Submitted by mrunali.samad on 30 December, 2021 - 07:05
मी एक महिन्यापासून किंडल अनलिमिटेड सबस्क्रीप्शन घेतले आहे. वीसेक पुस्तके वाचून झाली आहेत.
मी लेखक आणि रेटिंग्ज बघून पुस्तक वाचायचे कि नाही ठरवतेय.
प्रतिसादात वाचलेली पुस्तके आणि थोडक्यात पुस्तकांबद्दल लिहिन.
तुम्ही हि किंडल वर पुस्तके वाचत असाल तर कोणती वाचली आणि कशी वाटली. ह्या प्रतिक्रियांसाठी हा धागा.
इतर हि वाचकांना ह्याचा फायदा व्हावा हा उद्देश!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चौघीजणी वाचतेय किंडल
चौघीजणी वाचतेय किंडल अनलिमिटेड वर त्यातही खूप टायपो आहेत आणि काही तर पानंच्या पानं रिपीट आहेत.
अरेरे! किंडल आवृत्ती लोकसत्ता
अरेरे! किंडल आवृत्ती लोकसत्ता किंवा मटावाले बनवतात की काय कुणास ठाऊक! #लष्करच्याभाकर्याधागा
'चौघीजणी' पुर्ण वाचून झाले.
'चौघीजणी' पुर्ण वाचून झाले.
सुंदर पुस्तक, शांता शेळकेंनी अनुवाद पण इतका सुरेख केलाय कि वाटतच नाही अनुवाद आहे..क्लास स्टोरी.
वाचताना एक वेगळाच अनुभव, मार्च कुटुंबातील जणू आपण एक सदस्य बनून जातो.
काल पुस्तक वाचून संपल्यावर थोडं वाईट वाटलं आता ह्या मार्च बहिणी रोज भेटणार नाहीत म्हणून..
'कुतुहलापोटी' पूर्ण झाले- खेळकर भाषेत महत्त्व पूर्ण माहिती.. आवडले.
आता कोणतं वाचायला घेऊ??संपेपर्यंत ठेवावेसे वाटणार नाही असे??
'मास्तरांची सावली' (कृष्णाबाई
'मास्तरांची सावली' (कृष्णाबाई नारायण सुर्वे)
प्रांजळ, प्रामाणिक आत्मकथन. साधीसुधी, गप्पा मारल्यासारखी भाषा.
सुर्वे दांपत्याचं बालपण, तरुणपणीचा काळ केवढा ओढगस्तीचा होता! मधला काही काळ तर अक्षरशः अन्नान्न दशा होती. ते वाचताना अंगावर काटा येतो.
नारायण सुर्वे शाळाशिक्षक होते, तर कृष्णाबाई एका शाळेत शिपाई होत्या. त्यांना चार मुलं झाली. प्रत्येकाची काही ना काही शोकांतिका झाली. अशातही आनंदी, खेळकर स्वभाव टिकवून ठेवणे, काव्यलेखन, आलागेला-पै पाहुणा, सगळं करणे, याची कमाल वाटते.
त्याकाळची मुंबई पुस्तकात ठिकठिकाणी येते. ती चित्रं मनात उभी करायला मजा आली.
कृष्णाबाईंनी पूर्णपणे स्वत:च्या नजरेतून, स्वत:च्या आयुष्याबद्दल लिहिलंय. नारायण सुर्वेंच्या कवि म्हणून कारकीर्दीतल्या महत्वाच्या गोष्टींबद्दल पुस्तकात केवळ उल्लेख येतात, ते मला आवडलं.
लहानपणापासून कृष्णाबाईंचा स्वभाव विचारी, खमका होता. त्यांच्याजवळ भक्कम आत्मविश्वास होता. मात्र लग्नानंतर त्या नोकरी करत असल्या तरी इतर घराबाहेरची कामं, पैशांचे व्यवहार त्यांनी कधीच केले नाहीत; सुर्व्यांच्या कोणत्याही सत्काराला, सार्वजनिक कार्यक्रमाला त्या गेल्या नाहीत; हे वाचून आश्चर्य वाटलं.
नवनव्या आवृत्यांच्या वेळी मजकुरात भर घातली गेली आहे. एका टप्प्यापर्यंत ते अपडेट्स चांगले वाटतात. मात्र शेवटी शेवटी गृहकलहाशिवाय काहीच उरत नाही. पण अर्थात हे आत्मकथन असल्याने त्यांचा दृष्टीकोन आणि प्रस्तावनेत नोंदवलेला पुस्तकाचा उद्देश (मनातलं सगळं बोलून टाकायचं आहे) पाहता ते साहजिक म्हणावं लागेल.
मास्तरांची सावली' (कृष्णाबाई
मास्तरांची सावली' (कृष्णाबाई नारायण सुर्वे)>>>>>>> पुस्तक ओळख छान.. कुठे वाचले?
अँन फ्रँक- द डायरी ऑफ क यंग गर्ल
वाचून झाले, सुन्न करणारे पुस्तक.. हेट किती विध्वंसक असते.
छान आढावा.चिनूक्सनी
छान आढावा.चिनूक्सनी मास्तरांची सावली मधला एक उतारा मायबोलीवर दिला होता.
पुस्तक परिचयाबदद्ल धन्यवाद..
पुस्तक परिचयाबदद्ल धन्यवाद.. आत्मचरित्रं फारशी वाचवत नाहीत, पण नारायण सुर्वेंवरच्या प्रेमापोटी हे आता बघेन..
# 'तुमचंच नाव लिवा, मास्तर' _/ \_
आत्मचरित्रं फारशी वाचवत नाहीत
आत्मचरित्रं फारशी वाचवत नाहीत, पण नारायण सुर्वेंवरच्या ....... जरूर वाचा हे पुस्तक.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/19084
मास्तरांची सावली
मराठी पुस्तक वाचलेली असतील
मराठी पुस्तक वाचलेली असतील त्याची लिंक टाकणार का ? बरीच पुस्तक मला नाही मिळाली शोधल्यावर. इकडच्या अॅमेझॉन वर नाहीत बहुदा.
द पैलेस ऑफ इल्युजन- पांचालीचे
द पैलेस ऑफ इल्युजन- पांचालीचे महाभारत. वाचले.
घनगर्द-ह्रषिकेश गुप्ते
गुढ भयकथा, विस्मयकथा.इंटरेस्टींग आहे.
घनगर्द-ह्रषिकेश गुप्ते
घनगर्द-ह्रषिकेश गुप्ते
गुढ भयकथा, विस्मयकथा.इंटरेस्टींग आहे.
>>नाईस... हे ट्राय करतो...
हाच माझा मार्ग (सचिन पिळगावकर
हाच माझा मार्ग (सचिन पिळगावकर) -
किं.अ.मध्ये फुकटात मिळत होतं म्हणून वाचलं, नाहीतर मला या पुस्तकाकडून फार काही आशा नव्हत्या. आणि तेच बरोबर निघालं. शाळकरी निबंधातल्या आठवणी लिहिल्यासारखी एक-एक प्रकरणं आहेत. सगळीकडे स्वत:ची टिमकी वाजवली आहे. खरं सचिनची केवढी प्रदीर्घ कारकीर्द आहे, हरहुन्नरी माणूस आहे तो. त्यावर एक उत्तम पुस्तक झालं असतं.
पण वाया घालवलंय.
-----------------
खेकडा (कथासंग्रह, रत्नाकर मतकरी)
मी मतकरींच्या नाटकांची फॅन आहे. पहिल्यांदाच त्यांचा कथासंग्रह वाचला. जुन्या कथा आहेत, पण जुनाट वाटत नाहीत अजिबात. मला पुस्तक आवडलं.
वासांसी नुतनानी-नारायण धारप
वासांसी नुतनानी-नारायण धारप
वाचले..रोचक आहे..भुतकथा नाही.
● देवाज्ञा, बहुरूपी - नारायण
● देवाज्ञा, बहुरूपी - नारायण धारप वाचले.
● ए थाऊजंड स्प्लेंडीड सन्स-खलिद हुसैनी वाचले.
मराठी अनुवाद इतका खास नाही केला, सुरूवातीला
अनुवाद खटकत होता पण कथेची लिंक लागल्यावर नाही लक्षात आलं..
अफगाणिस्तान कम्युनिस्ट कारवाया,सोव्हिएत
आक्रमणं,तालिबानी एन्ट्री आणि दोन स्त्रियांची कहाणी..
● खिडक्या अर्ध्या उघड्या-गणेश मतकरी.. ठिकठाक आहे..
कथारूपात कादंबरी टाईप.
गेल्या काही दिवसांत वाचलेली
गेल्या काही दिवसांत वाचलेली पुस्तके.
●अर्थाच्या शोधात- लेखक डॉ. व्हिक्टर Frankel.अनुवाद डॉ.विजया बापट.डॉ. व्हिक्टर Frankel प्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट व सायकिएट्रिस्ट होते. दुसऱ्या महायुद्धात वेळी तीन वर्षे छळछावणीत असताना आलेले त्यांचे व इतरांचे अनुभव.. पत्नी, आईवडील, भाऊ छळछावणीत गमावले,सुटका झाल्यावर इतरांना त्यांच्या आयुष्यातील अर्थ शोधण्यास मदत करण्यात उर्वरित आयुष्य व्यतीत केले.सकारात्मक पुस्तक.. आवडले.
●रंगांधळा- रत्नाकर मतकरी.
●ऐसी रत्ने मेळवीन-नारायण धारप-चांगले आहे.
●निवडक कन्नड कथा-अनुवाद उमा कुलकर्णी.. पहिली कथा तर मला कळलीच नाही.. काही ठिक काही चांगल्या आहेत.
●पाचूचे बेट- अनुवाद भानु शिरधनकर..खुप थ्रीलींग नाहीये. पण ठिक आहे.
●माफिया क्वीन्स ऑफ मुंबई- चांगले आहे.गंगुबाई ची स्टोरी आहे यात..आधी सिनेमा पाहिला होता मग पुस्तक वाचले.. सेमच वाटले.
चांगली माहिती देताय
चांगली माहिती देताय
"एक होता कार्व्हर" हे वीणा
""
अनिल अवचटांची सर्व पुस्तके
अनिल अवचटांची सर्व पुस्तके किंडलवर उपलब्ध आहेत का कुणी सांगू शकेल का?
सगळी माहिती नाहीत.
सगळी माहिती नाहीत.
सर्च केले तर हि चार दिसताहेत.
ओके, धन्यवाद मृणाली!
ओके, धन्यवाद मृणाली!
बराच व्यासंग आहे की. अनील
बराच व्यासंग आहे की. अनील अवचट वाचेन. खरं तर गेम व ऑडिओ बुक्स मध्ये बिचारे किंडल तसेच पडून राहते.
एखादे धारपांचे असले हाताशी की बरे वा टते.
ऑडिओ बुक्स त्यामानाने महा ग पडतात मी ड्युन चे एक घेतले. त्यातच सर्व बजेट खलास झाले.
गेम मध्ये पण काही किडुक मिडु क खरेदी अचानक करावी लागते. प्रसंगाची गरज. मग किंडल बुक वर पैसे खर्च करायला अवघड वाट्ते.
तुम्ही चांगली माहिती देत आहात. माझ्या तर्फे खण व नारळ. ( महिना अखेर आहे. )
एखादे धारपांचे असले हाताशी की
एखादे धारपांचे असले हाताशी की बरे वा टते.>>>>>>मलापण
धन्यवाद अमा
धन्यवाद कुमार सर
मस्तच लिहितेयस मृ
मस्तच लिहितेयस मृ
थँक्स अस्मिता.
थँक्स अस्मिता.
वाचलेली पुस्तके
वाचलेली पुस्तके
●ते सात दिवस-सु.वि.पारखी
मेडिकल माफिया पार्श्वभूमी, गुढ,क्राईम स्टोरी.
●द mad तिबेटियन-दिप्ती नवल
काही फिल गुड काही अस्वस्थ करणार्या कथा आणि किस्से.
●अ प्रिझनर ऑफ बर्थ-जेफ्री आर्चर.
●थैलीतला खामरा-नारायण धारप
●वीरप्पन-सुनाद रघुराम
सध्या मी सुनील वाईकर यांची
सध्या मी सुनील वाईकर यांची पुस्तके किंडल अनलिमिटेड वर वाचते आहे, छान आहेत sci-fi, रहस्य आवडत असेल तर नक्की वाचा फ्री आहेत किंडल अनलिमिटेड वर -
रहस्य सांकेतिक चिन्हांचे, मध्यरात्रीचे धुके वाचून झाले आता कालचक्र वाचते आहे
मी वाचलेली बाकी किंडल अनलिमिटेड पुस्तके् -
शेरलॉक होम्स:
साईन ऑफ फोर
Sampurna Sherlock Holme
Sherlock Holmes chya Chaturya Katha
Sherlock Holmes : The Hound of The Baskerville
Sherlock Holmes : A Study in Scarlet
Sherlock Holmes: The Valley of Fear
Sherlock Holmes che Punaragaman
------
DAN BROWN:
द दा विंची कोड
एन्जल्स अॅण्ड डेमन्स
द लॉस्ट सिम्बॉल
डिसेप्शन पॉर्इंट
INFERNO
-----
नारायण धारप:
थैलीतला खामरा
४४० चंदनवाडी
चेटकीण
चंद्राची सावली
देवाज्ञा
काळी जोगीण
कुलवृत्तांत
लुचाई
नवे दैवत
रावतेंचा पछाडलेला वाडा
स्वाहा
संक्रमण
शपथ
शोध
वेडा विश्वनाथ
द्वैत
नेनचिम
फ्रॅंकेन्स्टाईन
वासांसि नूतनानी
विश्वसम्राट
शिवराम
बहुरूपी
चक्रावळ
कृष्णचंद्र
अंधारातील उर्वशी
काळ्या कपारी
इक्माई
भुकेली रात्र
ग्रास
---
जेफ्री आर्चर:
प्रिझनर ऑफ बर्थ
ओन्ली टाइम विल टेल - क्लिफ्टनं क्रोनिकल्स १
द सिन्स ऑफ द फादर - क्लिफ्टनं क्रोनिकल्स 2
बेस्ट केप्ट सिक्रेट - क्लिफ्टनं क्रोनिकल्स 3
बी केअरफुल व्हॉट यू विश फॉर - क्लिफ्टनं क्रोनिकल्स-४
---
Dhruva Bhatt:
Tatvamasi
Akoopar
Sagartiri
---
हॉटेल रोडसाईड
अंधारवारी
डेड एन्ड
धुरंधर : रहस्यभेद
काजळी वन: भय गूढ कथा
चांगली लिस्ट दिव्या१७.
चांगली लिस्ट दिव्या१७.
माझी इतक्यात वाचून झालेली पुस्तके.
● माय नेम इज परवाना-deborah ellis अनुवाद-अपर्णा वेलणकर..अफगाणिस्तानात मुलीच्या/स्त्रीयांच्या
शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या आई आणि मुलींची गोष्ट.
● जळातील मासा - जयवंत दळवी.कथासंग्रह.
● कात- नारायण धारप. हॉरर नाहीए.
● बी केयरफुल व्हॉट यु वीश फॉर.क्लिफ्टनं क्रोनिकल्स-४
● मध्यरात्रीचे पडघम- रत्नाकर मतकरी
जबरी लिस्ट दिव्या... कॉपी
जबरी लिस्ट दिव्या... कॉपी पेस्ट करून ठेवली...
दिव्या: काजळी वनचे लेखक कोण
दिव्या: काजळी वनचे लेखक कोण आहेत?
Pages