दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.
फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात. ओझोनचा थर पातळ होतो.एकदा मराठी विज्ञान परिषदेचा फटाक्यामागील विज्ञान या कार्यक्रमात फटाक्यात वापरल्या गेलेल्या रसायनांबदद्ल स्लाईड शो कार्यक्रम दाखवला होता.
कॉपर मुळे श्वसननलिकेत त्रास कॅडमियम मुळे किडनीला धोका आणि अॅनेमिया.शिशाचा मज्जासंस्थेवर परिणाम अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. अशा प्रदुषण करणार्या फटाक्यांपासून मुक्त राहून दिवाळी साजरी करता येणार नाही का? नक्कीच येईल. फटाक्या शिवाय दिवाळी ही कल्पनाच काहींना करवत नाही. कारण दिवाळी आणी फटाके यांची संलग्नता मेंदुमधे ठामपणे कोरली गेली आहे.पिढ्यान पिढ्या ती संक्रमित होत गेली आहे.कालसुसंगत नसलेल्या अनेक प्रथा परंपरा आज पाळल्या जातात.खर तर कालबाह्य रुढी परंपरा या एक प्रकारच्या अंधश्रद्धाच आहेत.मनाला वाटणार्या असुरक्षिततेमुळे ते मोडण्याचे धाडस आज बर्याच लोकांना होत नाही.अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ ही एक व्यापक समाज परिवर्तनाची चळवळ आहे.त्यामुळे अंनिस फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान नेहमी राबवते. विद्यार्थ्यांमधे ही पर्यावरण जागृतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे त्यांना फटाके मुक्त दिवाळीचे महत्व पटू लागले आहे.काही सुसंस्कृत पालक ही आपल्या मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम पटवून त्यापासून परावृत्त करु लागले आहेत. डॊ नरेंद्र दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही युवकांनी व विद्यार्थ्यांनी स्वत:हून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.पाहू या काय होते ते!
आमची दिवाळी तर अगदीच शांततेत
आमची दिवाळी तर अगदीच शांततेत गेली...दिवाळीचा मुहुर्त साधून दांडेलीच्या अभयारण्यात सहकुटुंब गेलो होतो...
फटाक्याच्या दणदणाटाऐवजी मस्त पक्ष्यांचे आवाज, धुराऐवजी उत्साहीत करणारा जंगलाचा टिपीकल वास आणि भन्नाट वातावरण....
आम्हा सगळ्यांनाच हा बदल खूपच हवाहवासा वाटला त्यामुळे बहुदा दरवर्षी आमची दिवाळी अशीच जाईल असे वाटत आहे.
चांगलं केलंत. दरवर्षी आमची
चांगलं केलंत.
दरवर्षी आमची दिवाळी अशीच जाईल << अशाने दांडेलीच्या अभयारण्यातले प्राणी / पक्षी पण ओळखू लागतील तुम्हांला.. दिवाळीच्या वेळी स्थलांतर करणारे म्हणून
आशुचँप, वृत्तांत टाका ना.
आशुचँप,
वृत्तांत टाका ना. अनेकजणांना गोवा म्हणजे बीच, पब इ. असेच वाटते. गोव्यातली शांत, रम्य देवालये, ठिकाणे यावर कोणी लिहीले तर उत्तमच!
अशाने दांडेलीच्या
अशाने दांडेलीच्या अभयारण्यातले प्राणी / पक्षी पण ओळखू लागतील तुम्हांला.. दिवाळीच्या वेळी स्थलांतर करणारे म्हणून
जबरी
>>अशाने दांडेलीच्या
>>अशाने दांडेलीच्या अभयारण्यातले प्राणी / पक्षी पण ओळखू लागतील तुम्हांला.. दिवाळीच्या वेळी स्थलांतर करणारे म्हणून हाहा<<
मस्तच. परवा आयबीएन वर प्रकाश आमटेंच्या प्राणीपक्षी मित्रमंडळी दिवाळी भेट होती. तो बिबट्या मस्त प्रकाश आमटेंना चाटत होता. आमचा बिट्ट्या भुभु मला असच चाटायचा. काही वर्षांनी आशुचॆम्प ला पण दांडेलीतील प्राणी चाटायला लागतील. दिवाळीच्या प्रदूषणा पेक्षा हा आनंद खुपच छान.
काही वर्षांनी आशुचॆम्प ला पण
काही वर्षांनी आशुचॆम्प ला पण दांडेलीतील प्राणी चाटायला लागतील. >> काही वर्षांनी आशुचँप दांडेलीत अंतराळवीरासारखा जाडजुड पोषाख घालुन हिंडत असेल.
झाड / पाउस / अनार , फुलबाजे,
झाड / पाउस / अनार , फुलबाजे, चिटपिट, भुईचक्कर असे बिनआवाजाचे फटाके मुलाने लावले / फोडले / उडवले.
त्याने हे एन्जॉय केलं.
अजुन दोन तीन वर्षात तो कदाचित हे देखील बंद करेलही.
त्याच्या इच्छेने..
रॉकेट कुणाच्याही घरात घुसते म्हणुन मीच घेतले नाही.
आवाजी फटाके आवडतच नाहीत.
छान धागा आणि उपयुक्त चर्चेचा
छान धागा आणि उपयुक्त चर्चेचा विषय आहे. मी लहान असताना अनेक वेळा फटाके फोडण्याचा आनन्द घेतला आहे.
सर्व प्रकारचे आवाजी फटाके धोकादायक आहेतच विशेषत: सुतळी बॉम्ब. बाण, चिमणी यावर बन्दीच असायला हवी, चिमणी/ बाण कुठला मार्ग घेतील हे सान्गता येत नाही. क्वचित प्रकरणी झाड, चक्री पण अनपेक्षित पणे धोकादायक ठरु शकतात.
मुर्ख आणि धोकादायक प्रकार
(अ) सुतळी बॉम्ब टपरी डब्ब्यामधे फोडणे हा अजुन त्यात मुर्खपणा.... हा धातूचा डबा कुठे जाणार हे सान्गताच येत नाही..
(ब) दोन सुतळी बॉम्ब एकमेकाला लावायचे आणि एकत्र फोडायचे... कधी एक आधी फुटतो आणि दुसर्याला सोबत घेऊन दुर उडतो... दुसरा त्या नव्या ठिकाणी जाऊन फुटतो...
आपल्याकडे प्रत्येक शहरात काही ठराविक ठिकाणीच (क्रिडा मैदान इ.), एका ठराविक वेळी, मोठ्यान्च्या मर्गदर्शनात फटाके फोडता येतील असे नाही का करता येणार ? शहर मोठे असेल तर फटाके फोडण्यासाठीच्या स्थळान्ची सन्ख्या वाढवावी जेणेकरुन लोकाना फार अन्तर चालावे लागू नये. एक वेळ ठरवली तर स्थानिक सरकारी यन्त्रणा, अग्नीशामक दल आणि आणिबाणीच्या प्रसन्गी सामना करता येणारी निष्णात यन्त्रणा तयारीत राहिल - हाकेच्या अन्तरावर मदत.
(अ) ज्याना आवाजाचा खरोखरच त्रास होतो (प्रामुख्याने लहान मुल, वृद्ध, आजारी) त्याना याचा फायदा मिळेल.
(ब) जर का अपघत झालाच तर जवळच यन्त्रणा तयार रहाणार आहे. अगदी ६० सेकन्दात मदत मिळेल...
(क) आपल्या फटाके फोडण्यामुळे कुणालाही त्रास होत नाही ह्या भावनेमुळे फटाके फोडण्याचा आनन्द द्विगुणित होणार.
येथे तुम्ही फटाके फोडत नसाल तरी कुणाच्या मुर्खपणाची शिकार होण्याची शक्यता असते.
दर दिवाळीला हा उपयुक्त धागा वर आणायला हवा...
अलीकडेच वाचनात आलेले एक वाक्य
अलीकडेच वाचनात आलेले एक वाक्य (बहुतेक मिळून सार्याजणीच्या संपादकीयातले)
फटाके उडवताना त्यांत फटाक्यांच्या कारखान्यातील बालमजुरांच्या आयुष्याची राख भरली आहे याची जाणीव ठेवा.
फटाके उडवताना त्यांत
फटाके उडवताना त्यांत फटाक्यांच्या कारखान्यातील बालमजुरांच्या आयुष्याची राख भरली आहे याची जाणीव ठेवा.>>
मग तिथले सगळे बालमजूर बेकार झाले की त्यांना रोजगार किंवा अधिक चांगले म्हणजे शिक्षण देण्याची व्यवस्था आधी करा. तिथून मोकळे होऊन गुन्हेगारी कडे वळल्यास कोण जबाबदार? इथे त्या बालमजुरांबद्दल पोकळ कळवळा असणार्यांनी प्रत्येकी एक या प्रमाणे फटाका कारखान्यात काम करणार्या एका बालमजूराच्या शिक्षणाची जबाबदारी उचलावी आणि मग पुळका आणावा.
बा़की बकरी इदला प्रतिकात्मक बकरा कापा असं का नाही बोलत कुणी? बिच्चारे किती बकरे कापले जातात नै का?
बालमजुरीचे समर्थन? तेही
बालमजुरीचे समर्थन? तेही फटाक्यांच्या कारखान्यासारख्या धोकादायक क्षेत्रात? त्या मुलांच्या आरोग्यावर काय परिणाम होत असतील याची काही कल्पना? त्यांचे वय पैसे कमवण्याचे की शाळेत जायचे?फटाके बनवायचे काम मुलेच करू शकतात आणि प्रौढ करू शकत नाहीत असे काही आहे का?
फटाके कारखान्याच्या मालकांच्या आणि वापरणार्यांच्या मनात त्या मुलांच्या उदरनिर्वाहाचा उदात्त हेतू असतो हे नवीनच कळले.
फटाके प्रौढांनी बनवलेले असले म्हणून ते स्वीकार्य होतील असे नाही. पण फटाक्यांना विरोध करण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहेच की.
नुसती बकरी ईद काय घेऊन बसलात? बकरे, कोंबडी इ.इ. कापायचा नवस बोलणार्यांची, प्रथा पाळणार्यांची खानेसुमारी करा.
विषयच असा आहे की इग्नोअरास्त्र तात्पुरते मागे घ्यावे लागले.
मयेकर, 'नुसती बकरी ईद काय
मयेकर, 'नुसती बकरी ईद काय घेऊन बसलात?' हा प्रश्न मूर्खपणाचा आहे कारण कशाचेही कसेही समर्थन करून मुद्दा तिथेच तर न्यायचा आहे! भारताचा प्रत्येक प्रश्न त्याच्याशीच जोडायचा आहे, मजबूरी आहे, समजून घ्या.
काल रात्री मी लोकसत्तच्या
काल रात्री मी लोकसत्तच्या एका विव्हा म्हणुन असणार्या पुअरवणीत असच एक लेख वाचला की
पनवेल[ प्रबळ्गड], ई भत़यात जमातीत जिथे सामन्या जिवन अवघड आहे , जिथे शहरा पर्यंत जाण्यासाठी पण बरेच पैसे मोजावे लागतात अश्या वस्त्या मधे कपडे , फराळ, खे ळ्नी वा टप करायची मस्त आहे मी पण माझ्या लेकी च्या वाढ्दिवसाला असेच काहितरी प्लॅन कर ते आता
त्याकरता दिवाळी कशाला हवी?
त्याकरता दिवाळी कशाला हवी? वर्षातल्या कुठल्याही दिवशी आपण करु शकतो. सावरकर जयंतीला करा. पुण्य मिळेल
बालमजुरीचे समर्थन? तेही
बालमजुरीचे समर्थन? तेही फटाक्यांच्या कारखान्यासारख्या धोकादायक क्षेत्रात? त्या मुलांच्या आरोग्यावर काय परिणाम होत असतील याची काही कल्पना? त्यांचे वय पैसे कमवण्याचे की शाळेत जायचे?फटाके बनवायचे काम मुलेच करू शकतात आणि प्रौढ करू शकत नाहीत असे काही आहे का? >>
फटाके कारखान्याच्या मालकांच्या आणि वापरणार्यांच्या मनात त्या मुलांच्या उदरनिर्वाहाचा उदात्त हेतू असतो हे नवीनच कळले.
फटाके प्रौढांनी बनवलेले असले म्हणून ते स्वीकार्य होतील असे नाही. पण फटाक्यांना विरोध करण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहेच की.
बालमजूरीचे समर्थन कुठे दिसले तुम्हाला? महानच. मग ती मुले करणार काय असा प्रश्न आहे. म्हणूनच म्हणतो आहे. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेताय का? निदान एका मुलाच्या तरी? अशा संस्था असतीलच की. त्यांना सांगून तुम्हाला एका मुलाला स्पॉन्सर करता येईल. करताय का? लांबून लंब्याचवड्या गप्पा सहज मारता येतात हो. तुम्हाला आणि मला सुद्धा. पण प्रत्यक्ष जबाबदारी घ्यायची वेळ आली की मी बालमजूरीचे समर्थन अशी लंगडी सबब पुढे केली जाते. घ्या ना जबाबदारी एका तरी मुलाच्या शिक्षणाची. सोडा हो. नाही जमणार.
नुसती बकरी ईद काय घेऊन बसलात? बकरे, कोंबडी इ.इ. कापायचा नवस बोलणार्यांची, प्रथा पाळणार्यांची खानेसुमारी करा.>>>
अगदी अगदी. आधी बकरे कापणे बंद होऊ दे. मग हे काय ते पाहू. सगळ्यात आधी काय ते हिंदूंच्या प्रथा आणि पद्धती दिसतात. वाह वाह!! लगे रहो. इथले हेमाशेपो.
मग ती मुले काय करणार? शाळेत
मग ती मुले काय करणार?
शाळेत जातील. शिकतील. एकवेळचे जेवण मिळेल त्यांना तिथे.
फटाक्यांच्या कारखान्याला बालमजूरच का लागतात, तेही भारतात इतक्या मोठ्या प्रमाणात गरिबी असताना याचे उत्तर मिळालेले नाही.
शिक्षणापासून वंचित मुलांसाठी मी काही करतो की नाही आणि काय करतो हे इथे लिहायची गरज मला वाटत नाही.
प्राण्यांचा बळी द्यायची प्रथा कधीपासून आणि कुठे कुठे सुरू झाली ते शोधा आणि मग या.
प्रश्नांसाठी विचारलेले प्रतिप्रश्न केवळ लंगडे नसून लुळेपांगळे आहेत यावर हेमाशेपोतून शिक्कामोर्तब झालेले आहे.
(No subject)
बकरी ईद व्हर्सेस दिवालीचे
बकरी ईद व्हर्सेस दिवालीचे फटाके यामधे माझा एक मुद्दा.
बकरी ईदला, अकिकासाठी कित्येक बकरे हलाल होतात त्यात वाद नाही अथवा दुमत नाही, पण हे हलाल झालेले बकरे कुणाच्या तरी मुखी पडतात. रस्त्यावर वाटेल तसे मारून फेकलेले नसतात. बकरी ईदच्या बकरा कापल्यानंतर शेजारी आजूबाजूला प्रत्येक घरामधे जाऊन मटण दिले जाते. मटणामधील ठराविक हिस्सा गरीबांसाठी म्हणून वेगळा काढून ठेवला जातो. प्रत्येक मुसलमान बकरा कापणे एफॉर्ड करू शकेलच असे नाही, पण सणाच्या दिवशी प्रत्येक मुसलमानाच्या घरामधे मटण बनायला हवे याची दक्षता त्या समाजाकडून घेतली जाते.
दिवाळीच्या फटाक्यांमधे फराळामधे अथवा त्या पूर्ण सणामधे असे काही अस्ते का?
दिवाळीखेरीज क्रिकेट मॅचेसच्या
दिवाळीखेरीज क्रिकेट मॅचेसच्या काळात देखील जोरदार फटाके उडविले जातात. यंदा दिवाळीत तितके फटाके उडले नाहीत तरी नंतरच्या मॅचेस दरम्यान दणकून उडले. मग वाटते, उपयोग नक्की काय झाला? आनंद हा फक्त फटाके उडवूनच व्यक्त होतो का? रस्त्यात, भर वाहतुकीत फटाक्यांच्या माळा लावायच्या - आजूबाजूच्या पादचार्यांना, वाहनांना, प्राण्यांना त्याचा उपद्रव करायचा, शिवाय आगीचे भयही असतेच.
ओळखीच्यांच्या हाऊसिंग सोसायटीत वाभरट पोरांनी २ वर्षांपूर्वी पार्किंग लॉट मधील वाहनांजवळ फटाके फोडले. एका स्कूटरने पेट घेतला. अग्निशमन बंब बोलवावा लागला, भुर्दंड बसला. नशीबाने इतर वाहने / वायरी / मोटर / फ्यूज इत्यादींपर्यंत आगीचे लोळ गेले नाहीत. नाहीतर किती महागात गेले असते! आणि प्राणहानी झाली नाही, कोणाला दुखापत झाली नाही हेही नशीब! तेव्हापासून त्या सोसायटीने आवारात फटाके उडवण्यावर बंदी आणली आहे.
अकु+१ विरोध दिवाळीला नाही, तर
अकु+१
विरोध दिवाळीला नाही, तर फटाक्यांना आहे.
विरोध दिवाळीला नाही, तसेच तो
विरोध दिवाळीला नाही, तसेच तो क्रिकेटलाही नाही तर फटाक्यांना आहे.
आपण फटाके विकत घेत आहोत म्हणजे त्या लहानग्याना त्यान्ची पोटाची खळगी भरायला मदत करत आहोत असे वाटते का?
मयेकरजी, नेहेमीप्रमाणे संयत
मयेकरजी,
नेहेमीप्रमाणे संयत प्रतिसाद. इग्नोरास्त्र "सोडल्याने" बरे वाटले.
आगाऊ,
>>
'नुसती बकरी ईद काय घेऊन बसलात?' हा प्रश्न मूर्खपणाचा आहे कारण कशाचेही कसेही समर्थन करून मुद्दा तिथेच तर न्यायचा आहे! भारताचा प्रत्येक प्रश्न त्याच्याशीच जोडायचा आहे, मजबूरी आहे, समजून घ्या.
<<
एकदम बुल्स आय!
वृषभनेत्रवेधी व बिंदूगामी प्रतिसाद
*
नंदिनी,
>>दिवाळीच्या फटाक्यांमधे फराळामधे अथवा त्या पूर्ण सणामधे असे काही अस्ते का?<<
छान मुद्दा.
मध्यंतरी शिवसेनेकडून १ करंजी १ सांजोरी असा एक अभिनंदनिय उपक्रम राबवलेला आठवला. घराघरांतून फराळाचे सामान गोळा करून वृद्धाश्रम व कुष्ठधामात वाटप केल्याचे आठवले.
आयडिया सुंदर होती, पण दुर्दैवाने फोटो काढण्यापुरती मर्यादित राहिली, व नंतर बारगळलीच.
लोकशाहीतल्या "सणां"नाही
लोकशाहीतल्या "सणां"नाही फटाकेमुक्त करणे आवश्यक आहे हे गेल्या वर्षात जास्तच जाणवले. आंबेडकर जयंतीपासून शिव जयंती पर्यंत! आज राजकीय निवडणूक प्रचारासाठी आमच्या भागात गल्लोगल्ली पंजापक्श वाल्यांनी ढोल, कर्णे, घोषणांच्याजोडीला १० मिनिटे वाजणारी फटाक्याची माळ लावली. भर रस्त्यात, ऎन रहदारीत. लोकांच्या सुरकशेची इथे पर्वा कोणाला? दिवाळीत फटाके कमी फोडल्याचि "दाखवायचे" फक्त!
>दिवाळीत फटाके कमी फोडल्याचि
>दिवाळीत फटाके कमी फोडल्याचि "दाखवायचे" फक्त!<
अरुधंती वर उल्लेख केलेले लोक हे दिवाळीत कमी फटाके वाजवणारे नसतातच मुळी. त्यामुळे दाखवायचा प्रश्नच येत नाही.
फटाके फोडणारे ह्याच भागातील
फटाके फोडणारे ह्याच भागातील रहिवासी असावेत असे समजून लिहिले आहे. कारण दिवाळीत खरोखर कमी फटाके वाजले. क्रिकेट म्याच अपवाद!
फटाकेमुक्त दिवाळी साठी
फटाकेमुक्त दिवाळी साठी प्रदुषण नियंत्रण बोर्डाच्या जाहिरात छान आहे. तसेच झी २४ तास व अन्यही चॆनेल ने त्यासाठी आवाहन केले आहे. हिंदु जनजागृती वाल्यांनी देखील हा विषय घेतला आहे.
http://dainiksanatanprabhat.blogspot.in/2014/10/blog-post_297.html
विद्यार्थ्यांमधे जागृती होत आहे. ही समाधानाची बाब आहे
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/fire-crac...
चला चला दिवाळी आली
फटाकेमुक्तीची वेळ झाली
(No subject)
फटाके पाहिजेतच राव. त्याशिवाय
फटाके पाहिजेतच राव. त्याशिवाय काय मजा आहे!
येथील आधीची पोस्टः
फटाक्यांमधले धोके, तसेच बनवतानाचे ही धोके, बालमजुरी ई. बंद करण्याचे पर्याय शोधून तसे फटाके विकायला कोणी आणले तर बरे होईल. दिवाळीत फटाकेच नाहीत यात काही मजा नाही.
लोकांना समजत आहेत फटाक्यांचे
लोकांना समजत आहेत फटाक्यांचे पर्यावरणावर होणारे वाईट परिणाम .यंदा त्यातुलनेने कमी प्रमाण आहे फटाके वाजवणार्यांचे .
ही दुदैवी कालची बातमी पाहुन वाट्ते .लोकांच्या जीवाची काळजी न बघता कीती भयानक प्रसंग ओढवू शकतो.
http://www.newindianexpress.com/nation/200-Cracker-Shops-Gutted-in-Fire-... .
चार दिवस फटाके उडवून पर्यावरण
चार दिवस फटाके उडवून पर्यावरण भयंकर प्रदुषित होते. वर्षभर सिगारेटी फुन्कून नाही!
काही नाही.. लहान मुलाना फटाके आवडतात. त्याना उडवू द्याकी!
सिगरेट मुक्त घर्/बिल्डिग्/सोसायटी/उपनगर्/गाव्/शहर/देश आवाहन सुरु करा आणि अमलात आणून दाखवा.
Pages