चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धमाका पाहिला . खतरनाक बॉम्बपेक्शा ताजमहालचा धमाका वाटला .
पण आवडला . कार्तिक , अम्रुता , फोनवरचा रघूबीर सगळे आवडले . म्रूणाल ठाकूर छान दिसते पण तिचा रोल काही खास नाही .
तो प्रविण कामत , सीआयडी मध्ये होता का ??
दोन गाणी चांगली वाटली . ते एरियल शॉटस मोठ्या पडद्यावर बघायला भारी वाटले असते.
एकदा बघायाला चांगला आहे .

इनसाईड एज कशी आहे >>> मी क्रिकेट फॅन नाही , पण मला थरारक वाटली . मेचेस तर भारीच आहेत . लाईव चालु आहेत असे वाटते. दोन्ही सीजन्स बघितले , आता तिसरा येतोय .

उघडउघड सेक्स सीन्स दाखवण्याच्या नादात विषयाच्या गाभ्यात शिरायचं जरा राहूनच गेलंय. तरी एकदा पाहण्यासारखा आहे.
>>>

दुसरे वाक्य पिक्चरबद्दल आहे ही ट्यूब लेट पेटली Lol

बॉब बिस्वास बघितला काल . ना धड सस्पेन्स , ना थ्रिल्लर , ना कौटुंबिक , ना रोमअँटिक .
एक ही कॅरेक्टर व्यवस्थित दाखवले नाही .
अभिषेक चा बॉब सायको नाही खुळा वाटतो . अभिषेक कधी फार सुजलेला , जाडा दिसतो कधी व्यवस्थित - विशेषत: चेहरा .
चित्रांगदा नेहमीप्रमाणे सुंदर दिसते . पूरब कोहली आणि कालीदा आवडले . अमर उपाद्याय बरेच दिवसानी दिसला .
सगळ्या गोष्टी अर्धवट आहेत . ब्लु ची गोष्ट , बॉब चा भूतकाळ , मेरी चा भूतकाळ , ईन्स्पेक्टर ईंदिराचा तपास - काहीच धड नाही .
पूर्वार्ध जरा रंगतो - शेवट तर अक्षरशः लेखकाला कंटाळा आला म्हणून शाळकरी मुलाने पूर्ण केलाय .
आणखी बर्याच गोष्टी खटकल्या , पण लिहायचा कंटाळा आलायं आता. Happy

सुर्यवंशी पाहिला प्राईमवर. मजा आली.
अक्षयकुमार नेहमीसारखाच.. ॲक्शन प्लस कॉमेडी.
रणवीरसिंग नेहमीसारखाच.. येतो आणि धमाल उडवतो.
अजय देवगन नेहमीसारखाच.. स्टाईलमध्ये एंट्री मारतो आणि सामना फिनिश करतो
कतरीना नेहमीसारखीच.. सुंदर दिसायचे काम करते
रोहीत शेट्टी नेहमीसारखाच.. दमदार बॅकग्राऊंड म्युजिक लावतो.. आणि दणादण गाड्या ऊडवतो..
चुकवलात तर फार काही नाही.. फक्त दोन अडीच तासांच्या मनोरंजनाला मुकाल

व्हिलन तेवढे बोअर आहेत.

gandhi land.jpg
ओरिजिनल बॉब विश्वास घ्यायचा होता

अभिषेकला उगाच घेतला

कहानी मध्ये विद्या बालनला मेट्रोखाली ढकलतो तो , त्याच्यावर अख्खआ नवीन मुवि बनवला

सूर्यवंशी हा नितांतसुंदर सिनेमा आहे. यातल्या सर्व पुरूष नटांचा अभिनय उत्तम आहे. सर्व नट्या सुंदर आहेत. संगीत अस्सल आणि ओरिजिनल आहे. ध्वनीयोजना उत्तम आहे.
संवाद प्रथमच ऐकले आहेत. कथा अभिनव आहे. पटकथा उत्तम.
प्रकाश योजना, छायाचित्रण नितांतसुंदर आहे.
थरारदृश्ये उत्तम आहेत.
शेवटी अर्धा तास एकटा दिग्दर्शक व्हिडिओ गेम खेळतो. त्याऐवजी प्रेक्षकांनाही रिमोट दिले असते तर मज्जा आली असती.

धमाका बकवास वाटला. अमृता सुभाश शांतपणे इरिटेट करायचे काम करते.. कार्तिक चा अभिनय चांगला आहे पण चित्रपट गुंगवून ठेवण्यात अपयशी ठरतो असे माझे वयक्तिक मत! वेनस्डे च्या धरती वर काहितरी करायचा प्रयत्न वाटला.

एखादी बातमी न्युज अँकर ने दाखवली नाही म्हणुन बाँब लावणार्याचे नाराज होऊन बसणे, ताबडतोब दुसर्या चॅनल शी थेट संवाद साधणे, धमाका झाल्या वर ही न्युज आणि विडिओ वाला टिवि तेवढा चालु बाकी सर्व बंद पडणे वगैरे प्रकार बालिश वाटले.

सूर्यवंशी खरा रंगतो ते शेवटच्या अर्ध्या - एक तासात जेव्हापासून सिम्बा एन्ट्री मारतो .

कहानी मध्ये विद्या बालनला मेट्रोखाली ढकलतो तो , त्याच्यावर अख्खआ नवीन मुवि बनवला >>> हो तोच तो . शेवटी एक संदर्भ येतो , विद्या बालनचा .
खरतर बॉब एक हीटमॅन आहे , आठ वर्षे कोमात होता , तो काय काम करायचा त्याला आठवत नाही , बायकोला माहीत नाही , आपण ईतके वर्ष काम करत असतो तर साठवलेले पैसे कुठे आहेत , आपल्या हातून जो एक गुन्हा घडलाय तो का घडला , आपला अपघात कसा झाला - तो एक एक दुवे शोधत आपला भूतकाळ उलगडतो , कौटुम्बिक पातळीवर- ही बायको फारच प्रेम करते , तिचाही एक भूतकाळ आहे , एक टीन एजर मुलगी आहे जी जरा फटकून वागते , एक शाळकरी मुलगा आहे ज्याने त्याला कधी बघितल नसेल ( मुलाचं वय लक्षात घेता) ... खरतर फार ईन्टरेस्टीन्ग थ्रीलर बनला असता , पण माती केलीय सगळी .

सूर्यवंशी बघितला (का? का?) आणि वाईट सिनेमे बघायचा तिय्या जमवला. थलायवी, धमाका आणि सूर्यवंशी - तिन्ही मूव्हीज ला सिनेमॅटोग्राफी सोडून कुठल्याच कॅटेगरीत उल्लेखनीय कामगिरी करता आलेली नाहीये. सूर्यवंशी आचरटपणाचा कळस आहे - पानचट विनोद, प्रभावशून्य संवाद (मधेच ३७० कलम, देश की बेटी वगैरे ऑबव्हियस शब्दात केलेल्या सरकारी जाहिराती), टुकार पटकथा - sheer waste of time!

धमाका विषयी आधीच लिहीलं होतं - अत्यंत अतर्क्य आणि illogical sequences असणारा मूव्ही.

थलायवी - सरळसोट, ओव्हरसिंपलीफाईड घटना - प्रतिक्रिया-परिणाम ह्या त्रिकोणातून फिरणारी पटकथा (कास्टींग मस्त जमलंय).

मुलींनी काल सूर्यवंशी बघतला.. त्यांना भयंकर आवडलेला दिसतोय.. कालपासून दोघींनाही मोठं होऊन पोलिसच बनायचंय.
मागे दंगल बघितला तेव्हापासून पेहेलवान बनायचं होतं, मग गुंजन सक्सेना बघितला तर पायलट बनायचं होतं..आता पांडू येतोय बहुतेक.. तोही दाखवायचाय

मुलींनी काल सूर्यवंशी बघतला.. त्यांना भयंकर आवडलेला दिसतोय.. >>>> लहानांना आवडेल असाच आहे. फक्त ते अंडरवर्ल्डचे संदर्भ बोअर करतात. म्हणून वर म्हटले व्हिलन बोअर आहेत. बाकी धमाल आहे. ती बॅकग्राऊंड म्युजिक तर कमाल आहे. मी ती वापरून काल मुलीचा एक विडिओही बनवला. आमच्या घरातही त्यामुळे सुर्यवंशी वातावरण आहे. तरी अजून मुलांना दाखवला नाही. डायरेक्ट मुलांना काही दाखवण्यापेक्षा आधी आपण बघितलेले असणे सेफ वाटते. काही त्यांनी न बघण्यासारखे वाटले तर काळजी घेत ढकलता येते.

सूर्यवंशी आचरटपणाचा कळस आहे - पानचट विनोद, प्रभावशून्य संवाद >>> फेफ, मी सुमारे तासभर बघितला आणि मलाही असेच वाटले. सुरूवातीचे ते फाळणी, २६/११ चे बॉम्बिंग वगैरे एकदम गंभीर चित्रीकरण आणि नंतर त्याचे इतके ट्रिव्हियलाझेशन करणारा पांचटपणा. अक्षय कुमार आता जख्ख म्हातारा दिसतो. सूर्यवंशम मधल्या "तरूण" अमिताभच्या जागी चालेल इतका Wink कत्रिना इतकी भीषण संवादफेक करते की जिनामिदो मधे टोटल क्रश मटेरियल वाटलेली हीच का हा प्रश्न पडतो. कुमुद मिश्राला पाहिल्यावरच शंका आली की याला एखादा तरी सहृदय वगैरे छाप सीन असणार.

जावेद जाफ्री फक्त आवडला. त्याचा तो "कामाच्या बाबतीत चोख पण जनरल बोलताना पाल्हाळ लावणारा" (अगदी "गच्चीचां काय, हा हे काय बोलतोय" इतके) टाइप न्युआन्स्ड विनोदी रोल किती डेव्हलप केला आहे पुढे माहीत नाही. तोपर्यंतचही बाकी विनोदाची लेव्हल बघता चान्सेस कमीच वाटतात. नाव विसरण्याचे विनोद तर हवा येउ द्या/हास्यजत्रा मधल्या लेव्हलच्याही खाली आहेत.

* "जाफ्री" लिहीताना सारखे वाटत होते की मी टायपो करतोय आणि जॉफ्री लिहायला हवे Happy

सूर्यवंशी सुरुवात केली आणि फार बघू न शकल्याने बॉब बिस्वास बघितला. हा बरा वाटला. अभिषेक आवडतो जरा आणखी फास्ट चालला असता, पण आहे तो ही ठीकच आहे. कहानी बघुन अनेक वर्षे लोटल्याने त्याचा संदर्भ असल्याची शेवटची ओळ वाचुन काहीच अर्थबोध झाला नाही. परत कहानी बघुन समजुन घ्यावा असं काही वाटलं नाही.

सूर्यवंशी आचरटपणाचा कळस आहे - पाणचट विनोद, प्रभावशून्य संवाद>>> अक्षयच वय जाणवत आहे त्यात तो दात नाही तर हिरड्या फाकवुन हासतो जे भयाण दिसत... त्याने थोड वेट पुट ऑन करुन मध्यम वयिन रोल वैगरे रोल करावे.
कत्रीना काहितरी पोस्ट का प्रि बोटॉक्स केल्यासारखी दिसते, गाल फुगवलेत् त्याने डोळे उगाच मिचमिचे वाटतायत टाइप... बाकी मुव्ही बन्डल आहे.

सूर्यवंशी एक रोशे पिक्चर म्हणून पाहिला. आवडला. ३ तास फूल टाईमपास. उगीच काही सिरीयस करतोय असा आव रोशे कधीच आणत नाही त्यामुळे त्याचे पिक्चर हे मसाला करमणूक म्हणूनच बघतो. नेफीवर आलाय ते बरे वाटले.

अक्कीनी मध्येच एक दोन मराठी डायलॉग्ज मारले आहेत ते भारी आहेत. आम्ही एकदम रिवाईंड करून पाहिले. करोनपूर्व काळात थिएटर मध्ये जाम शिट्ट्या / टाळ्या पडल्या असत्या त्यांना. कत्रीनाचे हिंदी मात्र अजूनही नमस्ते लंडन स्टाईलच आहे.

"सुरूवातीचे ते फाळणी, २६/११ चे बॉम्बिंग वगैरे एकदम गंभीर चित्रीकरण आणि नंतर त्याचे इतके ट्रिव्हियलाझेशन करणारा पांचटपणा. अक्षय कुमार आता जख्ख म्हातारा दिसतो. सूर्यवंशम मधल्या "तरूण" अमिताभच्या जागी चालेल इतका Wink कत्रिना इतकी भीषण संवादफेक करते की जिनामिदो मधे टोटल क्रश मटेरियल वाटलेली हीच का हा प्रश्न पडतो. कुमुद मिश्राला पाहिल्यावरच शंका आली की याला एखादा तरी सहृदय वगैरे छाप सीन असणार." - टोटली सहमत फा!

"जावेद जाफ्री फक्त आवडला. त्याचा तो "कामाच्या बाबतीत चोख पण जनरल बोलताना पाल्हाळ लावणारा" (अगदी "गच्चीचां काय, हा हे काय बोलतोय" इतके) टाइप न्युआन्स्ड विनोदी रोल किती डेव्हलप केला आहे पुढे माहीत नाही" - तू पाहून उरलेल्या भागात अक्षय कुमार-कटरिना (ही एक सिनेमाभर ऑस्ट्रेलियाला जायच्या धमक्या दे दे देते, पण अजिबात जात नाही), रणवीरसिंग, अजय देवगण ह्यांना त्यांच्या वाटणीचे सीन्स देणे, आणि सिनेमाभर भरून ठेवलेल्या व्हिलन्स ना मोक्षपदाला पाठवणे इतकी कामं राहिली असताना त्या जावेद जाफरीचं कॅरेक्टर फुलावायला कितीसा वाव असणार आहे असा विचार केलास तरी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. Happy

ब्लॅककॅट, नावेदजावेद जुळे नाहीत.
मला काय तो सुर्यवंशी पहायची इच्छापण होईना. हिंदी सिनेमेच पहाणे बंद झालंय जवळजवळ.

कत्रीना काहितरी पोस्ट का प्रि बोटॉक्स केल्यासारखी दिसते, गाल फुगवलेत् त्याने डोळे उगाच मिचमिचे वाटतायत टाइप...>>>> एक्झॅक्टली माय थॉट्स..असं पण नुसतं सुंदर चेहरा आणि डॅन्स ह्यांच्या जिवावर किती तगणार? तशाही नोरा फतेही, जॅकलीन वगैरे आहेत च जास्त यंग.

Zee var

Pages