ज्यांना लेख वाचायला बोअर होत असेल ते थेट विडिओ बघू शकतात.
दोन्ही भागातले दोन्ही विडिओ ईथे बघू शकता.
भाग १) स्टेज शो - https://jumpshare.com/v/VlM4Mbuh5G1NNgrMjPup
भाग २) पार्टी डान्स - https://www.youtube.com/watch?v=oWT6RUiOGrI
-----------------------
या लेखमालेतील पहिला भाग गेल्या वर्षी आपण जरूर वाचला असेल.
नसेल वाचला तर वाचून घ्या, तिथूनच हे पुढे लिहीणार आहे
माझा नाच आणि नाचाचा प्रवास ! (फोटो आणि विडिओसह) -
https://www.maayboli.com/node/72946
-----------------------
आता भाग दुसरा,
माझ्यातील लुप्त झालेला नाच पुनर्जिवित करताना मी ऑफिसच्या अॅन्युअल फंक्शनमध्ये स्टेजवर तर नाचलो होतो. पण तरी त्या आधीही आणि त्या नंतरही ऑफिसच्या कलीग्जसोबत पार्टीमध्ये कधी नाचणे झाले नाही. आधी ऑफिसच्या पार्टीत कोणी मला हात धरून खेचत नाचाचा आग्रह केला तर मी मला नाचताच येत नाही म्हणत सटकून जायचो. पण एकदा स्टेजवर नाचल्यावर आणि हा बरावाईट का होईना नाचू शकतो हे ऑफिसमध्ये सर्वांना समजल्यावर ते कारणही देता यायचे नाही. तरीही आता मूड नाही, मी आता नाचून दमलोय, वा गेले चार दिवस प्रॅक्टीसने पाय दुखू लागलेत म्हणत कलीग्जसोबत पार्टीत नाचणे टाळायचोच. कारण मी कोणाशी ट्युनिंग जमल्याशिवाय नाचूच शकत नाही हे मला ठाऊक होते. शेवटचे असे मला एखाद्या पार्टीत मित्रांसोबत नाचून तब्बल १२ वर्षे झाली होती. नाचासाठी लागणारा कम्फर्ट झोन मला माझी मुले आणि माझे घर वगळता बाहेर कुठेच मिळाला नव्हता.
सलग दोन वर्षे ऑफिसच्या फंक्शनला स्टेजवर नाच केल्यावर किमान हे तरी आपण वयाची पन्नास वर्षे होईपर्यंत दर वर्षी करायचे आणि आपल्यातील नाचाचा किडा जपायचा असे ठरवले होते. पण कोरोनामुळे गेल्यावर्षी ऑफिसचे फंक्शनही झाले नाही. येत्या वर्षात ते किती वेळा असेच रद्द होईल आणि किती वेळा आपण या संधीला मुकू याचीही आता कल्पना नव्हती.
जसे गेल्या काही वर्षात मी भला आणि माझे कुटुंब भले म्हणत मी माणूसघाणा झालो होतो तसेच आता आपले नाचणेही कुटुंबापुरतेच मर्यादीत असून बाह्य जगात नाचाशी असलेली आपली नाळ आता तुटली आहे हे मी स्विकारले होते. जिथे मला मित्रच शिल्लक राहिले नव्हते तिथे मित्रांसोबत होणारा नाचही आयुष्यात पुन्हा कधी येणार नाही हे मला समजले होते.
आणि अश्यात आली शाळेच्या मित्रांची पिकनिक....
शाळेच्या मित्रांची हि व्हॉटसपग्रूप स्थापनेपासूनची दरवर्षी एक याप्रमाणे सातवी पिकनिक होती. आणि मी आता ते माझे मित्र राहिलेच नाहीत समजून त्यांना आधीच्या सहा वेळा टांग दिली होती. अखेरीस बायकोच्या आग्रहावरून एकदा जाऊन बघूयाच म्हणत या सातव्या वर्षी तयार झालो होतो.
या पिकनिकचा वृत्तांत ईथे सविस्तर वाचू शकता -
एका माणूसघाण्याची पिकनिक - विडिओ आणि केकसह -
https://www.maayboli.com/node/79682
पिकनिक माझ्यासाठी छान शांततेत पार पडत होती. मी मित्रांची कंपनी पुरेसे अंतर राखून का होईना, त्यांच्यात न मिसळता का होईना, तरीही दुरूनच त्यांचे निरीक्षण करत एंजॉय करत होतो. कोणाशी स्वत:हून बोलायला जात नव्हतो, पण सर्वांच्या गप्पा आणि किस्से ऐकून भूतकाळाच्या आठवणी जागवत होतो. संध्याकाळपर्यंत सारे काही ठिक होते. मी नेहमीसारखे माझ्याच कोषात होतो, पण तरीही कुठे येऊन फसलो असे तोपर्यंत झाले नव्हते. पण संध्याकाळी समजले की त्या हॉटेलमध्ये रात्री डीजे सुद्धा आहे.. अरे देवा !! मी कपाळावर हात मारला. आता तो होणारा आग्रह आणि आपण द्यायचा नकार, फार ईरीटेटींग असते ते सारे. विचारांनीच पोटात गोळा आला.
सायंकाळच्या ओल्या पार्टीला मध्यांतराचा ब्रेक देऊन सर्वांची पावले थिरकायला डीजे असणार्या हॉलकडे वळली तेव्हा एका मित्राने माझ्या खांद्यावर हात टाकत विचारले, नाचतोस का?
मी हो म्हणावे की नाही, असा विचार करत असतानाच अजून एक मित्र म्हणाला, तू ऑफिसच्या प्रोग्रामला नाचलेलास ना? मी पाहिलेला विडिओ फेसबूकवर... गेम ओवर!
मी विचार केला, गपचूप थोडा वेळ बाजूला उभे राहून बघूया सर्वांचा नाच आणि मी सुद्धा त्यांच्यात आहे हे लक्षात यायच्या आधीच रूमवर सटकूया आणि दोनतीन तास तिथेच लपून बसूया.
पण नियतीच्या मनात काहीतरी स्पेशल लिहिले होते. त्याशिवाय हे शक्यच नव्हते...
आम्ही आत शिरलो आणि डान्सफ्लोअरवर उतरलो तसे पहिलेच गाणे लागले ते बचना ए हसीनो, लो मै आ गया. हे तेच गाणे ज्यावर मी गेल्या वर्षी ऑफिसला नाचलो होतो. मग काय घेतला चान्स. उतरलो रिंगणात. माझ्या दोनचार स्टेप्स बघून पोरे थक्क झाली. भाई ये तो सोलो डान्सर है म्हणत सगळे मागे सरकून एक रिंगण तयार केले आणि मी एकटाच नाचू लागलो. मुले चेकाळू लागली. आणि मला नाचतानाच जाणवू लागले की मी शेलमधून बाहेर येतोय. पाठोपाठ बघतोय रिक्षावाला झाले, पुन्हा डॉनचे गाणे लागले तसे पुन्हा माझा सोलो डान्स सुरू झाला. झिंगाटला अक्षर्शा झिंगाटलो, त्यानंतर नागाची पिल्लेही खवळली, जवळपास दोन अडीच तास नाचून झाल्यावर यारी दोस्तीच्या गाण्यांनी नाचाच्या कार्यक्रमाचा समारोप झाला. पण माझ्यासाठी ती पिकनिक तिथे खरी सुरू झाली. एका बोअरींग दुपार आणि काहीश्या उदास संध्याकाळीनंतर एक रात्र उजळून निघाली.
ज्या नाचाच्या कार्यक्रमाला मी इरीटेटींग समजून रूमवर जाऊन लपणार होतो, त्यानेच मला मित्रांच्या मुख्य प्रवाहात सामील केले होते. मी नाचून नाचून दमल्यावरही, पोटाच्या आजाराने उचल खाल्यावरही, मित्रांचे हात खेचून आग्रह होत होते आणि मी देखील ते उत्स्फुर्तपणे पुरवले होते.
मी नाचताना कोणी विडिओ काढत असेल तर मला फार ऑकवर्ड होते, मुद्दाम कॅमेर्यासमोर जात हात हलवणे तर बिलकुल जमत नाही. अगदी घरातही मुलांसोबत नाचताना कधी कोणाला माझा विडिओ काढू दिला नाही. कारण नाच कोणाला दाखवायला करा हे मला कधीच जमले नाही. नाच हा मी नेहमी माझ्या मूडनुसार व्यक्त व्हायलाच केला आहे. ते म्हणतात ना, असे नाचा की कोणी बघत नाहीये. त्यामुळे ते कॅमेर्याचे रोखलेले डोळेही मला नेहमीच नकोसे वाटले आहेत. पण तरीही काही मित्रांनी नाचाचे उलटसुलट विडिओ बनवले होते. जे व्हॉटसपवर ग्रूपवर शेअर केल्यानंतर त्यातल्याच माझ्या काही नाचांचे तुकडे जोडून आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरलेल्या या पिकनिकची आठवण म्हणून मी एक विडिओ बनवला जो लेखा खालील लिंकवर बघू शकता.
घरी जेव्हा मी माझ्या मुलीला माझ्या नाचाचा हा विडिओ दाखवला तेव्हा तिचा आनंद बघण्यासारखा होता. ती नेहमी मला चिडवायची की मला हंड्रेड फ्रेंड्स आहेत आणि तुला एकही नाही. जेव्हा तिला कळलेले की मी पिकनिकला जातोय आणि ते सुद्धा तब्बल पंचवीस तीस मित्रांसोबत तेव्हा याचेच तिला फार अप्रूप वाटले होते. आणि त्यानंतर आपला बाप आपल्याव्यतिरीक्त आणखी कोणासोबत तसाच वेड्यासारखा नाचू शकतो जसे आपल्यासोबत नाचतो हे बघून तिला आणखी आनंद झाला. आणि त्याहीपेक्षा जास्त आनंद माझ्या बायकोला झाला कारण मी कोणासोबतही ट्युनिंग जमल्याशिवाय नाचत नाही हे तिला माहीत होते. त्यामुळे फायनली आपल्या नवर्याला काही मित्र मिळाले. आता तो त्यांना वेळ देईल, आणि सतत आपल्या डोक्यावर नसेल. असा तो सुटकेचा आनंद होता
माझ्यासाठीही हा नाच सर्वात स्पेशल ईतक्यासाठीच होता कारण फायनली शेलमधून बाहेर येत तब्बल बारा वर्षांनी मी कुठल्याही मित्रांसोबत असे पार्टीमध्ये नाचत होतो. नाच जे माझ्यासाठी व्यक्त होण्याचे सर्वात महत्वाचे माध्यम आहे. नाच जो मी दिवसातून शंभर वेळा घरात येता जाता खिडक्यांच्या आरश्यासमोर, चहा बनवताना किचन ओट्यासमोर, कपडे बदलताना कपाटासमोर, आंघोळ करताना डोक्यावरून ओघळणार्या पाण्यासोबत, लॅपटॉपवर बसल्या बसल्या ऑफिसचे काम करत, घरची अक्षरशा कुठलीही कामे करताना सतत करतच असतो... अगदी हा लेख लिहीतानाही मध्येमध्ये ब्रेक घेत जो चालूच आहे.. तो नाच, मी तब्बल बारा वर्षांनी पुन्हा एकदा कोण बघतेय न बघतेय याची पर्वा न करता बाहेर मित्रांसोबत केला होता
____________________________
धन्यवाद,
ऋन्मेऽऽष
माझ्या नाचाचा विडिओ - यु
माझ्या नाचाचा विडिओ - यु ट्यूब लिंक - https://www.youtube.com/watch?v=oWT6RUiOGrI
दिसत नसेल तर प्लीज कळवा, गेल्यावेळी यूट्यूबवर विडिओ अपलोड करताना त्यातील गाण्यामुळे कॉपीराईटचा प्रॉब्लेम झालेला आणि दिसत नव्हता.
भयंकर सुंदर असा हा डांस
भयंकर सुंदर असा हा डांस प्रकार आहे... सकाळी सकाळी पाहिल्याने आजच्या दिवसाचे सार्थक झालेले आहे आता मि सु डो मी
व्हिडिओ बघितला. ऋन्मेऽऽष यार
व्हिडिओ बघितला. ऋन्मेऽऽष यार तू भारी माणूस आहेस एकदम.
खरोखर अप्रतिम डान्स, अजून
खरोखर अप्रतिम डान्स, अजून बघायला आवडेल.
आज मला कळले तुम्ही दारूला
आज मला कळले तुम्ही दारूला विरोध का करता...
शराब वो पिते है जो नशा चाहते है, आप तो बिन पियेही नशे मे होते हो...
भयंकर सुंदर असा हा डांस
भयंकर सुंदर असा हा डांस प्रकार आहे.>>>> काय म्हणावं ह्या डांस प्रकाराला? छान छान आहे.
आता कळालं तुला पिळगावकर का
आता कळालं तुला पिळगावकर का आवडतात ते
आता कळालं तुला पिळगावकर का
आता कळालं तुला पिळगावकर का आवडतात ते
81 व्ह्यू ज 5 तासात म्हणजे
81 व्ह्यू ज 5 तासात म्हणजे गेला बाजार 50 तरी माबोकर च व्हिजिट देऊन आले तिथे.
पचास व्ह्यूज और सिर्फ सात कमेंट्स , बहुत नाइन्सफी है ये | (दिवे घ्या)
वर्णिता
वर्णिता
छान नाचता तुम्ही..
छान नाचता तुम्ही..
हिडीस प्रकार होता, जे काही
हिडीस प्रकार होता, जे काही पाहिले ते, अर्थात महिलामंडळ यालाही उचलुन धरेलच
जेवढे धाग्यात कौतुक केले आहे
जेवढे धाग्यात कौतुक केले आहे
तेवढा काही छान डान्स नाही आहे
सायलेंट करुन व्हिडीओ बघितला
सायलेंट करुन व्हिडीओ बघितला तर ते जत्रेबित्रेत उग्र दैवतांचे संचार झाल्यावर लोकं जसे हलतात डुलतात तसं दिसतंय.
एवढं काय खास डान्स वगैरे नाही
एवढं काय खास डान्स वगैरे नाही. उगाच वाढीव लिहिलेय.
आत्ताच धागाकर्ता यांनी
आत्ताच धागाकर्ता यांनी तोंडभरुन कौतुक केलेला त्यांचा नाच पाहिला. चित्रविचित्र हलचाली करत, झटके आल्यासारखे हात पाय हलवत उड्या मारत इकडे तिकडे पळणे, पळतांना मध्येच धडपडणे याला नाच तरी कसे म्हणावे असा प्रश्न पडला. पण तुम्ही चार घटका सोशल मिडियाच्या विळख्यातुन सुटुन वास्तव दुनियेत रमलात म्हणुन तुमचे अभिनंदन.
https://youtu.be/c8U6_1o5O9A
https://youtu.be/c8U6_1o5O9A
हा नाच रे मोरा डान्स काही महिन्यापूर्वी तुफान व्हायरल झाला होता. त्याची आठवण आली. बघा तुम्हीही घ्याच असं काही मनावर
३० एक सेकंद पाहिला असेल फक्त.
३० एक सेकंद पाहिला असेल फक्त. वरच्या लेखात स्वतःच्या ह्या सुमार नाचाचं कौतुक आहे की काय?!
हे असे अंगविक्षेप करून
हे असे अंगविक्षेप करून स्वतःचं हसू करून घेऊ नका. ह्याला डान्स म्हणत नाहीत.जे लोक तुमचं ह्या नाचासाठी कौतुक करत आहेत ते स्वतःचं मनोरंजन करून घेत आहेत. ग्रो अप.
कै च्या कै डान्स ब्वा,
कै च्या कै डान्स ब्वा,
म्हंजी आम्ही बी आशे धागे काढू शकतो का ?
जस कि,
तुम्ही कशे घोरता.... ?:)
माझा दारू पिण्याचा प्रवास...:), फँण्टा मध्ये दारू कशी प्यावी ...?
तुम्ही बाथरूम मधे गाणे कसे गाता ...?
बाथरूम मधे गाण्याला शेजारी विरोध करतात, काय करावे ...?
अजून बरेच आहेत, सध्या इतकेच पुरे .
सांगा कोण कोण प्रतिसाद देणार?
हलकेच घ्या
आज स्वातंत्र्यदिनामुळे धागा
आज स्वातंत्र्यदिनामुळे धागा पुन्हा बघायला आता वेळ मिळाला.
छान प्रतिसाद आलेत
धन्यवाद अनिश्का, साधा माणूस
ऋन्मेऽऽष यार तू भारी माणूस आहेस एकदम. >>> धन्यवाद बोकलत. फार डीप विचार न करता आपल्या मनाचे ऐकून वागू लागलो तर सारे जगच भारी आहे. मी सुद्धा हे या पिकनिकच्या निमित्ताने अनुभवले
आज मला कळले तुम्ही दारूला
आज मला कळले तुम्ही दारूला विरोध का करता...
शराब वो पिते है जो नशा चाहते है, आप तो बिन पियेही नशे मे होते हो...
>>>>
हा हा च्रप्स,
हो
मी माझ्या पहिल्या लेखातही हे लिहिले होते. मी नाचताना पिऊन नाचतोय असे आरोप माझ्यावर नेहमी होतात.
पण मला असेच नाचता येते. असेच जगता येते. जिथे हे अलाउड नसते तिथून मी दूरच राहणे पसंद करतो
काय म्हणावं ह्या डांस
काय म्हणावं ह्या डांस प्रकाराला? छान छान आहे. Proud
>>>>
मृणाली, नाव नसेल काही तर माझेच द्या. मी कॉपीराईट घेतो लगेच
धन्यवाद, बाई दवे
आता कळालं तुला पिळगावकर का
आता कळालं तुला पिळगावकर का आवडतात ते
>>>>>>
@ रीया, मला पिळगावकर गंमत जंमत पासून आवडतात. त्यांना वयाची तमा न बाळगता उत्स्फुर्त नाचताही येते हे मला पहिल्यांदा नच बलियेमध्ये समजले. तेव्हा कौतुक वाटले. पुढे महागुरू म्हणून त्यांना ज्ञात असलेले जे नाचातले बारकावे पाहिले तेव्हा आदर वाटू लागला.
माझे बालपणीपासूनचे नृत्यप्रेम आणि सचिन पिळगावकर आवडीचे असणे हे दोन संपूर्णपणे वेगळे विषय आहेत.
छान नाचता तुम्ही.. >>> सोनाली, धन्यवाद
81 व्ह्यू ज 5 तासात म्हणजे
81 व्ह्यू ज 5 तासात म्हणजे गेला बाजार 50 तरी माबोकर च व्हिजिट देऊन आले तिथे.
पचास व्ह्यूज और सिर्फ सात कमेंट्स , बहुत नाइन्सफी है ये | (दिवे घ्या)
>>>>>
वर्णिता, हाहा
याचे विश्लेषण करावे लागेल.
बरेचसे मायबोलीकर तसेच मूकवाचक लॉगिन न करता ईथे येतात. त्यांनी धागा उघडला, नाच पाहिला. पण लॉगिन न केल्याने प्रतिसाद दिला नसेल. वा ते मूकवाचक असल्याने कधीच प्रतिसाद देत नसतील. हे असे प्रत्येक धाग्याबाबत होत असावे. फक्त ईथे यूट्यूबलिंकमुळे धागा रीड किती जणांनी केला हे समजले.
दुसरे एक कारण असेही असेल की ज्यांनी तो विडिओ पाहिला त्यांना तो आवडून ते मंत्रमुग्ध झाले, वा न आवडून शॉक्ड झाले असावेत. ज्याची त्याची आवड. पण परीणामी ईथे प्रतिसाद द्यायचे राहून गेले असावे
तसेही प्रतिसाद महत्वाचे नाहीत. जास्तीत जास्त लोकांनी हा धागा वाचावा, जमल्यास विडिओही बघावा. कोणेतरी माझ्यासारखा असेल जो कोषात असेल, आणि हे पाहून त्यालाही त्यातून बाहेर पडावेसे वाटेल. कसलाही विचार न करता बेछूट जगावेसे वाटेल. एकामध्ये तरी ही भावना जागृत झाली तरी धागा सार्थकी लागला.
महिलामंडळ यालाही उचलुन धरेलच
महिलामंडळ यालाही उचलुन धरेलच >>> कोण महिलामंडळ बन्या? हि कॉमेंट आपण आधीही काही वेळा दिली होती का? जेव्हा जेव्हा महिलामंडळ हा शब्द एखाद्या पुरुषाकडून वापरला जातो तेव्हा त्यामागे महिलांना एक छुपा टोमणा असतो. असो, हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे, नंतर नक्की काढूया
सायलेंट करुन व्हिडीओ बघितला
सायलेंट करुन व्हिडीओ बघितला तर ते जत्रेबित्रेत उग्र दैवतांचे संचार झाल्यावर लोकं जसे हलतात डुलतात तसं दिसतंय. Proud
>>>>
हा हा हा हाडळीचे आशिक, सही पकडे है
नाचाची थीम तीच होती
@ मैत्रेयी,
नाच रे मोरा भारी होते
असे विडिओ ठरवून बनत नाहीत. उत्स्फुर्त बनतात. आणि त्यातच मजा असते.
तुम्ही चार घटका सोशल
तुम्ही चार घटका सोशल मिडियाच्या विळख्यातुन सुटुन वास्तव दुनियेत रमलात म्हणुन तुमचे अभिनंदन.
>>>>
वीरू,
सोशल मिडीया हा विळखा नाहीये. वा हे आभासी जग नाहीये. तसे असते तर तुम्ही, मी, हे वरचे सर्व, आपण सारेच मायबोलीकर ईथे आनंदाने आलो नसतो. असो, हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे. नंतर नक्की काढतो.
पण येस्स, मित्रांसोबत नाचण्यात एक वेगळीच मजा असते, ऑनलाईन मित्रांसोबत आपण चर्चेचा, गप्पांचा आनंद लुटू शकतो, नाचाचा नाही
वरच्या लेखात स्वतःच्या ह्या
वरच्या लेखात स्वतःच्या ह्या सुमार नाचाचं कौतुक आहे की काय?! Uhoh
>>>>>>
@ सायो,
बिल्कुल नाही हं.
कौतुक आहे ते १२ वर्षानंतर शेलमधून बाहेर येत मित्रांसोबत मनमोकळेपणाने नाचल्याचे. नाच हे एक निमित्त होते, एक माध्यम होते
किंबहुना तब्बल ३२ महिन्यांनी आज आपण माझ्या धाग्यावर प्रतिसाद देत आहात हे देखील माझ्यासाठी आनंदाचे कारण आहे. अश्या छोट्यामोठ्या गोष्टीत आनंद शोधून जगणारा मुलगा आहे मी
बाकी तुम्ही स्वतः लेख वाचा आणि ठरवा. लोकांचे ऐकू नका.
जे लोक तुमचं ह्या नाचासाठी
जे लोक तुमचं ह्या नाचासाठी कौतुक करत आहेत ते स्वतःचं मनोरंजन करून घेत आहेत. ग्रो अप.
>>>>>
@ झम्पू
मी जे करतो ते स्वतःच्या मनोरंजनासाठी करतो. नाच तर नक्कीच त्यासाठीच करतो. आणि ते बघून जर कोणाचे मनोरंजन होत असेल तर ईट्स ओके. आता काय पैसे घेऊ का त्यांच्याकडून
राहिला प्रश्न ग्रो अप चा.
तर ज्या दिवशी खरेच ते होईल तेव्हा माझ्यातला ऋन्मेष कायमचा मरून जाईल. मी आहे तसाच राहू द्या मला. हे जग लहान मुलांच्या नजरेतून खूप सुंदर आहे
Pages