काही आकडे देतोय- साभार इंटरनेट.
बॉक्स ऑफिस कलेक्शन्स cr -
पुष्पा - 365
ररर - 1050
केजीफ 2 - 300 (रिलीज होऊन पहिले दोन दिवस)
केजीफ पुष्पा ला ओव्हरटेक करेलच आणि कदाचित ररर पेक्षाही पुढे जाईल...
आता तुम्ही जर हिंदी चित्रपटांचे कलेक्शन बघाल तर ते 100 आकडाही गाठू शकले नाहीयत... अपवाद आलिया चा गंगुबाई आणि काश्मीर फाईल्स... बच्चन पांडे , अट्याक तर फ्लॉप आहेत..
बधाई दो आणि झुंड चे आकडे तर डिसपॉईंटिंग आहेत...
असेही नाही कि साऊथ चित्रपटांचे कलेक्शन फक्त साऊथ मधून आहे.. हिंदी बेल्ट मधूनही शंभर दोनशे कमवतायत...
सलमान भाई चे चित्रपट दोनशे करतील पण बाकीचे चित्रपट लोक का बघायला जात नसावेत? आणि हेच साऊथ चित्रपट कडे इतके का आकर्षित होत असावेत? मी केजीफ पाहायला सुरुवात केली- बघू शकलो नाही.. काहीच खास नव्हते... व्हायोलन्स तर प्रचंड होता.. पी जी - हा फॅमिली चित्रपट नाहीय...
लोक रिपीट बघत आहेत...
हिंदी इंडस्ट्री ही आपल्या महाराष्ट्रासाठी फार महत्वाची इंडस्ट्री आहे... हि इंडस्ट्री यशस्वी होणे फार गरजेचे आहे.. आमिर खान अजूनही हायस्ट बॉलिवूड बॉक्स ऑफिस वर एक क्रमांकावर आहे( दंगल - 2024 cr ) पण बाकीचे काय??
सरांनी हलकेच धागा रुळावरुन
सरांनी हलकेच धागा रुळावरुन ढकलुन दिला. च्रप्स सरकौ पताही नही चला.
सगळ्यांना सगळं कळतं इथं
सगळ्यांना सगळं कळतं इथं
फक्त ते दाखवत नाही इतकंच
भाबडेपणा करण्यात मास्टरी आहे सरांची
च्रप्स पाँईट आहे. केबल
च्रप्स पाँईट आहे. केबल टीव्हीने सारीच समीकरणे बदलली. आणि आता ओटीटीने तर आणखी पलटवली.
मराठा मंदिरला डीडीएलजे मी सुद्धा कैक वर्षांनी पाहिला आहे. लोकं ईतक्या वर्षांनीही बघतात आणि एंजॉय करतात हे अनुभवले आहे.
शाहरूखच्या चित्रपटात त्याच्या तोंडी असलेले संवाद साधेसेच असतात. पण तो जसे मारतो त्याने ते आत काळजात उतरतात..
तसेच शाहरूख रुढार्थाने नर्तक नाही. पण गाण्याचा मूड नाचात कसा पकडावा हे त्याच्याकडूनच शिकावे.
शाहरूखच्या संवांदांवर एक आणि त्याच्या गाण्यांवर एक असा दोन वेगळे धागे हवेत. काढा कोणीतरी. ईथे अवांतर नको
सिनेमा सिनेमा यांचे पहिल्या
सिनेमा सिनेमा यांचे पहिल्या पानावरचे पॉइण्ट्स बरोबर आहेत.
त्याखेरीज खानावळीबद्दल जनरल नावड असलेल्यांना हे पिक्चर त्यांच्यापेक्षा भारी चालत आहेत आणि या पिक्चर्स मधे "हिंदू" मोटिफ्स्/प्रतिमा जास्त दिसतात हे सुखावते. ते ही प्रचंड तारीफ करतात. RRR मी अजून पाहिलेला नाही पण त्यातही शेवटी तसे आहे असे वाचले.
साउथचे - विशेषतः तेलुगु - पिक्चर बाकी भारतात इतक्यात लोकप्रिय होण्याचे कारण कमर्शियल सुद्धा आहे. त्यांचे निर्माते काही फॅन्सना पैसे देउन भारतभर वातावरण निर्मिती करतात. त्याने कुतूहल वाढून इतर लोक पाहायला येतात. मार्केटिंग गिमिक आहे. एक मोठा वर्ग आहे ज्यांना हे पिक्चर खरोखर आवडतात. पण इतके प्रचंड चालण्यामागे ते गणितही आहे.
तमिळ व मल्लू पिक्चर्स चे थोडे वेगळे आहे. तमिळ मधे बहुधा दोन्ही प्रकारचे बनतात - रजनी वाले आणि अर्थपूर्ण सुद्धा. मल्लू दुसर्या प्रकारचे जास्त आहेत. किमान आपल्यापर्यंत पोहोचतात ते तरी.
कन्नड चित्रपटसृष्टीला स्वतःची काही इमेज आहे का कल्पना नाही. माझा एकूण समज ती मराठी इतपतच लहान आहे असा होता. केजीएफ ने ते गणित बदलवले असावे.
कन्नडा अत्यंत फ्लॉप इंडस्ट्री
कन्नडा अत्यंत फ्लॉप इंडस्ट्री होती- येस केजीफ ने समीकरण बदलले आहे...
मुंगारू माले पाहिला होता आधी- आवडला होता - आता नाही आवडणार...
तेलुगु लोकप्रिय चित्रपट फार
तेलुगु लोकप्रिय चित्रपट फार विनोदी असतात. एक हीरो दोन हीरॉइन हे बहुतांश असतेच. हीरो नुस्ता भारतात नव्हे तर जगात भारी असतो. त्याला नेहमी "फॉरीन व्हॅलिडेशन" असते. तो लास वेगासला डाउनटाउन मधे नाचतो इतर पोरींबरोबर. नाहीतर इटली/युरोपमधे फिरतो, तेथील पोरी - त्या ही गोर्याच - टोटली त्याच्या मागे असतात. त्याची ताकद उत्तरेकडच्या कोणत्याही हीरोपेक्षा चौपट असते. एका फायटीत तो काय काय करतो.
त्यातली एक तिटकारा येणारी गोष्ट म्हणजे हीरॉइनला पटवायला तो अजून जुनेच चाळे करतो. हिंदीत हे ८०ज/९०ज मधे चालत असे. ना मे हाँ है वगैरे. टॉलीवूड मधे अजूनही तेच चालते. तो थेट ऑफिसमधल्या महिला बॉसला सांगतो की तू कमी कपड्यात पाय उघडे ठेवून ऑफिसमधे आलीस की मला काय काय होते. हीरॉइन सहसा गोरी व ९०ज मधल्या रवीना सारखी भावखाऊ श्रीमंत असते. मग आपला हीरो तिला "वठणीवर" आणतो. ते ही बहुधा काही सामाजित सेवा वगैरे करून. मग दोघेही नाचतात. ते नाच भारी बिरी असतात का नाही माहीत नाही पण इतर असंख्य ठिकाणी दिसणार्या स्टेप्स सुद्धा परदेशी बायका अगदी हरखून पाहात असतात.
केजीएफ तेलुगु नसला तरी त्याच वळणावरचा. मर्द ई हीरो. नुसती दाढीच बास आहे. तेलुगु मधले अल्लू अर्जुन वगैरे खूप व्हेरिएशन्स तरी दाखवतात चेहर्यावर. हा सतत कोणावर तरी खार खाउन आहे. बाइक वर स्वतःचे नाव लिहीलेले. शंभर एक जणांना सहज लोळवतो. त्याच्या समोर स्त्रियांच्या दोनच इमेज. एक आई/बहीण बेहेनजी टाइप. दुसरी फटाकडी हीरॉइन. तिची मर्जी वगैरे गणतीत नाही. काहीतरी भंकस संवाद. अनेकांना आवडतात असे दिसते. अग्निपथ मधले संवाद दीवार इतकेच भारी समजणारे ते हेच पब्लिक असावे
दक्षिणेकडील राज्यात लोकसंख्या
दक्षिणेकडील राज्यात लोकसंख्या कमी असली तरी बेरोजगारी ही अगदी कमी असल्याने सिनेमे तिकीट काढून बघण्याची क्रयशक्ती (पर्चेस पॉवर) तिथे आहे. ९० च्या दशकात जेव्हा केजो सिनेमे काढायचा तेव्हा एन आर आय वर्गात पंजाबी, गुजराथी भाषिक अधिक होते. आता परदेशात दाक्षिणात्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे परदेशी कमाई (ओव्हरसीज कलेक्शन) ही वाढले आहे.
तेलूगू फिल्म इन्डस्ट्री
फा +१
तेलूगू फिल्म इन्डस्ट्री अत्यंत पेट्रिआर्कल वाटते, त्यामानाने हिंदी थोडी बरी आहे. गंमत म्हणून बरे वाटतात पण दर्जा व निर्मितीमूल्य हिंदीचे सरस आहे, मराठीची संहिता हिंदीपेक्षाही खणखणीत असते , रादर संहिता हाच बऱ्याच मराठी सिनेमाचा नायक असतो, पण बजेट कमी व अशा सिनेमांची संख्या अत्यंत कमी त्यात कॉमेडी पट अधिक त्यामुळे शोधून बघणे होत नाही. तेलूगू सिनेमा तितका ओपन नाही, हिंदी सिनेमा सुद्धा (थँक्स टू ओटीटी) आता होत आहे. त्यामुळे आता मागे जावे वाटत नाही. सिनेमा हा चांगल्या पुस्तकासारखा हळूहळू उलगडत जावा अशी अपेक्षा असते, स्पून फिडींग कटाक्षाने नको वाटते. साऊथपटांनी तात्पुरते मनोरंजन होते पण प्रेक्षक म्हणून समाधान होत नाही, काही नवीन मिळाल्यासारखे वाटत नाही. मल्याळम व कन्नड बघितलेच नाहीयेत.
फारएंड - लोल
फारएंड - लोल
सीमंतिनी- मुद्दा बरोबर आहे ..
मराठीची संहिता हिंदीपेक्षाही
मराठीची संहिता हिंदीपेक्षाही खणखणीत असते , रादर संहिता हाच बऱ्याच मराठी सिनेमाचा नायक असतो
>>>>>>>
मजबूरी का नाम गांधीजी असेही असू शकते हे..
म्हणजे करिष्माई नायक नायिका नसल्याने मग संहितेलाच नायक बनवा. अन्यथा चित्रपट व्यवसाय म्हटले की कोणाला पैसे कमवायचे नसतात.
ज्या कलाकारांना हिंदीत संधी मिळते ते जास्त पैसे कमवायला तिथे जातात. भले मग भुमिका तुलनेत दुय्यम वा कमी लांबीची का असेना. कमी श्रमात पैसे जास्त मिळत असतील तर का नाही.
बाकी हिंदीतही कितीतरी छान आणि आशयघन चित्रपट आजही निघतातच की जे तांत्रिकदृष्ट्याही सरस असतात. हिंदीतले लो बजेट चित्रपटांनाही ते शक्य होते कारण हिंदीचे मार्केट मराठीपेक्षा मोठे आहे.
मराठी कम्युनिटी पण भरपूर आहे
मराठी कम्युनिटी पण भरपूर आहे भारताबाहेर.. मराठी मंडळे आहेत... बघतात का मराठी चित्रपट जवळच्या थेटरात?
साउथ सिनेमातले विनोद पन जरा
साउथ सिनेमातले विनोद पन जरा सद्य परिस्थितीला धरून असतात. सध्या सोनि लिव्ह ला एक नवा तेलुगु सिनेमा आला आहे. नाव वाचता आले नाही. पन ट्रेलर भारी आहे. हाउस हसबंड टाइप सिचुएशन दिसते. आज बघून लिहि ते.
संगीत पण जमेची बाजू आहे.
मराठीत संहिता च नायक>> संहिता
मराठीत संहिता च नायक>> संहिता नावाचा दळण पिक्चर बघितला का. जाम बोअर आहे. व नायकाला उगीचच उघडे पाडले आहे.
आजचा ताजा आकडा - केजफ चार
आजचा ताजा आकडा - केजफ चार दिवस 552 cr
बजेट आहे 100.
मी सध्या पुष्पा आणि rrr हे
मी सध्या पुष्पा आणि rrr हे दोन साऊथ इंडियन चित्रपट पाहिले.
पुष्पा अजिबात आवडला नाही.rrr खूप आवडला.>>> +१ मी-अनू.
सिनेमा सिनेमा चांगली पोस्ट.
फारेंड पोस्ट मधे खरंच तथ्यं आहे, इतक्या वेल एजुकेटेड साऊथ लोकांना चित्रपटात हे असं स्त्रियांचा पाला पाचोळा केलेलं कसं काय खपतं कोण जाणे!
मराठी कम्युनिटी पण भरपूर आहे भारताबाहेर.. मराठी मंडळे आहेत... बघतात का मराठी चित्रपट जवळच्या थेटरात?>>> हो अगदी. पावनखिंड ला तर नथ, पैठणी घालून गेलेल्य होत्या स्त्रिया!
पण अगदी तस्साच रीस्पॉन्स मी वसंतराव ला तर नाहि ना मिळणार.. कारण बहुधा पब्लिसिटी!
इतर धागा भरकटवणार्यांना इग्नोरास्त्र!
म्हणजे करिष्माई नायक नायिका
म्हणजे करिष्माई नायक नायिका नसल्याने मग संहितेलाच नायक बनवा. अन्यथा चित्रपट व्यवसाय म्हटले की कोणाला पैसे कमवायचे नसतात.>>>
महागुरू पिळगावकर आणि लघुगुरु स्वजो यांना विसरलात का सर?
यांच्याकडे करिष्मा नसेल तर मग आता फक्त कोथरूडलाच जावं लागेल बघायला
फारएण्ड >> +१
फारएण्ड >> +१
साऊथच्या पोरी पटवायच्या फंडाबद्दल इथे कि मिपा कि अन्य कुठेतरी डिटेलमधे वाचलेय. रावडी राठोड मधली पैज होती त्यात. त्याचा ओरोजिनल आहे तोच पवन कल्याण आहे का ?
आशुचँप >>> +१ हेच लिहायला येणार होतो. सकाळी घाई असल्याने नाही जमले.
काल प्रसंगवशात एक चलचित्रपट
काल प्रसंगवशात एक चलचित्रपट बघण्याचा योग आला. केजिएफ असे त्याचे नाव होते. हा पट मुळात कन्नड भाषेतील असून तो हिंदी भाषक लोकांना आणि ती भाषा येणाऱ्या इतर लोकांनाही दुःख व्हावे या हेतूने हिंदीत डब करून गल्लोगल्ली लावला गेला आहे. बर्याच तासात दुःख न मिळाल्याने, त्याच्या शोधात असणारे आम्ही काही कलाकृमी तो पट बघावयास जाऊन बसते झालो. भावनिक गुंतवणूकीपेक्षा आर्थिक गुंतवणूकीवर निर्मात्याचा भर असल्याने, कॅमेरा, संकलन या बाबी थ आणि क्क करणाऱ्या होत्या. त्या अत्यंत दर्जेदार व श्रेष्ठतम असल्याने, त्यावर न बोलणे इष्ट. पण मित्रहो, काय ती कथा आणि पटकथा ! दिप्लोच. दिप दिप दिप्लो. चर्चेअंती आम्हाला कळलेली कथा साधारणपणे अशी होती.
एकदा एक राॅकी असतो. तो रस्त्याने जात असतो. मग मारामारी होते. नंतर थोडा वारा सुटतो. मग जरा मारामारी होते. मग तो उजवीकडे बघतो. मग थोडी मारामारी होते. नंतर थोडे संगीत ऐकू येते. मग जरा जास्त मारामारी होते. मग समोरून काही लालित्यपूर्ण कुरूप माणसे येतात. मग जरा मारामारी होते. मग संगीत वाजते. मग भरपूर मारामारी होते. मग मेन व्हिलन येतो. त्याचे नाव गरूडा असते. मग त्यांचे काही तात्विक मतभेद होतात. मग जरा चेंज म्हणून अंमळ मारामारी होते. मग मगाशी जी कुरुप माणसे रसिकांना दिसत होती, त्यातली वेचक म्हणजे कमाल बेंगरूळ, ओंगळ, हिडीस आणि विद्रूपोत्तम माणसे मारामारी करायचा निर्णय घेतात. मग जरा मारामारी होते. मग काही संवाद होतात. त्यातून कोणालाच काही कळत नाही. म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा. मग जरा मारामारी होते. आता मुळात या पिच्चरी, हे जे सगळे चालू आहे, ते एक माणूस दुसर्या बाईला सांगत असतो. तिथे मात्र मारामारी होत नाही. आतापर्यंत पिच्चरमधे सुमारे 26578 लोक मारामारी करून गेलेले असतात. त्यातील 48.78% लोकांच्या दाढ्या महागाईपेक्षा जास्त वाढलेल्या असतात. ते सर्व केस एकत्र केले तर पुढची 68 वर्ष गावोगावी 2/2 अस्वलं भेट देता येतील. तर ते असो. आता कथेचा महत्त्वपूर्ण टप्पा येतो. म्हणून मग जरा मारामारी होते. मग त्या सिनेमात काम करून कंटाळलेल्यांचे मनोरंजन व्हावे म्हणून त्रिदेव या सिनेमातले एक गाणे सादर होते. मग जरा मारामारी होऊन मध्यंतर होतो.
उत्तरार्धात मात्र संपूर्ण वेगळीच ट्रिटमेंट या पटाला दिलेली आहे. सुरवातीला थोडी मारामारी होते. मग जरा मारामारी होते. मग आणखीन मारामारी होते. नंतरच्या मारामारीला न्यूनगंड येवू नये म्हणून एक नीच मारामारी तिथे रहायला येते. तिच्याबरोबर तिची चुलत मारामारी असते. त्यांचे आजिबात पटत नसते. मग काय करणार त्या ? मग त्यांच्यात जरा मारामारी होते. आता ही सर्व मारामारी करणारी सात्विक आणि निरागस धूडं मारामारीत फारच प्रवीण असतात. संपूर्ण पिच्चरमधे एकूण सव्वादोन तास मारामारी आहे पण एकही स्टेप रिपीट होत नाही. बुक्क्या, फायटी, लाथा, लाकडं, शस्त्र, दारू आणि गोळे एकमेकांना प्रदान केल्यावरही सर्वजण उत्साहात चित्कारत असतात. पुल्लिंगांचा मधूनच कंटाळा आल्याने काही स्त्रिया तिथे येतात. आता त्यांनी तरी समझोता करावा की नाही ? पण छ्या ! त्याही या मारामारीस उत्तेजनच देतात. मग जरा मारामारी होते. आणि ती होतच रहाते. होतच रहाते. होतच रहाते. एखाद्या विहिरीत जसा जिवंत पाण्याचा झरा असतो, तसा या पिच्चरमधे मारामारीचा जिवंत झराच आहे. सतत झुळूझुळू मारामारी वहातच असते. कधी झुळूझुळू तर कधी बदाबदा. कोण कोणाच्या बाजूने आहे, कोण शत्रूपक्षात आहे; हे ओळखून दाखवणार्याला बक्षीस आहे. हे सर्व कमी म्हणून की काय....पिच्चरला भयानक वेग आहे. पिच्चर आणि डेक्कन क्वीन एकदम सोडले तर पिच्चर जिंकेल. पण हे कुठे बोलायची सोय नाही. कारण सगळेच चिडलेले. सर्व नटांच्या चेहर्यावर ताप, संताप, उद्वेग, विद्रोह, सूड आणि स्फोट. तर हे विषयांतर झाले. आता कथेकडे वळतो. मग जरा मारामारी होते. परत मग जरा मारामारी होते. मग उर्वरित मारामारी होते. मग पूरक मारामारी होते. मग एक हिंसक मारामारी होते आणि सरतेशेवटी आणखी थोडी मारामारी होऊन फायनल मारामारी होते आणि शेवटी एक सुखद धक्का म्हणून तुंबळ मारामारी होते !!!
या मारामाऱ्यांमधे विश्रांती म्हणून फाश्टात बोललेले संवाद, मुसळधार पार्श्वसंगीत, बटबटीत अभिनय आणि अतिभव्य लोकेशने आहेत....तेव्हा बालमित्रांनो...आज्जिबात चुकवू नका हा चलचित्रपट...उठा आणि बघा !!!!!
मिलिंद शिंत्रे
साभार फेसबुक
त्याचा ओरोजिनल आहे तोच पवन
त्याचा ओरोजिनल आहे तोच पवन कल्याण आहे का ?>>>>नाही तो रवी तेजा आहे.
त्या गावोगावी अस्वल वाल्या
त्या गावोगावी अस्वल वाल्या वाक्यावर हहपूवा
मला हल्ली हे दाढीवाले ओळखूच येत नाहीयेत.सगळेच सारखे दिसतात.
केजीएफ ने १००० कोटीचा गल्ला
केजीएफ ने १००० कोटीचा गल्ला जमवला. त्यात मिलिंद शिंत्रे सरांनीही हातभार लावला याबद्दल त्यांचे आभार. तुमचे मत काहीही असो, जवळच्या थेटरला जाऊन बघून या. आपल्याला ३००० कोटींचं टार्गेट आहे. इज्जत का सवाल है.
आशुचँप सर >> हत्तीची अॅक्टींग मुगले आजम पाहिला नसल्याने नाही पाहिली. दिलीपकुमार नावाचा दीड शहाणा नट असलेले मूव्हीज बघवत नाही. अमिताभ बच्चन जरी शारूक सरांसमोर कच्चे असले तरी शक्ती मधे अमिताभने दिलप्याला कच्चा खाल्लाय. कसलं फूटेज खात खात डायलॉग मारतो. मै तुम्हारे सामने लुंगी पहनके नही पँट पहनके खडा हूं हा डायलॉग त्यातच आहे. ओव्हररेटेड नट.
हत्तीच्या अॅक्टींगची क्लिप असलेल्या लिंक्स द्या. तेव्हढंच बघता येईल. मुगले आजम न बघण्याचं अजून एक कारण म्हणजे त्यात अजित आहे पण त्याने एकदाही सारा शहर मुझे लायनके नामसे जानता है हा डायलॉक मारलेला नाही.
शोले मधे घोड्यांच्या खालोखाल धन्नोने अॅक्टींग तोडलीय. बसंती ज्या वेळी ओरडते "चल धन्नो, बसंती की इज्जत का सवाल है " तेव्हां धन्नोच्या डोळ्यात " तुम्हारी इज्जत है और मेरी कुछ नही " हा डायलॉग उमटलेला स्पश्ट दिसतो. न बोलता जीव खाऊन पळायचं काम केलंय घोडीने.
मृणाली थँक्स.
मृणाली थँक्स.
गाशा एक्स्पेक्टेड होतं हे. अडचण झाली कि बायपास काढणारच. आता ते सर सर चा कंटाळा आलाय वाले गप्प बसणार. उत्तर दिलं की बिळातून बाहेर येणार. सर सर ला पर्याय शोधायला पाहीजे आता.
हिज हायनेस
शहाणशहा ऑफ पेडगाव
मिलिंद शिंत्रे यांच्या
मिलिंद शिंत्रे यांच्या पोस्टला +१००००
केजिफ अत्यंत इल्ललोजिकल सिनेमा आहे . संवाद , अभिनय, पटकथा कशाचा काहीही संबंध नाही
महागुरू पिळगावकर आणि लघुगुरु
महागुरू पिळगावकर आणि लघुगुरु स्वजो>> पन्नाशीतले विग लावलेले हिरो किती दिवस बघायचे?
गारंबी चे शरूक सर, तुम्हाला
गारंबी चे शरूक सर, तुम्हाला हत्तीचा अनुभव बघण्यासाठी मध्यंतर होईपर्यंत सिनेमा सहन करावा लागेल
मध्यंतरानंतर आहे तो सिन
हत्तीने चिलखत घालुनही लाजबाब अकटिंग केली आहे
पन्नाशीतले विग लावलेले हिरो किती दिवस बघायचे?>>>
साठीला येऊन इंजेक्शन टोचून, ओघळते स्नायू वर खेचून, आपल्यापेक्षा एक पिढीने लहान असलेल्या हिरवणीसोबत रोमान्स करणाऱ्या सलमान शरूख ना 300 कोटींचा गल्ला देता
पण सुटलेल्या ढेरी ने कॉलेजमध्ये जाणारा स्वजो खटकतो होय तुम्हाला
मराठी माणूसच मराठी माणसाला खाली खेचतो हेच खरे
मनात आणलं तर आजही म्हागृ शरूख
मनात आणलं तर आजही म्हागृ शरूख च्या लहान भावाचा आणि लघुगुरु शरूखच्या मुलाचा रोल करू शकतील
अंकुश आणि सई यांनाही वाड्यातली चिमणी पाखरे म्हणून सहज खपवता येईल
आजही म्हागृ शरूख च्या लहान
आजही म्हागृ शरूख च्या लहान भावाचा आणि लघुगुरु शरूखच्या मुलाचा रोल करू शकतील>>अशा प्रतिसादांनी चाहत्यांच्या भावना दुखावल्या जाऊन ते माबोला कायमचा राम राम करु शकतात.
आधी अशोक सराफ होते. अभिनयात दादा माणुस. पण बागेत नायिकेमागे गाणे म्हणत नाचायचे तेव्हा बघवले जायचे नाही.
अशा प्रतिसादांनी चाहत्यांच्या
अशा प्रतिसादांनी चाहत्यांच्या भावना दुखावल्या जाऊन ते माबोला कायमचा राम राम करु शकतात.>>>>
आजकाल कशानी भावना दुखावल्या जातील याचा नेमच राहिलेला नाही
अशोक सराफ तरी ठिके एका कुठल्यातरी सिनेमात विक्रम गोखले यांनाही असलं काहीतरी करायला लावलं आहे
नाव विसरलो काय होतं ते
पण जे काही होतं ते फार भयाण होतं
महागुरू पिळगावकर आणि लघुगुरु
महागुरू पिळगावकर आणि लघुगुरु स्वजो यांना विसरलात का सर?
यांच्याकडे करिष्मा नसेल तर मग ....
>>>>>
आपल्याकडे कोणी चमकतोय असे दिसले की सर्वात पहिले ट्रोलर्स सक्रिय होतात.
मराठी माणसे एकमेकांचे पाय खेचतात, पुढे जाऊ देत नाहीत असे म्हणतात खरे... पण बरेचदा त्यात तथ्यही जाणवते.
म्हणजे तुम्हाला अभिमान नसेल, वा ते कलाकार तुमच्या आवडीचे नसतील तर ठिक आहे. प्रत्येकाची आपापली आवड. पण ट्रोल करण्यात लोकांना काय आनंद मिळतो हे आकलनाच्या पलीकडे.
दुनियादारी चित्रपट मराठीतच माझ्या कित्येक अमराठी मित्रांनी पाहिला. पण त्याचवेळी काही मराठी माणसे त्याला ट्रोल करण्यात धन्यता मानत होती.
बहुधा साऊथला हे होत नसावे.
या तो गोडा बोलो या गधा बोलो
या तो गोडा बोलो या गधा बोलो एक पे कायम रहो हिहा (हिज हायनेस)
मराठीत मजबुरी का नाम म गांधी वाला प्रतिसाद आणि हा प्रतिसाद दोन वेगवेगळ्या पर्सनॅलिटीजचे लक्षण आहे का?
Pages