फटाकेमुक्त दिवाळी

Submitted by प्रकाश घाटपांडे on 26 October, 2013 - 08:12

दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.

फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अ‍ॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्‍या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्‍या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्‍याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बॉम्बसारखे फटाके वाजवण्यात किंवा ऐकण्यात काय आनंद मिळतो हे मला कळत नाही
>>>>

काहीतरी शास्त्रीय कारण असणारच.
शास्त्रीय संगीत ऐकण्यातून काय आनंद मिळतो असा प्रश्न मलाही पडतो.
पण या दोन्ही आवाजांनी अंतरंगातील कुठल्यातरी तारा छेडल्या जात आनंद मिळत असणारच.
अर्थात हे ज्याच्या त्याच्या आवडीवर अवलंबून.
कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाचा ईतरांना त्रास होतो हे कबूल. पण त्यात आनंद कसलाच नसतो हे विधान चुकीचे आहे.
बरेचदा होते काय, जे फटाके फोडत असतात ते एंजॉय करत असतात. ज्यांचे त्याच्याशी घेणेदेणे नसते त्यांना तो आवाज जीवघेणा वाटतो.
हे दणादण आवाज करणाऱ्या डीजे म्युजिकबाबतही होते. नाचणारे मस्त त्या बीट्स एंजॉय करत असतात. ईतरांना गोंगाट वाटत असतो.

मला आठवतेय.. दुसरी की तिसरीत मी रडून फार मोठा दंगा घातलेला. कारण मला वाटत होते मी मोठा झालो. मला आता बॉम्ब आणायला हवेत. आणि आई चक्र पाऊस घेऊन आलेली.

उलट नरकचतुदर्शीला पहिला सुतळी बाँब लावण्यातला आनंद शब्दात नाहि मांडु शकत. भाऊबीजेची ओवाळणी चालु असताना लावलेल्या मोठ्या माळेचं अप्रुप नाहि सांगु शकत. >> +१

पहिल्या दिवशी आम्ही घरातही फुलबाज्या लावायचो आणि हाताने गोलगोल फिरवायचो. नरकचतुर्दशीला पहाटे उजाडायच्या आधी आंघोळ करत असताना बाहेर कोणीतरी अशा फुलबाज्या फिरवताना त्याचा तो फिरणारा प्रकाश वगैरे अजून डोळ्यासमोर आहे.

मला अजूनही आवडतात फटाके उडवायला. शोभेची दारू, व आवाज वाले, दोन्ही. कोणाला अस्थमा वगैरे असेल तर त्यांना त्रास होउ नये अशा पद्धतीने उडवता आले तर आवडेलच. नाहीतर भारतात एकूण प्रदूषण आहे त्यात हे २-३ दिवसांचे फटाके अशी किती भर घालतात माहीत नाही. एक उदाहरण म्हणून - पूर्वी रेल्वेने मुंबई-पुणे प्रवास करणारे असंख्य लोक आता स्वतःच्या कार्सनी जातात. त्याने वाढलेले टोटल प्रदूषण, कार्बन इफेक्ट ई. यापेक्षा कितीतरी जास्त असावे.

बाय द वे फटाके "फोडायला" कधीपासून लागले लोक? पूर्वी तरी "वाजवत"

फारएंड - मुंबईत फटाके फोडतात...

मला आता नाही उडवावे वाटत फटाके पण मी माझ्या मुलांना फटाके उडवण्यापासून थांबवणार नाही... आणि इतर पालक जेंव्हा आपल्या मुलांना अरे फटाके नको, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण वगैरे सांगू लागतात मला त्या मुलांची दया येते... हा आनंद हिरावतायत त्यांचे पालक...

गावात पोरं कुत्र्याच्या शेपटीला फटाक्यांची माळ लावून पेटवायचे आणि मग कुत्रे सैरावैरा पळताना पाहून आनंदाने उड्या मारायचे. पण दुष्ट मोठ्यांनी भूतदया वगैरेचे कारण देऊन त्यांच्यापासुन तो आंनद हिरावून घेतला हे पाहून त्यांची खूप दया यायची.

आम्ही लहान असताना गरीब होतो , इतके महागडे फटाके प्राण्यांच्या शेपटीला बांधायला परवडत नव्हते.परंतु जुने खराब झालेल्या पत्र्याच्या डब्यात दगड टाकून गाढवाच्या शेपटीला बांधायचो, आणि गाढवाला पिटाळायचो . डब्याचा खुळखळा वाजायला सुरुवात झाली की गाढव अजून जोरात पळायचे , डब्याचा खुळखुळा अजून जोरात वाजायला लागायचा . डब्याचा आवाज आणि गाढवाचे पळणे दोन्हीही अनलिमीटेड . तेव्हा प्राणीमित्र असा प्राणी आमच्या भागात जन्मला नसल्याने वर्षभर जेव्हा मनात येईल तेव्हा हा आनंद मनसोक्त लुटला.

लेख वाचावा आणि त्यावर गांभिर्याने विचार करावा. लेखांत आलेली माहिती खरी/ खोटी याची पडताळणी करत आहे.
https://www.bbc.com/news/world-46138064

प्रदूषणाची अनेक ( शेतातला कचरा जाळणे , वाहतूक ) कारणे आहेत पण दिवाळी च्या काळात परिस्थिती नक्कीच खालावते. वेळ असल्यास भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाची लिंक आहे, मोलाची माहिती आहे . विविध भागांच्या प्रदूषणाची २४ तासांची पातळी येथे बघायला मिळेल.
https://app.cpcbccr.com/AQI_India/

मी काल बातम्या बघत होतो तर त्यावर दिवाळीच्या प्रदूषणामुळे ध्रुवीय प्रदेशातील एक मोठा हिमनग वेगळा झाला होता आणि वितळणार होता. मी लगेच खाली गेलो आणि आपटी बार वाजवत असलेल्या पोरांचे फटाके फेकून दिले आणि त्यांना घरी पिटाळून लावलं. परत टीव्हीसमोर आलो तर तो तुटलेला हिमनग परत जोडला गेला होता आणि त्या बर्फावर थँक्स बोकलत कोरलं होतं.

सद्गुरू फटाक्यांबाबत

हजारांची माळा फोडणारे अपरात्री कानठळ्या फुटतील एवढे बॉम्ब फोडणारे, ३१ जानेवारीच्या मध्यरात्री काय झोपता म्हणुन धडामधुम आतषबाजी सुरू करणारे लहान मुलेच असतात का? असतात काही कार्टी (माझ्यासारखी) पण जे दिसते आणि चहूकडुन ज्या प्रमाणात ते सुरू असते ते पाहून ही लहान मुले नसावीत असे वाटते.

वायूप्रदूषण मुद्दा हा स्थानिक प्रदूषण रोखणे या उद्देशाने असेल तर जिथे मुळात जास्त प्रदूषण तिथे अधिक कडक निर्बंध, लहान गावात ते शिथिल असे करता येईल. उदा: कमी वायू प्रदूषण करणारे फटाकेच महनगरात विकता येतील वगैरे.

ध्वनीप्रदूषणा बाबत सर्वत्र सारखेच नियम लावून ठराविक डेसीबल वर आवाज करणाऱ्या फटाक्यांच्या उत्पादनावरच बंदी असे उपाय करता येतील.

मग लहान मुलांनी उडवा की मोठ्यांनी. आपली ती दिवाळी असो की त्यांचा तो ख्रिसमस आणि न्यू इयर.

लहान मुलांना पुढे करून इमोशनल टच देण्यात काही अर्थ नाही.

लहान मुलांना एवढीच किंवा जास्त मजा येणारे दुसरे काही मिळाले की तिकडे रमतात. नको ते फटाके, हेच पाहिजे असे ही म्हणतील त्यांना जर दुसरे काही मिळाले तर. आणि ते तसे दुसरीकडे रमलेच तर काय बिचारी ही पोरं त्या फटक्यांच्या आनंदाला मुकत आहेत म्हणुन ज्यांना हळहळ वाटते त्यांनी थोडेफार फटाके उडवून मन प्रफुल्लीत करून घ्यावे.

आणि फटाक्यांमुळे वायुप्रदूषण मुद्दा हा ग्लोबल वार्मिंगशी निगडित असेल आणि त्याचा त्यावर तेवढ्या प्रमाणात इम्पॅक्ट असेल तर मात्र शहरी/ग्रामीण सगळीकडे वर्षभर सारखे नियम/निर्बंध हवेत.

बीजींग, चीन मधे PM2.5 (particulate matter 2.5 micron ) ची पातळी खालावल्यावर त्यांनी बाहेर खेळण्याचे, काम करण्याच्या व्यावहारांवर मर्यादा आणल्या. पण दिल्ली मधे त्याच्या दुपटीने वाईट परिस्थिती आहे.
https://www.reuters.com/world/china/visibility-deteriorates-pollution-cl...

बीजींग- PM2.5 = 166, unhealthy
https://aqicn.org/city/beijing/

दिल्ली - PM2.5 =470, hazardous
https://aqicn.org/city/delhi

प्रकाश घाटपांडे यांनी २०१३ मधे विचार करुन हा धागा सुरु केला. प्रदूषण विषयाचे गांभिर्य अजूनही सर्व-सामान्यांना कळालेले नाही ( थोडेफार कळाले असले तरी चार दिवस फटाके उडविल्याने असा कितीसा फरक पडणार आहे? असा युक्तीवाद ) याचे आष्चर्य वाटते. हा धागा दर वर्षी ते वर काढतात आणि प्रत्येक वेळेला मला धागाकर्त्यांना मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात. great service.

चार फटाके कमी फोडले तर त्याने थोडा का असेना फरक पडणार आहेच.... अगदीच १०० % नाही, ५० % तरी करा, मग २० % . त्यात काय घातक घटक असतील तर त्या घातक घटकांचे प्रमाण कमी करता येतील का?

सार्वजनिक, भल्या मोठ्या मैदानावर आतषबाजी केली तर ? आतषबाजीचा आनंदही मिळेल, आणि फटाके फोडण्याचे एकंदरीत प्रमाणही कमी करता येईल. कलानुरुप थोडे वेगळे स्वरुप देणे गरजेचे आहे.

फटाक्यातून आनन्द मिळतो हा आपला mindset च बदलायची गरज आहे. जसे काही पदार्थ आपल्याला त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या आठवणींमुळे आवडतात तसंच फटाक्यांच आहे. पण फटाके जीवावर बेतू शकतात एवढे ते धोकादायक आहेत. मुलांना आपण गॅस जवळ जाऊ देत नाही आणि बिनधास फटाके हातात देतो. आम्ही लहानपणी फटाक्यातून जी मजा उपभोगली ती मुलांना ही मिळायला हवी हा विचार बदलणे गरजेचे आहे. त्यांना शाळेत एक शिकवतायत घरी एक शिकवतायत ह्यातून त्यांचा गोंधळ वाढेल.
आता अनेक लहान मुलं फटाके नको म्हणतायत. ती जेव्हा मोठी होतील तेव्हा फटाक्यांशी जोडलेल्या आठवणी त्यांच्या जवळ नसतील मग दोन तीन पिढयात आपसूक च फटाके कमी होईन दिवाळी अधिक आनंदाची होईल .

बोकलत, तुमचा विनोद सर्वांना कळेलच असे नाही तेव्हा नको त्या बाबतीत विनोद केला नाहीत तरी चालेल अशी नम्र विनंती आहे.

पोरं किती खुश आहेत बघा. लहानपणीचे दिवस आठवले. मी लहान असताना असं चक्री लावायचो आणि त्यावर आम्ही सगळे मित्र ओरडत नाचायचो. कधीतरी चुकून कोणाचातरी पाय पडायचा आणि फटकन फुटायचा. मजा यायची. images (24).jpeg

नवीन पिढी अत्यंत काळजीपूर्वक साजरे करत आहे. त्या फोटोत एक मुलगा बाकीच्यांना भाजू नये ह्याची काळजी म्हणून सर्वांना हाताने थोपवून धरत आहे, तर दुसरा मुलगा धुराने पर्यावरण नासू नये म्हणून स्वतः आ वासून त्यास सामोरा जातो आहे.

सुरक्षित दिवाळी, आपली दिवाळी!

ईथे चर्चेत फटाके नको म्हणणाऱ्यांमध्ये दोन प्रकारची लोकं आहेत.
काही जणांना मुळातच फटाक्यातून काय आनंद मिळतो हे ठाऊकच नाहीये. अश्यांना तो समजाऊन चर्चा करणे अवघडच नाही तर अशक्य आहे.

ज्यांना हा आनंद कळतो तरी ते म्हणत आहेत की तुम्ही मुलांना या काळात दुसऱ्या कुठल्यातरी गोष्टीत रमवा आणि त्यातून आनंद मिळवायला शिकवा.

हे बोलायला सोपे आहे पण आचरणात आणायला कठीण. माझा हा प्रयत्न करून झाला आहे. पण जेव्हा आपल्या मुलांचे मित्र फटाके वाजवत असतात तेव्हा त्यांना अडवणे अवघडच नाही तर अशक्य असते. तुम्ही ते त्यांना रडवून आणि जोरजबरदस्ती करूनच साध्य करू शकतात.
अर्थात यातही जर मुलालाच फटाक्यांची फारशी आवड नसेल वा एकलकोंडे तर कदाचित हे सोपे जाऊ शकते. पण मूल ईतरांमध्ये मिसळणारे असेल तर अवघड. एवरी चाईल्ड ईज डिफरंट.
तर अश्या मुलांचा आनंद त्यांना रडवून जोरजबरदस्ती करून हिरावून आपण रोज पेट्रोल पिणाऱ्या आणि धूर ओकणाऱ्या गाड्या चालवणार, एसी लाऊन झोपणार, आणि उठल्यावर कॉम्प्युटर चालू करून मायबोलीवर येऊन चर्चा झाडणार हा दुटप्पीपणा काही पटत नाही.

जर कायद्यानेच फटाक्यांवर बंदी आणली आणि आजूबाजुचे सारेच फटाके वाजवायचे बंद झाले तर नक्कीच पोरे समजतील. गेल्यावेळी कोरोनाकाळात हा अनुभव घेतला आहे. पण तसे नसल्यास मला हे अवघड आणि अयोग्यही वाटत आहे.

आधी मुलांचा मूळ फटाक्यातच आंनद होता. तो आता इतर करताहेत मग आपण का नाही या वंचित रहाण्याच्या भावनेकडे आला, प्रगती आहे.

तर चर्चा ही मुळात फटाके बंदच करणे ते त्यांचे प्रमाण कमी करणे अशीच सुरू आहे. कमी केले तर मुलांना उडवता येतीलच. पण बंद केले तर काय? मग मुलांना नाही उडवता येणार. म्हणून अरे बंद कशाला मुलांना उडवू द्याना त्यांचा आनंद कशाला हिरावता हा मुद्दा आला. त्यावर (फटाके बंदच केले तर) मुलांना दुसरी कडे रमवता येईल म्हटले तर पण इतर मुले उडवत असताना त्यांना रडवायचे का मुद्दा आला.
हे फुगडी खेळू गं फिरकीची तीरक्या तीरक्या गं गिरकीची झाले.

थोडक्यात काय फटाके पूर्ण बंद केले तर हरकत नाही मुलं समजतील आणि असे नियम केले ज्याने ध्वनी वायू प्रदूषण कमी होतेय असे फटाके उडवता येतील तर मुले उडवू शकतील. म्हणजे दोन्हीही मध्ये मुलांचा प्रश्नच नाहीये. मग कशाला तो मुद्दा रेटताय उगाच.

आणि एसी पेट्रोल वीज पाणी यांचा कमीत कमी वापर करणे, कमी प्रदूषण करणाऱ्या CNG गाड्या, EV, इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या, एसी/फ्रीज साठी वेगळे वायू वापरणे सगळेच प्रयत्न सुरू आहेत. मी आणि माझे अनेक मित्र शक्य तिथे सायकल वापरतो आहोत. सगळ्याच फ्रंटवर जागरूकता आणणे सुरू आहे. ज्याची यांना कल्पना नाही, अशी काळजी घेत नाहीयेत त्यांना मग फटाक्यांबाबत चर्चा करणारे दुटप्पी वाटू शकतात.

<< पोरं किती खुश आहेत बघा. लहानपणीचे दिवस आठवले. मी लहान असताना असं चक्री लावायचो आणि त्यावर आम्ही सगळे मित्र ओरडत नाचायचो. कधीतरी चुकून कोणाचातरी पाय पडायचा आणि फटकन फुटायचा. मजा यायची. >>

------- आजची दिल्ली ( तसेच उ भारतातली ) मधे स्मॉगची परिस्थिती बघितल्यावर आणि PM2.5 चे दिवाळीच्याच काळांत वाढलेल्या प्रमाणाचा जवळचा संबंध यामुळे प्रदूषणाची भिषणत: आहे त्यापेक्षा गंभीर बनत आहे.
प्रदूषणामुळे कोट्यावधी लोकांच्या आरोग्याला धोका पोहोचतो आणि दिल्लीकरांचे सरासरी आयुष्य ८-१० वर्षांनी कमी होते आहे (असे आजच कुठे तरी वाचले), जोडीला जगणार्‍यांच्या आयुष्याची Quality पण घसरते. श्वासनाच्या आजारांचे वाढते प्रमाण, आणि शेवटची / आयुष्यातली अनेक वर्षे त्रास सहन करावा लागणे यामुळे क्षणिक आनंदाला थोडी वेसण घालणे सहज शक्य आहे.

थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे एक अगदी छोटा प्रयत्न केला तरी त्याने समस्येची गंभिरता कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे. त्याच वेळी इतरही अनेक पातळ्यांवर (वाहतूक आणि औद्योगिक) प्रयत्न होणे गरजेचे आहे. दिल्ली गॅस चेंबर बनली आहे हे पोरांना समजावून सांगितले तर त्यांनाही ते पटेल. एक वेळा विषयाचे गांभिर्य कळाल्यावर ते पण प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करतील. या प्रयत्नामधून मिळणारा आनंद दिर्घकाळ टिकणारा असेल.

बोकलत यांच्या वरच्या फोटोला झब्बू:
Screenshot_20211106-143130_Chrome.jpg

उद्देश हा तसे फोटो देऊन, मुलांचा आनंद हिरावून घेताय वगैरे यातील फोलपणा दाखवणे आहे.
हे फोटो दाखवून फटाक्यावर बंदी आणा अशी भावुक मागणी करणे हा नाही. सेफ्टी गॉगल्स व फायर रजिस्टंट ग्लोव्ह्ज वापरणे, सतत मूलांसोबत रहाणे आणि मुख्य म्हणजे मुलांना त्यांच्या वयास साजेसे असेच फटाके उडवण्यास देणे वगैरे करून अशा घटना टाळता येतील. आणि तरीही अघटीत प्रसंगासाठी भाजल्यावरील प्रथमोपचाराची किट अद्ययावत व हाताशी असावी.
हा फोटो मला मूळ चर्चेचा मुद्दा बनवायचा नव्हता. पण यात लहान मुलांचा मुद्दा आणला आणि मग ते जस्टीफाय करायला काहीपण सुरू आहे त्याकरता हा फोटो.

यात हसण्यासारखे काही नाही.
लहानमुलांना घालता येईल या साईझ आणि वजनाचे आणि फटाक्याचा तडाखा सहन करू शकणारा पुढचा काच असणारे हेल्मेट मिळत असेल तर चांगलेच आहे. योग्य ती सुरक्षा घेणे म्हणजे काय उगाच फलतुपणा हा असा विचार बहुतेकांचा असतो. आम्ही नाही का लहानपणी फोडलं काहीच तर नाही झालं याची त्यात भर घातली की झालं.
वरील चित्रातील पालकांना विचारा, किंवा डोळा गेलेल्या मुलांना विचारा. असे हेल्मेट असते तर डोळा वाचला असता असेच म्हणतील ते.
बागकाम करताना ग्लोव्ह्ज वापरणे सुद्धा कमीपणाचे वाटते अनेकांना.

सकाळीच पेपर मध्ये फटाके वाजवताना पत्रा उडून गळा कापल्यामुळे युवकाच्या मृत्यू ची बातमी वाचली आणि संध्याकाळी मुला बरोबर मोपेड वरून येत असताना काही टाळकी टिन च्या डब्यात ऍटम बॉम्ब लावताना दिसली .
वस्तीचे नाव लिहिले तर इथे फटाके फुटताना दिसतील Happy
आता इथे हेल्मेट कोण कोण घालणार ? आणि रक्षण कसे होणार ?
असा आहे सगळा मामला !

म्हणजे रक्षण करणारी वस्तू ही कुठल्याही परिस्थितीत रक्षण करणारी असावी नाहीतर वापरुच नये का?.

काही दिवसांपूर्वी रस्त्यात असा एक टोकदार तार पडला होता, जो माझ्या बुटाच्या टाचेतून घुसुन पायात गेला थोडासा. काय उपयोगाचे बूट, चप्पल? वापरणे सोडून द्या.

@ मानवमामा,
जेव्हा मुलांना सर्दी खोकला वा ईतर कुठल्याही कारणाने आईसक्रीम द्यायची नसते पण तरीही अनवधानाने आणली जाते तेव्हा त्यांना न सांगता ती लपवून ठेवली जाते. त्यांना असे सांगितले जात नाही की आईसक्रीम आणली आहे. फ्रीजमध्ये ठेवतो. आज तुला जरा सर्दी खोकला आहे ना. तर आपण दोन दिवसांनी खाऊया. तो पर्यंत तू फ्रिज उघडून आईसक्रीम बघत बसू शकतोस. पण खायची मात्र नाही.

बघा कळतोय का मुद्दा?
की माझ्याच घरातली पोरे जगावेगळी आहेत Happy

गार्डनमध्ये झोका घसरगुंडी खेळताना, क्रिकेट खेळताना, साधे पकडापकडी खेळताना कोणी आजवर लहानपणी कुठलाही खेळ खेळताना पडले नाही असा एकतरी मायबोलीवर आहे का?

मी यावर उद्या परवा एक स्वतंत्र धागाही काढतो. मी तर ईतके वेळा उचापती करताना पडलोय आणि काय काय मोडून घेतलेय याची कादंबरी बनेल.

असो, सांगायचा मुद्दा असा की जी काळजी आपण घरात स्टोव्ह गॅस आणि लहान मुले एकत्र नांदताना घेतो ती फटाके उडवताना घेऊ शकतोच.

स्टोव्ह वरून आठवले की माझ्या वयाच्या मुलांमध्ये स्टोव्ह पेटवता येणाराही बिल्डींगमध्ये मी एकटाच होतो. मुलगाच काय कुठल्या मुलीलाही तिच्या आईने हे शिकवले नव्हते Happy

Pages