खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या...

IMG_20220130_011452.jpg
.
IMG_20220130_011517.jpg

वाह लावण्या.. मोमोज कातिल दिसत आहेत

पनियारा? .. च्रप्स काय असते हे.. ते पॅन केक आहेत. सध्या आमच्याकडे पोरांच्या हिट लिस्टवर आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे आणि साईजमध्ये बनतात हल्ली घरी. त्या दिवशी वर विषय निघाला म्हणून काल केले तेव्हा मुद्दाम फोटो काढला.

त्या पात्रात तिखट बॅटर घालून जे गोळे बनतात त्याला अप्पे किंवा पनियरे म्हणतात

बॅटर डोसा किंवा मेंदू वडाचे , भाज्या , डाळी इ इ घालून करतात
ते सांबार चटणीसोबत खातात

छान

तोंडात तोफगोळे भरतात भरभरा ते
अन भोवती सभोती खादाड थांबलेले

राऊंड शेप देखके अप्पे समझे क्या
मिठा पनियरम है मै!

मोमेज मस्त.. गाजर हलवा कधी खाल्ल्याचं आठवत नाही

सासूबाईंतर्फे - मकई दी रोटी सरसो दा साग.
बायकोतर्फे - कांद्याच्या पातीच्या भज्या, सिमलाबेसन भाजी आणि चपात्या.

IMG_20220201_140142.jpg

मजा आहे. Happy
मस्त दिसतेय ताट.

भजी मस्तच

आमच्याकडे आज नवऱयाच्या हातचे झणझणीत पोहे आणि त्यावर आलू भुजिया प्लस आल्याचा चहा
9C685D11-1314-4C16-8225-04CDBF6EB9CA.jpeg744AAD40-E1EA-4CD1-9E73-FCDFD50E9794.jpeg

आमच्याकडे आज नवऱयाच्या हातचे झणझणीत पोहे आणि त्यावर आलू भुजिया प्लस आल्याचा चहा
>>>
हे वाचूनच कळले कोणाची पोस्ट Proud

744AAD40-E1EA-4CD1-9E73-FCDFD50E9794.jpeg
नवीन Submitted by म्हाळसा on 1 February, 2022 - 19:31

डिनर टायमाला ब्रेकफास्टचा तोंपासू फोटो टाकल्याबद्दल झैर निषेढ!

रसरशीत लिंबाची फोड हवी सोबत.

गेले वर्षभर आई रहायला आलेली.. लिंबू घातलेल्या पोह्यांसोबत चहा पिऊ देत नव्हती.. विरूद्ध आहार म्हणून Happy .. तेव्हापासून लिंबू न पिळताच पोहे खाते.. पण बरंय त्यामुळे जरा जास्तच तिखट लागतात

विरूद्ध आहार म्हणून Happy .. तेव्हापासून लिंबू न पिळताच पोहे खाते..
<<
भिंत आहे का घरात?

डोक्यावर आपटून घ्या.

पोहे अन लिंबू = विरुद्ध आहार?

देव बिव काय आहे की नाही जगात?

लिंबू घातलेल्या पोह्यांसोबत चहा पिऊ देत नव्हती>>>(दूध घातलेला) चहा आणि लिंबू हा विरूद्ध आहार असे म्हणायचे आहे त्यांना. पोहे आणि लिंबू नव्हे.

पोहे मस्तच! तोंपासु!

Pages