शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. भटकंतीस जाताना आवश्यक (५ त * तोब रा )
२. राजघराण्यातील व्यक्ती (५ राज * * सी )

३. ही कृती केल्यावर पाने वाटायची (५, न).... सीमोल्लंघन
४. प्रशंसा (५ , न ****)

५. नुकसान पोचवणारा कारकून (६, ***** ई )
६. मातीयुक्त भाजक्या वस्तूंचे बांधकाम (४).....ईटबंदी

७. हा गरिबांवर जुलूम करतो (५, दीन** रा)
८. पहिल्या राजवटीच्या समाप्तीनंतर दुसरी सुरू होईपर्यंतचा काळ (७ रा ***** क)

९. सपाटून (५, क्र १ चे पहिले).... कचकचीत

राजवारसी नाही.
'वंश' हे 'त्या' वरून मराठीत झाले असावे.

५. नुकसान पोचवणारा कारकून (६, ***** ई ) --- गफलतीशाई, हिशेबमलई वगैरे?
मुद्दाम चुकीचा हिशोब लिहून केलेले नुकसान (गफलत-ए-स्याही मूळ परभाषिक असे काही)

गफलतीशाई, हिशेबमलई >>> नाही.

संगणकपूर्व काळातील कारकून मुख्यत्वे कसा काम करत असे ते आठवा.
हा शब्द पेपरांच्या कोड्यात आठवड्यातून एकदा तरी असतोच.

उत्तरे:
१. तवातोबरा

२. राजबनसी
आपण जर 'राजवंशी' असा शोध बृहद्कोशात घेतला, तर तो आपल्याला या शब्दाकडे घेऊन जातो !

आता
४. प्रशंसा (५ , न ****)

५. नुकसान पोचवणारा कारकून (६, ***** ई )

७. हा गरिबांवर जुलूम करतो (५, दीन** रा)

८. पहिल्या राजवटीच्या समाप्तीनंतर दुसरी सुरू होईपर्यंतचा काळ (७ रा ***** क)

सामसूम? पुणेकरपी, मानव, हीरा कोणी नाही आले आज....
सीमोल्लंघन सोडले तर काही परिचयाचे नाही वाटत. मी नाही पेपरची कोडी सोडवत हल्ली.
त्यादिवशीसारखे गूढकोड्यात रूपांतर द्या आता. कोणाला तरी सुचेल.

ठीक. तूर्त ही भर बघा :

४. प्रशंसा (५ , न ***क) >>> फारसी उगम

५. नुकसान पोचवणारा कारकून (६, क **** ई ) >>> कारकून त्याच्या लेखणीने एखाद्याला नुकसान/ अतित्रास देतो.

७. हा गरिबांवर जुलूम करतो (५, दीन ** रा) >>> जुलूमाची परिसीमा काय असेल ?

८ मीच उत्तर देईन शेवटी

सर्व उत्तरे :

१. भटकंतीस जाताना आवश्यक (५, रा ) >> तवातोबरा
२. राजघराण्यातील व्यक्ती (५)>>>> राजबनसी
३. ही कृती केल्यावर पाने वाटायची (५, न) >> सीमोल्लंघन

४. प्रशंसा (५) >>> नवाजणूक
५. नुकसान पोचवणारा कारकून (६, ई ) >>> कलमकसाई
६. मातीयुक्त भाजक्या वस्तूंचे बांधकाम (४)>> ईटबंदी

७. हा गरिबांवर जुलूम करतो (५, रा) >>> दीनहत्यारा
८. पहिल्या राजवटीच्या समाप्तीनंतर दुसरी सुरू होईपर्यंतचा काळ (७) >> राजीकबेराजीक
९. सपाटून (५, क्र १ चे पहिले)>>> कचकचीत
............................................
सर्वांना धन्यवाद !

अरे बापरे...अजून २ दिवस थांबूनही नसते आले हे शब्द. डोक्यावरून सीमापार. टोलवण्याचा प्रश्नच नाही.
कुठल्या पेपरच्या कोड्यात इतके कठीण शब्द येतात? महाशब्दकोडे का, ज्याला बक्षीस असते ते?

खेळाच्या सुरुवातीस तळटीप दिल्याप्रमाणे सूत्रे क्रमांक २,३,५,६ व ९ हे पाच शब्द बहुतेक दैनिकांच्या कोड्यात नियमित असतात. (कलमकसाई तर वारंवार).
उरलेले चार अपरिचित आहेत हे मान्य.

आताचा अनुभव लक्षात घेता इथून पुढे या ४ शब्दांसारखे शब्द कायमचे बंद !
सहभाग आणि सूचनाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

बहुतेक दैनिकांच्या कोड्यात नियमित >>>>
अच्छा.... वेगवेगळ्या दैनिकांमधील. मी तोच विचार केला कुठला पेपर इतकी कठीण कोडी रचतो... हल्ली लोकाना साधे शब्दही येतील न येतील अशी गत असते. २ ५ ६ हे नव्हते माहितीतले, माझ्यातरी.

उरलेले चार अपरिचित ..... ४ शब्दांसारखे शब्द कायमचे बंद ! >>
असेच काही नाही. अपरिचितही चालतील की. कुणाला कुठला अपरिचित तो दुसर्‍याला त्याच्या गावचा / वाचनातला म्हणून सरावाचा. पण अंदाज लावायला कठीण गेले आज, हे खरे. शेवटचे अक्षर जुळवावे तर सुरूवात सुचत नव्हती, सुरूवात एक केली तर अर्थपूर्ण शेपूट मिळाले नाही. एकेका शब्दासाठी क्ल्यूसाठी तरी कितीदा त्रास द्यायचा असे झाले.

आणि वापरात नसल्याने शब्द वाचल्यावर त्याचा अर्थ न सांगता नजरेसमोर येत नाही. कारण आम्ही बहुतेकजण भाषेचे अभ्यासक वगैरे नाही. वापर कुठे कसा केलाय साहित्यात तेही मिळत नाही नेटवर. ते दिलेत तर संदर्भासह कळेल शब्द. मग मजा येईल अपरिचित शब्दही हुडकायला.

कुठला पेपर इतकी कठीण कोडी रचतो. >>

कालच्याच सकाळमध्ये ‘घोड्यांचा वैद्य’ हा शब्द ओळखायला दिलाय. ( * ला * * ).
मला तो कोशातूनच शोधावा लागला.

परवा ‘किराणा व्यापारी’ ( * * ल ) हा दिला होता.
बघा कोणाला जमताहेत का ! हा शब्द तर अतिपरिचित आहे !!

आताचा अनुभव लक्षात घेता इथून पुढे या ४ शब्दांसारखे शब्द कायमचे बंद ! >>>
असं काही नको सर आपण इव्हॉल्व होत जाऊ...नवीन/ अपरिचित किंवा अल्पपरिचित आहे असे स्पष्ट सांगून क्लु जास्त द्या झालं !! Happy
नवाजणूक आला असता, नवाजणे या अर्थाने किती तरी वेळा ऐकलायं. नवाजणूक माहिती नव्हता पण.....
('नवाजलं कुकडं दमडीला विकलं' ही म्हण आठवली)

नवीन/ अपरिचित किंवा अल्पपरिचित आहे असे स्पष्ट सांगून क्लु जास्त द्या झालं !! >>> बरोबर. तेवढीच नवी माहिती कळेल.

हो अस्मिता, नावाजून / नावाजलेला म्हणतो आपण. नवाजणूक नाही सुचला. कुकडं काय असतं?

@ ‘घोड्यांचा वैद्य’ --- शालिहोत्र संहिता आहे. वैद्य बघावा लागेल.

ओके, शालिहोत्रीच होता काय? मी ( * ला * * ).काय असेल याचे रूप बदलून असा विचार करत राहिले.
पुन्हा बकाल = वाणी नव्हते माहिती. अस्वच्छ, अस्ताव्यस्त, बेशिस्त वसलेला परिसर हे परिचयाचे.

ओके टंकनातील चूक.... इतर नेहमी खेळणारे अजून काय सुचवतात बघू. नाहीतर आता अपरिचित शब्दही घेऊन पुढे जाऊया.

Pages