ज्यांना लेख वाचायला बोअर होत असेल ते थेट विडिओ बघू शकतात.
दोन्ही भागातले दोन्ही विडिओ ईथे बघू शकता.
भाग १) स्टेज शो - https://jumpshare.com/v/VlM4Mbuh5G1NNgrMjPup
भाग २) पार्टी डान्स - https://www.youtube.com/watch?v=oWT6RUiOGrI
-----------------------
या लेखमालेतील पहिला भाग गेल्या वर्षी आपण जरूर वाचला असेल.
नसेल वाचला तर वाचून घ्या, तिथूनच हे पुढे लिहीणार आहे
माझा नाच आणि नाचाचा प्रवास ! (फोटो आणि विडिओसह) -
https://www.maayboli.com/node/72946
-----------------------
आता भाग दुसरा,
माझ्यातील लुप्त झालेला नाच पुनर्जिवित करताना मी ऑफिसच्या अॅन्युअल फंक्शनमध्ये स्टेजवर तर नाचलो होतो. पण तरी त्या आधीही आणि त्या नंतरही ऑफिसच्या कलीग्जसोबत पार्टीमध्ये कधी नाचणे झाले नाही. आधी ऑफिसच्या पार्टीत कोणी मला हात धरून खेचत नाचाचा आग्रह केला तर मी मला नाचताच येत नाही म्हणत सटकून जायचो. पण एकदा स्टेजवर नाचल्यावर आणि हा बरावाईट का होईना नाचू शकतो हे ऑफिसमध्ये सर्वांना समजल्यावर ते कारणही देता यायचे नाही. तरीही आता मूड नाही, मी आता नाचून दमलोय, वा गेले चार दिवस प्रॅक्टीसने पाय दुखू लागलेत म्हणत कलीग्जसोबत पार्टीत नाचणे टाळायचोच. कारण मी कोणाशी ट्युनिंग जमल्याशिवाय नाचूच शकत नाही हे मला ठाऊक होते. शेवटचे असे मला एखाद्या पार्टीत मित्रांसोबत नाचून तब्बल १२ वर्षे झाली होती. नाचासाठी लागणारा कम्फर्ट झोन मला माझी मुले आणि माझे घर वगळता बाहेर कुठेच मिळाला नव्हता.
सलग दोन वर्षे ऑफिसच्या फंक्शनला स्टेजवर नाच केल्यावर किमान हे तरी आपण वयाची पन्नास वर्षे होईपर्यंत दर वर्षी करायचे आणि आपल्यातील नाचाचा किडा जपायचा असे ठरवले होते. पण कोरोनामुळे गेल्यावर्षी ऑफिसचे फंक्शनही झाले नाही. येत्या वर्षात ते किती वेळा असेच रद्द होईल आणि किती वेळा आपण या संधीला मुकू याचीही आता कल्पना नव्हती.
जसे गेल्या काही वर्षात मी भला आणि माझे कुटुंब भले म्हणत मी माणूसघाणा झालो होतो तसेच आता आपले नाचणेही कुटुंबापुरतेच मर्यादीत असून बाह्य जगात नाचाशी असलेली आपली नाळ आता तुटली आहे हे मी स्विकारले होते. जिथे मला मित्रच शिल्लक राहिले नव्हते तिथे मित्रांसोबत होणारा नाचही आयुष्यात पुन्हा कधी येणार नाही हे मला समजले होते.
आणि अश्यात आली शाळेच्या मित्रांची पिकनिक....
शाळेच्या मित्रांची हि व्हॉटसपग्रूप स्थापनेपासूनची दरवर्षी एक याप्रमाणे सातवी पिकनिक होती. आणि मी आता ते माझे मित्र राहिलेच नाहीत समजून त्यांना आधीच्या सहा वेळा टांग दिली होती. अखेरीस बायकोच्या आग्रहावरून एकदा जाऊन बघूयाच म्हणत या सातव्या वर्षी तयार झालो होतो.
या पिकनिकचा वृत्तांत ईथे सविस्तर वाचू शकता -
एका माणूसघाण्याची पिकनिक - विडिओ आणि केकसह -
https://www.maayboli.com/node/79682
पिकनिक माझ्यासाठी छान शांततेत पार पडत होती. मी मित्रांची कंपनी पुरेसे अंतर राखून का होईना, त्यांच्यात न मिसळता का होईना, तरीही दुरूनच त्यांचे निरीक्षण करत एंजॉय करत होतो. कोणाशी स्वत:हून बोलायला जात नव्हतो, पण सर्वांच्या गप्पा आणि किस्से ऐकून भूतकाळाच्या आठवणी जागवत होतो. संध्याकाळपर्यंत सारे काही ठिक होते. मी नेहमीसारखे माझ्याच कोषात होतो, पण तरीही कुठे येऊन फसलो असे तोपर्यंत झाले नव्हते. पण संध्याकाळी समजले की त्या हॉटेलमध्ये रात्री डीजे सुद्धा आहे.. अरे देवा !! मी कपाळावर हात मारला. आता तो होणारा आग्रह आणि आपण द्यायचा नकार, फार ईरीटेटींग असते ते सारे. विचारांनीच पोटात गोळा आला.
सायंकाळच्या ओल्या पार्टीला मध्यांतराचा ब्रेक देऊन सर्वांची पावले थिरकायला डीजे असणार्या हॉलकडे वळली तेव्हा एका मित्राने माझ्या खांद्यावर हात टाकत विचारले, नाचतोस का?
मी हो म्हणावे की नाही, असा विचार करत असतानाच अजून एक मित्र म्हणाला, तू ऑफिसच्या प्रोग्रामला नाचलेलास ना? मी पाहिलेला विडिओ फेसबूकवर... गेम ओवर!
मी विचार केला, गपचूप थोडा वेळ बाजूला उभे राहून बघूया सर्वांचा नाच आणि मी सुद्धा त्यांच्यात आहे हे लक्षात यायच्या आधीच रूमवर सटकूया आणि दोनतीन तास तिथेच लपून बसूया.
पण नियतीच्या मनात काहीतरी स्पेशल लिहिले होते. त्याशिवाय हे शक्यच नव्हते...
आम्ही आत शिरलो आणि डान्सफ्लोअरवर उतरलो तसे पहिलेच गाणे लागले ते बचना ए हसीनो, लो मै आ गया. हे तेच गाणे ज्यावर मी गेल्या वर्षी ऑफिसला नाचलो होतो. मग काय घेतला चान्स. उतरलो रिंगणात. माझ्या दोनचार स्टेप्स बघून पोरे थक्क झाली. भाई ये तो सोलो डान्सर है म्हणत सगळे मागे सरकून एक रिंगण तयार केले आणि मी एकटाच नाचू लागलो. मुले चेकाळू लागली. आणि मला नाचतानाच जाणवू लागले की मी शेलमधून बाहेर येतोय. पाठोपाठ बघतोय रिक्षावाला झाले, पुन्हा डॉनचे गाणे लागले तसे पुन्हा माझा सोलो डान्स सुरू झाला. झिंगाटला अक्षर्शा झिंगाटलो, त्यानंतर नागाची पिल्लेही खवळली, जवळपास दोन अडीच तास नाचून झाल्यावर यारी दोस्तीच्या गाण्यांनी नाचाच्या कार्यक्रमाचा समारोप झाला. पण माझ्यासाठी ती पिकनिक तिथे खरी सुरू झाली. एका बोअरींग दुपार आणि काहीश्या उदास संध्याकाळीनंतर एक रात्र उजळून निघाली.
ज्या नाचाच्या कार्यक्रमाला मी इरीटेटींग समजून रूमवर जाऊन लपणार होतो, त्यानेच मला मित्रांच्या मुख्य प्रवाहात सामील केले होते. मी नाचून नाचून दमल्यावरही, पोटाच्या आजाराने उचल खाल्यावरही, मित्रांचे हात खेचून आग्रह होत होते आणि मी देखील ते उत्स्फुर्तपणे पुरवले होते.
मी नाचताना कोणी विडिओ काढत असेल तर मला फार ऑकवर्ड होते, मुद्दाम कॅमेर्यासमोर जात हात हलवणे तर बिलकुल जमत नाही. अगदी घरातही मुलांसोबत नाचताना कधी कोणाला माझा विडिओ काढू दिला नाही. कारण नाच कोणाला दाखवायला करा हे मला कधीच जमले नाही. नाच हा मी नेहमी माझ्या मूडनुसार व्यक्त व्हायलाच केला आहे. ते म्हणतात ना, असे नाचा की कोणी बघत नाहीये. त्यामुळे ते कॅमेर्याचे रोखलेले डोळेही मला नेहमीच नकोसे वाटले आहेत. पण तरीही काही मित्रांनी नाचाचे उलटसुलट विडिओ बनवले होते. जे व्हॉटसपवर ग्रूपवर शेअर केल्यानंतर त्यातल्याच माझ्या काही नाचांचे तुकडे जोडून आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरलेल्या या पिकनिकची आठवण म्हणून मी एक विडिओ बनवला जो लेखा खालील लिंकवर बघू शकता.
घरी जेव्हा मी माझ्या मुलीला माझ्या नाचाचा हा विडिओ दाखवला तेव्हा तिचा आनंद बघण्यासारखा होता. ती नेहमी मला चिडवायची की मला हंड्रेड फ्रेंड्स आहेत आणि तुला एकही नाही. जेव्हा तिला कळलेले की मी पिकनिकला जातोय आणि ते सुद्धा तब्बल पंचवीस तीस मित्रांसोबत तेव्हा याचेच तिला फार अप्रूप वाटले होते. आणि त्यानंतर आपला बाप आपल्याव्यतिरीक्त आणखी कोणासोबत तसाच वेड्यासारखा नाचू शकतो जसे आपल्यासोबत नाचतो हे बघून तिला आणखी आनंद झाला. आणि त्याहीपेक्षा जास्त आनंद माझ्या बायकोला झाला कारण मी कोणासोबतही ट्युनिंग जमल्याशिवाय नाचत नाही हे तिला माहीत होते. त्यामुळे फायनली आपल्या नवर्याला काही मित्र मिळाले. आता तो त्यांना वेळ देईल, आणि सतत आपल्या डोक्यावर नसेल. असा तो सुटकेचा आनंद होता
माझ्यासाठीही हा नाच सर्वात स्पेशल ईतक्यासाठीच होता कारण फायनली शेलमधून बाहेर येत तब्बल बारा वर्षांनी मी कुठल्याही मित्रांसोबत असे पार्टीमध्ये नाचत होतो. नाच जे माझ्यासाठी व्यक्त होण्याचे सर्वात महत्वाचे माध्यम आहे. नाच जो मी दिवसातून शंभर वेळा घरात येता जाता खिडक्यांच्या आरश्यासमोर, चहा बनवताना किचन ओट्यासमोर, कपडे बदलताना कपाटासमोर, आंघोळ करताना डोक्यावरून ओघळणार्या पाण्यासोबत, लॅपटॉपवर बसल्या बसल्या ऑफिसचे काम करत, घरची अक्षरशा कुठलीही कामे करताना सतत करतच असतो... अगदी हा लेख लिहीतानाही मध्येमध्ये ब्रेक घेत जो चालूच आहे.. तो नाच, मी तब्बल बारा वर्षांनी पुन्हा एकदा कोण बघतेय न बघतेय याची पर्वा न करता बाहेर मित्रांसोबत केला होता
____________________________
धन्यवाद,
ऋन्मेऽऽष
>>शराब वो पिते है जो नशा
>>शराब वो पिते है जो नशा चाहते है, आप तो बिन पियेही नशे मे होते हो...<<
ऋन्म्या, धिस प्रॉबॅबली इज द बेस्ट काँप्लिमेंट फॉर यु. अरे बाबा, टपोरी डँस अॅप्रिशिएट करायला हि नजर लागते.
बाकि, निगेटिव कामेंट देणार्यांना एक प्रश्न - व्हॉट यु वेर एक्स्पेक्टिंंग? कथक, टॅप ऑर रिवरडँस?
बेस्ट डँस इज व्हेन (अॅज इफ) नोबडि इज वॉचिंग...
81 व्ह्यू ज 5 तासात म्हणजे
81 व्ह्यू ज 5 तासात म्हणजे गेला बाजार 50 तरी माबोकर च व्हिजिट देऊन आले तिथे.
पचास व्ह्यूज और सिर्फ सात कमेंट्स , बहुत नाइन्सफी है ये
>>> किंवा सातच माबोकरांनी सरासरी सात वेळा व्हिडीओ पाहिला असू शकेल... मी दोनदा पाहिला
किंबहुना तब्बल ३२ महिन्यांनी
किंबहुना तब्बल ३२ महिन्यांनी आज आपण माझ्या धाग्यावर प्रतिसाद देत आहात हे देखील माझ्यासाठी आनंदाचे कारण आहे.>> कोणी तुम्हाला किती दिवसांपुर्वी प्रतिसाद दिला हे तुम्हाला कसे कळते. याच्या काही नोंदी ठेवता की काय? सहज कुतुहल म्हणुन विचारतो.
एक गोष्ट मान्य करायला पाहिजे
एक गोष्ट मान्य करायला पाहिजे की ऋ ने सगळ्यांसमोर जो डान्स केला आहे तो डान्स करायला गट्स लागतात. एका ठिकाणी त्याचा पाय घसरला पण त्याने गोंधळून न जाता प्रसंगावधान दाखवून माधुरी दीक्षितची मार डाला या गाण्याची स्टेप केली.
सगळ्यांसमोर जो डान्स केला आहे
सगळ्यांसमोर जो डान्स केला आहे तो डान्स करायला गट्स लागतात. >+१११
असे गटस् महागुरुंमध्ये पण आहेत.
सगळ्यांसमोर जो डान्स केला आहे
सगळ्यांसमोर जो डान्स केला आहे तो डान्स करायला गट्स लागतात.
>>> चूक... डान्स करायला गट्स लागत नाही, किंबहुना असा डान्स सगळेच करतात.. गट्स लागतात ते असा डान्स युट्युब वर टाकायला आणि त्याची लिंक पाठवायला ...
ऋन्मेष, तुला झिपर्या दाट
ऋन्मेष, तुला झिपर्या दाट असल्याने केसावर फुगे या गाण्यावर तू नाचु शकतो आणी ते केस विकुन फुगे पण घेऊ शकतोस. पण तुझ्या बरोबर जो उजडे चमन का माली नाचतोय, तो का नाचतोय? त्याला ते गाणे शोभत नाही.
रश्मी.
रश्मी.
बाकी तू बिनधास्त आहेस आणि बिनधास्त नाचलायस.
गट्स लागतात ते असा डान्स युट्युब वर टाकायला आणि त्याची लिंक पाठवायला ...>>> ह्याला सहमत च्रप्स.
तुस्सी ग्रेट हो...मला भयंकर
तुस्सी ग्रेट हो...मला भयंकर अवघडल्या सारखं होत नाच म्हटलं कि.. पण तुम्ही मी,मस्त नाचलात ..दिल खुलास..आणि खूप सयंमाने उत्तर देता इथे प्रत्येकiला ते तर जास्तच ग्रेट आहे..
ऋन्मेष, काय आहे बघा, अगदी
ऋन्मेष, काय आहे बघा, अगदी तुमचा राग राग करणारे पण येवून, अगदी काही सेंकद्स येवून विडिओ बघतात.... मज्जा आहे की नाही?
म्हणजे, तुम्ही त्यांना जागे करता असे म्हणायचे किती का काळाने .
धन्यवाद राज,
धन्यवाद राज,
बाकि, निगेटिव कामेंट देणार्यांना एक प्रश्न - व्हॉट यु वेर एक्स्पेक्टिंंग? कथक, टॅप ऑर रिवरडँस?
>>>>>>
निगेटीव्ह कॉमेंट तशी मला कोणाची आढळली नाही. ज्याचे त्याचे वैयक्तिक मत, त्याचा आदर असायलाच हवा. पण येस्स, पार्टी डान्स, ते देखील सोबतच्या २७ मित्रांमध्ये १९ जण मद्यपान करणारे आणि त्यांचा पहिला राऊंड झालाय. अश्यांसोबत डीजेला नाचताना जो नाच होणार तो गेल्यावेळी ऑफिसच्या फंक्शनला नाचलेलो त्यापेक्षा नक्कीच वेगळा असणार हे साहजिक आहे.
अगदी तुमचा राग राग करणारे पण
अगदी तुमचा राग राग करणारे पण येवून, अगदी काही सेंकद्स येवून विडिओ बघतात.... मज्जा आहे की नाही?
>>>>>
याचे कारण म्हणजे त्या रागात सुप्त प्रेम लपले असते. त्यामुळेच मी कधीही उलट उत्तर देऊन ते सुप्त प्रेम कायमचे लुप्त होईल हे बघत नाही
एका ठिकाणी त्याचा पाय घसरला
एका ठिकाणी त्याचा पाय घसरला पण त्याने गोंधळून न जाता प्रसंगावधान दाखवून माधुरी दीक्षितची मार डाला या गाण्याची स्टेप केली.
>>>>>
अच्छा ते मार डाला होते का..
ते त्यानंतर चर्चेचा विषय होते आमच्या ग्रूपवर. पाऊसाचे पाणी कोणाच्यातरी बूटांना वगैरे लागून तिथे आल्याने पाय घसरलेला. ज्या पोजिशनमध्ये पडलो तेच पुढे कंटिन्यू केले.
मी काही नाच शिकलो नाही, मला काही नाच येत नाही, फक्त ज्या बीट्स आहेत त्यानुसार स्टेप्स बाहेर पडतात. त्या तंत्रशुद्ध आहेत का, त्याला नाच तरी म्हणावे का, त्या मनोरंजक आहेत की हास्यास्पद आहेत, हा विचार कोण करतेय. नाचताना तो विचार करूही नये जर तुम्ही स्वतःसाठी नाचत असाल. त्यामुळे अगदी स्लो टेंपो असलेले सॅड साँग लागले तरी त्यावर मी नाचतो. पण जेव्हा माझा नाचायचा मूड असेल तेव्हा नाचतोच
तुस्सी ग्रेट हो...मला भयंकर
तुस्सी ग्रेट हो...मला भयंकर अवघडल्या सारखं होत नाच म्हटलं कि.. पण तुम्ही मी,मस्त नाचलात ..दिल खुलास.
>>>>
धन्यवाद ९६ क,
नाचावर नंतर एक वेगळा धागा काढायला हवा. सर्वसमावेशक. जिथे लोकं आपले नाचाचे अनुभव, आवड निवड, माहिती वगैरे शेअर करू शकतील.
मी गेले १२ वर्षे असे मित्रांसोबत नाचलो नसलो तरी मित्रांचे नाच मात्र बरेच आवडीने बघितली आहेत. नाच बघण्यातही एक मजा असते. त्यातही जे लोकं फार मोठे डान्सर वगैरे नसतात तरीही नाचायची प्रचंड आवड आणि उत्साह असतो अश्यांचा नाच बघायला आणखी मजा येते. दे सिंपली डोन्ट केअर
ऋन्मेष, तुला झिपर्या दाट
ऋन्मेष, तुला झिपर्या दाट असल्याने केसावर फुगे या गाण्यावर तू नाचु शकतो
>>
हे गाणे मी पहिल्यांदाच तेव्हा ऐकले होते. आता तुम्ही म्हणालात तसे गूगल करून आता पुन्हा ऐकले. ईथे नाव सांगितल्याबद्दल धन्यवाद. तरी पब्लिकला केसावर फुगे हे लिरीक्स ऐकून आता स्टेप्स त्याच्याशी रिलेट करता येतील
गट्स लागतात ते असा डान्स
गट्स लागतात ते असा डान्स युट्युब वर टाकायला आणि त्याची लिंक पाठवायला ...
>>>>>
परवा रात्री मी हा विडिओ फेसबूकवरही टाकलेला. तो आमच्या या नव्या सोसायटीमधील एका बाईने पाहिला. तसे ईथले फारसे कोणी अजून माझ्या फेसबूक लिस्टीत अॅड नाहीत. पण मुलांसोबत खाली खेळायला जातो म्हणून काही बायका ओळखीच्या आहेत त्यातल्या दोनतीन अॅड आहेत. तर त्या बाईने आपल्या नवर्यालाही तो दाखवला. काल स्वातंत्र्यदिनानिमित्तच्या कार्यक्रमात त्याने मला गाठले आणि जे काही मी नाचलो त्याचे कौतुक करू लागला. ईतकेच नाही तर तो कमिटी मेंबर असल्याने त्याने आणखी चार मेंबरना सांगितले. आता गणपती आणायचा ठरवत आहेत सोसायटीत. तर गणपती मिरवणूकीत आपल्याला डान्सर मिळाला म्हणत त्यांची चर्चा सुरू झाली. फसलोय आता हा विडिओ टाकून. अजून कोणाशी बॉन्डींग नाही की काही नाही. अश्यात माझ्याकडून त्यांनी नाचाची अपेक्षा केली तर पुन्हा अवघड प्रकरण होणार.
मला आवडला डान्स. असे
मला आवडला डान्स. असे उत्स्फूर्त धागे आले तर आवडेल. पण ते पोट इतके पुढे का? त्याचं कर काहीतरी. नाच रे मोरा वर नाचलेला कोण एकदम भन्नाट आहे.
ओह शिट, पोट लक्षात येऊ लागलेय
ओह शिट, पोट लक्षात येऊ लागलेय.. पण खरेय. आजवर कधी व्यायाम केलाच नव्हता पण लॉकडाऊनही कधी आयुष्यात आला नव्हता.
पिकनिकनंतर मलाही ते पोट जास्त जाणवले जेव्हा डोंगर चढावा लागला, जेव्हा नाच करावा लागला..
त्यामुळी घरी आल्याआल्या जिमचे कपडे ऑर्डर केलेत. जिम सोसायटीतच आहे. फक्त आता मुहुर्त शोधतोय
बाकी नाच आवडल्याबद्दल धन्यवाद
मी म्युटमध्ये व्हिडियो पाहिला
मी म्युटमध्ये व्हिडियो पाहिला त्यामुळे पाहताना असे वाटत होते कि ऋण्मेष च्या अंगात आले आहे
केसावर फुगे हे खांदेशी गाणं
केसावर फुगे हे खांदेशी गाणं आहे. खुप मज्जा येते ह्या गाण्यावर नाचायला आणि ऐकायला पण.
हो. तो सचीन कुमावत छान नाचलाय
हो. तो सचीन कुमावत छान नाचलाय. तश्या काही फार अवघड स्टेप्स नाहीत या गाण्याच्या. पण ऋन्मेषने या गाण्यावर पंगतीत भराभरा वाढणार्या वाढप्या सारखा डान्स का केला देव जाणे?
https://www.youtube.com/watch?v=8F9R_kiz5io
प्रतिसादाची संख्या वाढवायला
प्रतिसादाची संख्या वाढवायला प्रत्येकाला स्वतंत्र प्रतिसादात उत्तर
भारी स्कीम आहे
लगे रहो
इतके आचरट धागे काढूनही, त्यावर मनसोक्त आचरटपणा करूनही प्रतिसादात संख्या वाढावी म्हणून असल्या स्कीमा राबवायला लागत असतील तर हपापलेपणा किती असावा याचा चांगला अंदाज येतो
@ भावना,
@ भावना,
छान कल्पना आहे. विडिओतला ऑडिओ चेंज करून अंगात आल्याची एखादी मुजिक टाकून बघतो
आशुचँप,
आशुचँप,
आपला प्रतिसाद वाचून खेद वाटला.
आजवर नृत्य हे स्त्रियांची मक्तेदारी समजत आली आहे.
एखादा पुरुष नाचला तर त्याला भांड म्हणून हिणवले जाते.
अगदी शाहरूख खानलाही लग्नात नाचणारा भांड म्हणून हिणवले गेले आहे तिथे ऋन्मेष कोण.
स्त्रियांमध्येही आजही कित्येक घरांमध्ये मुलींनी उघड्यावर वा पब्लिकली नाचणे गैर आहे, चांगल्या घरातील मुली या नाचाबिचाच्या नादाला लागत नाहीत म्हणून बघितले जाते.
अश्यात एक पुरुष पुढाकार घेऊन नाचावर धागा काढत असेल तर त्याला तुम्ही सपोर्ट करायला हवा.
@ आशुचँप
@ आशुचँप
एक मिटींग आहे, नंतर यावर सविस्तर लिहितो.
तोपर्यंत तुम्ही हे खालचे दोन्ही विडीओ बघा आणि माझ्या नाचावर आपला प्रामाणिक प्रतिसाद द्या.
तुमचा स्क्रॉल करायचा त्रास वाचवायला लिंक देतो.
हा स्टेजवरचा - https://jumpshare.com/v/VlM4Mbuh5G1NNgrMjPup
हा पार्टीतला - https://www.youtube.com/watch?v=oWT6RUiOGrI
आशुचँप अहो तुमचे कुत्रे
आशुचँप अहो तुमचे कुत्रे मांजरीचे भिकार धागे आणि हा धागा काही फरक नाही
नसू दे की, फरक असलाच पाहिजे
नसू दे की, फरक असलाच पाहिजे असा काही नियम का बन्या?
तुम्हला शिव्या घालायला मिळत आहेत, तर एन्जॉय करा
हाय काय नाय काय
बन्या, आशूचँप
बन्या, आशूचँप
करायची असल्यास माझ्यावर टिका करा. एकमेकांवर नको _/\_
पण ऋन्मेषने या गाण्यावर
पण ऋन्मेषने या गाण्यावर पंगतीत भराभरा वाढणार्या वाढप्या सारखा डान्स का केला देव जाणे? Proud>>>> बरं, पण ऋन्मेषने माझ्या या प्रश्नाला उत्तर का बरे दिले नाही?
अहो याचे ऊत्तर अपेक्षित होते
अहो रश्मी याचे ऊत्तर अपेक्षित होते असे मला वाटले नाही.
तसेही प्रत्येक प्रतिसादाला उत्तर दिले की ते आशूचॅंप माझ्यावर प्रतिसाद वाढवल्याचा आरोप करतात
असो, पण खरेच काय उत्तर देऊ मी त्या प्रश्नाला? म्हणजे मी अमुक तमुक असाच डान्स का केला? कोण करते एवढे स्टेप्स वगैरेंचा विचार पार्टीत नाचताना.. जी एनर्जी लेव्हल त्या क्षणाला आहे ती वापरायची आणि गाणे कुठले आहे यापेक्षा आजूबाजूचा माहौल काय आहे त्यानुसार नाचायचे. त्यातही चारचौघांपेक्षा काहीतरी हटके नाचायचे हा किडा बाय डिफॉल्ट कित्येकांच्या डोक्यात असतोच. कोण मूळ गाण्यातल्या स्टेप्सचा विचार करून नाचते? असे मला वाटते.
अर्थात प्रत्येकाच्या फ्रेंड सर्कलची जातकुळी वेगळी असते. त्यानुसार अश्या पार्टीत डान्स करायची पद्धत बदलते. कुठे धिंगाणा असेल तर कुठे सिस्टमेटीक पद्धतीनेही नाचले जात असेल. चार बायका मिळून एकत्र येत एकच स्टेप्स नाचतात असेही मी पाहिले आहे. दहा बारा जण गरबा खेळल्यासारखे घेर करून अर्धा अर्धा तास तसेच नाचतात असेही पाहिले आहे ज्यात एक जण स्टेप सुचवणार आणि सारे जण तसेच नाचणार. जर ते सुद्धा जे करत आहेत ते एंजॉय करत असतील, जर मी आणि माझे मित्रही एंजॉय करत असू, तर सारेच आपापल्या जागी बरोबर आहेत.
Pages