Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06
दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धक्कादायक बातमी आहे.
धक्कादायक बातमी आहे. हॉस्पिटलमध्ये भरती झाल्याचे कळवल्यानंतरही त्यांच्या काही पोस्टस् इथे आत्ताआत्तापर्यंत वाचल्याचे आठवतेय. आणि आज एकदम ही बातमी. माबो वर मी इतर आयडींना प्रत्यक्षात ओळखत नसले तरीही काही जणांशी ऋणानुबंध जुळले असावेत असे वाटते.... त्यापैकी एक ब्लॅककॅट. माझ्या एका एड्स बद्दलच्या प्रश्नावर त्यांनी व्यवस्थित माहिती दिली होती जी मला खूप उपयोगी आली होती. त्यानंतर दोन वर्षांनंतरही आठवणीने त्यांनी मला चालू परिस्थितीबद्दल विपू मधून विचारले होते. त्यांची आजारपणाबद्दलची पोस्ट वाचली होती. काळजी घ्या चा प्रतिसाद टायपायला घेतला पण होता पण गडबडीत राहून गेला. खूप वाईट वाटतयं.
डॉक्टरांना भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
धक्कादायक बातमी! विनम्र
धक्कादायक बातमी! विनम्र श्रद्धांजली _/\_
Blackcat यांना विनम्र
Blackcat यांना विनम्र श्रद्धांजली _/\_
प्रत्येकाच्या रेसिपीच्या धाग्यावर हमखास प्रतिसाद द्यायचे.
खूप वाईट वाटले.
जामोप्या यांना भावपूर्ण
जामोप्या यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
" "
या स्मायलीचा वारेमाप वापर ही जणू जामोप्यांची माबोवरील ओळख होती. त्यांनी कितीतरी आयडी बदलले पण आपली ही ओळख कायम ठेवली असं मला वाटतं.
राजकीय चर्चेत पुराणकथेतील एखादा चपखल बसणारा संदर्भ देऊन असं एखादं वाक्य लिहून जायचे की ते वाचून नुसतं हसू फुटायचं.
या माणसानं पुराणातलं काय काय आणि किती वाचलेलं आहे असंही कधी वाटायचं.
त्यांची माबोवरील अनुपस्थिती कायम जाणवत राहील.
त्यांच्याबद्दल वेगळा धागा काढायला हवा. इथले काही निवडक प्रतिसाद तिथे हलवून पुढे त्यांच्या बद्दल इतर माहिती , अनुभव लिहिता येतील.>>>+१ सहमत. कुणीतरी असा धागा काढा.
ओह BLACKCAT तुम्ही नक्कीच
ओह BLACKCAT तुम्ही नक्कीच आठवणीत राहाल __/\__
त्यांच्या प्रतिसादातून असे जाणवले होते की ते एकल पालक असावेत.
मुलीला पुढच्या आयुष्यासाठी काही मदतीची गरज असल्यास , त्यांच्या संपर्कात असलेल्या माबोकरांनी माहिती द्यावी __/\__
Blackcat यांना श्रद्धांजली!
Blackcat यांना श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून बाहेर पडण्यासाठी बळ मिळो.
RIP blackcat.
RIP blackcat.
अरेरे,एकदम दुर्दैवी बातमी!
अरेरे,एकदम दुर्दैवी बातमी! Blackcat यांना श्रद्धांजली.
एकदम उत्साही असावेत.वेगवेगळ्या विषयांची चांगली माहिती होती.
सीमा,हीरा, निलूदा मदतीबाबत मला त्यात धरा.
खरेच blackcat यांच्यावर कोणीतरी वेगळा धागा काढा.
अतिशय धक्कादायक बातमी! २/३
अतिशय धक्कादायक बातमी! २/३ दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या आजारपणाबद्दल लिहिलेले आठवले आणि आज अचानक हे वाचले. मला त्यांच्या पोस्ट्स वाचायला खूप आवडे. व आवर्जून वाचायचे. विनोदबुद्धी व वन लायनर्स खूप छान असायचे. आज खूपच सुन्न वाटत आहे. मुलगी पण लहान आहे का ?
त्यांची माबोवरील अनुपस्थिती कायम जाणवत राहील.>> १००%
विनम्र श्रद्धांजली _/\_
भयानक सुन्न करणारी बातमी
भयानक सुन्न करणारी बातमी
शॉकिंग .. फारच धक्कादायक
शॉकिंग .. फारच धक्कादायक
डॉ साती यांची फेसबूक पोस्ट वाचून ईथे नेमके काय झाले चेक करायला आलो. वाद विवाद चर्चा.. अभ्यासू पोस्ट असायच्या .. त्यांची कमी नक्कीच जाणवणार.. हे जायचे वय नव्हते यार
फारच धक्कादायक! एक डॉक्टर
फारच धक्कादायक! एक डॉक्टर म्हणून शेवट पर्यंत आपले कर्तव्य करत राहीले. _/\_ . जामोप्या/ब्लॅककॅटना श्रद्धांजली. सुन्न व्हायला झाले आहे.
जामोप्या यांचे जुने लेखन.
जामोप्या यांचे जुने लेखन.
http://www.misalpav.com/user/2699/authored
खूपच वाईट बातमी! विनम्र
खूपच वाईट बातमी! विनम्र श्रद्धांजली!!
बऱ्याच दिवसांनी माबो उघडली
बऱ्याच दिवसांनी माबो उघडली आणि ही बातमी कळली. अतिशय धक्कादायक आणि दुःखद बातमी!
ब्लॅककॅट यांच्याशी माबोवर अनेक वेळा संवाद झाला. त्यांचे हजरजबाबी आणि उपयोगी असे प्रतिसाद लक्षात राहतील.
हे दुःख सहन करण्याची शक्ती देव त्यांच्या कुटुंबीयांना देवो!
ब्लॅककॅट यांना श्रद्धांजली __/\__
लिहीताना देखील प्रचंड वाईट वाटते आहे. मायबोलीवर वावरताना त्यांची आठवण येत राहील.
विनम्र श्रद्धांजली !
विनम्र श्रद्धांजली !
या धाग्यावर इतकी प्रतिसाद
या धाग्यावर इतकी प्रतिसाद संख्या बघूनच चर्र झालं. घाबरतच धागा उघडला. फार वाईट झालं.
ब्लॅककॅट याच नावाने ते मला माहीत होते. संवाद वा प्रत्यक्ष ओळख नव्हती पण प्रतिसादांतून त्यांचं हरहुन्नरी आणि संयत व्यक्तिमत्व जाणवत असे. त्यांची उणीव मायबोलीवर कायम जाणवत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली.
श्रद्धांजली !!!
श्रद्धांजली !!!
जामोप्या आणि ब्लॅककॅट कनेक्शन
जामोप्या आणि ब्लॅककॅट कनेक्शन माहित नव्हतं. दु:खद बातमी श्रद्धांजली!!
ब्लॅककॅॅटना भावपूर्ण
ब्लॅककॅॅटना भावपूर्ण श्रद्धांजली..
त्यांचं असं अकाली निघूून जााणे मनाला चटका लावणारे आहे.
ब्लॅक कॅट ना विनम्र
ब्लॅक कॅट ना विनम्र श्रद्धांजली, फारच धक्कादायक बातमी, त्यांची गैर हजेरी नेहमीच जाणवत राहील.
जामोप्यांना श्रद्धांजली.
जामोप्यांना श्रद्धांजली.
यांच्या जाण्याबद्दल दुसरीकडुन समजलं. खर नसावं म्हणुन माबोवर चेक केलं तर दुर्दैवाने खर ठरलं.
खूपच धक्कादायक बातमी, विश्वास
खूपच धक्कादायक बातमी, विश्वास बसत नाहीये.. ब्लॅककॅट ना विनम्र आदरांजली _/\_ त्यांच्या बद्दल हे असे काहीतरी लिहिताना एकदम गलबलून आलं
अतिशय दुर्दैवी बातमी.
अतिशय दुर्दैवी बातमी. मायबोलीवर रोखठोक, हातचं काहि राखुन न ठेवता मत मांडणार्यां मधलं एक ठोस व्यक्तिमत्व. डॉ. गजानन कागलकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
डॉ. गजानन कागलकर यांना
डॉ. गजानन कागलकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
जागोमोहनप्यारे यांच्याबद्दल
जागोमोहनप्यारे यांच्याबद्दल समजल्यावर खरंच धक्का बसला. विश्वास ठेवायला जड गेले.
त्यांच्याशी मायबोलीवर थेट संवाद फारच कमी वेळा झाला असेल. पण त्यांच्या पोष्टी / रेसिपीज नजरेस पडल्या की आवर्जून वाचल्या जायच्या. मला मायबोलीवर यायला फार मिळत नाही तरीही अलीकडचा त्यांचा सांडग्यांवरचा बाफ त्या सवयीतूनच फॉलो केला गेला. पूर्वी (साधारण २००५-०६ च्या सुमारास) ते इथे 'रागांवर आधारित गाणी' नावाच्या एका धाग्यावर मराठी/हिंदी गाण्यांमध्ये वापरल्या गेलेल्या शास्त्रीय रागांवर लिहायचे. एखाद्या गाण्यात मुख्य रागाबाहेरच्या घेतलेल्या स्वरांबद्दल ते सहज बोलून जात. ते बघून त्यांच्याबद्दल आदर/कौतुक वाटे. त्यांच्या गाण्यांवरच्या पोष्टींवरून ते ए. आर. रहमानचे चाहते आहेत असे वाटे.
जामोप्या यांना श्रद्धांजली.
सोशल मीडिया वरच्या
सोशल मीडिया वरच्या राजकारणाच्या समाजकारणाच्या गप्पा आणि धागे म्हणजे चावडीवरच्या किंवा पिंपळाच्या पाराच्या गप्पा. तिथे मध्यमवर्गीय शिष्टसंमत बोलणे, खोल comprehensive balanced विचार इत्यादी अपेक्षा misplaced आहेत. पारावरच्या गप्पा एकाच वेळी comforting व discomforting असतात म्हणून आवश्यक असतात. आपल्याला grounded ठेवतात. गेली काही वर्षे मायबोलीच्या राजकारण धाग्यांवर ब्लॅककॅट एक राजकीय भूमिका persistetnly लावून धरत होते. सध्याच्या काळात चावडीवर ब्लॅककॅट सारखे नेहमी टोकणारे व टिकणारे असणेचे महत्व माझ्यासारख्या चावडीवर गप्पा फक्त ऐकायला येणाऱ्या लोकांसाठी किती आहे शब्दात सांगू शकत नाही. त्यांचे सगळे विचार पटले नाहीत (e.g. स्त्री मुक्ती). पारावर ते चालायचेच. पारावरच्या गप्पा ऐकून हृदय परिवर्तन होईल असे illusion त्यांना नसणार याची खात्री आहे. That's why the significance of what he was doing cannot be denied. He will be sorely missed.
ब्लॅक कॅट यांना आदरांजली.
ब्लॅक कॅट यांना आदरांजली. परमेश्वर कुटूंबियांना या धक्क्यातून सावरण्याचे बळ देवो.
ब्लॅक कॅट यांना श्रद्धांजली.
ब्लॅक कॅट यांना श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
अरेरे..अतिशय धक्कादायक आणि
अरेरे..अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी.
डॉ. कागलकरांना विनम्र श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
Pages