Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमचंही साधच पण पौष्टिक ताट
आमचंही साधच पण पौष्टिक ताट ! गाजर हलवा आवडला तर अजून डब्यातून घ्या हं. लो क्यालरी आहे . नैसर्गिक शेतीतील गाजरं व गूळ आणि गीर गाईचे दूध
हलवा जबरी!
हलवा जबरी!
मानव ,मंजूताई मस्त ताट..
मानव ,मंजूताई मस्त ताट..
हलवा छान झालाय..
मंजू ताई तुमचे फोटो clear नाही दिसत side ला.
कॅमेरा che सेटिंग चेंज करा ना ..
फूड मोडवरच काढतेय .. शिकतेय .
फूड मोडवरच काढतेय .. शिकतेय ..
मल्ल गाजर हलवा , चपात्या आणि
मला गाजर हलवा , चपात्या आणि मूळ्याची कोशिम्बिर
ओळखून दाखवा बरं, जरा
ओळखून दाखवा बरं, जरा पूर्वेकडच्या वाटेनी पलिकडे जावे लागेल.
तीन प्रकारचे मासे आहेत यात. एकंदर पाच वेगवेगळे पदार्थ रात्रीच्या जेवणासाठी.
यातले मुख्य पदार्थ (उजवीकडचे) चिरंजीवांनी (ज्यु. हौशी कलाकार) केलेले. बाकी दोन डावीकडे वरचे बाहेरून तयार. आणि एक मी (हौशी) केलेला. . बाकीच्या (ज्यू आणि सिनियर) तज्ञांनी तोंडात बोटे घलण्याचे काम केले.
मंजू ताई..मस्त फोटो ..
मंजू ताई..मस्त फोटो ...पौष्टिक ताट खूप आवडलं
मला फक्त सुशि ओळखली
मला फक्त सुशि ओळखली
मलाही फक्त सुशी ओळखू आली.
मलाही फक्त सुशी ओळखू आली.
वरती सामन आहे. १२ ओ क्लॉक.
खाली पांढरा फ्लेकी सॉफ्ट दिसतोय तो बहुतेक 'बासा' उर्फ सी बास नामक दिसतोय.
सुशिमधे काय आहे माहिती नाही.
वरती सामन आहे. १२ ओ क्लॉक.
एक "जोक" आहे.
Man : We have a color named after you.
Salmon : Wow!
Is it silvery blue like my outsides?
..
Salmon : Wait. It is pink... WHY IS IT PINK??
कोणत्याही 'तंदूरी' रेसिपीत
कोणत्याही 'तंदूरी' रेसिपीत मटन्/चिकन/मासे दह्यात मॅरिनेट करून वापरतात. सर्व बिर्याण्यात दही वापरून भाजीचा रस्सा बनवतात.
ते उगाच दूध मासा अयुर्वेद वगैरे कन्सेप्ट आहे. (मासा दुधात जगू शकत नाही म्हणून दुधासोबत खायचा नाही म्हणे) ज्यांना खायचं त्यांनी खा, नसेल खायचं त्यांनी नका खाऊ. संपला प्रश्न.
आपल्याकडे अश्या "अमुक करू नका" वाल्या गोष्टींवर विश्वास चट्कन ठेवला जातो. "उगाच कशाला विषाची परिक्षा?" म्हणत.
आणि हो, त्या "कच्चं" दही सोबत खात नाहीत बद्दल : कोणत्याही बिर्याणीसोबत दहीकांदामिरचीकोथिंबीर वाली कोशिंबीर अन मिरचीचं सालन असतंच असतं.
मंजुताई, ताट भन्नाट, खास करून
मंजुताई, ताट भन्नाट, खास करून हलवा !
विक्रमसिंह, पिटा चिप्स, अवाकाडो/ग्वाकामोली सारखे आणि सुशी एवढंच ओळखू आलं.
स्मोक्ड सॅलमन सुशी असावी..
स्मोक्ड सॅलमन सुशी असावी.. ग्वाकोमोले पण दिसतंय..पांढरा मासा म्हणजे बहुतेक तिलापिआ असावा
फ्लाउंडरही पांढराच असतो पण
फ्लाउंडरही पांढराच असतो पण फार फार नाजूक. तिलापिआ असेल बहुधा.
मूळ प्रश्न अंडी आणि दह्याचा
मूळ प्रश्न अंडी आणि दह्याचा होता तर फुकटची मासे, मटणाची उदाहरणं देताहेत न वाचता... रोजच्या सवयीने.
मूळ प्रश्न अंडी आणि दह्याचा
मूळ प्रश्न अंडी आणि दह्याचा होता
एक "न" बिर्याणी असते. अंडा बिर्याणी म्हण तात तिला.
बिर्याणी कुठलीही असो, वेग
बिर्याणी कुठलीही असो, वेग अंडा मछली चिकन मटण वा कौवा बिर्याणी असो. सोबत मला दह्याचा रायता लागतोच
गोकुळाष्टमीला आमच्या कडे
गोकुळाष्टमीला आमच्या कडे दहीअंडी (डिश) असते हेच ऐकायचं बाकी राहिलंय आता.
दूध आणि अंडी एकत्र करून
दहीअंडी
दूध आणि अंडी एकत्र करून केलेले फ्रेंच टोस्ट माझा आवडीचा नाश्ता आहे. जर दूधाला काही प्रॉब्लेम नाही तर दह्यालाही होऊ नये.
तसेच आमच्या लहानपणी जिम करणाऱ्या पोरांमध्ये दूधात कच्चे अंडे फेटून प्यायचेही फॅड आलेले. सारे पोरं जिवंत आहेत. छान पैकी बॉडी बनवून..
खाली पांढरा फ्लेकी सॉफ्ट
खाली पांढरा फ्लेकी सॉफ्ट दिसतोय तो बहुतेक 'बासा' उर्फ सी बास नामक दिसतोय.>. आ.रा.रा. करे़क्ट. सुविचे नावाचा पेरुवियन पदार्थ. विशेष काहिनाही , कांदा आणि खूप लिंबू घालून सी बास ची कोशिंबीर.
स्मोक्ड सॅलमन >> नाही, सॅलमन/सामन साशिमी
ग्वाकोमोले पण दिसतंय..>> म्हाळसाक्का करेक्ट
पिटा चिप्स, अवाकाडो/ग्वाकामोली सारखे आणि सुशी एवढंच ओळखू आलं. > अस्मिता नाचो आणि चेडर चीज, बाकी करेक्ट. सामन आणि ट्युना सुशी
तुम्हाला माझ्यातर्फे एक सुशी, साशिमी पार्टी.
दूध आणि अंडी एकत्र करून
दूध आणि अंडी एकत्र करून केलेले फ्रेंच टोस्ट >>>+१
दूध, दही + मासे अंडी फोटो
दूध, दही + मासे अंडी फोटो टाकून 48 तास होऊन गेलेत
आयडी व्यवस्थित आहेत , म्हणजे काय होत नाही
आता दूध, दही, मासे यावर
आता दूध, दही, मासे यावर एव्हढ्या पोस्टी पडल्यात तर त्यात माझी अजून एक भर.
चिकन, मटण, अंडी हे दुग्धजन्य पदार्थां सोबत सर्रास खाल्ले जाते परंतू माश्यांसोबत सहसा आढळत नाहीत. (बंगाली आहारात सोडून)
आमच्याकडेही मासे दुग्धजन्य पदार्थां सोबत टाळतात. आयुर्वेदात सांगितले असेल म्हणून असावे पण नक्की कारण कोणाला माहीत नाहीये. कुणीतरी सांगितले होते की शरीरावर पांढरे चट्टे येतात असे कॉम्बिनेशन खाल्ल्यावर. त्यामुळे विषाची परीक्षा कशाला म्हणून आम्हीही मासे+दूध कॉम्बो टाळतो. तसेच मासे खाल्ल्यानंतर दुधाचे पदार्थ खात नाही.
>>>>>>>>कुणीतरी सांगितले होते
>>>>>>>>कुणीतरी सांगितले होते की शरीरावर पांढरे चट्टे येतात असे कॉम्बिनेशन खाल्ल्यावर.
होय मी ऐकलेले कोड येते.
>>>>>>>>>>आमच्याकडेही मासे दुग्धजन्य पदार्थां सोबत टाळतात.
सेम हियर
आमच्याकडेही दूध मासे खात
आमच्याकडेही दूध मासे खात नाहीत.मी खायचे ते सोडा(जाऊ दे या अर्थाने).
जसे फळ आणि दूध एकत्र खाऊ nayehanatat.पण शिकरण, मिल्कशेक बऱ्याच जणांच्या आवडीचा असतो.तसेच हेही असावे.
मला वाटतं तुम्ही वर्षानुवर्षे
मला वाटतं तुम्ही वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या जे खाताय त्याचा तुम्हाला त्रास होत नसावा.
माझ्या आई कडच्या 5 पिढ्या (including मी स्वतः) दूध भात मीठ खातात. सगळ्या 80+ निरोगी आयुष्य जगल्या. आईचा मधला एपिसोड सोडला तर आई पण टचवूड चांगली आहे. मी अजूनही जिवंत आहे.
पण आता मुलाला देताना मी दूध कसं मिठाबरोबर खाऊ नये वगैरे ज्ञान देते तेंव्हा स्वर्गात बसून त्यांना माझं मुस्काड फोडावं वाटत असणार नक्की.
कोणत्याही बिर्याणीसोबत
कोणत्याही बिर्याणीसोबत दहीकांदामिरचीकोथिंबीर वाली कोशिंबीर अन मिरचीचं सालन असतंच असतं.>>>>>> दही रात्री खाऊ नये असे आयूर्वेद सांगतं. पण एकदा मी रात्री अशीच कांद्याची दही घालुन केलेली कोशिंबीर खाल्ली आणी रात्री कधी नव्हे ती जी गाढ झोप लागली की बास. सकाळी उठुन खूप फ्रेश वाटले. कारण माझी झोप सावध असल्याने गाढ झोप अशी कधी मिळतच नाही.
या बाफावर येऊ नये असे वाटते कारण इथल्या वैशिष्ट्यपूर्ण रेसेपीज बघुन मला लय काँप्लेक्स येतो.
कॉम्प्लेक्स येऊ नये म्हणुन मी
कॉम्प्लेक्स येऊ नये म्हणुन मी देत असतो ना फोटो इथे.
दहीअंडी Proud
दहीअंडी Proud
सिझनल भाज्यांचे लोणचे
सिझनल भाज्यांचे लोणचे
मिरची आणि लसूण पातीचा ठेचा
मेथी आणि चुक्याची पचडी
Pages