Kindle Unlimited वर वाचलेले पुस्तक कसे वाटले ?

Submitted by mrunali.samad on 30 December, 2021 - 07:05

मी एक महिन्यापासून किंडल अनलिमिटेड सबस्क्रीप्शन घेतले आहे. वीसेक पुस्तके वाचून झाली आहेत.
मी लेखक आणि रेटिंग्ज बघून पुस्तक वाचायचे कि नाही ठरवतेय.
प्रतिसादात वाचलेली पुस्तके आणि थोडक्यात पुस्तकांबद्दल लिहिन.
तुम्ही हि किंडल वर पुस्तके वाचत असाल तर कोणती वाचली आणि कशी वाटली. ह्या प्रतिक्रियांसाठी हा धागा.
इतर हि वाचकांना ह्याचा फायदा व्हावा हा उद्देश!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किंडलवर वाचलेलं पहिलं पुस्तक म्हणजे गणेश मतकरीचं "खिडक्या अर्ध्या उघड्या". कथा फॉरमॅट मध्ये आहे पण फील कादंबरीसारखा आहे. इंटरेस्टिंग आहे.
किंडलवर वाचायचं असेल तर फोनपेक्षा टॅब बरा असे वैयक्तिक मत.

काही दिवसांपुर्वी 'बनारस टॉकीज' वाचले. होस्टेल लाइफवर पुस्तक आहे. चुरचुरीत संवाद, वेगवान कथानक. Kindle unlimited वर आहे.

मी इतक्यात वाचलेली पुस्तके्

रत्नाकर मतकरी
-संदेह-कथासंग्रह.
प्रत्येक कथेत एकापेक्षा एक भारी ट्वीस्ट्स
- अंतर्बाह्य-कथासंग्रह
भुत नसलेल्या गुढकथा.

नारायण धारप
-अनोळखी दिशा १,२,३
पहिला भाग जास्त डरावना.दोन आणि तीन कमी होत गेले.
-लुचाई
-पडछाया
-चेटकिण

सुधा मुर्ती
-परिघ
-बकुळा
-अस्तित्व
-पित्रुऋण

डॉ.एस एल भैरप्पा
-आवरण
-परिशोध

मृणाली, किंडल अनलिमिटेडचे सबस्क्रिप्शन कुठून घेतले?
त्यात किती फ्री पुस्तकं मिळतात?
जी फ्री नाहीत ती विकत घेताना (सबस्क्रिप्शन असल्याने) डिस्काउंट मिळते का?
गुगल प्ले मधील मुव्हीज सारखे पुस्तक विकत घेण्याऐवजी भाड्याने पण घेता येतात का?

मी मोबाईल वर एप इन्स्टॉल केले.
त्यात किंडल अनलिमिटेड चे गुगल पे करून एक महिन्याचे सबस्क्रीप्शन घेतले.
भरपूर फ्री पुस्तके असतात.
विकत घ्यावी लागतात ती म्हणजे 200 रू किंमत असेल तर इथे 30/- -40/- रूपयात मिळते.
तिथे एक लायब्ररी असते त्यात पुस्तक डालो होते.मी एकावेळी दोन-तीन डालो करून ठेवते.
गुगलप्लेचे मला माहिती नाही.
किंडल अनलिमिटेड पैसेवसूल आहे.

त्यांच्या ऑफर वर डोळा ठेवा
मी कायम ऑफर असताना घेतलं आहे
79 रु मध्ये तीन महिने
या तीन महिन्यात कचकून वाचन करायचं
एक दिवस अलीकडे सुबस्क्रिपशन एन्ड करायचे नैतर खात्यातूनपैसे वळते होतात 129 रु काकाहितरी तेहीएक महिन्याचे
तोही एकदा फटकाबसून झालाय
म्हणून एक दिवस आधीच

त्यांच्या ऑफर वर डोळा ठेवा>>>>>
हे बरोबरे
दिवाळीच्या आधी ऑफर होती 169/- मधे तीन महिने.
आठवडाभर गावी जाणार म्हणून आल्यावर करू ठरवलं. तोपर्यंत ऑफर संपली.

हो, एकदा अमेझॉन वर ऑफर होती 3 महिन्यांची, मी घेतली.
पण मोबाईलवर वाचणे जमेना, तीन-चार पुस्तकं वाचून सोडून दिले.
मग तीन महिन्यांनी क्रेडिट कार्डवर पैसे डेबिट झाल्याचा मेसेज आला. लगेच त्यांना फोन करून transaction reverse केले.

तोपर्यंत ऑफर संपली>>>>

हो झटकन संपते ऑफर
आमचा वाचक प्रेमी मंडळींचा एक व्हाट्सप ग्रुप आहे त्यावर वादळी वेगाने या बातम्या पसरतात. त्यामुळे वेळ घालवतच नाही कोणी

युगंधर (कादंबरी) - शिवाजी सावंत - आवडते आहे.
मृत्युंजय (कादंबरी) - शिवाजी सावंत - अंहं आता नाही आवडत. लहानपणी भारावले होते. मात्र काही ढोबळ समजूती जसे स्त्रियांना दुबळे समजणे अशा काही बाबी खटकतात.
खेकडा (कथा संग्रह)- रत्नाकर मतकरी - मस्त आहे.
श्री योगेश्वरी उपासना - अच्युत जोगळेकर - स्तोत्रे नेहमी वाचते. उत्तम माहीती.
अंधारवारी (कथा संग्रह) - हृषीकेश गुप्ते - बाप रे!!! भीतीदायक आहे.
ययाती (कादंबरी) - वि स खांडेकर - मस्त मस्त मस्त. हातातून खाली ठेवलीच नाही.

शांता शेळके यांचे - कविता स्मरणातल्या, गोंदण, लेकुरवाळी, रंगरेषा, चित्रपट गीते आणि किनारे मनाचे - ही पुस्तकेही आवडली. खूप आनंद दिला.

बाकी इंग्रजी पुस्तके खूप आहेत जी की फुकट होती मग त्यात विषय आहेत - बुद्धीझम, बायपोलर डिसॉर्डर, कविता, लाइफ आफ्टर डेथ, कुंडलिनी.

तू 'खलील जिब्रानचे' द प्रॉफेट वाचलयस का? सुंदर आहे.

तू 'खलील जिब्रानचे' द प्रॉफेट वाचलयस का? सुंदर आहे.>>> नाही

ययाती (कादंबरी) - वि स खांडेकर - मस्त मस्त मस्त.>>>+ ११

छान यादी मिळतेय पुस्तकांची. Happy

गेल्या नोव्हेंबर 2019 पासूनची वाचनयादी

काही उलट सुलट झाली असतील, काही रिपीट असतील, पण यात अजून बरीच पुस्तके टाकली नाहीयेत कारण केनेथ अँडरसन आणि जीम कॉर्बेट पुन्हा एकदा वाचून काढले. डॅन ब्राऊन सुद्धा आणि अजून हार्ड प्रिंट पुस्तके कुठली वाचली ते आठवून लिहावं लागेल.

मेंदुतला माणूस - सुबोध जावडेकर
प्रण्यांचे मेंदूशास्त्र अशी वाचली आहेत, ती एकदा मेंदूवर ताण देऊन आठवतो आणि जोडतो.

१. गोल्डा एक अशांत वादळ
२. मालगुडीचा संन्यासी वाघ
३. शेरलॉक - द साईन ऑफ फोर
४. थैलीतील खामरा
५. घनगर्द - ऋषिकेश गुप्ते
६. अंधारवारी
७. हिटलरच्या खुनाचा कट
८. शिवराम
९. रत्नपंचक
१०. कार्वालो
११. The Hour of the Leopard
१२. ONLY TIME WILL TELL
१३. THE SINS OF THE FATHER
14. Best Kept Secret
15. BE CAREFUL WHAT YOU WISH FOR
१६. अंधारवारी - ह्रुषिकेष गुप्ते
१७. प्राण्यांचा डॉक्टर - विजय देवधर
१८. स्ट्रीट लॉयर - जॉन ग्रिशम
१९. उत्तरकांड - भैरप्पा
२०. कात
२१. मृत्युद्वार
२२. ऐसी रत्ने मेळवीन - धारप
२३. लास्ट फ्रंटीयर - मॅक्लिन
२४. नागासाकी - क्रेग कोली
२५. कोमा
२६. डार्कर साईड
२७. डिंभक - संजय डोळे
२८. अर्थाच्या शोधात
२९. गन्स ऑफ नॅवरॉन
३०. गोष्ट छोटी डोंगराऐवढी
३१. न्यायमंदीर - धारप
३२. कथा युद्धकौशल्याच्या
३३. फेलुदा कैलासातील कारस्थान
३४ फेलुदा - बंगाल टायगर
३५. व्योमकेश बक्षी
३६ प्रिझनर ऑफ बर्थ - जेफ्री आर्चर
३७. पावणेदोन पायांचा माणूस
३८. एका डेंटीस्टची बत्तीशी -संदेश मयेकर
३९. महाराणी ताराराणी
४०. डोंगरी ते दुबई
४१. भायखळा ते बँकॉक
४२. फेलुदा बादशहाची अंगठी
४३. प्रेमाचा रेणू
४४. मगरडोह
४५. Tigers for Dinner
४६. क्ष शिल्लक
४७. चाणक्य
४८. स्क्रीन टाइम
४९. मालगुडीचा नरभक्षक
५०. माधवी - विजया जहागीरदार
५१. ठगाची जबानी
५२. The Year of Short Stories - Jeffrey Archer
Caste-Off, Too Many Coincidences, Cheap at Half the Price, Clean Sweep Ignatius, The Grass Is Always Greener, One Man's Meat, The Endgame, A Wasted Hour
५३. World War 1: A History From Beginning to End
५४. Word Study and English Grammar – Frederick William
५५. The Jungle Book - Rudyard Kipling
५६. Around the World in Eighty Days - Jules Verne
५७. Journey to the Center of the Earth - Jules Verne
५८. मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध - जयसिंगराव पवार
५९. Gulliver's Travels - Jonathan Swift
६०. Life on the Mississippi - Mark Twain
६१. Cycling Konkan Coast of India: Mumbai to Goa
६२. Dancing with Air: WWII Love Story - Uvi Poznansky
६३. रिपोर्टींगचे दिवस - अनील अवचट
६४. कुतुहलापोटी - - अनील अवचट

नारायण धारप
६५. थैलीतला खामरा
६६. ४४० चंदनवाडी
६७. चेटकीण
६८. चंद्राची सावली
६९. देवाज्ञा
७०. काळी जोगीण
७१. कुलवृत्तांत
७२. लुचाई
७३. नवे दैवत
७४. रावतेंचा पछाडलेला वाडा
७५. स्वाहा
७६. सैतान
७७. संक्रमण
७८. शपथ
७९. शोध
८०. वेडा विश्वनाथ
८१. द्वैत
८२. नेनचिम
८३. फ्रॅंकेन्स्टाईन
८४. वासांसि नूतनानी
८५. विश्वसम्राट
८६. शिवराम
८७. बहुरूपी
८८. चक्रावळ
८९. कृष्णचंद्र
९०. अंधारातील उर्वशी
९१. काळ्या कपारी
९२. इक्माई
९३. भुकेली रात्र
९४. ग्रास
९५. गुन्हेगारांचे जग - निरंजन घाटे
९६. दुसऱ्या महायुद्धातील शौर्यकथा - निरंजन घाटे
९७. अमेलीया इअरहार्ट - कीर्ती परचुरे
९८. फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे
९९. कंपनी ऑफ विमेन - खुशवंत सिंग
१००. सेक्स स्कॉच स्कॉलरशीप - खुशवंत सिंग
१०१. महाभारतातील अप्रचलीत कथा
१०२. रिबेल सुलतान - मनु पिल्लई
१०३. जळातील मासा - जयवंत दळवी
१०४. विरप्पन - सुनाद रघुराम
१०५. शेअर मार्केट - आनंद कुमार
१०६. रावण - अमिश
१०७. डायरी ऑफ यंग गर्ल - अॅन फ्रँक
१०८. शेरलॉक होम्स - साईन ऑफ फोर
१०९. A Study in Scarlet
११०. The Valley of Fear
१११. The Hound of The Baskerville
११२. Labrador: The Complete Owners Guide - Len Packwood
११३. Puppy Training: How To Train a Puppy - Carrie Nichole
११४. Labrador Puppy Training Tips - Bryan Henderson
११५. Brain Games for Dogs - Carrie Nichole
११६. Dog Training: 50 Dog Smart Tricks - Max Paco
११७. 100 Dog Training Tips - Jezebel Young
११८. नेताजी सुभाषचन्द्र बोस और भारतीय राष्ट्रीय सेना (Hindi Edition) - Dr. Mohan Lal Gupta
११९. महानायक (Hindi Edition) - विश्वास पाटील
१२०. Cat_O_Nine_Tales (Marathi) - JEFFERY ARCHER
१२१. False_Impression - - JEFFERY ARCHER
१२२. Everest ki Beti (Hindi Edition) - ARUNIMA SINHA
१२३. NOT A PENNY MORE, NOT A PENNY LESS (Marathi Edition)
१२४. The Race of My Life: An Autobiography - Milkha Singh
१२५.हटके भटके - निरंजन घाटे
१२६. रावी पार - गुलजार
१२७. पॅलेस्टाईन-इस्रायल - अतुल कहाते
१२८. फिडेल कॅस्ट्रो - - अतुल कहाते
१२९. मध्यरात्रीचे पडघम - रत्नाकर मतकरी
१३०. फाशी बखळ - रत्नाकर मतकरी
१३१. हॉटेल रोडसाईड मराठी Horror Book
१३२. रानमेवा - व्यंकटेश माडगूळकर
१३३. The Dirty Dozen: Hitmen of the Mumbai Underworld - Gabriel Khan
१३४. Raw: भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढ़गाथा - रवी आमले

वाचायला घेतली पण अर्धवट सोडली अशी

ड्रॅकुला, मेघदुत, घणाणतो घंटानाद, महाभारताचे रहस्य, डॉक्टर झिवागो, द वॉचमन, फ्रिडम अॅट मिडनाईट, थाऊजड स्प्लेंडीड सन्स, काईमेरा, गुदगुल्या, रेझोनन्स

ही सगळीच्या सगळी किंडल अनलिमिटेड वर आहेत

द. मा. मिरासदार , गदिमा , व्यंकटेश माडगूळकर , रत्नाकर मतकरी आणि धारपांची तर जवळ जवळ सगळीच आहेत

मोबाईलवर वाचणे जमेना, तीन-चार पुस्तकं वाचून सोडून दिले. - मानव पृथ्वीकर .

फक्त epub पुस्तके मोबाइलात इबुक रीडर apps वर वाचता येतात.

------------
ही सगळीच्या सगळी किंडल अनलिमिटेड वर आहेत

- आशुचँप .
भारी यादी आहे. महिन्याला चार पुस्तके वाचलीत!

--------------------
उपयोगी धागा आहे. वाचनालये बंद पडत चालली आहेत आणि नवीन माध्यमांची गरज वाढली आहे. पुस्तके सुचवणाऱ्यांना धन्यवाद.
------–-----
नववर्ष शुभेच्छा!

मी मतकरींचे रंगाधळा वाचायला घेतले. चार वाचल्या त्यातील एक बऱ्यापैकी वाटली, मग सोडून दिले.
यांचे कुठले आवर्जून वाचावे असे पुस्तक रिकमंड करा कोणी.

आणि गेस व्हॉट! Harry Potter and the philosophers stone वाचतोय, पहिल्यांदाच.

मी अजून सबस्क्रिप्शन नाही घेतले, किंडल डिव्हाईस घेण्यापूर्वी प्राईम रिडींगवर फ्री आहे त्यात वाचण्यासारखे काही असेल ते वाचून पहातोय.
किंडल डिव्हाईसचे पैसे वेगळे कमावून (नव्या ऍक्टिव्हिटीतून) ते घ्यायचे असे ठरवलेय.

मी सध्या किटकशास्त्रज्ञ- 'कार्वलो' वाचतेय.85% झाली वाचून. .
मधमाशा इतर किटकांची माहिती आहे तसेच दूर्मिळ उडत्या सरड्याच्या शोधात, निर्भिड जंगलात निघालेली चार पाच इरसाल लोकांची टिम सोबत एक पाळीव कुत्रा. रोमांचक, थोडासा विनोदी तडका.मस्त पुस्तक. वेगळ्या सफरीचा अनुभव.

तडा-भैरप्पा संपली. संथ वाटली थोडी.

खेकडा सुरू केली, दोन तीन कथा वाचल्या,प्रेडिक्टेबल वाटल्या.

यांचे कुठले आवर्जून वाचावे असे पुस्तक रिकमंड करा कोणी....... खेकडा,ऐक टोल पडताहेत(की मध्यरात्रीचे पडघम)

आत्मचरित्रे पण आहेत.

महागुरु - हाच माझा मार्ग
कान्चन घाणेकर - नाथ हा माझा
मोहन जोशी - नट्खट

I think you might like this book – "KARVALO (Marathi Edition)" by K. P. PURNACHANDRA TEJASWI, UMA KULKARNI.

Start reading it for free: https://amzn.in/fFx3NDC
@चिडकू, लिंक कशी देता येते,किंडल अनलिमिटेड वरून माहिती नाही. रेंकमेंड असा ऑप्शन आहे.ते ट्राय केलं.

कार्वलो झाली वाचून पूर्ण.. मस्त आहे.
खेकडा पूर्ण केली.

@आशुचँप
उपयोगी यादी दिलीत.धन्यवाद!
ONLY TIME WILL TELL वाचतेय सध्या.

सध्या जेम्स जॉईस यांचे Dubliners वाचत आहे.
गेले एक वर्ष 'The Brothers Karamazov' वाचत आहे, बघू कधी संपते ते.
किंडल अनलिमिटेड सुब्स्क्रिपशन फार छान आहे. छान इंग्लिश clasics अवेलेबल आहेत .

मराठीमध्ये श्रीमान योगी, स्वामी, पृथ्वीवर माणूस उपराच, माणदेशी माणसे वाचले आहे किंडलवर.
जमले तर तोत्तो-चॅन वाचा. (totto chan )

Pages