दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.
फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!
ज्या ज्या कुटुंबांनी
ज्या ज्या कुटुंबांनी स्वयंस्फूर्तीने आपली दिवाळी ही प्रदूषणमुक्त व पर्यावरण पुरक साजरी करुन देशाच्या प्रगतीत, वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यात हातभार लावला त्या सर्वांच अभिनंदन! ज्यांनी सर्वोच्च न्यायलयाच्या निकालाचा आदर राखून अंमलबजावणी केली त्यांचही अभिनंदन!
या धाग्याला आता ७ वर्शे झाली.
या धाग्याला आता ७ वर्शे झाली. यावरील प्रतिक्रियांचे आता पुनरावलोकन करा.कालसुसंगत होताना काहींना अतिशय त्रास झाला असेल. सगळेच लोक आपली सनातन मानसिकता वेगाने कशी बदलू शकतील हा प्रश्नही तितकाच रास्त आहे. सनातन प्रभात ने देखील सुरवातीपासून फटाक्यांना आपला विरोध दर्शवला आहे. कारण फटाके हा आपल्या संस्कृतीचा भाग नाही. कारण काही असो पण अंनिस व सनातन वाले यांचे यावर एकमत आहे.
. कारण काही असो पण अंनिस व
. कारण काही असो पण अंनिस व सनातन वाले यांचे यावर एकमत आहे >>>>>>
चला ! किमान या मुद्द्यावर तरी त्यांचे एकमत आहे .
आमच्या ही घरी फटाक्यांविना दिवाळी ला सूर वात झाली !
कोविडमुळे प्राणवायुचे महत्व
कोविडमुळे प्राणवायुचे महत्व या दीड दोन वर्षात लोकांना कळले असूनही वायु व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके वाजवले जातात? असा प्रश्न एका सहकार्याने विचारला आहे. गोष्ट खरी आहे. पर्यावरणाला निर्विवादपणे घातक असणारी गोष्ट आपल्याला समजत असूनही सुसंस्कृत समजणारे सुद्धा लोक फटाके का वाजवतात. प्राणवायुविना तडफडणारे मृत्यु आपण या काळात पाहिले आहेत, वाचले आहेत, ऐकले आहेत. आमच्या गृहसंकुलात देखील फटाके लक्ष्मीपूजनाला भरपुर उडवले. प्रबोधनाच्या तुलनेत फटाके उडवण्याची उर्मी ही जास्त असावी. फक्त निर्बुद्ध लोकच फटाके उडवतात या मताशी मी सहमत नाही.
प्रबोधनाच्या तुलनेत फटाके
प्रबोधनाच्या तुलनेत फटाके उडवण्याची उर्मी ही जास्त असावी >> +१ (सहमत)
प्राणवायुविना तडफडणारे मृत्यु आपण या काळात पाहिले आहेत >> -१ (म्हणजे असहमत). ह्याचा हवेतील प्राणवायूशी आणि त्याच्या प्रमाणाशी काही संबंध नाही. प्राणवायूच्या सिलेंडरची मागणी वाढली व पुरवठा तेवढा नव्हता, त्यामुळे झालेले ते दुर्दैवी मृत्यू आहेत. हवेत दिल्लीपेक्षा भयानक प्रदूषण असते, पण पुरवठा योग्य प्रमाणात असता तरी ते मृत्यू कमी झाले असते.
फटाके उडवण्याची ऊर्मी - हे तुम्ही सांगितलेले कारणच जास्त पटण्यासारखे आहे. प्रबोधनात फटाक्यांच्या ज्या तोट्यांकडे लक्ष वेधलं जातं, त्यावर दुर्दैवाने अजूनतरी लोक लक्ष द्यायला तयार नाहीत. कदाचित त्यांना महत्त्वाच्या वाटणार्या समस्या ह्यापेक्षा वेगळ्या असाव्यात.
फटाक्यांच्या किमती काहीतरीच
फटाक्यांच्या किमती काहीतरीच असतात या एका कारणामुळे मी फटाके उडवत नाही. रिलायन्सने जिओ आणला तसं फटाको पण आणायला पाहिजे म्हणजे फटाके स्वस्त होतील. फटाके स्वस्त झाल्यावर मी दिवसरात्र फटाके वाजवणार आहे. दिवाळी आणि फटाके यांचं एक अतूट नातं आहे. बाकी प्रदूषण वैगेरे होतं हे जे लोकं बोलतात त्यांना आपण इतरांपेक्षा किती विचारवंत आहोत हे दाखवायचं असतं. स्वतःची खोटी स्तुती करण्यात हे लोकं धन्यता मानतात. दुसऱ्यांच्या घरी फराळाला गेले की फटाक्यांमुळे कसा पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, ग्लोबल वॉर्मिंग होतंय या विषयांवर नेटवर वाचलेलं काहीतरी बरळतात आणि चार पाच अवघड शब्द समोरच्यावर फेकतात. म्हणजे समोरच्या व्यक्तीला पण वाटतं की हा मोठा विचारवंत आहे. मग काय यांना हेच पाहिजे असतं. आणि हे लोक फक्त दिवाळीमध्ये फटाके वाजतात त्यांनीच प्रदूषण कसं होतं हे समोरच्याला पटवून देत असतात बाकी इतर धर्मियांच्या सणाला वाजणाऱ्या फटाक्यांवर हे हाताची घडी तोंडावर बोट ठेऊन असतात. मग हे वर्षभर प्रायव्हेट गाडीने फिरतात, ऑफिसात घरात ac लावतात, घरात सागाची फर्निचर पाहिजे म्हणून अट्टाहास धरतात. म्हणजे आपण स्वतः वर्षभर प्रदूषण करत फिरतो त्याकडे कानाडोळा करायचा आणि दिवाळीच्या तीन चार दिवसात लागणाऱ्या फटाक्यांवर आक्षेप घ्यायचा. समाजात असे काही लोक्स असतात ज्यांना आपण मजा केलेली, आपलं व्यवस्थित सुरू असलेलं चालतं पण दुसऱ्या कोणी मजा केली, दुसऱ्याचं व्यवस्थित सुरळीतपणे सुरू असलेलं दिसलं की यांच्या पोटात दुखायची सुरवात होते. हे लोक्स समाजासाठी घातक असतात.
-१ (म्हणजे असहमत). ह्याचा
-१ (म्हणजे असहमत). ह्याचा हवेतील प्राणवायूशी आणि त्याच्या प्रमाणाशी काही संबंध नाही.>>>> थोड अधिक स्पष्ट करतो. वायुप्रदुषण दिवाळीच्या काळात अधिक होते. त्यामुळे श्वसनाचे त्रास होतात ही अगदी सहज अनुभवता येणारी गोष्ट आहे. दम्याच्या लोकांना तर हे अधिकच जाणवते. तडफडणे या मुद्द्याची तुलना मला श्वसनाच्या त्रासाशी करायची होती मृत्युशी नाही. प्राणवायुचे महत्व अधोरेखित करण्यासाठी मी ते घेतले आहे. फटाक्यामुळे ध्वनी व वायुप्रदूषण होते हा मुद्दा तर वादग्रस्त नाहीये ना?
हे लोक फक्त दिवाळीमध्ये फटाके
हे लोक फक्त दिवाळीमध्ये फटाके वाजतात त्यांनीच प्रदूषण कसं होतं हे समोरच्याला पटवून देत असतात बाकी इतर धर्मियांच्या सणाला वाजणाऱ्या फटाक्यांवर हे हाताची घडी तोंडावर बोट ठेऊन असतात>>सर्वोच्च न्यायालयाने केवळ हिंदू सण यापुरतेच निर्देश दिलेले नाहीत. तर नवीन वर्ष, सर्व धर्मांचे सण आणि उत्सव, विविध व्यावसायिक कार्यक्रम साजरे करणे, अशा सर्व प्रथा व कार्यक्रम यांच्यावर फटाकड्या प्रदूषण करत असतील तर बंदी घातली आहे. एवढेच नव्हे तर धार्मिक व सामाजिक कारणास्तव लाऊड स्पीकर, बेंजो आणि कर्णकर्कश्य वाद्यं यांच्यावरही ध्वनिप्रदूषण होऊ नये म्हणून बंदी घातली आहे.आता दिवाळी आहे म्हणून धागा व चर्चा दिवाळी निमित्ताने होते आहे एवढच. शिवाय प्रदूषणाचा तो एकमेव मुद्दा नाहीये. याकाळात ध्वनी व वायुप्रदुषण कमी काळात एकवटते हा मुद्दाही आहेच.
सर्वोच्च न्यायालयाने केवळ
सर्वोच्च न्यायालयाने केवळ हिंदू सण यापुरतेच निर्देश दिलेले नाहीत. तर नवीन वर्ष, सर्व धर्मांचे सण आणि उत्सव, विविध व्यावसायिक कार्यक्रम साजरे करणे, अशा सर्व प्रथा व कार्यक्रम यांच्यावर फटाकड्या प्रदूषण करत असतील तर बंदी घातली आहे. >>> हो हेच बोलतोय मी. सगळ्या सणांना निर्देश दिले आहेत पण फराळी विचारवंत फक्त दिवाळीबद्दल बोलतात ना. आता याच धाग्याच घ्या. 2013 च्या दिवाळीत हा धागा तुम्ही काढलात. आता हा धागा कधी वर आला ते बघा. 22 ऑक्टोबर 2014, 16 ऑक्टोबर 2017, 10 नोव्हेंबर 2018, 13 नोव्हेंबर 2020, 5 नोव्हेंबर 2021. आहेत ना सगळ्या दिवाळीच्या तारखा. वर ज्या तारखा आहेत त्या तारखेला धागा वर काढणारे तुम्हीच आहात. नवीन वर्षी होणाऱ्या फटाक्यांच्या प्रदूषणाबाबत तुम्हाला जनजागृती का करावीशी वाटली नाही? फक्त दिवाळी आली की हा धागा का वर काढावासा वाटतो?
मोठ्या बदलांची सुरूवात अनेक
मोठ्या बदलांची सुरूवात अनेक छोट्या बदलांनी होत असते. आपण छोटी छोटी पावलं उचलायला देखील खळखळ करणार असू तर मग आपल्याला आवश्यक ते मोठे बदल घडवणं किती कठीण आहे हे यावरून लक्षात येतं. अगदी बंद करणं शक्य नसेल तर ५०% कमी करा. तुमचं छोटंसं पाऊल ही मोठ्या बदलाची सुरुवात असते. जब तक तुम खुद कुछ नहीं बदलोगे, कुछ नहीं बदलेगा!
किनई, फटाके ज्या धर्मातल्या
किनई, फटाके ज्या धर्मातल्या सणाला वाजवले असतील त्या धर्मातल्या लोकांना बांधत नाहीत. म्हणजे दिवाळीचे फटाके हिंदूंना बांधत नाहीत आणि नववर्षाचे ख्रिश्चनांच्या. तसंच दिवाळीचे फटाके इतरांना बाधताणशत, नववर्षाचे हिंदूंना.
आता हिंदू बहुसंख्य आहेत किनै ?त्यांना त्या नववर्ष फटाक्यांचा
त्रिस होतो. आधी त्यावर बंदी आणली पाहिजे
मी आजपर्यंत कधी ही फटाके
मी आजपर्यंत कधी ही फटाके लावलेले नाहीत. भाजण्याची भीती ( ह्यात शोभेचे ही येतात ) हे लहानपणी एकमेव कारण होत. जस जशी मोठी झाले तस , फटाक्यांमुळे वाढणार धूर धुळीच साम्राज्य, कानठळ्या बसवणारा आवाज तो ही अनपेक्षित पणे दिवसाच्या किंवा रात्रीच्या कोणत्याही प्रहरी येणारा , ज्यावर आपला कंट्रोल शून्य, पैशाचा पूर्ण चुराडा अपव्यय ही कारण त्यात जमा होत गेली. त्यामुळे आमच्या कडे गेली अनेक वर्ष कधी एक ही फटाका येत नाही. सुगंधी साबण , फराळ, नवे कपडे दागिने, कंदिल पणत्या रांगोळ्या , मिष्टान्न भोजन हे सगळं असत पण फटाका एक ही नाही.
प्रदूषण आपल्याजागी बरोबर आहे,
प्रदूषण आपल्याजागी बरोबर आहे, सणांची धमाल आपल्या जागी योग्य आहे. मला वाटते मध्यममार्ग काढावा. फटाके मोठ्यांनी वाजवणे सोडावे. पण लहान मुलांना वाजवू द्यावेत आणि त्यांच्यासोबतच मोठ्यांनी फटाक्यांचा आनंद लुटावा. तसेच ज्यांना शक्य आहे ते मोकळ्या जागेत वाजवायची काळजी घेऊ शकतातच. मोठ्यांनी आपले मोठेपण जपावे, पण पोरांचे बालपण हरवू देऊ नये.
2013 च्या दिवाळीत हा धागा
2013 च्या दिवाळीत हा धागा तुम्ही काढलात. आता हा धागा कधी वर आला ते बघा. 22 ऑक्टोबर 2014, 16 ऑक्टोबर 2017, 10 नोव्हेंबर 2018, 13 नोव्हेंबर 2020, 5 नोव्हेंबर 2021. आहेत ना सगळ्या दिवाळीच्या तारखा>>>> धाग्याचा विषयच फटाकेमुक्त दिवाळी हा आहे त्यामुळे दिवाळीच्या वेळीच अशा धाग्याची आठवण येणे स्वाभाविक आहे.
वर ज्या तारखा आहेत त्या तारखेला धागा वर काढणारे तुम्हीच आहात.>>> हो मीच धागा काढल्याने त्याकडे प्रत्येक वर्षी लक्ष वेधून घेण्याचे काम मी करतो.
नवीन वर्षी होणाऱ्या फटाक्यांच्या प्रदूषणाबाबत तुम्हाला जनजागृती का करावीशी वाटली नाही? >>> नाही वाटली. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर फटाके दिवाळीतच उडवले जातात. शिवाय मी ज्या संस्कारात वाढलो त्यात दिवाळी हा माझ्या भावजीवनाचा भाग आहे ना! माझ्या आठवणी दिवाळीशी संबंधीत आहेत. नववर्षाशी नाही.
फक्त दिवाळी आली की हा धागा का वर काढावासा वाटतो?>>>> यालाच समयोचितता म्हणतात.
टिप्पणी- हे मुद्दे मला तुम्हाला फक्त हिंदू धर्मातल्या अंधश्रद्धा दिसतात का? या प्रश्नाची साम्य दाखवते.
कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर
कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर फटाके दिवाळीतच उडवले जातात. >>>
फराळी विचारवंतांचा विजय असो.
बोकलत, तुमचा मुद्दा पोहचला पण
बोकलत, तुमचा मुद्दा पोहचला पण थोडा समोरच्या व्यक्तीच्या वयाचा तरी मान ठेवत चला कमेंट करताना. तुमचे जेवढे वय असेल त्यापेक्षा जास्त वर्षे त्यांनी ज्योतिष प्रबोधन, अंनिस यांत काम केले असावे. फराळी विचारवंत रिअली ??
फराळी विचारवंत म्हणजे फराळ
फराळी विचारवंत म्हणजे फराळ करताना वैचारिक देवाणघेवाण करणारे. दिवाळी सण खास असतो आणि त्यात फराळ खाणे म्हणजे आरामात बसून टेन्शन वैगरे विसरून करण्याची कृती आहे. त्यात जे वैचारिक देवाणघेवाण करतात ते फराळी विचारवंत. मी काय कोणाचा अपमान वैगरे केला असे मला तरी वाटत नाही. तरीपण तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो. आणि वयाचा विचार करायचा झाला तर मॅटर नष्ट होत आणि नव्याने निर्माण होत नाही त्यामुळे घाटपांडे सर आणि मी एकाच वयाचे आहोत. अनंत काळापासून आम्ही आहोत आणि अनंत काळापर्यंत आम्ही राहू. म्हणजे आपण सगळेच. त्यामुळे मनुष्य अवस्था ही आपण फ्रॅक्षन ऑफ सेकंदासाठी जगत असणारी अवस्था आहे. आपल्या सगळ्यांची वये सेमच आहेत.
आपण वयाचा मुद्दा विचारात
आपण वयाचा मुद्दा विचारात घेण्यापेक्षा मुद्यांच वय विचारात घेउ. कारण जर व्यक्तीचे शारिरिक, मानसिक, बौद्धीक वय ही वेगळी असतात. शिवाय मूडनुसार मानसिक वय बदलतं. बोकलतचे स्पष्टीकरण पटणारे आहे. खेळीमेळीचे वातावरण हवेच फार गंभीर झालो तर संवादाची गंमत घेता येत नाही.
यावर्षी एकंदरच फटाक्याचे
यावर्षी एकंदरच फटाक्याचे प्रमाण सगळीकडेच बऱ्याच प्रमाणात कमी वाटतेय!!
बोकलत, नववर्षाच्या
बोकलत, नववर्षाच्या स्वागतासाठी लोक फटाके फोडत असतील तिथे जाऊन तुम्ही ते तुडवून विझवा. काही फटाक्यांचे भक्षण करा.
नाहीतर तुम्ही केक विचारवंत
नववर्षाचे फटाके वर जाऊन
नववर्षाचे फटाके वर जाऊन फुटणारे असतात. वर जाऊन फुटणारे फटाके म्हणजे रॉकेट आणि ते आतषबाजीचे फटाके. मी ते लावले की वेगळ्या दिशेने उडतात. त्यामुळे मी त्यांच्यापासून लांब राहतो. मी शाळेत खूप हुशार होतो. नासावाले माझ्या पाठीवर लागले होते आमच्या इथे ये आम्हाला तुझी गरज आहे. पण मी माझी आणि उडणाऱ्या फटाक्यांची फ्रिक्वेन्सी मॅच होत नाही म्हणून मी नकार देत होतो. शेवटी ते खूपच पाठीवर लागले तेव्हा मी त्यांना बोललो ठीक आहे मी येतो पण माझी जागा एक्झिटच्या जवळ ठेवा. त्यांनी विचारलं का तेव्हा मी त्यांना माझी हिस्ट्री सांगितली. मी बोललो माझं आणि रॉकेटचं वाकडं आहे. जेव्हा तुम्ही रॉकेट लॉन्च कराल तेव्हा ते वर न जाता इकडेतिकडे जाईल. चुकून जर आपल्या बिल्डिंगवर यायला लागलं तर मला सगळ्यात आधी बिल्डींगबाहेर पळता यावं म्हणून मला ती जागा पाहिजे. ते ऐकून नासावाले बोलले नको येऊ बाबा तू भारतातच थांब.
आत्ताच टीव्हीवर बघितले की
आत्ताच टीव्हीवर बघितले की यंदा मुंबईत आधीच्या तुलनेत ध्वनिप्रदूषण कमी झाले आहे. ही चांगली गोष्ट आहे.
लोकांचा पगार अर्धा झालाय, जॉब
लोकांचा पगार अर्धा झालाय, जॉब गेले हे कारण असू शकतं.
ध्वनिप्रदूषण कमी करण्याचा
ध्वनिप्रदूषण कमी करण्याचा उत्तम उपाय आहे की त्यांच्या किमती भरमसाठ वाढवायच्या आणि सार्वजनिक फटाके महोत्सव करायचा आणि फक्त आतिषबाजी होईल असे फटाके वापरायचे, जसे ऑलिम्पिकच्या वेळी करतात तसे.
यावर्षी एकंदरच फटाक्याचे
यावर्षी एकंदरच फटाक्याचे प्रमाण सगळीकडेच बऱ्याच प्रमाणात कमी वाटतेय!! >> हे मी न चुकता गेली दहा-पंधरा एक वर्षे भारतातल्या लोकांकडून ऐकतोय. जसं कोकणातले लोक यावर्षी आंब्याचं काही खरं नाही हे दरवर्षी ऐकवतात.
मुंबई त्याहुनही जास्त पुण्यात नॉन दिवाळी महिन्यात गेल्या दहा एक वर्षांत प्रत्येक भेटीत धूराचे प्रमाण अधिकाधिक वाढलेलेच जाणवले आहे. फटाके हा एक पझल पीस आहे. काही टँजिबल बदल दिसायला एकएक करत बरेच पीसेस हलवायला लागणार आहेत. ते टिपिंग पॉईंट येईपर्यंत होणार नाही. अर्थात तो इन्फ्लेक्शन पॉईंट असेल का डायरेक्ट टिपिंग पॉईंटच असेल ते कळेलच दहा एक वर्षांत.
बॉम्बसारखे फटाके वाजवण्यात
बॉम्बसारखे फटाके वाजवण्यात किंवा ऐकण्यात काय आनंद मिळतो हे मला कळत नाही. मलातर पोटात गोळा उठणे किंवा दचकणे हेच होते. जे अजिबात आवडत नाही. तसेच फटाके लागणाऱ्या रस्त्यावर फिरायचीही भीतीही वाटते. त्यात दिवाळीच नाही तर इतर लग्नात, वरातीत वगैरे उडवतात हे पण आवडत नाही. पैशाचा चुराडाच वाटतो.
हो लहानपणी उडवलेले आहेत शोभेचे फटाके. बॉम्ब कधीच नाही. पण जसे कळायला लागले तसे स्वतःहून बंद केले.
पूर्वी फटाके न वाजवण्यामागे बालकामगार शिवकाशीत काम करतात हे अर्ग्युमेण्ट असायचे. आता काय परिस्थिती आहे तिकडे ? आता कोण काम करते फटाक्याच्या फॅक्टरीत ?
काल मी पोरीला हाताने टिकल्या
काल मी पोरीला हाताने भिंतीवर घासून टिकल्या/रोल फोडायला शिकवले. तिला जमले. आवडले. मग त्यातच रमली.
फटाक्याची वात पेटवून दूरवर जाऊन कानात बोटे घालण्यापेक्षा यात थ्रिल जास्त मिळते आणि पोल्युशन देखील नगण्य होते.
>>बॉम्बसारखे फटाके वाजवण्यात
>>बॉम्बसारखे फटाके वाजवण्यात किंवा ऐकण्यात काय आनंद मिळतो हे मला कळत नाही.<<
चांगला प्रश्न आहे, उत्तर माझ्याकडे नाहि. तसं बघायला गेलं तर दिवाळी संबंधित बर्याच प्रश्नांची उत्तरं सध्या माझ्याकडे नाहित. पण लहानपणी फटाके फोडण्यात कधी गिल्टि फिलिंग आलं नाहि. उलट नरकचतुदर्शीला पहिला सुतळी बाँब लावण्यातला आनंद शब्दात नाहि मांडु शकत. भाऊबीजेची ओवाळणी चालु असताना लावलेल्या मोठ्या माळेचं अप्रुप नाहि सांगु शकत.
मेबी, तेंव्हा सोशल मिडिया, माबो अस्तित्वातच न्हवती म्हणुन असेल कदाचित...
दारुतला आनंद मांडायला राज
दारुतला आनंद मांडायला राज भाऊंचे शब्द नेहमीच तोकडे पडतात तर.
आमच्या भागात लक्ष्मीपूजनाच्या
आमच्या भागात लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी भरपूर फटाके फुटले.
काल तुलनेने कमी.
आज पहाटे, सकाळी एकही आवाज नाही.
शाळेतील मुलांचं प्रबोधन करून त्यांना शपथा दिल्या जात. त्याने फरक पडलाय.
मी लहान असताना एक दोन वर्षांचं आवाजाचे फटाके आणले असतील.
एका फटाक्याच्या वातीला उदबत्तीने पेटवा, तसं करताना कुठून कुठून येणाऱ्या आवाजांनी दचका, मग वात पेटली की मागे येऊन आवाजाची वाट बघा हे कंटाळवाणे वाटलं.
माळा लावण्याइतके फटाके आणले नव्हते. शिवाय पैशाची लाख हेही डोक्यात होतं.
वय वाढलं तस फुलबाज्या इ. लहान मुलांच्या झाल्याने बाद.
Pages