शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाट बरोबर

आता उरका बाकीचे ....

1. नव्या कल्पना (3)
4. ज्योतिष प्रांतातले (3)

4. मुहूर्त >>
हे उत्तर नाही. विशिष्ट 'मुहूर्त" शोधा
.....ज्योतिषाकडे न जाता !

१. तरंग
४. घबाड

१. तरंग
४. घबाड दोन्ही बरोबर.
...............................
मानव, सुन्दर खेळ !
अर्थात सर्वांचेच सामूहिक प्रयत्न महत्वाचे होते.

लाट : विविध अर्थ :

1. नव्या कल्पना (3) >>>> तरंग

2. छाया (३) >>>> लहर
3. सार्वजनिक बांधकामात वापरतात (2) >>>> रुळ

4. ज्योतिष प्रांतातले (3) >>> घबाड
5. यांचा रुबाब फार (४) >>> अधिकारी ( लाटसाहेब हे खास नाव )

6. मज्जा आहे बुवा ! (3) चंगळ
7. नशिबाची परीक्षा (३) >>> सोडत

खाली एकूण ८ शब्द दिले आहेत. त्या प्रत्येकातील फक्त एकेक अक्षर घ्यायचे आणि नंतर योग्य तो क्रम लावून ८ अक्षरी मराठी शब्द तयार करायचा.

शोधसूत्र : रूढी वगैरेस अनुसरून असलेले

चरकसंहितेमुळे
सुप्रवचनात्मक

कायिकअनुभव
प्रवीणकुमारकडे

तिन्हीसांजेच्यावेळी
मलिदाखाण्यातून

सरकीपासूनचे
आकारविवक्षित
............

सुधारणा : आता क्रम लावून दिला आहे. ओळीने शोधा ८ अक्षरे.

तिन्हीसांजेच्यावेळी
सुप्रवचनात्मक
मलिदाखाण्यातून

अकायिकअनुभव
सरकीपासूनचे
चरकसंहितेमुळे

आकारविवक्षित
प्रवीणकुमारकडे

Sorry ,vichar नाहीच येणार.पूर्ण वाचायच्या आधी लिहायची घाई नेहमीप्रमाणे नडली.

प्रकार?

८ अक्षरी शब्द ओळखा.
उपशब्द सूत्रे :

१ जोडाक्षर
२३ भाजतांना काळे झालेले

८४ चमक
५६७ विकार

संपूर्ण : भाषेच्या संदर्भातले

तुम्ही काही दिवस नव्हता हे लक्षात येऊन विपू करणार होते. आज दिसलात बरं वाटलं. Happy
८४ चमक
तेज/आभा
५६७ विकार
आजार

२३ भाजतांना काळे झालेले
करपलेले की जळालेले या अर्थाने ?

अस्मिता, धन्यवाद.
चांगला प्रयत्न पण सर्व नाही

२३ जास्त भाजून काळे झालेले; पूर्ण जळलेले नाही

कोंडी कोण फोडणार ? Bw

२३ चे उत्तर अस्मिता यांच्या उत्तरातून सापडेल

सर्व नाही
पुणेकर
जवळ येताय पण ......
जमेल !

Pages