दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निशीकांत देशपांडे आणी जामोप्या ? Sad Sad विश्वासच बसत नाहीये. बर्‍याच दिवसांनी माबोवर आले. काल की परवा रानभुलीने लिहीलेले वाचुन लक्षात येईना. पण आज हा बाफ आत्ताच दिसल्यावर कळले.

जमोप्यांना अचानक काय झाले? किती वाद व्हायचे आमचे पण त्यांचे सडेतोड मर्मिक लिखाण पण आवडायचे. देव या दोघांना शांती देवो नी जामोप्यांच्या मुलीला नीट आधार मिळो.

आभासी जगतात स्क्रीनवरचा आयडी आणि त्याच्यामागची व्यक्ती यात फरक केला पाहीजे असे तीव्रतेने वाटले.>>>>>> अनुमोदन द्यायची ही वेळ नाही, पण हे १००० टक्के खरे आहे. Sad

मला निशिकांत देशपांडे काकांचे वीकेंड/वीकली लिखाण फार आवडायचे. सहसा दर शुक्रवारपासून सुलेखा तळवलकरांच्या Youtube चॅनेल वर शनिवारी कुणाची मुलाखत असणार आणि निशिकांत काका मायबोलीवर काय लिहिणार ह्याची उत्सुकता असते (असायची).

अरे बाप रे! पुन्हा एकदा या धाग्यावर भरपूर प्रतिसाद बघून शंकेची पाल चुकचुकली होती आणि अतिशय वाईट बातमी दिसली. निशिकांत यांच्या कविता आणि गझला नियमित वाचत होतो. भावपूर्ण श्रद्धांजली.

भावपूर्ण श्रद्धांजली!
मायबोलीवर जरी खूप ऐक्टिव्हली लिहीत नसले तरी आयुष्याचा महत्वाचा कोपरा मायबोली ने व्यापलाय. प्रत्यक्षात भेटलो नाही तरी येथील प्रत्येक जण ओळखीचा वाटतो. आधी ब्लॅककॅट आणि आता निशिकांत देशपांडे याच्या बद्दल वाचुन खरंच धक्का बसला. या दोघांच्याही जवळच्या माणसांना यातून सावरायच बळ मिळो

मुलायमसिंहांबद्दल लोकसत्तेने छापलेला अग्रलेख नाही आवडला.

सहसा मृत व्यक्तिबद्दल चांगले लिहिले जाते आणि इतरांसोबत तूलना करुन लिहिली तर निश्चितच हे पथ्य पाळतात.

https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/samajwadi-party-founder-mu...

इथे हे पाळलेले दिसत नाहीये.

लालू आणि त्यांच्यात एक महत्त्वाचा फरक आहे. तो असा की आपले ‘झाकून’ ठेवण्यासाठी लालूंनी बदलत्या राजकीय वाऱ्यांना आपल्या शिडात भरून आपले जहाज पुढे ढकलण्याचा उद्योग कधी केला नाही. मुलायम यांनी मात्र चातुर्य दाखवत भाजपशी जुळवून घेतले.

एकतर हे लिहायची गरज नव्हती शिवाय हे असत्य देखील आहे. लालूंनी कित्येक वर्षे काँग्रेस विरोध केला आणि नंतर पुन्हा काँग्रेस सोबत सत्ता स्थापन केली असे असताना मुलायम यांच्यावर टीका आणि त्याच कारणाकरिता लालूंचे कौतूक लोकसत्तेला शोभत नाही.

त्यानंतर पुन्हा मृत्यूलेखात अस्थानी अशी ही विधाने -

महिलांविषयी मुलायमसिंह यांचा पवित्रा पुरोगामी होता असे म्हणता येणार नाही. बलात्काराचा इतका बाऊ करण्याचे कारण नाही, अशा अर्थाचे विधान करत ‘होतात मुलांकडून चुका कधी कधी’ असे म्हणण्याइतका कमालीचा बेजबाबदारपणा मुलायमसिंह यांनी वयाच्या पंचाहत्तरीत दाखवला होता, याकडे दुर्लक्ष करणे अवघड. त्यांच्या या भयानक विधानाची दखल संयुक्त राष्ट्रालाही घ्यावी लागली होती.

ही विधाने अप्रस्तुत तर आहेतच शिवाय पूर्णपणे सत्य देखील नाहीत. मुलायम यांनी सरसकट बलात्कार्‍यांचे समर्थन केले नव्हते तर अनेकदा तरुण मुले ही अल्पवयीन मुलीसोबत तिच्या मर्जीनेच संबंध ठेवतात पण नंतर लग्न केले नाही की मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या मर्जीने घडलेला संबंध देखील ती बलात्काराचा गुन्हा म्हणून नोंदविते. जसे की साडे सतरा वर्षाचा मुलगा जेव्हा बलात्कार करतो तेव्हा तो अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेत बालसुधारगृहात जातो तसेच साडेसतराची तरुणी प्रियकराला गजाआड पोचविते. अशा प्रकरणांतील तरुण मुलांनी लग्नाची तयारी नसताना स्वतःच्या प्रेयसी सोबत ठेवलेल्या संबंधांबद्दल ‘होतात मुलांकडून चुका कधी कधी’ असे विधान मुलायम यांनी केले होते. त्यावेळी खप वाढविण्याकरिता प्रसारमाध्यमांनी त्यांच्या विधानाचा विपर्यास केला होता. पण आता त्यांच्या मृत्यूनंतर तरी लोकसत्ताने हे विधान छापायला नको होते किंवा निदान संपूर्ण स्पष्टीकरणासह छापून त्यांच्यावरील हा कलंक मरणोत्तर का असेना पण पुसायला हवा होता. कितीही मूर्खशिरोमणी आणि कोणत्याही पक्षाचा नेता असला तरी तो कधीतरी बलात्कार्‍यांचे समर्थन करेल काय? बलात्कार या गुन्ह्याबद्दल जनमानसात इतकी घृणा आहे की त्याचे आणि पक्षाचे राजकीय भविष्य शून्य होईल इतपत सामान्य ज्ञान प्रसारमाध्यमांना नसेल कदाचित पण नेत्यांना नक्कीच असते.

कोणत्याही पक्षाचा नेता असला तरी तो कधीतरी बलात्कार्‍यांचे समर्थन करेल काय? >> या धाग्यावर अप्रस्तुत आहे, पण बरेच केसेस मधे बलात्कारी आरोपिंच्या समर्थनार्थ आमदार्/खासदार रस्त्यवर उतरलेले आपण पाहिले नसावेत. असो

रॉबी कोल्टरेन, म्हणजे हॅरी पॉटर मालिकेतला हॅग्रीड, ह्यांचे ७२व्या वर्षी निधन झाले.

हॅरी पॉटर सोबत, ओशन्स १२ मध्ये एक लहान भूमिका त्यांनी केलेली ती लक्षात आहे.

सांगली आकाशवाणीचे पूर्वीचे प्रसिद्ध निवेदक वामन काळे यांचे दोन-तीन आठवड्यापूर्वी (९ ऑक्टोबर २०२२) दु:खद निधन झाल्याची बातमी आज वाचायला मिळाली. वाईट वाटले. लहानपणी खूप खूप ऐकलेला आणि परिचित आवाज. स्वच्छ सुस्पष्ट उच्चार, अतिशय परिणामकारक निवेदन. अतिशय लोकप्रिय निवेदक होते. श्रोत्यांच्या ह्रदयावर त्यांनी अनेक दशके अधिराज्य गाजवले.

त्यांनीच एका मुलाखतीत एक ह्र्द्यस्पर्शी आठवण सांगितली होती. एका वयोवृद्ध चर्मकाराने त्यांना पत्र पाठवले होते आणि त्या पत्रात लिहिले होते "तुमचा आवाज आणि तुम्ही सादर केलेले कार्यक्रम ऐकणे हाच आयुष्यातला आनंद आता माझ्यासाठी शिल्लक राहिला आहे. केवळ त्यावरच आता जगण्याची उमेद मिळत आहे. तुमच्या पायाचा आकार एका कागदावर काढून पाठवा, तुमच्यासाठी माझ्या हाताने पादत्राणे बनवून ती तुम्हाला भेट म्हणून पाठवण्याची आयुष्यातली अखेरची इच्छा आहे".

अजून एका प्रसंगी त्यांनी आकाशवाणीचा प्रोटोकॉल ब्रेक करून कोल्हापूरच्या सिव्हील हॉस्पिटल मधील एका मुलीस ठराविक रक्तगटाची तातडीने गरज असल्याची उद्घोषणा रेडिओवरून "आपली आवड" या कार्यक्रमात केली होती. वास्तविक अशी उद्घोषणा करता येत नाही आणि तातडीने काही करायचे असेल तर त्यासाठी वरिष्ठांची परवानगी आवश्यक असते. पण हाताशी तितका वेळ नव्हता. पण त्या मुलीच्या पित्याचा सतत येणारा फोन आणि एकूण परिस्थितीचे गांभीर्य पाहून काळेसाहेबांनी परस्परच हा निर्णय घेतला होता. त्यावर आकाशवाणीचे वरिष्ठ अधिकारी नाराज झाले होते. सगळेच तणावात होते. पण दुसऱ्याच दिवशी त्या मुलीच्या पित्याचा फोन आला. काळे साहेबांमुळे आपल्या मुलीला वेळेत रक्त मिळाले व तिचे प्राण वाचल्याचे त्याने फोनवर रडतरडतच सांगितले.

लोकांचे इतके प्रेम मिळालेला निवेदक विरळाच. आज गुगलवर सहज म्हणून वामन काळेंचे नाव शोधले आणि हिच बातमी दिसली वाईट वाटले Sad भावपूर्ण श्रद्धांजली

आदरांजली _/\_
सांगली आकाशवाणी कधी ऐकली नसल्यामुळे वामन काळे हे नाव परिचयाचं नाही. पण तुमच्या पोस्टवरून कल्पना आली, किती लोकप्रिय आणि सज्जन होते त्याची.

इथे डीजे हल्ली लिहीत नाहीत का? त्यांनी सांगली आकाशवाणीबद्दल लेख लिहिला होता तो आठवला.
https://www.maayboli.com/node/73389

Pages