कालच केदार जाधव यांच्या चॅनल बद्दल थ्रेड पाहिला आणि मलाही माझ्या नुकत्याच सुरु केलेल्या युट्युब चॅनलबद्दल लिहायचं इन्स्पिरेशन मिळालं!
मायबोलीवर बर्याच जणांना ऑलरेडी माहित असेलच, व्यवसायाने मी मेंदी/बॉडी पेंटिंग अर्टिस्ट आहे आणि काहींना माझी पॅशन फॉर स्टायलिंग्/फॅशनही माहित असेल !
या सगळ्याची सफर माझ्या चॅनलवर , ‘ग्लोरी ऑफ हेना ऑफिशिअयल’ वर पहायला मिळेल !
चॅनल वर अधुन मधुन इंग्लिश व्हिडिओजही येतील पण मुख्यतः मराठी व्हिडिओज असतील .
अत्ता पर्यंत रिलिझ झालेले मराठी व्हिडिओज :
१. खणाची साडी कशी स्टाइल करायची : https://youtu.be/DSa50t10jQE
२. एक बेसिक ग्रे कुर्ता वापरून १० वेगवेगळ्या स्टाइल्स : https://youtu.be/gJG2ihXMTkw
३. स्टे होम लुक स्टायलिश : https://youtu.be/EunTdSlcjns
४. संक्रान्त स्पेशल काळ्या कपड्यांचे स्टायलिंग : https://youtu.be/CM81NMR6IYM
५. काळ्या साडीचे स्टायलिंग पार्ट १ : https://youtu.be/3VHKrvewzeA
6. काळ्या साडीचे स्टायलिंग ( पार्ट २ )
https://youtu.be/QQRYd2YQlRE
पण मुळात माझ्या चॅनलची सुरवात कशी झाली, थॉट प्रोसेस काय होती , याची छोटीशी जर्नी मला इथे शेअर करायला नक्कीच आवडेल !
नावात काय आहे ?
तर माझं चॅनल तसं नावाला मी २०१७ मधे सुरु केलं खरं पण २०२० ची लॉकडाउन फेज येई पर्यन्त मी एकही व्हिडिओ केला नव्हता, माझं इन्स्टाग्रॅम अकाउंट अपडेट ठेवणे एवढेच मला पुरेसे होते !
२०१० मधे लॉस एंजलिसला मुव्ह झाल्या पासून मी मेन्ली एंटरटेन्मेन्ट इंडस्ट्री , म्युझिक इंडस्ङ्री आणि फॅशन इंडस्ट्री रिलेटेड इव्हेंट्स करु लागले आणि माझ्या नावा बरोबरच माझ्या इन्स्टाग्रॅम नावालाही रेकग्निशन मिळालं !
२०१६ मधे मधे मी पॉप सिंगर पियामियाला ‘ग्लॅमर मॅगझिन’ च्या कव्हरपेज साठी आणि इतर बर्याच एडिटोरियल लुक्स साठी मेन्दी काढली आणि माझं ते मेन्दी डिझाइन , माझ्या इन्स्टाग्रॅम चं नावही एकदम व्हायरल झालं .
या नंतर मी इतरही अनेक सेलिब्रिटी इव्हेंट्स केले , त्यात बियॉन्सी, शे मिचेल टोनी ब्रॅक्स्टन, इव्हन रेचल वुड इ. सेलिब्र्टिजच्या मेन्दीला बरच मिडिया रेकग्निशन मिळालं आणि मी दीपाली देशपांडे = ग्लोरी ऑफ हेना असं इक्वेशन बनलं , त्यामुळे मी सगळ्या सोशल मिडिया हॅडल्सना काही विचार न करता हेच नाव दिलं, ‘ग्लोरी ऑफ हेना’ , अर्थात युट्युबलाही !
चॅनलचा श्रीगणेशा
मी ज्या फिल्डमधे काम करते, त्या फिल्ड मधे तुमच्या खर्या नावा आधी लोक इन्स्टाग्रॅम हँडल विचारतात !
तुमचं काम, एक्स्पिरिअन्स, इव्हेंट्स, क्लाएंटेल या सगळ्या गोष्टीं मधे पोटेन्शिअल क्लाएंट्सना इंटरेस्ट असतो आणि ती माहिती लोक इन्स्टाग्रॅमवरच बघतात त्यामुळे अनेक मिनि व्हिडिओज मी फक्त इन्स्टाग्रॅमवरच टाकत होते , युट्युब ऑप्शनच्या बाबतीत मी कधीच फारसा उत्साह दाखवला नाही.
पण २०२० मधे मार्च एंड नंतर सगळी इक्वेशन्सच बदलली !
६ मार्चला मी डिस्नी स्टुडिओ मधे माझा २०२० चा शेवटचा कॉर्पोरेट मेंदी इव्हेंट केला.
डिस्नीनी पहिले देशी अॅनिमेटेड डिटेक्टिव कॅरॅक्टर ‘मीरा , द रॉयल डिटेक्टिव्ह ‘ , इंट्रोड्युस करताना सेलिब्रेशन म्हणून हा कॉर्पोरेट इव्हेंट ठेवला होता.
त्या इव्हेंटला करोना ची भिती /चर्चा नुकतीच सुरु झाली होती , ‘आपल्या लॉस एंजलिस मधे इथे एकही केस नाही, इतकच समाधान लोक व्यक्त करत होते पण एप्रिल सुरु झाला आणि हळुहळु सगळच गंभीर होत गेलं.
माझ्या सारख्या सगळ्याच फ्रीलान्स अर्टिस्ट्सना मोठा ब्रेक घ्यावा लागला, ज्या कामात सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य नाही त्यातून तात्पुरता ब्रेक घेणे हेच शहाणपणाचे होते.
पँडेमिकच्या गंभीर वातावरणात स्वतःला पॉझिटिव आणि बिझी ठेवण्यासाठी अनेक नव्या गोष्टी सुरु केल्या पण फायनली हे पूर्ण वर्ष असच जाणार, ऑल सेलिब्रेशन्स /फेस्टिवल्स आर अबाउट सेलिब्रेटिंग अॅट होम हे रिअलाइझ झाल्यावर फायनली ऑक्टोबरमधे मुहुर्त लागला माझ्या पहिल्या स्टायलिंग युट्युब व्हिडिओला ‘नवरात्री आउटफिट्स‘.
त्यावेळी समजलं कि माझ्या ‘ग्लोरी ऑफ हेना’नावाने अनेकांनी चॅनल्स सुरु केली म्हणून मग मला ‘ग्लोरी ऑफ हेना ऑफिशिअल’ हे अॅड करावं लागलं !
या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स मिळाल्यावर मी माझ्या इतर हॉबीज क्राफ्ट्स, कुकिंग, मेंदी क्रस्फ्ट्स या विषयांनाही चॅनलवर इन्क्लुड केले पण स्टायलिंग व्हिडिओजना , त्यात मराठी स्टायलिंग व्हिडिओजना सर्वात चांगला रिस्पॉन्स मिळाला.
स्टायलिंग व्हिडिओज का ?
जरी या क्षेत्रात फॉर्मल शिक्षण घेतले नसले तरी मी माझ्या इव्हेंट्सच्या निमित्ताने गेले १० वर्ष याच क्षेत्रात वावरते, इंडस्ट्रीतल्या टॉपमोस्ट स्टायलिस्ट्स्/मॉडेल्स/मेकप अर्टिस्ट्सची/हेअर अर्टिस्टची कामं अगदी जवळून बघते , टिम म्हणून अनेक इव्हेंट्सना त्यांच्याबरोबर एकत्रं काम करते आणि शिकते.
याशिवाय लहानपणापासून ही माझी हॉबी/पॅशन आहे, कुठल्याही इव्हेंट्सना जाताना माझ्यासाठी एकच अॅट्रॅक्शन असतं, ते म्हणजे ड्रेसिंग अप्/स्टायलिंग त्यामुळे युट्युबच्या निमित्ताने माझ्या स्टायलिंग टिप्स, मेन्ली इंडो वेस्टर्न फॅशन , माझ्या क्षेत्रातली वेगळी लाइफस्टाइल याबद्दल मराठी ऑडियन्सला सांगणे हा माझा मेन उद्देश असेल !
याचा अर्थ असा नाही कि मी माझ्या मेन प्रोफेशन ‘मेन्दी ‘ बद्दल व्हिडिओज टाकणार नाही, तेही टाकणारच आहे पण त्यासाठी माझे इन्स्टाग्रॅम अकाउंटही आहे !
मच रिक्वेस्टेड ‘ हेना कँडल्स ट्युटोरियल’ व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे : https://youtu.be/9habwefU6Us
तर माझ्या या नव्या अॅडव्हेंचरला तुम्हाला या टॉपिक्स बद्दल आवड असेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि मित्र मैत्रीणींशी शेअर करा !
Glory of Henna Official : https://youtube.com/channel/UCgiWJZMwRX5gnSRSUTbCx9Q
खूप शुभेच्छा. .
खूप शुभेच्छा. .
भार्रीच की !
भार्रीच की !
अभिनंदन आणि शुभेच्छा !
अरे वा! मस्तच!
अरे वा! मस्तच!
खूप शुभेच्छा दिपाली!
खूप शुभेच्छा दिपाली!
तुमचे व्हिडिओ आवडले मला.
डीजे तुझे व्हिडीओज अप्रतिम
डीजे तुझे व्हिडीओज अप्रतिम असतात. फार छान सांगतेस, मला आवडतात. शुभेच्छा.
मस्त व्हिडिओ.. oxidized
मस्त व्हिडिओ.. oxidized jewellery कुठून घेतली?
मस्त तुझा लोगो लेफ्ट साइड
मस्त तुझा लोगो लेफ्ट साइड ला चुकून क्रॉप झालाय का वरच्या इमेज मधे?
डीजे ने तिच्या अचीव्हमेन्ट्स बर्याच अन्डर प्ले करून सांगितल्यात. जिथे कित्येक आर्टिस्ट्स् ना कोणीतरी ओळखी, कॉन्टॅक्ट्स असल्याखेरीज सेलेब्रिटी सर्कल मधे एक साधे काम मिळणे अशक्य असते अशा ठिकाणी तिने तिच्या टॅलेन्ट वर प्रवेश मिळवला आणि यशस्वी झाली. एकेक सेलेब्रिटी क्लायन्ट्स म्हणजे आम्हालाच उत्सुकता जास्त असयाची. सगळ्यात जास्त एक्सायटमेन्ट म्हणाजे तिने साक्षात बियॉन्से ला बेबी शॉवर ची मेन्दी काढली तेव्हा ! अजून एक विनोदी किस्सा म्हणाजे एके काळचा तिचा क्रश जॉन अब्राहम च्या बायकोने तिला हायर केले होते तिच्या वेडिंग रिसेप्शनच्या मेन्दी साठी ! तेव्हा आम्ही फार हसलो होतो, हे म्हणजे बॉलिवुडी सिनेमात प्रेमभंग झालेल्या हिरो ला नायिकेच्या लग्नात पियानोवर गायला बसवतात तसला किस्सा झाला
खूप छान!! शुभेच्छा तुम्हांला!
खूप छान!! शुभेच्छा तुम्हांला!!
मस्त व्हिडिओ आहेत.
मस्त व्हिडिओ आहेत.
खूप शुभेच्छा दिपाली!
बियॉन्सेचं ऐकून जॉड्रॉप झाला
बियॉन्सेचं ऐकून जॉड्रॉप झाला होता. मस्तच आहेत व्हिडिओ! शुभेच्छा.
डीजे ने तिच्या अचीव्हमेन्ट्स
डीजे ने तिच्या अचीव्हमेन्ट्स बर्याच अन्डर प्ले करून सांगितल्यात. जिथे कित्येक आर्टिस्ट्स् ना कोणीतरी ओळखी, कॉन्टॅक्ट्स असल्याखेरीज सेलेब्रिटी सर्कल मधे एक साधे काम मिळणे अशक्य असते अशा ठिकाणी तिने तिच्या टॅलेन्ट वर प्रवेश मिळवला आणि यशस्वी झाली. >>> खरंच कौतुकास्पद आहे.
हे म्हणजे बॉलिवुडी सिनेमात प्रेमभंग झालेल्या हिरो ला नायिकेच्या लग्नात पियानोवर गायला बसवतात तसला किस्सा झाला >>>
हे चॅनल मस्तच आहे.
हे चॅनल मस्तच आहे.
आणि दीपांजली स्वतः पण जवळजवळ मॉडेलच आहे.सुंदर कपडे, गेटप आणि मेकअप.बघून मस्त वाटतं.
डीजे ने तिच्या अचीव्हमेन्ट्स
डीजे ने तिच्या अचीव्हमेन्ट्स बर्याच अन्डर प्ले करून सांगितल्यात. <<< +1000
Beyonce आणि तिच्या सगळ्याच सेलेब स्टोरीजचे युट्यूब व्हिडीओ करायला हवेत तिने खरंतर. विथ स्टायलिंग.
डीजे ने तिच्या अचीव्हमेन्ट्स
डीजे ने तिच्या अचीव्हमेन्ट्स बर्याच अन्डर प्ले करून सांगितल्यात. <<< +1000
Beyonce आणि तिच्या सगळ्याच सेलेब स्टोरीजचे युट्यूब व्हिडीओ करायला हवेत तिने खरंतर. विथ स्टायलिंग.
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
चॅनल फॉलो करते आहे, तो मस्तच सुरू आहे.
>> बॉलिवुडी सिनेमात प्रेमभंग झालेल्या हिरो ला नायिकेच्या लग्नात पियानोवर गायला बसवतात
नवीन चॅनलकरता शुभेच्छा.
नवीन चॅनलकरता शुभेच्छा.
हे म्हणजे बॉलिवुडी सिनेमात
हे म्हणजे बॉलिवुडी सिनेमात प्रेमभंग झालेल्या हिरो ला नायिकेच्या लग्नात पियानोवर गायला बसवतात तसला किस्सा झाला
खूप हसलो ! असो, असा प्रसंग वैर्यावरही येऊ नये !
शुभेच्छा !
खूप शुभेच्छा, डीजे! तुझ्या
खूप शुभेच्छा, डीजे! तुझ्या मेंदी आर्टची तर फॅन आहे मी.
डीजे ने तिच्या अचीव्हमेन्ट्स बर्याच अन्डर प्ले करून सांगितल्यात >>> अगदी अगदी
थँक्स सगळ्यांना !
थँक्स सगळ्यांना !
मैत्रेयीने सांगितलेला जॉन अब्राहमच्या बायकोचा किस्सा विसरलेच होते
तिला जेंव्हा मी सांगितल कि तुझा नवरा मला ‘चांगलाच’ माहितेय, त्याला बघून एकेक काळी डोळ्यात बदामांचा स्क्रीन तयार होत असे , तिला आश्चर्य वाटलं कि लो प्रोफाइल वेडिंग करून इतक्या ठिकाणी न्युज ऑलरेडी आली आहे
ती अमेरिकेत जन्मलेली उच्च शिक्षित मुलगी आहे आणि तिचं करिअर, फायनान्शिअल स्टेटस / फॅमिली बिजनेसेस इ. मधे त्याच्यापेक्षा ती कितीतरी पटींनी पुढे आहे त्यामुळे त्याच्या बॉलिवुड स्टारडमचं ऑब्सेशन नाहीये तिला .
डीजे ने तिच्या अचीव्हमेन्ट्स बर्याच अन्डर प्ले करून सांगितल्यात. <<< +1000
Beyonce आणि तिच्या सगळ्याच सेलेब स्टोरीजचे युट्यूब व्हिडीओ करायला हवेत तिने खरंतर. विथ स्टायलिंग.
थँक्स नी , MT , rmd
खणाच्या साडीचा व्हिडिओ मला
खणाच्या साडीचा व्हिडिओ मला फार आवडला होता आणि ग्रे कुर्ता स्टायलिंग. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, डिज्जे!
खूप च मस्त चॅनल आहे दिपांजली
खूप च मस्त चॅनल आहे दिपांजली तुझं. तुझ्यामुळे मी हिना कँडल करायला घेतली, एक एक करत ५ केल्या आणि त्या सगळ्यांना इतक्या आवडल्या मी आवर्जून तुझी लिंक पाठवली होती की हे बघून केलं म्हणून. तुझे वॉर्डरोब स्टाईलचे विडीओ पण मी फॉलो करते. एखादा खणाचा लूक ट्राय करायची इच्छा आहे बघू .
Beyonce आणि तिच्या सगळ्याच सेलेब स्टोरीजचे युट्यूब व्हिडीओ करायला हवेत तिने खरंतर. विथ स्टायलिंग.>>>>>>>>>>>>>>>> +++११११
नक्की मनावर घे. प्राऊड ऑफ यू #मराठी मुलगी #
वॉव अंजली, मस्तं वाटलं कँदल्स
वॉव अंजली, मस्तं वाटलं कँडल्स ट्राय केल्यास वाचून !
तू केलेल्या कँडल्सचे फोटो टाक किंवा लिंक दे इतर कुठे शेअर केले असतील तर !
मला तुझं चॅनल आवडतं मी
मला तुझं चॅनल आवडतं मी आवर्जून बघते. खणाच्या साडी चा लुक एकदा try करणार आहे
बुकमार्क करून ठेवलंय तुझे
बुकमार्क करून ठेवलंय तुझे चॅनेल, दीपांजली ! नक्की फॉलो करणार.
खणाच्या साडीचा ( परकर-पोलकं लूक विशेष आवडला. )आणि ग्रे कुर्ता वापरून केलेल्या स्टाइल्स ( पहिलाच ब्लॅक टॉपचा ट्राय करणार ) हे दोन व्हिडिओज फार मस्त झालेत. तुझे हॅण्डबॅग्ज/ पर्सेसचे कलेक्शन छान आहे. Pleated Maxi आणि Crinkle Gauze Skirt चे काही व्हिडिओज प्लिज करशील का ?
अभिनंदन आणि शुभेच्छा. खण
अभिनंदन आणि शुभेच्छा. खण साडीचा व्हिडियो उत्कृष्ट झाला आहे.
व्हिडिओज अतिशय आवडले आहेत.
व्हिडिओज अतिशय आवडले आहेत. इंस्टा वर फॉलो केलं आहे आता युट्यूबवर जाऊन subscribe करते.
Proud आणि अभिनंदन
थँक्स मीरा , सनव, राधिका !
थँक्स मीरा , सनव, राधिका !
राधिका,
लाँग स्कर्ट्स नक्की दिसतील , Crinkle Gauze Skirt पर्टिक्युलर्ली सध्या क्लक्शन मधे नाही पण स्प्रिंग सिझनमधे इथे एले च्या फेस्टिवल फॅशनला सुट अशा व्हिडिओज साठी कनसिडर करेन !
डीजे ने तिच्या अचीव्हमेन्ट्स
डीजे ने तिच्या अचीव्हमेन्ट्स बर्याच अन्डर प्ले करून सांगितल्यात. जिथे कित्येक आर्टिस्ट्स् ना कोणीतरी ओळखी, कॉन्टॅक्ट्स असल्याखेरीज सेलेब्रिटी सर्कल मधे एक साधे काम मिळणे अशक्य असते अशा ठिकाणी तिने तिच्या टॅलेन्ट वर प्रवेश मिळवला आणि यशस्वी झाली. >>> खरंच कौतुकास्पद आहे.
हे म्हणजे बॉलिवुडी सिनेमात प्रेमभंग झालेल्या हिरो ला नायिकेच्या लग्नात पियानोवर गायला बसवतात तसला किस्सा झाला >>>
मलाही खणाच्या साडीवाला खूप आवडलाय. नवीन बघायचे राहिलेत..
अप्रतिम कला आहे तुमच्याकडे.
अप्रतिम कला आहे तुमच्याकडे. शुभेच्छा!
थँक्स दीपांजली
थँक्स दीपांजली
विपु बघशील का प्लिज ?
Pages