Kindle Unlimited वर वाचलेले पुस्तक कसे वाटले ?

Submitted by mrunali.samad on 30 December, 2021 - 07:05

मी एक महिन्यापासून किंडल अनलिमिटेड सबस्क्रीप्शन घेतले आहे. वीसेक पुस्तके वाचून झाली आहेत.
मी लेखक आणि रेटिंग्ज बघून पुस्तक वाचायचे कि नाही ठरवतेय.
प्रतिसादात वाचलेली पुस्तके आणि थोडक्यात पुस्तकांबद्दल लिहिन.
तुम्ही हि किंडल वर पुस्तके वाचत असाल तर कोणती वाचली आणि कशी वाटली. ह्या प्रतिक्रियांसाठी हा धागा.
इतर हि वाचकांना ह्याचा फायदा व्हावा हा उद्देश!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संप्रति, अज्ञेय ह्यांची हिंदी पुस्तके कुठे मिळतील? तुम्ही इतके मस्त लिहलय त्यांच्या पुस्तकांबद्दल त्यामुळे वाचायची उत्सुकता आहे. हिंदी वाचन अजीबात नाही ह्या आधी त्यामुळे हिंदी पुस्तके कुठे मिळतील काही कल्पना नाही.

>>>>>मनोविश्लषणात्मक -नॉट माय टाईप. म्हणजे स्पष्ट मनोविश्लषण नसून घटना आणि पात्रांचे वागणे यातून उलगडणारे आवडते. उदाहरणार्थ जिएंच्या कथा.
डिट्टो.

द गुड अर्थ - पर्ल बक
डॉ झीवागो - बोरिस पास्तरनाक (हे मराठीत आहे पण. मला इंग्लिश आवडले)
रात पश्मिने की - गुलज़ार
जोनाथन लिविंग्टन सीगल (हिंदीत आहे. इंग्लिश दिसले तर तेच वाच)
प्राईड अँड प्रेज्युडाइस

>>लेखक आणि रेटिंग्ज बघून पुस्तक वाचायचे कि नाही ठरवतेय.>>

मी पाच पुस्तकांत चार सुचविलेली वाचतो आणि एखादे स्वत: शोधलेले. वेळ वाचतो.

द लॉस्ट सिटी ऑफ झेड
डेव्हिड ग्रान (२००९)
या मूळ पुस्तकाचा अनुवाद - मंदार गोडबोले.
मेहता पब्लिशिंग हाऊस,२०२२.
पाने ३००

अमेझोनच्या अरण्याचा शोध घेणाऱ्या पर्सी फॉसेटचा आणि इतर संशोधकांचा परिचय. तसेच लेखकाने केलेली शोध मोहीम. David Grann
या पुस्तकाची लिंक

1) https://www.amazon.in/s?k=The+lost+city+of+z+by+Devid+Graan&i=digital-te...

अशा इतर पुस्तकांची लिंक .Kindle unlimited link - या पानावर अशाच इतर पुस्तकांची यादी आहे
2) https://www.amazon.in/s?k=The+lost+city+of+z&rh=n%3A90130021031%2Cp_n_su...

पुस्तक वाचनीय.

Pages