दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राहुल तुमची पोस्ट वाचून जीव कळवळला. तुमच्या भावना पोहोचल्या. देव आईंना खूप छान पुढील आयुष्य देवो हीच प्रार्थना..... सहमत.

राहुल तुमची पोस्ट वाचून जीव कळवळला. तुमच्या भावना पोहोचल्या. देव आईंना खूप छान पुढील आयुष्य देवो हीच प्रार्थना..... सहमत.

रघुवीर नेवरेकर >>> धन्यवाद, काही केल्या नाव आठवेना .

राहुल, तुमच्या आईंना निरोगी दीर्घायुष्यासाठी खूप शुभेच्छा! अमा, तुम्हालाही! >>> मम. अमांची पोस्ट वाचली नाही पण अंदाज आला.

राहुल, आई आणि बाबा दोघांनाही खूप शुभेच्छा! अतिशय आनंदी समाधानी आयुष्य त्यांना मिळावे.
विक्रम गोखले प्रकृतीत सुधारणा होवो अशी प्रार्थना

राहुल, वेगळा धागा काढुन तिथे सुद्धा ही पोस्ट द्या. अमांना पण तिथे लिहिता येईल. तुमच्या आई बाबांना दीर्घायुष्यासाठी सदिच्छा.

राहुल, तुम्ही बरंच काही पाहिलंय. तुम्हांला तुमच्या आईबाबांची सोबत खूप काळ लाभो. त्यांना उत्तम आरोग्य मिळो. आपल्यातल्या अनेकांना असं काही बोलायचं असतं, पण ऐकणारं कोणी असतंच असं नाही. मायबोलीवरचे गप्प्पंचे वाहते धागे यासाठी आधी चांगले होते.
अशा गोष्टी वाहत्या धाग्यांवर , क्लोज्ड ग्रुपमध्ये लिहिलेल्या बर्‍या असं मला वाटतं. अर्थात प्रत्येकालाच तसं वाटलं पाहिजे हा आग्रह नाही.

कमाल आहे राहुल तुमच्या मातोश्रींची आणि तुमच्या सगळ्यांच्या धैर्याची. त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो.

अहो srd, तुमचे मत अगदीच चुकीचे नाही. वेन्टीलेटर म्हणजे तांत्रिक जीवनच आहे. आईला ऐन वेळेवर वेन्टीलेटर म्हणजेच कुत्रिम जीवनरक्षा प्रणालीवर ठेवले नसते किंवा आम्ही डॉक्टरांना नकार दिला असता तर ती नक्कीच वाचली नसती. वेन्टीलेटरवर ठेवण्यापूर्वी त्यांनी आम्हाला सगळे फायदे व तोटे समजावून सांगितले होते. मगच आम्ही होकार दिला. वेन्टीलेटरवर ठेवल्याने डॉक्टरांना बर्याच गोष्टी मॅनेज करायला सोप्या जातात. पुढे होऊ शकणार्या गुंतागुंती टाळल्या जाऊ शकतात. तरी समजा झाल्याच तर उपचार देणे सोपे होते. खरं तर त्या काळात शरीरच यंत्रवत झाले असते. मात्र एकूणच हॉस्पीटलायशेनचा खर्च चार-पाच पट वाढतो. शिवाय रूग्ण बराच काळ कुत्रिम प्रणालीवर असल्याने, आयसीयूत सतत एसीत राहल्याने व शरीराची काहीच हालचाल न होता मृतप्रेतवत पडून असल्याने (यथाकदाचीत बरा झाल्यास) मस्क्युलर डीस्ट्रोफी होऊन स्यूडोपॅरालाईज्ड झाला असतो. त्यातून सामान्य स्थितीवर यायला बराच कालावधी लागतो. माझ्या आईला सुमारे तीन महीने लागले. त्यानंतर हिंडाफिरायला लागली.

कमाल आहे राहुल तुमच्या मातोश्रींची आणि तुमच्या सगळ्यांच्या धैर्याची. त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो>> +१
विक्रम गोखलेच्या तब्येतित सुधारणा होतेय हे खरच चान्गलय
पण ,अशा व्यकिवर स्वत:ला प्रसिद्धी मिळावी म्हणून वागळे सारख्या निच माणसाने गलिच्छ भाषेत टिका केलीये, वर नातेवाइकानाही ओढलय त्यात ते वाचुन भयकर चिडचिड झाली.

ओह!

ओहह, वाईट बातमी. श्रद्धांजली.

ह्यांच्या कुटुंबाची एक आठवण म्हणजे, चाळीस वर्षांपूर्वी वगैरे त्यांचा prgm बडोद्यात ब्राह्मणसभेत झाला होता. तिथे माझे आजोबा मॅनेजर होते आणि आजी आजोबांना राहायला दोन खोल्या होत्या. बाकी मजल्यावरच्या खोल्या students, तिथे कार्यक्रम करायला येणारे यांच्यासाठी होत्या. तेव्हा मोठी मोठी लोकं अशी राहायला राजी असायची, अमुक स्टार हॉटेल हवं म्हणायची नाहीत. असं हे कुटुंब राहिलेलं दोन दिवस आणि गप्पा मारायला आजी आजोबांकडे जायचे सर्व. अगदी डाउन टू अर्थ सुलोचनाबाई आणि कुटुंब. नंतर कधी बडोद्यात दुसरीकडे कार्यक्रम असला तरी आजी आजोबांना भेटायला जायचे ब्राह्मणसभेत.

भावपूर्ण श्रद्धांजली! ___/\____
इतकी मोठी कलाकार परंतु अत्यंत साधे रहाणी मान!
ह्यांची आठवण म्हणजे आमच्या गांवांत बर्‍याच वर्षांपुर्वी कार्यक्रम झाला तेंव्हा आल्या होत्या. एस्टीच्या लाल डब्याने संपूर्ण वाद्यवृंदासह आल्या आणि गेल्या होत्या. पुणे गाडीची वाट पहात होत्या आमच्या छोट्याश्या एस टी स्टँडवर!

सुलोचना चव्हाण ह्या महाराष्ट्र ची शान आहेत.

त्यांची गाणी म्हणजे स्वर्गीय सुखाची अनुभती.

महाराष्ट्रात अनेक रत्न जन्माला आली त्या मधील एक दुर्मिळ रत्न म्हणजे सुलोचना जी

Pages