झिम्मा - मराठी चित्रपट
झिम्मा म्हणून एक मराठी चित्रपट आलाय बघा. काय चित्रपट आलाय. या वर्षात मी पाहिलेला सर्वात आनंददायी चित्रपट. तो देखील कोरोना प्रकरण सुरू झाल्यापासून थिएटरला जाऊन पाहिलेला पहिलाच चित्रपट. या स्पेशल ओकेजनला एखादा छान चित्रपट बघणे नशिबी आला हे भाग्यच म्हणावे.
याच चित्रपटावर चर्चा करायला हा धागा.
ज्यांनी अजून पाहिला नाही ते ट्रेलर बघू शकतात. ट्रेलर सुद्धा फार आवडेल.
झिम्मा ट्रेलर - https://www.youtube.com/watch?v=o8EZsgN167A
चित्रपट मराठी आहे. ओटीटीवर बहुधा नाहीये. पण आला तरी तिथे बघू नका. थिएटरलाच बघा. मराठी चित्रपट ईंग्लंडला गेलाय. आपण थिएटरला जायला हरकत नाही
म्हणजे स्टोरी फार सिंपल आणि चार ओळींची आहे बघा. ट्रेलर पाहिला असेल तर हा पॅराग्राफ वाचूही नका. म्हणजे बघा एक साधारण सात आठ बायका आहेत. वेगवेगळ्या स्वभावाच्या, जातकुळीच्या आणि त्याला साजेश्या पार्श्वभूमीमुळे वेगवेगळे प्रॉब्लेम घेऊन आलेल्या.. या सार्याजणी मिळून एका ईंग्लंड टूरवर दंगा घालतात. भांडतात, एकत्र होतात, एकमेकींना समजून घेतात, आणि त्यात त्यांचे प्रॉब्लेम सुटत जातात, जगण्याचा नवा दृष्टीकोन मिळतो.. वगैरे वगैरे.. पण हे सारे फारच सुंदर पद्धतीने घडते.
ईतक्या बायका जेव्हा पडद्यावर सतत दिसत राहतात तेव्हा चित्रपटाची फ्रेम तशीही सुंदरच होते. पण याऊपर ईंग्लंड ईतके छान टिपलेय की कमॉन, हा मराठी चित्रपट आहे, जो कधीकाळी लो बजेट समजला जायचा, हे स्वतःला चिमटा काढून सांगावे लागते.
सगळ्या व्यक्तीरेखा अगदी सुरेख आणि ठसठशीत उभ्या केल्यात पण त्या पेलायला जो समर्थ अभिनय लागतो त्यात डावेउजवे करणे कठीण व्हावे ईतका नैसर्गिक केलाय प्रत्येकीने.. अर्थात तरीही निर्मितीताई किंचित भाव खाऊन जातात. नुसत्या एक्स्प्रेशनवर हश्या वसूल करतात. त्यांच्यासाठी एक बदाम एक्स्ट्रा
गाणी आणि पार्श्वसंगीतही चोख.. झिम्मा शीर्षकगीत सतत डोक्यात पिंगा घालून राहणारे.. संवाद चुरचुरीत तसेच तत्वज्ञान सांगणारे वगैरे फुल्ल पॅकेज आहे चित्रपट! म्हणजे बघत असतानाच सतत जाणवत राहते की आज आपण काहीतरी छान बघतोय.
चित्रपटात चुका काढायच्या म्हटल्या तर लॉजिक लाऊन त्या निघतीलही. पण अश्या चित्रपटांत मॅजिक बघायचे असते. तरच ते अनुभवण्यात मजा. म्हणजे बघा ना, बायकोने ईंटरव्हलमध्ये पॉपकॉर्न न घेता आम्ही चित्रपटातच गुंतून राहिलोय हे शेवटचे कधी घडले आठवत नाही. तसेच चित्रपट संपल्यावर शेवटी नावे पडताना स्क्रीनवर एका कोपर्यात त्या बायकांच्या व्हॉटसपग्रूपची चॅट दाखवतात. ती सुद्धा शेवटपर्यंत म्हणजे "कबीर लेफ्ट" येईपर्यंत आम्ही खुर्चीत बसून पाहिली, आय मीन वाचली. असंही रोज रोज होत नाही.
अरे हो, त्या व्हॉटसपग्रूपमधून लेफ्ट होणारा हा कबीर म्हणजे सिद्धार्थ चांदेकर, जो त्या टूरचा आयोजक दाखवला आहे. त्याची अभिनयशैली आवडतेच. हा रोल तर त्याचाच होता. तर चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा आणि सोबत चान्स मारत त्यात अभिनयही करणारा हेमंत ढोमे, त्याचे ईतका सुंदर चित्रपट बनवल्याबद्दल कौतुक आणि आभार.
बाकी मला परीक्षण वगैरे लिहिता येत नाही. एवढी चित्रपट समजायची अक्कल नाही माझ्यात.
पण हे बघा, मी हे पाहिलेय, आणि ते मला फार आवडलेय, तुम्हालाही आवडेल... हे चार लोकांना सांगायला मनापासून आवडते म्हणून हा खटाटोप
थोडेसे अवांतर पण गरजेचे -
आम्ही हा चित्रपट नवी मुंबईच्या सीवूड स्टेशनमधील ग्रॅंड सेंट्रल मॉल मधील सिनेपॉलिसला पाहिला. मॉलमध्ये प्रवेश देताना वॅक्सिन सर्टिफिकेट चेक करूनच आत पाठवत होते. थिएटरमध्ये खुर्च्या एक सोडून एकच बूकिंग होते. आम्ही दोघे नवराबायको ईंटरव्हल पर्यंत याच नियमाचे पालन करत मधली खुर्ची सोडून बसलो होतो. पण पुढे पिक्चरचा प्रभाव पडला. जश्या त्या बायका एकमेकींच्या जवळ आल्या तसे आम्हीही मग ईंटरव्हलनंतर बाजूबाजूच्या खुर्चीवर बसूनच पुढचा पिक्चर पाहिला
असो, सांगायचा मुद्दा हा की सोशल डिस्टंन्सिंग पाळले जाते. चिंता नसावी. त्यामुळे तुम्ही एकटे गेलात तरी शेजारी कोणी लगटून बसायला येणार नाही याची खात्री. त्यामुळे बायकांनी बिनधास्त एकटेही जायला हरकत नाही. तसेच पुरुषांच्या वॉशरूममध्येही सोशल डिस्टन्सिंग पाळून युरिनल एक सोडून एक वापरात असल्याने आपले काम चालू असताना बाजूला कोणी येऊन उभा राहत नाही हे ही फार छान वाटले. पुरुषांनीही हा सुखद अनुभव घेण्यास चित्रपटगृहात जायला हरकत नाही. असे एखादे काहीही कारण शोधा, पण हा चित्रपट चुकवू नका
धन्यवाद,
ऋन्मेष
'मायबोली म्हणजे काही जग नाही'
'मायबोली म्हणजे काही जग नाही' हे एका महान व्यक्तीने सांगितलेले सुभाषित लक्षात ठेवा > चुम्मा प्रतिसाद आशुचँप
सरांचि भाषा वापरल्या बद्दल़ माफि असावि
मायबोली म्हणजे काही जग नाही'
मायबोली म्हणजे काही जग नाही' हे एका महान व्यक्तीने सांगितलेले सुभाषित लक्षात ठेवा
कोणत्या महान व्यक्तीचे सुभाषित आहे हे ?
झिम्मा पाहिला नाही. पण तो कसा
झिम्मा पाहिला नाही. पण तो कसा असेल याचा अंदाज आला.
तुम्ही अ गटात असाल आणि अ गटाला आवडला असेल तर तुम्हाला आवडला. पण ब गटात असेल तर तो नाही आवडत. तेच तुम्ही ब गटाला आवडलेला चित्रपट तुम्ही अ गटात असल्याने आवडलेला नसणार आणि ब गटाला नावडलेला अ गटाला आवडला असणार.
अ गटाला बायको चुकली स्टॅण्डवर हा जागतिक दर्जाचा मराठी चित्रपट वाटला तर ब गट त्यात उणिवा शोधतो. खरे तर बायको स्टॅण्डवर चुकणे ही कल्पनाच किती रोमॅण्टिक आहे. पण नेमक्या त्या कल्पनेचेच पोस्टमार्टेम केले जाते. मग नवरा का नाही चुकत असा प्रश्न येऊ शकतो. पण एकंदर परिणाम पाहता ही परिस्थिती सुद्धा तितकीच सुखावह आहे हे अ आणि ब दोहोंच्याही ध्यानात येत नाही.
>>सिनेमातील बायांचे लिबरेशन
>>सिनेमातील बायांचे लिबरेशन टिअर 2-3 शहरातील बायांच्या दृष्टीने प्रोजेक्ट केलेले आहे, त्यामुळे काही लोकांना ते फार बेसिक वाटणार हे आहेच.>>
सिम्बा, माझ्या दृष्टीने कुठल्या सामाजिक गटाचे लिबरेशन आहे, किंवा त्याच्याशी रिलेट होणे न होणे हा मुख्य मुद्दा नाही तर ते होण्याची क्रिया बाळबोध, फार वरवरची, कन्विनिअंटली गृहितकं मांडून ... थोडक्यात लेखन, दिग्दर्शन, पटकथा, संवाद, देहबोली, कायिक अभिनय हे सगळं ऑप्शनला टाकून थोडेफार खुसखुशीत संवाद, ठीकठाक फ्रेम्स, वरच्या बंदिस्त चौकटीत जमेल तो अभिनय यावर सिनेमा तोलुन नेऊ ही मानसिकता हा आहे.
फार श्रम, विचार ऑप्शनला टाकलेला ऑडियन्स म्हणत असलात तर मग मान्य. इतर कचर्याच्या मानाने वासरात लंगडी गाय .. जसं वावे म्हणत्येय की आणखी बेकार करता आला असता तितका केला नाही ... तसं असेल तरी एकवेळ चालेलच.
एवढं मराठी कशाला. सरळ Sloppy
एवढं मराठी कशाला. सरळ Sloppy work म्हणून दोन शब्दात मिटवा.
अल्लू अर्जुन : "रश्मिका, तू
गचु
अमित, अनुमोदन.
अमित, अनुमोदन.
इतक्या व्यक्तिरेखांतली एकही व्यक्तिरेखा नीट उभी राहात नाही, एकीचाही कथेतला आलेख विश्वसनीय वाटत नाही हा प्रॉब्लेम आहे.
'कमतरता आहेत, पण दोनचार वेळा हसू आलं' इतकीच अपेक्षा चित्रपटाकडून असेल तर मग प्रश्नच मिटला.
मी या चित्रपटाचा टार्गेट ऑडियन्स नाही, इतकाच या चर्चेचा माझ्यापुरता गोषवारा.
ऋण्म्याचं हेडर पहिल्यांदाच
ऋण्म्याचं हेडर पहिल्यांदाच नजरेखालनं घातलं आणि आपण बोलतोय तो सिनेमा आणि तो म्हणतोय तो सिनेमा एकच का हा प्रश्न पडला. असो, ज्याची त्याची आवड.
ऋण्म्याचं हेडर पहिल्यांदाच
ऋण्म्याचं हेडर पहिल्यांदाच नजरेखालनं घातलं आणि आपण बोलतोय तो सिनेमा आणि तो म्हणतोय तो सिनेमा एकच का हा प्रश्न पडला. Wink असो, ज्याची त्याची आवड.
>>>>
पहिल्यांदाच नाही हं सायो, चौथ्या पाचव्यांदा तरी नक्की.. कारण असे पहिल्यांदाच हे तुम्ही चार पाच वेळा म्हणाला आहात
असो,
निव्वळ तर्क आणि लॉजिक लाऊन चित्रपटाला जोखायचे झाल्यास शोले हा एक बाळबोध चित्रपट ठरेल ज्यात एक जेलर असलेला ठाकूर डाकूंचा बदला घ्यायला दोन कैदी आणतो आणि ते त्यांचा बीमोड करतात. प्रेक्षकांनी अक्कल वापरायची ठरवले तर हे त्यांना बिलकुल विश्वासार्ह वाटणार नाही. हेच अगदी डीडीएलजे आणि हम आपके है कौन चित्रपटांबाबत देखील म्हणता येईल. पण हे सारे चित्रपट बॉक्स ऑफिसवर मैलाचे दगड ठरले आहेत. पण अर्थात, तुम्ही म्हणालात तसे, ज्याची त्याची आवड
आता प्रॉब्लेम असा आहे की झिम्मा हा देखील त्यात दृष्टीकोनातून पाहिला तर आवडेल. पण तो स्त्रीप्रधान चित्रपट असल्याने प्रेक्षकांचे त्यातून समाज प्रबोधन व्हावे, प्रत्येकीची व्यक्तीरेखा सुस्पष्टच हवी जेणेकरून प्रेक्षकांना त्या महिलांचे प्रॉब्लेम कळतील, मग त्यांना मिळणारे सोल्युशन पटेल वगैरे वगैरे अपेक्षा ठेऊन आता लोकं चर्चा करू लागलेत जी वर उल्लेखलेल्या चित्रपटांबाबत त्यांना नव्हतीच.
तळटीप - मी हेडरमध्येही झिम्माला सर्वोत्तम वा उत्कृष्ट असे न म्हणता आनंददायी चित्रपट असे म्हटले आहे. आणि हा चित्रपटच नाही तर त्यावर होणार्या चर्चेचे या धाग्यावरील प्रतिसादही आनंददायीच आहेत
ऋ तुम्हाला सिनेमावरील
ऋ तुम्हाला सिनेमावरील प्रतिसाद, सगळा आनंदी आनंद आहे म्हणायचेय का?
झिम्मा मधले मेहबूबा मेहबूबा
झिम्मा मधले मेहबूबा मेहबूबा खूप आवडले.
सरांची फॉर्मात येऊन केलेली
सरांची फॉर्मात येऊन केलेली बॅटिंग बघणे हेही आनंददायी
काय ते शब्द, काय ती वाक्यांची फेक
अहाहा लाजबाब
वशिला असता ना सर, तुम्ही पोपच्या खालच्या दर्जाचे अधिकारी झाला असता
>> पहिल्यांदाच नाही हं सायो,
>> पहिल्यांदाच नाही हं सायो, चौथ्या पाचव्यांदा तरी नक्की.. कारण असे पहिल्यांदाच हे तुम्ही चार पाच वेळा म्हणाला आहात>> नाही वाचलेलं. झिम्मा नावाचा मराठी पिक्चर थेटरला आला आहे हे माहित होतं त्यामुळे हेडरमधे लिहिलेलं वाचायची गरज पडली नाही. आणि तुझा बीबी असल्यामुळे नेहमीप्रमाणे स्किप मारलं.
हरकत नाही.. धागा स्किप मारा..
हरकत नाही.. धागा स्किप मारा.. पण झिम्मा कुठल्याही मराठी स्त्री ने चुकवू नये असा पिक्चर आहे. तो नक्की बघा
सामो हा हा.. आनंदी आनंद नाही
सामो हा हा.. आनंदी आनंद नाही आनंददायीच आहे. सूक्ष्म निरीक्षण केलेत तर चुका दाखवतानाही कोणी त्रागा करत नाहीये हे समजेल.
गेल्या वर्षभरातील वा गेल्या काही काळातील बहुचर्चित मराठी चित्रपट असावा हा... या आधीचे दुनियादारी, मुंबईपुणेमुंबई, सैराट, नटसम्राट, कट्यार काळीजात घुसली हे चारपाच चटकन आठवणारे
.
लोल. चुकवू नये असा चित्रपट
लोल. चुकवू नये असा चित्रपट अजिबातच नाहीये.
सरांच्या विरोधी मत. मेजर
सरांच्या विरोधी मत. मेजर फाऊल.
पुढच्या फाऊलला बँकेतून दंडाची रक्कम कापली जाईल.
- सरोभक्त मंडळ
सर यावरही एक मस्त पोस्ट लिहा
सर यावरही एक मस्त पोस्ट लिहा
होम ग्राउंड आहे
हाणा बिनधास्त
वशिला असता ना सर, तुम्ही
वशिला असता ना सर, तुम्ही पोपच्या खालच्या दर्जाचे अधिकारी झाला असता
हे सरांचे डिमोशन आहे. आमच्या लेखी सरांचा दर्जा पोपच्याही वरचा आहे.
निषेध.
बघितला झिम्मा. फारच बाळबोध
बघितला झिम्मा. फारच बाळबोध आहे.
झिम्मा माझ्या गर्लफ्रेण्डला
झिम्मा माझ्या गर्लफ्रेण्डला आणि तिच्या आईला पण आवडला. तिच्या आईने खूप एण्जॉय केला. माझ्या आईला पण खूप आवडला. मी आमच्या चाळीत टीव्ही बाहेर आणून सर्व स्त्रियांसाठी एक खास शो ठेवला. सर्वांनाच आवडला. जाताना सगळ्या आया काकवांनी मला आशिर्वाद पण दिले. हे सर्व झिम्मा मुळेच शक्य झालं. या शतकातला झिम्मा हा एक महान चित्रपट आहे. ज्यांना आवडला नाही त्यांचे काहीतरी चुकतेय हे निश्चित.
खुप पुण्य कमवत आहेस. जमेल तर
खुप पुण्य कमवत आहेस. जमेल तर सगळ्यांना चित्रपट गृहात दाखव अजून जास्त आशिर्वाद घेशील
आणखी बेकार कसा करता आला असता-
आणखी बेकार कसा करता आला असता-
सिद्धार्थ चांदेकर आधी लंडनमध्ये काही तरी शिकायला होता असं दाखवायचं. आणि हे 'काही तरी' म्हणजे बँकिंग, एमबीए वगैरे. मग ते शिकून झाल्यावर त्याला साक्षात्कार झालेला असणार आपल्याला हे आवडत नाही, आपल्याला तर प्रवास करायला आवडतो. मग तो भारतात परत येऊन या धंद्यात पडतो. कारण तुम्ही जे शिकलात, तेच काम करत असलात तर तुम्ही 'कूल' नसता आणि सिद्धार्थ चांदेकर कूल असलाच पाहिजे.
मग लंडन दर्शन. 'हे कॅथेड्रल, म्हणजे यांचं देऊळ' हे एक टोक असेल, तर दुसरं टोक म्हणजे सगळ्या प्रेक्षणीय स्थळांचं सविस्तर दर्शन आणि समालोचन. वर टिप्पण्या. म्हणजे एखादी टेकडी वगैरे असेल, तर 'आपल्या पर्वतीपेक्षा बुटकी आहे नाही?'
शेवटी परत निघायची वेळ झाली की मग सगळ्यांना घरची आठवण यायला लागणार. हे दारू पिणं, तिकडचे नवीन नवीन पदार्थ खाणं वगैरे ठीक आहे, पण घरच्या गरम गरम वरणभात-तूप-लिंबू या जेवणाची सर 'कश्शाकश्शाला नाही' हे प्रत्येकीने वेगवेगळ्या प्रकारे बोलून दाखवणं.
इत्यादी.
गुलाबजाममधे आपण लंडनला जाऊन
गुलाबजाममधे आपण लंडनला जाऊन आलोय हे तो अजूनही विसरलेला नाहीए आणि तेव्हा पासूनच ती ॲंकल लेंथ स्वेटपॅंट घालून फिरतोय .. कूल दिसायला ..त्यात सस्पेंडर घालून पुण्यात फिरणे म्हणजे कळस
Submitted by svalekar on 26
Submitted by svalekar on 26 January, 2022 - 20:14 >>>> हे पण सरच ना ? कळेना कुठल्या रूपाची भक्ती करावी. सर खूप कठीण परीक्षा घेताय !
वावे
वावे
तो फोटोत दिसायला चांगला आहे.
तो फोटोत दिसायला चांगला आहे.
अभिनय, बहुतेक मी जास्त पिक्चर/मालिका पाहिल्या नाहीत त्याच्या.मला गुलाबजाम आणि इथला अभिनय सारखाच वाटला.
हा पिक्चर 3 तासांचा असता तर गुंडाळलेल्या गॅप पूर्ण करता आल्या असत्या का?
सिनेमा मध्ये हल्ली 'एक डिश बनवायचीय आपल्याला.त्यात चीज हवं, बटाटा हवा, बीन्स हव्या, ब्रोकोली चालेल, थोडी कोथिंबीर भुरभुरू मस्त फ्लेवर येईल, मग वर तूप जिरे फोडणी टाकू.थोडी वर मस्त पिवळी शेव टाकू' अश्या सर्व चांगल्या गोष्टी केलेल्या असतात.पण शेवटी 'डिश चं नाव काय, नक्की काय करायचंय,कोण खाणार आहे,ही डिश हे सर्व टाकून बनवतात का' हा मूळ प्रश्न राहतो.
अहो दोन तासाचा आहे तोच बघवत
अहो दोन तासाचा आहे तोच बघवत नाही
अजुन एक तास सोनाली चे नखरे, क्षिती जोग चे रडणे आणि ढोमेच्या मेणचट संवादांना सहन करण्याची ताकद कोणाला असेल असे वाटत नाही
चक्क आमच्या आईबाबांना ही नाही आवडला म्हणजे बघा
म्हणे एक ना धड भारंभार चिंध्या असा प्रकार आहे
म्हणलं चला कधी नव्हे ते एकमत झाले
असाच एक न आवडलेला पिक्चर
असाच एक न आवडलेला पिक्चर म्हणजे तो काहितरी आकडा सदाशिव.व पु काळेंच्या भांडणाची कला वाल्या जमदग्नी जोशी वर आधारित आहे.पण पिक्चर बाळबोध वाटला.व्हॉट्सअप किंवा फेसबुक फॉरवर्ड एकमेकांना जोडून बनवल्या सारखा काहीतरी.
इथे कुणी अमांच्या कॉन्टॅक्ट
इथे कुणी अमांच्या कॉन्टॅक्ट मधे असाल तर अमांची खुशाली कळवा.
Pages