दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.
फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!
ऋन्मेषचा मुद्दा काही अंशी
ऋन्मेषचा मुद्दा काही अंशी पटतो आहे. म्हणजे त्यांचा फटाकेबंदीला विरोध नाहीये, पण फक्त आपल्याच घरात बंदी घालणे आणि आजूबाजूचे इतर लोक मोठ्या प्रमाणात त्यातून आनंद घेणे - हे सस्टेनेबल सोल्युशन नाही. बंदी ही सरसकट सर्वांवर घातली गेली, तर मुलेही हिरमुसणार नाहीत. त्यामुळे फटाके उडवू नका - असं लोकांना सांगण्यापेक्षा मुळात फटाके तयारच करू नका, किंवा फटाकेविक्रीवरच बंदी घाला - असा दबाव शासनावर आणला तरच त्यातून सस्टेनेबल सोल्युशन मिळेल. सरकारी नियमांचं उल्लंघन करूनही फटाके उडवणारे काही लोक असतीलच, पण ते काही इतके सर्वजण उजळ माथ्याने करणारे आप्ल्यासारख्या घराघरात नसतील. त्यामुळे 'त्यांच्यावर का कारवाई नाही' असा वेगळा धागा काढता येईल एकवेळ; पण फटाके सर्वत्र कमी होतील हे नक्की.
पर्यावरणवाद्यांचा भर सरकारवर दबाव आणण्यापेक्षा जनजागृतीवर असतो. एक तर सरकार जुमानत नाही आणि दुसरं म्हणजे आपणहून लोकांनी काही गोष्टी का पाळायच्या हे समजून घेतल्या तर सरकारला 'नियम' म्हणून जबरदस्ती करायची गरज पडत नाही. हा मार्गही पटण्यासारखा आहे. परंतु हे सर्व पुढारलेल्या, समजूतदार नागरिक असलेल्या समाजात ठीक आहे. आपल्याकडे सध्या तरी हा मार्ग उपयोगी पडेल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे ठराविक समजूतदार लोकांनी पर्यावरण सांभाळायचे आणि इतरांनी नाही - असा भेद राहणारच. त्याचा विपरित परिणाम 'असमान वागणूकीची भावना' तयार होण्यात होईल - जी ऋन्मेषच्या वरच्या प्रतिसादात व्यक्त होत आहे.
मी लहानपणी आई वाचत असलेल्या
मी लहानपणी आई वाचत असलेल्या श्रावणातल्या कहाण्या ऐकायचो. मला त्यातील सोमवारच्या कहाणीतील खुलभर दुधाची गोष्ट आठवते
देवाचा गाभारा दुधाने भरून वाहील असा संकल्प राजाने केला व सक्तिने सर्व नागरिकांना स्वतःला थेंबही न घेता सगळे दूध देवळात आणुन घालायचा हुकुम सोडला. सार्या गावाने सगळे दूध ओतले तरी गाभारा भरेना. अखेर एक म्हातारी आली. तिने राजाचा हुकुम बाजुला सारून आपल्या घरच्या वासराना, लेकराना दूध पिऊ दिले आणि उरलेले खुलभर दूध ती देवळात घेऊन आली. तिने आपला गडु देवावर ओतताच गाभारा ओसंडुन वाहु लागला.
आता मला मोठेपणी ऐकलेली 'खुलभर पाण्याची' कहाणी आठवली. देवाचा गाभारा दुधाने भरून वाहील असा संकल्प लोकशाही राजाने केला व अनासक्तिने सर्व नागरिकांना स्वतःला थेंबही न घेता सगळे दूध देवळात आणुन घालायचे आवाहन केले.
कोणी विचार करु लागला कि इतर लोक दुध टाकणार आहेतच तर आपल्या एखादा तांब्या पाण्याने काय होणार आहे? चला आपण पाणीच टाकू
कोणी विचार करु लागला कि इतर लोक साले चोर आहेत पाणी टाकतील मग आपण दुध टाकले तरी त्याचा काय उपयोग? चला आपण पाणीच टाकू.अशा रितिने सर्व गाभारा पाण्याने ओसंडून वाहू लागला. पाण्याने ओसंडून वाहू लागला.
तसे इथे माझ्या एकट्याच्या प्रदूषणाने काय होणार आहे इथे कितीतरी प्रदूषण करणारे अन्य घटक आहेत.माझ्या एकट्याच्या फटाके न वाजवण्याने वा कमी वाजवण्याने काय होणार आहे? प्रतिसादात उदय यांनी जी भूमिका मांडली ती अगदी माझ्या मनातील आहे. माझीही तीच भूमिका असते. " कालानुरुप मनुष्याचे विचार बदलतात, समोर एखादी नवी माहिती आल्यावर मी माझी भुमिका तपासतो, आणि प्रसंगी बदलतो. क्वचित प्रसंगी , माझी आजची भुमिका काल घेतलेल्या भुमिकेच्या अगदी विरुद्धही असेल..."
लहानपणी एसी आणि कार किती
लहानपणी एसी आणि कार किती जणांकडे होते?
प्रत्यक्ष आयुष्यातील समस्या
प्रत्यक्ष आयुष्यातील समस्या फारच गुंतागुंतीच्या आहेत. कहाण्यांमधल्या सरधोपट चूक-बरोबर, हिरो-व्हिलन छाप लॉजिक अनेकवेळा लागू होत नाही हे आपल्याला माहीत आहेच. खुलभर पाण्याची कहाणी प्रत्यक्षात घडली तर 'मी लॅक्टोज इन्टोलरंट असल्याने नारळाचं दूधच पितो, ते चालेल का', ' आमचं दूध जर्सी गाईचं आहे, जी स्थानिक नाही, ते देवळात चालेल का', 'इतके महाग दूध ओतणे कितपत योग्य आहे', 'अन्नाची नासाडी चुकीची आहे', 'गरिबांना द्यायच्या ऐवजी गाभार्यात कसलं दूध ओतत आहात', 'दूध ओतल्यानंतर ते वाहून जाऊन पाण्याच्या स्रोतांत मिसळत असेल तर ते पर्यावरणाचे नुकसान आहे' - अशी अनेक मतमतांतरे आढळतात. चर्चा त्यामुळेच लांबली आहे. दूध ओतणारे योग्य आणि पाणी घालणारे चुकीचे - इतका सरळसोट मामला असता तर प्रश्न कधीच सुटला असता.
थोडक्यात काय तर आपण सगळ्यांनी
थोडक्यात काय तर आपण सगळ्यांनी फटाके उडवले पाहिजे आणि एकमेकांना फटाके उडवण्यास मदत केली पाहिजे हे या धाग्यावरून निष्पन्न होते.
त्यामुळे ठराविक समजूतदार
त्यामुळे ठराविक समजूतदार लोकांनी पर्यावरण सांभाळायचे आणि इतरांनी नाही - असा भेद राहणारच. त्याचा विपरित परिणाम 'असमान वागणूकीची भावना' तयार होण्यात होईल - जी ऋन्मेषच्या वरच्या प्रतिसादात व्यक्त होत आहे.
>>>>
एक्झॅक्टली!
आणि हे समजूतदारपणाचे वागणे सिलेक्टीव्हली मुलांकडून एक्स्पेक्ट करणे अवघड आहे.
म्हणजे म्हटले तर आदर्शवादी विचार आहे की बाकीच्या मुलांना फोडू दे काय फोडायचे आहे ते, आपण आपल्या मुलांना तर फटाके फोडण्यापासून अडवू शकतो ना.. पण हे प्रॅक्टीकल नाहीये. मला तरी नाही जमलेय हे. आणि मला ती जोरजबर्दस्ती करणे योग्य वाटत नाही. स्पेशली तो निकषही सिलेक्टीव्हली फटाक्यांना लाऊन. कारण आपल्या आपण दैनंदिन जीवनात ईतर प्रदूषणास हातभार लावणार्या गोष्टी करतच आहोत. त्या थांबवू तर मुलांना समजवायला तोंड राहील ना. माझ्याकडे तरी नाहीये ते तोंड.
उदाहरणार्थ परवाच दिवाळी निमित्त फॅमिली गेट टूगेदरला सारे जण फसफसणारे कोल्ड्रींक पित होते तर मुलीनेही प्यायचा हट्ट धरला. मी नकार दिला. हे मोठ्यांचे पेय आहे म्हणालो. तसे तिने तिच्या काही मैत्रीणी पितात हे सांगितले तरी त्या चुकीचे करताहेत हे सांगू शकलो. कारण मी स्वतः कोल्ड्रींक पित नाही. मला बोलायला तोंड होते.
आणि मग चाईल्ड सायकॉलॉजी आलीच, ज्या गोष्टी जबरदस्ती करायला अडवाल, त्या मुद्दाम करतील किंवा मग त्यामागच्या मूळ हेतूचाच ते राग करू लागतील. त्यामुळे प्रदूषणाची चिंता आणि कळकळ आधी वर्षभर आपल्या दैनंदिन व्यवहारात दिसू द्या त्यांना, मग त्यांना दिवाळीला समजवायला जाल तर ते पटेल त्यांना..
https://twitter.com/ANI
https://twitter.com/ANI/status/1457560578994491392
छठपूजेनिमित्त यमुनेच्या फेसाळलेल्या पाण्यात पवित्र स्नान करणारे श्रद्धाळू.
पाण्याला फेस कसा आला हे त्यांना माहीत आहे. पण श्रद्धा आणि रूढी अधिक महत्त्वाच्या.
फटाके आरोग्य आणि पर्यावरणाला कसे घातक आहेत ते माहीत आहे. पण आनंद , रूढी, धर्माभिमान अधिक महत्त्वाचे.
कार्बन फूट प्रिंट, प्रदूषण ,
कार्बन फूट प्रिंट, प्रदूषण , demonstration effect असा मोठा मोठा विचार करूच नका. तुम्ही फक्त तुमच्या मुलांच्या सुरक्षिततेचा संकुचित विचार करा. फटाक्यांचा आनन्द घेताना ठिणगी डोळ्यात गेली आणि नको ते झालं तर मुलगा कायमचा जीवनातल्या मोठ्या आनंदाला मुकणार आहे. फटाक्यांचा आनन्द ( मुळात त्यात आनन्द असतो हेच मला पटत नाही ) आणि त्या साठी घेतलेली रिस्क ह्याच त्रैराशिक मांडा. काही विपरीत घडलं तर मुलगाच म्हणेल "मी लहान होतो पण बाबा तर मोठे होते ना ,त्यानी का मला आगीशी खेळू दिलं " … ह्याचा विचार करा म्हणजे आपोआप कोडं सुटेल आणि फटाक्यांवर बंदी, उत्पादनावर बंदी अश्या कुबड्यांचा आधार घ्यावा लागणार नाही नो फटाके साठी.
उद्या मुलं मोठी झाली आणि
उद्या मुलं मोठी झाली आणि त्यांनी विचारले "का हो आमच्या लहानपणापासूनच तर या प्रदूषणाबद्दल, ग्लोबल वार्मिंग बद्दल जागरूकतेचे बरेच प्रयत्न चालू होते, तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं त्याबद्दल? आजच्या एवढी वाईट परिस्थिती टळली असती ना." तर त्यांना काय सांगणार?
"आम्हाला असं वाटलं की जे जागरूकतेचा प्रयत्न करत आहेत ते सगळे दुटप्पी आहेत, स्वतः वाटेल तसे प्रदूषण करून दुसऱ्यांना उपदेश करणारे ढोंगी आहेत, म्हणुन तुम्हाला नाही सांगितलं, उलट प्रोत्साहित केलं." ..?
मुलांना सायकल चालवायला शिकवू
मुलांना सायकल चालवायला शिकवू नका, मुलांना अजिबात पोहायला शिकवू नका, खेळायला सोडू नका, सहलीला पाठवू नका. मुलांना अपघात झाला तर मुलंच बोलतील आम्ही लहान होतो पण आमचे पालक मोठे होते ना. मुलांना अजिबात बाहेरचं खायला देऊ नका. हेल्थ प्रॉब्लेम झाले तर मुलं बोलतील आम्ही लहान होतो पण आमचे पालक मोठे होते ना. मुलांना अजिबात टीव्ही मोबाईल सिनेमे दाखवू नका डोळे खराब झाले तर मुलं बोलतील आम्ही लहान होतो पण आमचे पालक मोठे होते ना.
आणखी २०-३० वर्षांनी
आणखी २०-३० वर्षांनी पर्यावरणाची जी स्थिती असेल ती पाहता, आम्हांला जन्माला का घातलंत असा प्रश्न नक्की विचारतील मुलं.
आता तुम्ही का जन्मलात असं विचाराल.
दिवाळीत फटाके उडवायला नेमकी
दिवाळीत फटाके उडवायला नेमकी सुरुवात केव्हा झाली?
वात पेटवल्यावर
वात पेटवल्यावर
मुलांना सायकल चालवायला शिकवू
मुलांना सायकल चालवायला शिकवू नका, मुलांना अजिबात पोहायला शिकवू नका, खेळायला सोडू नका, सहलीला पाठवू नका. ......
>>>
खरंय, मला सायकल चालवता येत नाही. मला बाईक चालवता येत नाही. कारण मी एकुलता एक होतो. मला अपघात होईल या भितीने माझ्या पालकांनी मला कधी हे चालवायला शिकायला प्रोत्साहीतच नाही केले. कधी मला गच्चीवर पोरांसोबत पतंग उडवायला नाही पाठवले. त्यामुळे मला पतंगही उडवता येत नाही. तसेच मला पोहताही येत नाही. कारण पुन्हा तेच.. मला शाळेच्या सहलीला जायची परवानगीही थेट नववीत मिळाली. बिल्डींगमधील मित्रांसोबत तर कॉलेजला गेलो तेव्हाच पहिली ट्रिप झाली. याआधी फक्त ते फिरून आल्यावर त्यांच्या गप्पा ऐकायचो.
आज माझ्यासोबत लहानाचे मोठे झालेल्या सर्व मित्रांना हे करता येते, करून झालेय, तसेच लहानपणी हे सर्व करताना त्यांनी खूप मौजमजा केली. मी माझ्या आईवडिलांना काय प्रश्न विचारू आता. त्यांनी प्रेमापोटी केले. काळजीपोटी केले. पण याचा अर्थ माझ्या मित्रांच्या आईवडिलांना त्यांची काळजी नव्हती असेही नाही. मुळात मुलांना चार फटाके ऊडवू दिले म्हणजे त्यांना आगीशी खेळ करायला लावलेय हे चुकीचे गृहीतक आहे. मूल काय वयाचे आहे त्यानुसार सारेच आईबाप काळजी घेतात. तसेच फटाके वाजवून बघ, काय आनंद मिळतो असे आपण मुलांना सांगत नाही. त्यांचा आनंद तेच शोधतात आणि फटाके हवेत म्हणून हट्ट धरून बसतात.
आणि हो, आता माझ्या आईवडीलांनी मला काळजीपोटी हे करू दिले नाही म्हणून आता मी माझ्या मुलांना हवे ते करू देणार का असे कोणी ईथे मुद्दा उपस्थित करू नका. हे एक मायबोलीवर नेहमी होतेच, सोयीने अर्थ शोधले जातात
मुद्दा ईतकाच आहे की जगात अश्या बर्याच आनंदाच्या गोष्टी आहेत ज्यात कमी अधिक प्रमाणात रिस्क असतेच, त्यामुळे ते करूच नये असे नसते. आणि आयुष्यात जराही रिस्क उचलायची नाही असे ठरवले तर आपण ईतक्या विविध आनंदांना मुकू की मग जगलोच का हा प्रश्न मरताना पडेल
प्रदूषणावरून रिस्क कडे
प्रदूषणावरून रिस्क कडे कोलांटी उडी.
रिस्क मॅनेज करून आंनद लुटता येतो. संरक्षक गोष्टी वापरता येतात.
रिस्क ही एक शक्यता असते.
रिस्क ही एक शक्यता असते. अपघात होईलच असं नाही.
पण फटाक्यांनी आवाज, धूर होण्याची , हवेत केमिकल्स मिसळणं यांची शक्यता १०० टक्के आहे.
(No subject)
आठवड्यातून एक दिवस गाडी न
आठवड्यातून एक दिवस गाडी न वापरणे, २/३ km परिघात cycle किंवा चालत जाणे, सूर्यप्रकाशाचा भरपूर वापर, बिनमहत्वाचा विमान प्रवास टाळणे; अश्या शाश्वत लॉन्ग लास्टिंग पर्यावरण friendly गोष्टी बद्दल न बोलता; फक्त फटाक्यांवर का चर्चा केली जाते?
जर आईवडील वर्षभर अश्या गोष्टी करून एक उदाहरण समोर ठेवत असतील, तर ते मुलांना सांगू शकतात, कि ४ दिवसाच्या ऐवजी १/२ दिवस ग्रीन फटाके उडवूया. किंवा मूलही नाही फार उडवणार. नाहीतर आत्ताची पिढी जून्या पिढीला hypocrite म्हणू शकते.
मला ऋन्मेशचं म्हणणं पटतय.
मला ऋन्मेशचं म्हणणं पटतय. आम्ही इथे बऱ्याच फुलबाज्या
लावल्या. मुलाने त्या जोरात गोल फिरवून त्यात वर्तुळ दिसतं, जळताना दोन एकमेकांना टेकवल्या तर चिकटतात, त्या आगीतून दुसरी पेटते असे आपले आपण शोध लावले. आम्हाला मजा आली.
आता संपली दिवाळी. उरलेले फटाके आता पुढच्या वर्षी वाजवू.
बोकलत मराठी कॅलिग्राफी चांगली
बोकलत मराठी कॅलिग्राफी चांगली जमली. एकंदर दिवाळी सुट्टीत कॅलिग्राफीशिकायचं मनावर घेतलत.
"मोठा आवाज करून इतरांचे लक्ष
"मोठा आवाज करून इतरांचे लक्ष वेधून घेणे आणि त्यातून आनंद मिळवणे"
या मानसिकतेतून जोरदार कर्कश्श स्पीकर्स लावणे. कानठळ्या बसतील असे फटाके रात्री बेरात्री फोडणे इत्यादी प्रकारांचा जन्म झाला असावा. आदिम अवस्थेत असताना जोरदार ओरडणे, किंवा वाद्याचा जोरदार आवाज काढून लक्ष वेधून घेणे इत्यादी गोष्टी त्या काळानुसार कदाचित उचित असतीलही. पण आजच्या सिव्हिलाईज्ड समाजात या प्रकारांचे समर्थन कसे होऊ शकते हे कळत नाही. वरचे सगळे प्रतिसाद वाचलेले नाहीत. काहींनी कदाचित समर्थन केलेही असेल. इतर ग्रुप्स आणि फोरम्सवर सुद्धा याबाबत उलटसुलट चर्चा सुरु असते. सणासमारंभात फटाके वाजवणे, कर्कश्य आवाजात स्पीकर्स लाऊन गोंगाट करणे हे सगळे योग्य कसे याच्या बाजूने समर्थन देणारे असतात. पण त्याबाबतचे कोणत्याही प्रकारचे समर्थन कधीच मनाला पटले नाही.
दीपावली बाबत बोलायचे तर त्या नावातच स्पष्ट आहे. दीप म्हणजे दिवे व प्रकाशाचा सण आहे. यात फटाके वाजवायची परंपरा कुणी कधी सुरु केली याबाबत मतमतांतरे असतील. पण या परंपरेला फार जुना इतिहास असेलसे वाटत नाही. पण वर उल्लेखलेल्या मानसिकतेमुळे त्या परंपरेला बळ मिळत गेले असावे. आणि मग दीपावलीची धुरावली आणि स्फोटावली झाली. रात्री बेसुमार वायू आणि ध्वनी प्रदूषण आणि सकाळी उठून पहावे तर बेचिराख झालेल्या फटाक्यांच्या कागदाच्या चिंध्यांनी सगळे रस्ते भरलेले. सफाई कामगार शांतपणे तो सगळा कचरा साफ करत असतात. हे सगळे नक्कीच आनंददायी वाटत नाही. त्यामुळे फटाक्यांचे कधीच समर्थन करावे वाटले नाही.
फटाके आणि कर्णकर्कश लाउडस्पीकर यांना एकतर सरसकट बंदी असावी किंवा शहरात ठराविक ठिकाणीच (जसे मोकळी मैदाने), त्या दोन्ही गोष्टीना परवानगी द्यावी असे वाटते. अर्थात कायदा तेंव्हाच येतो जेंव्हा त्याला जनाधार असतो. त्यामुळे सध्याच्या मानसिकतेत तरी ते शक्य वाटत नाही. मोठमोठ्यायाने ओरडून भांडण करणे जसे सभ्यपणाचे वा सिव्हिलाइज्ड असल्याचे लक्षण मानले जात नाही त्यानुसार या गोष्टी (फटाके वाजवणे लाउडस्पीकर लावून गोंगाट करणे इत्यादी) सुद्धा सभ्यपणाचे/सिव्हिलाइज्ड असल्याचे लक्षण मानले जाणार नाहीत (बहुतांश लोकांकडून) तोवर वाट पहावीच लागेल.
प्रदूषणावरून रिस्क कडे
प्रदूषणावरून रिस्क कडे कोलांटी उडी.
>>>>
मानव पृथ्वीकर + ७८६
बहुधा प्रदूषणाच्या मुद्द्यावर आपण मोठी माणसेही ईतर बरेच गोष्टींतून प्रदूषण करतो आणि ते बदलता येणे सहज शक्य नाही हे लक्षात आल्याने आता रिस्कचा मुद्दा घेण्यात आला असावा
नाहीतर आत्ताची पिढी जून्या पिढीला hypocrite म्हणू शकते.
Submitted by jollyjui on 8 November, 2021 - 17:35
>>>>>
ते ती म्हणणारच आहे.
आठवड्यातून एक दिवस गाडी न वापरणे
>>>>>>
जर कोणी आठवड्यातून एक दिवस गाडी न वापरता दुसरा काही मार्ग शोधू शकतो तर रोज का नाही?
"मोठा आवाज करून इतरांचे लक्ष
"मोठा आवाज करून इतरांचे लक्ष वेधून घेणे आणि त्यातून आनंद मिळवणे"
>>>>>>
हे एकच लॉजिक फटाक्यांमागे असावे हे काही पटले नाही.
तेच एक लॉजिक डीजेलाही लावलेय हे देखील पटले नाही.
मोबाईलवर गाणे लाऊन नाचणे आणि डीजे स्पीकरवर गाणी लाऊन नाचणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
अर्थात हे मोठ्या आवाजाचे समर्थन करत नाहीये. फक्त लॉजिक ओढूनताणून विरोध करणारे वाटले.
डीजेमध्ये वाजणारी मोठ्या आवाजातली गाणी असो वा मोठ्या आवाजांचे फटाके असो, यातून मनाला काहीतरी आनंद मिळतोच.
फक्त तो आनंद उचलताना आपण कोणाला त्रास तर देत नाही आहोत याचे सामाजिक भान हवे. ते गरजेचे आहे. हा योग्य मुद्दा आहे. पण या गोष्टीतून आनंदच मिळत नाही वा जे मिळते तो विकृत आनंद असतो हा मुद्दा चुकीचा आहे.
आम्हाला शाळेत सरांनी आवाज आणि गोंगाट यातील फरक सांगितला होता.
कॉलेजात सरांनी तेच साऊंड आणि नॉईज यातील फरक ईंग्लिशमध्ये सांगितला होता.
नॉईज म्हणजे अनवाँटेड साऊंड
जर तुम्ही डीजेवर आपले पाय थिरकवत असाल तर तुम्हाला त्या आवाजाचा त्रास न होता तो आवाज हवाहवासा वाटणार.
पण तेच तुमच्या शेजारच्या घरात पार्टी आहे आणि तुमचे त्या शेजार्याशी फारसे सख्य नसल्याने त्याच्या पार्टीत ईंटरेस्ट नसेल तर लांबून आणि किंचित कमी येणारा आवाजही तुम्हाला त्रासदायक वाटणे स्वाभाविक आहे.
थोडक्यात तुम्हाला फटाके वाजवणे वा डीजेवर नाचणे मुळातच आवडत नसल्यास तुम्हाला यानिमित्ताने झालेला प्रत्येक आवाज जास्त त्रास देणार.
अर्थात, पुन्हा सांगतो हे अश्या मोठ्या आवाजात डीजे वाजवणार्यांचे समर्थन नाही. आपण कुठे आवाज करतोय, शेजारी कोण आहेत, त्यांना त्रास होतोय की नाही हे बघणे आणि त्यानुसार काळजी घेण्याचे सामाजिक भान असलेच पाहिजे. हा योग्य मुद्दा आहे.
पण तुम्हाला पार्टी करायला मोठ्या आवाजात गाणी लावायची गरजच काय? नुसते खाऊन पिऊन छान छान कपडे घालून पत्ते कॅरम खेळून नाही का पार्टी करता येत हा चुकीचा मुद्दा आहे.
शास्त्रीय संगीत महोत्सवात
शास्त्रीय संगीत महोत्सवात मोठ्या पटांगणावर माईकवर जे गायलं जातं, किंवा मोठमोठ्याने मृदंग बडवतात, त्याचा आजूबाजूच्या रहिवाश्यांना त्रास होतो हे ऐकून आहे. त्यामुळे एखाद्याला अमुक एक गोष्टीत काय आनंद मिळतो हे दुसऱ्याला कळणे अवघड असू शकते. मी स्वतः शास्त्रीय संगीत आवडीने ऐकतो, पण अनेक मित्र-मैत्रिणींना 'ते काय रडगाणं ऐकत बसतो' असं वाटतं. पण म्हणून काय ते सुसंस्कृत नाही असं नाही. माझा आनंद हा खराच आहे, तो नक्की कशामुळे उत्पन्न होतो, हे मला शब्दात मांडता येत नाही इतकंच.
बंजी जम्पिंग करणारे, विमानातून उड्या मारणारे कुठला आनंद उपभोगतात, हे काही लोकांना कळणार नाही. त्यांना वाटेल की एवढं स्वतःच्या शरीराला आणि मेंदूला त्रास देऊन मरण सिम्युलेट करण्यात कसला आनंद आहे?
असेच फटाक्यांचे असावे. ज्यांना ती भावना उत्पन्न होत नाही, त्यांना तो आनंद कमी, हीन दर्जाचा वाटतो. इतरांच्या आनंदाला कमी न लेखता, ते करत आहेत ते का चुकीचे आहे हे वस्तुनिष्ठपणे सांगावे असे मला वाटते.
>>जर कोणी आठवड्यातून एक दिवस
>>जर कोणी आठवड्यातून एक दिवस गाडी न वापरता दुसरा काही मार्ग शोधू शकतो तर रोज का नाही?<<
"प्रॅक्टिस बिफोर यु प्रीच" याची इक्विवॅलंट मराठी म्हण काय आहे? इथे बर्याच जणां/णींना चपखल बसु शकेल...
>> तो आनंद उचलताना आपण कोणाला
>> तो आनंद उचलताना आपण कोणाला त्रास तर देत नाही आहोत याचे सामाजिक भान हवे.
हेच! आनंद कुणी कशात घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न. फक्त आपल्या आनंद घेण्याच्या नादात इतरांना त्रास तर होत नाही ना याचे भान असावे.
>> असेच फटाक्यांचे असावे. ज्यांना ती भावना उत्पन्न होत नाही, त्यांना तो आनंद कमी, हीन दर्जाचा वाटतो.
असे नाही. कोणत्या आनंदाचा काय दर्जा असावा हे व्यक्ती सापेक्ष आहे. कुणी कशात आनंद घ्यावा हा सुद्धा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न. फक्त, वर उल्लेख केल्यानुसार, त्या आनंद घेण्याच्या नादात इतरांना त्रास होऊ नये वा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष नुकसान पोहोचू नये इतकेच. असा त्रास होऊ शकतो हे सुद्धा कैकदा अनेकांच्या गावीही नसते.
<< "प्रॅक्टिस बिफोर यु प्रीच"
<< "प्रॅक्टिस बिफोर यु प्रीच" याची इक्विवॅलंट मराठी म्हण काय आहे? >>
------ आधी केले मग सांगितले...
समोरचा/ची आधी स्वतः न करताच
समोरचा/ची आधी स्वतः न करताच इतरांना सांगतोय/तेय असे सोयीस्कररीत्या गृहीत धरणे बंद करा.
याला इंग्रजीत काय म्हणतात ते ही लिहा कुणीतरी.
प्रॅक्टिस बिफोर यु प्रीच"
प्रॅक्टिस बिफोर यु प्रीच"
आधी केले मग सांगितले.
>>>>
+७८६
म्हणून मी ईथे तेच सांगतो जे मी करतो. गाडी न घेण्याबाबतही मी याच प्रदूषणाच्या पाँईट ऑफ व्यू ने आजतागायत ठाम आहे. अन्यथा घरच्यांचे (आई वगळता पुर्ण फॅमिली), ऑफिसच्यांचे (स्पेशली सेक्शन मॅनेजर), आणि आता सोसायटीवाल्यांचे (स्पेशली कमिटी मेंबर्सचे) फार प्रेशर आहे माझ्यावर गाडी घेण्यासाठी. असो, यावर स्वतंत्र धागा काढतो. अन्यथा आधी जे केले ते सांगायला ईथे लिहिले तरी म्हणाल ऋन्मेष धागा हायजॅक करतो
पण एक आहे, एकदा तुम्ही गाडी वापरू लागला तर तुम्हाला फिरून गाडीचा त्याग करून पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणे फार अवघड आहे. याची मला कल्पना आहे.
आनंद घेण्याच्या नादात इतरांना
आनंद घेण्याच्या नादात इतरांना त्रास होऊ नये वा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष नुकसान पोहोचू नये >> सहमत!
समोरचा/ची आधी स्वतः न करताच इतरांना सांगतोय/तेय असे सोयीस्कररीत्या गृहीत धरणे बंद करा.
याला इंग्रजीत काय म्हणतात >> स्टॉप कन्व्हिनियंटली अझ्यूमिंग दॅट द पर्सन इन फ्रंट इझ टेलिंग अदर्स विदाउट प्रॅक्टिसिंग इट देम्सेल्व्झ ( हुश्श! सगळं तर्खडकरीय ज्ञान पणाला लागलं हे लिहिताना. चू भू द्या घ्या.)
Pages