Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47
घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
लोल, मायबोलीवरच्याच एका
हल्ल्याची टाईमलाईन आणि हल्लेखोर काँग्रेसमन आणि सिनेटर्सच्या किती जवळ पोचले होते ह्याचं recreation
Inside the U.S. Capitol at the height of the siege: https://www.youtube.com/watch?v=ibWJO02nNsY
एक चांगला लेखhttps://www
एक चांगला लेख
https://www.loksatta.com/lokrang-news/america-election-donald-trump-joe-...
जाई.. डॉक्टर घासकडवी.. अचूक
जाई.. डॉक्टर घासकडवी.. अचूक निरिक्षण! लेख शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
नंदन.. तु शेअर केलेली लिंक.. बहुतेक फेक न्युज या कॅटॅगरीत मोडते....
हो. घासकडवी यांचा लेख चांगला
हो. घासकडवी यांचा लेख चांगला आहे.
@मुकुंदराव - लोल!
@मुकुंदराव - लोल!
मायबोलीवरच्याच एका जुन्या धाग्यावर राज ह्यांनी संध्यानंदी, यलो जर्नलिझमने परिपूर्ण अशा 'न्यू यॉर्क पोस्ट' ह्या टॅब्लॉईडमधल्या एका लेखातले परिच्छेदच्या परिच्छेद आपल्या नावावर खपवण्याचा प्रयत्न केला होता: https://www.maayboli.com/node/55037?page=5
["धनी, मी कुठं म्हणतोय कि ट्रंप पर्फेक्ट आहे. माझ्या पोस्टमधलं हे वाचलं का? - Voting for him is an act of desperation and reflects a fevered delusion that there is nothing left to lose..."]
(न्यू यॉर्क पोस्टमधला तो मूळ लेख इथे: https://nypost.com/2015/07/12/hillary-vs-trump-is-a-lose-lose-for-america/)
अर्थात, मग काही काळाने ती उचलेगिरी उघडकीला आल्यावर प्रतिक्रिया एडिट करून, साळसूदपणे वर ह्या टॅब्लॉईड न्यू यॉर्क पोस्टचे आभारही मानले होते!
ह्या पार्श्वभूमीवर टॅब्लॉईड्सवरची राणा भीमदेवी प्रतिक्रिया फारच मनोरंजक वाटली!
हे म्हणजे, कॉपी-पेस्ट करून झाल्यावर मेलानियाकाकूंनी आपण मिशेल ओबामांच्या भाषणांना काडीचीही किंमत देत नाही, असं म्हणण्यासारखं झालं!!
Luke Mogelson ह्या न्यू
Luke Mogelson ह्या न्यू यॉर्करच्या पत्रकाराने ट्रम्पने चिथावणी दिलेल्या डोमेस्टिक टेररिस्टच्या घोळक्यासोबत राहून टिपलेला हा व्हिडिओ - https://www.newyorker.com/news/video-dept/a-reporters-footage-from-insid...
वॉ'शिंग्'टन सुंदराच्या सार्या लीळा ह्यात टिपलेल्या आहेतच, त्याशिवाय हे माथेफिरु लोक यादी बनवून एकेकाला युद्धाप्रमाणे टिपून मारणाच्या गोष्टी करत होते - तेही साधारण बाराव्या मिनिटाला स्पष्ट होतं.
परत एकदा स्पीच लेस!
परत एकदा स्पीच लेस!
इतकं होऊनही ट्रम्पचा रिपब्लिकन सपोर्ट बिलकुल कमी झालेला नाही. तो होणार न्हवताच
चार वर्षांतील गोंधळा नंतर नाही झाला तर या हल्ल्याने होईल ही अगदीच भाबडी समजूत झाली.
>>'न्यू यॉर्क पोस्ट' ह्या
>>'न्यू यॉर्क पोस्ट' ह्या टॅब्लॉईडमधल्या एका लेखातले परिच्छेदच्या परिच्छेद आपल्या नावावर खपवण्याचा प्रयत्न केला होता:<<
नंदन - अच्छा, तर हि ठुसठुसणारी जखम कारणीभूत आहे या धाग्यावरच्या ट्रोलिंग मागे. आणि "नांवावर खपवण्याचा" निष्कर्श तुमच्या कुवती नुसार काढलात, त्यात अजिबात आश्चर्य वाटलं नाहि. या धाग्यावरंच वेळोवेळी "व्हॉटअबौटरी" चे मुद्दे आणुन स्वत: तिथेच व्हॉटअबौटरी करणार्याने बेसलेस आरोप करणे इज दि एपिटमी ऑफ ट्रोलिंग. चालु द्या...
राज,
राज,
अमेरीकेच्या संसदेवर हल्ला झाला त्याला ट्रंप कारणीभूत आहे का नाही? (त्यानं त्याच्या पाठिराख्यांना फूस लावून हल्ला करवला की नाही? ) तो ६ जानेवारीच्या भाषणात जे काही बोलत होता, ते योग्य होते का?
आणि याचं उत्तर हो असेल तर त्याला कसे जबाबदार धरावे आणि काय शिक्षा व्हावी?
आता अनेक डिटेल्स बाहेर येत आहेत, ते वाचून अजूनही तुमच्या दृष्टीनं हा 'न्यूसंस' आहे का?
मुकुंद,
मुकुंद,
तुझे सगळे मुद्दे मान्य करूनही मला प्रामाणिकपणे अजून एक सिव्हील वॉर होईल असं वाटत नाही. परीस्थिती नाजूक आहे आणि पूर्णपणे काळजी घ्यावी लागणार आहे हेही मान्य. पण अमेरीकेची लोकशाही एवढी कमकुवत नाही. पुढच्या काही दिवसांत-महिन्यांत चित्र स्पष्ट होईल. मात्र ग्रामिण भागातील रीपब्लिकन बेसबरोबर बरेच काम करावे लागेल हे मलाही वाटतंय. पण त्यासाठी रीपब्लिकन नेत्यांनी सत्तेपलीकडचे 'बिगर पिक्चर' पाहिले पाहिजे. थोडक्यात सध्याचा घाणेरडा स्वार्थ सोडून अमेरीकेच्या हिताचा विचार करावा.
वॉ'शिंग्'टन सुंदराच्या सार्
वॉ'शिंग्'टन सुंदराच्या सार्या लीळा >>>>
सगळ्या गदारोळात हे "जेम" निसटायला नको
>>... ते वाचून अजूनही तुमच्या
>>... ते वाचून अजूनही तुमच्या दृष्टीनं हा 'न्यूसंस' आहे का?<<
अंजली, तुमच्या प्रश्नांची उत्तरं, क्रमाने - हो, (शक्यता आहे), नाहि. ट्रंप निवडणुक हरला यापेक्षा मोठी शिक्षा त्याला नाहि.
आणि शेवटचा प्रश्न - पुढच्या सगळ्या घटना रिअॅक्शनरी आहेत. यापुर्विहि निवडणुक निकाला नंतर निदर्शनं/राय्ट्स झालेली आहेत, यावेळेस लाइन क्रॉस झाली यात शंका नाहि, आणि त्याचं समर्थनहि नाहि. पण तोच धागा पकडुन आता अमेरिकेत यादवी माजणार, जागोजागी दंगे होणार अशी बोंब ठोकुन स्वतःला लिबरल किंवा काय असेल ते म्हणुन घेणार्या संधीसाधु लोकांबाबत मला किंव वाटते. बाकि काहि नाहि. उद्या यादवी झाली नाहि (होणारहि नाहि), तर काहितरी नविन टिमकि वाजायला लागेल. तयारी ठेवा...
>>>जागोजागी दंगे होणार अशी
>>>जागोजागी दंगे होणार अशी बोंब ठोकुन स्वतःला लिबरल किंवा काय असेल ते म्हणुन घेणार्या संधीसाधु लोकांबाबत मला किंव वाटते.
ऑ ?
यादवी होणार की नाही यावर मतभिन्नता असली, तरी यादवी होऊ शकते असे म्हणणारा नेहमीचा strawman 'लिबरल' संधिसाधू ?
मग आम्हाला यादवी हवी आहे असे म्हणणारे तात्यांचे चेले कोण ?
ही चर्चा वाचून इतकेच समजले की
ही चर्चा वाचून इतकेच समजले की भारतात सनातनी, वर्णवर्चस्ववादी, धर्मांध असणारी बाई/माणुस अम्रिकन सनातनी, वर्णवर्चस्ववादी, धर्मांध जनतेला घाबरून लिबरलांच्या पंखाखाली लपते/तो हे वैश्विक सत्य आहे. आणि भारतात लिबरलांच्या नावाने ठणाणा करते/तो.
भारतात असो की अमेरिकेत, शेवटी देश वाचवणार लिब्रांडुच बरका.
खी: खी: खी: - टॅब्लॉईडच्या
खी: खी: खी: - टॅब्लॉईडच्या मुद्द्याला दिलेली बगल पाहून आश्चर्य वाटलं नाही. यलो जर्नलिझम, टॅब्लॉईड, ट्रम्पची रेसिस्ट हिस्टरी, हिंसाचाराला सातत्याने दिलेले उत्तेजन, "स्ट्रॅटेजिक जेरीमँडरिंग" - द लिस्ट कंटिन्युज! आता तर त्याला खास 'काव्या विश्वनाथन' टाईपच्या उचलेगिरीची जोड मिळाली आहे - तीदेखील क्लिंटनच्या खोटेपणाबद्दल चर्चा करताना - हाऊ आयरॉनिक!!
शिवाय मुद्दे संपले, गोची झाली की लोकांची कुवत काढणं हे आता फारच बोअरिंग आणि कंटाळवाणं होत चाललं आहे - याच धाग्यावर आपण कितीतरी लोकांच्या लेव्हलचा, कुवतीचा, सारासारबुद्धीचा उद्धार केलात. तेव्हा काहीतरी नवीन, ओरिजिनल पर्सिव्ह्ड इन्सल्ट शोधा बुवा!
Ad hominem पणा, व्हॉटअबाऊटरी, तणतणत केलेली ताशेरेबाजी, काल्पनिक उच्चासनावरून टाकलेल्या पिंका हे तर सारे खास ट्रम्पियन डिबेट टॅक्टिक्स. पण काय आहे; कधी ना कधी, आपल्याच औषधाची चव आपल्याला चाखायला मिळाली की खपली निघणारच!
असो, २०१६ चा विषय निघालाच आहे तर हिलरी क्लिंटनने वर्तवलेलं भविष्य, किती नेमकेपणाने खरं ठरलं आहे, ते पहा: https://twitter.com/i/status/1324518095873101824
तेव्हाही ट्रम्पने 'पीसफुल ट्रान्झिशन ऑफ पॉवर'ला नकार दिला होता.
WALLACE: But, sir, there is a tradition in this country -- in fact, one of the prides of this country -- is the peaceful transition of power and that no matter how hard-fought a campaign is, that at the end of the campaign that the loser concedes to the winner. Not saying that you're necessarily going to be the loser or the winner, but that the loser concedes to the winner and that the country comes together in part for the good of the country. Are you saying you're not prepared now to commit to that principle?
TRUMP: What I'm saying is that I will tell you at the time. I'll keep you in suspense. OK?
CLINTON: Well, Chris, let me respond to that, because that's horrifying. You know, every time Donald thinks things are not going in his direction, he claims whatever it is, is rigged against him.
...He lost the Iowa caucus. He lost the Wisconsin primary. He said the Republican primary was rigged against him. Then Trump University gets sued for fraud and racketeering; he claims the court system and the federal judge is rigged against him.
...This is a mindset. This is how Donald thinks. And it's funny, but it's also really troubling.
WALLACE: OK.
CLINTON: So that is not the way our democracy works. We've been around for 240 years. We've had free and fair elections. We've accepted the outcomes when we may not have liked them.
(दुवा: https://www.latimes.com/politics/la-na-pol-final-presidential-debate-tra...)
>>> इतकं होऊनही ट्रम्पचा
>>> इतकं होऊनही ट्रम्पचा रिपब्लिकन सपोर्ट बिलकुल कमी झालेला नाही. तो होणार न्हवताच
चार वर्षांतील गोंधळा नंतर नाही झाला तर या हल्ल्याने होईल ही अगदीच भाबडी समजूत झाली.
--- दुर्दैवी आहे.
Five Stages of Grief ज्या म्हणतात, त्यापैकी बरेचसे ट्रम्प समर्थक अद्यापही पहिल्या दोन-तीन स्टेजेसमध्येच अडकलेले दिसताहेत - denial, anger (=बायडनने निवडणूक ढापली) आणि bargaining (= छे, छे, हे काही विशेष नाही. मामुली घटना आहे!). होपफुली, त्यांना इव्हेंच्युअली acceptance पर्यंतचा मार्ग सापडेल!
राज, अंजली, फारेंड... मी
राज, अंजली, फारेंड... मी सिव्हिल वॉरमाँगर आहे असे माझ्या पोस्टींगवरुन अनुमान काढु नका... मलाही सिव्हिल वॉर मुळीच नको आहे.
पण ज्या अमेरिकन व्हॅल्युंच्या प्रेमात पडुन मी माझे सगळे अॅडल्ट आयुष्य अमेरिकेत घालवले... त्या देशात.. त्याच व्हॅल्युज... ज्या सहजतेने पायदळी तोडल्या जात आहेत / जाउ शकत आहेत त्याचा व जे जहरी विष अमेरिकन समाजात पसरले/ पसरवले जात आहे.. त्या विषाचा परिणाम.. काय होउ शकतो.. याचा विचार.. लोकांनी करावा असे मला वाटते.
नाहीतर.. सगळ्या जगाला माहीत आहे... हिटलरच्या सगळ्या लिला बघुनही... इंग्लंडचा तत्कालिन पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन.. जो शांतता प्रिय व युद्ध होणार नाही/ होउ नये.. अश्या आशावादी व गलिबल विचाराच्या असल्यामुळे.. हिटलसारख्या नाझी भस्मासुराचे फावले... व शेवटी.. १ सप्टेंबर , १९३९ च्या झुंजुमुंजुला.. त्याच्या लुफ्तवाफ व पॅंझर तुकड्यांनी जेव्हा पोलंडवर.. उघड उघड हल्ला केला व दुसर्या महायुद्धाची त्याने जेव्हा तोफ डागली.. तोपर्यंत खुप उशीर झाला होता...
पुढे काय झाले ते सगळ्या जगाला माहीत आहे...
पण १ सप्टेंबरच्या बर्याच आधी... हिटलरने पुढे तो काय करणार आहे/ करु शकतो याची ... ऑस्ट्रिया/ हंगेरी/ झेकोस्लोव्हाकिया .. युद्धाशिवाय गिळंकृत करुन...जगाला जाणीव करुन दिली होती... पण चेंबरलेन व बाकीचे जगातील नेते... युद्ध नको/ होउ शकणार नाही/ तसा हिटलरचा मुळीच उद्देश नाही.. असे विचार करत गाफील राहीले.
त्यातुन धडा घेउन.. आपण चेंबरलेनसारखे... शांततेच्या प्रेमाखातीर... गाफील रहावे व अमेरिकेत अस काहीही होणार नाही/ होउ शकणार नाही असे म्हणत.. वेळीच हा अजगर न ओळखायची चुकी करायची की नाही.... हे ज्याने त्याने ठरवावे.
मला मात्र... नेव्हिल चेंबरलेन.. व त्याच्यासारख्या लोकांनी जी शांतता हवी.. युद्ध नको.. या विचारांमधे मश्गुल राहुन... जी चुकी केली..त्या चुकींची पुनरावृत्ती होउ नये असे वाटते.
यात मी लिबरल/ कंझरव्हेटिव्ह आहे याचा प्रश्न नसुन... डोळ्यासमोर...जे दिसत आहे.. त्याचा अभ्यास करुन.. इतिहासाने काय शिकवले याचा विचार करुन.. व त्या इतिहासाचा धडा... सध्या जे काय घडत आहे त्या घटना.. कुठे पॉईंट करतात.. हे मला दाखवायचे आहे.
अंजली.. हा माझा प्रयास म्हणजे.. .. तु म्हणतेस तसे.. सिव्हिल वॉर होउ नये म्हणुन.. माझ्या परीने केलेले काम समज.
ट्रम्पने म्हणे 2012 मध्ये पण
ट्रम्पने म्हणे 2012 मध्ये पण ओबामा जिंकल्यावर revolution चं आवाहन केलं होतं.
https://www.businessinsider.com/donald-trump-twitter-obama-election-rigg...
त्यावेळी त्याला कोणीच सिरियसली घेतलं नव्हतं. पण म्हणजे त्याच्या डोक्यात हे revolution चं खूळ तेव्हापासून आहे.
https://youtu.be/hLyrwIlB8cs
https://youtu.be/hLyrwIlB8cs
ट्रंप सपोर्टर्स उर्फ पॅट्रिअट्स आर्मीने .. पोलिसांचा खुन करुन ..त्यांचा पाडाव करुन.. संपुर्ण कॅपिटल बिल्डींगचा कसा ताबा घेतला.. ते ही .. चिलिंग क्लिप बघुन तुम्हाला दिसेल. या क्लिपमधे या ट्रंप सपोर्टर्सचा राग कश्यावर आहे व यांचा अजेंडा काय आहे हे स्पष्ट दिसुन येइल.
ही क्लिप बघुनही... आम अमेरिकन जनतेमधे.. सगळे आलबेल आहे.. हे जे म्हणु शकतात/ शकतील.. त्यांना सलाम!
हे जरा लांबलचक आहे पण
हे जरा लांबलचक आहे पण रशियाच्या क्रुस्चेव्हने अनेक वर्षांपूर्वी म्हंटल्या मुळे एकदा तर वाचायला हवे. थोडा विचार केला तर कळते की रिपब्लिकन पक्ष कमी अधिक प्रमाणात ख्रुस्चेव्ह चे म्हणणे खरे मानतो. अगदी शिकलेल्या लोकांनाहि असे वाटते की डेमोक्रॅटिक पक्ष या मार्गाने चालला आहे म्हणून त्यांना ट्रंपच्या प्रेमापेक्षा पक्षाचे प्रेम अधिक आहे. ़काहीहि करून डेमोक्रॅट्स च्या हातात सत्ता जाऊ नये, असे त्यांना वाटते.
आता दोन्ही पक्षात अतिरेकीपणा चालू आहे. गरीबांना मदत करावी हे ठीक आहे - पण नुसते पैसेच ओतायचे? त्यांना स्वावलंबी होण्यासाठी काय करावे? कुणालाच माहित नाही
पण मग काय करायचे - कुणालाच कळत नाही. त्यातून स्वार्थ - सत्ता, अधिकाधिक पैसे मिळवण्याची धडपड, शिक्षणाकडे दुर्लक्ष, सायन्स वर अविष्वास या कारणांपुढे कुणि गेट्स सारखे लोक काही करू पहात असतील तर ते सगळे फिक्के पडते.
Khrushchev's Prediction
Remember Khrushchev's Prediction?
THIS WAS HIS ENTIRE QUOTE: A sobering reminder. It's been almost
sixty one years since Russia’s Khrushchev delivered this. Many of
you may not remember his quote or even were alive when Mr. Khrushchev
of the Soviet Union made his remarks to President John F. Kennedy.
Do you remember September 29, 1959 ?
THIS WAS HIS ENTIRE QUOTE :
"Your children's children will live under communism, You Americans are
so gullible. No, you won't accept communism outright; but we will keep
feeding you small doses of socialism until you will finally wake up
and find you already have Communism. We will not have to fight you; We
will so weaken your economy, until you will fall like overripe fruit
into our hands." "The democracy will cease to exist when you take away
from those who are willing to work and give to those who would not."
Remember, socialism leads to Communism. So, how do you create a
Socialistic State?
There are 8 levels of control; read the following recipe:
1) Healthcare - Control healthcare and you control the people.
2) Poverty - Increase the poverty level as high as possible, poor
people are easier to control and will not fight back if you are
providing everything for them.
3) Debt - Increase the debt to an unsustainable level. That wayyou are
able to increase taxes and this will produce more poverty.
4) Gun Control - Remove the ability to defend themselves from the
Government that way you are able to create a police state.
5) Welfare - Take control of every aspect (food, housing, income) of
their lives because that will make them fully dependent on the
government.
6) Education - Take control of what people read and listen to and take
control of what children learn in school.
7) Religion - Remove the belief in God from the Government and schools
because the people need to believe in ONLY the government knowing what
is best for the people.
8) Class Warfare - Divide the people into the wealthy and the
poor. Eliminate the middle class. This will cause more discontent and
it will be easier to tax the wealthy with the support of the poor. A
perfect parallel to the Democrat agenda!!!!!
I remember this very well. He also said "We will bury you".
HOPE YOU’LL PASS THIS ALONG........................................................
Because it looks like his prediction is almost done. Only a few steps left and Biden will take care of them.
बस काय नंद्या? आता मायबोलिपण
बस काय नंद्या? आता मायबोलिपण तुम्हाला टॅब्लॉइड करुन टाकायची आहे का? १९६० मधे... रॉनाल्ड रेगनने ,२ वर्षांपुर्वी.. निकी हेलीने ... व सध्या..मी खाली नमुद करणार असलेल्या.. एक्स्ट्रिम राइट विंग्सच्या फ्रिंज संघटनांनी... व बर्याच रिपब्लिकन लिडर्सनीही.. ख्रुश्चेव्हला ( फॉल्सली).. अॅट्रिब्युट केलेले हे प्रेडिक्शन.. वापरलेले व सर्क्युलेट केलेले आहे.. टु सुट देअर नरेटिव्ह!
पण तुमच्या.... “ आता दोन्ही पक्षात अतिरेकीपणा चालू आहे. गरीबांना मदत करावी हे ठीक आहे - पण नुसते पैसेच ओतायचे? त्यांना स्वावलंबी होण्यासाठी काय करावे? कुणालाच माहित नाही“... या वाक्याशी ५०% सहमत.
मी स्वतःला इंडीपेंडंट .. फिस्कली कंझरव्हेटिव्ह.. लिनिंग टोवर्ड्स.. सोशली लिबरल.. व्होटर समजतो. मी बहुतेक वेळा .. आंधळ्यासारखे.. डाउन बॅलेट... एकाच पक्षाला मत देत नाही.
पण ट्रंप व त्याचे.. आतापर्यंत.. रिपब्लिकन पार्टीच्या.. फ्रिंजवर असलेले .. प्राउड बॉइज, अमेरिकन फ्रिडम पार्टी, निओ नाझी, कु क्लक्स क्लॅन, अमेरिकन फ्रिडम पार्टी, अमेरिकन नाझी पार्टी, आर्यन ब्रदरहुड ऑफ टेक्सास, क्रिएटिव्हिटी अलायन्स, युरो,क्विनॉन, नॅशनल पॉलीसी इन्स्टिट्युट, पॅट्रिअट फ्रंट, व्हाइट अमेरिका आणी व्हाइट आर्यन रझिस्टंस.. यांची लोक... यांनी.. सगळ्या डेमॉक्रेटिक पार्टीला.. त्यांच्या रेशिअल डिव्हर्सिटी प्लॅटफॉर्मला.. वर नंद्याने दिलेल्या .. प्रोपोगांडा फतव्यानेच नव्हे तर .. असंख्य कॉन्स्पिरसी थिअरीज.. सोशल मिडियावर पसरवुन..... सुरुंग लावायचा जो सपाटा गेली ४-५ वर्षे चालवला आहे तो डेंजरस आहे.
आणी त्या कॉन्स्पिरसी थिअरींना एवढे ट्रॅक्शन का मिळाले व मिळत आहे?... त्याचे कारण म्हणजे... ट्रंपने.. सगळी मेनस्ट्रिम मिडिआ कशी फेक आहे.. हे त्यांना सारखे सांगुन.. त्यांना मेनस्ट्रिम मिडिया पासुन खुप लांब नेले आहे.
मग त्यामुळे.. त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेल्या... न्युज व्हॅक्युम मधे.. सोशल मिडियाच्या आधारे.. या वर नमुद केलेल्या .. पुर्वी फ्रिंजवर असलेल्या.. एक्स्ट्रिम ऑर्गनायझेशनना.. आपल्याला हवे असलेले नरेटिव्ह असलेल्या .. कॉन्स्पिरसी थिअरीज व कुठलेही पुरावे नसलेल्या गोष्टी... पसरावयला मार्ग मोकळा झाला व तसे करायला त्यांना एकदम सोप्पे गेले. ( स्वतः ट्रंप.. ओबामा बर्थर थिअरी कॉन्स्पिरसी... २०११ पासुन अॅड्व्होकेट करत होता.. आठ्वतय का?)
या सगळ्याची परीणीती... सध्या अमेरिकेत जे काय चालले आहे त्यात दिसतच आहे.
म्हणुन मी म्हटले .. की अश्या वाइल्ड फायरसारख्या पसरलेल्या वणव्यातुन.. अमेरिकेतल्या या फार मोठ्या वर्गाला.. बाहेर काढणे .. आता महामुष्कील काम आहे.
@ सनव - दुवा रोचक आहे. तेव्हा
@ सनव - दुवा रोचक आहे. तेव्हा इलेक्टोरल कॉलेजला काडीचंही महत्त्व न देणारे ट्रम्पतात्या नंतर त्याचे गोडवे गाऊ लागले होते! पॉप्युलर व्होटबद्दलही तसंच.
भंपकपणा आहे नुसता!
>>>त्यावेळी त्याला कोणीच सिरियसली घेतलं नव्हतं. पण म्हणजे त्याच्या डोक्यात हे revolution चं खूळ तेव्हापासून आहे.
--- अगदी असेच. 'जाने दो, जाने दो, आदमी पिएला है!' म्हणत अनेकांनी दुर्लक्ष केलं. माध्यमांना - मग ती पारंपरिक असोत वा सोशल मीडिया - ट्रम्पतात्यांबद्दलच्या बातम्या म्हणजे हमखास टीआरपी असल्याने, त्यांनीही काणाडोळा केला. परिणाम काय तो दिसतोच आहे!
ह्या खुळचटपणाला रेवोल्यूशन
ह्या खुळचटपणाला रेवोल्यूशन म्हणू नका हो. बाकी चालू दया.
नंद्याशेठ, क्रुश्चेवचं
नंद्याशेठ, क्रुश्चेवचं प्रेडिक्शन इथल्या डेम्सना रुचणार नाहि. वर आलेली मुकुंदची रिअॅक्शनंच अगदि प्रातिनिधीक आहे...
मुकुंद, फिस्कली कंझरवेटिव आणि सोशली लिबरलची सांगड तु कशी घालतोस? कारण सोशल लिबरलिझम करता लागणारं फंडींग आभाळातुन पडत नाहि. ते राबवायला लागणारा गवर्नेमेंट कंट्रोल, स्पेंडींग, हाय टॅक्सेस फिस्कली कंझरवेटिव समीकरणात बसत नाहि. मग हा आक्सिमोरॉन डेम्सच्या फिलॉसॉफित कुठुन आला? राइट बॅलंस वगैरे, असं गुळगुळीत उत्तर नको...
गे लोकांना लग्न करू देणे,
गे लोकांना लग्न करू देणे, महिलांना अॅबोर्शन करू देणे, बंदूक खरेदीसाठी कडक कायदे करणे, ई ई साठी कशाला पैसा लागेल ?
>>...ई ई साठी कशाला पैसा
>>...ई ई साठी कशाला पैसा लागेल ?<<
इल्लीगल इमिग्रेशन राहिलं. सगळी अॅबॉर्शन्स आउट-ऑफ-पॉकेट होतात?
१९५० च्या दशकात गन कंट्रोल हा
१९५० च्या दशकात गन कंट्रोल हा फारसा महत्त्वाचा इश्श्यू नव्हता. (इन फॅक्ट, साठच्या दशकात जेव्हा ब्लॅक पँथर चळवळ जोरात होती, तेव्हा बहुसंख्य जनता गन कंट्रोलच्या समर्थनात आघाडीवर होती. एन आर ए मध्ये सत्तरच्या दशकात माजलेली दुफळी, १९७७ मध्ये झालेलं होस्टाईल टेकओव्हर या नंतर मग हा मुद्दा ऐरणीवर आला.)
त्यामुळे वर दिलेली पोस्ट ही जवळपास राईट-विंगर्सची scare tactics issues wish list वाटते!
थोडा शोध घेतला असता, हे बनावट असल्याचं दिसून येतं. निकी हेली ह्यांनी ह्या जुन्या कॉन्स्पिरसी थिअरीला पुन्हा हवा दिली असं दिसतंय! - https://www.politifact.com/factchecks/2020/oct/09/nikki-haley/no-khrushc...
(Also it fails the smell test!
आपली लाँग टर्म स्ट्रॅटेजी इतक्या उघडपणे कुणी मुरलेला राजकारणी जगाला ओरडून सांगेल, असं वाटत नाही.)
बाकी चालू द्या, पण हेही पहा;
In U.S. politics, the Hyde Amendment is a legislative provision barring the use of federal funds to pay for abortion except to save the life of the woman, or if the pregnancy arises from incest or rape.
राज, एकदम बरोबर.
राज, एकदम बरोबर.
फिस्कली सुद्धा conservative होऊ नये. :))))))
सोशली कॉन्सर्व्हेटिव्ह म्हणजे गोऱ्या पुरुषांशीवाय इतर कोणावरही कसलाही अन्याय होत नाही, असे मानणे.
फिस्कली कंसर्वेटिव्ह म्हणजे गरीब लोकं त्यांच्या चुकीमुळे गरीब आहेत, राहुदेत तशीच. सगळ्यांना फ्री हेल्थकेअर, काय खाऊ आहे का ? हॅ, फार्मा कंपन्या पैसे उकळतायत म्हणून काय झालं, फ्री इकोनॉमी ब्लाब्लाब्ला. उच्चशिक्षण कशाला म्हणे सब्सिडाईझ करायचं ? नाही नाही, मार्केट मधली शिक्षणाची किंमत, तीच खरी किंमत, हा ! डिमांड आणि सप्लाय, वुहू ! सगळा कंट्रोल काढून टाका, साला कन्स्ट्रक्शन सेक्टर मध्ये पण काही रेग्युलेशन ठेऊ नका, बिल्डिंग पडली तर लोकं परत त्या बिल्डर कडे जाणार नाहीत, आणि सगळं सुरळीत होईल, हा.
ह्यातल्या कश्याच्या विरोधात गेला तर काढायला रायफल आहेत म्हंटलं आमच्याकडे ! ऑटोमॅटिक वेपन्स चा विजय असो.
डेमोक्रॅटिक प्रेसिडेंट निवडून
डेमोक्रॅटिक प्रेसिडेंट निवडून आला रे आला की लोकांना फिस्कल कन्झर्व्हेटिझम आठवतो, हे अतिशय गोंडस आहे!
ट्रम्पतात्यांनी गेल्या वर्षी सुमारे पन्नासेक बिलियन्सची फार्म सबसिडी वाटलीच - वर गेल्या सप्टेंबरात विस्कॉन्सिनमधल्या रॅलीत खास त्या राज्यासाठी अॅडिशनल तेरा बिलियन डॉलर्सची सबसिडी जाहीर केली! (ते भाषण बघून मला तर क्षणभर आपण एन टी रामाराव यांच्या रॅलीज तर बघत नाही ना, असा भास झाला!! तोच नाटकीपणा, त्याच लोकानुनयी घोषणा, तीच फ्यामिली मेंबर्सची "सल्लागार" म्हणून जमवलेली मांदियाळी.) इतकं करूनही विस्कॉन्सिन हरले ते हरलेच!
शिवाय २०१८ च्या निवडणुकीच्या आधी, आपले टॅक्स कट्स हे लोकप्रिय ठरत नसून उलट मध्यमवर्गाला फारसा फायदा होत नसल्याने, निवडणुकीत अंगलट येऊ शकतील म्हणून तात्यांनी परस्पर अॅडिशनल मिडल क्लास टॅक्स कट्सची घोषणा केली - बाकी रिपब्लिकनांना याचा पत्ताच नव्हता! म्हणजे हाऊस, सिनेट इ. येडे!!
असो, बाकी ते मेक्सिकोकडून पैसे येणार होते - ते आले का हो? ;))
In U.S. politics, the Hyde
In U.S. politics, the Hyde Amendment is a legislative provision barring the use of federal funds to pay for abortion except to save the life of the woman, or if the pregnancy arises from incest or rape
धन्यवाद ! शिवाय तुम्ही जर खरे फिस्कल कॉंझर्व्हेटिव्ह असाल तर अॅबोर्शनला विरोध करणार नाही.
Pages