Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डिबुक साऊथच्या इझरा मुविचा
डिबुक साऊथच्या इझरा मुविचा रिमेक आहे
इझरा हिंदीत युट्युबवर आहे. मूळचा इझरा अडीच की 3 तासांचा आहे , नवीन हिंदी डिबुक बराच कमी केलेला आहे.
युट्युबवरून हिंदी डब इझरा उडालेला दिसतोय, पण हे स्टोरीवाले व्हिडीओ आहेत
https://youtu.be/uIWHIG3GwT4
ओके.
ओके.
भूत साय फाय झालं हा बदल आश्वासक वाटला.
ड्युन पहिला. मला आवडला.
ड्युन पहिला. मला आवडला. पुस्तक नं वाचलेल्या मित्राला फारसा नाही आवडला.
Erida मल्याळम पाहिला प्राईमवर
Erida मल्याळम पाहिला प्राईमवर.
सस्पेन्स, थ्रीलर.आवडला.
ड्युन पहिला. मला आवडला.
ड्युन पहिला. मला आवडला. पुस्तक नं वाचलेल्या मित्राला फारसा नाही आवडला. >>>>>
मी सुद्धा पहिला , पण काही समजलाच नाही
इझरा हाॅटस्टारवर आहे
इझरा हाॅटस्टारवर आहे . मला बरेचदा सजेशनमध्ये दिसला, आता बघायला हवा.
तो कन्नड नट मेल्यापासुन भक्त
तो कन्नड नट मेल्यापासुन भक्त फारच चेकाळलेत , म्हणे त्याने नेत्रदान केले, शाहरुखने काय केले ?
शाहरुखने नेत्रदान या विषयावर कितीतरी पूर्वीच गुड्डू नावाची फिल्म केली आहे.
https://www.hotstar.com/in/movies/guddu/1000238182/watch
तो कन्नड नट मेल्यापासुन भक्त फारच चेकाळलेत , म्हणे त्याने नेत्रदान केले, शाहरुखने काय केले ?
शाहरुखने नेत्रदान या विषयावर कितीतरी पूर्वीच गुड्डू नावाची फिल्म केली आहे.
https://youtu.be/A5h1XxVqBSA
आज एक चित्रपट पहायला गेलो
आज एक चित्रपट पहायला गेलो होतो. पाच जण हेल्मेट घालून आले होते. मला संशयास्पद वाटले. मला बसल्या जागेवरून ते दिसत होते. माझे लक्ष चित्रपटात कमी आणि यांच्यावर जास्त. रणवीर सिंगची एण्ट्री झाली आणि हे पाचही जण हात जोड्डून काही तरी पुटपुटायला लागले. नंतर ते हात जोडूनच बसले होते. ज्या वेळी रणवीर गेला तेव्हांच ते निवांत झाले. इतक्यात अजय देवगणची एण्ट्री झाली. तर त्यातले दोघे उभेच राहणार पण इतरांनी त्यांना झाली दाबले. आता ते हात जोडण्याबरोबरच डोकं गुडघ्याला लावून पुन्हा मागे येत होते.
मला विशेष वाटलं. बाकी सगळे पडद्यावर बघत असल्याने कुणाला काही लक्षात आले नाही.
इतक्यात अक्षयकुमारची एण्ट्री झाली आणि पाचही जण गायब झाले. मी उठून बघितले. मागचा बोंबलू लागला. पण त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तर ते पाचही जण जमिनीवर लोळण घेत दंडवत घालताना दिसले. मग हात जोडून बसले. कधी रणवीरला हात जोड, कधी अजयला तर कधी अक्षयला.
मला उत्सुकता लागून राहिली. कोण असावेत हे ?
इंटर्व्हलच्या आधी ते बाहेर पडले. मी पण मांजराच्या पावलाने दबक्या चालीने पाठलाग करू लागलो. दरवाजापाशी लपून ते कुठे जातात ते पाहीले. मग कॉरीडीरच्या एका बाजूला झटकन जात पाहीले. ते मेन्स लिहीलेल्या एका वास्तूकडे चालले होते. मी ही त्यांच्या मागे लपत छपत गेलो.
ते ही बाहेर कुणी आहे का याचा अंदाज घेत असतील म्हणून दाराच्या बाहेर लपून राहिलो.
आता ते हेल्मेट काढत होते बहुतेक. तसे बोलले सुद्धा.
मग हळूच मुख्य दरवाजातून येऊन आतल्या भिंतीला लपून पाहिले तर...
आर्यन मॅन, बॅट मॅन, सुपरमॅन, स्पायडरमॅन आणि कॅप्टन अमेरिका होते ते !
तो कन्नड नट मेल्यापासुन भक्त
तो कन्नड नट मेल्यापासुन भक्त फारच चेकाळलेत , म्हणे त्याने नेत्रदान केले, शाहरुखने काय केले ?
>>>>
माझ्या शाहरूखसंबंधित धाग्याच्या हेडरमध्ये एक लिंक आहे. ती चिपकवावी जिथे असा दंगा दिसेल तिथे
शाहारुख मेला का? नसेल तर
शाहारुख मेला का? नसेल तर जिवंतपणी कसं करणार? भक्तांना म्हणावं तुम्ही बसा तिरडीवर आणि करा नेत्रदान! कोणी अडवलं आहे का तुम्हाला ताबडतोब नेत्रदानपासून. करा सुरुवात!
त्याने नेत्रदान केले,
त्याने नेत्रदान केले, शाहरुखने काय केले ?
>>>मूर्खांचा बाजार आहे भारतात खरेच...
अमितव, ऑलरेडी सुरू झाला आहे
अमितव, ऑलरेडी सुरू झाला आहे मुर्खपणा. काही फॅन्सनी आत्महत्या केली आहे आणि मरताना 'नेत्रदानाची इच्छा' लिहून ठेवली आहे.
:डोक्याला हात: तिरकस बोलायची
:डोक्याला हात: तिरकस बोलायची ही सोय राहिली नाही!
बघितला सरदार उधम
बघितला सरदार उधम
आवडला. मु़ख्य म्हणजे ऑथेंटिक घेतलाय. डायरेक्शन, कलाकार बेस्टच
जालियनवालाचं जरा अंगावर येतं पण कथेची गरज म्हणून. म्हणजे गांधीमधले शॉट्स एकदम सटल होते कारण पुन्हा कथेची गरज. पण यात ती घटना हीच उधमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट तर तो सटल घेऊन कसा चालेल न?
क्रांतीकारकाचे पैलू काही संवादांत खूप छान मांडलेच(भगतसिंगच्या तोंडचे) खरे क्रांतिकारक आणि संभावित यातला फरक एकदम हायलाईट होतो.
सो खरच आवडला
जरा डॉक्यु-मुव्ही या मधला झालाय पण ठिक.
शिवाय अनावश्यक स्पिड दिला नाही, मूळ घटनांनुरुप योग्य वेग ठेवून केलाय.
काहींना स्लो वाटू शकतो. पण ते तसच जास्त अंगावर येतं न?
इतिहासातल्या सनसनाटी घटनाही तारतम्य अन योग्य तो आदर ठेवून दाखवता येऊ शकतात याचं उत्तम उदाहरण ठरावा चित्रपट!
मला ते फ्लॅशबॅक-प्रेझेंट
मला ते फ्लॅशबॅक-प्रेझेंट मध्ये खूप वेळा तळ्यात मळ्यात केल्याने जरा किचकट वाटला.पण चित्रण प्रभावी आहे.मुळात भूमिका भडकपणे न मांडता स्पष्ट केल्या आहेत.क्रांतिकारकाना पळून न जाता पकडलं जाऊन खटला का चालवायचा होता हेही नीट स्पष्ट झालंय.
आम्ही अजून जालियनवाला भाग पाहिला नाही.पण तो प्रभावी असणार.एकदा नीट सर्व व्यवधानं बाजूला ठेवून बघायचा आहे.
खरे म्हणजे "गांधी" मधला
खरे म्हणजे "गांधी" मधला जालियनवालाचा सीन बराच प्रक्षोभक आहे. जर यातील सीन त्याहीपेक्षा जास्त असेल तर जास्तच भीषण दाखवला असेल.
जय भीम ! थोडासा अंगावर येतो
जय भीम ! थोडासा अंगावर येतो पण मला आवडला. वास्तवदर्शी !
उधम स्लो स्लो ऐकून लावायची
उधम स्लो स्लो ऐकून लावायची ईच्छाच होत नाही.
काल मुले घरी नसल्याने फुरसत होती म्हणून निवांतपणे रात्री एक वाजता नेटफ्लिक्सवर मीनाक्षी सुंदरेश्वर बघायला घेतला.
तो सुद्धा स्लो च निघाला.
पण तरी आवडला.. हलका फुलका रोमांचिक, आणि साऊथ कल्चरचे मस्त चित्रण
बाकी सान्या मल्होत्रा कधीही कुठेही केव्हाही आवडतेच. आणि फ्रेशच वाटते.
सरदार उधम नक्की बघा, लोकहो...
सरदार उधम नक्की बघा, लोकहो...
स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग, उधमसिंग यांच्यासारख्या क्रांतीकारकांचं म्हणणं काय होतं, कामाची पद्धत कोणती होती, माणूस म्हणून ते कसे होते, याकडे चांगलं लक्ष पुरवलं आहे, असं मला वाटलं. त्यांनी निवडलेला मार्ग बरोबर की चूक, या वादात न पडता तेव्हा जे घडलं, जसं घडलं तसं (थोडी लिबर्टी पत्करली असावी) दाखवलंय.
उधमसिंगचं लंडनमध्ये जाणे, ब्रिटिश अधिकार्याला मारण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करणे, संधीची वाट पाहणे, त्यादरम्यान कुणाचीही नजर जाणार नाही अशा पद्धतीने राहणे, त्यासाठीचा पेशन्स, हे सगळं दाखवण्यासाठी संथपणाचीच गरज होती.
ज्या एका घटनेमुळे त्यानं हे केलं ती जालियनवाला हत्याकांडाची त्याची आठवण फारच प्रभावीपणे दाखवली आहे. आणि ती जनरल डायरनं केलेल्या गोळीबाराची आठवण नाहीये.
काळाच्या उड्याही अजिबात गोंधळात टाकणार्या वाटल्या नाहीत.
फक्त एकच गोष्ट मला जाणवली - इतरवेळी उधमसिंग लंडनमध्ये मोडकंतोडकं इंग्लिश बोलताना दाखवला आहे. मात्र कोर्टाच्या सीनमध्ये तो बर्यापैकी व्यवस्थित इंग्लिश बोलतो, क्रियापदं, काळ वगैरे सांभाळून.
पण हा एकच अपवाद.
न्यायमूर्ती कॉम्रेड के.
माईल्ड स्पॉयलर अलर्ट
जय भीम !
न्यायमूर्ती कॉम्रेड के. चंद्रू यांच्या वकिल म्हणून कारकिर्दीतल्या एका खर्या केस वर हा सिनेमा आधारित आहे, नुकताच पाहिला. सुंदर सिनेमा आहे.
जस्टिस चंद्रू जिथे गोरगरीबांचे हक्क हिरावून घेतले जात, त्या केसेस विनामूल्य लढत असत. तामिळनाडू मधल्या इरुलार या भटक्या/शिकार करुन पोट भरणार्या/ साप पकडणार्या समूहावर पोलिसांकडून अत्याचार होत असतात. जे गुन्हे दाखल झालेत पण तपासात काही सापडले नाही तिथे निष्पाप इरुलार लोकांवर गुन्हा दाखल होत असे.
राजकुमारन नावाचा एक इरुलार एका स्थानिक नेत्याच्या घरी साप पकडायला गेला होता. त्यानंतर घरात चोरी झाली, त्याचा आळ राजकुमारन वर आला. राजकुमारन पोलिस "तपास" चालू वेळेस विटभट्टीत काम करायला गावाबाहेर गेला होता. त्याने सोने कुठे ठेवले आहे म्हणुन त्याच्या खुप सार्या कुटुंबियांवर ( यात राजकुमारनची गरोदर पत्नी सुद्धा.) खुप वाइट अत्याचार पोलिसांनी केले. पुढे राजकुमारन स्वतः गावात परिवाराला भेटायला आला तेव्हा त्याला अटक झाली. त्याला, त्याच्या भावाला, आणि पुतण्याला पोलिसांनी खुप मारहाण केली. आणि, अचानक एक दिवस संगम्मा, म्हणजे राजकुमारनच्या पत्नीला सांगण्यात आले की तिचा नवरा आणि बाकि दोघेही पोलिस कस्टडीतून फरार आहेत, आणि सापडत नाहीत.
संगम्मानी मग कथानायक चंद्रूंची मदत घेतली. त्यांनी मद्रास हाय कोर्टात फाईल केलेली हिबियस कॉर्पस ऐतिहासिक आहे- त्याच्यावर सिनेमा बेतला आहे. नक्की पाहा. संवाद, पटकथा, अभिनय- भट्टी उत्तम जमली आहे. सिनेमा दु:खद घटनांनी भरला असला तरी आशादायी आहे.
कोणी
कॉमी, जय भीम साठी हजार मोदक.
संवाद, पटकथा, अभिनय- भट्टी
संवाद, पटकथा, अभिनय- भट्टी उत्तम जमली आहे. सिनेमा दु:खद घटनांनी भरला असला तरी आशादायी आहे.+१११
दिवाळीच्या दिवशीच पाहिला जय भीम ... सत्य घटनेवर आधारित असल्यामुळे चित्रपट पाहताना डोळे सारखे भरून येत होते.. चित्रपटातल्या सगळ्या कलाकारांचा अभिनय अप्रतिम आहे...!
जय भीम can not recommend
जय भीम can not recommend enough
असले चित्रपट बघवत नाहीत...
असले चित्रपट बघवत नाहीत... धन्यवाद कॉमी स्टोरी सांगितल्याबद्धल...
कोणी सूर्यवंशी पाहिला का शेट्टी चा??
म्हनजे जय भीम नावाचा आनि
म्हनजे जय भीम नावाचा आनि चित्रप्ट कथेचा तसा काही संबंध नाहीये. फक्त पब्लिसीटी स्टंट म्हणुन नाव वापरले असावे.
मीनाक्षी सुंदरेश्वर पाहिला.
मीनाक्षी सुंदरेश्वर पाहिला.
फ्रेम्स सुंदर आहेत. सानिया फ्रेश दिसते आणि साड्या सुपर्ब आहेत. मध्ये मध्ये २ स्टेटस मधल्या आलिया ची आठवण येते.
मुलगा (त्याचे पिक्चर मधले पात्र) खूप बोरिंग आहे. पण सुधारेल हळूहळू.
तो हिरो भाग्यश्री चा मुलगा आहे हे नंतर पाहिलं. चेहरा फ्रेश आहे.
कथा काही जागी खूप स्टिरिओटाईप वाटली (तो कंपनीचा मालक), पण एकंदर सानिया आणि हिरो च्या वावरामुळे पहायला आवडला.
मीनाक्षी सुंदरेश्वर पहायला
मीनाक्षी सुंदरेश्वर पहायला सुरुवात केली होती पण पूर्ण नाही पाहिला.
सानिया छान दिसलिये आणि मदुराई च शूटिंग अप्रतिम आहे.
मीनाक्षी ... पाहिला नाही , पण
मीनाक्षी ... पाहिला नाही , पण ट्रेलर आणि गाणी पाहिली . सानया आवडते बर्याचदा .
तो हिरो आवडला , क्युट दिसतो , गोड हसतो . अॅक्टीन्ग कशी करतो माहित नाही , त्याचा "मर्द को दर्द नही होता" बघायचा राहिलाय .
हो, त्याचा “मर्द को दर्द नही
हो, त्याचा “मर्द को दर्द नही होता" चांगला होता..खास करून माटुंगा दादर भागात राहिलेल्यांना आवडेल.. मला त्यात तो हिरो जास्त आवडलेला.. मीनाक्षी सुंदरेश्वरचा फर्स्ट हाफ आवडला, नंतरचा जरा रटाळ वाटला. सुंदरेश्वरचा भाऊ टाईमपास दाखवलाय.
मलाही रटाळ वाटला सिनेमा. गाणी
मलाही रटाळ वाटला सिनेमा. गाणी तर अगदीच अगम्य.. एकही लक्षात राहण्यासारखे नाही.
हिरो अभिनयाबाबतीत 'हिमालयपुत्र' आहे अगदी.
सान्या छान दिसते. साड्या सुंदर आहेत तिच्या
बाकी कथानक सो सो च. काही नवीन नाही.
Pages