अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक २०२०

Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47

घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

त्याने वाट लावली तर शिव्या देणारच. मग काय ओव्या गायच्या काय त्याच्या?>>> Lol
ट्रंपच्या वेळी ओव्या गायलात की... Wink
एक मतदार म्हणून राज्यकर्त्यांच्या धोरणावर लक्ष ठेवणे हे कर्तव्य आहे. >>> काही उपयोग होत नाही. चार वर्षे तरी काहीही होत नाही. अनुभवानं सांगते आहे Proud

>>
ट्रंपच्या वेळी ओव्या गायलात की... Wink
<<
एखाद्या पदावरील व्यक्तीला निव्वळ शिव्याच द्यायच्या असे काही मी सांगितल्याचे आठवत नाही. त्याचे कर्म पाहून तो निर्णय घ्यायचा असे माझे धोरण आहे. म्हातारबाबा जो जे जे करणार नाही म्हणाला तो ते करत आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस दिलेली आश्वासने पाळत नाही असे दिसते आहे. मग काय त्याची आरती ओवाळायची का?

वोक आणि SJW चा अतिरेक तर वीट आणू लागला आहे. कुठल्या गोष्टीमधे वर्णद्वेष आणि वर्णभेद दिसेल ह्याचा नेम नाही. २०२२ पर्यंत जनताही विटलेली असेल आणि मध्यावधी निवडणूकीत डेमोक्रॅट सपाटून मार खातील अशी आशा करू!

वोक आणि SJW चा अतिरेक तर वीट आणू लागला आहे. +१

मुले आणी मुली यांच्या शारीरिक क्षमतेत मूलभूत फरक असतो. ज्या मुलांना आपण मुलगी आहोत असे वाटते त्यांना मुलगी बनू द्यावे इतपत ठीक, पण त्यांना मैदानी खेळांत मुलींच्या गटात भाग घेऊ देणे फारच झाले. मिस यूएसए मध्ये ही अशा ट्रान्स लोकांना भाग घेऊ द्या अशी मागणी कोर्टाने फेटाळली.

<<निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस दिलेली आश्वासने पाळत नाही असे दिसते आहे. >>
त्या उलट ट्रंप पहा - आणला की नाही एक उत्कृष्ट health care prograam, केले ना सर्वांना so rich so fast your heads will spin?
बांधली ना भिंत? तरी बरे पहिली दोन अख्खी वर्षे senate नि house मधे पक्षाचे बहुमत होते.
म्हणून त्यालाहि शिव्या देणारे लोक आहेत.

आपले काम एकच - नुसत्या शिव्या, मदत शून्य. परिणाम शून्य. म्हणताना म्हणायचे राज्यकर्त्यांच्या धोरणावर लक्ष ठेवणे!

नाटां*, डोंबल! आता राजकारणी लोक काय असल्या शिव्या ऐकून घाबरणार आहेत का?

काही म्हणा, माझ्यासारख्या निवृत्त लोकांचा वेळ जातो!

* - (महित आहे ना काय आहे ते)

George Takei
@GeorgeTakei
·
14h
Make no mistake. Texas and Mississippi opening back up to 100% will disproportionately impact and kill minorities, who comprise much of the essential work force bearing the brunt of this pandemic.

This is criminal, a racist death sentence for so many who could have been spared.

आइकलत का? इकॉनॉमी री-ओपन करण्यामागे मायनॉरिटीजना मारून टाकण्याचं कुटिल कारस्थान आहे!
सुलुसाहेब म्हणजे बारा गॅलेक्स्यांचं पाणी पिलेला माणूस Biggrin त्याच्या लक्षात सगळा डाव आला बघा!

. ग्रेग ॲबट रॉक्स! >> एकदम बरोबर आहे. पॉवर कट मधे झालेला सावळा गोंधळ नि त्यावरचा आरडाओरड ह्यावरून लक्ष इतरत्र नेण्याचा परफेक्ट प्लॅन. ही रॉक्स ईन ऑल सच मूव्ह्स. हे पण म्हणालाय वर, की मॅडेट ने काय होतय, पर्स्नल रीस्पॉन्सिबिलिटी स्टिल मॅटर्स. (स्टेट रीस्पॉन्सिबिलिटी डज्ञॉट हे अध्यार्‍हुत आहे).

>>>>एकदम बरोबर आहे. पॉवर कट मधे झालेला सावळा गोंधळ नि त्यावरचा आरडाओरड ह्यावरून लक्ष इतरत्र नेण्याचा परफेक्ट प्लॅन. >>>> ओह करेक्ट!!! तसच असावं.

सध्या Dr Seuss cancel करण्यावरून गदारोळ माजला आहे. त्याची ६ पुस्तके पुन्हा प्रकाशित न करण्याचा निर्णय publishing company ने घेतला आहे.
बायडेनच्या inauguration मधे कविता सादर केलेल्या अमांडा गोर्मन च्या कवितांचा अनुवाद डचमधे करण्यात येणार होता. पण भाषांतरकार black नाही म्हणून गदारोळ झाला आणि आता नवीन भाषांतरकार शोधण्यात येणार आहे.

कोमोच्या खुलाशाचा अर्थः सेक्शुअल हॅरॅसमेण्ट म्हणजे नक्की काय ते त्याला माहीत नाही. पण आता समजले. हा गव्हर्नर आहे - ते ही न्यू यॉर्कचा. एखादे फ्लायओव्हर रेड स्टेट नव्हे. न्यू यॉर्क स्टेट च्या ऑफिसेस मधे अ‍ॅण्टी-हॅरॅसमेण्ट ट्रेनिंग वगैरे नसते का? याने आधी फॉक्स व इतर ठिकाणी काय झाले पाहिले नाही का? आणि आपल्या बरोबर काम करणार्‍या व्यक्तीच्या पाठीला हात लावून तुला किस करू का विचारणे हे नॉर्मल नाही हे याला इतके दिवस कोणी सांगितले नाही? सत्तेवर असलेल्या किंवा एकूणच पॉवर पोझिशन वर असलेल्या आणि असले उद्योग बाहेर येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे असल्या केसेस झाल्यावर "आम्हाला माहीतच नव्हते बुवा" असले खुलासे येतात.

तिकडे टेक्सास १००% ओपन म्हणे. सगळे ओपन करा. पण मास्क काढायची काय घाई आहे?

राज, चिनॉय शेठ! Happy

फारेंड, Proud पण तु एकदम बरोब्बर बोललास! १९२१ मधे एक वेळ असा डिफेन्स खपुन गेला असता पण २०२१ मधे “मी टु” मुव्हमेंटच्या काळात न्यु यॉर्क सारख्या स्टेटच्या गव्हर्नरने “ मला हे सेक्श्युअल हरॅसमेंट असु शकते हे माहीतच नव्हते“ असा डिफेंस करणे अतिशय हास्यास्पद आहे.

अजुन एक हास्यास्पद ( पण ट्रॅजिक) गोष्ट म्हणजे टेक्सस मधे झालेला पॉवर आउटेजचा फिआस्को व त्या फिआस्कोमधे टेक्सस सेनेटर टेड क्रुझने केलेला निर्लज्जपणा! सगळे राज्य पॉवर फेल्युअरने बेजार झाले आहे आणी हा माणुस आपल्या फॅमीलीसकट मेक्सिकोत मजा मारायला जातो! हीच लोक गेल्या वर्षीच्या फायर सिझनमधे कॅलिफोर्निया पॉवर आउटेज व मिसमॅनेजमेंटला हसत होती. राज, अ‍ॅबटला सुद्धा चिनॉयशेठचा डायलॉग चपखल बसु शकतो Proud

टेक्सस मधे आणि मिसिसिपीमधे सगळी बंधने काढून टाकली आहेत. हे काही प्रमाणात "a canary in the mine" म्हणता येईल. पण कदाचित डेमोक्रॅट आपली झाकली मूठ सव्वा लाखाची छाप धोरणे खोटी पडतील, आपले बिंग उघडे पडेल म्हणून चिंतित असावेत.
भ्रमिष्ट बायडनने समस्त टेक्ससच्या नागरिकांना निअँडर्ताल्स वगैरे शिव्या घालून आपण कसे युनायटर आहोत हे पुन्हा दाखवले!
फाउची हा जगातील सर्वश्रेष्ठ आरोग्यतज्ञ आहे असे डेमोक्रॅट भासवत असतात. आम्ही विज्ञानाचे ऐकतो हे त्यांचे आवडते पालुपद. प्रत्यक्षात ह्या फाउची साहेबांच्या कोलांट्या उड्या ह्या सर्कशीतील कसरतवीरला लाजवतील. पहिल्यांदा मास्कचा काही उपयोग नाही म्हणणे, मग मास्क हवा असा आग्रह, मग दोन मास्क, आता तीन मास्क आणि लस आणि तरी रिस्क आहेच. एकंदरीत फाऊचीसाहेब भ्रमिष्टपणात बायडनच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत.
आणि टेक्ससमधील सक्तीचा मास्क बंद केल्याबद्द्ल रान उठवणारे बायडन आणि त्यांचे डेमोक्रॅटिक पाठिराखे जेव्हा लाखो बेकायदा घुसखोरांना पायघड्या घालून बोलवतात तेव्हा त्यांची कुठलीही आरोग्य तपासणी होणार नाही याबद्दल कमालीचे जागरूक असतात. हा काय प्रकार आहे? अमेरिकेतचे नागरिक रोग पसरवतात आणि हे घुसखोर काय आरोग्याच्या लाटा पसरवतात का?
बायडनने बेकायदा घुसखोरांना पायघड्या घालताना कुठलीही लाज, संकोच बाळगलेली नाही. ह्या नररत्नांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, आरोग्य पार्श्वभूमी, शिक्षण, कौशल्य, काहीही न बघता त्यांना थेट नागरिकत्व देण्याची तयारी! डेमोक्रॅट व्होटबँक निर्माण करण्याची इतकी निलाजरी पद्धत पाहिली नव्हती. २०२२ लवकर येवो आणि असल्या नीच प्रकाराला आळा बसो.

२०२१ मधे “मी टु” मुव्हमेंटच्या काळात न्यु यॉर्क सारख्या स्टेटच्या गव्हर्नरने “ मला हे सेक्श्युअल हरॅसमेंट असु शकते हे माहीतच नव्हते“ असा डिफेंस करणे अतिशय हास्यास्पद आहे. > +१ मुकुंद.

हे काही प्रमाणात "a canary in the mine" म्हणता येईल. >> आयजीच्या जीवावर बायजी उधार !

टेक्ससच्या नागरिकांना निअँडर्ताल्स वगैरे शिव्या घालून >>> नागरिकांना नव्हे, तेथील लीडर्सना.

म्हातारबाबाने असे म्हटले की It's Neanderthal thinking that in the meantime everything is fine, take off your masks. म्हणजे जे कोणी "आता मास्क काढला तरी चालेल" असा विचार करत आहेत ते निअ‍ॅंडर्तल पद्धतीने विचार करत आहेत.
म्हणजे समस्त लोकांना. नेत्यांना नाही.
भ्रमिष्ट माणसाला ह्यातील चांगले वाईट समजत असेलच असे नाही. कदाचित वामकुक्षीची वेळ जवळ आलेली असताना पत्रकार प्रश्न विचारतच चालले आहेत म्हणून म्हातारबाबांचे डोके सणकले असेल! एन ने सुरु होणारा तुलनेने निरुपद्रवी शब्द शिवी म्हणून वापरला हे नशीब नाहीतर सत्तेचे सुकाणू कमलाबाईंच्या हाती सोपवावे लागले असते!

>>हे काही प्रमाणात "a canary in the mine" म्हणता येईल. >> आयजीच्या जीवावर बायजी उधार !
हा निर्णय काही माझा नाही. टेक्ससच्या लोकांनी लोकशाही पद्धतीने निवडून दिलेल्या सरकारचा आहे. आणि तो त्या राज्याच्या रहिवाशांना लागू आहे. मी टेक्सस मधे रहात नाही. मी एक निरीक्षक म्हणून ह्या प्रयोगाकडे बघतो आहे.
ह्यात आयजी आणि बायजी कुठून आले? मी कुणाच्या जीवावर बेतणारा निर्णय घेतला? म्हणीचा अर्थ समजावून घेता आला तर पहा.

ह्यात आयजी आणि बायजी कुठून आले? मी कुणाच्या जीवावर बेतणारा निर्णय घेतला? म्हणीचा अर्थ समजावून घेता आला तर पहा. >> तुम्हीच विचार करून पहा कशाबद्दल म्हटलय ते. " मी एक निरीक्षक म्हणून ह्या प्रयोगाकडे बघतो आहे." ह्यातच सगळे कळतय, तुमची भूमिका नि तुमची विचारसरणी कशी आहे हे इथे वाचणार्‍याला सहज कळते. अजून एक म्हण घ्या " कोंबडे झाकून ठेवलं तरी सूर्य उगवायचा राहात नाही."

लोकशाही पद्धतीने निवडून दिलेल्या सरकारचा >> बाकी एकदम तुम्हाला लोकशाही मार्गाने निवडून दिलेल्या सरकारची आठवण आली हे बघून गम्मत वाटली.

म्हणजे जे कोणी "आता मास्क काढला तरी चालेल" असा विचार करत आहेत ते निअ‍ॅंडर्तल पद्धतीने विचार करत आहेत. >> नाही. तेथील नागरिकांनी ही घोषणा केलेली नाही, गव्हर्नर ने केलेली आहे. त्यावर तो रिमार्क आहे. Take off your masks हे गव्हर्नर लोकांना सांगतोय, त्यावर आहे ते.

>>
" मी एक निरीक्षक म्हणून ह्या प्रयोगाकडे बघतो आहे." ह्यातच सगळे कळतय, तुमची भूमिका नि तुमची विचारसरणी कशी आहे हे इथे वाचणार्‍याला सहज कळते. अजून एक म्हण घ्या " कोंबडे झाकून ठेवलं तरी सूर्य उगवायचा राहात नाही."
<<
दात कोरून पोट भरत नाही. काखेत कळसा गावाला वळसा ह्याही अजून काही म्हणी आहेत. आणि आपण उद्धृत केलेल्या म्हणींप्रमाणे त्याही ह्या प्रसंगाला लागू होत नाहीत! असो.
मी एक निरीक्षक आहे हे आपल्याला आक्षेपार्ह वाटते. का? दुसर्‍या कुठल्या राज्यात कुणीतरी काही प्रयोग करत आहे. मला तो पटतो. माझ्या राज्याचा गव्हर्नर (न्युसम) जर एक भ्रष्ट, ढोंगी, नीच माणूस नसता तर त्याने/तिनेही असा निर्णय घेतला असता. वर्षानुवर्षे मास्क घालून वावरायचे. अट्टाहासाने सरकारडून बंधने घालत रहायची हे पटणारे नाही. परंतु स्वतंत्र विचार करायचा नाही. समस्त समूह जो विचार करतो तोच पाळायचा असा फासिस्ट विचार डेमोक्रॅटिक पक्ष वारंवार पुढे करताना दिसतो आहे. कॅन्सल कल्चर नामक कॅन्सर सगळ्या डेमो मंडळींना ग्रासू लागला आहे.
>>
लोकशाही पद्धतीने निवडून दिलेल्या सरकारचा >> बाकी एकदम तुम्हाला लोकशाही मार्गाने निवडून दिलेल्या सरकारची आठवण आली हे बघून गम्मत वाटली.
<<
मग काय हुकुमशाही पद्धतीने, वा लष्करी उठाव करुन टेक्सच्या गवर्नेर साहेबांनी सत्ता हस्तगत केली काय? आहो सगळ्या निवडणुकीत गैरप्रकार होत नाहीत. कॅलिफोर्नियाचा गवर्नर हा एक नीच, ढोंगी, भ्रष्ट माणूस आहे. माझ्या विचाराच्या पूर्ण विरोधी. पण तरी तो लोकशाही मार्गाने निवडून आला आहे असेच मी मानतो. (आता त्याला लोकशाही मार्गानेच पदच्युत करण्याचे षडयंत्र कॅलिफोर्नियाचे लोक करत आहेत ती गोष्ट वेगळी!)

मी एक निरीक्षक आहे हे आपल्याला आक्षेपार्ह वाटते. >> हे तुम्ही ठरवलय. तुमच्या निर्क्षक असाण्याबाबत मला आक्षेप नाही. "दुसर्‍या कुठल्या राज्यात कुणीतरी काही प्रयोग करत आहे. मला तो पटतो" ह्यात सगळे आले. दुसर्‍यांवर केलेले प्रयोग नेहमीच सोयीस्कर असतात. ब्लॅक लाईव्ह मॅटर बद्दल तुमचे पहिले पोस्ट होते ओकलंड मधल्या सब वे मधे होणार्‍या प्रकारांबद्दल. हे नेहमीचेच आहे. प्रत्येक घटनेकडे जोवर माला भूर्दंड पडत नाही तोवर 'होऊ दे , चांगलेच आहे. " हा तुमचा जो अ‍ॅप्रोच आहे तो नेहमीच उघडपणे इथे दिसत आला आहे. मी फक्त त्याबद्दल म्हणत होतो. अर्थात हे तुम्हाला न कळण्याइतके तुम्ही दूधखुळे नक्की नाहि हे माहित आहे. पण अ‍ॅस युसवल, तुम्ही डेमोक्रॅटिक पार्टी वगैरे गोष्टींम्वर विषय घेऊन जाणे अपेक्षितच आहे.

कॅन्सल कल्चर नामक कॅन्सर सगळ्या डेमो मंडळींना ग्रासू लागला आहे. >> एकदा अमेरीकेचा इराक हल्ला , फ्रांसची भूमिका नि त्यावर रिपब्लिकन्स ची भूमिका ह्याबद्दल थोडे वाचून बघा. कॅन्सल कल्चर बद्दल थोडे गंमतशीर काहीतरी कळेल.

बर काल ४ मार्च होता. तुम्हा तात्या समर्थकांच्या मते तात्या काल परत प्रेसीडंट बनणार होता. काय झाले बुवा त्याचे ?

>>
प्रत्येक घटनेकडे जोवर माला भूर्दंड पडत नाही तोवर 'होऊ दे , चांगलेच आहे. " हा तुमचा जो अ‍ॅप्रोच आहे तो नेहमीच उघडपणे इथे दिसत आला आहे. मी फक्त त्याबद्दल म्हणत होतो. अर्थात हे तुम्हाला न कळण्याइतके तुम्ही दूधखुळे नक्की नाहि हे माहित आहे. पण अ‍ॅस युसवल, तुम्ही डेमोक्रॅटिक पार्टी वगैरे गोष्टींम्वर विषय घेऊन जाणे अपेक्षितच आहे.
<<
माझे हे वाक्य सोयिस्कररित्या दुर्लक्षित केलेत काय?
"दुसर्‍या कुठल्या राज्यात कुणीतरी काही प्रयोग करत आहे. मला तो पटतो. माझ्या राज्याचा गव्हर्नर (न्युसम) जर एक भ्रष्ट, ढोंगी, नीच माणूस नसता तर त्याने/तिनेही असा निर्णय घेतला असता."
ह्याचा अर्थ माझ्या राज्याचा गव्हर्नर जनतेचे हित चिंतणारा असता तर त्यानेही कदाचित हाच निर्णय घेतला असता आणि तो मला पटला असता. ( शक्य परिस्थिती असती तर मला टेक्ससला जायला आवडले असते) कारण कधीतरी हे संपायलाच हवे. सोशलिस्ट वृत्तीच्या डेमोक्रॅटिक लोकाना कुठल्या ना कुठल्या कारणाने लोकांवर नियंत्रण ठेवणे आवडते.
ह्या तथाकथित बागुलबुवा उभा करण्यामागे ही वृत्ती किती आहे आणि खरोखरचा रोगाचा धोका किती आहे हे कळणे अवघड आहे.
त्यामुळे दुसर्‍या कुणीतरी धोका पत्करावा आणि मी टाळ्या पिटतो असे मी समजत नाही. उलट आमच्या राज्यालाही ही सुबुद्धी होवो अशी प्रार्थना करतो.
महिनाभरात हे कळेलच टेक्ससमधे भीषण मृत्युचे तांडव दिसते का बिझनेस अ‍ॅज युज्वल ते.
बायडनची निएंडर्थल वगैरे मुक्ताफळे झाली आता त्याची जेनबाई क्षमायाचना करून ते निस्तरत आहे. टेक्ससचा नि मिसिसिपी प्रयोग बायडन आजोबांच्या कवळ्या त्यांच्याच घशात घालेल अशी आशा करतो!

>>बर काल ४ मार्च होता. तुम्हा तात्या समर्थकांच्या मते तात्या काल परत प्रेसीडंट बनणार होता. काय झाले बुवा त्याचे ?
हो का? मी स्वप्नात आलो होतो का तुमच्या हे मत सांगायला? कदाचित तुम्ही कुठल्या वर्षाचा मार्च ४ हे बघायला विसरला असाल झोपेत. असो. मी अशी कुठलीही खोटी आशा बाळगून नाही. २०२२ आणि २०२४ हे.

<< भ्रमिष्ट माणसाला ह्यातील चांगले वाईट समजत असेलच असे नाही. कदाचित वामकुक्षीची वेळ जवळ आलेली असताना पत्रकार प्रश्न विचारतच चालले आहेत म्हणून म्हातारबाबांचे डोके सणकले असेल! >>

------- बायडन यांच्याबर असा वैयक्तिक ( भ्रमिष्ट) हल्ला का? अमेरिकेचे अध्यक्ष आहेत, आणि जनतेला त्यांच्यात काही चांगले नेतृत्व गुणा दिसले म्हणून निवडून दिले.
"coronavirus might be treated by injecting disinfectant into the body.... " असे विनोदी विधाने WH च्या पोडियम वरुन तर करत नाही.

जनतेला त्यांच्यात काही चांगले नेतृत्व गुणा दिसले म्हणून निवडून दिले>>> Biggrin Biggrin Biggrin
Orange man bad चा प्रपोगंडा सतत ऐकून खरं वाटू लागलेल्या शेळ्यांनी जो बैंगनला निवडून दिले. या शेळ्यांचे डोळे उघडतील तेव्हा उघडतील. Keystone पाइप लाइन बंद पाडून झाली. 15 डॉलर मिमिमम वेज चा फज्जा उडाला. (गरीब लोक गरीब राहिले नाहीत तर यांच्या व्होटर बेसचं काय?) ब्लॅक लोकांच्या नावाने मतांचा जोगवा मागून त्यांच्या तोंडाला पाने पुसली. दुसरीकडे फ्युचर डेमोक्रॅट व्होटर्स 'आयात' करण्याचे काम मात्र इमाने इतबारे चालू आहे. रोज सकाळी याची कवळी लावून देताना आणि कपडे घालून देताना नॅन्सी आजी आणि एओसी आक्का आदेश देतील त्याची अंमलबजावणी करणे हेच या बुजगावण्याचे काम.
सगळे पोलिस डिपार्टमेंट्स मात्र जाम खूष आहेत. पुढची चार वर्षं कितीही काळे लोक अटकेदरम्यान मरोत, बातमी ताबडतोब दाबली जाईल. डेमोक्रॅट पक्षाच्या ठेवलेल्या बाया एकेए सिएनेन, वॉपो, एमेसेन्बीसी याची काळजी घेतीलच.

A30kau7
प्रतिसादाची भाषा नीट असू द्या

शक्य परिस्थिती असती तर मला टेक्ससला जायला आवडले असते>>> काही उपयोग नाही. तुमच्या राज्यातून लोक खोऱ्याने इथे येत आहेत. बरे नुसते येत नाहीत तर बरोबर आपले woke कल्चर घेऊन येत आहेत. माझ्या हयातीतच टेक्सास ब्लू झालेले बघावे लागणार अशी चिन्हे दिसत आहेत. इथले लोक आता मेक्सिको ऐवजी या लोकांनाच रोखण्यासाठी भिंत बांधावी असे म्हणत आहेत!

Pages