Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05
आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ज्या पद्धतीने दाक्षिणात्य लोक
ज्या पद्धतीने दाक्षिणात्य लोक हिंदीला ट्रीट करतात आणि आपल्याच भाषांचा अभिमान धरतात तसे मराठी मनुष्य करत नाहीत. साऊथ मधे मराठी सिनेमा चालणे शक्यच नाही. सैराटचा त्यांनी रीमेक बनवला. पण ते कधीही मराठी बघणार नाहीत. हेच जर मराठी जनतेने केले तर बाहुबलीला महाराष्ट्रातून शंभर एक कोटींचा गल्ला मिळाला नसता. मुंबई टेरीटरी ही चित्रपट चालण्यामधे महत्वाची टेरीटरी आहे. मराठी भाषिकांनी फक्त आणि फक्त मराठीच सिनेमे बघायचे ठरवले तर मराठी चित्रपटांचा गल्ला वाढेल. शंभर कोटींचा धंदा होऊ शकतो. रजनीकांतचे सिनेमे हे रिपीट ऑडीयन्समुळे धंदा करायचे. तुम्ही इतर भाषांचे सिनेमे बघायचेच नाहीत असा पण केला तर रिपीट ऑडीयन्स तयार होतो.
एकदा मराठीत धंदा आला कि स्पर्धा येईल. स्पर्धेमुळे राष्ट्रीय स्तरावरचे सिनेमे बनतील.
ज्याला आपण हिंदी चित्रपटसृष्टी म्हणतो त्यातल्या कोणत्याही निर्मात्याला आपल्या राज्यात आपल्या भाषेत चित्रपट चालवणे शक्य नाही. राजस्थान मधे चित्रपटच बनत नाहीत. पंजाबी, बंगाली तीस चाळीस करोडच्या वर धंदा करत नाहीत. एकच बंगाली सिनेमा ६० कोटीपर्यंत गेला आहे. गुजराती तर खूपच वाईट अवस्था आहे. भोजपुरी भाषेतल्या चित्रपटांची अवस्था मराठीतल्या तमाशापटांसारखी आहे. एक कोटीच्या आत बजेट आणि पाच कोटीचा गल्ला. पण हे सगळे मुंबईत येऊन हिंदी चित्रपट बनवतात.
एक राजस्थानी युट्यूबर आहे. तो मराठी चित्रपटांच्या प्रेमात आहे. त्याचे म्हणणे आहे मराठी चित्रपटांनी हिंदीत पण हे सिनेमे आणावेत. अडचण अशी आहे कि एकाच वेळी हिंदी आणि मराठी बनवला तर लोक हिंदी बघणे पसंत करतात. मराठी कोण बघणार ?
एकदा कोईमतूर शहरात रहायचा
एकदा कोईमतूर शहरात रहायचा प्रसंग आला होता. कुठेच हिंदी पाटी नाही. ठिकाण शोधायला त्रास व्हायचा. रिक्षावाल्यांना हिंदीत विचारले की मुद्दाम तमिळ मधे बोलायचे. नाहीतर तोडके मोडके इंग्लीश. त्यातून दोघांनाही काही कळायचे नाही. शेवटी नाईलाजाने म्हणालो, इथे पाच दिवस आहे, रोजचे शंभर रूपये जास्तीचे देईन पण माझ्याशी हिंदीत बोलेल त्याच रिक्षावाल्याच्या रिक्षात बसीन. तर लगेच दोघे जण हिंदी बोलायला लागले. सगळं येतं पण आगाऊपणा करतात.
जुग जुग जियो (प्राइम)
जुग जुग जियो (प्राइम)
टिपिकल बॉलिवूड सिनेमा आहे. विषय चांगला आहे. अनिल कपूर, वरुण धवन आवडतात. त्यामुळे जरा अपेक्षा होत्या. तितका आवडला नाही. पण ठीके. लांबीही जरा कमी चालली असती.
शेवट पाहता पार्ट-टू येऊ शकतो.
कामं सगळ्यांची आवडली. पण अनिल कपूरचं पात्र लेखनात गंडलेलं वाटलं.
नीतू सिंगचा तळ्याकाठी कियारा अडवाणीबरोबरचा सीन छान आहे.
कि.अ. मात्र मला जाम बोअर होते. स्क्रीनसाठीचा काही स्पार्कच नाहीये तिच्यात...
नीतू सिंगला पुन्हा चांगल्या भूमिका मिळायला हव्यात.
मराठी भाषिकांनी फक्त आणि फक्त
मराठी भाषिकांनी फक्त आणि फक्त मराठीच सिनेमे बघायचे ठरवले तर मराठी चित्रपटांचा गल्ला वाढेल.
एकूण बॉलीवूडवर राग हा केवळ सुमार चित्रपट बनवतात म्हणून आहे की काय वेगळं कारण आहे? मराठी मध्ये जणू कधी सुमार चित्रपट बनलेच नाहीत.
नीट वाचा हो. कदाचित फ्रेंच
नीट वाचा हो. कदाचित फ्रेंच किंवा पिलिपिनी सिनेमावरचा राग असेल माझ्या पोस्ट मधे. मलाच माहिती नसेल तर लक्षात आणून द्या. आणि त्यावर दुसर्या आयडीने प्रतिसाद पण द्या.
ललिता प्रिति, प्राईम वर जुग
ललिता प्रिति, प्राईम वर जुग जुग जियो मला अजून दिसत नाहिये
प्राईम वरच मॉडर्न लव हैद्राबाद अशी शॉर्ट स्टोरीज मालिका पाहिली काहि काहि गोष्टी छान आहेत. त्यातली १ बाप-मुली ची कथा तर इतकी चपखल आहे की किती वेळ रडू आले. पहिली आई मुली ची कथा पण छान, तोंपासू हैद्राबादी मुस्लिम पदार्थ त्यात दाखवलेत.
मॉडर्न लव च्या एरिया वाईज वेगवेगळ्या अशा सिरीज आहेत. हिंदी पण चांगली आहे. त्यात अर्शद वार्सी आहे.
माझे पण असेच मत झाले आहे की
माझे पण असेच मत झाले आहे की बॉलिवुड इज ओव्हर. संपले त्यांचे ग्लोरी डेज. सुमार नेपो किड्स, किंवा मग वयस्क पण तरीही डिनायल मधे असलेले लीड हिरोज अन त्यांचे आउटडेटेड सुमार सिनेमे येतात फक्त. एकही बघावा असा प्रॉमिसिंग सिनेमा पाइपलाइन मधे सुद्धा दिसत नाही. शमशेरा फ्लॉप झाल्याचे लोकांना आश्चर्य वाटले याचेच मला आश्चर्य वाटते आहे. कसला भंकस ट्रेलर होता. ब्रम्हास्त्र पण त्याच लाइनीने जाणार.
मुळात 'पिक्चरमध्ये घ्यायला
मुळात 'पिक्चरमध्ये घ्यायला माणूस शोधू' नसून 'माणसाला लॉंच करायला काहीतरी करून कोणतीही कथा शोधू आणि पिक्चर बनवू' असं उलट गणित कोणत्याही भाषेत आलं की पिक्चर पडतो.
जुग जुग जियो आवडला मलाही...
जुग जुग जियो आवडला मलाही... आणि वरून छान अभिनय करतो हे देखील कळले..
नितु सिंग ने सर्वात बेकार अभिनय केला आहे...
अनिल कपूर चंचल दाखवला आहे... असतात असे लोक...
विक्रम रोना बघू
विक्रम रोना बघू
बॉलिवुड इज ओव्हर... सुमार
बॉलिवुड इज ओव्हर... सुमार नेपो किड्स, किंवा मग वयस्क पण तरीही डिनायल मधे असलेले लीड हिरोज अन त्यांचे आउटडेटेड सुमार सिनेमे >>> अगदी अगदी. आणि त्यात ते काहीच्या काही vfx ही.
खास करून brilliantly written, well acted हॉलिवूड मुव्हीज, टीव्ही सिरीज बघितल्यावर तर हे जाणवत राहते. इरफान खान, आयुष्मान खुराना, राजकुमार राव, इमरान हाश्मीचे काही चित्रपट एव्हढीच काय ती अधून मधून येणारी झुळूक.
छान आहे जुग जुग जिओ
छान आहे ... जुग जुग जिओ
मला आवडला!
अनिल कपूरचा सळसळता उत्साह नेहमीसारखाच या भुमिकेतही जाणवला...
नीतू सिंग काही स्पेशल नाही, पण वाईटही नाही.
वरून धवन हा फारच अंडररेटेड कलाकार आहे. खूप छान वावर असतो त्याचा. आणि अभिनय म्हणाल तर शेवटच्या कोर्ट सीनमध्ये पाणी काढले त्याने डोळ्यातून.. और क्या चाहिये!
कियाराच्या तर मी प्रेमात आहे. कधीही कसेही कुठूनही बघा. छान प्रसन्नच वाटते. पिक्चर बघायचे पहिले कारण तर तीच होती. तिने तितकेच सुंदर दिसत निराश नाही केले
बाकी फिल गूड ईमोशनल ड्रामा आहे. फार विनोदी नाही..पण पांचटपणा टाळलाय आणि काही ठिकाणी विनोदाचे टायमिंग छान आहेत.
एवढेच सागेन,
ज्यांनी आयुष्यात आपल्या बायकोवर - नवऱ्यावर - जोडीदारावर प्रेम आणि भांडण दोन्ही केले आहे त्यांनी जरूर बघा. ईतरांनी नाही बघितला तरी चालेल
मोस्टली सेन ला वाया घालवली
मोस्टली सेन ला वाया घालवली आहे...
अगदीच.. जरा चांगला तरी रोल
अगदीच.. जरा चांगला तरी रोल द्यायचा तीला
माझे पण असेच मत झाले आहे की
माझे पण असेच मत झाले आहे की बॉलिवुड इज ओव्हर. संपले त्यांचे ग्लोरी डेज. सुमार नेपो किड्स, किंवा मग वयस्क पण तरीही डिनायल मधे असलेले लीड हिरोज अन त्यांचे आउटडेटेड सुमार सिनेमे >>> यातल्या नंतरच्या भागाबद्दल "टोटली"!
पण बॉलीवूड संपले, की दर काही वर्षाने हे होतच असावे? प्रस्थापित हीरो जुने होत जातात, त्यांच्या पिक्चर्स मधे तोचतोचपणा येतो. पब्लिक कंटाळते. मग कोणीतरी नव्या दमाचे लोक वेगळे काही घेउन येतात व तो नवीन ट्रेण्ड होतो. अमिताभची आजोबागिरी, अक्षय कुमारचे इतक्यातले बरेच रोल्स, खान पब्लिकचे एखाद्या प्रोजेक्टसारखे प्लॅन केलेले व मार्केट केलेले पिक्चर्स, देवगण वगैरे या सर्वांचा कंटाळा आलेला आहे. सगळे "स्टेल" वाटू लागले आहे. यातून बॉलीवूड नव्याने उभे करायला नवीन हीरोज्/हीरॉइन्स, गायक, संगीत सगळे फ्रेश यायला हवे.
त्यातल्या त्यात आमिरच्या नव्या चित्रपटाबद्दल कुतूहल अजूनही असते. नागराज मंजुळेच्याही झुंडबद्दलही होती. बाय द वे बॉलीवूड मधून आलेला व सर्व पेक्षकांना भरपूर आवडला, आणि धंदाही भरपूर केला असा शेवटचा पिक्चर कोणता होता? दंगल, की नंतर होता एखादा?
मला वाटते सिम्बा होता.
मला वाटते सिम्बा होता.
तान्हाजी असेल.
तान्हाजी असेल.
मी- अनु >> मागच्या पानावरचा
मी- अनु >> मागच्या पानावरचा पूर्ण प्रतिसाद खतरनाकच आहे. पटला.
हल्ली दक्षिणेचे चित्रपट पण त्यांच्या हिरोला ठाकून ठोकून बसवण्यासाठी त्याच्या भोवती कथा (?) रचत बनवल्याप्रमाणे जाणवते. हॉलीवूडमधे सुद्धा हे लोण काही वर्षांपासून जाणवते. सिनेमे कमी आले की आकर्षण राहते. भरमसाठ झाले कि काही वाटेनासं होतं तसं झालंय बहुतेक.
२०२१ आयएमडीबी प्रमाणे
२०२१ आयएमडीबी प्रमाणे सुर्यवंशम आणि ८३ बरे चालले..बाकी सौंदीडीयन रॉक्ड!
प्राईम चा सर्च खूप बेकार आहे.
प्राईम चा सर्च खूप बेकार आहे. नवे रीलिज दाखवतच नाहित नेफ्लि सारखे. सर्च केला जरा स्पेल चुकले तरी येत नाही.
दिसला जूग जूग जियो, थोडा पाहिला.
मोस्टली सेन ला वाया घालवली आहे.>>> अगदी अगदी. ती ज्या विषयांवर फनी मीम बनवते तसेच कॅरॅक्टर दिले तिला
वरून कुठल्याही रोल मधे छपरीच वाटतो मला..निरागस एक्सप्रेशन छान आणतो पण. अनिल नेहमी प्रमाणे मस्त फ्रेश दिसलाय, स्वतःच्या प्रेमात जरा दिल धडकने दो ची छाप!
किआरा ला सुरेख दिसायचेच काम असते, ते केलेय. तिस्का पट्टीची अभिनेत्री आहे, तिला फाल्तू रोल दिला असं मला वाटलं. तिचा रहस्य , चटनी मधे खतरनाक रोल होता.
मोस्टली सेन ला वाया घालवली
मोस्टली सेन ला वाया घालवली आहे >>> कोण आहे ही. स्टारकास्ट मध्ये तर दिसत नाहीये. कुठला रोल दिलाय हिला?
टिस्का चोप्रा ? ती अनिल
टिस्का चोप्रा ? ती अनिल कपूरच्या २४ मधे दिसली होती सीझन १ मधे. त्या आधी इरफान खान, रघुवीर यादव बरोबर एका मालिकेत ( एक शाम की मुलाकात) दिसली होती. खूप तरूण आणि सुंदर होती तेव्हां. इरफान आणि टिस्का दोघांचीही नावे माहिती नव्हती तेव्हां.
https://www.youtube.com/watch?v=LDog5t_cz1A
mostlysane - प्राजक्ता कोळी.
mostlysane - प्राजक्ता कोळी...
Confront the brutal facts
Confront the brutal facts then only anything can grow.
आपल्या मुलांचा इतका ही लाड करू नये ती वाया जातील..सेम एप्लीकेबल फॉर आपली भाषा, आपले राज्य आणि आपले सिनेमे..सगळ्यांनाच अभिमान असतो आपापल्या भाषेवर,राज्यावर...
Talent doesn't have any language...भाषा,प्रसंग हे बैरिअर नसावेत खरंतर.
सैराट टाईप ऑफ सिनेमे साऊथ मधे १५-२० सिनेमे येऊन गेलेत वीस वर्षापूर्वी आणि सुपरहिट आहेत...सैराट मधे फक्त क्लायमॅक्स बदलला आहे.
साऊथ मधे प्रत्येक राज्यात वर्षाला 200-300 सिनेमे रिलीज होतात, max 50 हिट होतात..प्रत्येकच सिनेमाला पब्लिक डोक्यावर घेत नाही...
मराठी सिनेमे चालत नाहीत चालत नाहीत म्हणण्यापेक्षा का चालत नाही ते पाहावे..
लोकं म्हणतात परदेशातील शिक्षण चांगलं आहे..भारतात चांगले कॉलेजेस नाहीत असं रडून काय होणार?आपल्याला काय करता येईल यावर विचार करावा लागेल..अशी बरीच उदाहरणे देता येतील..रूट कॉज शोधले पाहिजे
पहिला सिनेमा बनवला कुणी? मराठी माणसानेच..आपल्याला अभिमान असला पाहिजे.. गाडी तिथेच थांबली नाही पाहिजे..वेळेनुसार बदलले पाहिजे ..
मै +१ , म्रुनालि +१
मै +१ , म्रुनालि +१
सैराट टाईप ऑफ सिनेमे साऊथ मधे
सैराट टाईप ऑफ सिनेमे साऊथ मधे १५-२० सिनेमे येऊन गेलेत वीस वर्षापूर्वी आणि सुपरहिट आहेत...सैराट मधे फक्त क्लायमॅक्स बदलला आहे.
हे कळलं नाही. क्लायमॅक्स तर महत्त्वाचा आहे ना सैराटमधे. सुखान्त केला असता तर सैराट इतक्या उंचीवर गेला नसता.
सिद्धार्थ जाधव हिरो असतो
सिद्धार्थ जाधव हिरो असतो मराठीत- कोण बघणार?
मृणाली हा प्रतिसाद माझ्यासाठी
मृणाली हा प्रतिसाद माझ्यासाठी आहे का ?
मी कुठेच मराठीचा अभिमान धरा असे म्हटले नाही. उलट मराठी माणसाच्या सहीष्णूतेने इतर भाषेतले सिनेमे चालतात हे माझ्या प्रतिसादात म्हटले आहे. बहुतेक समजलेला नाही तो. दक्षिणेला हिंदी अजिबात बोलत नाहीत. याला अभिमान नाही तर दुराभिमान म्हणायला पाहीजे. सैराट चा रीमेक दक्षिणेत झाला. ती निव्वळ प्रेमकहाणी किंवा शोकांतिका नव्हती. दक्षिणेकडचे अनेक दिग्दर्शक नागराज मंजुळेचे कौतुक करतात. सैराट सारखे कोणते सिनेमे दक्षिणेत येऊन गेले होते ?
मराठीतला धंदा इतर भाषांत विभागला जातो. जर मराठी माणूस पण असाच दक्षिणेच्या लोकांप्रमाणे दुराभिमानी, हट्टी झाला तर मराठी सिनेमांचा गल्ला वाढेल हे मी म्हटले आहे. मराठीत विषयांची कमतरता नाही. सध्या भारतात सर्वात जास्त वेगळेपण मराठीत आहे. कमी आहे ती प्रेक्षकांची. आत्मपरीक्षणच करायचे झाले तर मराठी माणसाने हिंदी, साऊथ अशा सिनेमांवर बहीष्कार घालून मराठी सिनेमांना लोकाश्रय दिला पाहीजे. जे होणार नाही. कारण मराठी माणूस असा कट्टर बिट्टर नाही. मी मराठी सिनेमांचा कट्टर समर्थक अजिबात नाही. मराठीत सुद्धा बोगस सिनेमे बनतात. पण चांगले सुद्धा चालत नाहीत. त्याचे कारण दिले आहे. मराठीत नायकप्रधान सिनेमे बनत नाहीत. सिनेमा म्हणजे काय हे सैराट मधून कळते. इथे एक वेगळा धागा पण आहे त्यावर.
बाशा (नावात थोडीफार चूक असेल)
बाशा (नावात थोडीफार चूक असेल) नावाचा एक रजनीकांतचा सिनेमा होता. माझ्या सोबत एक तमिळी होता. त्यात बाशा रिक्षाचालक असतो. त्याला खांबाला बांधून मारत असतात. याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होते. मलाही बाजूला बसवून बघा म्हणाला. तद्दन फिल्मी अभिनय आणि प्रसंग होता. दुसर्या दिवासापासून जहाजावरचे दहा बारा तमिळी व्हिडीओ हॉलमधे बाशाची पारायणं करायला लागली. ना रजनीकांत दिसायला भारी, ना सिनेमा भारी. त्यांनी आम्हाला शेवटपर्यंत हिंदी सिनेमे लावू दिले नव्हते. इतका कट्टरपणा ?
कायच्या काय
कायच्या काय
मी माझी गरज म्हणून मी सिनेमा बघतो.
कुणाचे पोट भरावे म्हणून नाही
असेच म्हटले तर मग संगीत नाटक , तमाशा हेही बघा
Pages