आयपीएल - २०२१

Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22

आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.

IPL-2021-final-and-updated-squad-list-of-all-teams-after-Auction-e1613663034681.jpg

तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!

त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोज दर सामन्यावर तीच चर्चा
आता बोअर होऊ लागले
अर्थात यात आपलीही चूक नाही. सामनेच लगातार असे होत आहेत की धुरळा उठत आहे. नुसते क्लोज होत नाहीयेत तर असे अविश्वसनीय आणि अनाकलनीयरीत्या पलटत आहेत की या बोटाची थुंकी अक्षरशा त्या बोटावर जात आहे..

या सगळ्यात धोनीने मात्र दखवून दिले.. शेर अगर बुढा भी हो गया वगैरे वगैरे...
आता उद्या चौथी आयपीएल ट्रॉफी मिळू दे Happy

भाऊ, माझा बीसीसीआय चा मुद्दा सोडून देऊ. तो मला नेमकेपणे मांडता आला नाही असं म्हणू. खेळाडू कुठल्याही संघाटनेतर्फे खेळत असले तरी त्यांच्या खेळावरील निष्ठा आणि एथिक्स वर कुठल्याही पुराव्याशिवाय शंका घेऊ नये इतकाच मुद्दा आहे.

उद्याच्या फायनलसाठी दोन्ही संघांना शुभेच्छा! May the best team win! ऋतुराज, अय्यर, चहर, मावी - सर्वच युवा खेळाडूंसाठी हा अनुभव महत्वाचा ठरेल.

रोज दर सामन्यावर तीच चर्चा
आता बोअर होऊ लागले >> होपफुली तुला तुझे प्रत्येक बॉलनंतर येणारे फिक्सिंग चे चर्‍हाट थांबव असे लोक का सांगत होते ते कळले असेल अशी अजूनही एक वेडी आशा.

May the best team win! ऋतुराज, अय्यर, चहर, मावी - सर्वच युवा खेळाडूंसाठी हा अनुभव महत्वाचा ठरेल. >> स्लो पिच असावे. दवाचा तोटा अथवा फायदा एकाही टीमला न मिळता चुरशीचा सामना होवो अशी आशा धरूया. May the best team win!

*फक्त तुमच्या अनुमानाप्रमाणे खेळले नाहीत म्हणून शंका आहे* - माझं अनुमान इथे अजिबात महत्वाचं नाहीय. कारण , माझ्या अनुमानाप्रमाणे खेळणारे माझ्या सारखेच गल्ली क्रिकेटच्या पुढेही नाहीं सरकत, आयपीएल तर दूरच ! Wink

दवाचा तोटा अथवा फायदा एकाही टीमला न मिळता चुरशीचा सामना होवो अशी आशा धरूया. May the best team win! >>> नक्कीच! होऊन जाऊ दे!

छे हो असामी, मी फक्त संशय व्यक्त केले.
पण असे होऊच शकत नाही असे ठामपणे ठरवून जे स्पष्टीकरण येत आहे तेच तेच त्याने बोअर झाले.

अर्थात मी सुद्धा संशय वारंवार घेत आहे म्हणा. पण काय करू. या मेल्या अनाकलनीय अविश्वसनीय घटनाही वारंवार घडत आहेत. आणि या वारंवारतेमुळे संशय आणखी दाट होत आहेत. अति झाले अन हसू आले म्हणतात तसे या आयपीएलवाल्यांचे आधी हसू यायचे पण आता अति झाले आणि बोअर झालेय मला. तुम्हालाही सतत स्पष्टीकरणे द्यावी लागत आहेत कारण सामनेच सातत्याने असे होत आहेत. आणि गंमतही बघा ना. सारे स्लो पिच एकीकडे. पण मुंबईच्या फॉर्म गेलेल्या फलंदाजीला जेव्हा धावा ठोकायच्या होत्या त्या त्यांनी न भूतो न भविष्यति अश्या ठोकल्याच. राजस्थानला ९० ला बाद केलेल्या पिचवरही ठोकल्याच. फिटनेसमुळे कुंथणाऱ्या धोनीला जेव्हा हिरो बनायचे होते तेव्हा त्याने आल्या आल्या तुडवलेच.

असो, स्पॉट फिक्सिंगवरून आठवले. दिल्लीचे गेले तीन सामने लास्ट ओवरला जाणे. सिक्स खाऊन हरणे. त्या ओवर टाकायला प्रत्येक वेळी रबाडा वा नॉर्किया नसणे. किंबहुना त्या आधीचाही जो सामना दिल्ली चेन्नईशी जिंकली तो सुद्धा लास्ट ओवरलाच गेलेला. त्यातही मॅच सुरळीत चालू असताना आश्विनला मध्येच बढती देणे वगैरे जे प्रकार आपण पाहिले हे स्पॉट फिक्सिंग असू शकते का?

चेन्नई टॉस हरून १९२
पिच उत्तम आहे. मजा येणार आहे. धोनी चौथी आयपीएल मारतो का हे दोनेक तासात समजेलच...

ही मॅच पण जाईल शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ?पूर्वी याच दोघांत याच स्कोअरवर झालं होतं म्हणे असंच !

के आर के नी फायनल ला येऊन लाखो रसिकांना धक्का दिला होता , आता सी एस के ने फायनल जिंकावी असे त्याच लाखो रसिकांना वाटत असेल !

तुम्हालाही सतत स्पष्टीकरणे द्यावी लागत आहेत कारण सामनेच सातत्याने असे होत आहेत. > > फे फ म्हणतो तसे तू आधी ठरवून त्याला पूरक अशा घटना (पुरावे नाही) शोधत फिरतोस म्हणून तुला असे वाटते. मी माझ्यपुरते तरी 'काळ सोकावतो' ह्या भूमिकेतून स्पष्टीकरण देतो. त्यातही तुला उत्तर देण्याचा मूर्खपणा सातत्याने करायचे टाळतो पण तुझ्या टकळीच्या नादात भाऊंसारखे चोखंदळ ज्यांचे पोस्ट्स वाचायला मजा येते , हे ही सापडले हे बघून उत्तर देत होतो.

मी अजूनही तूच ठरवलेल्या फिक्स्ड आयपील मॅचेस च्या ५ ट्रॉफ्यां च्या जोरावर रोहित उत्कृष्ट कप्तान कसा हे अजूनही स्पष्ट केलेले नाहीस हे नमूद करू ईच्छीतो.

१९० खूप स्कोर झाला. फाफ क्ल्च प्लेयर आहे. मोक्याच्या वेळी खेळतोच. अय्यर ला नक्की वर्ल्ड कप मधे खेळवायला हवा. मॉर्गन ची कप्तान शिप फारशी ईंप्रेस्सीव्ह नाही. जाडेजा चा कॅच अफलातून होता. (त्यात नवीन काय म्हणा) पण तरीही नुसत्या बोटांवर घेतला.

मी अजूनही तूच ठरवलेल्या फिक्स्ड आयपील मॅचेस च्या ५ ट्रॉफ्यां च्या जोरावर रोहित उत्कृष्ट कप्तान कसा हे अजूनही स्पष्ट केलेले नाहीस हे नमूद करू ईच्छीतो.
>>>>>>
असामी,
म्हणजे तुम्ही माझ्या पोस्ट नीट वाचतच नाही आहात.
पुर्ण आयपीएल स्क्रिप्टेड असते असे मी कुठेच म्हटले नाहीये. प्रेक्षकांना खेचायला गरजेचे तितकेच ईथे चालते ईतकाच संशय आहे. मी ते वेचतो आणि ते सिरीअसली घेत नाही. बाकीचे परफॉर्मन्स एंजॉय करतोच.

चेन्नईचा संघ धोनीच्या कप्तानीत सरस होताच आणि तोच जिंकला. धोनी आणि शर्मा हे भारी कप्तान आहेतच. धोनी तर जगात सर्वोत्तम आहे ते सोडाच. शर्माने देखील आयपीएलच नाही तर ईंटरनॅशनललाही जेव्हा संधी मिळाली तेव्हा हे दाखवलेच आहे.

*प्रेक्षकांना खेचायला गरजेचे तितकेच ईथे चालते ईतकाच संशय आहे. * - मलाही हेंच अधिकाधिक तीव्रतेने जाणवतं. सामने रंजक होण्यासाठी कांही वेळां तरी कृत्रिम खेळ केला जातो, असा ग्रह झाला कीं खरं व खोटं यातला फरकच धूसर होतो व कांहीं खर्या अफलातून खेळीही ( व खरैखुरे बादही ) खोट्या वाटतात. ही खरी शोकांतिका आहे !

खरे असेल बोकलत. तरीच काल रात्री चेन्नई फॅन्सनी आम्हाला ओली पार्टी दिली. आता ते आशेवर आहेत की पुढच्यावेळी धोनी शर्माच्या पाच आयपीएल ट्रॉफीशी बरोबरी करेन.
कोहली वगैरे तर यात गिणतीतही नाही. आणि त्याला घेऊन आपण वर्ल्डकप जिंकायला चाललो आहोत.
मैदानावर शर्मा सोबत आणि मैदानाबाहेर मेण्टर म्हणून धोनी सोबत आहे तेच एक आशेचा किरण आहे. दोघांनीही ईथे गेले दोन वर्षे आयपीएल जिंकल्या आहेत.

पूर्वीचं क्रिकेट आता राहिलं नाही आणि पूर्वीसारखं मॅच बघायला मज्जा पण नाही येत. एक दौरा संपला की पुढच्या आठवड्यात दुसरा आहेच. तो ऊसाचा रसवाला एकच ऊस सारखा सारखा मशीनमध्ये टाकून चोथा करतो तशी अवस्था झाले क्रिकेटची.

मुंबई इंडियन फॅन्स ची दया येतेय... csk कडे धोनी आहे.. मास्तर माईंड... अरे ज्याने भारताला दोन वर्ल्ड कप जिंकून दिले, ipl किस खेत की मुली..
उद्या म्हणाल वर्ल्ड कप पण फिक्स होता Happy

आपण वर्ल्ड कप जिंकू शकतो फक्त प्लेईनग 11 मध्ये शर्मा नको...
विराट धोनोनंतर चा बेस्ट कॅप्टन आहे पण शर्मा मैदानात असला की लुडबुड करतो डिसीजन्स मध्ये.. विराट ने निर्धास्त खेळणे गरजेचे आहे त्यासाठी शर्मा ला बाहेर ठेवणे जरुरी आहे...

वर्ल्ड कप सुरू झाला की आमचे रुन्मेष सर डोळ्यात तेल घालून बघणार कोण कसा बॅटिंग, बॉलिंग करतोय ते. त्यांना काही आक्षेपार्ह आढळलं की लगेच ते त्या प्रसंगाच्या खोलात शिरून फिक्सिंग कशी झाली, कोणी का केली ते मायबोलीकरांना समजावून सांगणार. इथले अनेक लोक्स फिक्सिंग नाही झाली हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करणार. पण शेवटी रुन्मेष सरांचे ऍनालिसिस बरोबर निघणार. सरांमुळे आम्हाला क्रिकेटचे वास्तव पाहायला मिळाले. सर नसते तर आम्ही या आभासी दुनियेच्या खाईत ढकलले गेलो असतो. वी लव्ह यु सर, यु आर ग्रेट. जय हिंद, जय महाराष्ट्र.

ब-याच दिवसांनी हा धागा वाचला. नाही आलो इतके दिवस बर वाटल.
मला फायनलच्या वेळेस वाटल होत दोन ओव्हरीत कोलकत्ता 72 धावा करेल. इथे वाचून सिक्सेसच गारुड होत ना. बायकोशी बेटही लावली. ती म्हणाली जास्ती झालीय का, का मायबोली वाचलीय. Happy

कोहली वगैरे तर यात गिणतीतही नाही. आणि त्याला घेऊन आपण वर्ल्डकप जिंकायला चाललो आहोत.
मैदानावर शर्मा सोबत आणि मैदानाबाहेर मेण्टर म्हणून धोनी सोबत आहे तेच एक आशेचा किरण आहे. दोघांनीही ईथे गेले दोन वर्षे आयपीएल जिंकल्या आहेत.

>>
पण आयपीएल फिक्स्ड असते म्हणून बीसीसीआय पण त्यातल्या परफॉर्मन्स ला सीरियासाली घेत नाही असं तूच म्हणतोस ना...

एक पे रेहेना
या घोडा बोलना या चतुर बोलना...

पुन्हा तेच हो. सगळंच काही स्क्रिप्टेड नसते. निवडसमितीलाही ती अक्कल आणि कल्पना असावी की तिथे काय चालते आणि त्यातले काय सिरीअसली घ्यावे न घ्यावे.
धोनी काही आयपीएलमुळे जगातला सर्वोत्तम कप्तान ओळखला जात नाही. तर तो तिन्ही आयसीसी चषक जिंकणारा जगातला एकमेव कर्णधार आहे. भारताला कसोटीत पहिल्या क्रमांकावर पहिल्यांदा पोहोचवणारा पहिला कर्णधार आहे.
आणि शर्मानेही आयपीएलमधील ५ ट्रॉफीच्या जोडीने संधी मिळेल तेव्हा २०-२० आणि वनडे मध्ये आपले कप्तानीचे नाणे खणखणीत वाजवून दाखवले आहे.
कोहलीने आयसीसी स्पर्धा असो वा आयपीएल, सगळीकडे मोक्याला धोकाच दिला आहे.

Pages