माझा नाच आणि नाचाचा प्रवास - भाग दुसरा - पार्टी डान्स (विडिओसह)

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 August, 2021 - 21:24

ज्यांना लेख वाचायला बोअर होत असेल ते थेट विडिओ बघू शकतात.
दोन्ही भागातले दोन्ही विडिओ ईथे बघू शकता.
भाग १) स्टेज शो - https://jumpshare.com/v/VlM4Mbuh5G1NNgrMjPup
भाग २) पार्टी डान्स - https://www.youtube.com/watch?v=oWT6RUiOGrI

-----------------------

या लेखमालेतील पहिला भाग गेल्या वर्षी आपण जरूर वाचला असेल.
नसेल वाचला तर वाचून घ्या, तिथूनच हे पुढे लिहीणार आहे
माझा नाच आणि नाचाचा प्रवास ! (फोटो आणि विडिओसह) -
https://www.maayboli.com/node/72946

-----------------------

आता भाग दुसरा,

माझ्यातील लुप्त झालेला नाच पुनर्जिवित करताना मी ऑफिसच्या अ‍ॅन्युअल फंक्शनमध्ये स्टेजवर तर नाचलो होतो. पण तरी त्या आधीही आणि त्या नंतरही ऑफिसच्या कलीग्जसोबत पार्टीमध्ये कधी नाचणे झाले नाही. आधी ऑफिसच्या पार्टीत कोणी मला हात धरून खेचत नाचाचा आग्रह केला तर मी मला नाचताच येत नाही म्हणत सटकून जायचो. पण एकदा स्टेजवर नाचल्यावर आणि हा बरावाईट का होईना नाचू शकतो हे ऑफिसमध्ये सर्वांना समजल्यावर ते कारणही देता यायचे नाही. तरीही आता मूड नाही, मी आता नाचून दमलोय, वा गेले चार दिवस प्रॅक्टीसने पाय दुखू लागलेत म्हणत कलीग्जसोबत पार्टीत नाचणे टाळायचोच. कारण मी कोणाशी ट्युनिंग जमल्याशिवाय नाचूच शकत नाही हे मला ठाऊक होते. शेवटचे असे मला एखाद्या पार्टीत मित्रांसोबत नाचून तब्बल १२ वर्षे झाली होती. नाचासाठी लागणारा कम्फर्ट झोन मला माझी मुले आणि माझे घर वगळता बाहेर कुठेच मिळाला नव्हता.

सलग दोन वर्षे ऑफिसच्या फंक्शनला स्टेजवर नाच केल्यावर किमान हे तरी आपण वयाची पन्नास वर्षे होईपर्यंत दर वर्षी करायचे आणि आपल्यातील नाचाचा किडा जपायचा असे ठरवले होते. पण कोरोनामुळे गेल्यावर्षी ऑफिसचे फंक्शनही झाले नाही. येत्या वर्षात ते किती वेळा असेच रद्द होईल आणि किती वेळा आपण या संधीला मुकू याचीही आता कल्पना नव्हती.

जसे गेल्या काही वर्षात मी भला आणि माझे कुटुंब भले म्हणत मी माणूसघाणा झालो होतो तसेच आता आपले नाचणेही कुटुंबापुरतेच मर्यादीत असून बाह्य जगात नाचाशी असलेली आपली नाळ आता तुटली आहे हे मी स्विकारले होते. जिथे मला मित्रच शिल्लक राहिले नव्हते तिथे मित्रांसोबत होणारा नाचही आयुष्यात पुन्हा कधी येणार नाही हे मला समजले होते.

आणि अश्यात आली शाळेच्या मित्रांची पिकनिक....

शाळेच्या मित्रांची हि व्हॉटसपग्रूप स्थापनेपासूनची दरवर्षी एक याप्रमाणे सातवी पिकनिक होती. आणि मी आता ते माझे मित्र राहिलेच नाहीत समजून त्यांना आधीच्या सहा वेळा टांग दिली होती. अखेरीस बायकोच्या आग्रहावरून एकदा जाऊन बघूयाच म्हणत या सातव्या वर्षी तयार झालो होतो.

या पिकनिकचा वृत्तांत ईथे सविस्तर वाचू शकता -
एका माणूसघाण्याची पिकनिक - विडिओ आणि केकसह -
https://www.maayboli.com/node/79682

पिकनिक माझ्यासाठी छान शांततेत पार पडत होती. मी मित्रांची कंपनी पुरेसे अंतर राखून का होईना, त्यांच्यात न मिसळता का होईना, तरीही दुरूनच त्यांचे निरीक्षण करत एंजॉय करत होतो. कोणाशी स्वत:हून बोलायला जात नव्हतो, पण सर्वांच्या गप्पा आणि किस्से ऐकून भूतकाळाच्या आठवणी जागवत होतो. संध्याकाळपर्यंत सारे काही ठिक होते. मी नेहमीसारखे माझ्याच कोषात होतो, पण तरीही कुठे येऊन फसलो असे तोपर्यंत झाले नव्हते. पण संध्याकाळी समजले की त्या हॉटेलमध्ये रात्री डीजे सुद्धा आहे.. अरे देवा !! मी कपाळावर हात मारला. आता तो होणारा आग्रह आणि आपण द्यायचा नकार, फार ईरीटेटींग असते ते सारे. विचारांनीच पोटात गोळा आला.

सायंकाळच्या ओल्या पार्टीला मध्यांतराचा ब्रेक देऊन सर्वांची पावले थिरकायला डीजे असणार्‍या हॉलकडे वळली तेव्हा एका मित्राने माझ्या खांद्यावर हात टाकत विचारले, नाचतोस का?
मी हो म्हणावे की नाही, असा विचार करत असतानाच अजून एक मित्र म्हणाला, तू ऑफिसच्या प्रोग्रामला नाचलेलास ना? मी पाहिलेला विडिओ फेसबूकवर... गेम ओवर!

मी विचार केला, गपचूप थोडा वेळ बाजूला उभे राहून बघूया सर्वांचा नाच आणि मी सुद्धा त्यांच्यात आहे हे लक्षात यायच्या आधीच रूमवर सटकूया आणि दोनतीन तास तिथेच लपून बसूया.

पण नियतीच्या मनात काहीतरी स्पेशल लिहिले होते. त्याशिवाय हे शक्यच नव्हते...

आम्ही आत शिरलो आणि डान्सफ्लोअरवर उतरलो तसे पहिलेच गाणे लागले ते बचना ए हसीनो, लो मै आ गया. हे तेच गाणे ज्यावर मी गेल्या वर्षी ऑफिसला नाचलो होतो. मग काय घेतला चान्स. उतरलो रिंगणात. माझ्या दोनचार स्टेप्स बघून पोरे थक्क झाली. भाई ये तो सोलो डान्सर है म्हणत सगळे मागे सरकून एक रिंगण तयार केले आणि मी एकटाच नाचू लागलो. मुले चेकाळू लागली. आणि मला नाचतानाच जाणवू लागले की मी शेलमधून बाहेर येतोय. पाठोपाठ बघतोय रिक्षावाला झाले, पुन्हा डॉनचे गाणे लागले तसे पुन्हा माझा सोलो डान्स सुरू झाला. झिंगाटला अक्षर्शा झिंगाटलो, त्यानंतर नागाची पिल्लेही खवळली, जवळपास दोन अडीच तास नाचून झाल्यावर यारी दोस्तीच्या गाण्यांनी नाचाच्या कार्यक्रमाचा समारोप झाला. पण माझ्यासाठी ती पिकनिक तिथे खरी सुरू झाली. एका बोअरींग दुपार आणि काहीश्या उदास संध्याकाळीनंतर एक रात्र उजळून निघाली.

ज्या नाचाच्या कार्यक्रमाला मी इरीटेटींग समजून रूमवर जाऊन लपणार होतो, त्यानेच मला मित्रांच्या मुख्य प्रवाहात सामील केले होते. मी नाचून नाचून दमल्यावरही, पोटाच्या आजाराने उचल खाल्यावरही, मित्रांचे हात खेचून आग्रह होत होते आणि मी देखील ते उत्स्फुर्तपणे पुरवले होते.

मी नाचताना कोणी विडिओ काढत असेल तर मला फार ऑकवर्ड होते, मुद्दाम कॅमेर्‍यासमोर जात हात हलवणे तर बिलकुल जमत नाही. अगदी घरातही मुलांसोबत नाचताना कधी कोणाला माझा विडिओ काढू दिला नाही. कारण नाच कोणाला दाखवायला करा हे मला कधीच जमले नाही. नाच हा मी नेहमी माझ्या मूडनुसार व्यक्त व्हायलाच केला आहे. ते म्हणतात ना, असे नाचा की कोणी बघत नाहीये. त्यामुळे ते कॅमेर्‍याचे रोखलेले डोळेही मला नेहमीच नकोसे वाटले आहेत. पण तरीही काही मित्रांनी नाचाचे उलटसुलट विडिओ बनवले होते. जे व्हॉटसपवर ग्रूपवर शेअर केल्यानंतर त्यातल्याच माझ्या काही नाचांचे तुकडे जोडून आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरलेल्या या पिकनिकची आठवण म्हणून मी एक विडिओ बनवला जो लेखा खालील लिंकवर बघू शकता.

घरी जेव्हा मी माझ्या मुलीला माझ्या नाचाचा हा विडिओ दाखवला तेव्हा तिचा आनंद बघण्यासारखा होता. ती नेहमी मला चिडवायची की मला हंड्रेड फ्रेंड्स आहेत आणि तुला एकही नाही. जेव्हा तिला कळलेले की मी पिकनिकला जातोय आणि ते सुद्धा तब्बल पंचवीस तीस मित्रांसोबत तेव्हा याचेच तिला फार अप्रूप वाटले होते. आणि त्यानंतर आपला बाप आपल्याव्यतिरीक्त आणखी कोणासोबत तसाच वेड्यासारखा नाचू शकतो जसे आपल्यासोबत नाचतो हे बघून तिला आणखी आनंद झाला. आणि त्याहीपेक्षा जास्त आनंद माझ्या बायकोला झाला कारण मी कोणासोबतही ट्युनिंग जमल्याशिवाय नाचत नाही हे तिला माहीत होते. त्यामुळे फायनली आपल्या नवर्‍याला काही मित्र मिळाले. आता तो त्यांना वेळ देईल, आणि सतत आपल्या डोक्यावर नसेल. असा तो सुटकेचा आनंद होता Happy

माझ्यासाठीही हा नाच सर्वात स्पेशल ईतक्यासाठीच होता कारण फायनली शेलमधून बाहेर येत तब्बल बारा वर्षांनी मी कुठल्याही मित्रांसोबत असे पार्टीमध्ये नाचत होतो. नाच जे माझ्यासाठी व्यक्त होण्याचे सर्वात महत्वाचे माध्यम आहे. नाच जो मी दिवसातून शंभर वेळा घरात येता जाता खिडक्यांच्या आरश्यासमोर, चहा बनवताना किचन ओट्यासमोर, कपडे बदलताना कपाटासमोर, आंघोळ करताना डोक्यावरून ओघळणार्‍या पाण्यासोबत, लॅपटॉपवर बसल्या बसल्या ऑफिसचे काम करत, घरची अक्षरशा कुठलीही कामे करताना सतत करतच असतो... अगदी हा लेख लिहीतानाही मध्येमध्ये ब्रेक घेत जो चालूच आहे.. तो नाच, मी तब्बल बारा वर्षांनी पुन्हा एकदा कोण बघतेय न बघतेय याची पर्वा न करता बाहेर मित्रांसोबत केला होता Happy

____________________________

धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उडाल्या जाहीराती. आयडीही गेला असेल.

@ मृणाली, धागा काढा ओणमची माहिती हवीय असा. किंवा तुम्ही थोडी द्या, बाकीचे लोकं भर टाकतील. किंवा तुम्ही कसे तुमच्या एका मल्याळम मित्राबरोबर ओणम साजरा केला यावर काल्पनिक किस्सा लिहा. भले चुकीचे लिहा. मग ती चुकीची माहिती खोडत जाणकार लोकं योग्य माहिती देतील Happy

छे हो, कुठला प्रश्न? सुटला असेल..>> हे म्हणजे पुजेला गेलो पण यजमानांनी प्रसाद तर दिला नाहीच वरुन 'कोण तुम्ही' असा प्रश्न केला असं झालं.

हा धागा आता विनोदी होऊ लागलाय. विरु प्रसाद Lol
बहुतेक तुमचा प्रश्न राखून ठेवला होता. किंवा एक प्रतिसादात उत्तर मावण्यासारखं नसेल , वेगळ्या धाग्यात उत्तर येईल.

किंबहुना तब्बल ३२ महिन्यांनी आज आपण माझ्या धाग्यावर प्रतिसाद देत आहात हे देखील माझ्यासाठी आनंदाचे कारण आहे.>> कोणी तुम्हाला किती दिवसांपुर्वी प्रतिसाद दिला हे तुम्हाला कसे कळते. याच्या काही नोंदी ठेवता की काय? सहज कुतुहल म्हणुन विचारतो.

Submitted by वीरु on 16 August, 2021 - 07:30>>>>> हा घे वीरू चा प्रश्न

१००

100 च्या वर प्रतिसाद झालेत आणि youtube वर पण 870 views झाले, लवकरच हजार होतील, कारण तुमचे चहाते खूप आहेत. मी स्वतः 12 वेळेस बघितला डान्स, खूप छान आहे

हे म्हणजे पुजेला गेलो पण यजमानांनी प्रसाद तर दिला नाहीच वरुन 'कोण तुम्ही' असा प्रश्न केला असं झालं.
>>>>
छे छे विरू, तुम्ही पूजेला आलात पण अचानक खास जिव्हाळ्याचे कोणीतरी (आशूचँप) आल्याने तुमचे आदरातिथ्य करणे राहून गेले.
आता तुम्हाला प्रसाद मिळाला नाही हे कळले तर ढोपरापासून हात जोडून नमस्कार करत तुमच्यासमोर ऊभा आहे. प्रतिसादाला उत्तर देण्यास चुकलो वा विलंब झाला म्हणून रागावून माझ्या धाग्यांवर प्रतिसाद देणे सोडू नका Happy

हा धागा आता विनोदी होऊ लागलाय >>>> नाचही विनोदीच होता. लोकांना हे समजेसमजे पर्यंत धागा शंभरीला पोहोचला हा काय माझा दोष?

कोणी तुम्हाला किती दिवसांपुर्वी प्रतिसाद दिला हे तुम्हाला कसे कळते. याच्या काही नोंदी ठेवता की काय? सहज कुतुहल म्हणुन विचारतो.
>>>>

ऊप्स हा प्रश्न होता का?
छे हो, सायो यांना बरेच काळाने पाहिले. मूळ लेखात तब्बल बारा वर्षानंतर डान्स केला असा ऊल्लेख होता (अर्थात जो खराच आहे). तर त्याच धर्तीवर गंमतीने अमुकतमुक महिन्यांनी सायो आपला प्रतिसाद आला, आनंद झाला असे लिहिले. आता ते अमुकतमुक महिने किती लिहिलेले हे सुद्धा लक्षात नाही. काहीतरी लिहायचा म्हणून आकडा लिहिलेला Happy

@ साधा माणूस,
youtube वर पण 870 views झाले. मी स्वतः 12 वेळेस बघितला डान्स.
>>>>>>>>

परवा सहज यूट्यूब चॅनेल आणि आधीचा अपलोड केलेला विडिओ चेक करत होतो तेव्हा समजले की माझ्या अकाऊंट मधून चेक करता किती व्यू आले, कधी आले, कुठल्या देशातून आले, बायकांचे आले की पुरुषांचे आले, किती युनिक व्युवर आहेत, किती रीपीट व्यूवर आहेत असे बरेच डिटेल्स कळतात.
आज आपला प्रश्न वाचून पुन्हा ते आठवले. आणि त्या अनुषंगाने पुन्हा चेक केले.
या टोटल व्यूजमध्ये ५३५ युनिक व्यूवर्स आहेत आणि २०४ रिटर्निंग व्यूवर्स आहेत.
जुना स्टेज शो डान्सचा विडिओ युट्यूबवरच नसल्याने तिथे जास्त डिटेल्स न कळता फक्त व्यू कळत आहेत. ते सुद्धा १३५६ झालेत.
हे सारे मायबोलीकरच असल्याने मायबोलीकरांचे मनापासून धन्यवाद Happy
कौतुक मिळो वा टिका पदरी पडो, ईथे एक आपुलकीची, आपलेपणाची भावना जाणवते म्हणूनच पुन्हा पुन्हा यावेसे वाटते Happy

Pages