४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

<< टिचर जवळ बंदुक असती तर हे घडलेच नसते अस ह्या पालकांना वाटत. >>

------- हे लॉजिक मस्त आहे....

प्रत्येक शिक्षकाकडे बंदुक आहे असे मानले तर परिस्थिती बिघडण्याची पण शक्यता आहे.
गृहपाठ केला का?
नाही !
---- ठो ठो

अनेक कारणांनी शिकवणार्‍या शिक्षकांना पण राग येतो... एखादा विद्यार्थी/नी मुद्दाम आपल्याला त्रास देणारे प्रश्न विचारत आहे असे शिक्षकाला वाटल्यावर तो काय करेल?

पुढे प्रत्येक विद्द्यार्थ्याकडे गन द्यायची. सर्वांकडे गन असेल तेव्हाच पृथ्वीवर शांतता राहिल.

सुप्रीम कोर्टाने रो वि वेड उलथवले ! >> अ‍ॅट लीस्ट २०१६ पासून तयारी सुरू होती. मेरीक गारलँड आठवतोय का ? पण लक्षात कोण घेतो.

रिपब्लिकन्सची एक टर्म काय करते हे दिसत आहे.

पुढे बर्थ कंट्रोल वर बंदूक आहे. किती दुटप्पीपणा, गर्भपात आणि काँट्रॅसेप्शन दोन्हींचा विरोध करणार.
The conservative justice Clarence Thomas appeared to offer a preview of the court’s potential future rulings, suggesting the rightwing-controlled court may return to the issues of contraception access and marriage equality, threatening LGBTQ rights.

रिपब्लिकन पार्टी हि अधोगाम्यांची पार्टी आहे.

मी काही घटनेचा तज्ञ नाही, किंवा वकीलपण नाही.
पण मला वाटते की एका पक्षाचे मत असे की गर्भपात, समलिंगी विवाह, आणि इतर कित्येक गोष्टी या घटनेतल्या व्यक्तिस्वातंत्र्याखाली येतात.
दुसर्‍या पक्षाचे म्हणणे असे की तसे काही नाही.

आता घटनेचा अर्थ लावणे हे सुप्रीम कोर्टाने ठरवायचे असे असल्याने त्यांनी लावलेला अर्थ मान्य करायला पाहिजे.

तेंव्हा कुणा राज्याने गर्भपात, समलिंगी विवाह, आणि इतर कित्येक गोष्टी बेकायदेशीर केल्या तर त्या घटनेच्या विरुद्ध होणार नाहीत.
किंवा काही राज्यांनी गर्भपात, समलिंगी विवाह, आणि इतर कित्येक गोष्टी कायदेशीर केल्या तरी त्याला घटनाविरोधी म्हणता येणार नाही.

गर्भपात करू नये कारण तसे करणे म्हणजे खून होईल असे काही लोकांचे मत आहे. मनुष्यांच्या जीवाची काळजी आहे असे दाखवणारे लोक कधी कधी गर्भपात करणार्‍या डॉक्टरचा खून करतात, तेंव्हा ते कायदा आपल्या हातात घेताहेत, स्वतः पण खून करताहेत असले काही समजण्या इतकी अक्कलच नाही.

एकूणच सध्या या देशात अकलेचा फारच तुटवडा आहे, त्यामुळे देशातील लोकांसाठी काही उपयुक्त कामे होतील, अशी आशा नाही. फार तर भिंती बांधा, दुसर्‍या देशातील आपली एम्बॅसी इकडून तिकडे हलवा, युक्रेनमधे शस्त्रात्रे पुरवून युद्धाचा भडका उडवा असले धंदे करणारे लोक.

आजकाल निवडणुकांवर विश्वास न ठेवता निदर्शने करून, सगळ्यांवर खोटेनाटे आरोप करून सत्ता बळकवण्याचे प्रयत्न करणे असले प्रकार वाढले आहेत.
लवकरच पाकीस्तान किंवा इतर अफ्रिकन, दक्षिण अमेरिकन राज्यांप्रमाणे लष्करच सत्ता ताब्यात घेईल. किंवा यांच्या मूर्खपणामुळे आण्विक युद्ध!

मग नोस्त्रदामस च्या भविष्याप्रमाणे २०२९ साली काही भयंकर घटना घडतील, नि नंतर तीनशे वर्षे जगात शांतता!!!

रो वि वेड चे भयंकर परिणाम हळूहळू येत आहेत. एका दहा (!) वर्षाच्या गरोदर मुलीला गर्भपातासाठी दुसर्‍या राज्यात जावे लागले. ectopic pregnancy कधीही पूर्णत्वास जात नाही व मातेसाठी धोकादायक असते. पण आता डॉक्टर लोक लगेच उपाय करण्या ऐवजी वकीलांशी सल्ला मसलत करत आहेत. त्यात वेळही जातो व मातेसाठी धोकाही असतो.

ob gyn चे शून्य ज्ञान असलेल्या रिपब्लिकन म्हातार्‍या गोर्‍या पुरुषाच्या हातात निर्णय दिले की असेच होणार !

कॅन्सास मधल्या निकालाबद्दल काय मत लोकहो? ८ लाख रजिस्टर्ड रिपब्लिकन्स, ५ लाख कुंपणावरचे आणि फक्त ४ लाख डेम्स. इतके असूनही अ‍ॅबॉर्शन राइट्स ला उचलून धरले मतदारांनी! अजून चार राज्ये यावर मत घेणार आहेत, त्यात केंटकी व मॉण्टाना ही दोन हा ट्रेन्ड आहे का ते सांगतील. कॅलिफोर्निया आणि व्हरमॉण्ट मधे सपोर्ट अपेक्षितच आहे.

बायडेननेही जेथे बंदी आहे तेथून इतर राज्यांत जायला मेडिकेड फंडातून निधी उपलब्ध करून देण्याची एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढली आहे. पण त्याला काही लीगल बॅरियर्स आहेत.

कॅन्सास मधल्या निकालाबद्दल काय मत लोकहो? >> आपल्या मतापेक्षा रिपब्लिकन्स होंचो कडून काय किम्मत दिली जाईल ह्याला अधिक मह्त्व आहे.

मी बस सर्व्हिस सुरू करतोय. रेड स्टेट्स टू (तुमच्या चॉईस चे) ब्लू स्टेट अँड बॅक. जाताना शंभर प्याशिंजर नेणार. येताना पन्नास.

मी बस सर्व्हिस सुरू करतोय. रेड स्टेट्स टू (तुमच्या चॉईस चे) ब्लू स्टेट अँड बॅक. जाताना शंभर प्याशिंजर नेणार. येताना पन्नास. >> टेक्सास मधे करत असाल तर सांगा, तुम्हाला सू करून मिळणार्‍या पैशामधे प्लॅ.पॅ. ला मदत करता येईल Lol

हो पण रिपब्लिकन होंचो इथे नाहीत. म्हणून इथले मत >> त्या मता मधे बोगस मतदान झाले आहे Lol

मी एक दुर्बीण आणून शेजार्‍यांच्या खिडकीतून निरिक्षण करणार व एखाद्या पुरुषाला एच एम करताना पकडले तर त्याने हजारो बाळांचा खून केला म्हणून पोलिसात तक्रार करणार !
( अँडमिन नी प्रतिसाद अयोग्य वाटला तर उडवावा ! )

टेक्सास बाणेदार राज्य असल्यामूळे फेडरल मदत घेत नाही हो , सांभाळून बससर्व्हिस चालवा Lol

बाय द वे अ‍ॅलेक्स जोन्स च्या लॉयर्सनी चुकून त्याच्या फोन मधले सगळे मेसेजेस प्रतिपक्षाच्या लॉयर्सना पाठवले म्हणे Happy आणि त्यांनी उलटे चेक केले एकदा विचारायला की ही माहिती गोपनीय आहे का, तर त्यालाही उत्तर दिले नाही. म्हणजे एकतर हे लोक फारच दिलदार आहेत किंवा ते २०२० च्या निवडणुकीबद्दल बाहेर (व फोर सीझन्स हॉटेल ऐवजी फोर सीझन्स लॅण्डस्केपिंगच्या दारात) अफाट क्लेम करणारे पण प्रत्यक्षात लीगल केस मधे दम नसणारे लॉयर्स आहेत.

अल्ट्रा हार्डकोअर ख्रिश्चन सुद्धा कंसेप्शन नंतरच लाईफ सुरू होतं असं मानतात. पोलिसात तक्रार करून फायदा नाही.
हां आता पुरूषांचं निरीक्षण करायला निमित्तच पाहिजे असेल तर... Wink

जेव्हढे त्या जुन्या राष्ट्राध्यक्षाच्या मागे लागतील तेव्हढे त्याचे भक्त वाढतील.
म्हणे की अरिझोनामधे सशस्त्र लोक एफ बी आय च्या कचेरीसमोर जमले होते! २०१६ निवडणुकी पूर्वी असेच लोक त्याच्या मागे लागले नि त्याला आपोआप जास्तच प्रसिद्धी मिळाली. लोकांच्या अजून लक्षात येत नाही की या देशातले अर्धे लोक महामूर्ख, अज्ञानी आहेत, ४५ टक्के पैशाच्या नि सत्तेच्या लागून त्यांनी लाजलज्जा, प्रामाणिकपणा सभ्यता सर्व काही सोडले आहे.
तेंव्हा इथे कुठलेहि तर्कशास्त्र चालत नाही. आपण बदलत्या परिस्थितीत शहाणपणाने मार्ग काढून आपल्याला जपावे.

लिझ चेनीचे पराभव स्वीकारतानाचे भाषण पाहिलेत का? मी लहान क्लिप पाहिली. टोटल फॅन आता.

बाईंकडे गट्स आहेत पण व्होट्स नाहीत! (देवाची कृपा दुसरं काय?)
WY सारख्या लहानशा राज्यात प्रायमरी ही जिंकू न शकणाऱ्या एब्रहम लिंकनच्या स्त्री अवतारापुढे आता एकच पर्याय आहे तो म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद! बाईंची रिपब्लिकन पक्षातील लोकप्रियता १० टक्के च्या आसपास आहे. अशा अफाट लोकप्रियतेमुळे त्यामुळे त्यांचे राष्ट्रपती पदासाठी नामांकन जवळपास निश्चित आहे!
त्यांच्या तीर्थरूपांनी रिपब्लिकन उच्च पदस्थ मंडळींना waterboarding केले तर कदाचित ते ह्या बाईंना नामांकन देतील.
इतके प्रेमळ आणि लळा लावणारे कुटुंब आहे की प्रचंड बहुमताने ह्या लिंकनिण बाई निवडून येतील. शंकाच नाही!

>>लोकप्रियतेमुळे त्यामुळे त्यांचे राष्ट्रपती पदासाठी नामांकन जवळपास निश्चित आहे!<<
उपरोध पोचला. रामनीने तिला प्रायमरीत सपोर्ट दिला होता, आता तो हि म्हणतोय या बाईने घरी बसावं. लिझ चेनीसकट काहि मूठभर कांग्रेसमन्/सेनेटर्स्नी या प्रायमरीत ट्रंपविरोध कॅपिटलाय्ज करायचा प्रयत्न केला; दुर्दैवाने तो बॅकफायर झाला. आता खरी गंमत पुढे आहे... Wink

गंमत म्हणजे असे म्हणायचे आहे का की २०२२ च्या निवडणुकात रिपब्लिकन पक्षाला बहुमत मिळेल. जरी त्यांनी बायडेन नि कमला इम्पीच करून हाकलले तरी त्यानंतर इतर १५ डेमोक्रॅट्स लायनीने प्रेसिडेंट होतील.
मग त्यापेक्षा सुप्रिम कोर्टावर आपलेच लोक आहेत, त्यांना हाताशी धरून काय वाट्टेल ते कायदे पास करून घ्यावे, प्रेसिडेंटने व्हिटो केल्यास आपले बहुमत आहेच. व्हिटो नामंजुर.
घटना पण बदलून ट्रंपला तहाहयात राजा नि त्यानंतर वंशपरंपरागत राज्यपद त्याच्याच घराण्यात चालू ठेवावे. सुप्रिम कोर्ट आपलेच आहे. इतर सर्व चॅनेल बंद करून फक्त फॉक्स चालू ठेवायचे. सकाळ संध्याकाळ प्रार्थना - ट्रंपची!!
ओबामा ला फाशी!

यस मिनिस्टर मधे एक वाक्य आहे जेम्स हॅकरचे - "I am their leader. I must follow them"

पूर्वीचे दिग्गज रिपब्लिकन नेते सध्या जे काय बडबडत आहेत त्यावरून हेच आठवले. ट्रम्प जे काय बोलतो तेच आपण बोलत राहिलो तरच आपल्याला लोक मते देतील हे लक्षात आल्याने तेच ते रिले करत आहेत. याविरूद्ध बोलणारे ८-१०च फक्त. डेम्सच्या धोरणांविरूद्ध जे काय विरोध असेल तो असेल. तो इव्हन चेनी व इतर "विद्रोही" लोकांचाही आहेच. पण बाकीचे २०२० चा निकाल, ६ जानेवारीचे इन्सरेक्शन ई. बद्दल जे काय बोलत आहेत त्यावरून आणि त्यातून निवडून येण्याच्या शक्यतेवरून वाहत्या गंगेत नक्की कोण हात धुवून घेत आहे ते उघड आहे.

चेनीला जिने हरवले त्या हॅरिएट हेगमन चे हॅनिटी बरोबरचे बोलणे महान होते. लिझ चेनी ने "कन्सीड" केले नाही हे सांगायला तिने मला फक्त "हॅलो हॅरिएट" इतकाच (फोन) मेसेज केला असे हेगमन म्हंटली. हॅनिटीनेही ते रिपीट केले. दोघांनी यावरून ठरवले की चेनी ने कन्सीड केले नाही. आपल्याला कोणा ओळखीच्याचा असा त्रोटक मेसेज आला तर आपण किमान विचार करतो की फोन कट झाला असेल, अजून काहीतरी सांगायचे असेल. नॉट इन ट्रम्प वर्ल्ड. मग नंतर चेनी ने पूर्ण मेसेज शेअर केला तेव्हा यांनी बॅकट्रॅक केले. ते ही एक आश्चर्यच. हे लोक कधीही काहीही बॅकट्रॅक वगैरे करत नाहीत.

आणि हे असल्या लोकांकडून ज्यांनी अजून २०२० ची निवडणूक "कन्सीड" केलेली नाही.

हे असल्या लोकांकडून ज्यांनी अजून २०२० ची निवडणूक "कन्सीड" केलेली नाही. >>> हो ना! हॅनिटी ची बडबड ऐकून तेच आधी आठवलं.

लिझ चेनी आता डेम आणि पुरोगामी लोकांच्या गळ्यातली ताईत बनली आहे. लोकशाहीचा तारणहार, रणरागिणी आणि काय काय!
इतकी अहंकारी बाई पहिली नव्हती. इराकचे युद्ध देशावर लादून लाखो निरपराध इराकी आणि हजारो अमेरिकन सैनिकांचे जीव घेणारा दैत्य डिक चेनी आणि त्याच्या इराकी धोरणाचे आजही समर्थन करणारी लिझ चेनी. पण आज ती लोकशाहीची तारणहार! वा. राजकारण वाट्टेल त्या लोकांशी शय्या सोबत करवून घेते असे इंग्रजी वाक्य इथे बरोब्बर फिट बसते.
आपण वायोमिंग मधे निवडणूक लढवतो म्हणजे त्या राज्याच्या लोकांवर उपकार करत आहोत असा ताठा लिझ बाई दाखवत होत्या. इतक्या प्रचंड मताधिक्याने मतदारांनी धूळ चारून एका अप्रसिद्ध उमेदवाराला (ही लिझ चेनी नाही ह्या गुणाकडे पाहून!) निवडून दिले. इतकी जोरदार लाथ बसूनही आपण कमी पडलो असे चुकूनही व्यक्त झाले नाही. अत्यंत उर्मट पद्धतीने स्वतः ला लिंकन वगैरे समजणारे भाषण ठोकले. आपण म्हणजे लोकशाहीला मिळालेली देवदत्त देणगी आहोत वगैरे समजणे ठीक आहे. पण लोकशाहीचा मूलभूत पाया हा मतदार आहे. त्यांचा शब्द शेवटचा. जानेवारी ६ कमिटी म्हणजे लोकशाहीचा अंतिम शब्द नाही. हे बाई विसरल्या.
२०२० निवडणुकीत गैर प्रकार नक्कीच झाले. त्याने निवडणुकीचे निकाल पलटले का हा वादाचा विषय आहे. माध्यमे, ट्विटर, फेसबुक ह्यांनी हंटर बायडन च्या लफड्यांशी सर्व बातम्या दबल्या. अशा बातम्या देणाऱ्या लोकांची मुस्कटदाबी केली. रशियन कट कारस्थान वगैरे हेटाळणी केली. त्यामुळे नक्कीच काही कुंपणस्थ मतदार बदलले असतील. निवडणुकीत खोटे मतदानही झाले आहे. अनेक गैर प्रकार उघडकीस आले आहेत.
इतके असूनही आज २०२० निवडणुकी बाबत थोडीही शंका व्यक्त केली की लगेच कोंस्पिरसी नट, लोकशाही विरोधी, अमेरिकन संविधान मातीमोल करणारा दुष्ट वगैरे विशेषणांची खैरात सुरू होतें.
बघू नोव्हेंबर मधे काय होते ते..

बघायचे काय, २०२० मधे डेम्स ना इतकी कारस्थानं आणि गैरप्रकार करून इलेक्शन जिंकता आले असेल तर आताही ते नक्कीच जिंकतील ना Proud जर नाही जिंकले तर असं समजू की यावेळेस रिपब्लिकन्स ना ते प्रकार करायला जमले Happy

असं आहे की निवडणुकीतले गैरप्रकार करणारे अमेरिकन नागरिकच होते. काही सरकारी नोकर, काही निवडणुकीत स्वयंसेवक तर कुणी पोलीस, सुरक्षा कर्मचारी. गेल्या दोन वर्षातील म्हातरबांच्या अव्यापारेषू व्यापारामुळे, भ्रष्टाचारामुळे, अनिर्बंध बेकायदा घुसखोरी सुरू केल्यामुळे, चलन फुगवट्या मुळे, समलिंगी, लिंग बदल करणाऱ्यांचे अनाठायी उदात्तीकरण, गर्भपाताचे स्तोम इ इ विकृत कामामुळे हे नागरिक संतप्त असतील आणि ते ह्या खेपेस गैरप्रकारात सहभागी होणार नाहीत आणि चेनीला जसे चेचले तशीच डेमची वाट लावतील अशी एक अंधुक आशा आहे. बघू या. घोडा मैदान जवळ आहे. गाढव वरचढ होते का हत्ती ते कळेलच!

Pages