शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

…………………………………………………………

१. सुगंधी औषधी वनस्पती (४, प )
२. प्रत्युत्तर (५) ...........पलटवार

३. अशी कहाणी उत्सुकतेने ऐकावी (५, त ) .......... .रसभरित
४. हा तिऱ्हाईत गम्मत पाहतो (५)

५. भटक्या ( ५, म)..... रमताराम
६. मोठ्या प्रदेशाशी संबंधित (६)

७. शंकेखोर शब्द (६, त)
८. पोटाची अवस्था (५)......... तटतटीत

९. योजना (अरबी उगम) ( ४, क्र १ चे पहिले).
………………………………………………………………….

9 तरतूद तदबीर चूक.
.......................
छान खेळ !
काय मंडळी, अगदी नेहमीचे शब्द आहेत ना ! Bw

४. हा तिऱ्हाईत गम्मत पाहतो (५) --- तमासगीर
१. सुगंधी औषधी वनस्पती (४, प ) --- बडीशेप
७. शंकेखोर शब्द (६, त) --- यदाकदाचित

आज देवकीनी पहिली रन काढली Happy संपवा पण तुम्हीच.

कारवी, मस्तच.
बडीशेप,सुगंधी वनस्पती लक्षातच आले नाही.
सर म्हणत होते तसे नेहमीच्या वापरातले शब्द होते.पण दडून बसले होते.

धन्यवाद.

कोणी इच्छुक नसल्यास काही वेळाने पुढचे देऊ शकतो.

खाली एकूण ८ शब्द दिले आहेत. त्या प्रत्येकातील फक्त एकेक अक्षर घ्यायचे आणि नंतर योग्य तो क्रम लावून ८ अक्षरी मराठी शब्द तयार करायचा.
शोधसूत्र : नाटकाशी संबंधित व्यक्ती
……………………………….
कार्यकारिणीमध्ये
नियोजनशून्यता

सहोदरप्रणित
प्रजासमाजवाद

अराजकतेसाठी
भडकावण्याकरिता

आमांशरोगामुळे
गजाननाच्याद्वारी
.......................................

देवकी तुम्ही प्रकाश लिहून निम्मं काम सोपं केलं होत..thank you तुम्हाला.. कारवी ,कुमार सर धन्यवाद..पहिल्यांदा च नीट जमलं..:-)

Pages