Submitted by VB on 25 December, 2020 - 18:54
पार्टी चा भात म्हणजे बिर्याणी असे कितीतरी जणांचे मत असल्याचे लक्षात आले. माझ्या ओळखीच्या दहा पैकी आठ लोकांना बिर्याणी आवडते. अन म्हणून मला बिर्याणी आवडत नाही म्हणून ते नाकही मुरडतात.
पण खरेच माझ्यासारखे कित्येक जण असतील ज्यांना बिर्याणी आवडत नाही. पूर्वी मी कधीतरी खायची बिर्याणी, पण आता बघवतही नाही. तसेही हल्ली चांगली बिर्याणी मिळत सुद्धा नाही आवडायला. बरेचदा तर बिर्याणी च्या नावाखाली भाज्या/चिकन/मटण/कोलंबी नावापुरता घातलेला अन मसाल्याने थबथबलेला भात देतात. तो प्रकार तर अजून भयानक असतो. कदाचित ह्या सगळ्या मुळे असेल पण मला बिर्याणी आता बिलकुल आवडत नाही.
माबोवर पण खाऊगल्लीत बरेचदा बिर्याणी दिसते अन तिची प्रशंसा करणारे पण. म्हणून सहज उत्सुकता म्हणून जाणून घ्यायला आवडेल की माझ्यासारखे अजून कोणी बिर्याणी हेटर्स आहेत का इकडे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भरत, सहमत.
भरत, सहमत.
देवकी, ती त्यांच्या कडची पद्धत असेल. कैऱ्या नेहमी नसतात ना.
चित्रान्न बाराही महिने केव्हाही करतात. मोहरी, जिरे, कडीपत्ता, उडीद डाळ, चना डाळ, शेंगदाणे, हिंग, हळद घालुन फोडणी आणि भात घालून लिंबु पिळतात.
आणि तो डाळिंबाचे दाणे घालून
आणि तो डाळिंबाचे दाणे घालून केलेला दहीभात कुठला
त्याला काय म्हणतात? दही बुत्ती?
फोडणीचा भात हॉटेलात सर्वात
फोडणीचा भात हॉटेलात सर्वात जास्त विकला जातो... मेन्यू मध्ये त्याचे नाव व्हेज बिर्याणी असे लिहिलेले असते...
अस्मिता, हाटलातुन आलेल्या
अस्मिता, हाटलातुन आलेल्या भाताचा चिनी फ्राईड राईस मस्त होतो कारण तो खूप फडफडीत असतो म्हणुन. थोडा कोबी , ढबु मिरची, कांदा उभे कापुन बास होतात भातात.
ती VB कुठे गेली ??
ती VB कुठे गेली ??
आता आली तर म्हणेल " कुठे नेउन ठेवलात धागा माझा ???"
हेट बिर्याणी -> लाईक बिर्याणी -> बिर्याणी फॅन क्लब -> वेज वि. नॉन वेज बिर्याणी -> -> कुठली बिर्याणी मागवावी --> बिर्याणी रेसिपी -> किचन मधली भांडी -> फोभा .
आशुचॅम्प हो दही बुत्ती.
आशुचॅम्प हो दही बुत्ती. डाळिंब ऑप्शनल, पण छान लागते असले तर.
थँक्स सुनिधी, पुढच्या वेळी.
थँक्स सुनिधी, पुढच्या वेळी.
भरत +1.
हाटलातुन आलेल्या भाताचा चिनी
हाटलातुन आलेल्या भाताचा चिनी फ्राईड राईस मस्त होतो कारण तो खूप फडफडीत असतो म्हणुन. थोडा कोबी , ढबु मिरची, कांदा उभे कापुन बास होतात भातात.>>>+१
कोणी नेटफ्लिक्सवरची “राजा
कोणी नेटफ्लिक्सवरची “राजा रसोई और अन्य कहानियां“ सिरिज बघितली आहे का? एका भागात बिर्याणीचं खूप छान वर्णन आहे.. सिरिज नक्की बघावी
मी पाहिलीये , छान आहे. राजा ,
मी पाहिलीये , छान आहे.
बाई दवे, फोडणीचा भात माझे
बाई दवे, फोडणीचा भात माझे पहिले प्रेम आहे. कित्येक बिर्याणीज ओवाळून टाकेन मी त्यावरून. मी स्वतंत्र धागा काढतो यावर !
>>
बाकी जाउद्या पण फो.भा वर धागा पायजेच. खरंच कोणतीही बिर्याणी ओवाळून टाकीन मी पण. रुन्मेश, हम तुम्हारे साथ है.
>>>
काढला
https://www.maayboli.com/node/77730
चला जावा आता तिकडे
चला जावा आता तिकडे
यांना मोकळं सोडा
हो आशूचॅम्प, ईथे आता फक्त मी
हो आशूचॅम्प, ईथे आता फक्त मी तुम्ही आणि शाहरूख, मिल बैठेंगे तीन यार वही रात गुजर जाये ..
इतक्या साऱ्या प्रतिसाद संख्या
इतक्या साऱ्या प्रतिसाद संख्या बघून बिर्याणी अजूनच नावडती झाली.
सगळे नाही पण काही प्रतिसाद वाचले, त्यावरून असे वाटते की बिर्याणी खरच मला कधीच आवडणार नाही, त्यापेक्षा पुलावच बरा.
लॉक डाउन आधी रोड साईडला 40 - 60 रूपयेला शाही(?) बिर्याणी विकणारे अन ती चवीने खाणारे बघितले आहेत. काय परवडत असेल अशी बिर्याणी बनवायला अन त्यांच्याकडून अपेक्षा तर काय ठेवत असतील लोक माहीत नाही.
ऑफिस मध्ये बरेचदा बिर्याणी
ऑफिस मध्ये बरेचदा बिर्याणी पार्टी असायची, ते किलोवर मागवायचे, तेव्हाही मी माझा वाटा सगळ्यांना वाटून शेजवान फ्राइड राईस नाही तर पाव भाजी खायचे
भारतभरचे बिर्याणीचे प्रकार
भारतभरचे बिर्याणीचे प्रकार
इथे कोणीतरी हरीहर यांच्या या
इथे कोणीतरी हरीहर यांच्या या धाग्याविषयी विचारले होते.
https://www.maayboli.com/node/69521
सांगली येथे असणारी pride किचन
सांगली येथे असणारी pride किचन हैद्राबादी बिर्याणी आणि डोंबिवलीत असणारी हैद्राबादी बिर्याणी हाऊस सेम टू सेम टेस्ट.
बेहरोझ ची बिर्याणी खाल्लीस तर
बेहरोझ ची बिर्याणी खाल्लीस तर बिर्याणी आय लव्ह यु या क्लबात येशील. जबरी असते त्यांची. मी व्हेजच खाते, बाकी नॉनव्हेजच खातात. आणी शिळी बिर्याणी उलट जास्त मुरुन दुसर्या दिवशी जास्त चवदार लागते असे माझे वै मत आहे. ( बेहरोझ विषयी )
इतर ठिकाणी बेहरोज ठिकाय.
इतर ठिकाणी बेहरोज ठिकाय.
पण हैद्राबादला आलात की इथली हैद्राबादी बिर्याणीच खा, त्याची सर बेहरोजला नाही.
पण हैद्राबादला आलात की इथली
पण हैद्राबादला आलात की इथली हैद्राबादी बिर्याणीच खा
कुठली कुठली...लिस्ट टाका प्लीज.
हॉटेल शादाब, मदिना सर्कल
हॉटेल शादाब, मदिना सर्कल
हॉटेल पॅराडाइज, पॅराडाइज सर्कल - सिकंदराबाद
बावर्ची, आरटीसी क्रॉस रोड
हे मुख्य.
या व्यतिरिक्त खूप आहेत वेगवेगळ्या ठिकाणी.
शाग हाऊस
शाग हाऊस
खुप खुप आभार मानव आणी च्रप्स.
खुप खुप आभार मानव आणी च्रप्स.
आताच युट्युबावर बावर्ची बिर्यानी कसे बनवतात ते पाहुन आलो
नुकतीच पॅराडाईज बिर्याणी
नुकतीच पॅराडाईज बिर्याणी खाल्ली. मस्त होती!
आमचे फेवरिट बहार. बशीर बाग
आमचे फेवरिट बहार. बशीर बाग चौरस्त्याच्या जवळ
Pages