काही आकडे देतोय- साभार इंटरनेट.
बॉक्स ऑफिस कलेक्शन्स cr -
पुष्पा - 365
ररर - 1050
केजीफ 2 - 300 (रिलीज होऊन पहिले दोन दिवस)
केजीफ पुष्पा ला ओव्हरटेक करेलच आणि कदाचित ररर पेक्षाही पुढे जाईल...
आता तुम्ही जर हिंदी चित्रपटांचे कलेक्शन बघाल तर ते 100 आकडाही गाठू शकले नाहीयत... अपवाद आलिया चा गंगुबाई आणि काश्मीर फाईल्स... बच्चन पांडे , अट्याक तर फ्लॉप आहेत..
बधाई दो आणि झुंड चे आकडे तर डिसपॉईंटिंग आहेत...
असेही नाही कि साऊथ चित्रपटांचे कलेक्शन फक्त साऊथ मधून आहे.. हिंदी बेल्ट मधूनही शंभर दोनशे कमवतायत...
सलमान भाई चे चित्रपट दोनशे करतील पण बाकीचे चित्रपट लोक का बघायला जात नसावेत? आणि हेच साऊथ चित्रपट कडे इतके का आकर्षित होत असावेत? मी केजीफ पाहायला सुरुवात केली- बघू शकलो नाही.. काहीच खास नव्हते... व्हायोलन्स तर प्रचंड होता.. पी जी - हा फॅमिली चित्रपट नाहीय...
लोक रिपीट बघत आहेत...
हिंदी इंडस्ट्री ही आपल्या महाराष्ट्रासाठी फार महत्वाची इंडस्ट्री आहे... हि इंडस्ट्री यशस्वी होणे फार गरजेचे आहे.. आमिर खान अजूनही हायस्ट बॉलिवूड बॉक्स ऑफिस वर एक क्रमांकावर आहे( दंगल - 2024 cr ) पण बाकीचे काय??
तुम्ही या की ओरिजिनल आआयडीने.
तुम्ही या की ओरिजिनल आआयडीने.
आज एक आयडी हाक मारल्याबरोबर उगवला कि नाही ?
पर्यावरण बिघडवू नका. त्या
पर्यावरण बिघडवू नका. त्या ताई काय म्हणाल्या ?
नवीन आयडी काढायला सर्वांना परवानगी आहे. काय मिळणार आहे कोण कुणाचा आयडी आहे हे शोधून ?
बोलल्या कि नाही त्या ? त्यांचा मान ठेवा. नाहीतर त्या पण तुमच्या बाजूने येणार नाहीत.
भोकाड पसरा आता. मी चाललो.
भोकाड पसरा आता. मी चाललो.
चला.. बोर्डिंग अनाउन्समेंट
चला.. बोर्डिंग अनाउन्समेंट झाली... छान वेळ गेला फिनिक्स.... तीन चार तासाने लॅन्ड होऊन घरी गेल्यावर चेक करतो.. तोपर्यंत स्क्रीनशॉट्स शोधून टाका... मलाही उत्सुकता आहे...लॅटर ...
नक्की टाका मात्र... विसरू नका... कि ई-मेल करू?
तुम्हाला काम असतं ? खरं नाही
तुम्हाला काम असतं ? खरं नाही वाटत.
ऑफीस बॉयला पण एव्हढा वेळ नसतो. माईक पुसायला चालला असल तर ओके.
फुस्स झालंय च्रप्स. लोड घेऊ
फुस्स झालंय च्रप्स. लोड घेऊ नका. जाऊन झोपा आता.
बेअरींग सोडून या ओरिजिनल नी.
मराठी कधी येणार?? ---------
मराठी कधी येणार?? --------- येऊन गेली की सैराट च्या वेळेस... अगदीच नाही अली असं नाही...
बरोबर anishka ते सैराट 100
बरोबर anishka ते सैराट 100 झाल्यावर.. प्राऊड मोमेन्ट होती... K
हे वाचून आठवलं की मी अजून
हे वाचून आठवलं की मी अजून सैराट बघितलाच नाहीए.. कुठे बघू शकते?
Zee5
Zee5
च्रप्स, यांनी मांडलेला
च्रप्स, यांनी मांडलेला मुद्दा सध्या चर्चेत आलाय. कन्नड स्टार Kichcha Sudeepa ने दक्षिण भारतीय चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा संदर्भ देत हिंदी आता राष्ट्रभाषा राहिली नाही अशा अर्थाचं विधान केलं. त्यावर अजय देवगणने हिंदी ही कायम राष्ट्रभाषा असेल. हिंदी राष्ट्रभाषा नाही, तर तुमच्या भाषेतले चित्र पट हिंदीत डब कशाला करता? असं विचारलं.
राष्ट्रवादी इंग्रजी वृत्तवाहिन्यांनी Kichcha Sudeepa ट्रोल झाला, अजय देवगणने त्याला मस्त सुनावले मग तो कसा मवाळ शब्दांत बोलू लागला, असं रिपोर्टिंग केलं आहे.
हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही या गोष्टीकडे त्यांनी अर्थातच दुर्लक्ष केलं.
हो हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे
हो हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे असा भरपूर लोकांचा गैरसमज असतो...
दृश्यम हिंदी डब सुद्धा आहे
दृश्यम हिंदी डब सुद्धा आहे आणि देवगणचा रिमेकपण आहे
हिंदीतल्या सध्याच्या बहुतेक
हिंदीतल्या सध्याच्या बहुतेक स्टार्सना लिहून दिलं नसेल तर हिंदीत बोलता येईल का, याबद्दल मला शंका आहे. यांच्या पुरस्कार समारंभाची भाषा इंग्रजी असते. एका समारंभात तर त्यांनी हिंदीची खिल्ली उडवली होती. नवाजुद्दिनची एक मुलाखत पाहिली. त्याला स्क्रिप्ट रोमनमध्ये मिळतं. देवनागरीत नाही. सेटवर सगळेजण इंग्रजीत बोलतात.
अजय देवगणला विमलवाल्यांनी
अजय देवगणला विमलवाल्यांनी राजभाषा आणि राष्ट्रभाषा यातला फरक कळवला पाहीजे.
हिंदी राष्ट्रभाषा नाही. हिंदी
हिंदी राष्ट्रभाषा नाही. हिंदी भाषिकांनी पसरवलेला गैरसमज आहे. पण दुसऱ्या राज्यांमध्ये गेल्यावर संवाद साधायला सोयीस्कर पडते.
अजय देवगणच्या पोटदुखीचं कारण
अजय देवगणच्या पोटदुखीचं कारण म्हणजे दक्षिणी चित्रपट हिंदीतच डब होऊन भारतभर पोचत असतील तर तो रिमेक करणार कशाचा?
मी लहानपणापासून हिंदीलाच
मी लहानपणापासून हिंदीलाच राष्ट्रभाषा म्हणत आलोय. हे मायबोलीवर येऊन मला समजले की हिंदी राष्ट्रभाषा नाहीये. अजूनही मी शुअर नाहीये याबाबत. आमच्या घरचे तर आजही हिंदीच राष्ट्रभाषा आणि महात्मा गांधीच राष्ट्रपिता समजून जगतात. जर त्यांना सांगितले असे काही ऑफिशिअल नाही तरी एक तर ते त्यांना पटणार नाही. आणि पटले तरी ते हिंदीला राष्ट्रभाषा समजायचे सोडणार नाहीत.
भारताची राष्ट्रभाषा हिंदी आहे
भारताची राष्ट्रभाषा हिंदी आहे. महाराष्ट्राची मराठी. तमिळनाडू ची तामिळ, तेलंगण ची तेलगू, मल्याळम ची मल्याळी. सिंपल.
अजय देवगण आणि सुदीप यांना
अजय देवगण आणि सुदीप यांना मायबोलीच्या संबंधित धाग्याच्या दुवा पाठवून द्या, प्रश्न मिटला.
अजय देवगण आणि सुदीप यांना
अजय देवगण आणि सुदीप यांना मायबोलीच्या संबंधित धाग्याच्या दुवा पाठवून द्या, प्रश्न मिटला. >>>
पण त्यासाठी आधी मराठी राष्ट्रभाषा करावी लागेल त्याचं काय?
(No subject)
विमल ची एक पुडी जोडा सोबत
विमल ची एक पुडी जोडा सोबत
म्हणजे गप वाचून घेईल कोणाकडून तरी
अजय देवगण सुद्धा फर्स्ट क्लास
अजय देवगण सुद्धा फर्स्ट क्लास शाळेत गेलेला दिसतोय.
पुष्पा २ आला - माय प्रिडिक्शन
पुष्पा २ आला - माय प्रिडिक्शन इज़ करेक्ट
पुष्पा २ सर्व रेकॉर्ड ब्रेक
पुष्पा २ सर्व रेकॉर्ड ब्रेक करत आहे.
<< पुष्पा २ आला - माय प्रिडिक्शन इज़ करेक्ट >>
----- पुष्पा बद्द्ल अंदाज व्यक्त केला आहे ? कुठे ?
बाराशे कोटी.
बाराशे कोटी.
पुष्पा टू
या चित्रपटाला साउथ चा चित्रपट किंवा भारतीय चित्रपट म्हणूच नका. हा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट आहे सोनी ,वॉर्नर पासून सगळ्यांनी त्यात पैसे घातले आहेत.जगातल्यासोळा भाषांमध्ये काही हजार चित्रपटगृहात एकाच वेळेस रिलीज झाला आहे . दणक्यात धंदा करतोय.
त्याची बॉलीवूडची तुलना करू नका. तांत्रिक दृष्ट्या बॉलीवूड पेक्षा सरस असतो. एकाच्या जागी 10 फ्रेम्स असतात,
दक्षिण भारतात स्टुडिओमध्ये लेबर स्वस्त आहे कटकटी नाहीत शिस्त आहे तिथे चित्रपट बनवणे परवडते. मुंबईत युनियन आणि संपबाजी खूप आहे ,त्यामुळे चित्रपट बनवणे थोडेसे महाग आणि कटकटीचे आहे, आणि आता आधुनिक तंत्रज्ञानाने भाषेच्या मर्यादा ओलांडले आहेत त्यामुळे dubbing खूप स्वस्त आणि सुलभझाले आहे.
बॉलीवूडच्या कल्पना दारिद्र्य या विषयावर न बोलणे इष्ट.
कृष्णा गोदा कावेरी पेरियार या नद्यातील खोऱ्याची संस्कृती वेगळीच आहे कट्टर आहे अट्टल आहे त्या मातीतील चित्रपट कसदार असतात हे वेगळे सांगणे न लगे
Pages