Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काल कुठेतरी मुन्ना आणि कालीन
काल कुठेतरी मुन्ना आणि कालीन भाऊ असतील का असा प्रश्न वाचण्यात आला.. मग कालीन आणि मकबूल डॉक्टर कडे जातात तो सीन आठवला.. ये बिमारी बहोत पुरानी है असं काहीतरी.. मग बिना जेव्हा माधुरीला बोलते, इस घर के ससूर बहू का बहोत ख्याल रखते है..
खरंच तसं असेल का?
असू शकतील बाबूजींनी दोन्ही
असू शकतील बाबूजींनी दोन्ही सुनांना सारखेच प्रेमाने वागवले असेलही. पण आता मुन्ना अन बाबूजी दोघेही गेलेत त्यामुळे आता (बहुतेक) त्याचा काही फरक पडणार नाही गोष्टीत. मुन्ना जायला नको होता पण.
मला तो लिलिपुट अन ते जुळे हा थ्रेड नव्हता फारसा आवडला.
>>स्टे क्लोज छान आहे.<<
>>स्टे क्लोज छान आहे.<<
स्लो आहे पण चिकाटिने पाहिली तर आवडेल. प्रोफेशनल गुन्हेगारांवर आधारीत वेबसिरीजच्या तुलनेत सामान्य माणसांकडुन घड्लेल्या गुन्ह्यांवर (अंडर एक्स्ट्राऑर्डनरी सर्कंम्स्टंसेस) आधारीत असा हा जॉनरं आहे. एचबिओवर बर्याच आहेत या जॉनरंवर - मेर ऑफ इस्टटाउन, फ्लाइट अटेंडंट, बिक लिटल लाइज टु नेम अ फ्यु...
Archive 81 - supernatural
Archive 81 - supernatural horror/thriller नेटफ्लिक्स वर आहे.
जुन्या खराब झालेल्या विडिओ / ऑडिओ चित्रफिती दुरुस्त करणाऱ्या माणसाळल्या एक धनाढ्य माणूस काम देतो , ते जुने व्हिडिओ बघताना त्याला एका अघोरी पंथाची माहिते मिळते आणि एका अडकलेल्या तरुणीची सुटका करण्याची जबाबदारी त्याचावर येते.
कुणी पाहिली का? मी संपवली बघून . खूप दिवसांनी SUPERNATURAL HORROR / थ्रिलर मालिका बघितली. काही प्रश्न पडलेत पण वेगळं काहीतरी बघायला मस्त आहे.
हॉटस्टारवर परवा स्पेशल ऑप्सचा
हॉटस्टारवर परवा स्पेशल ऑप्सचा सीजन १.५ पाहिला. चार एपिसोड एकाच वेळी. मस्त वाटला म्हणून काल आजमध्ये पहिला सीजन सुद्धा बघून संपवला. तो तर जबरदस्त वाटला. मजा आली. बायकोने आधी पाहिलेले तरी सोबत पुन्हा पाहिला. कोणी अजून पाहिले नसल्यास दोन्ही जरूर बघा.
“सायलेंट सी” ही कोरीअन मालिका
“सायलेंट सी” ही कोरीअन मालिका नेटफ्लिक्सवर पाहिली. जरा हळू आहे पण एकुण कल्पना मला फार आवडली.
Stay Close संपवली , मग
Stay Close संपवली , मग Stranger चालू केली.
आता netflix मला Harlene Coben च suggest करतोय धडाधड. .
Stranger पण आवडली मला . पहिले 2-3 भाग इतके parallel tracks चालतात की काय संबंध ??असं वाटायला लागतं. पण हळूहळू सगळे धागे एकमेकांना येऊन जुळतात.
Stay close मधला photographer इथे हिरो आहे. कांदे कापता येतील असलं धारदार नाकं आहे त्याचं.
तो , त्याची बायको , मोठा मुलगा , डिटेक्टीव जो , ती stranger सगळे आवडले मला.
स्वस्ति, behind her eyes
स्वस्ति, behind her eyes बघितली आहेत का? नक्की बघा. मस्त आहे.
नाही प्राची. बघायला घेते.
नाही प्राची. बघायला घेते.
Thnks for reco
मी पण stay close संपवली.
मी पण stay close संपवली.
तो ब्रूम काय पटला नाय बुवा आपल्याला.
ऑन ड्युटी असताना मदतीसाठी call केला तरी हा उचलत नाही, voice messages पाहत नाही.
Stranger (कोरियन )की The Stranger ??
Behind her eyes पण भारीए.
The stranger . English
The stranger . English
Stranger चालू केली आहे. आवडते
Stranger चालू केली आहे. आवडते आहे. आज तो झिम्मा दिसला आणि तो बघण्यात फुकट वेळ घालवला :डोक्याला हात: आता रात्रपाळी करून बघायला लागेल.
Human हॉटस्टारवर. नाही बरी.
Human हॉटस्टारवर. नाही बरी. सगळंच डिप्रेसिंग आहे. शेफालीसाठी बघितली पण तिचं ते संथ आणि low pitch मधे बोलणं नको झालं.
Stranger चा हीरो छान आहे,
Stranger चा हीरो छान आहे, सारखं वाटत होतं याला कुठे पाहीलंय मग संपल्यावर शेवटी ट्यूब पेटली. Binge watch आहे पण कथा उगाच गुंतागुंतीची केलीये. Stay close बघेन आता.
ह्युमन चालू करायची आहे.
ह्युमन चालू करायची आहे.
ह्यूमन लैच संथ आहे हो !
ह्यूमन लैच संथ आहे हो !
शेफाली ची overacting वाटतेय .
या पेक्षा ' ये काली काली आंखे ' मस्त वाटली .
उत्तराखंड मधील बाहुबली नेत्याच्या मुलीच्या रोल ची "तू मेरा नही तो , और किसीं का हो नही सकता " सायको थीम जबरी आहे .
काली काली आखे पाहिली. बरेच अ.
काली काली आखे पाहिली. बरेच अ. आणि अ. प्रकार आहेत. बघायला पेशन्स लागला. सध्या अरण्यक बघते आहे. बर्यापैकी वाटली आतापर्यन्त.
ओझार्क सीझन ४ आला आहे नेफ्लि वर. पहायला सुरुवात केली का/ पाहून झाला का कुणाचा?
काली काली आंखे ..एंगेजींग आणि
काली काली आंखे ..एंगेजींग आणि थ्रिलींग आहे. अ आणि अ प्रकार आहेतच..सटासटा खून पाडतात वेबसिरीज मधे..खरच इतके आणि असे सर्रास कापाकापी रियल लाईफ मधे होत असेल का आणि पोलिस काय झक मारतात का ह्या शहरातले..असा प्रश्न पडतो.
अरण्यक मस्त आहे, हिरोचा अभिनय मस्त.
बिहाईंड हर आईज अमेझींग आहे..तशी दुसरी सिरिज आजवर सापडली नाही.
नेफ्लि वर मॅनिफेस्ट बघत आहे..
नेफ्लि वर मॅनिफेस्ट बघत आहे.. ३ सिझन आहेत. मस्त आहे
BHE पुढच्या weekend साठी
BHE पुढच्या weekend साठी ठेवलीयं.
Clickbait बघायला सुरु केलीय. Interesting आहे.
तो हिरो ओळखीचा वाटला मग लक्षात आलं की हा तर devil wears prada मधला boyfriend .
अरण्यक च्या शेवटाकडे आलोय.
अरण्यक च्या शेवटाकडे आलोय.
सगळ्यांचं काम मस्त झालय
एवढी हाय प्रोफाईल लोक involve असताना पोलीसांना एवढी मोकळीक मिळत असेल का हा प्रश्न पडला मला.
अनपॉझड चा पहिला भाग चाळा
अनपॉझड चा पहिला भाग चाळा म्हणून सुरू केला. लॉकडाऊन मधे घरात अडकलेल्या जोडप्याची कहाणी आहे. पाच सहा मिनिटे पाहू शकेन असे वाटले होते. ८३ मधे के श्रीकांतचा रोल ज्याने केला तो अॅक्टर आहे. थोड्याच वेळात पकड घेतली. लॉकडाऊनचे आयटीवाल्यांचे वातावरण माझ्यासाठी अनोळखी आहे. पण त्याने नंतर फरक नाही पडला. पुढचा भाग पाहिला जाईल याची खात्री नाही.
अरण्यक कुठे आहे.
अरण्यक कुठे आहे.
स्पेशल ऑप्स चा हा सीझन बघायचा विचार करतेय, पहीला बघितला नाहीये. मी नुसता विचारच करत असते, हाहाहा.
स्ट्रेंजर बघितली.
स्ट्रेंजर बघितली.
शेवटी अगदी माती खाल्ली आहे! कित्येक धागे अर्धवट राहिले, कित्येक कन्विनिअन्टली वळवले गेले. शेवटच्या एपिसोडचा लेखक/ डिरेक्टर बॉलिवुड मधुन हायर केलेला बहुतेक, कायच्याकाय सोयोस्कर प्रसंग!
पण कामं चांगली केलेली सगळ्यांनी. वेळ चांगला गेला, पण संपल्यावर डोक्यात रेंगाळायला हवी तसं काही झालं नाही.
Article 81 बघितली , वेगळी
Article 81 बघितली , वेगळी विचित्र आहे. विशेष नाही.
हॉरर, कल्ट, supernatural, thriller आहे.
नेटफ्लिक्स वर आहे.
हार्लन कोबेन ची गॉन फॉर गुड
हार्लन कोबेन ची गॉन फॉर गुड आहे नेफ्लि वर. फ्रेन्च आहे पण इंग्लिश डब केलेले वर्जन बघायला घेतले आहे. २ भाग बघून झाले. इंटरेस्टिंग वाटतेय. स्ट्रेन्जर चे केले तसे घोळ केले नाही म्हणजे मिळवलं.
ओझार्कचा चौथा सीझन (पहिला भाग
ओझार्कचा चौथा सीझन (पहिला भाग म्हणे - सात एपिसोड्स) पाहतोय. रिकॅप करायला आधीचा शेवटचा एपिसोड पुन्हा पाहिला. त्यामुळे आता लिन्क लागत आहे परत. आधीसारखाच खिळवून ठेवत आहे. आता जी कामगिरी आली आहे ती कशी करतात बघायची उत्सुकता आहे.
मलाही बहुतेक आधीच्या सीझन चा
मलाही बहुतेक आधीच्या सीझन चा शेवटचा एपिसोड बघावा लागणार पुन्हा.
अरण्यक कुठे आहे.>> नेफ्लि
अरण्यक कुठे आहे.>> नेफ्लि
बघण्यासाठी खूप पर्याय असले की
बघण्यासाठी खूप पर्याय असले की काय बघावं काय नको म्हणून काहीच बघून होत नाही. लहान असताना थेटरात सिनेमे यायचे, दूरदर्शनला रविवारी मूव्ही असायचा तेच बरं होतं.
Pages