Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्पेस सोडण्यासाठी टिम्ब
स्पेस सोडण्यासाठी टिम्ब द्यावे लागतात .
.
स्पॉयलर अॅलर्ट
.
.
.
.
.
.
.
मी सायको थ्रिलर म्हणून सिरियसलीच बघितली पण मला शेवटच्या २ भागांमधे वाटायला लागलं की ही सीरीज एक मीम किंवा पॅरडी म्हणून बनवली असावी. शेवट आणि त्या लहान मुलीसोबत मारामारी वगैरे बघून खात्रीच वाटली. नंतर मग इतर काही ऑनलाइन रेव्ह्यू अन आर्टिकल्स दिसली तीही तेच म्हणत आहेत. पण मग तसे असेल तर ती लक्षात येत नाही म्हणाजे एक प्रकारे फसलेलीच आहे
.
.
.
.
.
.
स्पॉयलर
स्पॉयलर
.
.
.
.
हो. मलाही नंतर वाचल्यावर समजलं की ही भयंकर विनोदी (हीलेरियस) सिरीज म्हणून बघायला हवी होती. मी आपला सायको थ्रिलर कपडे घालून बसलेलो. खरतर एलिझाबेथ चा अंत ज्याप्रकारे चणे फुटाणे खावे तसा झाला , तिच्या टूंब स्टोन वरचे सुविचार (!) जसे बदलत गेले, स्ट्रिपर बरोबर लव मेकिंग ज्या प्रकारे झाले, मेल बॉक्स दुरुस्ती जशी चालू होती, मेलमन चं काटा रुते कुणाला जसं झालं, कॅसरोल जसे फुटत गेले, पोलीस कॅसरोल मागू लागले... तेव्हा माफक हसू ते आयरोल झालं होतं. पण ते काय सत्य आणि काय दारूचा अंमल यातला गोंधळ दाखवायला केलं आहे अशी मनाची समजूत घालत बघत राहिलो. तेव्हा हसायचंच होतं तर!
ते नीट कनवे झालं नाही हे खरं.
स्पेसिफिक कशाची प्यारडी असेल तर समजलं नाही, जनरल धक्का द्यायला काय वाट्टेल ते ची असेल तर आत्ता समजली पण तेव्हा सस्पेन्स ने बघत राहिलेलो असच म्हणेन.
तिच्या टूंब स्टोन वरचे
तिच्या टूंब स्टोन वरचे सुविचार (!) जसे बदलत गेले,>> हे माझ्या लक्शात नाही आलं .
मेल बॉक्स दुरुस्ती जशी चालू होती >>> हे मला फार क्रीपी वाटत होतं . मला तो माणूस ईमॅजिनारी वाटत होता . विशेशतः , जेव्हा ती पहिल्यांदा चक्कर येउन रस्त्यात पड्ते.
अमित, सगळ्याच पोस्टला +११११!
अमित, सगळ्याच पोस्टला +११११! सेम असेच थॉट्स !
बर मला तो तसला वाइन ओपनर घ्यायचा आहे आता
स्पॉयलर
स्पॉयलर
.
.
.
.
The woman in the window नावाचा एक सिनेमा आहे. त्यात थोडीफार अशीच कथा आहे. औषधं + दारू पिणारी स्त्री खिडकीतून खून होताना बघते वगैरे.
पॅरडी आहे हे मीपण वाचले होते पण बघताना तसे वाटत नाही.
कथानक विनोदी अंगाने न्यावे की सस्पेन्स यात गोंधळ उडालेला दिसतो मेकर्सचा.
अनु, मैत्रेयी,
अनु, मैत्रेयी,
थँक्स !
अमितव, पुर्ण पोस्ट पटली.
स्वस्ति, सॉरी !
>>बर मला तो तसला वाइन ओपनर
>>बर मला तो तसला वाइन ओपनर घ्यायचा आहे आता >> हैला! तुमाखमै! काल सर्च पण केला.
स्पॉयलर
.
.
.
.
मला नाही वाटत दुसरा सीझन येईल.
शेवटी वाईन सोडली सांगून आणखी हार्ड ड्रिंक घेणे, त्या बरोबर सायकोअॅक्टिव्ह ड्र्ग्स घेणे... मग लॅव्हेटरी मध्ये डेड बॉडी दिसणे, ती बाकी कोणालाच न दिसणे, ती सीट रिकामीच असणे, मग तो मेकप मिरर दिसणे... हे एकावर एक मजले चढवत टिपिकल मिस्ट्रीची पॅरडी केलेली आहे असं धरुन चालतो. हे असं झालं की आपलं डोकं गरागरा फिरत त्या वेळात ती बॉडी कशी गायब झाली असेल याचे वळसे घेऊ लागतं. त्याची मजा घेतलेली आहे. तसं असेल आणि दुसरा सीझन आणला तर मात्र अगदीच पोपट होईल.
पॅरडी असल्यास मलापण माहिती
पॅरडी असल्यास मलापण माहिती नाही कशाची. पण फरक पडला नाही कारण मजा आली रहस्य पहाताना. कुठेकुठे हसू आलं. दिग्दर्शकाला, लेखकाला काही का अभिप्रेत असुदे , मला पहायला मजा आली.
शेवटाबद्दल मीराने लिहिले तेच वाटले होते. दुसरा सिझन कदाचित अजुन रहस्ये घेऊन येईल असे वाटले किंवा नवी ष्टोरी, पहिल्याशी संबंध नसलेली. नाही आला तरी चालेल.
मेलबॉक्सवाल्याने मस्त काम केले. हिरॉईन तर भारीच होती.
काल spoilers वाचल्यामुळे पळवत
काल spoilers वाचल्यामुळे पळवत पळवत बघून संपवली.
आता Comedy , parody चा रंग चढल्यामुळे शेवटी काही डोक्याला भुंगा लागला नाही. नाही तर विचार करत बसले असते.
तिच्या मुलीच्या mryutyu che
तिच्या मुलीच्या mryutyu che कारण पण अ आणि अ वाटला. .... असं कोणी करत का?
तिच्या टूंब स्टोन वरचे सुविचार (!) जसे बदलत गेले << हे लक्षात आले नाहि. एक आठवतोय. If love could have saved you, would have never died or something
एन्ड मुळे खुनाच रहस्य खोटं वाटतय..
तिच्या मुलीच्या mryutyu che
तिच्या मुलीच्या mryutyu che कारण पण अ आणि अ वाटला. .... असं कोणी करत का ? >>>> किती बावळट आहे मग तिचा नवरा .
तिचा तो कुत्र्यांचे पेन्टीन्ग्स काढायचा व्यवसाय पण एक्दम विनोदी .
पॅरडी ? तसं असेल तर अत्यंत
पॅरडी ? तसं असेल तर अत्यंत वाईट पॅरडी केली आहे.
मला तर एव्हढ्या मोठ्या घरात
मला तर एव्हढ्या मोठ्या घरात काम-धंदा सोडाच पण निदान स्वत:ची कामे, जेवण, साफसफाई काही काही न करता वाईनचा ग्लास भरून दिवसभर खिडकीत बघत बसायचेच पटले नाही. आणि ईतकी व्यसनी पण जरा हॅंगओव्हर नाही कि नशा नाही. एकदम टुणटुणीत! (मी फक्त २ भाग पाहिलेत) वाईन ओपनर मी पण सर्च केला
ब्लॅकवॉटर युध्दात टिरीअनवर
ब्लॅकवॉटर युध्दात टिरीअनवर हल्ला कोण करतं? किंग्सगार्डचा वेष.. इंटरनेट वर मूर दिलंय, पण त्या हल्ल्यामागे कोण होतं?
पास! काहीही आठवत नाही आता!
पास! काहीही आठवत नाही आता!
बहुधा सर्सीचा कुणीतरी सैनिक
बहुधा सर्सीचा कुणीतरी सैनिक असतो ना?
हल्ल्यामागे कोण होतं?>>
हल्ल्यामागे कोण होतं?>> सर्सेई. पुढच्या सीजनमध्ये टिरियन तिला तोंडावर विचारतो तेव्हा चूप बसते. अपा, सिरीज घाईघाईत उरकायची असे ठरवून पाहू नका. सावकाश पहा
तीन वेळा पाहून झालंय.. हे
तीन वेळा पाहून झालंय.. हे आठवत नव्हतं आणि टिरोबाचे काही झकास कोट्स पून्हा पाहायचे म्हणून चौथ्यांदा बघतोय.
सर्सि नव्हती, मूर्ख
सर्सि नव्हती, मूर्ख जॉफ्रीच्या ऑर्डरनुसार हल्ला झाला
'अनपॉज्ड' मधला मंजुळेची
'अनपॉज्ड' मधली मंजुळेची 'वैकुंठ' सिरीज मधली शेवटची स्टोरी असुन फार ऐकलेलं म्हणून आधी लावली.
वैकुंठ, तिथली रया, बघुन अंगावर काटा येतो. तेव्हा भारतात न्हवतो, पण कल्पनाही करू शकणार नाही इतकं विदारक असेल हे दिसत रहातं. पण ते डॉक्युमेंट करण्याव्यतिरिक्त काही स्टोरी हवी होती असं वाटलं. अगदी अर्ध्याओळीची गोष्ट आहे, त्यापेक्षा बॅकग्राऊंड ला एक जोरकस कथा चालू आणि समोर वैकुंठ, जागोजागी रस्त्यातच चिता मांडलेल्या हे जास्त अंगावर आलं असतं.
उरलेल्यातली पहिली चालू केली त्यात चीज अजीर्ण झाल्याने असेल पण झोप लागली. उरलेल्या बघेन आता एक एक.
रिचर प्राईम वर बघून संपवली आज
रिचर प्राईम वर बघून संपवली आज. ८ एपिसोड आहेत तासाभराचे.
आज दिवसभरात 'द ग्रेट इंडियन
आज दिवसभरात 'द ग्रेट इंडियन मर्डर' पाहिली हॉटस्टार वर.
सुरूवात थोडी डगमगली तरी नंतर बऱ्यापैकी पकड घेते म्हणेपर्यंत अचानक शेवट होतो. शेवट Abrupt वाटला एकदम.
सतत भूतकाळ, वर्तमान काळ उड्या असल्याने जरा गोंधळ उडाला माझा.
बघता बघता मेथी निवडून झाली, संध्याकाळच्या भाजीसाठी गवार मोडून झाली त्यामुळे वेळ वाया गेला नाही.
'रिचर' जॅक रिचर स्टोरी आहे का
'रिचर' जॅक रिचर स्टोरी आहे का? तर बघेन मीपण.
लोकहो, इथे कुणी रॉकेट बोईस
लोकहो, इथे कुणी रॉकेट बोईस पाहत नाही का , मी पहिला सीजन पहिला. छान आहे , घटना त्यांच्या (साराभाई आणि भाभा ) वैयक्तिक आयुष्यतल्या दाखवल्या आहेत. १ टाइम वोच आहे . अभिनय पण चांगला आहे विशेषतः जिम शरभ चा. तो काळ , त्यांचा ऑरा चांगला capture केला आहे. सोनी लिव्ह वर आहे subscription घ्यावे लागते
The Great Indian murder..
The Great Indian murder.. hotstar वर पाहिली..
इतके जास्त एक से बडकर एक कलाकार घेतलेत... रीचा चढ्ढा, प्रतीक गांधी, अमेय वाघ, आशुतोष राणा, family man मधला श्रीकांत चा मित्र... आणि इतर बरेच..
पण विस्कळीत वाटली... अ आणि अ आहे...! काहीही आहे असं वाटतं सारखं बघताना..!
बघताना दमछाक झाली..की कधी एकदा संपते.. एवढं करून..अर्धवट संपवली.. डोकं भांजळून गेलं एकदम..!
ग्रेट इंडियन मर्डरः मला काय
ग्रेट इंडियन मर्डरः मला काय नक्की शेवट झाला समजलाच नाही, आजकाल ट्रेंड असावी अशी
सुरवात बरी झाली, नंतर पकड गेली !
प्रतीक गांधीला कशाला घेतलय.. काहीही स्कोप नाही त्याला !
बरीच कॅरेक्टर्स अर्धवटच सोडून
बरीच कॅरेक्टर्स अर्धवटच सोडून दिली आहेत.
शेवट मला पण Abrupt वाटला
****************स्पॉयलर ****"**"****"""
ती मूर्ती आशुतोष कडे कशी येते? आणि तो ती डुप्लिकेट मूर्ती का देतो इकेती कडे?
इकेतीला अडकवायचा प्लान करून तो ' मूर्ती विकीकडे आहे' असं खोटंच सांगतो का ( खरं तर मूर्ती आशुतोष कडेच असताना)? का ऐनवेळी पोलिस येतात म्हणून त्याला अडकवतो?
आश्रम रेड वेळी अशोक राजपूत ती
आश्रम रेड वेळी अशोक राजपूत ती मूर्ती गायब करतो. नंतर तशीच डुप्लिकेट बनवून ती विकीच्या पार्टीमध्ये ठेवतो. आधी एकेती काहीतरी तोफ निघेल वाटत होतं, पण नन्तर जेव्हा राजस्थानमधल्या शिकारीच्या केसचा पहिला उल्लेख आला तेव्हा अंदाज बदलला
रिचर प्राईम वर बघून संपवली मी
रिचर प्राईम वर बघून संपवली मी पण.
ग्रेट इंडियन मर्डर पुढचा सिझन
ग्रेट इंडियन मर्डर पुढचा सिझन येईल. कारण किलर कोण आहे अजूनही कळले नाहीय...
Pages