Submitted by mrunali.samad on 30 December, 2021 - 07:05
मी एक महिन्यापासून किंडल अनलिमिटेड सबस्क्रीप्शन घेतले आहे. वीसेक पुस्तके वाचून झाली आहेत.
मी लेखक आणि रेटिंग्ज बघून पुस्तक वाचायचे कि नाही ठरवतेय.
प्रतिसादात वाचलेली पुस्तके आणि थोडक्यात पुस्तकांबद्दल लिहिन.
तुम्ही हि किंडल वर पुस्तके वाचत असाल तर कोणती वाचली आणि कशी वाटली. ह्या प्रतिक्रियांसाठी हा धागा.
इतर हि वाचकांना ह्याचा फायदा व्हावा हा उद्देश!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दोन चार वाक्यांत पुस्तकाचा
दोन चार वाक्यांत पुस्तकाचा विषय कळला तर बरं होईल. जसं -माय नेम इज परवाना-deborah ellis अनुवाद-अपर्णा वेलणकर..अफगाणिस्तानात मुलीच्या/स्त्रीयांच्या
शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या आई आणि मुलींची गोष्ट.
माय नेम इज परवाना-deborah
माय नेम इज परवाना-deborah ellis अनुवाद-अपर्णा वेलणकर
द ब्रेडविनर, परवाना आणि शौझिया - असे तीन अनुवाद वाचल्याचं आठवतंय. सगळे अपर्णा वेलणकरांनी केले आहेत. सगळी पुस्तकं छान आहेत.
आणखी एक वर्षा वेलणकरही आहेत
आणखी एक वर्षा वेलणकरही आहेत त्यांनी एक विक्टोरिया महाराणीवरचं पुस्तक अनुवादित केलंय. सम्राज्ञी : महाराणी व्हिक्टोरिया आणि भारत । इतिहासपर अनुवाद : वर्षा वेलणकर
नमस्कार,
नमस्कार,
माझे एक पुस्तक किंडलवर आहे.
'वेगळे आकाश'
लिन्क - https://www.amazon.in/gp/product/B09YPYJJ97/ref=x_gr_w_bb_sout?ie=UTF8&t...
अनलिमिटेड वाल्यांना फुकट वाचता येईल. धन्यवाद __/\__
Thanks च्रप्स, mrunali.samad
Thanks च्रप्स, mrunali.samad
काजळी वनचे लेखक कोण आहेत? Deepak Kadam
Thanks for link विनिता.झक्कास, Nakki vachen
माझी इतक्यात वाचून झालेली पुस्तके.
ब्र
नारायण धारप :
संसर्ग
अघटित
पळती झाडे
काळोखी पूर्णिमा
मानकाचे डोळे
ग्रहण
मैफल
न्यायमंदिर
अघोरी हिरवट
तळघर
कपटी कंधार
मृत्युद्वार
माझे एक पुस्तक किंडलवर आहे >>
माझे एक पुस्तक किंडलवर आहे >> विनिता, झक्कास!
1. एंजल्स ऐन्ड डेमन्स- dan
1. एंजल्स ऐन्ड डेमन्स- dan ब्राऊन
थरारक, सस्पेन्स कादंबरी
2.एदिन-जयवंत दळवी
लघुकथा संग्रह ..ठिक आहे.
3,4. कात,शिवराम- नारायण धारप.
जनरल गोड शेवट असलेल्या कथा..हॉरर नाहीयेत दोन्ही.
5.गाईड- आर के नारायण.
गाईड राजू आणि नर्तकी रोझी ची गोष्ट..देवानंदचा गाईड
सिनेमा यावर बेतलेला आहे.
कंटाळवाणे वाटले पुस्तक मधे मधे, पण संपवले.
6.डोंगरी टु दुबई- हुसैन झैदी.
मुंबईतील गुन्हेगारी विश्वात दाऊदचा उदय, इतर टोळ्या आणि त्यांची कारस्थाने..थराराक आहे.
7.टाटायन- गिरीश कुबेर
जमशेटजी टाटांपासून रतन टाटापर्यंत टाटा समुहातील कंपन्यांच्या जन्मकथा, संघर्ष, सरकारी हस्तक्षेप, सगळं बारकाईने छान लिहिले आहे..आवडले.
○
○
रिसेंट वाचलेली पुस्तके.
1. नागासाकी- Craig collie, अनुवाद- डॉ.जयश्री गोडबोले.
हिरोशिमा,नागासाकी वर झालेले अणुबॉम्ब हल्ले, जापानी नागरिकांची झालेली होरपळ,कल्पना करता येणार नाही असा झालेला विध्वंस, त्यातूनही बाहेर पडण्याची जिद्द.मैनेजमेंटचे निर्णय, रशियाचा attack...बॉम्बस्फोटातून वाचलेल्यांचं पुढे काय झाले?अमेरिकन टिम,त्यांचं प्लानिंग, अणुबॉम्ब टाकण्यापर्यंचा त्यांचा प्रवास.. दोन्ही बाजू पुस्तकात मांडल्या आहेत..
2.मालगुडीचा सन्यासी वाघ- आर के नारायण
एका वाघाचा जीवनप्रवास त्याच्याच द्रुष्टीकोणातून.
जंगलातील वाघाचं निरागस बालपण, रम्य आठवणी.. मग जोशफुल तारूण्य, फैमिलीची ताटातूट.. सर्कशीतलं खडतर ट्रेनिंग मग तेच आरामदायक जीवन..एका सन्याशाबरोबर व्यतीत केलेले दिवस आणि व्रुध्दापकाळ एका प्राणिसंग्रहालयात....
छान आहे पुस्तक.. आवडलं..
वाचलेली पुस्तके:
वाचलेली पुस्तके:
1.झू- निरंजन घाटे
रोचक अनुवादित विज्ञान कथासंग्रह. आवडला.
2.दिवा मालवू नका- नारायण धारप
कथासंग्रह. काही कथा रिपीटेड आहेत.
3.गोष्ट छोटी डोंगराएवढी-अरविंद जगताप
छोट्या छोट्या गोष्टी काही मिश्किल काही अस्वस्थ करणाऱ्या.
4.सीरीया-अतुल कहाते
सीरीयाचा रक्तरंजित इतिहास,समाजशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय राजकारण
5.शेरलॉक होम्सच्या साहस कथा.
'पाखरमाया' - मारुती चितमपल्ली
'पाखरमाया' - मारुती चितमपल्ली.
निव्वळ सुंदर अनुभव आहे हे पुस्तक वाचणे म्हणजे. किती ती शब्द संपदा. मारुती चितमपल्ली यांनी मराठी भाषेला असंख्य मराठी शब्द दिले याबद्दल त्यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे - https://www.lokmat.com/maharashtra/vinda-karandikar-life-care-award-seni.... या पुस्तकातही कितीतरी सुंदर व समृद्ध शब्द येतात. जपानी हायकु, संस्क्रूत श्लोक व मुख्य गाभा म्हणजे पक्ष्यांची घरटी, वीण घालण्याची पद्धत, प्रणयाराधन. किती तरी माहीती आहे.
वाचलेली पुस्तके :-
वाचलेली पुस्तके :-
१. गोल्डा एक शांत वादळ-वीणा गवाणकर
एका सामान्य रशियन ज्यू कुटुंबातील मुलगी कुटुंबासमवेत अमेरिकेला स्थलांतर करते, किशोर वयातच ती ज्यूंसाठी स्वतंत्र भूमी हवी, या विचाराने झपाटली जाते. राष्ट्र उभारणीच्या ध्येयाने प्रेरित होऊन, राजकारणात प्रवेश करते. अल्पावधीतच ती आपल्या कणखर वृत्तीनं फटकळ स्पष्टवक्तेपणानं, साध्या राहणीनं आणि सहज वणीनं आपला स्वतंत्र ठसा उमटवते, इस्रायलच्या स्वातंत्र्याच्या जाहिरनाम्यावर स्वाक्षरी करणारी ती एकमेव स्त्री.वयाची सत्तरी उलटल्यावर ती पंतप्रधान होते.
२. फिडेल कैस्ट्रो-अतुल कहाते
बलाढ्य अशा अमेरिकेच्या वर्चस्वाला क्यूबानं लढत दिली आणि अमेरिकेला नामोहरम केलं. अशा या क्यूबाच्या नेतृत्वाची धुरा कॅस्ट्रोनं जवळपास पाच दशकं सांभाळली.
क्यूबाचा संघर्ष सहा दशकांहून जास्त काळ चालला होता.
या संघर्षाचा कर्ताकरविता होता, झुंजार क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रो! याची खिळवून ठेवणारी कहाणी.
३. अडॉल्फ हिटलर- अतुल कहाते
केवळ डझनभर वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत हिटलरनं अक्षरशः धुमाकूळ घातला. ज्यू लोकांचा संहार, आपल्या शत्रूंशी अतिशय क्रूरपणेपण वागणं, आपल्याच सहकाऱ्यांवर विलक्षण अविश्वास दाखवणं, माणुसकीचा अंशही वागण्याबोलण्यातून न दाखवणं, हुकूमशाही आणि एकाधिकारशाही यांचं थैमान त्याच्या कारकिर्दीत बघायला मिळते.विसाव्या शतकामधला सगळ्यात गाजलेला माणूस म्हणून आपण अॅडॉल्फ हिटलरचं नाव घेऊ शकतो
४. सेक्स स्कॉच एन्ड स्कॉलरशिप- खुशवंत सिंग
सेक्स, स्कॉच अँड स्कॉलरशिप’ या त्यांच्या निवडक लेखसंग्रहात काही सेक्स, थोडी स्कॉच आणि बरंच काही स्कॉलरशिप, अशा विषयांवरील लेख आहेत. त्यांचे निसर्गप्रेम, पंजाब प्रश्नाबाबतची आस्था, जगातील सर्व धर्मांचा अभ्यास आणि त्याचबरोबर स्वत:च्या शीख धर्माचे संशोधन, या विषयांवरील अभ्यासपूर्ण आणि उत्कट विवेचन ही या संग्रहाची वैशिष्ट्ये आहेत.
५.द गन्स ऑफ नेवरॉन- अलीस्टिअर मैक्लीन
नेवरॉनच्या बेटावर १२०० ब्रिटीश सैनिकांना वाचवण्याच्या आणि जर्मन तोफा डिस्ट्रॉय करण्याच्या मिशनवर गेलेल्या, वादळी पावसात, भुकेने व्याकूळ, कडा चढून जाणाऱ्या, ब्रिटिश योद्ध्यांची कहाणी.थरारक, सस्पेन्स, ऐक्शन.
६.रानमेवा- व्यंकटेश माडगूळकर
माडगूळकर यांच्या उत्तम कथा आणि उतारे वेचून बनवलेला कथासंग्रह.. छान आहे.
७. हिज डे- स्वाती चांदोरकर
समाजातील उपेक्षित घटक असणारे तृतीय पंथीय अर्थात हिजडे यांची ही कहाणी. त्यांचेही निरनिराळे प्रकार असतात. यावर हे पुस्तक.
८. नेल्सन मंडेला- अतुल कहाते
वर्णद्वेषाविरुद्ध सुरू असलेल्या या लढ्यात मंडेलाच्या आयुष्यातली सत्तावीस वर्षं तुरुंगात गेली. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आले तरीही मोठ्या जिद्दीनं मंडेलानं लढा चालूच ठेवला आणि दक्षिण आफ्रिकेवर असलेलं गोर्या लोकांचं अन्यायी वर्चस्व संपुष्टात
आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. ही सगळी लढाई
अत्यंत संयमानं लढताना नेल्सन मंडेलानं माणूसपणाची शिकवणच जगासमोर ठेवली आणि या कामातूनच त्याचं नाव इतिहासात अजरामर झालं.
दक्षिण आफ्रिकेचा अन्यायी इतिहास उलगडून दाखवणारी
प्रेरणादायक कहाणी!
९. ट्वेल्व रेड हेरिंग्ज जेफ्री आर्चर
लघुकथा संग्रह.. चांगला आहे.
१०. मी मलाला- मलाला युसुफजाई
मुलींच्या शिक्षणासाठी लढणार्या मलाला आणि तिच्या कुटुंबाची कहाणी..
११. cat o nine tales Jeffry Archer.- लघुकथा संग्रह..प्रत्येक गोष्टीत ट्वीस्ट...चांगला आहे.
१२. कनफेशन विजय खाडिलकर..- सामान्यांच्या जाणिवांना स्पर्शून जाणाऱ्या विविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण १५ कथा.
१३. वन फॉर द रोड व पु काळे..कथासंग्रह..ठिक आहे.
छान लिहिले आहे मृ !
छान लिहिले आहे मृ !
थँक्स अस्मिता !
थँक्स अस्मिता !
वीणा गवाणकरांमुळे अनेक
वीणा गवाणकरांमुळे अनेक व्यक्तींची ओळख झाली.
K.Unlimitedवर बरीच चांगली
K.Unlimitedवर बरीच चांगली पुस्तके दिसताहेत. महिना दोनशे रुपयांत काम होतंय.
त्यांची बरेचदा ऑफर पण असते.
त्यांची बरेचदा ऑफर पण असते..Rs.79 /99 मधे 3 महिने वगैरे.. अमेझॉन प्राईमवाल्यांसाठी पण वेगळ्या ऑफर असतात...
मृणाली किंडल वर असलेली बरीच
मृणाली किंडल वर असलेली बरीच पुस्तके कळतात तुझ्यामुळे. धन्यवाद.
१. थैमान चंगळवादाचे-अच्युत
थँक्स निर्मल.
१. थैमान चंगळवादाचे-अच्युत गोडबोले
चंगळवादाचे स्वरूप आणि परिणामाची जाणीव करून देणारे पुस्तक. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यामुळे जीवन सुखकर बनले, आर्थिक धोरणांमुळे संपत्तीचे विषम वाटप होऊ लागले आणि सुरु झाले चंगळवादाचे थैमान, त्याचाच वेध.
२.एच एम एस युलीसीस-अलीस्टैर मैक्लीन
कहाणी दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील आहे. रशियाचे जर्मनीशी युद्ध सुरू असते, आणि एफआर ७७ या मालवाहू आणि तेलवाहू जहाजांच्या ताफ्यामार्फत रशियाला जर्मनीशी लढण्यासाठी अत्यंत निकड असलेले युद्धसाहित्य पोचवण्याची योजना असते. एचएमएस युलिसिस ही ब्रिटिश आरमारातील एक क्रूझर जातीची युद्धनौका या ताफ्याची फ्लॅगशिप असते. तिच्या साथीला आणखी छत्तीRस जहाजे या ताफ्यात असतात. भयंकर थंडी, बर्फवृष्टी, प्रचंड वादळे, चिडलेले व निराश झालेले नौसैनिक, त्यांची झालेली प्रचंड उपासमार, थकवा, झोपेचा अभाव, आणि ताफ्याने रशियापर्यंत पोचता कामा नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारी जर्मन बॉम्बर विमाने, युद्धनौका आणि यू-बोटी, अशा पार्श्वभूमीवरील या ताफ्याच्या– आणि पर्यायाने युलिसिसच्या– प्रवासाची ही कहाणी आहे.
३.एका सेलिब्रिटी डेन्टिस्टची बत्तिशी- संदेश मयेकर
चंदेरी दुनियेतील सिनेस्टार्सपासून सर्वसामान्यांपर्यंत, दिग्गज उद्योजकांपासून प्रसिद्ध कलावंतांपर्यंत आणि स्टार क्रिकेटर्सपासून रॅम्पवरील मॉडेल्सपर्यंत...
अनेक चेहर्याना सुंदर हास्य व मोहक दंतपंक्ती देणारे सेलिब्रिटी डेन्टिस्ट डॉ. संदेश मयेकर सांगताहेत निरोगी आणि सुंदर दातांचं रहस्य...
४.शांताराम Gregory david Roberts
आपल्या माणसांपासून, मात्रुभुमीपासून जगण्यापासून ऑस्ट्रेलिया च्या तुरूंगातून दुर पळून आलेला एक कैदी..मागावर पोलिस कधीही पकडलं जाण्याची धास्ती.. लपून राहायची धडपड..तो कैदी आला होता काळी, कलकलकाटाची दुनिया मुंबईत.. बघता बघता सारं बदलत जातं आणि एक नवी दुनिया उलगडत जाते...
एक महिना लागला पुस्तक संपवायला..एंगेजींग आहे..
५.डिसेप्शन पॉईंट-डैन ब्राऊन
गोष्ट आहे नासा आणि अमेरिकेन पॉलिटिक्सची.सस्पेन्स थ्रीलर..शेवटपर्यंत खिळवून ठेवणारे पुस्तक.
६.माणदेशी माणसं-व्यंकटेश माडगूळकर
व्यक्ती चित्रण कथासंग्रह.. छान आहे.
७. भुलभुलैय्या - व पु काळे
बाळबोध फैन्टसी कथा संग्रह.. बोअर आहे.
८.द अल्केमिस्ट -पाऊलो कोएल्हो
९. इक्माई-नारायण धारप
१०. नवी माणसं- नारायण धारप
११.अरूणाची गोष्ट - पिंकी विराणी
बाप रे पिंकी विराणी म्हटलं की
बाप रे पिंकी विराणी म्हटलं की धस्सं होतं.
>>>>>व्यक्ती चित्रण कथासंग्रह.. छान आहे.
+१
>>>एंगेजींग आहे..
+१
सध्या विस्मय कथा ( सुनिल
सध्या विस्मय कथा ( सुनिल दांडेकर) वाचतोय.
स्वाती आंबोळेंचा पी. एस्.
स्वाती आंबोळेंचा पी. एस्. वरचा अभ्यास आणि रेकमेंडेशन वाचून पोन्नियीन सेल्वनचे सारे भाग वाचले. पुस्तकं जास्त डिटेल्ड व छान आहेत.
सप्टेंबर २०२३ ते डिसेंबर २०२३
सप्टेंबर २०२३ ते डिसेंबर २०२३ वाचलेली पुस्तके
१. विटाळ (कथासंग्रह) - दया पवार
२. वॉकिंग ऑन द एज - प्रसाद निक्ते.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून सलग ७५ दिवसांची ६५० किमीची लेखकाची भटकंती..भटकंतीत भेटलेली वेगवेगळ्या तर्हेची माणसं,अनुभव छान मांडलेय..छान वाटले वाचायला..
३. फॉल्स इंप्रेशन - जेफ्री आर्चर्
थ्रीलर , सस्पेन्स कादंबरी.
४. नागझिरा-व्यंकटेश माडगूळकर
५.and thereby hangs a tale- Jeffry Archer
कथासंग्रह
६. म्रुत्युपेटित पाच दिवस - विजय देवधर
साहसी, सर्वायल, थ्रीलर कथासंग्रह.
७. द लास्ट गर्ल - नादिया मुराद.
८. मुसाफिर - अच्युत गोडबोले
लेखकाचा रोमांचक जीवनपट..आयायटीचे दिवस..आदिवासी चळवळीसाठीचे एक वर्ष, तुरूंगातील काही दिवसांचा अनुभव, तंत्रज्ञान जगतात एन्ट्री, पर्सनल लाईफमध्ये स्ट्रगल.. एकंदरीत खिळवून ठेवणारे पुस्तक
छान आहे पुस्तक. आवडले.
९.नाझी भस्मासुराचा उदय अस्त. वी जी कानिटकर.
दुसऱ्या महायुद्धाबद्दल सबकुछ.
१०.सिंहाच्या देशात - व्यंकटेश माडगूळकर
बर्नार्ड आणि मायकल ग्रझिमिक यांनी लिहिलेल्या 'serengeti shall not die' या ग्रंथाचा संक्षिप्त अनुवाद.
छान पुस्तक.
११.गोष्टीच गोष्टी - द मा मिरासदार
सध्या क्रुष्णकन्या (भयकथा संग्रह)- रत्नाकर मतकरी
वाचतेय.
केवढं वाचत असतेस तू!!
केवढं वाचत असतेस तू!!
किंडल अनलिमिटेड वरची काही
किंडल अनलिमिटेड वरची काही वाचनीय पुस्तकं :-
**मराठी :
माया, झोका, कादंबरी, पुठ्ठा, श्वास, धांडोळा, जंजाळ, स्वप्नवृत्त -- विक्रम त्र्यंबक भागवत
नर्मदे हर हर - जगन्नाथ कुंटे
शेतकऱ्याचा आसूड- जोतिराव फुले
स्मृतिचित्रे- लक्ष्मीबाई टिळक
शीतयुद्ध सदानंद - श्याम मनोहर
रक्तमुद्रा - जी ए कुलकर्णी
**अनुवादित :
अर्थाच्या शोधात - डॉ. व्हिक्टर फ्रॅंकल
शांताराम - ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स
झुंडीचे मानसशास्त्र - विश्वास पाटील
अवनी एक नवी- एकहार्ट टॉल
चीपर बाय डझन - फॅंक गिलब्रेथ,अर्नेस्टाईन गिलब्रेथ कॅरे
निर्वाण उपनिषद - रजनीश
दोन शहरांची गोष्ट - चार्ल्स डिकन्स
आत्मरंगी - रस्किन बॉंड
पाच शहरे- अहमत हमीद तानपिनार
काळी मांजर - एडगर ॲलन पो
मानवजातीची कथा- हेन्री थॉमस
पिसुक-- फ्रांझ काफ्का
डॉक्टर झिवागो - बोरिस पास्तरनाक
नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि ग कानिटकर
द कॉल ऑफ वाईल्ड - जॅक लंडन
पाश्चात्य तत्वज्ञानाची कहाणी - विल ड्युरांट
द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज - अरुंधती रॉय
कॅमिली (निशिगंधा)- ॲलेक्झांडर द्युमास
मून ॲंड सिक्स पेन्स - सॉमरसेट मॉम
**हिंदी
कसप - मनोहर श्याम जोशी
धन यात्रा, खोया पानी- मुश्ताक अहमद युसुफी
नरकयात्रा, बारामासी, नेपथ्य लीला, पागलखाना- डॉ. ज्ञान चतुर्वेदी
हम इक उम्र से वाकिफ है- हरिशंकर परसाई
विकलांग श्रद्धा के दौर - हरिशंकर परसाई
ठिठुरता हुआ गणतंत्र - हरिशंकर परसाई
एक बटा दो- सुजाता
ठीक तुम्हारे पीछे - मानव कौल
नाकोहस- पुरुषोत्तम अग्रवाल
रेहन पर रग्घू - काशीनाथ सिंह
वैधानिक गल्प - चन्दन पांडेय
शेखर: एक जीवनी - अज्ञेय
नदी के द्वीप - अज्ञेय
नये शेखर की जीवनी - अविनाश मिश्रा
हिंदी पुस्तकांची आवड लागलेली
हिंदी पुस्तकांची आवड लागलेली आहे अर्थात आतापावेतो अडीच एकच पुस्तके वाचलेली आहेत. आता यातील काही घेउन पाहीन. हिंदी पुस्तकांवरती एखादा धागा काढुन त्यातील आवडलेल्या पुस्तकांची समीक्षा करावी.
हिंदी पुस्तकातलं हिंदी फारच
हिंदी पुस्तकातलं हिंदी फारच जड वाटतं. तसंच नवभारत टाइम्समधलं हिंदी सुद्धा. इंदौरकडचं बोली हिंदी बरं वाटतं. यामुळे हिंदी पुस्तकांकडे कधी वळलो नाही. प्रेमचंद,गुलशन नंदा हे वाचले आहेत. ते सोपे आहेत.
हिंदी पुस्तकातलं हिंदी फारच
हिंदी पुस्तकातलं हिंदी फारच जड वाटतं.>>
मलाही आधी तसं वाटायचं. पण दोन-तीन चांगल्या हिंदी कादंबऱ्या वाचून काढल्यावर मेंदूच्या नसा त्या भाषेशी ॲडजस्ट झाल्या, नजर रूळली आणि मग सगळं स्मूथ जायला लागलं. आता तर चटकच लागलीय. एवढी की सलग काही हिंदी कथा कादंबऱ्या संपवून एखादं मराठी पुस्तक हातात घेतल्यावर अडखळायला होतं. गंमत वाटते.
अलीकडे ह्या मताला आलोय की हिंदीमध्ये आपल्यापेक्षा खूप जास्त चांगलं आणि खूप जास्त वैविध्यपूर्ण लिहिलं गेलंय.
उदाहरणादाखल अज्ञेय हे एकच लेखक आणि त्यांची 'शेखर: एक जीवनी' नावाची १९४० मध्ये आलेली दीर्घ मनोविश्लषणात्मक (आणि इंटरेस्टिंग..!)कादंबरी वाचायला घेतली तर अवाक व्हायला होतं. . हे म्हणजे एखाद्या ऋषीनं लिहायला बसावं आणि मानवी जीवनाचा विराट आवाका कागदावर उतरवावा, असलं काहीतरी आहे.
त्यांचीच 'नदी के द्वीप' म्हणून आणखी एक कादंबरी आहे. रजनीशांनी या कादंबरीबद्दल म्हटलंय की 'टॉलस्टॉय आणि चेकॉव्हपेक्षा सरस. या लेव्हलवरून, एवढ्या उत्तुंग हाईटवरून बोलणं सोपं नाही' आणि ते खरंच आहे म्हणजे.
तर हा एक सलगच्या सलग सगळा वाचून संपवण्यासारखा लेखक. आणि असे आणखीही काही सापडतात. (प्रेमचंद, निराला, भीष्म साहनी, कमलेश्वर, अमृतलाल नागर हे काही जुने दिग्गज आहेत, पण माझ्याच्याने वाचवले नाहीत. नॉट माय टाईप. असो.)
वॉकिंग ऑन द एज - प्रसाद
वॉकिंग ऑन द एज - प्रसाद निक्ते >>>
वा! या पुस्तकाचा उल्लेख अनपेक्षित होता. अलीकडचं पुस्तक आहे. फार छान लिहिलंय त्यांनी.
समकालीन प्रकाशन.
पुस्तकाच्या संपादनात माझा सक्रीय सहभाग होता.
आता हिंदीतले दोन तीन प्रकार
आता हिंदीतले दोन तीन प्रकार वाचून बघतो.
मनोविश्लषणात्मक -नॉट माय टाईप. म्हणजे स्पष्ट मनोविश्लषण नसून घटना आणि पात्रांचे वागणे यातून उलगडणारे आवडते. उदाहरणार्थ जिएंच्या कथा.
नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि
नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि ग कानिटकर>> हे अनुवादीत नाही. ह्याला The Rise and Fall of the Third Reich: A History of Nazi Germany चा अनुवाद म्हणता येणार नाही. त्यावरुन प्रेरित म्हणता येईल.
Pages