भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................
सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.
गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !
हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.
आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.
नवधा (शतधा सारखे),>>>> शतदा
नवधा (शतधा सारखे),>>>> शतदा असे म्हणतो ना?
प्रवसर,
सवन (सूर्य), प्रसर, वगार, रवण>>>>>> यातील सवन सोडल्यास बाकीच्या शब्दांचे अर्थ काय आहेत?
प्रसर = विस्तार
प्रसर = विस्तार
वगार = म्हैस
रवण = रांग
ओह ! धन्यवाद सर.
ओह ! धन्यवाद सर.
शतदा म्हणजे शंभर वेळा आणि
शतदा म्हणजे शंभर वेळा आणि शतधा म्हणजे शंभर प्रकारे किंवा शंभर तऱ्हांनी. द्विधा, त्रिधा, हे शब्द आपल्या ओळखीचे असतात. तसेच नवधा .
शब्दव्यूह आणि अंताक्षरी
शब्दव्यूह आणि अंताक्षरी
खाली ओळीने ९ शोधसूत्रे दिली आहेत. त्यानुसार तुम्हाला प्रत्येकी एक अर्थपूर्ण शब्द ( दिलेल्या अक्षरसंख्येचा) शोधायचा आहे. एक आड एक अपेक्षित शब्दाचे शेवटचे अक्षर दिले आहे. आता पुढे अंताक्षरी अशी चालू होईल:
• पहिला योग्य शब्द शोधल्यावर त्याचे शेवटचे (दिलेले) अक्षर घ्या.
• त्या अक्षराने सुरू होणारा दुसरा योग्य शब्द ओळखा.
• पुन्हा वरील शब्दाचे शेवटचे (दिलेले) अक्षर घेऊन तिसरा शब्द शोधा.
• असे क्रमाने खाली जात राहा.
• नऊव्या शब्दाचे शेवटचे अक्षर हे पहिल्या शब्दाचे सुरवातीचे अक्षर आहे. असे सिद्ध झाल्यासच कोडे पूर्ण झाले असे समजावे.
• कोडे मध्यावर असताना जर तुम्ही समानार्थी पर्यायी शब्द काढलेत तरी अंताक्षरी जुळलीच पाहिजे. आणि शेवटी १ व ९ ची अटही पूर्ण झाली पाहिजे. म्हणून अनुक्रमेच उत्तरे द्या.
• पहिली दोन लागोपाठची उत्तरे एकदम लिहा. पुढे क्रमाने एकेक सुटे चालेल.
…………….
१. भटकंतीस जाताना आवश्यक (५, रा )
२. राजघराण्यातील व्यक्ती (५)
३. ही कृती केल्यावर पाने वाटायची (५, न)
४. प्रशंसा (५)
५. नुकसान पोचवणारा कारकून (६, ई )
६. मातीयुक्त भाजक्या वस्तूंचे बांधकाम (४)
७. हा गरिबांवर जुलूम करतो (५, रा)
८. पहिल्या राजवटीच्या समाप्तीनंतर दुसरी सुरू होईपर्यंतचा काळ (७)
९. सपाटून (५, क्र १ चे पहिले)
............................................
(९ पैकी ५ शब्द वृत्तपत्रीय कोड्यांतील नियमित).
3.पाने खायला वाटायची की
3.पाने खायला वाटायची की द्यायला?
--pakshalan ?
3.पाने द्यायला वाटायची
3.पाने द्यायला वाटायची
--pakshalan नाही
८. पहिल्या राजवटीच्या
८. पहिल्या राजवटीच्या समाप्तीनंतर दुसरी सुरू होईपर्यंतचा काळ (७) ---- राष्ट्रपतीसत्ताक
९. सपाटून (५, क्र १ चे पहिले) --- कडकडून / कचकचून / कचकावून
६. मातीयुक्त भाजक्या वस्तूंचे बांधकाम (४) --- ईष्टिकाम / ज / य / ईष्टिका?
2. राजकुलीन
2. राजकुलीन
सर्व नाही.
सर्व नाही.
फक्त
कचकचून >>> जरा सुधारावे !
Kachkachit
Kachkachit
बरोबर
बरोबर
माफ करा, कदाचित मला 7 तास इथे यायला जमणार नाही
चालू ठेवा
६. मातीयुक्त भाजक्या वस्तूंचे
६. मातीयुक्त भाजक्या वस्तूंचे बांधकाम (४) --- ईटकाम / ईटकरी / ईट्बंदी ( चिरेबंदी, फरसबंदी सारखे) ?
८. पहिल्या राजवटीच्या समाप्तीनंतर दुसरी सुरू होईपर्यंतचा काळ (७) ---- ??? अराजक / निर्नायक / संक्रमक ?
राज्याला निश्चीत अधिपती नाही असा अंदाधुंदीचा संक्रमण काळ.
ईटबंदी बरोब्बर !
ईटबंदी बरोब्बर !
८ हे राजाच्या राजवटीबद्दल आहे.
३ सोप्पे आहे !
अराजक >>> थोडे याच्याशी खेळत राहा. शब्द वेगळा आहे.
१. भटकंतीस जाताना आवश्यक (५
१. भटकंतीस जाताना आवश्यक (५ त ...... रा )
२. राजघराण्यातील व्यक्ती (५)
३. ही कृती केल्यावर पाने वाटायची (५, न)
४. प्रशंसा (५)
५. नुकसान पोचवणारा कारकून (६, ई )
६.
मातीयुक्त भाजक्या वस्तूंचे बांधकाम (४)ईटबंदी७. हा गरिबांवर जुलूम करतो (५, रा)
८. पहिल्या राजवटीच्या समाप्तीनंतर दुसरी सुरू होईपर्यंतचा काळ (७)
९.
सपाटून (५, क्र १ चे पहिले).... कचकचीत3. _ _नमन?
3. _ _नमन?
3. _ _नमन नाही
3. _ _नमन नाही
'पाने' वर विचार करा... कुठलीही असू शकतात !
३. ही कृती केल्यावर पाने
३. ही कृती केल्यावर पाने वाटायची (५, न) >>>
पत्त्यांची असतील तर पिसणे याअर्थी काही? --- ?? मंथन / मर्दन
मेंदी / चटणीत असतील तर धुणे निवडणे याअर्थी --- ?? क्षालन
पाने म्हणजे पत्ते असावेत.
पाने म्हणजे पत्ते असावेत. वाटण्यासाठी पिसावे आणि काटावे लागतात.
हो पत्ते असतील तर पिसणे काटणे
हो पत्ते असतील तर पिसणे काटणे हुकुम ठेवणे यापैकी काही वटतेय
Ho, पत्ते पिसणे हाच विचार आला
Ho, पत्ते पिसणे हाच विचार आला होता.
आधी विड्याची पाने नंतर अपट्याची पाने डोक्यात होती.
अपट्याची पाने >>> होय !
अपट्याची पाने >>> होय !
आता येउद्यात !
सीमोल्लंघन ??
सीमोल्लंघन ??
सीमोल्लंघन
सीमोल्लंघन
अगदी बरोबर !
9 पैकी हा शब्द ओळखायला सर्वात सोपा असल्याने 'पाने' हे संदिग्ध दिले होते
१. भटकंतीस जाताना आवश्यक (५ त
१. भटकंतीस जाताना आवश्यक (५ त ...... रा )
२. राजघराण्यातील व्यक्ती (५ रा * * * सी )
३. ही कृती केल्यावर पाने वाटायची (५, न).... सीमोल्लंघन
४. प्रशंसा (५ , न ****)
५. नुकसान पोचवणारा कारकून (६, ***** ई )
६. मातीयुक्त भाजक्या वस्तूंचे बांधकाम (४).....ईटबंदी
७. हा गरिबांवर जुलूम करतो (५, दी *** रा)
८. पहिल्या राजवटीच्या समाप्तीनंतर दुसरी सुरू होईपर्यंतचा काळ (७ रा ***** क)
९. सपाटून (५, क्र १ चे पहिले).... कचकचीत
1. तळ/तड तोबरा 2. राजराजसी?
1. तळ/तड तोबरा
2. राजराजसी?
बरेच्से आले.
बरेच्से आले.
त * तोबरा
राज * * सी
आता फक्त * हे शोधा.
रा ज वा र सी ???
रा ज वा र सी ???
रा ज वं श सी ??? कैच्या कै
२. राजघराण्यातील व्यक्ती (५
२. राजघराण्यातील व्यक्ती (५ रा * * * सी ) --- राजनिवासी, राजविलासी
१. भटकंतीस जाताना आवश्यक (५ त ...... रा ) --- तणतोबरा (अरबटचरबट खाऊ)
७. हा गरिबांवर जुलूम करतो (५, दी *** रा) >>>
गरीबसाठी दीन + जुलूम करतो साठी लुटेरा, माजोरा .... पण असा शब्द नाहीये.
पहिले शेवटचे अक्षर असूनही शब्द नजरेसमोर येत नाहीयेत
सर्व नाही.
सर्व नाही.
राजनिवासी हा नोकर सुद्धा असू शकतो . म्हणून नाही.
वं श > तर्क योग्य. याच धर्तीवर शोधा
Pages