Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05
आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फिलाडेल्फियावरून हिंदीत एक
फिलाडेल्फियावरून हिंदीत एक चित्रपट आला होता. शिल्पा शेट्टी, अभिषेक बच्चन. सलमान पाहुणा कलाकार.
फिलाडेल्फियावरून हिंदीत एक
फिलाडेल्फियावरून हिंदीत एक चित्रपट आला होता. शिल्पा शेट्टी, अभिषेक बच्चन. सलमान पाहुणा कलाकार.>>>
फिर मिलेंगे
हिंदी लाल सिंग मध्ये पण
हिंदी लाल सिंग मध्ये पण हिरोईन मरते का ?
सिनेमा जसाच्या तसा उचलला असेल
सिनेमा जसाच्या तसा उचलला असेल तर मरायला पाहिजे
नशीब मी फॉरेस्ट गंप हा
नशीब मी फॉरेस्ट गंप हा ब्लॅककॅटच्या वरच्या कमेंटच्या आधी पाहिला आहे. नाहीतर सॉल्लिड चिडलो असतो सस्पेन्स गेला म्हणून
यु ट्यूबवर त्याच दिवशी
यु ट्यूबवर त्याच दिवशी movie explained in hindi चे व्हिडीओ येतात
मी त्यात 16 मिनिटांचा फॉरेस्ट गंप बघितला
मग लाल सिंग अर्धाच पाहिला
पण त्यात झिंगे पकडण्याचा उद्योग असतो , ह्यात चड्डी शिवायचा
सिरियसली??
सिरियसली??
चड्डी शिवायचा? आणि त्याची मोठी इंडस्ट्री होते असं दाखवलं आहे??
श्या या मूर्ख बहिष्कार लोकांनी उगाच हवा केलीय सिनेमाची
हा मुवि असाही अपटायला हवा होता
मूर्खाचा बाजार नुसता
हम्म है राही प्यार के मध्ये
हम्म है राही प्यार के मध्ये शर्ट शिवत असतो, ह्यात चड्ड्या
लोकहो चड्डाला वेगळा धागा
लोकहो चड्डाला तो वेगळा धागा वापरा
नाहीतर हा सुद्धा चड्डा हायजॅक करायचा.
अजून कोणी मायबोलीवरचे बघून नाही आले तर ही चर्चा आहे.
लोकहो चड्डाला तो वेगळा धागा
लोकहो चड्डाला तो वेगळा धागा वापरा
नाहीतर हा सुद्धा चड्डा हायजॅक करायचा.>>>>
सगळे धागे हायजॅक केल्यावर सर आपल्या धाग्याची रिक्षा फिरवताना बघून कसंस होतंय
सर हा चित्रपटाचा धागा आहे, आणि ही चर्चा चित्रपट विषयक आहे
त्यामुळे आपण काळजी करू नका
सिरियसली??
सिरियसली??
चड्डी शिवायचा? आणि त्याची मोठी इंडस्ट्री होते असं दाखवलं आहे?? >> मिठाईचा उद्योग असतो ना यात ?
आता हे लोक चड्डीवर पण बॉयकॉट
सर आता 'फक्त लाल सिंग चड्डा या चित्रपटाच्या मेरिट्स-डिमेरिट्स- मायनस पॉलिटिक्स' वर चर्चा करायला एक तिसरा धागा काढा
(सर खरंच काढतील सुद्धा)
आशुचँप, श्रिंप ची चड्डी केली
आशुचँप, श्रिंप ची चड्डी केली हे प्रचंड विनोदी असलं तरी त्याने काही फार फरक पडतो असं पिक्चर बघायच्या आधी तरी वाटत नाही. फक्त आता बुबा... बेबी चड्डी, लाँजरे, अॅडल्ट डायपर, डिझायनर बीच वेअर, बिकीनी, स्विम सुट, व्होक्टोरिआ सिक्रेट असं बोलून बोलून किती बोलणार याचं एक बारिक टेंशन आलय मला! पण ते एक राहुद्या!
बघायचा मुहुर्त सापडेना. समर असल्याकारणाने दिवसाचा वेळ थेटर मध्ये वाया घालवावासा वाटत नाही. बघू रात्री जमतंय का.
स्पॅायलर……
स्पॅायलर……
चड्डी शिवायचा? आणि त्याची मोठी इंडस्ट्री होते असं दाखवलं आहे?? >> मिठाईचा उद्योग असतो ना यात ?>>> नाही. Rupa चड्डी-बनियन
लाल सिंग चड्ढा , एकदाचा हा
लाल सिंग चड्ढा , एकदाचा हा चित्रपट काल पाहिला. forrest gump चे हक्क रीतसर विकत घेऊन चित्रपट काढला ह्याचे कौतुक होते पण अमीर खानला ट्रेलर मध्ये 'acting!' करतांना पाहून तितकीच धाकधूक होती. तर चिकवा ,फॉरेस्ट गम्प ची चाहती म्हणून मनस्वी दुःख झाले कि एव्हडे हक्क वगैरे विकत घेऊन त्या चित्रपटाचा मूळ गाभाच समजला आहे कि नाही ही शंका येतेय. लाल सिंग पासून फॉरेस्ट वेगळा केला तर मग मला स्वतंत्रपणे लाल सिंग चड्ढा हा चित्रपट अजिबात समजलाच नाही. अगदी 'कहना क्या चाहते हो भाई' झालं. अमीर खान वगळता सर्वांची acting चांगली आहे. पण चांगला चित्रपण हा एका चांगल्या पटकथेच्या साहाय्याने फुलतो, इथे हि पटकथा दुसऱ्या सिनेमावर भेटण्याच्या नादात गोंधळ झाला आहे. फॉरेस्ट हा एक अति सामान्य माणूस होता ज्याने त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटना अनुभवल्या, त्यावर कोणतीही टिप्पणी किंवा analysis केला नाही. तो त्या घटना जगला आणि चित्रपटात शेजारी येऊन बसेल त्याला सांगितल्या. तो श्रोते जमा करून त्यांना इंप्रेस करत नव्हता. लाल सिंग चड्ढा हा बॉलीवूड हिरो असल्याने त्याला चड्डी बनियान पासून काहीही उत्तम करता येतं , आई पश्चात शेती सुद्धा. असो. मला नाही आवडला लहान सिंग चड्ढा
आशुचॅंप, सुप्रभात !
आशुचॅंप, सुप्रभात !
मला माझ्या धाग्यांची रिक्षा फिरवायला फार आवडते हे मान्य आहे.
पण चड्डा धाग्याचे त्रिशतक आधीच लागले आहे, तो सातत्याने वरच पहिल्या पाचात दिसतोय. त्यामुळे त्याची रिक्षा फिरवायची गरजच नाही हे तुम्हीही मान्यच कराल.
पण ज्या स्पीडने तिथे पोस्ट येत आहेत, तश्याच ईथेही येऊ लागल्या तर या धाग्यावरील दुसऱ्या चित्रपटांच्या चर्चा हरवून जातील म्हणून म्हटले ईतकेच.
तरी ज्यात राजकीय ॲंगल नाही अश्या लालसिंगचड्डापोस्ट ईथे जरूर लिहा.
पुढच्या शुक्करवारी नवीन विषय
पुढच्या शुक्करवारी नवीन विषय येतो
आत्ताच बघून आले
आत्ताच बघून आले
नॉट बॅड ! कॅरेक्टर्स चे भारतीयीकरण जमले आहे. ओरिजिनल मधल्या घटनांऐवजी भारतीय इतिहासातले जे माइलस्टोन घेतलेत ते हुषारीने घेतले आहेत. आमीर आणि करीना हे कास्टिंग मला (बघायच्या आधीही) अॅप्ट वाटले. थोडक्यात सांगायचे तर कुलकर्णीच्या पटकथेला मार्क द्यायला हरकत नाही
.
पण ...
स्पॉयलर्स :
.
.
.
.
पण .. ओरिजिनल शी तुलना तर होणारच इथे. टॉम हॅन्क्स च्या चेहर्यावर कसा एक इनोसन्स दिसतो आणि तो जे एफर्टलेसली फॉरेस्टच वाटतो त्याची सर आमीर च्या लाल सिंग ला नाही. त्याने काम चांगले केले नाही असे नाही पण तो "अॅक्टिंग" करतोय असे जाणवतेच. आमीर ने त्या आयब्रो़ज चे काहीतरी करायला हवं होतं. भुवया आश्चर्याने उडवल्यावर जशा होतात तशा कायमच्या आहेत त्याच्या भुवया. पूर्वी अशा असलेल्या आठवत नव्हत्या, काहीतरी कॉस्मेटिक सर्जरीचा परिणाम असावा कदाचित. पण तो लूक मला खटकत होता सारखा.
करीनाने काम चांगले केले आहे. पण अजून चांगले व्हायला वाव होता. जब वी मेट च्या गीत चा इनोसन्स आणि इमोशनल इन्टेन्सिटी यात असती तर छान झालं असतं ते कॅरेक्टर. ओरिजिनल सिनेमातली जेनी ही एखाद्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नासारखी गूढ, आकर्षक तरी वल्नरेबल वाटते. त्या मानाने यात ते कॅरेक्टर जरा (हिंदी सिनेमा टाइप) फ्लॅट झालेय.
एल्विस ऐवजी शाहरुख ही स्मार्ट आयडिआ होती. पण शाहरुख यंग असताना लालसिंग कडून "ती " सिग्नेचर स्टेप शिकला असे दाखवण्यासाठी सीजिआय वगैरे च्या मदतीने आताच्या शाहरुख ला यंग केले आहे असे दिसते (त्याच्याच "फॅन" सिनेमामधल्यासारखा लूक दिसला आहे.)त्यामुळे माझ्या मते तो कॅमिओ चांगला असला तरी तेवढा मेमरेबल झाला नाही. मोहमद हा पाकी सैनिक, त्याला कारगील मधे लाल सिंग चुकून वाचवतो असे दाखवले आहे ( असा ट्रॅक ओरिजिनल मधे आठवत नाही मला तरी) पण चांगली जमलीय ती स्टोरी लाइन.
मला नागा चैतन्य चा रोल ( बब्बा चे केरेक्टर) आणि ती स्टोरी लाइन सर्वात आवडली, अॅक्चुअली चड्डी बनियान स्टोरी फनी वाटते पण मस्त डेवलप केली आहे. नंतर त्याची "रुपा अंडरवेयर बनियान कंपनी" होते ते अगदी फिट्ट बसलेय !! बाला (नागा चैतन्य) त्याच्या सौदिन्डियन हिंदी अॅक्सेन्ट सकट खूपच लाइकेबल वाटतो. दुसरा आवडलेला रोल म्हणाजे मोना सिंग चा. लालसिंग ची आई. मस्त काम केलेय तिने.
बाकी आठ्वेल तसे लिहीन.
आणि हो, मला तरी हिंदू धर्माचा अपमान, आर्मीचा अपमान असे काहीही जाणवले नाही
बघितलात सिनेमा ?
बघितलात सिनेमा ?
डिस्क्लेमर द्या
माझा आमिर खानच्या विचाराशी संबंध नाही इ इ इ
आणि यु ट्यूबवर बघितला तर डिस्क्लेमर कुणाच्या कानात जाऊन सांगायचे ?
बब्बा गम्प चे केरेक्टर >>
प्र का टा.
पल्वली आणि मैत्रेयी, छान आणि संतुलित प्रतिसाद.
भुवया आश्चर्याने उडवल्यावर
भुवया आश्चर्याने उडवल्यावर जशा होतात तशा कायमच्या आहेत त्याच्या भुवया. पूर्वी अशा असलेल्या आठवत नव्हत्या, काहीतरी कॉस्मेटिक सर्जरीचा परिणाम असावा कदाचित>>> नाही. चित्रपटासाठीच त्याने तसा (भुवया आणि ओठ ताणलेला) लूक ठेवलाय.(जो अजिबात आवडला नाही). इतर ठिकाणी, मुलाखतीत तो नॅार्मल दिसतोय.
अरे मै तू इथे लिहिलं होय! मी
अरे मै तू इथे लिहिलं होय! मी त्या गदारोळ धाग्यात लिहुन आलो
एकझॅक्टली! आमिरचा म्हातारा लुक ठीक वाटला मला. दाढी आणि लांब केस नसताना मध्ये डोळे आणि भुवया विचित्र वाटल्या. बाकी मला आवडला चित्रपट.
मै धन्यवाद, चित्रपट पाहून
पल्वली, मै धन्यवाद, चित्रपट पाहून लिहिणाऱ्यांचेच प्रतिसाद महत्वाचे
पण चड्डा धाग्याचे त्रिशतक
पण चड्डा धाग्याचे त्रिशतक आधीच लागले आहे, तो सातत्याने वरच पहिल्या पाचात दिसतोय. त्यामुळे त्याची रिक्षा फिरवायची गरजच नाही >>>>
नका फिरवू मग
लोकांना जिथं लिहायचं आहे तिथे लिहितील
तुमची फुकट फौजदारी बंद करा पहिले
गणेश मतकरीच्या रिव्ह्यूमधून-
गणेश मतकरीच्या रिव्ह्यूमधून-
रुपांतर तसं सेफ आहे. मॅकनमारा’ज मोरॅान्सचा दाखला देत त्यांच्याकडे मंद लोक आर्मीत घेतात, आपल्याकडे नाहीत वगैरे टिका मी वाचलेली आहे, पण तशी तर मी पथेर पांचाली देशाबाहेर पाठवू नका, तो भारताची बदनामी करतो अशी टिकाही वाचलेली आहे. सिनेमा ही डॅाक्युमेन्टरी नाही आणि संकल्पनेच्या पातळींवर तो काय मांडतोय हे पाहिलं तर लालचं आर्मीत असणं आपण चालवून घेऊ शकतो. यात थोडा दोष परफॅार्मन्सचा आहे कारण आमिर खानचे मॅनेरिझम लाल मधे थोडी वेडेपणाची झाक आणून देतात. प्रत्यक्षात लाल आर्मीच्या शिस्तीसाठी कॅाम्पिटन्ट आहे. त्याच्याकडून अपेक्षित सर्व गोष्टी तो करु शकतो आणि भाबडं असणं हा दोष नाही.
पटकथेत वादाच्या शक्यता जमतील तितक्या टाळलेल्या आहेत. मुस्लीम दहशतवाद्यांना दोष दिलाय , एकाला तर चक्क ( काहीशा अविश्वसनीय घडामोडींनंतर ) रिफॅार्म करुन टाकलय, आणीबाणी / मुंबईतल्या दंगली आणि दहशतवाद/ इंदिरा गांधींच्या हत्येनंतरचे शीखांवरचे हल्ले हे सारं दिसून गुजरात दंगली दिसत नाहीत, मोदीजींबद्दलही निवडणूकीचा आणि स्वच्छ भारत अभियानाचा पोस्टर असे सकारात्मक उल्लेखच आहेत, जेएफकेला भेटताना फॅारेस्टला घाईची शू लागलेली असते, तसले विनोदही इथे दिसत नाहीत.
आमिर खानचा अनइव्हन परफॅार्मन्स हा चित्रपटाचा एक दोष वाटतो आणि लांबी हा दुसरा. सेफ गेमच्या नादात त्यांनी थोडा दुरूनच इतिहास दाखवलाय असंही म्हणता येईल, आणि तो तिसरा पण मायनर दोष ठरेल. आमिर खान हा कामसू कलाकार आहे पण त्याच्या अभिनयाचा गुणात्मक दर्जा बेताचा आहे. तो गेट अप्सवर, अंगमेहनतीवर, अभ्यासावर भर देतो, पण स्टार्स जसे एका छोट्या रेंजमधे प्रभावी असतात तसच त्याचं आहे. लालची भूमिका त्या रेंजमधे करणं शक्य होतं पण त्याने व्यक्तीरेखेचा सूर पकडणं आवश्यक होतं. इथे कधी तो पकडला जातो तर कधी तो सुटून कॅरीकेचर होतं. आमिर खान टॅाम हॅंक्स सारखा दिसत असून टॅाम हॅंक्स अधिक मोठा अभिनेता का आहे याचं लाल सिंग चढ्ढा हे टेक्स्टबुक उदाहरण आहे. पण असं सगळं असून फिल्म पाहतांना मला कंटाळा आला नाही. मला हे शक्य तितक्या प्रामाणिकपणे केलेलं रुपांतर वाटलं. आता ते का केलं असं कोणी म्हणू शकेल, तर त्यावर का नाही, असं विचारता येईल. मूळ चित्रपट अभिजात मानला जातो, त्याला सर्वोत्कृष्ट फिल्म आणि अभिनेता यासह सहा ऑस्कर आहेत. मग त्याचं भारतीय रुप आपल्या प्रेक्षकांना दाखवावं असं दिग्दर्शक अद्वैत चंदन, रुपांतरकार अतुल कुलकर्णी आणि निर्माता/ स्टार आमिर खान यांना वाटलं तर ते समजण्यासारखं आहे. आता याचा अर्थ ते प्रत्येकाला आवडावं असं नाही. मला मात्र ते एका मर्यादेत आवडलं.
गणेश मतकरीच्या रिव्ह्यूमधून-
गणेश मतकरीच्या रिव्ह्यूमधून-
+११
सगळ्यांचे प्रामाणिक रिव्ह्यू
सगळ्यांचे प्रामाणिक रिव्ह्यू आवडले
मला फॉरेस्ट गंप विशेष क्लिक न झाल्याने (कदाचित नीट पाहिला नसावा) लाल सिंग बघायचा नव्हता.किंवा परत फक्त शीख गेटअप चा फरक करून पिकेच डोक्यावर मारला जाईल अशी भीती होती.
मुलीला बघायचा आहे.,पण आयुष्यात खूप काय काय चालू आहे.थोडं कमी झालं आणि तोवर पिक्चर राहिला तर दाखवेनच.
Submitted by maitreyee on 14
Submitted by maitreyee on 14 August, 2022 - 07:53 >> +१
वाचून पहावा का असे वाटले. आता पहावासा वाटतोय.
झनक झनक पायल बाजे पाहिला.
झनक झनक पायल बाजे पाहिला. गोपिकृष्णाचं नृत्य, शांतारामांचं दिग्दर्शन, संध्याने केलेलं नृत्य सगळंच सुंदर आहे. सुरुवातीची नावं जी येतात, त्या सगळ्या पाट्या रांगोळीत काढल्या आहेत आणि एकेक रांगोलीपुढे ट्रॉली फिरली आहे. मला वाटतं वेगळा धागाच काढावा यावर कधीतरी.
मतकरींचा रिव्ह्यू आवडला.
मतकरींचा रिव्ह्यू आवडला.
Pages