विधानसभेत भाजपा विरुद्ध शिवसेना झाल्यास कोण मारेल बाजी?

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 August, 2014 - 16:33

सर्वप्रथम नमूद करू इच्छितो, राजकारणासंबंधी एक्स्पर्ट कॉमेंट देणे हा माझा प्रांत नाही तर उगाच उसना आव आणायचा नाहीये. सध्या आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप वर दोन गटात (खरे तर तीन गटात) पेटलेल्या चर्चेला इथे घेऊन आलोय.

विषय आहे - जर भाजपा आणि शिवसेनेत बिनसले आणि निवडणूकपूर्वी युती तुटली तर निकालात बाजी कोण मारेल?

१) मोदींच्या पुण्याईवर (कर्तुत्वावरही बोलू शकतो) भाजपा सरस ठरेल?
२) बाळासाहेबांच्या महाराष्ट्रात मराठी माणूस आजही शिवसेनेच्या बरोबर उभा राहील?
३) दोघांत भांडण तिसर्‍याचा लाभ, (ज्याची शक्यता फारच कमी दिसतेय सध्या) ?

माझे मत - मी लोकसभेत मोदींना बघून भाजपाच्या पारड्यात टाकले असले तरी विधानसभेत मराठी माणसांचा (म्हणवणारा) प्रादेशिक पक्ष शिवसेनेलाच प्राधान्य देईन. माझ्यामते बहुतांश मराठी माणूस उघडपणे कबूल करो वा न करो ऐनवेळी धनुष्यबाणावरच शिक्का मारून येईल. यात शिवसेनेला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास निकालानंतर पुन्हा युती होऊन ते भाजपाच्या सपोर्टवर सरकार स्थापतील. जेणेकरून केंद्रातील भाजपा सरकारशीही सूत जुळून राहील आणि महाराष्ट्राच्या विकासाला अडथळा येणार नाही.

अर्थात, बाळासाहेबांनतर शिवसेनेने जनतेचा विश्वास बरेपैकी गमावला असूनही दोघांमधील एक पर्याय निवडताना जनता आपले मत शिवसेनेच्या पारड्यात टाकेल. त्यामुळे मोदी यांच्या नावाची कितीही हवा झाली असली तरी भाजपा केवळ दबावतंत्र अवलंबवेल मात्र युती तोडायची हिम्मत ते शेवटपर्यंत दाखवणार नाहीत.

असो, याउपर युती फुटल्यास इतर मित्रपक्ष तसेच मनसे वगैरे काय कोणाशी युती करतील आणि काय नवीन गणिते बनतील यावर जाणकारांनी आपली मते मांडली तर त्यातील काही मुद्दे मला आमच्या ग्रूपवर टाकून राजकीय चर्चेत कच्चा लिंबू समजल्या जाणार्‍या माझ्या स्वताचा भाव वधारता येईल.

आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< बाकी, जनतेने दोनपैकी एका सेनेच्या हाती नारळ दिला तर बरे होईल. >>

नका हो असं काहीतरी लिहू. एकवेळ माकडाच्या हाती कोलीत परवडलं पण हे नको...
मागे एकदा ह्या दोन्ही वानरसेनांमध्ये राडा झाला होता, तेव्हा ते सर्वजण नेमके मंदिराजवळ होते. झालं.. त्यांनी एकमेकांवर नारळ फेकायला सुरुवात केली. अनेक मर्कटांसोबत येणार्‍या जाणार्‍या इतर नागरिकांची देखील टाळकी फुटली.

तेव्हा नारळ नकोच शालच बरी (किंवा शालजोडीतले जास्त चांगले).

हो पण 'सत्ता आता आपलीच' ह्या खात्रीनंतर एकदम 'पुन्हा पाच वर्ष अपोझिशन'' ची रिअ‍ॅलिटी ह्यामध्ये जी दरी तयार झालीये ती कुठल्याही कौतुकाने भरून निघणार नाहीये.

कॉग्रेसची जातीयवादी नोट फॉर वोट पॉलिसी, राष्ट्रवादीचे मराठा /आरक्षण कार्ड, सेनेचा मराठी अस्मितेचा मुद्दा, आणि मनसेचे मराठीचा कैवार घेणारी परप्रांतियावरची अरेरावी असे सगळे हुकमी अस्त्र मोदी/शहा फॅक्टर आणि भाजपच्या थोड्याफार विकासाच्या गप्पा ह्यापुढे आजिबातंच निष्रभ झाल्यासारखे वाटत आहेत.

ईथून पुढे फक्त विकास एके विकास आणि सुशासन हाच मुद्दा असावा असा पायंडा पडला तर चांगलंच आहे.

फडणावीस आणि मुंडे नक्कीच प्रॉमिसिंग वाटत आहेत.

<< ईथून पुढे फक्त विकास एके विकास आणि सुशासन हाच मुद्दा असावा असा पायंडा पडला तर चांगलंच आहे.>> मोठ्या चमत्काराची अपेक्षा नसली तरी ह्या एकाच आशेने देश मोदी व भाजपाकडे पहात असावा. पूर्वग्रह न बाळगतां बघूंया हा पायंडा पाडण्यात ते किती यशस्वी होतात तें !

रॉबीनहूड
मी कुठल्याही पक्षाचे समर्थन करत नाही आहे व माझा कुठल्याही पक्षाशी कोणताही संबंध नाही इतकेच नव्हे तर राजकारण हा माझ्यासाठी सर्वात शेवट्चा आवडीचा विषय आहे .पण जर का तुम्हाला काही खटकले असल्यास मी माफी मागते.

माझ्या मते स्वताच्या पैशातुन लोकांसाठी काम करतात ते खुप थोर असतात पण आजच्या भ्रष्ट राजकारणात लोकांचाच पैसा लोकांसाठी (विकासासाठी) वापरणारे नेते किती असतात ? तरी पण तुम्ही जास्त जाणकार आहात तुमच्या
प्रतीक्रिया माझ्यासाठी मह्त्वाच्या आहेत.धन्यवाद.

सिनि,
ते त्यांनी त्यांचे जनरल मत व्यक्त केले. आपण मनाला लाऊन घेऊ नका.

खरे तर इथे दोन्ही मते आपापल्या जागी योग्य आहेत. जे निवडून आलेल्या नेत्यांचे कर्तव्यच आहे त्याचे कौतुक कसले, आणि तळे राखील तो पाणी चाखेल या नात्याने ते त्याचा मोबदलाही वसूल करतातच. पण आजची स्थिती बघता जिथे कित्येक भ्रष्ट असेच आहेत जे काम न करता नुसतीच त्यांना खा खा सुटली आहे, ते पाहता कोणी काम करत असेल तर तो नक्कीच उजवा.

राजकारण हा आपला शेवटचा आवडीचा विषय असला तरी तो नावडीचा होऊ नये, आपलाच काय, कोणाही सुजाण नागरीकाचा तो तसा होऊ नये म्हणून मी हे मध्येच माझे नाक खुपसले Happy

सिनी , ऋन्मेष म्हनतो ते बरोबर आहे ते जनरलच स्टेटमेन्ट होते. तुम्हाला उद्देशून तर मुळीच नव्हते. आणि इथे माबो वर माफी मागायची नसते. दोन 'देणे' आणि दोन 'घेणे' हे इथले तत्व आहे ::फिदी:

इथेही दोन "टपल्या" घेणे हा अर्थ मी माझ्यासाठी घेते.इतर अर्थ ज्यांना घ्यायचे आहेत त्यांनी घ्या. Proud Happy

<< इथेही .... इतर अर्थ ज्यांना घ्यायचे आहेत त्यांनी घ्या. >> सिनी, मला इथली जाणवलेली सगळ्यात मोठ्ठी गंमत म्हणजे इथे कुणीही कांहींही अर्थाने लिहीलं व कुणीही त्याचा कांहींही अर्थ घेतला तरीही त्यामुळे बाहेरच्या जगात मात्र कांहींही अनर्थ घडण्याची शक्यता अजिबात नसते !! मग काय हरकत आहे इथं खेळातलीं प्लास्टिकची पिस्तुलं एकमेकांच्या डोक्यावर टेकवायला !! Wink

भाऊ::फिदी:

<< सगळे सरले आता हा धागा गुंडाळा ! >> थांबा !
घाई करुं नका. आत्तांची ताजी खबर-
" भाजपचं सरकार वाचवण्याचा मक्ता आम्ही घेतलेला नाहीं. हें सरकार फार काळ टीकणार नाही. आपण निवडणूकीच्या तयारीला लागलं पाहिजे " - रायगडमधल्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबीरात पवारसाहेब;
" भाजपचं हें सरकार शिवसेना पडूं देणार नाही ! " - संजय राऊत, शिवसेना, यांची प्रतिक्रिया !

नक्की या भांडणात कोण जिंकलेय हे सांगणे कठीणच झालेय..
ना सेना सत्तेत येत आहे ना भाजपाला सत्तेचा आनंद उचलता येतोय, तिसर्‍याचा लाभ म्हटले तरी पाठिंबा देऊनच, त्यातही सेना-भाजपा एक झाले तर राष्ट्रवादीचा पाठिंबा शून्य किंमतीचा याचीही पवारसाहेबांना भिती असणारच.. सर्वांचेच जीव टांगणीला.. कोणीच नाही बाजी मारली.. महाराष्टृ तेवढा हरला Sad

राष्ट्रवादीचा पाठिंबा शून्य किंमतीचा याचीही पवारसाहेबांना भिती असणारच..
<<
<<
म्हणुन त्यांनी आतापासुन फिल्डींग लावायला सुरवात केलीय. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळावे म्हणुन त्यांनी भाजपला पाठींबा दिला होता आणि आता काय म्हणतायत ते पहा.

शिवसेना आणि भाजप एकत्र आले असते तर राज्याला स्थिर सरकार मिळाले असते. मात्र तसं घडलेलं नाही. पुढच्या सहा महिन्यानंतरही जर ही परिस्थिती कायम राहिली तर पुन्हा निवडणुका घेण्याची वेळ येऊ शकते, असे धक्कादायक विधान ज्यांच्या भरवशावर भाजप सरकार स्थापन झाले आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

भाजपचं सरकार वाचवण्याचा मक्ता आम्ही घेतलेला नाहीं. हें सरकार फार काळ टीकणार नाही. आपण निवडणूकीच्या तयारीला लागलं पाहिजे " - रायगडमधल्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबीरात पवारसाहेब;
" भाजपचं हें सरकार शिवसेना पडूं देणार नाही ! " - संजय राऊत, शिवसेना, यांची प्रतिक्रिया !

>>> म्हणजे खांदेकरी बदलणार तर. प्रेत खाली पडू द्यायचे नाही एव्हडेच ना? मोबदला पडेल पण , सांगून ठेवतंय भाऊ ! ::फिदी:

<< असे धक्कादायक विधान....... त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. >> आतां, ' शरद पवार यानी असे विधान केले आहे' म्हटलं तरी पुरे; त्यांच्या विधानाला 'धक्कादायक' हें विशेषण लावण्याची गरजच रहात नाही, अशी परिस्थिती आहे सध्यां !! Wink
कालच शिवाजी पार्कवर पवार व संजय राऊत बराच वेळ अगदीं खाजगीत एकमेकांशीं बोलताना टीव्हीवर दिसले. चेहर्‍यांवरून तसं वाटलं नाहीं तरीही ते बाळासाहेबांच्या आठवणीनाच उजाळा देत असणं शक्य आहे ! Wink

शिवसेनाच 'दादा'; भाजपचे ‘विमान’ जमिनीवर!
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/BJP-flop-...

देशभरात मोदी लाटेचा प्रभाव कायम असून, त्या लाटेवर लोकसभा विधानसभेपाठोपाठ पालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीतही मुसंडी मारू हा भाजपचा भ्रमाचा भोपळा गुरूवारी फुटला. नवी मुंबई महापालिकेसह अंबरनाथ- बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे 'विमान' बऱ्यापैकी जमिनीवर आले असून, ठाणे जिल्ह्यात शिवसेनाच 'मोठा भाऊ' असल्याचे सिध्द झाले. या तिन्ही ठिकाणी १६३ जागा लढविणाऱ्या शिवसेनेने ८८ जागांवर विजय नोंदवला. तर, १४२ ठिकाणी रिंगणात उतरलेल्या भाजपच्या पदरात अवघ्या ३६ जागा पडल्या आहेत.

माझी पहिली post politics varachi ani radaa pahila. Fidi Fidi
Maja aali vachun. ॠ हूशार आहेत. हे आतातरी पटेल. ::-D
Fakt he liha nehami ((+786 +om +cross
)) garaj asel tevha ha. Smit

pan garaj padate ha khara apamaan माणुसकीचा. Angry

https://www.loksatta.com/maharashtra-news/mri-machine-purchased-by-munic...

नगर : सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्चून महापालिकेने खरेदी केलेले ‘एमआरआय’ मशीन गेल्या सहा महिन्यांपासून चक्क सावेडीतील भाजीमंडईच्या आवारात, उघडय़ावर बेवारस अवस्थेत वापराविना पडून आहे. मनपाच्या अधिका?ऱ्यांनी हे मशीन कोठे आहे याची माहिती देण्यास टाळाटाळ केली होती परंतु शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या मशीनचा शोध लावला. ते भाजीमंडईत ताडपत्रीखाली झाकून ठेवलेले आढळले.

या खळबळजनक घटनेकडे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी लक्ष वेधले आहे. करोना काळात नगरकरांपुढे बडेजाव मिरवणाऱ्या महापौर व आयुक्तांचे करायचे काय, असा संतप्त सवाल शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख जाधव यांनी विचारला आहे.

महाराष्ट्रात पुढच्या निवडणुकीत सुद्धा BJP maharashtra मध्ये सत्तेवर येवुच शकत नाही.
आणि केंद्रात BJP ची ही शेवटची सत्ता असेल परत कधीच bjp केंद्रात सत्ता बनवू शकणार नाही. अगदी हिंदू चा पण विश्वास घात करून अदानी आणि अंबानी साठी च bjp वाले सरकार चालवत आहेत.

भाजप्यांचं एक बरं असतं.. ५-१० वर्षं सत्ता मिळाली की २०-२५ वर्षं तोंड काळं करुन बसतात.. त्यानंतर पुढच्या पिढीत विखार कालवून ५-१० वर्षं सत्ता मिळवतात. यांच्या स्वतःच्या पिढ्या कधीच राजकारणात येत नाहीत कारण त्यांना ते कष्ट झेपणारे नसतात. त्यामुळे भाजप्यांकडे भरपूर वेळ असतो अन त्या फावल्या वेळात दुसर्‍यांनी कष्टाने निर्माण केलेल्या पिढ्यांच्या डोक्यात विखार भिनवायचा षंढ निरुद्योग हे आजन्म ब्रम्हचारी राहून करतात. Proud

महाराष्ट्रात पुढच्या निवडणुकीत सुद्धा BJP maharashtra मध्ये सत्तेवर येवुच शकत नाही.
आणि केंद्रात BJP ची ही शेवटची सत्ता असेल परत कधीच bjp केंद्रात सत्ता बनवू शकणार नाही. अगदी हिंदू चा पण विश्वास घात करून अदानी आणि अंबानी साठी च bjp वाले सरकार चालवत आहेत.
नवीन Submitted by Hemant 33 on 17 January, 2021 - 21:49
--

तुमचा पोपटांचा बिझनेस आहे का ?
भविष्य सांगण्याचा तुमचा रेट काय आहे ?

Pages

Back to top