ज्यांना लेख वाचायला बोअर होत असेल ते थेट विडिओ बघू शकतात.
दोन्ही भागातले दोन्ही विडिओ ईथे बघू शकता.
भाग १) स्टेज शो - https://jumpshare.com/v/VlM4Mbuh5G1NNgrMjPup
भाग २) पार्टी डान्स - https://www.youtube.com/watch?v=oWT6RUiOGrI
-----------------------
या लेखमालेतील पहिला भाग गेल्या वर्षी आपण जरूर वाचला असेल.
नसेल वाचला तर वाचून घ्या, तिथूनच हे पुढे लिहीणार आहे
माझा नाच आणि नाचाचा प्रवास ! (फोटो आणि विडिओसह) -
https://www.maayboli.com/node/72946
-----------------------
आता भाग दुसरा,
माझ्यातील लुप्त झालेला नाच पुनर्जिवित करताना मी ऑफिसच्या अॅन्युअल फंक्शनमध्ये स्टेजवर तर नाचलो होतो. पण तरी त्या आधीही आणि त्या नंतरही ऑफिसच्या कलीग्जसोबत पार्टीमध्ये कधी नाचणे झाले नाही. आधी ऑफिसच्या पार्टीत कोणी मला हात धरून खेचत नाचाचा आग्रह केला तर मी मला नाचताच येत नाही म्हणत सटकून जायचो. पण एकदा स्टेजवर नाचल्यावर आणि हा बरावाईट का होईना नाचू शकतो हे ऑफिसमध्ये सर्वांना समजल्यावर ते कारणही देता यायचे नाही. तरीही आता मूड नाही, मी आता नाचून दमलोय, वा गेले चार दिवस प्रॅक्टीसने पाय दुखू लागलेत म्हणत कलीग्जसोबत पार्टीत नाचणे टाळायचोच. कारण मी कोणाशी ट्युनिंग जमल्याशिवाय नाचूच शकत नाही हे मला ठाऊक होते. शेवटचे असे मला एखाद्या पार्टीत मित्रांसोबत नाचून तब्बल १२ वर्षे झाली होती. नाचासाठी लागणारा कम्फर्ट झोन मला माझी मुले आणि माझे घर वगळता बाहेर कुठेच मिळाला नव्हता.
सलग दोन वर्षे ऑफिसच्या फंक्शनला स्टेजवर नाच केल्यावर किमान हे तरी आपण वयाची पन्नास वर्षे होईपर्यंत दर वर्षी करायचे आणि आपल्यातील नाचाचा किडा जपायचा असे ठरवले होते. पण कोरोनामुळे गेल्यावर्षी ऑफिसचे फंक्शनही झाले नाही. येत्या वर्षात ते किती वेळा असेच रद्द होईल आणि किती वेळा आपण या संधीला मुकू याचीही आता कल्पना नव्हती.
जसे गेल्या काही वर्षात मी भला आणि माझे कुटुंब भले म्हणत मी माणूसघाणा झालो होतो तसेच आता आपले नाचणेही कुटुंबापुरतेच मर्यादीत असून बाह्य जगात नाचाशी असलेली आपली नाळ आता तुटली आहे हे मी स्विकारले होते. जिथे मला मित्रच शिल्लक राहिले नव्हते तिथे मित्रांसोबत होणारा नाचही आयुष्यात पुन्हा कधी येणार नाही हे मला समजले होते.
आणि अश्यात आली शाळेच्या मित्रांची पिकनिक....
शाळेच्या मित्रांची हि व्हॉटसपग्रूप स्थापनेपासूनची दरवर्षी एक याप्रमाणे सातवी पिकनिक होती. आणि मी आता ते माझे मित्र राहिलेच नाहीत समजून त्यांना आधीच्या सहा वेळा टांग दिली होती. अखेरीस बायकोच्या आग्रहावरून एकदा जाऊन बघूयाच म्हणत या सातव्या वर्षी तयार झालो होतो.
या पिकनिकचा वृत्तांत ईथे सविस्तर वाचू शकता -
एका माणूसघाण्याची पिकनिक - विडिओ आणि केकसह -
https://www.maayboli.com/node/79682
पिकनिक माझ्यासाठी छान शांततेत पार पडत होती. मी मित्रांची कंपनी पुरेसे अंतर राखून का होईना, त्यांच्यात न मिसळता का होईना, तरीही दुरूनच त्यांचे निरीक्षण करत एंजॉय करत होतो. कोणाशी स्वत:हून बोलायला जात नव्हतो, पण सर्वांच्या गप्पा आणि किस्से ऐकून भूतकाळाच्या आठवणी जागवत होतो. संध्याकाळपर्यंत सारे काही ठिक होते. मी नेहमीसारखे माझ्याच कोषात होतो, पण तरीही कुठे येऊन फसलो असे तोपर्यंत झाले नव्हते. पण संध्याकाळी समजले की त्या हॉटेलमध्ये रात्री डीजे सुद्धा आहे.. अरे देवा !! मी कपाळावर हात मारला. आता तो होणारा आग्रह आणि आपण द्यायचा नकार, फार ईरीटेटींग असते ते सारे. विचारांनीच पोटात गोळा आला.
सायंकाळच्या ओल्या पार्टीला मध्यांतराचा ब्रेक देऊन सर्वांची पावले थिरकायला डीजे असणार्या हॉलकडे वळली तेव्हा एका मित्राने माझ्या खांद्यावर हात टाकत विचारले, नाचतोस का?
मी हो म्हणावे की नाही, असा विचार करत असतानाच अजून एक मित्र म्हणाला, तू ऑफिसच्या प्रोग्रामला नाचलेलास ना? मी पाहिलेला विडिओ फेसबूकवर... गेम ओवर!
मी विचार केला, गपचूप थोडा वेळ बाजूला उभे राहून बघूया सर्वांचा नाच आणि मी सुद्धा त्यांच्यात आहे हे लक्षात यायच्या आधीच रूमवर सटकूया आणि दोनतीन तास तिथेच लपून बसूया.
पण नियतीच्या मनात काहीतरी स्पेशल लिहिले होते. त्याशिवाय हे शक्यच नव्हते...
आम्ही आत शिरलो आणि डान्सफ्लोअरवर उतरलो तसे पहिलेच गाणे लागले ते बचना ए हसीनो, लो मै आ गया. हे तेच गाणे ज्यावर मी गेल्या वर्षी ऑफिसला नाचलो होतो. मग काय घेतला चान्स. उतरलो रिंगणात. माझ्या दोनचार स्टेप्स बघून पोरे थक्क झाली. भाई ये तो सोलो डान्सर है म्हणत सगळे मागे सरकून एक रिंगण तयार केले आणि मी एकटाच नाचू लागलो. मुले चेकाळू लागली. आणि मला नाचतानाच जाणवू लागले की मी शेलमधून बाहेर येतोय. पाठोपाठ बघतोय रिक्षावाला झाले, पुन्हा डॉनचे गाणे लागले तसे पुन्हा माझा सोलो डान्स सुरू झाला. झिंगाटला अक्षर्शा झिंगाटलो, त्यानंतर नागाची पिल्लेही खवळली, जवळपास दोन अडीच तास नाचून झाल्यावर यारी दोस्तीच्या गाण्यांनी नाचाच्या कार्यक्रमाचा समारोप झाला. पण माझ्यासाठी ती पिकनिक तिथे खरी सुरू झाली. एका बोअरींग दुपार आणि काहीश्या उदास संध्याकाळीनंतर एक रात्र उजळून निघाली.
ज्या नाचाच्या कार्यक्रमाला मी इरीटेटींग समजून रूमवर जाऊन लपणार होतो, त्यानेच मला मित्रांच्या मुख्य प्रवाहात सामील केले होते. मी नाचून नाचून दमल्यावरही, पोटाच्या आजाराने उचल खाल्यावरही, मित्रांचे हात खेचून आग्रह होत होते आणि मी देखील ते उत्स्फुर्तपणे पुरवले होते.
मी नाचताना कोणी विडिओ काढत असेल तर मला फार ऑकवर्ड होते, मुद्दाम कॅमेर्यासमोर जात हात हलवणे तर बिलकुल जमत नाही. अगदी घरातही मुलांसोबत नाचताना कधी कोणाला माझा विडिओ काढू दिला नाही. कारण नाच कोणाला दाखवायला करा हे मला कधीच जमले नाही. नाच हा मी नेहमी माझ्या मूडनुसार व्यक्त व्हायलाच केला आहे. ते म्हणतात ना, असे नाचा की कोणी बघत नाहीये. त्यामुळे ते कॅमेर्याचे रोखलेले डोळेही मला नेहमीच नकोसे वाटले आहेत. पण तरीही काही मित्रांनी नाचाचे उलटसुलट विडिओ बनवले होते. जे व्हॉटसपवर ग्रूपवर शेअर केल्यानंतर त्यातल्याच माझ्या काही नाचांचे तुकडे जोडून आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरलेल्या या पिकनिकची आठवण म्हणून मी एक विडिओ बनवला जो लेखा खालील लिंकवर बघू शकता.
घरी जेव्हा मी माझ्या मुलीला माझ्या नाचाचा हा विडिओ दाखवला तेव्हा तिचा आनंद बघण्यासारखा होता. ती नेहमी मला चिडवायची की मला हंड्रेड फ्रेंड्स आहेत आणि तुला एकही नाही. जेव्हा तिला कळलेले की मी पिकनिकला जातोय आणि ते सुद्धा तब्बल पंचवीस तीस मित्रांसोबत तेव्हा याचेच तिला फार अप्रूप वाटले होते. आणि त्यानंतर आपला बाप आपल्याव्यतिरीक्त आणखी कोणासोबत तसाच वेड्यासारखा नाचू शकतो जसे आपल्यासोबत नाचतो हे बघून तिला आणखी आनंद झाला. आणि त्याहीपेक्षा जास्त आनंद माझ्या बायकोला झाला कारण मी कोणासोबतही ट्युनिंग जमल्याशिवाय नाचत नाही हे तिला माहीत होते. त्यामुळे फायनली आपल्या नवर्याला काही मित्र मिळाले. आता तो त्यांना वेळ देईल, आणि सतत आपल्या डोक्यावर नसेल. असा तो सुटकेचा आनंद होता
माझ्यासाठीही हा नाच सर्वात स्पेशल ईतक्यासाठीच होता कारण फायनली शेलमधून बाहेर येत तब्बल बारा वर्षांनी मी कुठल्याही मित्रांसोबत असे पार्टीमध्ये नाचत होतो. नाच जे माझ्यासाठी व्यक्त होण्याचे सर्वात महत्वाचे माध्यम आहे. नाच जो मी दिवसातून शंभर वेळा घरात येता जाता खिडक्यांच्या आरश्यासमोर, चहा बनवताना किचन ओट्यासमोर, कपडे बदलताना कपाटासमोर, आंघोळ करताना डोक्यावरून ओघळणार्या पाण्यासोबत, लॅपटॉपवर बसल्या बसल्या ऑफिसचे काम करत, घरची अक्षरशा कुठलीही कामे करताना सतत करतच असतो... अगदी हा लेख लिहीतानाही मध्येमध्ये ब्रेक घेत जो चालूच आहे.. तो नाच, मी तब्बल बारा वर्षांनी पुन्हा एकदा कोण बघतेय न बघतेय याची पर्वा न करता बाहेर मित्रांसोबत केला होता
____________________________
धन्यवाद,
ऋन्मेऽऽष
भौ नीट वाच
भौ नीट वाच
प्रत्येक प्रतिसादाला उत्तर दिल्याबद्दल नाही,तर प्रत्येकला वेगळा पोस्टमध्ये प्रतिसाद दिल्याबद्दल बोललोय
असेही तुला सोयीस्कर नसलेल्या गोष्टी टाळतोसच त्यामुळे काही नवल नाही
चालु दे
प्रत्येक प्रतिसादाला उत्तर
प्रत्येक प्रतिसादाला उत्तर दिल्याबद्दल नाही,तर प्रत्येकला वेगळा पोस्टमध्ये प्रतिसाद दिल्याबद्दल बोललोय
>>>>
हे मी दोन कारणांसाठी करतो
१) सुटसुटीतपणा - नुसते धन्यवाद मानायचे असेल तर मी एकाच पोस्टीत निपटवतो. पण सविस्तर प्रतिसाद जिथे असतो तिथे प्रत्येकासाठी स्वतंत्र पोस्ट वापरतो, वा दोन छोटे प्रतिसाद एका पोस्टमध्ये घेतो. जेणेकरून ज्याला त्याला ईतरांचे प्रतिसाद न चिवडत बसता आपल्या प्रतिसादाला कुठले उत्तर हे पटकन सापडते.
२) स्पेशल अटेंशन - जर कोणी वेळात वेळ काढून माझा धागा वाचत असेल, आणि त्यावर प्रतिसाद देत असेल तर मी सुद्धा त्याला तितकेच अटेंशन देऊन स्वतंत्र प्रतिसादात उत्तर देणे योग्य असे मला वाटते. जसे आपल्याकडे पूजेला पाहुणे आलेत तर आपण यजमान म्हणून प्रत्येकाला पर्सनली अटेंड करावे, प्रत्येकाशी स्वतंत्रपणे चार शब्द बोलावेत, आपण आलात बरे वाटले, जेवलात का विचारत प्रत्येकाची ख्यालीखुशाली विचारावी त्याने त्यांनाही छान वाटते अशी यामागे माझी विचारसरणी आहे.
अर्थात हे ज्याचे त्याचे मत आणि ज्याचे त्याचे विचार. मी दुसर्यांचे विचार चुकीचे असे म्हणत नाही, पण माझे मला बरोबर वाटतात. बदलाची गरज वाटत नाही.
स्पेशली मी प्रत्येकाला स्वतंत्र प्रतिसादात सविस्तर उत्तर दिल्याने ईतर कोणाचे काही नुकसान होत नसेल तर मला हेच योग्य वाटते.
तरी तुमचे काही नुकसान होत असेल तर तुम्ही खालील धाग्यावर तो मुद्दा ऊचलू शकता आणि ईथल्या अवांतर पोस्ट टाळू शकता
प्रतिसादांची संख्या वाढल्याने कोणाला काय फायदे तोटे होतात? - https://www.maayboli.com/node/79105
वाटलंच होतं सॉलिड भंपक
वाटलंच होतं सॉलिड भंपक स्पष्टीकरण येणार म्हणून
गुड गुड
२) स्पेशल अटेंशन - जर कोणी
२) स्पेशल अटेंशन - जर कोणी वेळात वेळ काढून माझा धागा वाचत असेल, आणि त्यावर प्रतिसाद देत असेल तर मी सुद्धा त्याला तितकेच अटेंशन देऊन स्वतंत्र प्रतिसादात उत्तर देणे योग्य असे मला वाटते. जसे आपल्याकडे पूजेला पाहुणे आलेत तर आपण यजमान म्हणून प्रत्येकाला पर्सनली अटेंड करावे, प्रत्येकाशी स्वतंत्रपणे चार शब्द बोलावेत, आपण आलात बरे वाटले, जेवलात का विचारत प्रत्येकाची ख्यालीखुशाली विचारावी त्याने त्यांनाही छान वाटते अशी यामागे माझी विचारसरणी आहे.>>>
ऋन्मेष मी प्रथमच तुमच्या धाग्यावर कंमेंट करत आहे. आतापर्यंत सायलेंट वाचक होते. काही धागे आवडतात काही नाहीत. पण अशा धाग्यांचीही जरूर आहेच.
हे तुमचे वरचे विचार मला खूप आवडले कारण मी पण हाच विचार करते. सोमी वर हा असा पर्सनल टच सुखावतो. तुम्ही जे करता ते योग्यच आहे. तसेच अतिशय शांतपणे न रागवता उत्तरे देता हा गुणही आवडतो .
आता तुमचा डान्स मी उत्सुकता म्हणून पहिला. डान्स काही ग्रेट नाहीये. पण अशा पार्टीसाठी ठीक आहे . पण त्याने तुम्हाला आनंद मिळाला व त्यामुळे शेल मधून बाहेर पडण्यास मदत झाली हे महत्वाचे. तुम्ही ऑफिस मध्ये केलेल्या डान्स मध्ये सुधारणेसाठी खूप वाव आहे. मी काही डान्सर नाही पण एक viewer म्हणून जाणवले ते सांगितले
प्रामाणिक प्रतिसादाबद्दल
प्रामाणिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद आरती
आज डान्सचे ईतके रिअॅलिटी शो येताहेत, गेला बाजार युट्यूब उघडताच ईतके डान्सचे छानछान विडिओ बघायला मिळतात, तिथे माझा कधीही फारसा सिरीअसली विचार न करता केलेला नाच लोकांनी तसल्या काही अपेक्षा ठेवून बघावा ईतका मी बालिश विचार मी नाही करत.
पहिला नाचाचा धागाही स्टेज फिअर जाण्याबद्दलचा आणि पब्लिकली काहीतरी परफॉर्म करण्याचा होता. तर हा धागा एक रिझर्व्हड म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती आपल्या कोषातून बाहेर येण्याचा होता.
दोन्हीकडे कॉमन धागा मात्र नाच होता. कारण ती आवड अंगात पुरेपूर ठासून भरलीय
वाटलंच होतं सॉलिड भंपक
@ आशूचॅम्प
वाटलंच होतं सॉलिड भंपक स्पष्टीकरण येणार म्हणून
>>>>>
जो माझा पाँईट ऑफ व्यू आहे तो सांगितला. तो आपल्याला भंपक वाटला ईट्स ओके. ते आपले वैयक्तिक मत आहे.
पण अजूनही माझ्या असे स्वतंत्र प्रतिसाद देण्याने आपला वा कोणाचाही काय तोटा होतो हे मात्र आपण सांगितले नाही.
अजूनही वाट बघतोय आपल्या उत्तराची....
न आल्यास उद्या पुन्हा रिमाईंडर टाकेन
तोटा कसला डोंबलाचा
तोटा कसला डोंबलाचा
एकेक प्रतिसाद एकेक अक्षराचा दे मला काय घंटा फरक पडतो
फक्त तुझी प्रतिसाद संख्या वाढावी म्हणून चाललेला हपापलेपणा दाखवून दिला
आशुचँप तुमच्यामुळे ह्या
आशुचँप तुमच्यामुळे ह्या धाग्याचे 7-8 प्रतिसाद वाढले असतील. तुमचा आरोप जर खरा असेल तर तुम्ही स्वतः हातभारच लावत आहात. तुमच्या भु भु च्या धाग्यात तुम्ही बऱ्याचदा हेच करता.
दाखवा पाहू, भुभु च्या धाग्यात
दाखवा पाहू, भुभु च्या धाग्यात मी प्रत्येकला वेगळा प्रतिसाद काढून उत्तर दिल्याचे
काही वेळेला एका पानावरचे प्रतिसाद वाचून तिथे उत्तर लिहिलं जातं पण एकेकाला एकेक प्रतिसाद दिल्याचे दाखवाच
मला शून्य प्रतिसाद आले तरी फरक पडत नाही
ते सगळं इकडे आहे
आणि वेळ असतो तेव्हा मी याच्या धाग्यावर लिहीत असतोच
त्यात नवीन काय आहे
तोटा कसला डोंबलाचा. एकेक
तोटा कसला डोंबलाचा. एकेक प्रतिसाद एकेक अक्षराचा दे मला काय घंटा फरक पडतो.
>>>>
एक्झॅक्टली आशूचॅम्प,
मला हेच तुमच्याकडून क्लीअर करून हवे होते. माझ्या अश्या करण्याने तुम्हाला वा कोणालाही काहीही तोटा होत नाही
आणि वेळ असतो तेव्हा मी याच्या
आणि वेळ असतो तेव्हा मी याच्या धाग्यावर लिहीत असतोच
>>>>>
आपल्यातले हे प्रेम सदैव काय राहो, बोलो आमीन
रुन्म्या तुला राग येत नाही का
रुन्म्या तुला राग येत नाही का रे ? कुठे तप बीप केले आहेस का ? स्थितप्रज्ञ आहेस. ( हे मी कौतुकाने म्हणतोय)
त्याला राग आला कि तो त्याच्या
त्याला राग आला कि तो त्याच्या दुसऱ्या आयडी ला पाठवतो
सगळी भडास काढून झाली की तो आयडी परत झोपायला जातो
आणि हा बघा मी कसा शांतपणे संयमाने उत्तर देतो म्हणत मिरवायला मोकळा
( हे मी कौतुकाने म्हणतोय)
( हे मी कौतुकाने म्हणतोय)
>>
धन्यवाद, पण हे कंसात लिहिले नसते तरी मी कौतुकानेच घेतले असते. कारण कोणाच्या टिकेने व्यथित व्हायचे नाही हि ईतकी सोपी गोष्ट नाही
त्याला राग आला कि तो त्याच्या
त्याला राग आला कि तो त्याच्या दुसऱ्या आयडी ला पाठवतो
सगळी भडास काढून झाली की तो आयडी परत झोपायला जातो
आणि हा बघा मी कसा शांतपणे संयमाने उत्तर देतो म्हणत मिरवायला मोकळा Happy
>>>>
हे सिद्ध करा मी मायबोली कायमची सोडून जाईन
माझे आजवरचे धागेही अॅडमिनला उडवायला सांगेन
आयुष्यात पुन्हा कधी नाच करणार नाही
फोनमधून व्हॉटसपचे अॅप डिलीट करेन
त्याऊपर तुम्हाला माझ्या संपत्तीतील अर्धा वाटा देईल. उरलेला अर्धा माझ्या बायकापोरांना ठेवेन. आणि संसारातूनही सन्यास घेऊन अफगाणिस्तानात निघून जाईन
आणि सिद्ध न करू शकल्यास वा जोपर्यंत सिद्ध करत नाही तोपर्यंत तुम्ही वचन द्या की माझ्या दर धाग्यावर किमान पाच प्रतिसाद द्यायचे
तूच ना तो हे असं झालं की
तूच ना तो हे असं झालं की मायबोली सोडून जातो म्हणणारा
>>>>
मग बरोबर आहे, हे असले दावे खुशाल करू शकतोस
नुसता सँपल आहेस. हे पण
नुसता सँपल आहेस.
हे पण कौतुकानेच घे 
धन्यवाद सस्मित
धन्यवाद सस्मित
मला माझी आई आणि तिच्या माहेरचे लोकं लहानपणापासून सँपल बोलत आलेत. आज पुन्हा हा शब्द कोणाच्या तरी तोंडून ऐकून मन भरून आले
@ आशूचँप...... ऊप्स, थांबा !....... नवीन प्रतिसादात उत्तर देतो
आशूचँप, थोडक्यात तुम्ही जे
आशूचँप, थोडक्यात तुम्ही जे विधान करत आहात त्याबाबत तुमच्याकडे शून्य पुरावा आहे.
पण निदान conspiracy theory ऊर्फ षडयंत्र सिद्धांत तरी मांडा.
असे तुम्हाला का वाटले? काय अनुभव आले? कोण माझे आयडी वाटतात वगैरे..
वाचकांना काहीतरी द्या
झालंय की लिहून अनेकदा
झालंय की लिहून अनेकदा
तुझेच मागचे धागे काढून वाच त्यात सापडेल
आयते आणून मी देणार नाही, कष्ट घे, नक्की सापडेल तुला
मग आपण बोलू
@आशुचँप तुमच्यामुळे ह्या
@आशुचँप तुमच्यामुळे ह्या धाग्याचे 7-8 प्रतिसाद वाढले असतील. तुमचा आरोप जर खरा असेल तर तुम्ही स्वतः हातभारच लावत आहात. तुमच्या भु भु च्या धाग्यात तुम्ही बऱ्याचदा हेच करता.
अगदी, हा महिलामंडळ तरी ६०-७० वर थांबतो, पण चँप साहेब १०००-१२०० पर्यत खेचतात. वर श्वानांच्या डायर्या लोल, मास्टरपीस
आयते आणून मी देणार नाही, कष्ट
आयते आणून मी देणार नाही, कष्ट घे, नक्की सापडेल तुला
>>>>
शोधले
नाही सापडले
उगाच अवांतर पोस्ट वाढत आहेत धाग्यावर. मला ते नको आहे. पण जर मी प्रतिसाद दिला नाही तर तुम्ही केलेले आरोप खरे आहेत असे उगाच तुम्हाला वाटेल म्हणून प्रतिसाद द्यावा लागतोय.
आणि मी प्रतिसाद दिल्यावर हा उगाच प्रतिसाद वाढवतोय असेही तुम्ही बोलणार आहात.
थोडक्यात तुम्ही मला ट्रॅप केलेय आशूचॅम्प
म्हणजे इन्फिनिटी लूप
म्हणजे इन्फिनिटी लूप
येस्स आणि जोपर्यंत धाग्यावर
येस्स आणि जोपर्यंत धाग्यावर शंभर होत नाहीत तो पर्यंत मला या लूपमधून बाहेरही पडायचे नाहीये.
शतकी धाग्यासारखे दुसरे समाधान नाही जगात !
जसे सचिनने शतकांचे शतक केले तसेच मलाही शतकी धाग्यांचे शतक करायचे आहे. त्या आधी निवृत्ती नाही.
किंबहुना ईथे तर यू ट्यूब विडिओवर हजार व्यू चे सुद्धा टारगेट आहे
अरे देवा !!!!!!!!!!!
अरे देवा !!!!!!!!!!!
मला हे वाचून देवर्शी पटेल
मला हे वाचून देवर्शी पटेल आठवला.
https://www.youtube.com/watch?v=PfrQvNNJatE
हा व्हीडीओ २,१५ पासून बघा. सेम टू सेम व्यक्तीमत्व. लगे रहो.
Submitted by अकिलिज on 20
Submitted by अकिलिज on 20 August, 2021 - 19:41
>>>>
तो रोडीजचा विडिओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद
कॉमेंटसुद्धा आवडल्या खालच्या
ग्रेट गाय. ईन्स्पिरेशनल कॅरेक्टर
@ कॉम्प्युटर
@ कॉम्प्युटर
रक्षाबंधन आणि शिक्षकदिनाची माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
मुलांना निबंध लिहायला उपयोगी पडेल.
पण प्रत्येक धाग्यावर का शेअर करत आहात?
ते ऍड करताहेत . जास्त लोकांनी
ते ऍड करताहेत . जास्त लोकांनी वेबसाईट व्हिजिट करावी. जेणेकरून त्यांना पैसे मिळतील. बेकारी वाढले देशात.
ओणमची माहिती मिळेल काय?
ओणमची माहिती मिळेल काय?
(सॉरी फॉर अवांतर)
Pages