हल्लीचे साऊथ इंडियन चित्रपट आणि बॉक्स ऑफिस

Submitted by च्रप्स on 16 April, 2022 - 22:49

काही आकडे देतोय- साभार इंटरनेट.
बॉक्स ऑफिस कलेक्शन्स cr -
पुष्पा - 365
ररर - 1050
केजीफ 2 - 300 (रिलीज होऊन पहिले दोन दिवस)

केजीफ पुष्पा ला ओव्हरटेक करेलच आणि कदाचित ररर पेक्षाही पुढे जाईल...

आता तुम्ही जर हिंदी चित्रपटांचे कलेक्शन बघाल तर ते 100 आकडाही गाठू शकले नाहीयत... अपवाद आलिया चा गंगुबाई आणि काश्मीर फाईल्स... बच्चन पांडे , अट्याक तर फ्लॉप आहेत..
बधाई दो आणि झुंड चे आकडे तर डिसपॉईंटिंग आहेत...

असेही नाही कि साऊथ चित्रपटांचे कलेक्शन फक्त साऊथ मधून आहे.. हिंदी बेल्ट मधूनही शंभर दोनशे कमवतायत...

सलमान भाई चे चित्रपट दोनशे करतील पण बाकीचे चित्रपट लोक का बघायला जात नसावेत? आणि हेच साऊथ चित्रपट कडे इतके का आकर्षित होत असावेत? मी केजीफ पाहायला सुरुवात केली- बघू शकलो नाही.. काहीच खास नव्हते... व्हायोलन्स तर प्रचंड होता.. पी जी - हा फॅमिली चित्रपट नाहीय...
लोक रिपीट बघत आहेत...

हिंदी इंडस्ट्री ही आपल्या महाराष्ट्रासाठी फार महत्वाची इंडस्ट्री आहे... हि इंडस्ट्री यशस्वी होणे फार गरजेचे आहे.. आमिर खान अजूनही हायस्ट बॉलिवूड बॉक्स ऑफिस वर एक क्रमांकावर आहे( दंगल - 2024 cr ) पण बाकीचे काय??

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे तिन्ही धागे वाचा. वर काढा. मी रात्री येतो.

मराठी चित्रपटसृष्टीचा उगवता सुप्परस्टार - स्वप्निल जोशी !
https://www.maayboli.com/node/52037

नाही जरी ‘सई’ तरी ...
https://www.maayboli.com/node/50822

सई मला आवडते - पोल, निकाल आणि निष्कर्ष !!
https://www.maayboli.com/node/50843

हे साऊथ फिल्म ईंडस्ट्रीत होत नसावे...>>>
कोण म्हणलं असं, सगळे साऊथ चे कलाकार छानपैकी ट्रोल होतात
फेसबुकवर बघा एकदा
मला त्यांची भाषा वाचता येत नाही म्हणून नैतर सप्रमाण दाखवलं असतं उदाहरण

हे तिन्ही धागे वाचा. वर काढा. मी रात्री येतो.>>>>
मुलांनो हे तिन्ही धडे वाचून ठेवा
सर आल्यावर प्रश्न विचारणार आहेत
जे नापास होतील त्यांचे सदस्यत्व एक दिवसासाठी स्थगित
आणि मायबोलीच्या कोपऱ्यात अंगठे धरून उभे केले जाईल Happy

आशुचँप सर, सरांचे शाहरूख खान सीनीयर आहेत.
माझे शारूक खान सर आहेत. त्यांना छोटा शारूक म्हणतात. ते १००० कोटी आत्ता नाही देऊ शकणार. नंतर सुपर्रहीट झाल्यावर देतील.
हे माझे गरीबांचे शारूक सर.
https://www.youtube.com/watch?v=QdTv4e5CiLA

हे पण बघून ठेवा
https://youtu.be/tjCUiCdi52s?t=21

हायला हे जबराट आहेत
सरांनंतर बॉलिवूड चा वारसा कोण चालवणार या चिंतेने झोप उडाली होती माझी
हे बघून आता सुखाने डोळे मिटतो Happy
अहहहा काय तो अभिनय
मनुष्यजन्माचे सार्थक

वीरू तयार असतील तर वीरू - शामा या नावाने लिहू.
वीरू - चँप पण जुळतंय>>
चालेल की. वाटल्यास तिघे मिळुन लिहू. सरांचा टायपिंग स्पीड सॉलीड आहे शिवाय सरांना ऑफिसचही टेन्शन नाही त्यांना टायपिंगला बसवु. सर टायपिंग करताहेत म्हटल्यावर शारुकसर काम करायला तयार होतील. गशासरांनी शोलेमधल्या घोड्यांची एक्टींग ओळखली, ते डायरेक्टर..
बाकीचं ठरवा आता.

"शाहरुख चा "सामान्य" रोल म्हटले कि मला यस बॉस आठवतो" - मला तर ऑल्मोस्ट सगळेच आठवतात Wink Happy

"आपल्या अभिनयाने अश्या भुमिकांना न्याय देईल असा कलाकार सध्या नाहीये." - 'श्री ४२०' म्हणजे 'राजू बन गया' बनायच्या आधी रिलीज झालेली पण 'राजू' ची कॉपी ('राजू' च ओरिजिनल) Happy

सिरियसली, तुम्ही लोकं साऊथ चे सिनेमे कसे बघता? मी एकदा दृश्यम-२ (मल्ल्याळम) बघायचा प्रयत्न केला होता. सब-टायटल्स वाचून वाचून दम लागला आणि सोडून दिला. बाकी ते 'भव्य पटकथा', 'कथेचा विस्तृत कॅनव्हास', 'दिग्दर्शनातलं तरल भावविश्व' वगैरे पर्यंत पोहोचणं शक्यच नव्हतं.

फेफ Lol

अला वैकुंठपुरमुलू सारखे चित्रपट सबटायटल्स वरून बघून समजले (नेटफ्लिक्स). कारण कंटेण्ट इतका हेवी नाही. समोर दिसते ते व सबटायटल्स मधून जे कॅच होईल ते - यावर चालून जाते Happy काही भाषिक विनोद ई हुकतात पण त्याबद्दल आपण तेलुगु शिकण्याव्यतिरिक्त किंवा एखादा तेलुगु मित्र बरोबर घेउन बघण्याशिवाय काही करू शकत नाही Happy

दक्षिणी सिनेमे चालत आहेत कारण बाहुबलीने हवा तयार केली त्याचापण फायदा या सिनेमांना झाला असणार.
दक्षिणमधले लोक कलाकारांची देवळं पण बांधतात. मग सिनेमे हिट करणारच.
ते हिंदी सिनेमे जास्त पहात नसावेत. आमचे काही दक्षिणी दोस्त हिंदीवर भयंकर राग ठेऊन असायचे मनात. त्यांनी स्पष्टच सांगितले होते की ते हिंदी सिनेमे पहात नाहीत.
आणि हिंदी दुसर्‍या भाषेत डब होत नाहीत, केले तर कसे वाटतील काय माहिती.
आणि तसंही हिंदीत हल्ली वेब सिरीज जास्त मेहनत घेतात. सिनेमांवर कमी घेत असावेत अशी शंका येते.

हिंदी इंडस्ट्री ही आपल्या महाराष्ट्रासाठी फार महत्वाची इंडस्ट्री आहे>> का?

हि इंडस्ट्री यशस्वी होणे फार गरजेचे आहे.. >> का?

"शाहरुख चा "सामान्य" रोल म्हटले कि मला यस बॉस आठवतो" - मला तर ऑल्मोस्ट सगळेच आठवतात Wink Happy
>>>>
RA-One असामान्य होता Happy

श्री ४२०' म्हणजे 'राजू बन गया' बनायच्या आधी रिलीज झालेली पण 'राजू' ची कॉपी ('राजू' च ओरिजिनल) Happy
>>>>>>

श्री ४२० म्हणजे राज कपूर ना...
शाहरूखचे म्हणजे आपल्या क्रिकेटमधील सचिनसारखेच आहे.
राजकपूरपासून दिलीप कुमार ते अमिताभ बच्चन आणि आता समकालीन आमीर वगैरे.. त्याचीच तुलना सर्वांशी होते Happy
अगदी हृतिक रोशनचे दमदार पदार्पण झाले तेव्हाही शाहरूखचेच सुपर्रस्टार पद धोक्यात आले अश्या वावड्या उठल्या होत्या. गेला बाजार अक्षयकुमार सलग हिट देत होता तेव्हा त्यालाही आपण शाहरूखची जागा घेतली अशी स्वप्ने पडत होती Happy

असो, शाहरूखचा चित्रपटांमधील ऐन उमेदीचा काळ संपला. आता मनोरंजनासाठी साऊथच्याच चित्रपटांवर अवलंबून राहायचे असल्याने ते चालणारच.. ईतके सोपे गणित आहे हे !

एकदा मुंबई सेंट्रलला राजधानी सुटायच्या खूप लवकर पोहोचलो. टाईमपास करायला समोरच मराठा मंदीरला गेलो. डोअर कीपरला विचारले की, "डीडीएलजे इतकी वर्षे कसा काय चाललाय पिक्चर ?" तर तो म्हणाला " १५ मिनिटात सुटणार आहे मॅटिनी शो. तीनच्या शो ला जाऊन बसा. कुणी येत नाही तिकीट बघायला".
मराठा मंडीर रेन्टवर घेतल्याच्या वावड्या ऐकत / वाचत होतो पण हा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. असा चालवून रेकॉर्ड केलंय हे ओपन सीक्रेट प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे कुणी ते रेकॉर्ड सिरीयसली घेत नाही.

जब DDLJ फिल्म को बंद करने का हुआ था फैसला  ...

मराठा मंदिर में DDLJ सुबह 11:30 बजे दिखाई जाती थी. थिएटर के लोगों ने यशराज फिल्म्स से निवेदन किया था कि इसकी टाइमिंग सुबह 9 बजे की जाए, जिससे हर हफ्ते रिलीज होने वाली बाकी फिल्मों को भी सही शो दिए जा सकें. DDLJ के सिर्फ एक शो की वजह से बहुत सारे लोगों को एक्स्ट्रा काम करना पड़ता था. इन सभी बातों को ध्यान में रखकर यशराज फिल्म्स और मराठा मंदिर के प्रमुख लोगों ने मिलकर फैसला किया था कि 19 फरवरी 2015 को DDLJ का अंतिम शो दिखाया जाएगा और उसके बाद इस फिल्म का कोई भी शो नहीं चलेगा. लेकिन फैंस ने इतने सारे मैसेज और कॉल्स की, जिससे मराठा मंदिर के मैनेजमेंट और यशराज फिल्म्स को फिर से अपने फैसले पर सोचना पड़ा और आखिरकार फैसला लिया गया की फिल्म पहले की ही तरह सुबह 11:30 बजे दिखाई जाती रहेगी.

सविस्तर बातमी ईथे

https://www.aajtak.in/entertainment/bollywood-news/story/ddlj-completes-...

हा रेकॉर्ड साऊथच्या कुठल्या चित्रपटाने केला आहे का?

जर नसेल, तर ऑलटाईम विनर आमचे बॉलीवूडच आहे Happy

https://forums.itsboxoffice.com/432220/films-funding-screening-about-col...

यशराज फिल्म्सच्या फंडींगने केलं रेकॉर्ड.
मिनर्व्हाला शोले शेवटपर्यंत ब्लॅकने चालला होता. ब्लॅक करणार्‍यांनी तुफान पैसा कमावला त्या वेळी. यशराजला मराठा मंदीर भाड्याने घेणं परवडत होतं.

फेसबुकची पोस्ट किंवा युट्यूबच्या व्हिडीओवर आपणच फेक प्रोफाईल्सने लाईक करणे किंवा लाईक्स आणि व्ह्यूज विकत घेणे आणि व्हिडीओ आपोआप व्हायरल होणे यात जो फरक आहे तोच आहे इथे,

परत तेच... शोले 1975 - तेंव्हा लोकांना पर्याय नव्हता परत थेटर जाण्याशिवाय... केबल , टीव्ही, कॅसेट्स असूनदेखील ddlj इतका चालला हेच त्याचे यश आहे...
बाकी शोले ची पिसे काढायला फार मटेरियल आहे.. फारएंड यांनी मनावर घ्यावे...

परत तेच. Lol
शोलेच्या वेळी लोकसंख्या, स्क्रीन्स संख्या आणि प्रिंट्सची संख्या सुद्धा कमी असायची. तिकीटाचे दर पण कमी असायचे.
१.६५ रू ड्रेस सर्कल , २.०५ रू बाल्कनी. - गुंजन येरवडा
२.०० रूपये ड्रेस सर्कल, २.७५ रूपये अलंकार

त्या वेळी डीडीएलजे आला असता तर सुपरफ्लॉप झाला असता. अभिनय ढापूंचे चित्रपट चालायचे पण थोडेच.

शांत माणूस जाऊ द्या हो
कुणाशी वाद घालताय
डीडीएलजे ची तुलना शोले शी करून ते स्वतःच इतके हास्यास्पद बनत आहेत तर तुम्ही कुठं अजून त्यांना सांगायला जाताय

त्यांना नंदनवनात राहायचं आहे तर राहू द्या ना

आशुचँप,
एखादा अमेरिकेत कामाला असणारा मनुष्य गंमत म्हणून का होईना इतका दीर्घकाळ हास्यास्पद लिखाण करत राहतो हा आजार वाटतो. अशांविषयी मनात अपार करूणा दाटते. देव त्यांना बरं करो.

इन्फ्लेशन नावाचा एक प्रकार असतो...
बाकी त्यावेळी ddlj फ्लॉप झाला असता त्याबद्धल सहमत...
तो काळ वेगळा होता... पब्लिक रिलेट करू शकली नसती... त्यावेळी अमर अकबर ऍंथोनी किंवा हिम्मतवाला सारखे फालतू चित्रपट देखील हिट झाले होते...

शोलेमध्ये अमिताभ आणि धर्मेंद्र दोघे होते. गेला बाजार संजीव कुमार सुद्धा होता.
डीडीएलजे नवख्या शाहरूखने एकहाती खेचला.

यात पर्सनल घेण्यासारखे काय आहे?
मी शांत माणूस याना म्हणलं की त्यांच्याशी वाद घालू नका
त्यांना डीडीएलजे हा शोले पेक्षा ग्रेट वाटत असेल तर वाटू द्या

आणि सर आजारी आहेत हे तर उघड आहेच
ते अजूनही हिरीरीने लिहीत आहेत बघा

मला तुमच्याबद्दल अनुकंपा आहे
आणि ही अनुकंपा पर्सनल आहे

डीडीएलजे नवख्या शाहरूखने एकहाती खेचला.
>>>
खरंय, शरूख च्या सिनेमात हिरोईन, त्यांचा बाप, किंवा अन्य कलाकार का असतात हेच कळत नाही
पहिल्या फ्रेम पासून शेवटच्या फ्रेम पर्यंत एकच व्यक्ती असावा
मग त्याने नाक खाजवावे, शिंकरावे, हातावर पाय, पायावर हात टाकावे
तरीही सर भयंकर कौतूकाने बघत राहतील 3 तास

“ श्री ४२० म्हणजे राज कपूर ना” - सरांनी राज कपूरला ओळखणे म्हणजे बोरटाके गुरूजींच्या भाषेत, ‘सुर्व्याने काजव्यासमोर चमकण्यासारखे आहे‘. Happy

“ त्याचीच तुलना सर्वांशी होते” - Rofl

चित्रपट ही सांघिक कामगिरी असली तरी तो चालतो एखाद्याच्या जीवावर हे आपण बरेचदा बघतो.

जसे क्रिकेट टीम अकराची असते.
तरी धोनी आधी तब्बल पंचवीसेक वर्षे आपण एकही आयसीसी चषक जिंकलो नव्हतो. ना धोनी पश्चात जिंकलो.
सचिन निर्विवाद जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे आणि आपण त्याला क्रिकेटचा देव म्हणतो. पण टेक्निकली विचार करता माझ्यासारख्या सच्या क्रिकेटप्रेमीसाठी धोनी क्रिकेटचा देव आहे.
तसेच शाहरूख हा बॉलीवूडचा देव आहे

असो.. उद्या वेगळा धागा काढतो दूध का दूध और पाणी का पाणी होऊन जाईल
शुभरात्री Happy

आकाशातल्या देवाकडे आपण मागतो मला परीक्षेत चांगले मार्क्स दे.
क्रिकेटच्या देवाकडे आपण मागणार आम्हाला वर्ल्डकप/आयसीसी कप जिंकवून दे.
मग देव कोण झाला.. सो सिंपल ! Happy

Pages