हल्लीचे साऊथ इंडियन चित्रपट आणि बॉक्स ऑफिस

Submitted by च्रप्स on 16 April, 2022 - 22:49

काही आकडे देतोय- साभार इंटरनेट.
बॉक्स ऑफिस कलेक्शन्स cr -
पुष्पा - 365
ररर - 1050
केजीफ 2 - 300 (रिलीज होऊन पहिले दोन दिवस)

केजीफ पुष्पा ला ओव्हरटेक करेलच आणि कदाचित ररर पेक्षाही पुढे जाईल...

आता तुम्ही जर हिंदी चित्रपटांचे कलेक्शन बघाल तर ते 100 आकडाही गाठू शकले नाहीयत... अपवाद आलिया चा गंगुबाई आणि काश्मीर फाईल्स... बच्चन पांडे , अट्याक तर फ्लॉप आहेत..
बधाई दो आणि झुंड चे आकडे तर डिसपॉईंटिंग आहेत...

असेही नाही कि साऊथ चित्रपटांचे कलेक्शन फक्त साऊथ मधून आहे.. हिंदी बेल्ट मधूनही शंभर दोनशे कमवतायत...

सलमान भाई चे चित्रपट दोनशे करतील पण बाकीचे चित्रपट लोक का बघायला जात नसावेत? आणि हेच साऊथ चित्रपट कडे इतके का आकर्षित होत असावेत? मी केजीफ पाहायला सुरुवात केली- बघू शकलो नाही.. काहीच खास नव्हते... व्हायोलन्स तर प्रचंड होता.. पी जी - हा फॅमिली चित्रपट नाहीय...
लोक रिपीट बघत आहेत...

हिंदी इंडस्ट्री ही आपल्या महाराष्ट्रासाठी फार महत्वाची इंडस्ट्री आहे... हि इंडस्ट्री यशस्वी होणे फार गरजेचे आहे.. आमिर खान अजूनही हायस्ट बॉलिवूड बॉक्स ऑफिस वर एक क्रमांकावर आहे( दंगल - 2024 cr ) पण बाकीचे काय??

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशुचँप, थोड्या वेळापूर्वी तुम्ही ज्ञानेश्वर पादुका चौकात सायकलवर होता का? खऱ्या नावाने आवाज द्यायचा तर मी आयडी नावाने हाका मारल्या.

च्रप्स, वैकुंठपुरामुल्लु बघितलात का ? मारामारी आहे. अगदी अचाट लॉजिक आहे. पण इमोशनल सिन्स जे घेतलेत ते खुप चांगले आहेत. झी टिव्ही वरच्या सिरिअलींसारखे फालतू लॉजिक नाही. उदा नवर्‍याने विश्वासघात केला म्हणुन तब्बु त्यांच्याशी बोलत नाही. जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा इतके जेन्युईन बोलण दाखवल आहे कि ते प्रत्य्क्षात घडू शकत. गैरसमज दाखवले आहेत पण ते उगाचच ताणत नाही बसले. चित्रपट भरभर पुढं सरकतो. न पटणारी मारामारी असुनही तो पटतो. माझ्यासारखी लोक जी कधीही मारधाडीचे किंवा गंभीर मुव्ही बघायला जात नाहीत त्यांना हा चित्रपट बघावासा वाटतो. हेच ह्या चित्रपटाच यश आहे. मी बाकीचे चित्रपट तुमच्या वरच्या लिस्ट मधले बघितले नाहीत. पण एकूणच अस वाटत कि साऊथैंडीअन मुव्ही कसे चालवायचे ह्याचा फॉर्म्युला त्या लोकांना गवसलाय. उगाच बाळबोध मध्यमवर्गीय कल्पनांमध्ये सिनेमा अडकला नाही आणि चालवणारे ही तो एक बिझेनेस म्हणुन पैसे ओतुन चालवत आहेत. मराठी मध्ये अज्जिब्बात हे दिसत नाही. हिंदीमध्ये सुद्धा हे कमीच दिसत . कारण नविन व्ह्यु आणणारे लोक नाहीत. जुने लोकच अजुन त्याच त्याच कल्पना चालवित आहेत. तेलुगु मध्ये उत्पन्न भरपुर आहे. पैसे टाकायची तयारी आहे आणि ते वसुल करण्यासाठी लागणारी 'कंसल्टींग टीम ' हाताशी आहे.

आशुचँप, थोड्या वेळापूर्वी तुम्ही ज्ञानेश्वर पादुका चौकात सायकलवर होता का? खऱ्या नावाने आवाज द्यायचा तर मी आयडी नावाने हाका मारल्या.>>>>
नाही मी नव्हतो
पण आमच्या ग्रुपमधले असतील सगळे
ते सकाळी सांबर ला येतात नाष्टा कॉफ़ी घ्यायला
माझं सध्या सायकलिंग बंद आहे

आयडी ने हाक मारलीत तरी चालेल, नुसत चॅम्प म्हणालात तरी मी थांबून बघेन कोण हाक मारताय ते

शोलेमध्ये अमिताभ आणि धर्मेंद्र दोघे होते. गेला बाजार संजीव कुमार सुद्धा होता.
डीडीएलजे नवख्या शाहरूखने एकहाती खेचला. >>>>>>
Lol
अति झाले बरं का !

एक धाग्याशी संबंधीत पोस्ट :

बर्‍याच वर्षांपासून हिंदी सिनेमा चॅनल्सनी साऊथ चे पिक्चर डब करून दाखवायला सुरूवात केली. सुरूवातीला इंद्रा - द टायगर सारखे काही काही चित्रपट दाखवले जायचे. पण मग चॅनल्सची संख्या वाढली आणि काही काही चॅनल्सनी २४ तास ते डब्ड पिक्चर्स दाखवायला सुरूवात केली. त्यामुळे मग हिंदी प्रेक्षकांनासुद्धा ते डब्ड पिक्चर्स पहायची सवय लागली. त्याचबरोबर युट्युब वर गोल्डमाईन्सनी आणलेल्या डब्ड पिक्चर्सना मिलियन्स मध्ये व्ह्यु मिळाले.

परत यात एक वेगळे अर्थकारण सुद्धा आहे. बाहुबलीचा हिंदी प्रोड्युसर करन जोहर होता. आर आर आर आणि केजीफ मध्ये सुद्धा काही हिंदी प्रोड्युसर चा वाटा आहे. त्यामुळे त्यांचे काहीच नुकसान होत नाहीये. उलट इथलेच प्रोड्युसर आणि वितरक असल्याने मराठी पिक्चर / हिंदी पिक्चर्स च्या तुलनेत त्यांना जास्ती स्क्रीन्स मिळतात. मग धंदा होणारच ना! मी पुण्यात झाँबिवलीचे शोज शोधत होतो तर एकही सापडला नाही - सगळीकडे तो आर आर आर लागलेला. एक पावनखिंडला त्यातल्या त्यात बरे शोज मिळाले. पण मग परत केजीफ ने काशी केली.

बाहुबलीचा हिंदी प्रोड्युसर करन जोहर होता. आर आर आर आणि केजीफ मध्ये सुद्धा काही हिंदी प्रोड्युसर चा वाटा आहे. त्यामुळे त्यांचे काहीच नुकसान होत नाहीये.
>>>
याने त्यांचाच वैयक्तिक फायदा होणार ना, ओवरऑल हिंदी चित्रपटसृष्टीला हे मारकच झाले ना..

ऋन्मेष, तुम्हीच तर मागे म्हणत होता की गल्लाभरू सिनेमाने इंडस्ट्रीत पैसा येतो...

मग मध्येच करण जोहरचा व्यक्तिगत फायदा या लाईनवर कसं घुसत आहात ? तो प्रोड्युसर आहे ना, तो काय व्यक्तिगत फायद्याचं लोणचं थोडीच घालतो, तो पैसा सिनेमासाठीच वापरणार कि.

तो प्रोड्युसर आहे ना, तो काय व्यक्तिगत फायद्याचं लोणचं थोडीच घालतो, तो पैसा सिनेमासाठीच वापरणार कि.
>>>>
छे, तो आपला पैसा घेऊन साऊथ ईंडस्ट्रीतच लावायला सुरुवात करेन. ईथे का समाजसेवा करत बसेन. जिथून कमावतोय तिथेच फिरवत राहील ना. एकाच दोन, दोनाचे चार करायला..
उद्या करण जोहर मराठी चित्रपट प्रोड्युस करू लागला तर त्याचा फायदा मराठी चित्रपटसृष्टीलाच होणार ना.

फक्त कलाकार बदलतील

पण थिएटरवाला , तिकीट फाडणारा, पॉपकॉर्नवाला, रिक्षावाला, पोस्टर लावणारा हे तर सगळे तेच असणार आहेत

20 % गल्ला इकडेतिकडे होईल, 80 % तोंडे तीच असणार आहेत.

चित्रपट निर्मिती होताना फक्त कलाकारांनाच रोजगार मिळतो का? पडद्यामागचे कलाकारही सारेच गपगार होतील ना.. ते आहेत तर पुढे ईंडस्ट्री आहे ना.

पडद्यामागचे कोण कलाकार असतात असे कंपनीत पर्मनन्ट कामाला लागल्यासारखे ? तुम्हाला काही माहिती आहे का इंडस्ट्रीची कि नुसते ऐकीव माहितीवर पुड्या सोडताय ? अशी मतं जाणकाराने मांडली तर ठीक.
केजीएफ चं एडिटींग १९ वर्षाच्या मराठी मुलाने केलं आहे. आर आर आर च्या टीममधे मराठी तंत्रज्ञ होते, डबिंग आर्टिस्ट होते. माहिती आहे का ?

या अशा फेका मारायच्या. कुणी प्रश्न विचारले की मग राखीव खेळाडू येऊन शिव्या देतात. मग च्रप्स आणि सर दोघे मिळून ट्रोलिंग करत राहतात आणि स्वतःच धागा काढून भोकाड सुद्धा पसरतात. त्यातल्या त्यात च्रप्स तर एक नंबर तापट आयडी आहे. हा स्वतः तापट असेल तर अशा गंमतीत भाग घेऊ नये असे माझे स्पष्ट मत आहे. जी गोष्ट आपल्याला झेपत नाही ती दुसर्‍यावर ट्राय करू नये.

केजीएफ चं एडिटींग १९ वर्षाच्या मराठी मुलाने केलं आहे. आर आर आर च्या टीममधे मराठी तंत्रज्ञ होते, डबिंग आर्टिस्ट होते. माहिती आहे का >>> सहमत.

पुण्यात पानमळा - दत्तवाडी इथे एका जुन्या मराठी चित्रपट-नाट्य कलाकाराचा ऑडीओ स्टुडीओ आहे. तिथल्या साऊंड टेक्निशिअनला चेन्नईत ए आर रेहमानचा मोठा प्रोजेट मिळाला. इथे बसून त्याने नंतर इंटरनॅशनल लेव्हलची कामे केली आहेत.
अजून एक सीनीयर लेडी आहेत माझ्या ओळखीतल्या. त्यांच्या मुलीने अवतारच्या टीममधे काम केले. तिला हे काम पुण्यात बसून मिळाले होते.

भारतातले काही जण अमेरीकेत जॉब लागला म्हणून तिथे कामाला जाणे वा ईथे बसून त्यांचे काम करणे आणि भारतातच कंपनी उघडत रोजगार निर्मिती होणे यात काही फरक नाही का?

भारतातले काही जण अमेरीकेत जॉब लागला म्हणून तिथे कामाला जाणे आणि भारतातच कंपनी उघडत रोजगार निर्मिती होणे यात काही फरक नाही का? >>> प्लीज एक्स्प्लेन. इथले कोणते टेक्नीशिअन कंपनीतल्या प्रमाणे पर्मनन्ट एम्लॉयी असतात ?
किती प्रकारचा रोजगार असतो ?

कमॉन ऋन्मेष. तसं असेल तर सांगली, कोल्हापूर, नाशिक, पुणे, धुळे, जळगाव, औरंगाबाद इ. शहरातल्या लोकांनी तरी मुंबईत काय होतंय याची का पर्वा करावी ? शेवटी मुंबईत रोजगार तयार होतोय, आम्हाला काय त्याच ?

हो कॉमी, नक्कीच. यात मुंबईचेच महत्व वाढतेय. मुंबईलाच डिमांड येतो. आज जागेचे भाव मला सांगा मुंबईतले जास्त आहेत की सांगली कोल्हापूर ईथले..
अर्थात जर आपण मुंबई सांगली सातारा नाशिक वगैरे म्हणजे आपलाच महाराष्ट्र असे एकच घर पकडले तर तसा भेद मनात येणार नाही.
पण या धाग्यात आपण महाराष्ट्रातील हिंदी मराठी चित्रपटसृष्टी वेगळ्या घरातली आणि साऊथ वेगळ्या घरातली पकडून चर्चा करत आहोत. भारतीय चित्रपटसृष्टी विरुद्ध परदेशी अशी चर्चा ईथे चालली नाहीये.

काय गोल गोल लिहीताय ?
कोण पडद्यामागचे कलाकार ? त्यांना का रोजगार मिळणार नाही ? कोणत्या कलाकारांविना इंडस्ट्री बंद पडते याचे उत्तर तर द्या आधी. नेहमीप्रमाणे चान्स मिळाला की दुसरीकडे मोर्चा वळवला. इथे बघू बरं कुणाकुणाला त्रास होतो ते. टाका फेसबुकवर मेसेजेस.

साऊथची इंडस्ट्री वाढल्याने कोणत्या कलाकारांचा रोजगार जातो हा सिंपल प्रश्न आहे. इथे कलाकार कसे एका जागेवरून दुसर्‍या जागेवर जाऊन पोट भरून पुन्हा येतात हे सुद्धा सांगितले. तरी आपलेच घोडे दामटताय. निदान मला हे माहिती नव्हते हे तरी म्हणायचे.
जिज्ञासा ताई, तुम्हाला त्रास होतोय का आता ?

महाराष्ट्र माझं घर वैगेरे हा भावनिक मुद्दा झाला. महाराष्ट्र घर, का भारत घर, का माझे शहर घर, का माझे गाव घर, का माझी गल्ली घर, का माझे घर हेच घर, का मी ज्या पायरीवर उभा आहे ते घर- हि लाईन सापेक्ष आहे.

पैश्यांची, माणसांची मोबिलिटी बघा कि. भारतात, आणि भारताबाहेर- असे दोन विभाग मोबिलिटी मुळे होऊ शकतात. पण भारत हा एक देश आहे, तुमच्याकडे करण्यासारखे काम असेल तर भारतभरात नोकरी मिळू शकते आणि तुम्ही फार कटकट न सहन करता तिथे जाऊन काम करू शकता. मुंबईत देशभरातले लोकं येतातच कि !

लाईन सापेक्ष असली तरी ईथे आपण साऊथ ईंडस्ट्री आणि हिंदी ईंडस्ट्री अशी विभागणी करणारी लाईन मारली आहे आणि त्याच अनुषंगाने चर्चा करत आहोत ना? मग आता सापेक्ष म्हणण्यात काय अर्थ आहे?

बॉलीवूडमधे पंजाबी, बंगाली, बिहारी वर्चस्व आहे. मेहनतीची कामे युपी बिहारी करतात. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच मराठी निर्माते आहेत. जे तंत्रज्ञ / स्पेशालिस्टस मराठी आहेत ते फक्त बॉलीवूडच्या कामांवर नाहीत. काही मराठी / हिंदी दोन्ही करतात. काही ग्लोबल आहेत. काहींना साऊथमधे कामं मिळतात.

पंजाबी बिहारी बंगाली वा कोणाचेही वर्चस्व आहे असे म्हटले तरी मायानगरी मुंबईतच आहे ना. त्या वर्चस्व असलेल्यांना आपल्या राज्यात नेता आली नाही ईंडस्ट्री. आणि ते कामाच्या शोधातही इथे येत आहेत. तिथे बसून नाही करत आहेत Happy

Pages