Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22
आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.
तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!
त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहिल्या मॅचमधे अपेक्षेप्रमाणे
पहिल्या मॅचमधे अपेक्षेप्रमाणे मुंबई सहज जिंकले. बुमराह ची बॉलिंग हा दोन टीम्स मधला मोठा differentiator ठरला. राजस्थानची बॉलिंग अगदीच दिशाहीन होती. फिल्डींग आणि बॉलिंग ह्यांचा एकमेकांशी अर्थाअर्थी संबंध नसल्यासारखी बॉलिंग चालली होती. राजस्थान कडे मॉरिस सोडून बॉलर्स ची (चांगल्या टीम्स विरूद्ध खेळताना) अगदीच वानवा आहे. तिवातिया ला खेळवलंच पाहिजे हा अट्टहास का कुणास ठाऊक? बॅटींगमधे कधीतरी चमकेल आणि बॉलिंगमधे चमकलाच तर नास्तिकाला अस्तिक करून जाईल असा खेळाडू आहे तो (हरियाणा चा चौथ्या क्रमांकाचा स्पिनर आहे तो -मिश्रा, चहल, जयंत यादव नंतर). त्यापेक्षा एक बर्यापैकी मिडल ऑर्डर बॅट्समन खेळवला (लोमरोर / अनुज रावत - फारसे ऑप्शन्स नाहीयेत) तर दुबे, पराग (लोमरोर) कडून ४ ओव्हर्स काढून घेता येतील पण बॅटींग ला बर्यापैकी डेप्थ मिळेल.
डि-कॉक फॉर्ममधे येणं हे मुंबईसाठी दिलासा देणारं आहे. पण कृणाल चे रन्स होणं ही जास्त आनंदाची बाब असावी.
आता दिल्ली वि. कोलकता.
>>पण बॅटींग ला बर्यापैकी
>>पण बॅटींग ला बर्यापैकी डेप्थ मिळेल.
आज इतके बॅटर्स नुसते बसूनच होते की डगआउटमध्ये..... मिलरला पुरेसा स्ट्राईक दिला असता तरी अजुन थोड्या रन्स वाढल्या असत्या!
बुमराहच्या ओव्हरला ५ किंवा सहा रन्स पकडूनच टारगेट सेट किंवा चेस करायला घ्यावे समोरच्या टीमने.... त्यापेक्षा जास्त मिळाल्या तर बोनस!
शाॅ पहिल्याच षटकात 6 चौकार !
शाॅ पहिल्याच षटकात 6 चौकार !
आज शॉ परत मस्त खेळला. तो फ्लो
आज शॉ परत मस्त खेळला. तो फ्लो मधे असताना बघायला मजा येते. अपेक्षेप्रमाणे दिल्ली एकतर्फी जिंकली. यंदाची आयपीएल बरीचसी प्रेडिक्टेबल झालीय.
राजस्थान ७.५ कोटी आणी दिल्ली १.५ कोटी ची मदत कोव्हिड मदतकार्याला केल्याबद्दल दोन्ही संघचालकांचं खूप कौतुक!
आज पृथ्वीचे एफर्ट्लेस शॉट्स
आज पृथ्वीचे एफर्ट्लेस शॉट्स बघुन तेंडल्याची आठवण येत होती. हा पठ्ठ्यापण हेवीबॅटने खेळत असावा...
यंदा डबल हेडर्स विकडेज ला का
यंदा डबल हेडर्स विकडेज ला का आहेत?... असं पण रोजच सुट्टी आहे की मग शनिवार काय नी गुरूवार काय...
शाॅचं असं सातत्य ठेवून खेळणं
शाॅचं असं सातत्य ठेवून खेळणं खूपच आवश्यक व आश्वासक आहे, त्याच्यासाठी व राष्ट्रीय क्रिकेटसाठी !
( काल त्याला शतक करायची संधी पंत सहज देवूं शकला असता, कसलाही धोका न पत्करतां, असंही वाटून गेलं ) .
काल त्याला शतक करायची संधी
काल त्याला शतक करायची संधी पंत सहज देवूं शकला असता, कसलाही धोका न पत्करतां>>> +१११११११ चुम्माने सिक्स फोर मारला ते बघून मलाही आश्चर्य वाटलं. नन्तर फस्ट्रेशनमध्ये शॉ आऊट झाला. चुम्मा मिकासारखा नको तिथे चुम्मे घेत सुटलाय.
पंत मॅच लवकर क्लोज करून रनरेट
पंत मॅच लवकर क्लोज करून रनरेट वाढवायला आलेला, तो वाढवला..
या वैयक्तिक शतकांची किंमत भारतीय क्रिकेटने फार मोजली आहे. त्यांचे कौतुक पुरे आता ..
यंदा डबल हेडर्स विकडेज ला का
यंदा डबल हेडर्स विकडेज ला का आहेत?....>> चांगले आहे हे शनिवार रविवार दोन दिवसात आठ संघ चार सामने खेळायचे मग शुक्रवारी आणि सोमवारी त्यातलेच चार संघ पुन्हा खेळायचे.. सगळेच शेड्यूल टाईट व्हायचे या बॅक टू बॅक डबल हेडरने. प्लेअरना जरा विश्रांतीही मिळेल. तसेच आता तरी दोन दोन ठिकाणीच सामने होत आहेत. आधी अश्या टाईट शेड्यूलमध्ये प्रवासही करावा लागायचा. जर हे डबल हेडर लागोपाठच्या दिवशी न ठेवणे या विचारांनी केले असेला तर उत्तम निर्णय आहे.
*वैयक्तिक शतकांची किंमत
*वैयक्तिक शतकांची किंमत भारतीय क्रिकेटने फार मोजली आहे. त्यांचे कौतुक पुरे आता ..* - हा उपरोध इथे अनावश्यक आहे असं नाहीं वाटत ?. शाॅ पहिल्या षटकापासून आक्रमक खेळत बहरात आला होता, चांगल्यापैकी स्थिरावला होता. मग त्याला सटराईक देवून रनरेट वाढवणं अधिक सोपं होतं कीं नवीनच आलेल्या पंतने आल्या आल्या फटकोबाजी करणं ? आणि अशाने जर शाॅचं शतकही होवून त्याचा आत्मविश्वास दुणावणार असेल , तर त्यांत वैयक्तिक शतकांची किंमत मोजायचा मुद्दाच कुठे येतो ? भरपूर षटकं व विकेटस हातात होत्या व 20-25 धांवांचीच गरज होती म्हणून मला तसं वाटलं, इतकंच .मीं कांहीं पंतला दोष तर देत नव्हतो .
कसला भारी खेळलाय राहुल!
कसला भारी खेळलाय राहुल!
अजुन एकदा महागडा ठरला हर्षल पटेल!
हर्षल पटेल प्रेडीक्टेबल झाला
हर्षल पटेल प्रेडीक्टेबल झाला आता. त्यामूळे बॅटस्मन हँडल करू लागलेत.
हरप्रीत!!!! कोहली आणि
हरप्रीत!!!! कोहली आणि मॅक्सवेल बॅक टू बॅक ब्युटीज वर उडवले! मॅक्सवेलचा तर कसले रिपर होता!!! वॉव!
"हर्षल पटेल प्रेडीक्टेबल झाला
"हर्षल पटेल प्रेडीक्टेबल झाला आता." - खरंय. पण मला उत्सुकता आहे कि तो हे काऊंटर करू शकतो का. रणजीमधला स्मार्ट बॉलर आहे, म्हणून अपेक्षा आहेत. डोमेस्टीक क्रिकेट मधे घासून-पुसून आलेले प्लेयर्स ना आयपीएलच्या स्टेजवर यश मिळालं कि छान वाटतं.
आज राहूल जबरदस्त खेळला. पंजाब मधेच एखादा जबरदस्त परफॉर्मन्स देऊन जातं ज्यामुळे 'अजून जीव आहे' (सं. म्हैस) असं वाटतं (राजस्थान ची कन्सिस्टंसी नाही कुणाकडे - कन्सिस्टंटली वाईट खेळतात ). आरसीबी ची अवस्था डळमळीत आहे. एबीडी वर अवलंबून आहे मॅच चं भवितव्य.
हरप्रीत आयपीएलचे कॉंट्रॅक्ट
हरप्रीत आयपीएलचे कॉंट्रॅक्ट मिळावे म्हणून चार वर्षे प्रयत्न करत होता.
गेल्या वर्षी त्याला पंजाबने घेतले.... नाहीतर त्याचा स्टुडंट विसा वर कॅनडाला जायचा प्लॅन होता म्हणे!
>>हर्षल पटेल प्रेडीक्टेबल
>>हर्षल पटेल प्रेडीक्टेबल झाला आता
त्याला काही मॅचेस डेथ ओव्हर्समध्ये न वापरता सुरुवातीला नाहीतर अध्येमध्ये वापरुन बघावे!
कसला भारी खेळलाय राहुल! +1
कसला भारी खेळलाय राहुल! +1
हा उपरोध इथे अनावश्यक आहे असं
हा उपरोध इथे अनावश्यक आहे असं नाहीं वाटत ? >>>> उपरोध नव्हताच. स्ट्रेट फॉर्वर्ड स्टेटमेंट होते. वैयक्तिक शतक डोक्यात सर्वात शेवटी यायला हवे जेव्हा ईतर काही उद्देश नसतेच. ईथे रनरेट वाढवायचा उद्देश होता तर दोन्हीकडून मारावे हेच योग्य होते. कोणाचे शतक होते की नाही हे आले कुठे ईथे.
आणि अशाने जर शाॅचं शतकही होवून त्याचा आत्मविश्वास दुणावणार असेल , तर >>>>>>>>> तर, हाच तर लोचा आहे, आत्मविश्वास दुणावायला शतकाची काय गरज आहे. कोण भरते हे खेळाडूंच्या डोक्यात. सामना फिनिश करून या, नाबाद राहून या, त्याने आत्मविश्वास दुणावायला पाहिजे न की शतकाने..
वर कोणीतरी म्हटले की फस्ट्रेशनमध्ये शॉ आऊट झाला.. कसले फ्रस्ट्रेशन ?? पंतने मारल्याने स्वतःचे शतक न झाल्याचे फ्रस्ट्रेशन??
त्या दिवशी पंतचे १९ व्या ओवरच्या चौथ्या चेंडूला अर्धशतक झाले. तो बॅट दाखवू शकला नाही. शतक झाले असते तेव्हा तरीही बॅट दाखवता आली नसती. कारण दोन चेंडू दहा हवे होते. दिल्ली जवळपास पराभवाच्या ऊंबरठ्यावर होती..
याऊलट पंतची कारकिर्द पलटणारी गाब्बा खेळी शतक नव्हती, पण भारतीय क्रिकेटच्या ईतिहासातील वन ऑफ द ग्रेटेस्ट होती .. तिथे सुंदरने थोडे फटके कमी मारले असते तर पंतचे शतकही झाले असते हा विचारही मनात शिवला नाही. तर काल तरी तो का शिवायला हवा? कसले फ्रस्ट्रेशन.. छानपैकी ९० नाबाद वर बॅट ऊंचावत गेला असता आम्ही चाहत्यांनी लक्षात ठेवली असती ती खेळी.. किंबहुना बाद होऊनही ते सहा चेंडू सहा चौकार वाली खेळी कायम लक्षात राहणारच. जसे पंतची नाबाद ८९ वाली खेळी आकड्यासह लक्षात राहिली आहे.
चार पाने आधी जी सचिनच्या शंभराव्या शतकाची चर्चा चालू होती. तेव्हाही मला आनंद झाला नव्हता. कारण त्या संथ खेळीमुळे आपल्याला पराभव बघावा लागला होता.
याऊलट सचिनची शाहरजाहची पहिली खेळी आठवा. तिथे शतक होते ते जाऊ द्या. पण जेव्हा आपण ठराविक स्कोअर करत फायनलसाठी क्लालिफाय झालो तेव्हा सचिनने बॅट ऊंचावलेली ती अजूनही आठवतेय. आम्हीही त्या क्षणाला जागेवरून ऊठून टाळ्या वाजवलेल्या.
अमुकतमुक शतक डिझर्व्ह करत होता म्हणत हळहळ व्यक्त करून त्या १०० च्या आकड्याला महत्व द्यायची काही एक गरज नाहीये असे मला वाटते. ऊलट पंत फारसे चेंडू न खाता मारायचेच आहे हे ठरवून पुढे आला हे बघून मला आनंदच झाला. जर हि दोन संघातील मालिका असती जिथे रनरेटला शून्य किंमत तर शॉ ला शतक करू द्यावे याचा मी सुद्धा सपोर्ट केला असता. पण काल जर शॉ खरेच फ्रस्ट्रेशनमध्ये बाद झाला असेल वा शतक न झाल्याने दुखी झाला असेल तर मला हि राँग साईन वाटते.
असो,
हा सीन जरूर बघा
https://www.youtube.com/watch?v=rrH90zd9uco
पुन्हा पुन्हा बघण्यासारखा आहे. तरीही वेळ कमी असल्यास २.५० ते ३.०३ पर्यंत जरूर बघा
ईथे रनरेट वाढवायचा उद्देश
ईथे रनरेट वाढवायचा उद्देश होता तर दोन्हीकडून मारावे हेच योग्य होते... धवन कसा खेळत होता मग ? का धवन ला जोरात खेळता येत नाही ? त्याला पण सांगायच ना रनरेट पाहीजे. दरवर्षा चं सोडा आताच पहा विराट दोन सामने काय हरला त्याचा रनरेट कसा कमी झाला.
रनरेट सोबतच संघातील खेळाडुना प्रोत्साहीत करनं पण कप्तान ला जमंल पाहीजे. पड्डीकल विराट ला बोलला की सामना लवकर संपवु पण विराट ने त्याला सांगितले की शतकाजवळ आहेस पुर्ण कर सामना तर जिंकुच. पड्डीकल ने शतक केलेला सामन्या नंतर विराट च वक्तव्य.
IPL आणि देशा कडुन खेळणे यात फरक आहे. पंत ने तु Try कर शतका साठी त्यात बाद झालाच तर मी आहेच असं का नाही सांगीतलं....
कारण मागच्या सामन्यात शेवट पर्यंत नाबाद राहुनही पंत ला सामना जिकंवता नाही आला...
विराट नाही आवडत मला पण असं काही केलं की वाटतंच Great ... Good Captain and Human...
पंत माञ जाम आवडतो आणि त्याला असं सिध्द करायची गरज पण नाही की सामना तो जिंकुन देऊ शकतो. पृथ्वी ला दिला असता चान्स की Go for it. सामना तर जिकंला असताच पण त्याचा संघात आदर ही वाढला असताच. नक्कीच शिकेल तो...
*अमुकतमुक शतक डिझर्व्ह करत
*अमुकतमुक शतक डिझर्व्ह करत होता म्हणत हळहळ व्यक्त करून त्या १०० च्या आकड्याला महत्व द्यायची काही एक गरज नाहीये असे मला वाटते*. -
एका अप्रतिम खेळीवर शतकाचा मुकूट चढणं, ही क्रिकेटमधील सदाकालीन एक साधी, सरळ, निखळ आनंदाची बाब आहे, त्या फलंदाजासाठी, संघसहकारी व क्रिकेटरसिकांसाठी. म्हणून, जर निकालावर परिणाम होणार नसेल, तर त्याला शतक करणयाची संधी मिळावी ही एक स्वाभाविक प्रतिक्रिया. . मीं क्रिकेट, विशेषतः आयपीएल, फक्त आनंदासाठीच बघतो म्हणून मला तें अधिकच महत्वाचं वाटत असेलही. बाकी त्याचे इतके गंभीर, दूरगामी परिणाम माझ्या बुदधीच्या आवाक्याबाहेरचे व माझी क्रिकेटची समज व रसग्रहण या पलिकडचे आहेत, हें प्रांजळपणे कबूल करतो. पण माझ्यापुरतं तें पूरेसं आहे, हेही खरं.
फलंदाजांनी नेहमी शतक कसं होईल
फलंदाजांनी नेहमी शतक कसं होईल हे बघावं आणि गोलंदाजांनी पाच बळी कसे मिळतील हे बघावं. शेवटी जग त्यावरूनच परीक्षण करतं. सचिन शेवटी शतक करण्यासाठी खेळत होता हे सगळे बोलतात पण 90 ते 99 यामध्ये तो 27 वेळा आऊट झालाय याकडे सगळे दुर्लक्ष करतात.
आज मुंबई विरुध्द चेन्नई!
आज मुंबई विरुध्द चेन्नई!
सगळ्या चायसे गरम किटल्यांना आज ऊत येणारेय
याबाबतीत विराट ग्रेट आहे...
याबाबतीत विराट ग्रेट आहे... आपल्या टीम च्या खेळाडूंसाठी समोरच्याला फटकवायला देखील जाईल असे वाटते... आपल्या खेळाडूचे आणि टीम चे भले बघून निर्णय घेणारा... लीडर असाच पाहिजे मॅच्युरिटी असणारा....
पंत अजून लहान आहे... येईल ही लेव्हल हळू हळू...
सचिन शेवटी शतक करण्यासाठी
सचिन शेवटी शतक करण्यासाठी खेळत होता हे सगळे बोलतात पण 90 ते 99 यामध्ये तो 27 वेळा आऊट झालाय याकडे सगळे दुर्लक्ष करतात.
>>नर्व्हस 90s .. ते शतक करण्यासाठी खेळतांना व्हायचे त्याचे... सेफ खेळायला जायचा.. नर्व्हस होऊन विकेट फेकली जायची... चेंज इन फॉर्म.. सुंदर फॉर्म मध्ये एकसे बढकर एक शॉट्स मारायचा आधी आणि 90 आसपास आले की स्लो व्हायचा...
अवांतर, भाऊ, ऋन्मेष, विक्रम,
अवांतर, भाऊ, ऋन्मेष, विक्रम, स्वरुप, आणि इतर जे भारतात आहेत, होप तुम्ही आणि तुमचा परीवार नीट आहे सध्याच्या वातावरणात. आय पी एल बघत घरी राहा.
आज धोनी ची कप्तानी काय
आज धोनी ची कप्तानी काय फिरायला गेली होती.... एकट्यानेच मॅच काढली....
व्हाट अ मॅच ! मुंबैचा 219 चा
व्हाट अ मॅच ! मुंबैचा 219 चा यशस्वी पाठलाग !! शेवटच्या चेंडूवर विजय ! पोलारड आज अफलातून खेळला, प्रचंड दबावाखाली ! मुंबई अभिनंदन !
असामीजी, धन्यवाद व शुभेच्छा.
पोलार्ड वि. सीएसके सामन्यात
पोलार्ड वि. सीएसके सामन्यात पोलार्ड चा विजय! स्पेअर अ थॉट फॉर रायडू, मोईन अॅण्ड फाफ!
चँडलर च्या भाषेत सांगायचं तर, and the ‘चिरडर’ becomes ‘चिरडी’
*स्पेअर अ थॉट फॉर रायडू, मोईन
*स्पेअर अ थॉट फॉर रायडू, मोईन अॅण्ड फाफ!* - खरंय. करनसाठी पण. मोईनने खरं तर आजच्या खेळाचा 'टेम्पो सेट ' केला, असंच म्हणायला हवं.
( मुंबैचा 187 स्कोअर असतांना सुटलेला पोलारडचा झेल हा निर्णायक ठरला ! )
Pages