Kindle Unlimited वर वाचलेले पुस्तक कसे वाटले ?

Submitted by mrunali.samad on 30 December, 2021 - 07:05

मी एक महिन्यापासून किंडल अनलिमिटेड सबस्क्रीप्शन घेतले आहे. वीसेक पुस्तके वाचून झाली आहेत.
मी लेखक आणि रेटिंग्ज बघून पुस्तक वाचायचे कि नाही ठरवतेय.
प्रतिसादात वाचलेली पुस्तके आणि थोडक्यात पुस्तकांबद्दल लिहिन.
तुम्ही हि किंडल वर पुस्तके वाचत असाल तर कोणती वाचली आणि कशी वाटली. ह्या प्रतिक्रियांसाठी हा धागा.
इतर हि वाचकांना ह्याचा फायदा व्हावा हा उद्देश!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुढचे चार दिवस प्राइम मेम्बर्ससाठी किंडल अनलिमिटेड - ३ महिने - ९९ रुपये असं रिपब्लिक डे डील आहे.

इच्छुकांनी लाभ घ्या.

दिवस आलापल्लीचे-निलिमा क्षत्रिय
लेखिकेच्या वडिलांची गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथे बदली झाल्यावरची चार वर्षे, वय 8 -११ वर्षाच्या मुलीचे अनुभव, शाळा, मैत्रिणी, खेळ,गमतीजमती, आदिवासी लोकांच्या प्रथा,राहणीमान, समज-गैरसमज यांचे चित्रण.
ओघवती,साधी सरळ भाषा आहे. आवडले.

The sins of the father (द क्लिफटन क्रॉनिकल खंड-२)
वाचले.
बेस्ट केप्ट सिक्रेट (खंड-3 ) सुरू केले.

नुकतंच किंडल गिफ्ट मिळालं आहे आणि हा धागा पण आला. सगळ्यांच्या लिस्ट चा उपयोग होईल.

धन्यवाद ललिता प्रीति, इथे वाचून ऑफर बद्दल कळालं, तीन महिन्यांचं सबस्क्रिप्शन घेतलं आहे.

इथे वाचून ऑफरबद्दल कळालं, तीन महिन्यांचं सबस्क्रिप्शन घेतलं आहे. >>> :थम्ब्जपः 'मी वाचलेले पुस्तक' हा धागाही बघा.

मी पण ते सबस्क्रिप्शन घेतलंय. विशलिस्टीतली काही मराठी पुस्तकं डालो केली आहेत. किंडलवर मुख्यत्वे इंग्रजी पुस्तकं वाचते. (त्यासाठीच घेतलं होतं) पण अधूनमधून मराठी पुस्तकांची आठवण येतेच.

मला दिसतच नाहीये ही ऑफर.
Kindle unlimited republic day offer असे सर्च केले तर पुस्तकांच्या ऑफर्स दिसतात सबस्क्रिप्शनची नाही दिसत.

ती ऑफर चारच दिवसांसाठी होती.

या ९९ रु.च्या ऑफर्स अधूनमधून येतच असतात. शक्य असल्यास किंडलचं अ‍ॅप डालो करून ठेवा. म्हणजे तिथे लगेच त्याची नोटिफिकेशन्स येतात.

मी १० जाने. किंडल सबस्क्रिप्शन घ्यायला गेलो, त्यात पहिला महिना फ्री ऑफर होती ती घेतली तेव्हा.
ती कॅन्सल करून ही घ्यायची असा विचार होता.
पण ती ऑफर घेतली असल्याने मला नव्या ऑफरचे नोटिफिकेशन आले नसावे, त्याला मी पात्र नसेन.

धन्यवाद ललिता-प्रीती! इथे वाचून डील घेतले आहे. तुझी किंडल अनलिमिटेड वरची इंग्रजी पुस्तकांची यादी शेअर करशील का?
निरंजन घाटे यांचे हटके भटके पुस्तक वाचत आहे. त्यातल्या लेखात उल्लेख केलेली मूळ पुस्तकं वाचली पाहिजेत असं वाटतंय.

तुझी किंडल अनलिमिटेड वरची इंग्रजी पुस्तकांची यादी शेअर करशील का? >>>

किं.अ.वरचं एकही इंग्रजी पुस्तक मी अजून वाचलेलं नाही. (कारण मी पहिल्यांदाच किं.अ.ला सब्स्क्राइब केलं आहे.)

निरंजन घाटे यांचे हटके भटके पुस्तक वाचत आहे. त्यातल्या लेखात उल्लेख केलेली मूळ पुस्तकं वाचली पाहिजेत असं वाटतंय. >>>
अगदी!
ते लेख आधी वर्षभर अनुभव अंकात येत होते. तेव्हा त्यांचं एडिटिंग करताना हेच वाटायचं. कित्येकदा ते काम बाजूला ठेवून मी त्या पुस्तकांबद्दल आणि लेखकांबद्दल नेटवर माहिती शोधून वाचत बसायचे.
अनुभव अंकातल्या लेखांशिवाय पुस्तकासाठी त्यांनी ३ जास्तीचे लेख लिहिले आहेत.

<<त्यातल्या लेखात उल्लेख केलेली मूळ पुस्तकं वाचली पाहिजेत असं वाटतं>> चांगली आठवण करून दिलीत. काही वर्षांपूर्वी निरंजन घाटेंची काही पुस्तकं वाचली तेव्हा मी हाच विचार केला होता आणि मूळ पुस्तकांची नोंद करून ठेवली होती, पण मागवली नव्हती.
किंडलवर वाचता येतील.

ललिता प्रीती, या वेळी वाचताना कोणती चांगली पुस्तके सापडली तर नक्की सांग! हटके भटके च्या लेखांचे संपादन करताना मजा आली असणार!
आशुचँप, तुमची आधीच्या पानावरची यादी मस्तच आहे! हटके भटके त्यातूनच सापडले. शेरलॉक, ज्युल्स व्हर्न वाचले आहेत.
मी रहस्य, हॉरर या विषयांवरची पुस्तकं फार वाचत नाही. एखादी उत्तम कादंबरी, कथासंग्रह किंवा चांगली non fiction पुस्तके (चरित्र, अनुभव, वैचारिक) आवडतात. त्यात self help आवडत नाहीत. पण तुम्ही सगळी लिस्ट द्या म्हणजे इतरांना पण उपयोग होईल.

Jack London चे
Call Of The Wild
White Fang
ही पुस्तके आवडतील कदाचित तुम्हाला

विश्वस्त महा बोर आहे
लेखकाचे खूप कौतुक ऐकून विकत घेऊन वाचायचा प्रयत्न केला
नुसती खाण्यापिण्याची वर्णने यानेच पानेच पाने भरली आहेत
तरी चिकाटी ठेऊन दीडशे पाने वाचली आणि मग ठेऊन दिली

अर्र! हो का Uhoh मी लॉक ग्रिफिन सुद्धा डा.लो. केलंय. काढून टाकते ही दोन्हीही पुस्तकं.
'संवादु अनुवादु' आणि 'गोल्डा - एक अशांत वादळ' ही दोन्ही वाचते.

Em And The Big Hoom (लेखक - जेरी पिंटो) - हे पुस्तक किंडल अनलिमिटेडवर आलं आहे. आवर्जून वाचण्याजोगं आहे.
मी गेल्या वर्षी मिवापु धाग्यावर त्याबद्दल लिहिलं आहे.

Em And The Big Hoom (लेखक - जेरी पिंटो) - हे पुस्तक किंडल अनलिमिटेडवर आलं आहे. आवर्जून वाचण्याजोगं आहे.>>>>>>> धन्यवाद, किंडलवर या पुस्तकाचे प्रतिसाद पण छान आहेत. लिस्टमधे घेतले.

इतक्यात वाचलेली पुस्तके.
१.भुकेली रात्र-नारायण धारप
२.मगरडोह-शशिकांत काळे
३.डॉलर बहू-सुधा मुर्ती

मी Harry Potter ची पहिली चार पुस्तके वाचून त्यात गॅप दिलाय.
मग एक 50 Short stories पुस्तक वाचले.
मग Joerney to the center of the earth.
तीन दिवसांपूर्वी कशावरून तरी आठवण निघाली आणि परत एकदा Count of Monte Christo वाचायला घेतले.

मागील काही दिवसांत वाचलेली पुस्तके.
● आफ्रिकेतील थरार रात्री थरार दिवस- विजय देवधर
- धाडसी, सर्वायवल कथांचा संग्रह. छान आहे.
● कबंध- रत्नाकर मतकरी
-खरंतर गुढकथासंग्रह पण पहिलीच कथा मला विनोदी वाटली. Lol
●अंधारवारी-ह्रषिकेश गुप्ते
-अनप्रेडिक्टेब्ल गुढ/भुत/थ्रीलर कथा
●बेस्ट केप्ट सिक्रेट-जेफ्री आर्चर

कुतुहलापोटी-अनिल अवचट
वाचतेय सध्या. सोप्या भाषेत माहितीपूर्ण वाटतेय.इंटरेस्टिंग आहे.

•उत्तराकांड
•नॉट अ पेन्नी लेस नॉट अ पेन्नी मोअर
•म्रुत्यु पाहिलेली माणसं
•बनारस टॉकीज
वाचलेय इतक्यात किंडल अनलिमिटेड वर

सध्या लिटल वीमेन चा मराठी अनुवाद' चौघीजणी-शांता शेळके' वाचतेय.

Pages