..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८)

Submitted by मामी on 17 July, 2021 - 12:36

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162

सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....

हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/

ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year

मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Submitted by वावे on 19 August, 2021 - 08:50 >>>
अच्छा असं आहे होय. हे रंगाबद्दल वगैरे मुळीच कल्पना नव्हती मला.

म्हणजे रेड बुल ड्रिंकला मराठीत पवळ्याचे पेय म्हणता येईल. >>>. Biggrin

रेड बुलमध्ये व्होडका मिसळली तर ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला ही म्हण सार्थ होईल.

रेड बुलमध्ये व्होडका मिसळली तर ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला ही म्हण सार्थ होईल.<<<<<<
Lol खतरनाक!

रेड बुलमध्ये व्होडका मिसळली तर ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला ही म्हण सार्थ होईल.>> Lol
पवळ्या म्हणजे पोवळ्या हे लक्षात नव्हतं आलं!

पुढचं कोडं
८/१८
सलीम रोज आपल्या बकऱ्या चारायला डोंगरावर घेऊन जात असे. त्यात उमर आणि नबी असे दोन छोटेसे बकरे त्याचे फार लाडके होते. एकदा काय झालं, नेहमीप्रमाणे संध्याकाळी घरी परत जाण्यासाठी तो बकऱ्यांना बोलावू लागला. बाकी सगळ्या बकऱ्या आल्या पण उमर आणि नबी काही दिसेनात. खूप शोधल्यावर त्याला उमरचा बें बें असा आवाज ऐकू आला. सलीमने धावत जाऊन त्याला एका खड्ड्यातून बाहेर काढलं. पण तिथे नबी नव्हता. आता तो कुठे असेल या काळजीने सलीम त्याला बोलावू लागला. तो कुठलं गाणं म्हणत असेल?

करेक्ट झिलमिल!

उत्तर (झिलमिल) -ए अज(बकरी) नबी तूभी कभी
आवाज दे कहीं से

अज नबी म्हणे!! आवडलं! Happy

फारएन्डच्या (संदेसे आते हैं) कोड्यावरून एक सुचलं. ह्यात गाणं नाही, त्यामुळे उत्तर देऊन टाकतो:

महाराष्ट्रात एस टी स्थानकावर एक विशिष्ट मिठाई विकताना विक्रेता जणू काही सीमेवर उभा असल्यासारखा ओरडतो, ती मिठाई कोणती?

उत्तर: आले पाक

म्हणजे रेड बुल ड्रिंकला मराठीत पवळ्याचे पेय म्हणता येईल. >>>
रेड बुलमध्ये व्होडका मिसळली तर ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला ही म्हण सार्थ होईल >>> Lol

आलेपाकही जबरी.

ए अज(बकरी) नबी तूभी कभी >>> हे कोडे, आणि त्याचे उत्तर सापडणे हे दोन्ही महान आहे.

८/१७ ची अ‍ॅकनॉलेजमेण्ट

८/१७ - बंगाली मिठाई येते पण आपल्यापर्यंत पोहोचत नाही अशी सीमेवरच्या सैनिकाची तक्रार

उत्तर (जावेद खान)
संदेसें आते है

अतिशय सोप्प!!!
८/१९ - शेजारच्या शर्मांच्या बंगल्यावर ढगाआड गेलेल्या चंद्राला पाहून वर्मांनी आपल्या बायकोला (गाण्यात) काय सांगितले?

शर्मा के बादलों में
चंदा क्यों छुप रहा है
हम प्यार कर रहे हैं
शायद उसे पता है

माझ्या मनात मृणालीने दिलेल गाण होत
पण जावेद खान, तुमचं गाणंही बरोबर आहे

८/१९ - शेजारच्या शर्मांच्या बंगल्यावर ढगाआड गेलेल्या चंद्राला पाहून वर्मांनी आपल्या बायकोला (गाण्यात) काय सांगितले?
उत्तर १ (जावेद खान)
चंदा क्यों छुप रहा है
हम प्यार कर रहे हैं
शायद उसे पता है

उत्तर २ (मृणाली)
चांद छुपा बादल मे शर्मा के
मेरी जाना

एक सोपं.

८/२०
जगभर फेमस असलेलं सँडविच चेन रेस्टॉरंट एकदाच या गावात आलं पण म्हातार्‍या पाटलांना असली थेरं अजिबात पटत नव्हती. 'घरची चटणी भाकरी बरी असल्या ब्रेडफिडपेक्षा" असं त्यांचं मत होतं. पण होता होता एके दिवशी न राहवून त्यांनी ते सँडविच चाखलंच आणि पाटिल पार बदललेच. त्यांना ते सँडविच इतकं आवडलं की गावातल्या प्रत्येक माणसाला पकडून ते सँडविचचं वर्णन करून स्तुती करायला लागले. बाकीच्यांनी अर्थात ते चाखलंही होतं आणि ते छान लागतं हे ही त्यांना माहित होतंच. पण पाटलांना कोण बोलणार ?

शेवटी पाटलांच्या पीए नं त्यांना न राहवून हे सत्य सांगितलंच ......

करेक्ट च्रप्स,

उत्तर : (च्रप्स)
ये पब्लिक है, ये sub जानती है
अजी, अंदर क्या है, बाहर क्या है

पब्लिकला रायटर्स ब्लॉक आलेला दिसतोय Happy हे घ्या बाफ पुढे ढकलायला एक सोपे

एका अगदी लहान मुलाचे (टॉडलर धरा) आईवडील त्याला फिरायला बाजारात घेउन जातात. तेथे एक पेट रिलेटेड सेण्टर दिसते. तेथे तो मुलगा आपण कुत्रा पाळायला विकत घेउ म्हणून हट्ट करतो. त्याला मी हे करणार नाही हे दोघे स्वतंत्रपणे सांगताना कोणते गाणे म्हणतील?

हो झिलमिल, परफेक्ट! नंबर द्यायचा विसरलो Happy

८/२१
एका अगदी लहान मुलाचे (टॉडलर धरा) आईवडील त्याला फिरायला बाजारात घेउन जातात. तेथे एक पेट रिलेटेड सेण्टर दिसते. तेथे तो मुलगा आपण कुत्रा पाळायला विकत घेउ म्हणून हट्ट करतो. त्याला मी हे करणार नाही हे दोघे स्वतंत्रपणे सांगताना कोणते गाणे म्हणतील?

उत्तर (झिलमिल)
मैं ना भूलूँगा, मैं ना भूलूँगी

Pages