मराठी बिग बॉस पर्व तिसरे- २

Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.

सो, हा आहे दुसरा धागा.

चला, चर्चा करुया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्नेहाला वाटतय की आता आपल्याला ऑस्कर अ‍ॅवॉर्ड मिळणार आहे ह्या परफॉर्मन्समुळे. जय खरच दुखावला गेला आहे का?

तृप्ती ताई अजूनही टिम ए बरोबरच आहेत. मला वाटल होत की आता उत्कर्षला शिव्या पडताहेत की काय पण कसल काय. लुझरची माळ घातली सोनालीच्या गळयात.

पहिल्या सिझनसारख... उशा शिवणे, डिक्टेटर टास्क, बिबॉचे घर एक लॅव्हिश हॉटेल आहे असे मानुन आलेल्या गेस्टचे आदरातिथ्य करणे असे कमीत कमी राडा होईल, असे टास्क नाहित का यावेळी? >>>>>> उशा शिवण्याच्या जागी चपला शिवणे आणि बॉक्सचा टास्क होता. डिक्टेटर टास्क ह्या आठवडयात होईल 'लिलिपुट टास्क' ह्या नावाने. यु टयुबवर बघितल, एव्हिक्टेड झालेले स्पर्धक हुकूमशहा झाले आहेत आणि बाकीचे स्पर्धक लिलिपूट.
बादवे, ह्यावेळी खुन करण्याचा टास्क नाही झाला. विकास किव्वा उत्कर्ष खून करताना बघताना आवडल असत.

आदिशचा स्प़ष्टवक्तेपणा अजूनही बदललेला नाहीये. मीराला लूझर टॅग दिला. हा हा हा

आदिश विशाल आणि सोनालीमध्ये पॅचअप करु पाहतोय.

अजुन एक गोश्ट म्हणजे बरेच व्युहरच मत मीनल मराठी नाही या गैरसमजामुळे मीळत नाहिये , काही लोक तिच्या अगेस्ट पण आहेत.
<<<
प्लेयर म्हणून जज करण्याइतके ऑडियन्स मॅच्युअर्ड नसावेत, लास्टनेम पाहून कशाला जज करतायेत ?
तसेही टेक्निकली ती मराठी वातावरणातच वाढली आहे, तिची आई मराठी आहे, आईवडिल मीनल लहान असतानाच सेपरेट झालेत !
१००% शुद्ध नसेल पण व्यवस्थित आणि एकदम बिंधास्त बोलते मीनल मराठी , मीरा -उत्क्या पेक्षा खूप चांगलं , सोनालीच्या ‘जब कि‘ सारखे भेसळ नाही बोलत !

विकास MU MU करत होता, पण ती येडी सोनाली miss u, miss u होतं म्हणे.( गोल गोल फिरवत होती ममां ना).
सोनालीच्या ‘जब कि‘ सारखे भेसळ >>> हिंदी लिटरेचर मध्ये M.A. केलयं तिने. 11th ,12th,1st yr ला शिकवायची. बोलता येत नाही पण शिकवू शकते म्हणाली. (Extra masala मधे पाहिलं)

हो ती कॉलेजमध्ये शिकवायची. वाटत नाही मलाही पण खरं आहे, वैजू नंबर वन सिरियल आली तेव्हा वाचलेले. त्यामुळे मला हे आधीच माहिती होतं.

उत्कर्ष आणि मीरा चांगलेच हललेत. मीरा एव्हिक्ट होणार हे कळलं तेव्हा तिला एकटीलाच रडू आलं. जाणारे लोक बहुधा रडत नाहीत. इथे इतर कोणी रडायचं नाव घेत नव्हतं आणि हिला रडू आवरत नव्हतं. त्यात स्नेहाचा हल्ला.

उत्कर्ष आणि मीराचा सल्ला धुडकावून काल जय आधी प्रेमभंग झालेल्या आणि मग रुसलेल्या प्रेयसीला मनवणार्‍या आशिकासारखा वागला.
बेडरूममध्ये बसला असताना स्नेहा आली तेव्हा तिच्यावर नेहमीचे सगळे चार्म्स वापरायचा प्रयत्न करत होता.

स्नेहाने घरात शिरल्यावर काय केलंय ते आदिशला दिसलं होतं का? तो तिच्या नादी लागला नाही.

प्रोमोजमध्ये दाखवला तेवढा स्नेहाचा पर्फॉर्मन्स ओव्हरड्रामाटिक वाटला नाही.

विकास जिंकणार नसला तरी सर्वात जास्त सेंसिबल वाटला.
चावडी मध्ये त्याने एकट्याने आदिश असायला हवा म्हंटले. बाकी सगळे त्या मख्ख अक्षयचे नाव घेत होते.
आज जयशी बोलताना पण तुम्ही दोघांनी एकमेकांचा फायदा घेतला असे जे त्याने निर्विकारपणे म्हंटले, तेव्हा त्याला पाठीवर शाबासकी द्यावीशी वाटत होती.
फेसबुकवर मीनल सेकंड आहे सगळीकडे. मला तरी ती जिंकली तर जास्त आवडेल.
गायत्री हि एकटी आहे जी गेम बदलून खेळायला लागली.
बाकी सगळे आहेत तसेच आहेत.
सिझन टु मध्ये सगळेच खेळाडू टुकार होते. बाप्पा सोडल्यास.

जयने इमोशन्स दाखवुन त्याला प्रेक्षकांची सिंपथी मिळावी यासाठी स्नेहाला आणलय की का?
जयने तिचा वापर करुन घेतला होता अस कुठेच जाणवले नाही, मला तरी! उलट बाईच त्याच्यामागे गोंडा घोळायच्या.

स्नेहा ओव्हर अ‍ॅक्टिंग आणि ओव्हर कॉन्फिडन्सची दुकान , आली होती इमेज क्लिअर करायला पण अजुनच माती खाल्ली, आधी पेक्षा जास्तं स्टुपिड दिसली Biggrin
सारंगे पॉप्युलर? सर्वात जास्त चर्चा स्नेहाची ?इंटरनॅशनल फेस ?? मी नेहेमी सुंदरच दिसते ??? आधी पेक्षा जास्तं व्हर्च्युअल जोडे पडतायेत स्नेहाला सोशल मिडियावर !
ब्रेकप झाल्यावर मुली हेअरकट करतात तशी हेअरकट्/कलर करून आली होती !
आदिशनी मस्तं इग्नॉअर मारलं स्नेहाला !
जय तर अक्शरशः कॅमेराला पोझ देऊन लाइट्स कॅमेरा अ‍ॅक्शन, मार बॅगवर Proud
विकासनी बरोब्बर अ‍ॅनॅलिसिस केलं !

आज जयशी बोलताना पण तुम्ही दोघांनी एकमेकांचा फायदा घेतला असे जे त्याने निर्विकारपणे म्हंटले, तेव्हा त्याला पाठीवर शाबासकी द्यावीशी वाटत होती.>> + ११
विकास रॉक्स.... त्याचं अ‍ॅनॅलिसिस नेहेमीच बरोबर असतं.... काल पण स्नेहा ला विचारत होता... की हे सगळं जे बोललीस ते खरच उत्स्फुर्त होतं का ? (की बिबॉ ने सांगितलेलं होतं अशा अर्थाने त्याने बरोबर पकडलं स्नेहा ला.... )
स्नेहा आली तेव्हा जय खरतर आधी एकदम खुशीत आला होता.... पण नंतर स्नेहा ने त्याला जे काही परतला... ते पण सर्वांसमोर... त्याने तो जास्त वैतागला असणार.... स्नेहा काय म्हणे मी ग्लोबल फेस आहे ? कधी झालं हे ? मला तर स्नेहा वाघ बीबॉ मधे आली तेव्हा एकदम क्लिक झालं ही फार फार वर्षांपुर्वी हिला एका सिरीअल मधे पाहिलं होतं... तेव्हापर्यंत तिचं नाव पण माहिती नव्हतं ... कधी झाली ही बाई ईंटरनॅशनल चेहेरा ?

जयने तिचा वापर करुन घेतला होता अस कुठेच जाणवले नाही, मला तरी! उलट बाईच त्याच्यामागे गोंडा घोळायच्या.>>>>> +111111111
काहीतरी scripted बोलायचं.

स्नेहा काय म्हणे मी ग्लोबल फेस आहे ? >>> बिग जोक. कॉमेडी शो झालाय का बिग बॉस.

विकास डोक्याने खरंच हुशार आहे, मानायला हवं त्याला.

जयने तिचा वापर करुन घेतला होता अस कुठेच जाणवले नाही, मला तरी! उलट बाईच त्याच्यामागे गोंडा घोळायच्या.>>> अगदी अगदी.

आधीच्या दोन वेळेप्रमाणे इथले तीन आणि तिथले तीन ठेवणार असतील फायनलला तर जय, उतक्या, मीरा कुठेही नाही जाणार. दुसरीकडे तीन आहेतच दोन वि आणि एक मीनल. (पहिल्या सीझनमध्ये तीन गट पडले शेवटी आणि दोन दोन होते तिघांतले. मेघा, शरा त्यानंतर पुष्कर, सई आणि अस्ताद, स्मिता) .

मीराचे एक्स्प्रेशन्स मात्र भारी असतात हा, खरेखुरे वाटतात, झरझर बदलतात. तिला खूप वाव मिळेल अ‍ॅक्टींग क्षेत्रात, म मां कौतुक करतात त्याबद्दल ते खोटं नाही. गा दा पेक्षा अभिनय प्रतिभा सरस आहे (गा दा कडे नाहीच आहे ते सोडा), चेहेरा खरोखर बोलतो तिचा. विकेंड शेवटी जाताना आणि थांबल्यावर कसले खरेखुरे भाव होते.

विकास रॉक्स.... त्याचं अ‍ॅनॅलिसिस नेहेमीच बरोबर असतं.... काल पण स्नेहा ला विचारत होता... की हे सगळं जे बोललीस ते खरच उत्स्फुर्त होतं का ? (की बिबॉ ने सांगितलेलं होतं अशा अर्थाने त्याने बरोबर पकडलं स्नेहा ला.... )>>> अगदी अगदी!

काल काकु केवढी माज करत होती!!! आणि ही इन्टरनॅशनल स्टार??? कधिपासुन झाली ही इन्टरनॅशनल स्टार?? इन हर ओन हेड बहुधा! आणी जयची शाळा कुठल्या हक्काने घेत होती? त्याला लटकुनच तर जे काय टिकली ती टिकली नाहितर हिला कोण भाव देत होत? हिने स्वतःच्या तोन्डानेच सान्गितल ना की माझ घरात कूणाशीच कनेक्शन नव्हत कारण तु एकाच व्यक्तिच्या मागे मागे फिरत होती.
जयची चिडचिड जेन्युइन होती, तो रडत होता कारण आता स्पर्धा २ विकवर आली आणि स्नेहा काकुनी सगळाच भान्डाफोड केला वर लुजरचा टॅगही गळ्यात घातला अब मै कैसा बनुगा विनर!!
स्नेहा काकुना सगळ्यात भारी टशन आदिशने दिला फुल टु इन्गोर मारल फक्त दरवाजा उघडताना एक लुक दिला... खरच तो राहिला पाहिजे होता अजुन काही काळ तरी.... त्या दादुस होयबा च काय कवतिक होत बिबी टिमला देवच जाणे.

सोनाली, गायत्री, मीरा, जय , उत्कर्ष - नॉमीनेट
सोना ला यावेळी बी टीम फॅन वाचवतील का ?
तसं झालं तर मीरा जाती का काय ?
मीरा ला बिबॉ लाच वाचवायचे असेल तर उत्कर्ष पण जाऊ शकतो...

<<स्नेहा काकुना सगळ्यात भारी टशन आदिशने दिला फुल टु इन्गोर मारल फक्त दरवाजा उघडताना एक लुक दिला.<< अगदी अगदी.. तिला जे वाटत होतं, की ती छा गयी है, त्याला चांगला धक्का होता हा! तरीही बाईची गिरे तो भी एक टांग उपर रहाणार! काय समजतेय स्वतःला कुणास ठाऊक Biggrin
टीम ए चे तिघेही नॉमीनेट झालेत अन हादरलेत चांगलेच, उत्कर्ष जास्तच! Lol

सोनाली, गायत्री, मीरा, जय , उत्कर्ष - नॉमीनेट
सोना ला यावेळी बी टीम फॅन वाचवतील का ?... मी सगळी मते फक्त गायत्रीला देणार.

खरं तर मीरा जावी आता पण बिबॉ ला वाटले तर सोनालीलाही कदाचित घालवतील यावेळी. वोट्स काही का असेना.
काल स्नेहाचा ड्रामा जरा अति झाला. सोमि वर लोक दोन्ही बाजूने बोलतायत, काही म्हणतात जय चा गेम खराब करायला बिबॉ ने तिला आणाले, काही म्हणतायत त्याला अजून इमोशन्स दाखवून सिंपथी मिळावी म्हणून आणले! Happy अर्थात जय ला जो आयताच चान्स मिळाला रिअ‍ॅक्ट करायला, तो त्याने रडून मुठी वगैरे आपटून वसूल केला. बहुधा इतके होऊन शेवटी ती चल माफ केले वगैरे म्हणून गळ्यात पडूनच जाईल बाहेर. पण उत्क्या आणि मीरा जय वर आता जरा उचकले आहेत असे दिसले एका व्हिडिओत. झाले ना, केला ना तिचा वोट साठी वापर त्यात इतके मागे मागे फिरुन माफी मागायचे काय कारण असे ते म्हणत होते.
विकासने माझ्या मते सध्या मीनल ला विनाकरण टार्गेट करून, विशाल ला मुद्दम उचकवून आणि त्या MU कमेन्टवरून त्याचा मुळात सटल आणि स्मार्ट असलेला गेम खराब करून घेतला आहे.
विशाल अजूनही त्याच्या पहिल्या ट्रॅक वर येऊ शकतो पण त्याला अजून पॉजिटिव्ह खेळणे भाग आहे. सोनाली / विकास ने उचकवले तरी न उचकता हाय रोड घेणे त्याला जमायला हवे ! बाकी ए टीम ने त्याला कितीही ट्रोल केले तरी नेहमी तो शांत आणि पॉजिटिव दिसतो. त्याच्या टीम पैकी मात्र कुणी खुट्ट करायचा अवकाश, त्याचा एकदम ज्वालामुखी होतो!

खुनशी वाटत होती कसली. काय फालतूपणा केला तिनं!!!
इतरांना प्रेक्षक बघत होते तसेच तुलाही बघत होतेच की बाई.
स्क्रीन टेस्ट सुरू आहे असं वाटत होतं का तिला?
बिग बॉस, इसके ओवरऍक्टिंगका पचास रुपया काट लेना।

विकासने माझ्या मते सध्या मीनल ला विनाकरण टार्गेट करून, विशाल ला मुद्दम उचकवून आणि त्या MU कमेन्टवरून त्याचा मुळात सटल आणि स्मार्ट असलेला गेम खराब करून घेतला आहे... मलाही तसे वाटते, पण त्याचा एक खूप चांगला गुण आहे म्हणा किंवा गेमचे अंडरस्टॅंडिंग चांगले आहे, तो त्याच्या विरोधात जातील अशा गोष्टी फार वाढवत नाही.

सोनालीला जय त्यांच्या टीम मध्ये ओढू पहातोय! त्या येडीला हे कळत नाही का? टीम बी मध्ये आहेस म्हणून वाचतेय दर वेळी! ती काय, जयसारखा हिरो बोलवतोय म्हटल्यावर टणाटण उड्या मारत तयार.

सोनालीला जय त्यांच्या टीम मध्ये ओढू पहातोय! त्या येडीला हे कळत नाही का?
<<<
ती वाटच पहातेय, वाचणे/जिंकणे/प्रेक्षकांना आवडणे कशाशी देणंघेणं नाहीये तिला, स्नेहाचीच सुधारीत आवृत्ति आहे ती!
परवा वॉल बांधणे टास्क मधे जयने तिला कंबर पकडून लॉक केले होते तर ही येडी लाजत हसत होती !

सोनालीला काढतील बहुतेक किंवा मीराला.

जनरली व्हिलन टीमकडेही तीन जण ठेवतात, त्यामुळे सोनाचे जायचे चान्सेस जास्त वाटतायेत. विशाल पण डायव्हर्ट होणार नाही. जेवणाचे हाल होतील मात्र त्याचे. सोनाच्या हातची चव एक नंबर आवड्ते त्याला, तो आणि विकास बोलत होते ते बघितलं.

परवा वॉल बांधणे टास्क मधे जयने तिला कंबर पकडून लॉक केले होते तर ही येडी लाजत हसत होती !... कठीण आहे. एवढे विशाल प्रकरण झाल्यावर पण सुधारणा नसेल तर काढा तीला.

ती वाटच पहातेय, वाचणे/जिंकणे/प्रेक्षकांना आवडणे कशाशी देणंघेणं नाहीये तिला, स्नेहाचीच सुधारीत आवृत्ति आहे ती!
परवा वॉल बांधणे टास्क मधे जयने तिला कंबर पकडून लॉक केले होते तर ही येडी लाजत हसत होती !>>> हो ती फार जयच्या ऑरामधे आहे पहिल्यापासुन आणी जयने तिला कधिही घास टाकला नाही, चुगली बुथ मधे पण किती वेळा जयचि चुगली आली होती सोनालीबद्दल.
असे प्लेयर पहिले बाहेर घालवावे... त्यापेक्षा गादा बरी, वेळेत ट्रॅक बदलुन आली तर लोक सपोर्ट करतायत, फायनलला तर जाणार नाहिच्चे पण निदान बाहेर जाइल तेव्हा ट्रोल तरी होणार नाहि.

मीरा-उत्क्याला पाठवा घरी ! >>> व्हिलन टीममधल्या दोघांना एकदम नाही पाठवायचे, पाठवलं तर जयचा फायदा होईल . सर्वांची वोटस त्याला एकट्याला मिळतील फायनलमधे. मीरा उत्क्यापैकी पाठवलं तर एकाला पाठवतील बाहेर.

सोनालीला काढतील बहुतेक किंवा मीराला.>>> मीरा जोवर मसाला देतेय्,भाण्डण करतेय तोवर ठेवतिल तीला, दोन्ही टिमचे ३-३ ठेवणार असतिल
तर सोनाली-गादा दोन्हि जातिल.

Pages