Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47
घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
याच वर्गातली अशी फायनॅन्शिअली
याच वर्गातली अशी फायनॅन्शिअली व शैक्षणिक द्रुष्ट्या मागासलेली लोक.. .. रिलिजिअसली कन्झरव्हेटिव्ह.. इव्हॅजिलिकल ख्रिश्चन लोक..मग क्विनॉन सारख्या ग्रुपमधे सहज सामील होतात व त्यांच्या क्विक्झॉटिक विचारांमधे सहज बिलिव्ह करतात. त्यांना त्यांच्या सगळ्या प्रॉब्लेम्सचे कारण बाहेर.. “ कशात तरी “ आहे.. त्यांच्यात नाही.. असच नेहमी वाटत असते. देअर प्रॉब्लेम्स आर नॉट बिकॉज ऑफ देअर इनॅबीलीटी टु अॅडॅप्ट टु द चेंजिंग टाइम्स.. बट बिकॉज ऑफ लिबरल डेमॉक्रॅट्स पॉलिसीज.. व्हिच फेव्हर अदर नेशन्स रादर दॅन देम.
>>>>>>>>>
ह्याची भारतीय आवृत्ती:
याच वर्गातली अशी फायनॅन्शिअली व शैक्षणिक द्रुष्ट्या मागासलेली लोक.. .. रिलिजिअसली कन्झरव्हेटिव्ह.. उच्चवर्णीय हिंदु..मग xxx सारख्या ग्रुपमधे सहज सामील होतात व त्यांच्या क्विक्झॉटिक विचारांमधे सहज बिलिव्ह करतात. त्यांना त्यांच्या सगळ्या प्रॉब्लेम्सचे कारण बाहेर.. “ कशात तरी “ आहे.. त्यांच्यात नाही.. असच नेहमी वाटत असते. देअर प्रॉब्लेम्स आर नॉट बिकॉज ऑफ देअर इनॅबीलीटी टु अॅडॅप्ट टु द चेंजिंग टाइम्स.. बट बिकॉज ऑफ लिबरल डेमॉक्रॅटीक पॉलिसीज.. व्हिच फेव्हर अदर रिलीजन/कास्ट रादर दॅन देम!
ह्याची भारतीय आवृत्ती:
ह्याची भारतीय आवृत्ती:
नंदन, आर्टिकलच्या दुव्यासाठी
नंदन, आर्टिकलच्या दुव्यासाठी धन्यवाद.
मुकुंद,
डॉक्युमेंटरी बघेन. तुम्ही म्हटले आहे तशी कष्टकरी जनता आमच्या अवतीभवती आहे. एकेकाळी हायस्कूल पास नसले तरीही अरेरावी करुन घरातली सगळीच मंडळी युनियनवाले जॉब करत. कार मार्केट जपानने खाल्ल्याने त्या क्षेत्रातल्या युनियन जॉब्जना कात्री लागली. जोडीला बदलत्या तंत्रज्ञानामुळे हायस्कूल पास हे पुरेसे राहीले नाही. या कष्टकरी मंडळींशी संवाद साधत रहाणे, एलिमेंटरी-मिडलस्कूल पासून मुलांना मेंटरिंग करणे असे केल्यास खूप फरक पडतो. सोशालिझमला शिव्या देताना ते स्वतः कसे सोशल सेफ्टी नेटवर्क म्हणून असलेल्या अनेक प्रोग्रॅम्सचे लाभधारक आहेत हे त्यांना कळत नाही. समजावून सांगितले की विचारात पडतात.
h1 b वाले जॉब्ज म्हणजे नक्की काय हे देखील त्यांना कळत नाही. आयटीतले जॉब ही तर अजूनच दुरची गोष्ट. मी जेव्हा त्यांना सांगितले की माझ्या नवर्याचे मास्टर्स पूर्ण झाल्यावर त्याला जो पहिला जॉब मिळाला तो h1 b प्रकारात, मी स्वतः देखील त्याच कॅटेगरीत पण आयटीत जॉब करायला २५-२६ वर्षांपूर्वी आले, तर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. ट्रंपच्या बायकोचा मॉडेलिंगचा जॉब देखील h1 b कॅटेगरीतच होता हे सांगितल्यावर त्यांचे चेहरे फोटो काढण्यालायक झाले. अगदी गेल्या ऑक्टोबरमधे देखील ही मंडळी ट्रंपमुळे जॉब मिळतील म्हणून आशावादी होती, तसे बोलून दाखवत होती. ग्राउंड रिअॅलिटी समजावून सांगितल्यावर त्यातले १०% लोकं काय केले तर यातुन बाहेर पडू म्हणून विचारु लागले बाकीचे ट्रंपभरोसे होते.
स्वतःसाठी आणि मुलाबाळांसाठी चांगले आयुष्य सगळ्यांनाच हवे आहे मात्र ते कसे मिळवायचे याचे मार्गदर्शन नसते. या लोकांना भरकटवायचे काम गेली अनेक वर्षे सुरु आहे. मात्र दुसर्या बाजूने संवाद साधला, योग्य मार्गदर्शन मिळाले की विचारात फरक पडतो. म्हणूनच मी वरती लिहेले की रिपब्लिकन, डेमोक्रॅट, इंडिपेंडंट्स कुणीही असा, खूप काम करावे लागणार आहे.
मुकुंद, इंटरेस्टिंग! युट्यूब
मुकुंद, इंटरेस्टिंग! युट्यूब लिंक नक्की बघते.
स्वाती ताई, सध्याच्या ground reality चं उत्तम वर्णन.
भारतात असे dillusioned लोकं प्रत्येक वर्गात सापडतील पण सुदैवाने त्यांना मेजॉरीटी मिळत नाही कारण अंतर्गत फटी अनंत असल्याने त्यांची मोट एकत्र बांधणे हे फार कठीण आहे!
राजकारण आणि समाजकारणात भारतीय माणसं अधिक चाणाक्ष आणि स्वार्थी आहेत हेमावैम. प्रत्येक जण नीती-अनीती/ खरं-खोटं यापेक्षा आपल्या हिताचा विचार करून वागतो. वीर दास म्हणतो तसं we don't choose winners, we abandon the loser! त्यामुळे काही राज्यांमध्ये जसा अमेरिकन मतदार टेकन फॉर ग्रांटेड असतो (यातला निवडणूक प्रक्रियेतला फरक लक्षात घेऊन देखील) तसा भारतात कुठेच असू शकत नाही.
ट्रंपच्या किंवा कोणाच्याही विधानांमधली सत्यासत्यता पडताळून पाहण्याचा सुजाणपणा जोवर अमेरिकन नागरिकांमध्ये निर्माण होत नाही तोवर काही मूलभूत बदल घडणे कठीण आहे.
मुकुंद तू लिहिलेल्या वर्गाचे
मुकुंद तू लिहिलेल्या वर्गाचे समजू शकतो पण शिकले सवरलेले नि डोक्याने विचार करू ठेवणारे पण पाठिंबा देतात त्यांचे कारण कसे देणार ? हा वर्गही तेव्हढाच मोठा आहे. ह्यांनाही फक्त पक्षाबद्दल लॉयल्टी ह्या क्षुद्र कारणा पुढे जाता येत नसेल तर खरच कठीण आहे.
स्वाती.. तु म्हणतेस ते खरे
स्वाती.. तु म्हणतेस ते खरे आहे.. १९७० ची पिढी .. हायस्कुल डिप्लोमावर.. युनिअन जॉब असल्याच्या बळावर.. अरेरावी करत.. मध्यमवर्गीय जिवन जगु शकत होती.. पण त्यांच्या मुलाबाळांची पिढी.. मात्र.. आइ वडिलांएवढेच शिक्षण असल्यास.. एकदम गरीबीत लोटली गेली.. हे ट्रान्झिशन कसे झाले हे त्यांच्या अल्पमतिला कळणे जड गेले/ जात आहे.
पण अमेरिकेत या अश्या वर्गाला.. अज्ञानाच्या खाइतुन बाहेर काढणे फार मोठे मुष्किलीचे काम आहे.
त्याचे कारण म्हणजे... या लोकांचे सामान्यज्ञान इतके कमी आहे की जगात जिओपोलिटिकली व विज्ञानात काय प्रगती व उलथापालथ झाली आहे याचा यांना थोडासुद्धा मागमुस नाही. या वर्गातल्या( व तसही.. इन जनरल अमेरिकेत..)... अॅव्हेरेज जोच्या सामान्यज्ञानाची भरारी..त्याच्या काउंटी किंवा सिटिमधे काय चालले आहे.. किंवा... फार तर फार.. त्याच्या राज्यामधे.. काय चालले आहे.. इथपर्यंतच असते. ग्लोबल इकॉनॉमी मधे काय चालले आहे.. त्यात आपण पुढे जायला काय करायला हवे..असले विचार.. यांना शिवत सुद्धा नाहीत.
आपल्या सिटीची फुटबॉल किंवा बेसबॉल किंवा बास्केटबॉल टीम कसे खेळत आहे.. यातच यांचा सगळा रिकामा वेळ जात असतो.
असे जगाचे अज्ञान व बेताचे शिक्षण.. यात तुम्ही जर अतिशय कंझरव्हेटिव्ह इव्हॅन्जिलिकल ख्रिश्चन फिलॉसॉफी अॅड केलीत.. (की जी.. विज्ञानाला शत्रु मानते.. त्याचे कारण विज्ञान सांगते की पृथ्वी सपाट नसुन गोल आहे.. पण बायबल सांगते की पृथ्वी सपाट आहे, विज्ञान सांगते की मानवाची प्राण्यांपासुन उत्क्रांती झाली आहे.. तर बायबल सांगते.. माणसाला देवाने डायरेक्ट माणुस बनवला आहे..). .... तर एक डेडली काँबीनेशन तयार होते.. अशी माणसे मग विज्ञानाला आपला शत्रु मानतात... मग अशी माणसे.. पँडेमिक वगैरे.. जे शास्त्रज्ञ सांगत आहेत.. त्याच्यावर बिलकुल विश्वास ठेवत नाहीत.. किंवा शास्त्रज्ञ( उदा. डॉक्टर फाउची) जे मास्क व व्हॅक्सिन बद्दल सांगतात.. त्यावर बिलकुल विश्वास ठेवत नाहीत. इतकच काय... ज्या अॅपल स्मार्ट फोनचा उपयोग करुन.. ज्या ट्विटर कंपनीचा उपयोग करुन ते ६ जानेवारीला त्यांचा कॅपिटल बिल्डींगवरचा हल्ला ते लाइव्ह स्ट्रिम करत होते... त्याच अॅपल व ट्विटर कंपनीवर.. हीच लोक टिकेचा भडिमार करत होती की ता कंपनी कश्या वाइट आहेत... एवढी तर यांची आकलनशक्ती!
हीच अमेरिकेतली विज्ञान विरोधी माणसे.. मग विज्ञानावर विश्वास नसल्यामुळे .. अमेरिका चंद्रावर गेली ही गोष्ट .. मानत नाहीत व तो एक स्टंट व होक्स होता अस म्हणतात. हीच माणस कॅन्सासमधे.. शाळेमधे... आजही डार्विनचा उत्क्रांतीवाद.. यांना मान्य नसल्यामुळे शाळेत शिकवत नाहीत...( अमेरिकेत.. २१ व्या शतकात.. आजच्या घडीला.. शाळेत मुलांना .. डार्विनचा उत्क्रांतीवाद शिकवत नाहीत हे वाचुन कित्येकांना शॉक बसु शकतो.. पण ही वस्तुस्थिती आहे!)
तर अश्या या .. आर्थिक द्रुष्ट्या मागासलेल्या...विज्ञानविरोधी असलेल्या रिलिजिअसली कंझरव्हेटिव्ह.. इव्हॅन्जिलिकल ख्रिश्चन असलेल्या वर्गाला.. वर स्वाती म्हणाली तसे.. एवढेसुद्धा कळत नाही की.. ज्या सोशल प्रोग्राम्सबद्दल यांना.. ट्रंपसारखे एलिट रिपब्लिकन लिडर्स.. सोशलिझन.. सोशलिझम.. म्हणुन.. घाबरवत आहेत.. ते प्रोग्रॅम .. याच लोकांना उपयोगी पडत आहेत!
या लोकांचे अमेरिकन कॉन्स्टिट्युशनचे ज्ञान.. फक्त पहिल्या व दुसर्या अमेंडमेंट पर्यंतच आहे... १:फ्रिडम ऑफ स्पिच अँड.. २: राइट टु बेअर आर्म्स! त्याच्यापलिकडे यांची झेप जाउ शकत नाही.
म्हणुन मग.. नुसते गन कंट्रोल अस जरा जरी म्हटल की या लोकांची तळपायाची आग यांच्या मस्तकात जाते पण...१३ वे अमेंडमेंट.. अॅबोलिशमेंट ऑफ स्लेव्हरी ( म्हणजेच ब्लॅक लाइव्ह्स मॅटर) व १४ वे अमेंडमेंट.. सेक्शन सी... नो इलेक्टेड ऑफिसर शॅल इंगेज इन एन्सरेक्शन ऑर रिबेलिअन...( जे ६ जानेवारीला ट्रंपने केले)... हे यांच्या खिजगणतीतही नसतात!
तर असा हा वर्ग .. रिपब्लिकन पार्टिच्या बेसमधे..संख्येने गेली कित्येक वर्षे .. वाढत चालला आहे.
मेन्स्ट्रिम रिपब्लिकन पक्ष.. जो मुख्यतः.. कमी टॅक्सेस, छोटे गव्हरमेंट, सेल्फ रिलायंस, स्ट्राँग मिलिटरी.. या गोष्टी मानतो.. . त्या पक्षात आता.. वर सांगीतलेल्या वर्गाची संख्या खुप आहे.
म्हणुन मग या वर्गाला खुष करायला .. त्यांना जे ऐकायला आवडते.. तेच ट्रंप बोलतो.. व आता ट्रंप हरल्यावर... जॉश हॉली व टेड क्रुझ.. ज्यांना पुढच्या इलेक्शनमधे प्रेसिडेंट व्हायचे आहे...ते या वर्गाचे व्होट मिळावे म्हणुन ट्रंप जे बोलत होता व करत होता( की डेमोक्रॅट्सनी इलेक्शन फ्रॉड करुन जिंकली..) तेच करत आहेत.
तर अस सगळ चित्र असल्यामुळे.. स्वाती.. तु म्हणतेस ते बरोबर आहे... की.. अमेरिकेत जे डिप डिव्हिजन झालेले आहे.. ते हील करायला.. खुप कष्ट करायला लागणार आहे...
बायडन विल सुन रिअलाइझ.. व्हॉट अ मेस ही हॅज लँडेड इन्टु!.. इट्स इझी टु से .. आय वाँट टु युनाइट द कंट्री.. बट इट्स गोइंग टु बी व्हेरी हार्ड टु डु! व्हेरी बेस्ट ऑफ लक प्रेसिडेंट बायडन!
मुकुंद , तुमच्या सगळ्याच
मुकुंद , तुमच्या सगळ्याच पोस्ट एकदम मुद्देसूद आणि खरं चित्र दाखवण्याऱ्या आहेत.
सोशालिझमला शिव्या देताना ते
सोशालिझमला शिव्या देताना ते स्वतः कसे सोशल सेफ्टी नेटवर्क म्हणून असलेल्या अनेक प्रोग्रॅम्सचे लाभधारक आहेत हे त्यांना कळत नाही. समजावून सांगितले की विचारात पडतात. >>>
स्वाती२ - तुमच्यासारखाच किस्सा पाहिला होता. आता ट्रम्प आला आहे, तो सर्वांना सरळ करेल, गरीब लोकांना मदत करेल छाप समज अनेकांचे होते. त्यात वृध्द लोकांना घरपोच जेवण पुरवण्याच्या एका कार्यक्रमात काम करणारी एक व्यक्तीही होती. त्याच वेळेस असल्या कार्यक्रमांचे फंडिंग बंद होणार म्हणून चर्चा सुरू होती. या प्रोग्रॅमचेही नाव होते त्यात. त्या व्यक्तीला त्याचा पत्ताही नव्हता. (तो कार्यक्रम तेव्हा वाचला कट्स मधून, पण ते नंतर)
बघतय का कोणी.. लाइव्ह..
बघतय का कोणी.. लाइव्ह.. अमेरिकेतल्या संसदेत चालु असलेला.. अमेंड्मेंट २५.. चा डिबेट... ट्रंपला इंपिच करायचा डिबेट...
अमेरिकेत .. २ पक्षात असलेली प्रचंड.. दरी.. अॅट फुल डिसप्ले.. इन द युनायटेड स्टेट्स कॅपिटल बिल्डींग.. जे बाहेर चालले आहे.. त्याचेच रिफ्लेक्शन.. काँग्रेसमधे .. २ पक्षाच्या .. इलेक्टेड.. ऑफिशिअल्स मधे दिसत आहे.. एकच माणुस ( ट्रंप).. एका पक्षाला देवदुत वाटतो.. तर तोच माणुस दुसर्या पक्षाला.. यमदुत वाटतो... .. तसच ६ जानेवारी २०२१ चे कॅपिटल वर जे झाले.. ते एका पक्षाला डेमॉक्रेसी अॅट फुल डिसप्ले वाटते .. तर दुसर्या पक्षाला.. ट्रिझन व इनझरेक्शन वाटते... ६ जानेवारीला जी लोक कॅपिटल बिल्डींग मधे घुसली होती... ती एका पक्षाला पॅट्रिअट्स वाटतात.. तर दुसर्या पक्षाला.. तिच लोक मर्डरर्स अँग्री मॉब वाटतो...
कस काय बायडन देश युनायटेड करणार.. तुम्हीच सांगा..
अमेरिकन डेमॉक्रेसी.. इन डेथ स्पायरल...
कोणी हुलुवर... २४ हवर्स.. जानेवारी ६.. हवर बाय हवर ही डॉक्युमेंटरी पाहीली का? ती बघताना.. माझी छाती धडधडत होती.. आय कॅन् जस्ट इमॅजिन .. त्या सगळ्या काँग्रेसमन व सेनेटर्स.. यांना तेव्हा कसे वाटत असेल? त्यांचा जिव घ्यायला जेव्हा तो ट्रंप सपोर्टर्सचा.. अँग्री मॉब... सेनेट व हाउस फ्लोअरवर... त्या सगळ्यांना शोधत होता.
२०२१ मधे.. अमेरिकन कॅपिटल बिल्डींगच्या बाहेर.. नुस उभा केला जाइल .. व .. कॅपीटल बिल्डिंगमधे..... सेनेट व हाउस फ्लोअरवर.. १८६१ च्या सिव्हिल वॉरच्या वेळचा.. कॉन्फिडरेट फ्लॅग फडकवला जाइल.. असे कोणाला स्वप्नात तरी वाटले होते का?
<सोशालिझमला शिव्या देताना ते
<सोशालिझमला शिव्या देताना ते स्वतः कसे सोशल सेफ्टी नेटवर्क म्हणून असलेल्या अनेक प्रोग्रॅम्सचे लाभधारक आहेत हे त्यांना कळत नाही. समजावून सांगितले की विचारात पडतात >
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं.
गरीब लोकांना उद्दीपित करून
गरीब लोकांना उद्दीपित करून त्यांच्या साठी चांगल्या असलेल्या गोष्टींना त्यांनाच कंठशोष करून विरोध करायला लावणे (हेल्थकेअर ईईई. जे सँडर्स ऑफर करतो ते.) हे पाहिलं की फार वाईट वाटत. हे सगळं sjw, सोशलिझम, कम्युनिझम, फेमिनिस्ट्स, लिबरल्स , फुरोगामी अशी बुजगावणी उभी करूनच केले जाते. त्यात डेव्ह रुबिन, मायलो युनाप्युलस, चार्ली कर्क, बेन शापिरो वैगेरे लोकं हातभार लावतात.
डेमोक्रॅटिक पक्षात प्रोग्रेसिव्ह आणि इतर अशी अंतर्गत लढाई आहे, म्हणजेच, पॉलिसी डिफरन्स. सँडर्स, aoc वि. इतर
ट्रम्प ज्यांना नावे ठेवत लढतोय, ट्रम्प च कारटं ज्यांचे करियर संपवायच्या धमक्या देतं, ह्यातली बरीचशी लोकं ट्रम्पचे आयडियोलॉजिकल आणि पॉलिसी पातळीवर विरोधक नाहीच आहेत. फक्त ट्रम्प दादागिरी करून मीच प्रेसिडेंट म्हणू पाहतोय ते ह्यांच्यासाठी जरा जास्तच झालं, इतकंच. जर ट्रम्प जिंकला असता तर हे सगळे सुखाने नांदले असतेच. म्हणजे, रिपब्लिकन पक्षातली अंतर्गत लढाई "ट्रम्प तुमचा देव आहे की नाही", अश्या प्रकारची आहे.
जर ट्रम्प जिंकला असता तर हे
जर ट्रम्प जिंकला असता तर हे सगळे सुखाने नांदले असतेच. म्हणजे, रिपब्लिकन पक्षातली अंतर्गत लढाई "ट्रम्प तुमचा देव आहे की नाही", अश्या प्रकारची आहे.>>>+१
असामी.. तुझ्या प्रश्नाचे
असामी.. तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला माझ्या सकाळच्या .. १०:२४ च्या पोस्टमधे सापडले असेल.
पण नसेल सापडले तर.. परत एकदा सांगतो...
रिपब्लिकन..पक्ष गेल्या २० वर्षात... अमुलाग्र बदलला आहे. सध्याचा या पक्षातला मोठा फॅक्शन.... प्राउड बॉइज, क्लु क्लक्स क्लॅन, क्विनॉन.. वगैरे... फॅक्शन...२० वर्षापुर्वी.. मार्जिनल म्हणुन समजला जात होता. तेव्हा मोस्टली.. रिपब्लिकन पक्ष एवढा राइटला झुकलेला नव्हता.
पण.. २००८ च्या टी पार्टी रेव्होल्युशन पासुन.. दिवसागणीक... या पार्टीमधे.. जे आधी या पार्टीच्या मार्जिनवर.. पेरीफेरीवर.. होते.. त्यांना रिपब्लिकन पार्टीच्या मेनस्ट्रिम टेबलवर बसायला जागा मिळाली.
फास्ट फॉरवर्ड.. २०१५-२०१६... ट्रंप एंटर्स द पिक्चर.. ही स्किलफुली हार्नेस्ड द इन्क्रिजिंग पॉवर ऑफ धिस पेरिफेरल एलिमेंट्स ऑफ द रिपब्लिकन पार्टी... सच अॅज कु क्लक्स क्लान, प्राउड बॉइज , क्विनॉन, बिलिव्हर्स इन सदर्न कॉन्फिडरेट पॉवर... अँड.. मी व स्वातीने .. वर मेन्शन केलेला डिसएंचांटेड ग्रुप...
आणी ट्रंप जेव्हा या मोठ्या संख्येने रिपब्लिकन पार्टीत सामावलेल्या या नविन फॅक्शनच्या व्होट्सच्या बळावर.. अनपेक्षितपणे ... हिलरीला हरवुन...इलेक्शन जिंकला.. तेव्हा... प्रथमच... या आतापर्यंत फ्रींज वर असलेल्या या सगळ्या ग्रुप्सना... ट्रंपच्या रुपाने. व्हाइट हाउसमधे हक्काचा... प्रेसिडेंट मिळाला .. हे त्यांच्या साठी ...वॉज अ बिग डिल!
ट्रंपने मग पहिल्या दिवसापासुन या लोकांना डोक्यावर घेतले.. त्यांचे लांगुलचालन केले.. मग शार्लट्सव्हिलला.. जेव्हा क्लु क्लक्स कॅन ने दंगल केली... तेव्हा.. त्यांना.. ते व्हेरी गुड पिपल आहेत म्हणुन त्यांच्या दंगलीचे समर्थन केले.
हे सगळे करुन... या रिपब्लिकन पक्षाच्या नविन मोठ्या फॅक्शनला ट्रंप ने त्याचे लॉयल फॉलोअर्स करुन टाकले..
म्हणजे गेल्या ३-४ वर्षात झाले काय.. की .. ट्रॅडिशनल कंझरव्हेटिव्ह रिपब्लिकन.. हा फॅक्शन.. रिपब्लिकन पार्टीत कमी कमी होत गेला.... व रिपब्लिकन पार्टी.. ही परत एकदा हायजॅक झाली.. व या वेळेला...ट्रंप पार्टी झाली.
हा सगळा ट्रंपचा चमत्कार बघुन... रिपब्लिकन पार्टीतल्या... बर्याच जणांना .. त्यांचे पॉलिटिकल फ्युचर... या वाढत्या नंबरच्या ट्रंप फॅक्शन वर अवलंबुन आहे असे प्रकर्षाने वाटु लागले. मग ते बहुतेक सगळे.. ट्रंप बँडवॅगन वर चढु लागले.
म्हणुनच मग.. सेनेटर टेड क्रुझ.. जो २०१५-२०१६ मधे ट्रंपचा कट्टर शत्रु होता व ज्याच्या बायकोला.. ट्रंपने... आपली मॉडेल व सुंदर असलेल्या बायकोसमोर ( मिलॅनिया).. तुझी बायको कशी कुरुप माकडीण दिसते असे म्हटले होते..... तरीही.. त्याच टेड क्रुझने..२०१७ मधे ..१८० डिग्री घुमजाव केला व तो ट्रंपचा नंबर १ भक्त व पाय चाटणारा झाला..... तिच गोष्ट... लिंडसे ग्रॅहॅम बद्दल... त्याचाही.. १८० डिग्री घुमजाव...
म्हणतात ना.. पॉलिटिक्स मेक्स स्ट्रेंज बेड्फेलोज!
आता ट्रॅडिशनल रिपब्लिकन पक्ष.. इकडे आड.. तिकडे.. विहीर अश्या कचाट्यात सापडला आहे.. ट्रंप सारखा .. प्रक्षोभक जिनी राक्षस.. बाटलीतुन बाहेर पडला आहे...आता परत त्याला...त्याच्या मोठ्या बेसला न दुखवता.. परत बाटलीत कसे टाकायचे या विवंचनेत तो पक्ष पडला आहे. किंबहुना.. मी तर म्हणेन.. कसा परत ट्रंपला बाटलीत टाकायचा की तसाच बाहेर ठेवुन.. त्याच्या बेसचा.. पार्टी फायद्यासाठी उपयोग करुन घ्यायचा हाच विचार.. पार्टीतली हुशार माणसे करत असतील.
ट्रंप रिपब्लिकन पार्टी परत एकदा ट्रॅडिशनल रिपब्लिकन पार्टी होइल असे मला तरी वाटत नाही. दे हॅव्ह नो चॉइस बट टु डिफेंड हिम अॅट एनी कॉस्ट... फॉर देअर पॉलिटिकल सर्व्हायवल!
म्हणुन मग.. सगळ्याच रिपब्लिकन पार्टीचा त्याला सपोर्ट... एज्युकेटेड ऑर अनएज्युकेटेड...
https://www.cnn.com/2021/01
https://www.cnn.com/2021/01/12/opinions/battle-against-anti-democratic-e...
https://in.news.yahoo.com
https://in.news.yahoo.com/trump-impeachment-capitol-building-soldiers-16...
मुकुंद, माझा प्रश्न
मुकुंद, माझा प्रश्न ट्रॅडिशनल रिपब्लिकन लोकांबद्दलच होता. तू म्हणतोस तसा तो कमी झाला असे मला वाटत नाही तर २०१६ मधे हिलरी ला विरोध ह्या तत्वावर एकत्र झाला असे मला वाटते. ह्यावेळी एकंदर तात्याचा सवळा गोंधळ नि विशेषतः त्याने ज्या प्रकारे कोव्हीड हातळले ते बघून डिसिल्ञुजन्ड झाला असावा. पण पक्षाची लॉयल्टी ह्या कारणामूळे नोव्हेंबर मधे तो तात्याच्या बाजूलाच राहिला. इथवर मी समजू शकतो.
पण त्यापुढे कॅपिटल हिल चा प्रकार झालावरचा पाठिंबा माझ्या आकलनापलीकडचा आहे. मी वर एक पोस्ट ची लिंक दिली आहे त्यातले ७०% रिपब्लिकन लोक जे ह्या प्रकाराकडे सहानुभूतीने बघताहेत त्यातला निम्मा वर्ग तरी हा ट्रॅडिशनल कंसर्व्हेटीव्ह रिपब्लिकन वर्ग असावा असे मी धरला तरी हा आकडा फार मोठा आहे. एक पार्टी बद्दल अॅफिनीटी (मूळ तत्वांना कधीच फाटा दिलाय ह्याबद्दल काहीच दुमत नाही) ह्यापलीकडे त्यांचा तात्याला पाठींबा देणे समजत नाही. हा प्रकार मला धोकादायक वाटतो. (कारण नंदन नि तू म्हटल्याप्रमाणे फॅसिस्ट जर्मनीच्या वेळची आठवण करून देतोय. )
असामीच्या वरच्या पोस्टशी सहमत
असामीच्या वरच्या पोस्टशी सहमत.
आज इथे कुण्णीच नाही अजून. तुका म्हणॅ उरलो इंम्पॉ पुरता
---------/\____________________
पोस्ट परत टाकतोय कारण त्यात
पोस्ट परत टाकतोय कारण त्यात खूप ढोबळ चूका आहेत व्याकरणाच्या - बॅक्स्पेस वापरताना शब्द रानोमाळ हरवतात.
मुकुंद, माझा प्रश्न ट्रॅडिशनल रिपब्लिकन लोकांबद्दलच होता. तू म्हणतोस तसे त्यांचे प्रमाण खुप कमी झालेय असे मला वाटत नाही . हा गट "२०१६ मधे हिलरी ला विरोध" ह्या तत्वावर एकत्र झाला होता. ह्यावेळी एकंदर तात्याचा सवळा गोंधळ (नि विशेषतः त्याने ज्या प्रकारे कोव्हीड हाताळले ता) बघून डिसिल्ञुजन्ड झाला असावा. पण पक्षाची लॉयल्टी ह्या कारणामूळे नोव्हेंबर मधे तो तात्याच्या बाजूलाच राहिला. इथवर त्यांचे वागणे मी समजू शकतो.
पण त्यापुढे कॅपिटल हिल चा प्रकार झाल्यावरही तात्याला पाठिंबा माझ्या आकलनापलीकडचा आहे. मी वर एक पोस्ट ची लिंक दिली आहे त्यातले ७०% रिपब्लिकन लोक जे ह्या प्रकाराकडे सहानुभूतीने बघताहेत त्यातला "निम्मा वर्ग तरी हा ट्रॅडिशनल कंसर्व्हेटीव्ह रिपब्लिकन वर्ग असावा" असे मी धरला तरी हा आकडा फार मोठा आहे. एक पार्टी बद्दल अॅफिनीटी (मूळ तत्वांना कधीच फाटा दिलाय ह्याबद्दल काहीच दुमत नाही) ह्यापलीकडे त्यांचा तात्याला पाठींबा देणे समजत नाही. हा प्रकार मला धोकादायक वाटतो. (कारण नंदन नि तू म्हटल्याप्रमाणे फॅसिस्ट जर्मनीच्या वेळची आठवण करून देतोय. )
हा सगळा फियास्को एकदा नजरेआड
हा सगळा फियास्को एकदा नजरेआड झाला, की भक्त बिळातून बाहेर येतील आणि संधी मिळताच, ट्रम्प असेना का लुच्चालफंगा, गुंड प्रवृत्तीचा, खोटारडा, रेसिस्ट इ. इ.; पण त्याने चीनला वेसण घातली की नाही!, अशी पंचारती ओवाळणं सुरू करतील!
त्या पार्श्वभूमीवर रुपर्ट मर्डॉकच्या 'वॉल स्ट्रीट जर्नल'मधला आजचा लेख बोलका आहे:
https://www.wsj.com/articles/chinas-economy-powers-ahead-while-the-rest-...
मुळात कोव्हिड सुरु व्हायच्या आधी, यूएस-चीन ह्यांच्यातलं ट्रेड डेफिसिट वाढलेलंच होतं. आता कोव्हिडोत्तर वर्षभरातही अशीच परिस्थिती दिसते आहे:
In the U.S., the Trump administration’s tariffs on China were meant to address imbalances in the global economy and level the playing field between the two countries.
Instead, China is expected for 2020 to record the biggest surplus in its current account —the broadest measure of a country’s transactions with the rest of the world—in history for any country, according to Capital Economics, a research firm.
------
For 2020, China’s economy is expected to account for 16.8% of global gross domestic product, adjusted for inflation, according to forecasts by Moody’s Analytics. That’s up from 14.2% in 2016, before the U.S. and China entered a trade war. The U.S. is expected to make up 22.2%, virtually unchanged from 22.3% in 2016.
तात्यांनी बोंबाबोंब केली, मिडवेष्टातल्या शेतकर्यांची मतं मिळवण्यासाठी त्यांना अनुदानाच्या खिरापती वाटल्या - पण टीपीपी सारख्या चिनी वर्चस्वावर दूरगामी परिणाम करू शकणार्या करारातून, केवळ ओबामाला नाक कापून अपशकुन करावा म्हणून, अमेरिकेला बाहेर काढलं.
याच नतद्रष्टपणाचं 'इराण अणुकरार' मोडीत काढणं, हे दुसरं उदाहरण!
या आततायीपणाला किती भरघोस यश मिळालंय, हे दाखवणारी हीदेखील आजचीच बातमी:
Iran Is Assembling Gear Able to Produce Key Nuclear-Weapons Material
(दुवा: https://www.wsj.com/articles/iran-is-assembling-gear-able-to-produce-mat...)
असामी.. मी सांगीतले आहे ना ..
असामी.. मी सांगीतले आहे ना .. ट्रॅडिशनल रिपब्लिकन्सची परिस्थीती.. इकडे आड .. तिकडे विहीर अशी झाली आहे... त्यांना माहीत आहे.. सध्याच्या डेमॉग्राफिक वाटणीमधे.. अॅज सच.. दे कॅन बेअरली स्क्विक आउट द विन इन द इलेक्शन्स... दे नो व्हेरी वेल... दे कांट अॅफर्ड टु लुझ धिस साइझेबल चंक ऑफ ट्रंप लव्हर्स...अॅज व्होटर्स... सो .. व्हॉट अदर ऑप्शन दे हॅव्ह अदर दॅन टु गो अलाँग विथ दिज ब्लेटंट ट्रंप लाइज अँड शिनॅनिगन्स?
हे असे सगळे होइल.. व या थराला ट्रंप जाइल.. याची कल्पना रिपब्लिकन पार्टीला असलीच पाहीजे. आय स्मेल्ड ट्रबल.. जेव्हा त्याची बसमधली टेप बाहेर आली होती.... ज्यात तो बोस्ट करत होता की बायकांचे प्रायव्हेट पार्ट्स तो कसे ग्रॅब करतो... आणी ते ऐकुनही जेव्हा इव्हँजिलिकल ख्रिश्चन्सना.. व रिपब्लिकन पार्टी ही फॅमिली व्हॅल्यु जपणारी पार्टी आहे असे बोस्ट करणार्या.. ट्रॅडिशनल रिपब्लिकन्सना ...काहीच ऑब्जेक्शन नव्हते!
हे आपले सगळे असले वागणे रिपब्लिकन पार्टी खपवुन घेते व डिफेंड करतेय हे बघुन मग ट्रंप एकदम चेकाळला.. तो राजाच झाला आहे असे त्याला वाटु लागले . आपण कुठल्याही थराला जाउन... काहीही खोटे- नाटे बोलु शकतो... आपले टॅक्स लपवु शकतो, कोणालाही काहीही नावे ठेवु शकतो.. व हे सगळे करुनही.. आपली पार्टी आपल्याला डिफेंड करतेय... हे बघुन.. दिवसागणिक.. त्याचा धिटपणा वाढत गेला. आपण जे काही बोलतो, करतो त्याला काहीच कॉन्सिक्वेन्स नाही याची त्याला खात्री होत गेली.
मग या सगळ्याचा कळस म्हणजे.. निवडणुक हरुनही.. कुठलाही पुरावा नसताना.. प्रत्येक कोर्टाने त्याचे खोटे दावे फेटाळुनही.. तो त्याच्या सपोर्टर्सना.. खोटे सांगत राहीला.. की निवडणुकच कशी फ्रॉड होती व ८५ मिलिअन्स लोक .. ज्यांनी बायडनला मत दिले... ती मते फेकुन देउन .. व्हाइस प्रेसिडेंट पेन्सने त्यालाच कसे विजयी घोषीत करावे अश्या मागण्या तो करु लागला.
आणी पेन्सने तसे नाही केले तर त्याला फायरींग स्क्वाडपुढे उभे केले पाहीजे असे त्याच्या लॉयरने त्याच्या सपोर्टर्सना सांगण्यापर्यंत याची मजल गेली! मग म्हणुन ६जानेवारीला.. ट्रंपचे सगळे सपोर्टर्स.. हँग माइक पेन्स.. हँग माइक पेन्स.. अश्या गर्जना करत.. कॅपिटल बिल्डिंगमधे .. पेन्सचा खुन करायला..पेन्सला शोधत फिरत होते.
जगाच्या इतिहासात असे प्रथमच झाले असेल की .. प्रेसिडेंटच्या स्वतःच्याच लॉयरने.. व्हाइस प्रेसिडेंटचा खुन करायला.. प्रेसिडेंटच्या सपोर्टर्सना सांगीतले असेल! सिंपली अनबिलिव्हेबल!
आता ट्रंप स्वतःलाच पार्डन करुन घ्यायच्या मागे आहे.
अमेरिकन फाउंडींग फादर्सनी म्हटले होते की.. धिस होल अमेरिकन कॉन्स्टिट्युशन अँड अमेरिकन प्रेसिडेंशिअल इलेक्शन प्रॉसेस इज अझ्युमिंग.. दॅट... अमेरिकन पिपल विल इलेक्ट अ प्रेसिडेंट.. व्हु हॅज अ हाय मॉरल कॅरेक्टर... बट .. दे प्रॉबेबली नेव्हर इमॅजिन्ड.. इन देअर वाइल्डेस्ट ड्रिम्स... दॅट .. वन डे .. देअर विल बि अ प्रेसिडेंट लाइक ट्रंप.. हु वुइ ऑल नो.. हॅज सच अ हाय मॉरल कॅरॅक्टर!
प्रेसिडेंटला इम्युनिटी ,
प्रेसिडेंटला इम्युनिटी , त्याने पार्डन करणे वगैरे घटना दुरुस्ती करुन बंद करावे अशी वेळ आलेय.
इस्लामिक टेररीझमशी लढता लढता एकीकडे फार राईट कॉनझर्वेटिव्ज , व्हाईट पॉवरवाले आणि इवांजेलिकल्स याची अतिशय अभद्र अशी यूती होत आहे याचा खरे तर काहींना विसर पडला आणि काहींनी सोईस्कर दुर्लक्ष केले. टी पार्टी, बर्थर कॉन्ट्रावर्सी वगैरे नुसती सुरुवात होती. रिपब्लीकन्सना तेव्हा हे सगळे सोईचे होते. पुढे ट्रंपने हाच बेस लक्षात घेवून आपली चाल खेळली. ट्रंपची महत्वाकांक्षा काही नवी नाही, ८७ सालापासून येनकेन प्रकाराने प्रेसिंडेट या पदाभोवती ती आहे. प्रेसिंडेंट होण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही ते माझा वीपी चॉईस म्हणून ओपरा पर्यंत बरेच काही बोलून झाले आहे. सत्तेवर आल्यावर ओबामाची लिगसी मोडून काढायची हा ध्यास घेवून पार्टी ट्रंपपाठी उभी राहीली. याच काळात उघड रेसिस्ट असणे म्हणजे पॉवरफुल हे नवे समिकरणही आले. द्वेशाचे राजकारण करत धोकादायक वोटर बेस वाढवत नेल्यावर त्याची परीणिती ही अशी झाली त्यात नवल ते काय.
इतर वेळी दहशतवादाबद्द्ल बोलताना समाजातील मॉडरेट वॅल्यूज असलेले लोक गप्प का, ते का करेज दाखवत नाहीत हा प्रश्न असतो आता हाच प्रश्न रिपब्लिकन पार्टी समोर आहे. ते ट्रंप सारख्या हुकूमशहा सोबत आहेत की प्रसंगी निवडणूक हरुन देशाशी , घटनेशी एकनिष्ठ रहाणार आणि डोमेस्टिक टेररिझमला हरवायला लढणार ? दुसर्या बाजूने डेमोक्रॅट्स ग्राउंड रियालिटी लक्षात घेवून सामान्य लोकांत उतरुन मत परीवर्तनासाठी काय प्रयत्न करणार आहेत ? लोकं खोट्या प्रचारावर विश्वास कसे ठेवतात असे म्हणून त्यांना अडाणी, मूर्ख असे लेबल लावणे खूप सोपे आहे. त्यांना शहाणे करायचे तर पार्टी पलिकडे जावून सहृदयतेने कामच करावे लागणार आहे.
मुकुंद अरे मी
मुकुंद अरे मी कंसर्व्हेटिव्ह ट्रॅडिशनल रिपब्लिकन्स नेत्यांबद्दल नाही तर कंसर्व्हेटिव्ह ट्रॅडिशनल रिपब्लिकन्स मतदारांबद्दल बोलत होतो. डॅलस ला इथे बरेच जण आहेत असे आणि प्रत्येक जण ह्याचे कारण पक्षाप्रती निष्ठा ह्यापलीकडे देऊ शकत नाहिये. तात्या त्यांना व्यक्तिशः आवडत नाही , बहुतेक जण धर्म नि राजकारण ह्यांची सांगड (रीड : अॅबॉर्शन ,वुमेन'स राईत) ह्याबद्दल फारसे उत्साही नाहित. पण डेम्स म्हटले की 'नको रे बाबा' असा स्टान्स येतो एकदम जो त्यांनाही जस्टीफाय करता येत नाही. सध्या डेम्स = सोशलीस्म ह्याचे भूत डोक्यावर चढलेले आहेच.
प्रेसिडेंटला इम्युनिटी , त्याने पार्डन करणे वगैरे घटना दुरुस्ती करुन बंद करावे अशी वेळ आलेय. >> +१ कमी त कमी त्याला सिनेट नि हऑस दोघांचीही मान्यता हवी असेही बंधन हवेय. ह्याचा जास्तच दुरुपयोग होतोय. मला वाटते हे फक्त आधी झालेल्या नि फेडरल क्रिमिनल क्राईम पुरतेच मर्यादीत आहे. स्टेट पर्स्यू करू शकते नि सिव्हिल क्राईम्स ह्यात अंतर्भूत नाहित.
हा सगळा फियास्को एकदा नजरेआड
हा सगळा फियास्को एकदा नजरेआड झाला, की भक्त बिळातून बाहेर येतील आणि संधी मिळताच, ट्रम्प असेना का लुच्चालफंगा, गुंड प्रवृत्तीचा, खोटारडा, रेसिस्ट इ. इ.; पण त्याने चीनला वेसण घातली की नाही!, अशी पंचारती ओवाळणं सुरू करतील! >> +१ नंदन. ह्या आरती मधे "टॅक्स कट्स्मुळे ईकॉनॉमी सिम्यूलेट होऊन डेफिसीट कसा बघता बघता बघता होणार (तात्याने आठ वर्स्।आत शून्य होणार अशी दर्पोक्ती केली होती २०१६ मधे) " हे निरांजन लावायचे राहिलेय. तरी बर, ह्या वेळच्या टॅक्स कट्स् नंतर कोव्हीड सुरू होईतो, डेफीसीट्स वाढण्याचा रेट ओबामा च्या आठ वर्षांमधल्या काळाएव्हढाच राहीला आहे. (कोव्ही ड नंतर मोठीच उडी घेतली आहे) इहे सगळॅ एकॉनॉमी फूल गीयर मधे असतानाची गोष्ट आहे. ह्यातून "(निव्वळ आयसोलेशन मधे बघितल्यामूळे) टॅक्स कट्स् म्हणजे वाढती ईकॉनॉमी" हा जीओपीचा मुद्दा किती बोगस आहे हे परत एकदा सिद्ध होते. बुशने एकदा केले नि स्टेबल जिनियस तात्याने परत सिद्ध केले आहे.
चीनला वेसण? चीनला वेसण? (हे
चीनला वेसण? चीनला वेसण? (हे मास्तरांच्या 'आमची एसटी?' या चालीवर वाचावं.)
वेसण कसली? चीननेच पूर्ण जगाला कोविदरुपी वेसण घातली. चीन मध्ये नेमकं काय सुरू आहे हे ट्रम्पला एक वर्षांपूर्वी हेरगिरी करून काढून घेता आलं असतं तर कदाचित कोविदचा इतका जगभर प्रसार झाला नसता. हेही लीडर ऑफ द फ्री वर्ल्ड(खिक!) चं अपयश, intelligence failure आहे.
असामी.. जसा राजा तशी प्रजा!..
असामी.. जसा राजा तशी प्रजा!.. ज्या कात्रीत ट्रॅडिशनल रिपब्लिकन लिडर्स सापडले आहेत त्याच कात्रीत ट्रॅडिशनल रिपब्लिकन व्होटर्स सापडले आहेत.. इथल्या दोनच पार्टी असलेल्या सिस्टिममधे त्यांना ट्रंपशिवाय दुसरा ऑप्शनच नव्हता.. जरी पुष्कळशे अॅज अ पर्सन/ ह्युमन बिंग.. हेटेड दॅट गाय!
तु जे म्हणालास ...की सध्या ...डेमॉक्रॅट्स म्हणजे सोशलिस्ट/ कम्युनिस्ट आहेत... आणी हे भुत ...कडव्या राइट विंगच्या टीव्हि, न्युजपेपर, रेडिओ स्टेशन्स, ब्लॉग्स, पंडित्स.. या सगळ्यांकडुन.. सगळ्या रिपब्लिकन बेसच्या मानगुटीवर बसवुन त्यांचे ब्रेनवॉशिंग चालले आहे.. ते अगदी बरोब्बर बोललास! जर दोन दिवस हे सगळे न्युज आउटलेट ऐकले / वाचले/ बघीतले .. तर कोणाला वाटेल.. डेमॉक्रेटिक पार्टीचे लिडर चक शुमर व नॅन्सी पलोसी म्हणजे.. चायना व रशियाने पाठ्वलेले अंडरकव्हर एजंट्स आहेत व त्यांचा अजेंडा म्हणजे अमेरिकेतल्या माणसांचा सर्वनाश करुन.. अमेरिकेला दुसरी रशिया व दुसर्या चायनामधे बदलवुन टाकायचे आहे! नो वंडर.. गेल्या आठवड्यातला.. ट्रंप सपोर्टर्सचा मॉब.. नॅन्सी पलोसीचा खुन करायला आला होता.
स्वाती.. तु अगदी बरोब्बर बोललीस.. हा पार्डनींग चा फिआस्को बंद केलाच पाहीने.. स्वतःला पार्डन काय... स्वतःच्या क्रिमिनल व्याह्याला पार्डन काय.. स्वतःचे मित्र.. ज्यांना कोर्टाने सजा दिलेली आहे अश्या..रॉड बोगोलोव्हिच व रॉजर स्टोनपासुन ते मायकेल फिन पर्यंत... सगळ्यांना पार्डन! इट्स नॉट ओन्ली अ जोक.. बट इट्स अ मॉकरी ऑफ अमेरिकन ज्युडिशिअल सिस्टीम..
आणी एक मला खटकणारी गोष्ट म्हणजे.. नोव्हेंबर २ च्या इलेक्शनपासुन.. २१ जानेवारीचा इनॉगरेशन डे... ८० दिवसांचा लेम डक सेशन... टु लाँग!
खर म्हणजे जुन्या व नविन अॅडमिनिस्ट्रेशनमधे स्मुथ ट्रांसफर ऑफ पॉवर व्हावी म्हणुन हा काळ वापरायचा असतो.. पण ट्रंपने या सगळ्या काळाचा दुरुपयोग करुन... हा काळ.. .. निवडणुक कशी फ्रॉड होती... अश्या खोट्या प्रचारात घालवली. तेही.. रोज ३-४ हजार अमेरिकेन्स.. कोव्हिड-१९ ने मरत आहेत हे माहीत असुनही! त्याने इनकमींग बायडन अॅडमिनिस्ट्रेशनला स्मुथ ट्रांझिशनसाठी अजिबात मदत केली नाही. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच अशी हिंसक ट्रांसफर ऑफ पॉवर होणार आहे...
भरतने जे अमेरिकन कॅपिटल बिल्डिंगमधले... शेकडो अमेरिकन सैनीक.. जमीनीवर झोपलेले फोटो वर दाखवले आहेत ते बघुन कोण म्हणेल की अमेरिका इज अ डेमॉक्रेटिक कंट्री? अशी दृष्ये आपल्याला एखाद्या बनाना रिपब्लिक किंवा हुकुमशाही असलेल्या देशामधे दिसतात.
होपफुली .. हे राजधानीत आलेले १५००० अमेरिकन सैनिक.. ट्रंपचे जे हजारो आर्म्ड सपोर्टर्स .. २० तारखेला कॅपिटल बिल्डींगवर हल्ला करायला येणार आहेत.. त्यांना .. गेल्या आठवड्यातल्या कॅपिटल पोलिसांपेक्षा कडवी लढत देतील. आजच एफ बी आय ने सांगीतले आहे की २० तारखेला...ट्रंप सपोर्टर्स ..कॅपिटल बिल्डींगवर हल्ला करताना आय- ई-डी चा वापर करणार आहेत.
मागच्या आठवड्यात कॅपिटल पोलिसांनी नांगीच टाकली.. काही कॅपिटल पोलिस तर ट्रंप मॉबला व्यव्स्थित वाट करुन देत होते तर काही पोलीस मॉबबरोबर सेल्फी काढत होते.
तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण
तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण अमेरिकेत एक वॉर्म इकॉनॉमी नावाची कन्सेप्ट आहे. जेव्हा एखादा अमेरिकन जन्माला येतो तेव्हा त्याला सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध होतात. समजा 100 अमेरिकन जन्माला आले तर शंभर सोयी या वॉर्म इकॉनॉमी तर्फे स्थापन होतात. आता समजा शंभरपैकी 50 लोकांना तात्पुरत्या या सुविधा नको असतील तर त्यांच्या 50 सुविधा दुसऱ्या नवीन 50 लोकांना असाईन होतात. आता ते नको असलेल्या 50 जणांना परत सुविधा हव्या असतील तर टोटल 150 सुविधा या वॉर्म इकॉनॉमीमध्ये तयार होतात. आता हे सगळं एकाच वॉर्म इकॉनॉमी मधून होत आहे त्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्था जरा डळमळीत झाले. ट्रम्प आता ही वॉर्म इकॉनॉमी वाढवणार आहेत जेणेकरून भार कमी होऊन जनजीवन पुन्हा व्यवस्थित सुरू व्हावं.
https://www.yahoo.com/news
https://www.yahoo.com/news/protect-myself-case-civil-war-180219516.html
राज, फारेंड... व इतर.. जे सिव्हिल वॉर होण्याची शक्यता डाउनप्ले करत आहेत त्यांच्यासाठी टेलिग्राफ चे हे आर्टिकल बोलके आहे.
मी स्वतः माझ्या आजुबाजुला असंख्य .. दोन्ही पार्टीची माणसे ... असे उघड उघड बोलताना रोज बघतो. दोन्ही बाजुच्या लोकांच्या भाषेत जे व्हिट्रिऑल आहे ते भयानक आहे.
राज, फारेंड... व इतर.. जे
राज, फारेंड... व इतर.. जे सिव्हिल वॉर होण्याची शक्यता डाउनप्ले करत आहेत >> मुकुंद मी तसे काहीच म्हणत नाहीये. आत्ता कोणीच काही सांगू शकत नाही. मी वरच्या पोस्ट्स मधे जे लिहीले ते गेले दोन महिने इलेक्शन फ्रॉडच्या क्लेम्स बद्दल वाचताना जे चित्र दिसले त्याबद्दल लिहीले.
या खालच्या indisputable facts आहेत, माझा ओपिनियन नव्हे
- ३ नोव्हें नंतर वेळोवेळी अनेक रिपब्लिकन्सनी कायदाबाह्य वागून ट्रम्पच्या म्हणण्याला दुजोरा द्यायला विरोध केलेला आहे
- जॉर्जिया मधे गव्हर्नर व सेक्रेटरी ऑफ स्टेट (दोघेही रिपब्लिकन्स) दोन महिने पूर्ण ठामपणे ट्रम्पच्या विरोधात उभे होते. या व अशा अनेक नेत्यांना हे नक्की माहीत असेल की ते करीयर पणाला लावत आहेत. वरून ट्रम्पचा व खालून त्याच्या कट्टर बेसचा दबाव त्यांनी (त्यांच्या जबाबदारीच्या संदर्भात) रोखला आहे.
- अनेक राज्यातले निवडणूक अधिकारी, त्यात काम करणारे असंख्य लोक वैयक्तिक कोणाच्याही बाजूचे असोत, त्यांनी प्रोसेस प्रमाणे काम केलेले आहे
- रिपब्लिकन्सनी नेमलेले, आणि खुद्द ट्रम्पने नेमलेले जजेसही जेव्हा वेळ आली तेव्हा प्रोसेस व नियम वार्यावर सोडून ट्रम्पच्या मागे गेले नाहीत. ते नियमानुसारच वागले.
- ३ नोव्हेंबर पासून होणारी प्रत्येक सरकारी प्रोसेस - ती डेमोक्रॅट प्राबल्य असलेल्या राज्यातील असो वा रिपब्लिकन - किंवा फेडरल- नियमाप्रमाणेच झालेली आहे, बाहेरील सर्व दबाव झुगारून.
इथे मला वेगळेपण दिसले. इतर देशांत जेव्हा लोकशाहीचे चेक्स आणि बॅलन्सेस डावलले जातात तेव्हा इतक्या प्रमाणात लोक त्याविरूद्ध उभे राहिलेले क्वचितच दिसतात. आता हे "पुरेसे" आहे की नाही मला माहीत नाही. पण कसली लोकशाही आणि कसले काय वगैरे कोणी म्हणू लागले की मला हे दिसते.
>>राज, फारेंड... व इतर.. जे
>>राज, फारेंड... व इतर.. जे सिव्हिल वॉर होण्याची शक्यता डाउनप्ले करत आहेत<<
कारण मी, आणि माझासारखे इतर टॅब्लॉय्ड्स, यलो जर्नलिझमला काडिचीहि किंमत देत नाहित...
राज.. ट्रंप स्वतः जे
राज.. ट्रंप स्वतः जे मुक्ताफळे उधळतो.. ते सोडुन बाकी सगळे फेक... फेक फेक... फेक फेक फेक न्युज... हा बचाव जुना झाला.
त्याच्या विरुद्ध जो कोणी बोलेल.. मग ती व्यक्ती असो, न्युज रिपोर्टर असो वा कोणीही असो... ते सगळे फेक हा ट्रंपचा प्रोपोगांडा मानणारे ...७५ मिलिअन्स असंतोषी लोक ..अमेरिकेत आहेत.. हेच सिव्हिल वॉर होण्याचे कारण असेल...
फारेंड.. तु दिलेली उदाहरणे.. तुरळक आहेत...
बट रिड व्हॉट जिज्ञासा सेड अदर डे.. अँड..जिज्ञासा कुड नॉट हॅव्ह सेड एनी बेटर.....
“ फा, सिस्टीममधले लोक खंबीरपणे सत्याच्या आणि कायद्याच्या बाजूने उभे राहिले ही उत्तमच गोष्ट आहे. पण लोकशाहीचा पाया सिस्टीम पेक्षा देखील सर्वसामान्य जनतेत असलेल्या संतोषावर टिकून राहतो. जेव्हा जनतेत असंतोषाची ठिणगी पडते तेव्हा ती लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असते. It's not like there are no systems in place when a coup happens, it's more like the people are against the system in place. And when people are extremely unhappy (= कायदा न जुमानणे, हिंसाचार) with the system the democracy is at risk.”
Pages