महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी

Submitted by हस्तर on 23 June, 2022 - 07:48

महाराष्ट्रातला "एक" राजकीय भूकंप consipiracy थोरी

उद्धव साहेब आणि एकनाथ साहेब ह्यांनी मिळून हि खेळी केली आहे असे मला वाटतंय कारण
१) आमदार तयार आहेत मग सत्ता स्थापने ला विलम्ब का ?
२) ह्याच वेळी कोशियारी ह्यांना करोना कसा
३) एवढ्या मोठ्या संख्येने आमदार लगोलग कसे फुटले ?
आणि सगळ्यात मुख्य
पवार साहेब संथ कसे ? सत्ता ते गमावणार तर नाहीत

मुळात राष्ट्रवादी कडून विकास निधी मिळत नाही
पवार साहेबांना निधीसाठी आपल्या बाजूने वळवायचे म्हणजे महा कठीण
मग पहाटे ५ वाजताच शपथ विधी आठवला असेल ,बरेच लोक बोलतात कि शरद पवार ह्यांनीच अजित ह्यांना पाठवले ते बघून उठा साहेबानी तीच कल्पना उचलली
एकनाथ शिंदे फुटल्यावर पण पवार साहेब २ दिवसाने आले ,खरे पाहता सगळ्यात जास्त खाती त्यांचीच आहे ,जास्त नुकसान तयांचेच आहे

मुळात फक्त bargaining पॉवर आणून विकास निधी वळवायचे दिसते आणि त्यातही भाजपाला बकरा बनवले आहे

कारण शिवसेना भाजप कधीही एक होणार नाही इतकी मनें कलुषित आहेत
एकनाथ शिंदे ह्यांनी प्रति शिवसेना स्थापन केली किंवा स्वतः ला शिवसेना घोषित केले तरी मतदार त्याच्याकडं पाठ फिरवणार हे उघड आहे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हेमंत पर्सनल कशाला घेतोस ?
शक्यतो राजकारणातील घटनांचा उपयोग टाईम पास साठीच करायचा असतो , आपण इथे कितीही ओरडत बसलो तरी ज्याच्या नशिबात आहे तोच मुख्यमंत्री होणार !

बंगाल सरकार चा पाठिंबा घेवून आसाम सरकार ल चांगला धडा शिकवावा.
महाराष्ट्र विरोधी वागणाऱ्या आसाम ला नानी याद आली पाहिजे.
आसाम विषयी सहनभुती मराठी लोकात असणार नाही.
बांगलादेश नी ह्यांची पूर्ण वाट लावली तरी

अरे काय झाले ?
Happy
पूर्वी तो फुटक्या मनी शंकर पाकिस्तान ची मदत घेवून भाजप सरकार उलथवून टाकणार होता , त्याची आठवण झाली ....
असे इतर राज्यातील लोकांची मदत घेऊन सरकारे उलथल्या वर बांगलादेश पाकिस्तान चीन आपल्याला जिवंत ठेवील का ?

कोणी जिंकले हरले तरी आपल्याला काय मिळणार आहे? >>>>
सहमत.
भाजपावर अंकूश ठेवायला त्याचा खूप उपयोग होईल. >>>
मग सेनाच काय वाईट आहे? एकटे राऊत अंकूश ठेऊ शकतात.

आत्तापर्यंत ठेवलेच की. पण शिवसेनेचे सरकार गडगडणार असेल तर
यापुढे राज ठाकरे ठेवतील.
कोणितरी भाजपावर अंकूष ठेवला म्हणजे झाले.

आसाम नी लगेच ह्या सर्व लोकांना आसाम बाहेर काढावे .नाही तर कायम स्वरुपी आसाम विषयी मराठी लोक आणि महाराष्ट्र प्रेम ठेवू शकणार नाहीं

मनसेत जायचे होते तर भारत भ्रमण कशाला करत बसले ?

राजाला सात द्या बोलले , तर सात लोक निवडून आले.

मग बोलले एक हाती सत्ता द्या, मग एकच निवडून आला.

आता शून्यातून विश्व निर्माण करतात की काय

Proud

मला संपत्ती बाबत शिंदेची बाजू घ्यायची नाहीये पण
तसे पाहता वाइल्ड फोटोग्राफर देखील करोडपती असेल ....
इतर शेतकरी आत्महत्या करतात पण सुळे बाई वांगी विकून करोडो कमवतात.

राज फक्त सभाच जिंकतात. इलेक्शन नाही.>>
असं म्हणणं बरोबर वाटत नाही. म्हणजे राज यांना कमी लेखणे धोक्याचे ठरू शकते.

मनसे स्थापन केल्यानंतर १३ आमदार आले होते. बाळासाहेब हयात असताना उध्दव व भाजपा दोघाचीही वाट लावली होती. २०१४ पर्यंत त्यांच्यापुढे भाजप व शिवसेनेचे काही चालत नव्हते व कॅांग्रेस राष्ट्रवादी त्यामुळे आरामात महाराष्ट्रात राज्य करू शकत होते. कितीतरी भाजप व शिवसेनेचे आमदार तसेच नगरसेवक मनसेच्या उमेदवारीने आपटलेले आहेत.

एकहाती सभा जिंकणारा राज सारखा नेता आला तर>>>>
अगदी बरोबर शब्दरचना Happy
एक हाती फक्त सभाच जिंकतात,
सध्या विधानसभेत त्यांचा एकच हात आहे Lol

<<सरकार कोणाचेही येवो, पण काहीजण मात्र माबोवर दणादण तलवार फिरवुन राहिले.>>
इथे लिहिणारे लोक राज, उद्धव, शरद, शिन्दे, राऊत फडणीस, मोदी, इ. लोकांबरोबर सकाळ संध्याकाळ चहाफराळाला भेटून गप्पा मारतात. म्हणून त्यांना सगळे माहित असते!!!

आपण काठावर बसून बुध्दीबळाचे डाव पहायला काय हरकत आहे ?
कोणी जिंकले हरले तरी आपल्याला काय मिळणार आहे?>>

अरेरे, पडती वेळ आली की ड्रामा सुरू Wink

https://www.loksatta.com/manoranjan/aadesh-bandekar-shares-an-old-video-...

शरद पोंक्शे आधी बोल्ला होता कि एक्नाथ शिण्देनी मद्त केलि म्हणून.

पण आदेश बाण्देकरने पोल खोलली, की ते एकनाथ नव्हते, उद्धव ठाकरे होते.

ह्याला नेमका कसला कॅन्सर होता? स्मृतीभ्रन्श करणारा कॅन्सर.

आणि मग अखेर बिल दिले कुणी ? कि सदाभाऊ खोतानी दिले ?

मोदींचा मान ठेवा, ऑन लाइन व्यवहार करा म्हणून भाजपे ओरडत होते.

आता ५० कोटी वाटणार ते चेकने की जिपेने ?

बोकिल आहेत की नोटेतून चीप गायब झाल्यावर हेही गायब झाले ?

सरकार पडणार नाही जरी पडले तरी काही त्या मध्ये मोठे नाही...
भारत सरकार महाराष्ट्र विरोधात उभे आहे.
आणि देशाची राज्य घटना केंद्र सरकार ल ते देश प्रेमी असते राज्यात भेद भाव करत नाही असे समजून जास्त अधिकार देते.

मराठी बाणा सोडला आणि बकवास हिंदुत्व bjp शी युती करण्यासाठी स्वीकारणे.
बाबरी कुठे महाराष्ट्र कुठे तरी नको त्या राज्याशी बिलकुल संबंध नसणाऱ्या विषयात उडी मारणे..
तुम्ही त्यांचे भले व्हावे म्हणून उडी मारले त्यांनी लघु शंका केली.
दक्षिण भारतातील राज्य कशी वागतात ह्याचा एकदा अभ्यास करा ..
हिंदू,हिंदुत्व च्या नादी लागून राज्यातील लोकांना गुलाम बनवू नका.

Bjp ल असा पण अंदाज आला आहे.महाराष्ट्रात ह्या सर्व घडामोडी मुळे नाराजी आहे.
आज त्यांनी मीटिंग घेवून सत्ता स्थापन करायचा दावा करायचा की नाही करायचा,बहुमत सिध्द करायला सांगायचे की नाही सांगायचे
ह्या वर विचार केलं.
त्यांना हवं ते घडले आहे.
सत्ता स्थापन करून महाराष्ट्र विरोधाला ते समोर जाणार नाहीत..
बंडखोर मात्र तोंडावर पडणार आहेत.

मराठी बाणा जोपासणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंना अटक करणाऱ्या भुजबळ च्या मांडीला मांडी लावून बसले तर चालते का ?

भावनिक होवून फायदा नाही.
पण मराठी लोकांनी एक लक्षात ठेवावे
हिंदुत्व आणि हिंदू चे रक्षण यूपी ,बिहारी करतील.
महाराष्ट्रात हिंदू सुरक्षित आहेत जादा बोजा घेण्याची गरज नाही.

Pages