Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04
४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण
फॅक्ट काहीही असो ते खून,
फॅक्ट काहीही असो ते जाणून न घेता खून, हत्या, मुले खाणे वगैरे बालिश बोल रेटत रहाणे यालाही ब्रेन वॉश किंवा बुद्धीभ्रंश असंच म्हणता येईल.
मुले खाणे हे काय नवे विकृत
मुले खाणे हे काय नवे विकृत खूळ? उजव्या विचारांच्या चॅनेल वर उजव्या आचरट विचारांना जेवढे व्यासपीठ मिळते त्याच्या कित्येक पट जास्त विकृत डाव्या विचारांना डाव्या चॅनेल वर मिळते हे स्पष्ट दिसते आहे.
गर्भपाताचे trivialiazation हे प्रचंड प्रमाणात होते आहे. ते ट्विटर व फेसबुक थांबवत नाही की MSNBC CNN सारखी Dem धार्जिणि चॅनेल.
उजव्या बाजूचा ह्या विषयावर इतका टोकाचा व्हिडिओ असेल तर लिंक द्या.
हे घ्या. भरपूर आहेत.
हे घ्या. भरपूर आहेत.
या क्लिप मधे विशेषतः या जागांवर पाहा:
https://www.youtube.com/watch?v=5VAAtoH8MS8&t=92s
"सेटॅनिक वर्शिप, ९/११ ही कॉन्स्पिरसी आहे. पेण्टॅगॉन वर विमान पडलेच नाही. वगैरे वगैरे".
तेव्हा जर रिपब्लिकन अध्यक्ष असता तर हे सगळे उघडे पडले असते. ओह वेट!
पुढे ओबामा मुस्लिम आहे हे एक.
इथे अजून एकदा. "सरकारमधेल लोक सेटॅनिक वर्शिप करत आहेत". सरकार मधले!
https://www.youtube.com/watch?v=5VAAtoH8MS8&t=214s
अमेरिकेतील मास शूटिंग्ज ही गन ओनर्स ना घाबरवण्याकरता करण्यात आलेली आहेत. हे ही ती म्हणत आहे.
ग्रीन बाईंची प्रत्यक्षातील फेसबुक पोस्ट या साइटवर मिळेल. ज्युईश स्पेस लेझर्स, सूर्याची उष्णता पृथ्वीवर बीम करून कॅलिफोर्नियातील वणवे पेटवले गेले वगैरे.
https://www.mediamatters.org/facebook/marjorie-taylor-greene-penned-cons...
https://www.newyorker.com
https://www.newyorker.com/humor/borowitz-report/marjorie-taylor-greene-r...
अजून एक. यात ऑगस्ट २०२१ मधे काहीतरी होउन ट्रम्प पुन्हा अध्यक्ष होणार होता.
रेप या एकाच विषयवर रिपब्स नी
रेप या एकाच विषयवर रिपब्स नी उधळलेली मुक्ताफळे भरपूर आहेत.
पण हे आव्हान "मी चिखलात लोळून दाखवतो, बघूया तुमच्यात डेअरिंग आहे का ? " असे आहे.
उजव्या बाजूचा ह्या विषयावर
उजव्या बाजूचा ह्या विषयावर इतका टोकाचा व्हिडिओ असेल तर लिंक द्या. >>>> बाकी काहीही असो पण हा कॉन्फिडन्स कमाल आहे
लहान मूल पण "३ सत्त्या " ना "चॅलेन्ज!" म्हणताना किमान एकदा विचार करते , की बाबा खरंच असल्या ३ सत्त्या तर?!
"ह्या विषयावर" आणि प्रस्थापित
"ह्या विषयावर" आणि प्रस्थापित उजव्या चॅनेल वर ह्या अटी सोयीस्कर रित्या दुर्लक्षित ठेवल्या आहेत तर. ठीक.
मी चिखलात लोळून दाखवतो ह्या प्रकारचा प्रस्तुत विषयाशी काही संबंध नाही.
मग हा पाहाhttps://www.youtube
मग हा पाहा
https://www.youtube.com/watch?v=2OaGmqfn4wU
रिपब्लिकन आणि ट्रम्प वोटरच म्हणतोय. तुमच्या ट्विटरच्या लिन्कपेक्षा वेगळे काही नाही.
जगातल्या अनेक युद्धांत/
जगातल्या अनेक युद्धांत/ विवादांत बलात्कार हे शत्रू पक्षाच्या लोकांन्ना अद्दल घडविण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे.
फार काही मागे जाण्याची गरज नाही पण गेल्या काही वर्षातल्याच या घटना आहेत. इराक मधे याझिदींवर.. इथिओपिया मधे टीग्रे भागांत सरकार समर्थक/ विरोधक यांच्यामधल्या वादांत हजारो स्त्रियांवर बलात्कार झाले. युक्रेनमधे सध्या सुरु असलेल्या युद्धांतही रशियन सैन्याने अनेक युक्रेनीयन महिला/ मुलींवर शारिरीक अत्याचार / बलात्कार केले आहेत. काही घटनांत अगदी त्या महिलांच्या मुलांसमोर. या घटनांचा त्या महिलांना आयुष्यभर त्रास सहन करावा लागणार आहे.
केवळ एक- दोन असे अपवाद नाही आहेत, घटना लाखो आहेत. अशा घटनांतून जर महिलेला गर्भधारणा झाली तर त्या महिलेला अधिकार असायला हवा का नको?
टीव्हीवर रँडम कॉमेडियन बाई
टीव्हीवर रँडम कॉमेडियन बाई काय बोलतात हे शेंडेंना एव्हढे महत्वाचे वाटते.
न्यू झीलंड मधल्या मशिदीत गोळीबार करून ५१ लोकांना ठार करणारा माणूस युट्यूबवरच्या राईट विंग चॅनेल्स ना बघून प्रेरित झाला होता. टकर कार्ल्सन सारखा स्कम ग्रेट रिप्लेसमेंट थियरी वैगेरे कन्स्पिरसी थियरी लोकांच्या डोक्यात भरवतो.
बफेलो मध्ये नुकताच गोळीबार करून ११ लोकांना ठार करणारा माणूस मॅनिफेस्टो मध्ये क्रिटिकल रेस थियरी बद्दल काही बाही लिहितो, ज्यूंबद्दल वाट्टेल त्या कन्स्पिरसी लिहितो.
But yeah, let's focus on a damn comedian and how her joke is evil and shit.
कॉमी +1
कॉमी +1
https://www.bbc.com/news
https://www.bbc.com/news/world-us-canada
Buffalo shooting: Ten dead in attack at supermarket in New York state
वय वर्षे १८.
कॉमी, या महाभागांनी न्युझिलंडमधल्या खुन्यालाही डिफेंड केलं होतं. त्याच्या वागण्याला इस्लामी टेररिझम आणि त्याला पुरेसा विरोध न करणारे सामान्य मुस्लिम लोकच जबाबदार आहेत अशी थियरी अनेकांनी मांडली, स्वीकारली होती.
<< त्याच्या वागण्याला इस्लामी
<< त्याच्या वागण्याला इस्लामी टेररिझम आणि त्याला पुरेसा विरोध न करणारे सामान्य मुस्लिम लोकच जबाबदार आहेत अशी थियरी अनेकांनी मांडली, स्वीकारली होती. >>
------- हा युक्तीवाद वाचल्याचे लक्षात आहे .
मैत्रेयी, या बीबीवर फॉक्स
मैत्रेयी, या बीबीवर फॉक्स चॅनलवर ट्रंपचाट्या माठ्या टकर कार्ल्सन व ट्रंपच्या ताटाखालचे मांजर असलेल्या बिनडोक शॉन हॅनीटीच्या निरर्थक वायफळ बडबडीने ज्यांचे संपुर्ण पणे( १००%) ब्रेन वॉशींग झालेले आहे तीच लोक बाकी उर्वरीत अमेरिकन लोकांचे कसे सिस्टमॅटीक ब्रेनवॉशींग होत आहे म्हणुन उर बडवत आहेत! गंमतच आहे नाही?
आणखी एक गंमत(?) म्हणजे अॅबॉर्शन कोण व कशासाठी करतात याबाबत कुठलीही माहीती न काढुन घेता, त्याबाबत कुठलेही सोशल किंवा मेडिकल नॉलेज नसताना ,कोण कुठल्या चॅनलवर कोण कॉमेडिअन मुर्ख बाइने केलेले विधान उचलुन धरुन ते समस्त अॅबॉर्शन करणार्या स्त्रिया/ मुलींना लागु करण्याचा व अॅबॉर्शन करणार्या स्त्रिया/ मुलींवर प्रक्षोभक आरोप करण्याचा फुकट परवाना या बीबीवर काही लोकांना मिळाला आहे असे त्यांच्या “ उचलली जिभ, लावली टाळ्याला“ अश्या विधानांनी वाटते.
'फीअर माँगरींग' हा कन्सिस्टंट
'फीअर माँगरींग' हा कन्सिस्टंट पॅटर्न दिसतो काही लोकांच्या विचारांत मला. अगदी कन्सिस्टंट. पण ती कन्सिस्टन्सी विरोधकांचे मुद्दे खोडतानाच येते. बाकी आपल्या बुडाखाली काय खरच जळतय त्याबद्दल काहीच फिअर माँगरींग / फिअर नसते.
मैत्रेयी, या बीबीवर फॉक्स
मैत्रेयी, या बीबीवर फॉक्स चॅनलवर ट्रंपचाट्या माठ्या टकर कार्ल्सन व ट्रंपच्या ताटाखालचे मांजर असलेल्या बिनडोक शॉन हॅनीटीच्या निरर्थक वायफळ बडबडीने ज्यांचे संपुर्ण पणे( १००%) ब्रेन वॉशींग झालेले आहे तीच लोक बाकी उर्वरीत अमेरिकन लोकांचे कसे सिस्टमॅटीक ब्रेनवॉशींग होत आहे म्हणुन उर बडवत आहेत! गंमतच आहे नाही? >> मी अगदी हेच लिहायला आलो होतो रे मुकुंद. विकु ने लिहिलेले "चिखलात लोळण्याचे " उदाहरण एव्हढे चपखल आहे की बास.
maitreyee, दोन्ही प्रतिसाद
maitreyee, दोन्ही प्रतिसाद फार चपखल लिहिले आहेस.
कितीहि शिव्या द्या तरी हाउस
कितीहि शिव्या द्या तरी हाउस नि सिनेट रिपब्लिकन होणार. नि मग सगळ्यांचा सूड घेणार!
नाहीतरी दुसरे काहीच करता येत नाही त्या लोकांना. फार तर बिझनेस व श्रीमंत लोकांचे टॅक्स कमी करणार!! नि अबॉर्शन बॅन नक्की करणार.
मग काळ्या लोकांची नि एशियन्स ची खैर नाही! जिवंत रहाणे कठीण.
सॅमुएल अॅलिटो यांनी
सॅमुएल अॅलिटो यांनी लिहिलेल्या ओपिनियन मध्ये अनेक हिरे मोती आहेत.
रो वि वेड उलथवले की दक्षिणेतील महिलांनाही या प्रक्रियेत से मिळेल असे तारे तोडले आहेत. नशीब आपले की अॅलिटो भारतात सुप्रीम कोर्टात जज नाहीत. आपल्या मुलाच्या लग्नात हुंडा घेण्याचा एका महिलेचा अधिकार अबाधित रहावा म्हणून हुंडबंदी घटनाविरोधी ठरली असती.
अजूनही बराच इंटरेस्टिंग मजकूर आहे त्या ओपिनियन मध्ये !
आपल्याला न पटणारे विचार
आपल्याला न पटणारे विचार मांडणार्या लोकांना मूर्ख, अक्कलशून्य, कुठल्यातरी टॉक शो वा चॅनेलचे होयबा ठरवण्याचा एकमेव कार्यक्रम दिसतो आहे. मुद्दे खोडता येत नसले की अशा प्रकारे उडवून लावायचे हा एक चर्चेचा, वादाचा एक चांगला प्रकार आहे. उदारमतवादी (लिबरल) म्हणणारे अन्य विचाराला इतके अस्पृश्य आणि त्याज्य समजतात हे खूप बोलके आहे. पुढचे पाऊल बहुधा विरोधी लोकांवर कायमची बंदी घालण्याची मागणी होणार. ( अगदी ट्वीटर स्ट्याईल!). असो.
आपल्याला न झेपणारे विचार मांडले म्हणून कॉमेडियन बाईला मूर्ख ठरवून मोकळे. पण अशा बाईला व्यासपीठ देवून तिच्या "मूर्ख" बडबडीला खो खो हसणारे, त्यांचे काय? अशा विखारी विचारांना व्यासपीठ देणार्यांचे काय?
गर्भपात एक अपरिहार्य तडजोड आहे ज्यात आपल्या पोटच्या अर्भकाच्य नरडीला नख लावले जात आहे असा विचार न मानता तो स्त्री मुक्तीचा हुंकार आहे. वाट्टेल त्या मुदतीनंतर , हव्या तितक्या वेळा बाईला गर्भ पात करता आला पाहिजे. परंपरावादी लोकांच्या नाकावर टिच्चून त्यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करून गर्भवती व्हायचे आणि पूर्ण मुदत झाल्यावर गर्भपात करून संबंधित परंपरावादी व्यक्तीला "अद्दल घडवायची". असल्या विचाराला खोडून न टाकणे ह्याला मी हळूहळू समाजात भिनवले जाणारे विष मानतो. ह्याकरता टकर कार्ल्सन वा हॅनिटी च्या ओंजळीने पाणी प्यावे लागत नाही.
गर्भपाताची वर्तमान आकडेवारी जी काही असेल ती असेल. पण पुरोगामी माध्यमे मोठ्या प्रमाणात ब्रेन्वॉशिंग करत आहेत हे नाकारता येणार नाही. गर्भपाताचे स्त्रीमुक्ती, पुरोगामीत्व ह्या नावाखाली क्षुल्लकीकरण चालू आहे. ह्यात शंकाच नाही.
मराठीत एक म्हण आहे, “
मराठीत एक म्हण आहे, “ कुत्र्याचे शेपुट वाकडे ते वाकडेच.“
शेंडेबुडखे( नो पन इंटेंडेड!) नसलेल्या मुद्द्यांना काय कप्पाळ खोडणार? हे मी मागेही कधीतरी लिहीले होते.
असल्या शेंडेबुडखे नसलेल्या मुद्द्यांना सारखे सारखे उगाळले ( म्हणजे टकर कार्ल्सन व शॉन हॅनीटी करतात अगदी तसेच!) म्हणजे ते खरे किंवा व्हॅलिड आहेत असा गोड गैरसमज ज्यांनी कधी उभ्या आयुष्यात ( खरा) वादविवाद केला नसेल अश्यासारख्यांनी करुन घेउ नये.
ग्रुहीतकः “ क्ष “ ही “स्त्री” आहे.
विधानः “क्ष” ने मी मुद्दाम मजा म्हणुन अॅबॉर्शन करते असे म्हटले.
अनुमानः म्हणजे सर्व स्त्रिया मुद्दाम मजा म्हणुम अॅबॉर्शन करतात!
असले अनुमान करणारा व असा मुद्दा वादविवादात दामटवणारा जर माझ्या नववीतल्या मुलासमोर त्याच्या वादविवाद स्पर्धेत जर आला तर तोही त्याला कच्चा खाउन टाकेल इतका बिनबुडाचा व फॅलसी असलेला मुद्दा आहे तो!
आणी अश्या लोकांना मग ते कोणाच्या (म्हणजे शॉन हॅनीटीच्या व टकर कार्ल्सनसारख्या लोकांच्या) ओंजळीतुन ते पाणी पितात असे म्हटले तर त्यांनी उगाच त्रागा करुन घेउ नये.
आणी अश्या बिनबुडाच्या
आणी अश्या बिनबुडाच्या मुद्द्यांना इथे असामी, अमितव, मैत्रेयी, फारेंड,कॉमी, स्वाती आंबोळे, स्वाती २ अश्या बर्याच जणांनी वेगवेगळ्या अँगल्सनी अॅबॉर्शन बाबतीत प्रोचॉइस का महत्वाचा आहे ते समजवण्याचा (अॅबॉर्शनचे अजिबात क्षुल्लकीकरण व उद्दात्तीकरण न करता!) प्रयत्न केला आहे. पण तरीही काहीही फरक पडला नाही त्याने! ब्रोकन रेकॉर्ड चालुच आहे!
“गर्भपाताचे स्त्रीमुक्ती, पुरोगामीत्व ह्या नावाखाली क्षुल्लकीकरण चालू आहे. ह्यात शंकाच नाही” हे अनुमान हे मी वर दिलेल्या फॅलसी अनुमानाचे जिवंत उदाहरण आहे! हे “ दिव्य” अनुमान थेट शॉन हॅनीटी व टकर कार्ल्सन यांच्या ओंजळीतुन निपजलेले आहे!
आणी हो,
आणी हो,
“ उदारमतवादी (लिबरल) म्हणणारे अन्य विचाराला इतके अस्पृश्य आणि त्याज्य समजतात हे खूप बोलके आहे“
असे लिहीणार्यांना राजकिय व सामाजीक “उदारमतवादाची” व्याख्या म्हणजे काय हे तरी माहीत आहे का याची शंका येते. उदारमतवादी म्हणजे “ कुठल्याही सोशली रिग्रेसिव्ह“ व “ कायच्या काइ“ विचारसरणीला, “उदार”दिलाने नंदी बैलासारखी मान डोलवुन होकार देणारे नव्हे!
जो मतवाद सोशली प्रोग्रेसिव्ह प्रणालीला मानतो,जो मतवाद वैयक्तिक स्वातंत्र्य व सिव्हिल लिबर्टीला प्रमाण मानतो त्या मतवादाला राजकिय/सामाजिक संदर्भात उदारमतवाद म्हणतात. मग तश्या लोकांनी त्या विचारप्रणालीच्या पायालाच सुरुंग लावणार्या विचारांना अस्पृश्य व त्याज्य समजले तर त्यात एवढा अचंबा वाटण्याचे काय कारण?
शंभर टक्के खरं बोललात मुकुंद
शंभर टक्के खरं बोललात मुकुंद.
उदारमतवादी म्हणजे “ कुठल्याही सोशली रिग्रेसिव्ह“ व “ कायच्या काइ“ विचारसरणीला, “उदार”दिलाने नंदी बैलासारखी मान डोलवुन होकार देणारे नव्हे!
<< जो मतवाद सोशली
<< जो मतवाद सोशली प्रोग्रेसिव्ह प्रणालीला मानतो,जो मतवाद वैयक्तिक स्वातंत्र्य व सिव्हिल लिबर्टीला प्रमाण मानतो त्या मतवादाला राजकिय/सामाजिक संदर्भात उदारमतवाद म्हणतात. मग तश्या लोकांनी त्या विचारप्रणालीच्या पायालाच सुरुंग लावणार्या विचारांना अस्पृश्य व त्याज्य समजले तर त्यात एवढा अचंबा वाटण्याचे काय कारण?>>
----- मुकुंद सहमत... छान विचार.
बफेलो मधील गोळीबाराबद्दल
बफेलो मधील गोळीबाराबद्दल रिपब्लिकन लोकांची मते -
१. हा अर्थातच बायडेनचा दोष आहे, कारण गोळ्या मारणार्या मुलाबद्दल पोलिसांना आधीच माहिती असून त्यांनी काहीचे केले नाही - कारण कायदा व सुव्यवस्था बायडेन च्या राज्यात होत नाही.
२. अर्थातच त्या मुलाला मानसिक प्रोप्रॉब्लेम होता. मग उगाच रेसिस्ट रेसिस्ट म्हणण्यापेक्षा त्या प्रश्नावर तोडगा काढायला नको का?
३. अॅलन डर्शोविझ - बायडेनचे भाषण चांगले होते, पण त्याने खरे तर काळ्या लोकांसमोर जाऊन हे भाषण द्यायला पाहिजे. काळे लोक ब्रूकलिनमधे ज्यू लोकांना मारतात नि कॅलिफोर्नियात एशियन लोकांना - हे रेसिस्टच नव्हे काय? शिवाय काळे लोकच जास्त प्रमाणात इतर काळ्यांना मारतात.
४. मार्जोरि टेलर ग्रीन - (ही काँग्रेसवूमन आहे पण ती जास्त करून कॉमेडियन असावी अशी मला शंका येते. ) कॉमेडीयन असली तरी तिला मूर्ख ठरवून मोकळे होऊ नका! तिचे म्हणणे हे गोळीबाराचे प्रकार डेमोक्रॅट्सच करतात म्हणजे त्याचे निमित्त करून आपल्या गन्स घेण्याचा त्यांचा डाव आहे. तर या मुद्द्यावर मुद्देसूद चर्चा करा!!!
:दात काढणारी बाहुली:
<< टकर कार्ल्सन व शॉन हॅनीटी
<< टकर कार्ल्सन व शॉन हॅनीटी >>
हे लोक तिकडचे ओर्नब, सुधीर चौधरी, अमीश देवगण, नाविका आहेत का?
<< शिवाय काळे लोकच जास्त
<< शिवाय काळे लोकच जास्त प्रमाणात इतर काळ्यांना मारतात. >>
------ काळे लोक काळ्यांना मारत असतील तर त्या सर्व घटनांत एक रँडमनेस आहे.
इथे केवळ काळे लोक मारण्यासाठी अत्यंत नियोजन बद्ध रितीने हल्ला केला आहे. बफेलो हे ठिकाण निवडण्याचे कारण तिथे काळे लोक जास्त आहे हे होते. हल्ला टारगेटेड आहे. भयंकर आहे अशी टोकाची विचारसरणी.
अ ओ
अ ओ
टोकाचे विक्षिप्त, असहिष्णू ,
टोकाचे विक्षिप्त, असहिष्णू , गर्भपाता सारख्या मुद्द्याचा पोरखेळ करणारे तथाकथित पुरोगामी दाखवले की आम्ही तसे अजिबात नहीं बरं का असे ठासून सांगायचे ह्यावरून आठवले. आयसिस, इराण, अफगाणिस्तान, सौदी ह्या देशात/राज्यात इस्लामवर आधारित सरकारे आहेत त्यांच्याकडे बोट दाखवले की मुस्लिम अपोलोजिस्ट असे म्हणतात की त्यांनां खरा इस्लाम कळलेलाच नाही mhanunte असे उद्योग करत आहेत. खरा इस्लाम कसा शाआआआआआंत स्वभावाचा, सहिष्णू, उदार मतवादी आहे. तसच हेही. ज्या पुरोगामी, उदारमतवादी लोकांच्या हातात ताकद, पैसा, सत्ता आहे ते तमाम विकृत गोष्टी करत आहेत. मग आई किंवा बाप ना म्हणता जन्म देणारे लोक आणि वीर्य देणारे लोक, दूध पाहणारी आई ना म्हणता स्तनपान करणारे लोक म्हणायचं. ९९.९९९% टक्के लोकांना बघून ते स्त्री आहेत का पुरुष हे कळत असून एखाद्या मंद बुद्धी व्यक्तींशी बोलत असल्याप्रमाणे आपली सर्वनामे सांगायची. मला. "मला असे वाटते की फक्त दोन लिंगे आहेत, स्त्री आणि पुरुष" ह्याला हेट स्पीच मानून त्या व्यक्तीवर सोशल नेटवर्क वर कायमची बंदी. मात्र "आय हेट व्हाईट पीपल, आय एम गोइंग टु किल as मेनी as आय कॅन" असे म्हणणाऱ्या काळ्या व्यक्तीला मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून दुर्लक्ष.
त्यामुळे गर्भपात ह्याविषयाचे असेच आहे. गर्भपात विषयावर आमचा असा थिल्लर विचार नाही पण मुख्य प्रवाहात जे कर्ते करवते आहेत त्यांचा आहे त्याचे काय?
असो. पालथ्या घड्यावर किती पाणी ओतायचे? जाऊंद्या.
सध्या भ्रमिष्ट बायडन चा एक उद्योग चालू आहे. काहीतरी बेछूट बोलायचे आणि मग नंतर व्हाईट हौस स्टाफ ती घाण साफ करत बसणार.
काही दिवसापूर्वी पुतिन ला आम्ही सत्तेवरून हटवणार असे म्हणाला. मग जेन साकी चा खुलासा की तसे नाही.
मग रशियाने जैव अस्त्रे वापरली तर तुम्ही काय कराल? बायडन: तसेच उत्तर देऊ. ( म्हणजे आम्हीही जैव अस्त्रे वापरू)
खुलासा: तसे म्हणायचे नव्हते.
बा: मंकी पोक्स ही कोविड सारखीच भयंकर महामारी येऊ घातली आहे
बा खु: नाही. मला तसे म्हणायचे नव्हते.
पत्रकार: चीनने तैवानवर हल्ला केला तर अमेरिकाआपले सैन्य पाठवून त्याला उत्तर देणार का?
बा: हो.
खुलासा: नाही, नाही, तसे म्हणायचे नव्हते आम्हाला!
दुसरीकडे कमलाबाई विकट हास्य करत निरर्थक शब्दांची कोशिंबीर बनावट सुटली आहे.
नुकतेच "work together" हे शब्द एकच भाषणात किमान डझन वेळा वापरायचे आणि पूर्ण भाषण निरर्थक असले पाहिजे अशी काहीतरी स्पर्धा असावी असा समज करून बाईंनी भाषण केले. ह्यापेक्षा बायडनच बरा अशीच लोकांची भावना होत असेल!
Pages