Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05
आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Sully पाहिला (फायनली).
Sully पाहिला (फायनली).
टॉम हॅन्क्सने पायलटचा अनुभवातून आलेला आत्मविश्वास, त्याचवेळी मनातली बाकबूक मस्त दाखवली आहे. विशेषत: बायकोशी फोनवर बोलतानाचा आवाजातला आणि चेहर्यातला बदल
कथानकात प्रवाशांच्या खूप स्टोरीज टाकून बॉलिवूडी आर्तता आणलेली नाही ते बरं वाटलं.
तेव्हा त्या घटनेच्या बातम्या सविस्तर पाहिल्या होत्या. तरी काल नंतर विकीपेडियावर माहिती वाचली. तेव्हाच्या कॉकपिट रेकॉर्डिंगची क्लिप तिथे आहे.
एअर ट्रॅफिक कंट्रोलवाले त्या त्या विमानाच्या कोडसहित दरवेळी बोलतात, कधी इकडचं तिकडे होत नाही बोलताना, याचं मला कायम कौतुक वाटतं. (ते कोड ठरवण्याची काहीतरी पद्धत असणार, ज्यामुळे ते लक्षात राहत असतील, त्यांना त्याचं ट्रेनिंगही मिळत असणार, तरी)
विमान पाण्यात उतरण्यापूर्वी पायलटशी बोलणारा ए.टी.सी.चा माणूस नंतर हताश होऊन बसलेला असतो - १५५ लोकांना आपण गमावलं म्हणून. तो सीनही मला आवडला.
-------------
अजय देवगणचा सिनेमा बघण्याची हिंमत झालेली नाही. ट्रेलर पाहिला, बास झालं.
माझं त्या फ्लाईट च बुकिंग होत
.
सली चांगलाच आहे, पण मला तो
सली चांगलाच आहे, पण मला तो ताणल्यासारखा वाटला होता. मूळ कथानक थोडं आहे आणि ताणून मोठं केलंय असं वाटत राहिलं होतं.
टॉम हँक्ससाठी +१. तो जेव्हा फायनली विमानातून बाहेर पडून त्या बोटीवर येतो तेव्हा वळून परत मागे बघतो. त्या एका नजरेतून काय काय दाखवलंय त्याने!
आज 'रॉकेट्री- द नंबी इफेक्ट'
आज 'रॉकेट्री- द नंबी इफेक्ट' बघितला. पटकथा संवाद दिग्दर्शन, मुख्य भूमिका सब कुछ आर. माधवन्.
आवडला. घटनेची साधारण कल्पना होती, पण नेमकं माहिती नव्हतं. धक्कादायक कहाणी आहे.
इस्रोचे सुरुवातीचे दिवस, विक्रम साराभाई, सतीश धवन, ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासारखी माणसं चांगली उभी केली आहेत.
माधवनचं आणि नंबी नारायणन् यांच्या पत्नीचं काम खूपच छान झालं आहे. एकंदरीत चित्रपट चांगलाच जमलेला आहे. नक्की बघावा असा.
शेवटी स्वतः नंबी नारायणन् यांची उपस्थिती प्रभाव पाडून गेली.
शाहरुख खानचं तसं छोटं पण चांगलं काम आहे.
जादुगर - नेटफ्लिक्स
जादुगर - नेटफ्लिक्स
छान आहे...
वावे कशा वर पाहिला?
वावे कशा वर पाहिला?
शाहरुख खानचं तसं छोटं पण चांगलं काम आहे.>> छोट्याच कामात छाप सोडतो तो बहुतेकदा
आशू, थिएटरमध्ये पाहिला
आशू, थिएटरमध्ये पाहिला
>>>>>>>छोट्याच कामात छाप
>>>>>>>छोट्याच कामात छाप सोडतो तो बहुतेकदा Wink
हाहाहा
बडे बडे लोग ऐसे छोटे छोटे
बडे बडे लोग ऐसे छोटे छोटे कामों मे छाप छोडते रहते है
बाई दवे दिलीप कुमार, अमिताभ या सिक्वेन्समधील सुपर्रस्टार आहे तो. त्याच्या कारकिर्दीनेच चित्रपट ईतिहासावर छाप सोडली आहे
शाहरूखसाठी हमखास बघणार तो चित्रपट...
हा प्रतिसाद फिल्मी या नावाने
हा प्रतिसाद फिल्मी या नावाने देणं शक्य नाही का ?
काय वाचतोय हे मी
काय वाचतोय हे मी
सरांनी चक्क दिलीप कुमार, अमिताभ हे सुपरस्टार होते हे मान्य केलंय
आणि शाखा त्यांचा सिक्वेल आहे हेही
जादुगर - नेटफ्लिक्स
जादुगर - नेटफ्लिक्स
छान आहे...
>>>>
+७८६
मी काल एकीला आवर्जून सांगितलेही हा बघायला.
जितेंद्र कुमारचे कॅरेक्टर बघून मला राजू बन गया जंटलमॅन आणि कभी हा कभी ना चा शाहरूख आठवला.
आदर्शवादी नसलेले आणि मानवी स्वभावाला अनुसरून मोह माया मत्सर असे गुण ठायी असलेले कॅरेक्टर.
स्वतंत्र लेखाचा / धाग्याचा विषय आहे.. सवडीने बोलूया यावर
roketry नाम्बी इफेक्ट
roketry नाम्बी इफेक्ट चित्रपट चांगलाच जमलेला आहे. नक्की बघावा असा. >> सहमत !
नंबी
नंबी
शो कमी झालेत , टीव्हीवर आला म्हणे
जादूगर आणि एक football वाला
जादूगर आणि एक football वाला असे 2 वेगळे चित्रपट आहेत का ???
दोघात जीतूभैयाच आहे
नाही जादूगरच फूटबॉलवाला
नाही जादूगरच फूटबॉलवाला चित्रपट आहे. चित्रपटात जादूपेक्षा जास्त फूटबॉलच आहे.
हार के जितने वाले को बाजीगर कहते है और दिल जितने वाले को जादूगर कहते है ...
जंगल क्राय नक्की बघा
जंगल क्राय नक्की बघा (लायन्सगेट प्ले वर)
भारताची ज्युनिअर रग्बी टीम २००७ चा वर्ल्डकप जिंकते याची गोष्ट.
पण टेकिंग छान आहे (टिपीकल गोष्टींना फाटा दिलाय किंवा वेगळ्या प्रकारे हाताळल्या आहेत)
अभय देओल कोच आहे, पण तो हीरो बाकीचे सपोर्ट करणार असा (चक दे) प्रकार नाही.
कुठल्या ott ला आलाय हा
कुठल्या ott ला आलाय हा
इंटरेस्टिंग वाटतोय
लायन्सगेटप्ले वर
लायन्सगेटप्ले वर
प्राईम वर पेड चॅनेल आहे
एअर टेल एक्सस्ट्रीम ला ॲक्सेस असेल तर फुकट आहे
What’s most stunning is the
What’s most stunning is the fact that the boys learnt the game only about ten months ago. According to KISS founder secretary Dr A. Samantha, “The boys are from tribal areas where they could not get even a square meal of the day. They have never been around their state, Orissa, leave alone the world.”
Read more at:
https://mumbaimirror.indiatimes.com/sport/others/indian-jungle-crows-win...
बघायला हवा हा...
जयम्मा पंचायती -तेलुगू बघितला
जयम्मा पंचायती -तेलुगू बघितला प्राईमवर.
जयम्मा, मुलीच्या एज अटेंड फंक्शन ला सगळ्या गावाला गोडाचं जेवण खाऊ घालून नंतर प्रत्येकाकडून गिफ्ट मनी वसूल करत असते कारण नवर्याच्या हार्ट सर्जरी ला पैसे कमी पडत असतात..जातीवाद, अंधश्रध्दा,नक्स्लाईट्स या विषयांनाही स्पर्श केलाय..शेवट भारीच..
शमशेरा आपटला. काही समजत नाही
शमशेरा आपटला. काही समजत नाही काय चाललेय ते. पाहिलेला नाही त्यामुळे काही बोलता येत नाही. आता पुन्हा साऊथचे आणि हॉलीवूडचे चित्रपट तिकीटबारीवर हिट झाले तर बॉलीवूड सपशेल फ्लॉप झालेय असा समज पसरेल. बॉलीवूडची जागा टॉलीवूड घेईल असे दिसतेय. वाईट याचे वाटतेय कि इथल्या सुंदर सुंदर नट्या आता साऊथच्या हिरोंना पटवताना पहाव्या लागणार. साऊथच्या हिरोंना हात जोडून प्रेमाची याचना करताना दिसणार. हे पाहताना जर काळीज बंद पडले तर अंधारात आजूबाजूच्यांना समजणार पण नाही.
नेटफ्लिक्स वरचा ऑपरेशन रोमिओ
नेटफ्लिक्स वरचा ऑपरेशन रोमिओ इथेच कुणाचे तरी वाचून पाहिला. आवडला. हिरो हिरॉईन सुमारच होते पण नेपोटिझम वाले नव्हते. कंगनाचा एक स्टार. मराठी लोकांवरचा दिग्दर्शक किंवा रायटरचा राग जाणवला. उत्तर भारतियांच्या चष्म्यातून मराठी आंदोलन कसे दिसते हे कळले. बरेच सीन गरज नसताना ते वातावरण सेट करण्यासाठीच टाकले आहेत. त्यांना उद्देशून लूजर्स म्हटलेले आहे. हे मी नॉन मराठी लोकांकडून ऐकलेले सुद्धा आहे. सगळेच असे नसतात म्हणा. शेवटच्या भागात हिरो मराठी चाळीसारख्या वस्तीत स्विफ्ट घेऊन गल्लीत शिरतो. तिथे गणपतीचा डान्स चालू असतो. त्याचे चित्रीकरण नकारात्मक आहे. दिल्लीत सुद्धा जागरणाच्या आणि मां की चौकी आणि अजून काय काय असते त्या काळात रस्ते पूर्ण बंद असतात.
याच विषयावर बॉबी देओलचा एक पिक्चर आला होता. त्यात त्याच्या भावाला गफ्रे सोबत कार मधे पोलीस अटक करतात. पुढे वेगळी स्टोरी होती. बादल किंवा बिच्छू नाव असेल.
कुठेतरी बॉलिवूड ने पण
कुठेतरी बॉलिवूड ने पण आत्मपरीक्षण करायला हवंय का?
मला मध्ये ड्रीम गर्ल, बधाई हो, फ्लाईट,टोटल धमाल सर्व पिक्चर आवडले होते.सिंबा अजिबात आवडला नव्हता.बहुतेक माझा बार थोडा लो असावा.
पिक्चर आवडला तर मराठी, बॉलिवूड, टॉली कॉली मॉलिवूड सगळे बघणार.
मी सध्या पाहिलेले काही
मी सध्या पाहिलेले काही चित्रपट
१. झुंड झी५-चांगला आहे. थोडा छोटा असता तर चालला असता
२. टॉप गन - रविवारी थेटरात पाहीला. अजुन याचे शोज आहेत. याचे आश्चर्य वाटले. हा भारी आहे. एकदम पैसा वसुल.
३. जुग जुग जिओ - प्राईम - छान टाइमपास आहे. अनिल कपुर रॉक्स
४. फॉरेनसिक झी५ - बकवास
सूर्यवंशी मला आवडला नाही.
सूर्यवंशी मला आवडला नाही. नुसतीच मारधाड. पण तो हिट झाला. बहुतेक कोरोनाच्या मोठ्या गॅपनंतर साऊथने पद्धतशीर रिलीज केलेल्या सिनेमांमुळे पब्लिक तिकडे गेले. त्यातही नावीन्य नाहीच. तोच तोच पणाच आहे. पण मोठ्या पडद्यावर पाहण्यासारख्या गोष्टी आहेत हे मान्य करायला पाहीजे.
सूर्यवंशी अतिशय भिकार होता
सूर्यवंशी अतिशय भिकार होता.त्यातले ते मायावती गर्भवती टाईप्स चे पीजे वगैरे सर्वच डोक्यात गेलं.त्यातल्या त्यात रणवीर ची एन्ट्री आवडली.
अक्षय कॅट दोघेही अत्यंत बोअर झाले.
पिक्चर आवडला तर मराठी,
पिक्चर आवडला तर मराठी, बॉलिवूड, टॉली कॉली मॉलिवूड सगळे बघणार.>>>>>>+ १११११ हॉली,कोरीयन पण.
वाईट याचे वाटतेय कि इथल्या
वाईट याचे वाटतेय कि इथल्या सुंदर सुंदर नट्या आता साऊथच्या हिरोंना पटवताना पहाव्या लागणार. साऊथच्या हिरोंना हात जोडून प्रेमाची याचना करताना दिसणार. हे पाहताना जर काळीज बंद पडले तर अंधारात आजूबाजूच्यांना समजणार पण नाही.>>>>>>>>
एकदम षटकार हाणला की
खरं म्हणजे आपण पण खिशाला कात्री लावून बॉलीवुड मधील सुमार दर्जाचे सिनेमे
चालवीण्याचा ठेका घेतलाय का ?
चांगला दर्जा असेल तर टॉप गन सारखे मूव्ही जगभर चालतातच ना ? मग यांना काय रोग येतो .
तेच तेच घिसे पिटे बनवितात आणि प्रेक्षकांची वाट बघत बसतात ...
एखाद्याने मराठी चित्रपट आवडला
एखाद्याने मराठी चित्रपट आवडला म्हटले कि त्याला दक्षिणेचे सिनेमे बघा आणि दहा मिनिटात मराठी चित्रपट बंद केला असे मी कधीही म्हणणार नाही.
मराठीचे क्षेत्र छोटे आहे. बजेटचा ताण असतो. बहुतेक निर्माते बुडतात. जर आपण आत्ता टेकू दिला नाही तर मराठी चित्रपटसृष्टी बुडू शकते. तमिळ चित्रपटसृष्टी पूर्वी बॉलीवूड समोर भिकारच होती. रजनीकांत शत्रुघ्न सिन्हा आणि अमिताभच्या सिनेमांचे भ्रष्ट नक्कल करून सुपरस्टार झाला. तेलगू मधे पूर्वी पौराणिक चित्रपट बनत असत. म्हणून एन टी रामाराव यांना मॅटिनी आयडॉल म्हणत. त्या वेळी बॉलीवूड मधे मदर इंडीया, मुगल ए आझम , शोले सारखे सिनेमे बनत. हृषिकेश मुखर्जी, बासू चटर्जी यांचे सिनेमे बनत.
साऊथच्या पब्लीकने वाईट असू कि चांगला भाषिक अस्मितेसाठी त्या चित्रपटांना पाठिंबा दिला. अर्थात त्यांची आवड पण तशीच होती. आजही त्यांचे विनोद पाहिले की वेगळ्या पद्धतीचे हसू येते. कधी कधी हा त्यांचा भाषिक अभिमान डोक्यात जाणारा असतो. मराठी माणूस सहीष्णू आहे म्हणून हिंदी चित्रपटसृष्टी मुंबईत वाढली.
Pages