दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वामन काळे यांना श्रद्धांजली.
सांगली आकाशवाणी किंवा काळेंचा आवाज कधीच ऐकला नाहीये पण माणुस ओळखीचा नसला तरी निवेदकांबद्दल एक प्रचंड आस्था आणि नॉस्टॅल्जिया आहे. त्यांच्या आवाजाने दिवसाची सुरवात, केवळ आवाजावरून व्यक्तीची असलेली ओळख, तेव्हा गुगल वगैरे नसल्याने ते कसे दिसतात हेही माहित नसे. पण सगळ्या निवेदकांचे सुस्पष्ट उच्चार, लकबी, आवाजाचे चढउतार चांगलेच लक्षात आहेत.
चर्मकाराची आठवण हृद्य आहे.

मोराबा नदी वरील पुल अपघात असू किंवा सेवूल मधील दुर्घटना .
ही प्रशासन च्या निष्काळजी पना मुळेच घडल्या आहेत
फक्त श्रद्धांजली वाहून काही उपयोग नाही.

सर्व संबंधित अपराधी लोकांना पकडुन सर्वात कठोर शिक्षा कमीत कमी वेळात होणे गरजेचे आहे.

ओह! Sad अलीकडे त्यांनी स्वत:चे युट्युबवर चॅनलवरून सुदधा काही एपिसोड दिले होते. जिंदादिल सतत हसतमुख चेहरा काळाच्या पडद्याआड गेला _/\_

तबस्सुम , आस्थेने सादरिकरण करणारी गोष्टीवेल्हाळ मावशी वाटायची. _()_ भावपूर्ण श्रद्धांजली.

( ट्विंकल खन्नाच्या Tweak यूट्यूब वाहिनीवरील एका मुलाखतीत करण जोहरने सांगितले होते की त्याला मोठं होऊन 'तबस्सुम' व्हायचं होतं. त्याच्या टॉक शो मागची प्रेरणा होती.)

लोकसत्ता मध्ये बातमी आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं ८२ व्या वर्षी निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास.
>> श्रद्धांजली

गोखले यांच्यावर अजून उपचार चालू आहेत.
निधनाच्या बातमीत तथ्य नाही असे आत्ता पुणे आकाशवाणी वरील आठच्या बातम्यांमध्ये सांगितले

त्यांची द्विधाता ही मालिका त्या एज मध्ये एकदम वेगळी होती.त्यावेळी तश्या थ्रिलर्स नव्हत्या.
82 वे वर्षं: परिपूर्ण समाधानी आयुष्य जगले असावे अशी आशा करू.भावपूर्ण श्रद्धांजली.

Pages