मायबोलीकर युट्यूबर्स : माझं ‘फॅशन्/स्टायलिंग्/मेंदी/क्राफ्ट्स’ याबद्दल चॅनल , ‘Glory of Henna Official

Submitted by दीपांजली on 7 January, 2021 - 04:30

कालच केदार जाधव यांच्या चॅनल बद्दल थ्रेड पाहिला आणि मलाही माझ्या नुकत्याच सुरु केलेल्या युट्युब चॅनलबद्दल लिहायचं इन्स्पिरेशन मिळालं!
मायबोलीवर बर्याच जणांना ऑलरेडी माहित असेलच, व्यवसायाने मी मेंदी/बॉडी पेंटिंग अर्टिस्ट आहे आणि काहींना माझी पॅशन फॉर स्टायलिंग्/फॅशनही माहित असेल !
या सगळ्याची सफर माझ्या चॅनलवर , ‘ग्लोरी ऑफ हेना ऑफिशिअयल’ वर पहायला मिळेल !
चॅनल वर अधुन मधुन इंग्लिश व्हिडिओजही येतील पण मुख्यतः मराठी व्हिडिओज असतील .
अत्ता पर्यंत रिलिझ झालेले मराठी व्हिडिओज :
१. खणाची साडी कशी स्टाइल करायची : https://youtu.be/DSa50t10jQE
२. एक बेसिक ग्रे कुर्ता वापरून १० वेगवेगळ्या स्टाइल्स : https://youtu.be/gJG2ihXMTkw
३. स्टे होम लुक स्टायलिश : https://youtu.be/EunTdSlcjns
४. संक्रान्त स्पेशल काळ्या कपड्यांचे स्टायलिंग : https://youtu.be/CM81NMR6IYM
५. काळ्या साडीचे स्टायलिंग पार्ट १ : https://youtu.be/3VHKrvewzeA
6. काळ्या साडीचे स्टायलिंग ( पार्ट २ )
https://youtu.be/QQRYd2YQlRE

पण मुळात माझ्या चॅनलची सुरवात कशी झाली, थॉट प्रोसेस काय होती , याची छोटीशी जर्नी मला इथे शेअर करायला नक्कीच आवडेल !
नावात काय आहे ?
तर माझं चॅनल तसं नावाला मी २०१७ मधे सुरु केलं खरं पण २०२० ची लॉकडाउन फेज येई पर्यन्त मी एकही व्हिडिओ केला नव्हता, माझं इन्स्टाग्रॅम अकाउंट अपडेट ठेवणे एवढेच मला पुरेसे होते !
२०१० मधे लॉस एंजलिसला मुव्ह झाल्या पासून मी मेन्ली एंटरटेन्मेन्ट इंडस्ट्री , म्युझिक इंडस्ङ्री आणि फॅशन इंडस्ट्री रिलेटेड इव्हेंट्स करु लागले आणि माझ्या नावा बरोबरच माझ्या इन्स्टाग्रॅम नावालाही रेकग्निशन मिळालं !
२०१६ मधे मधे मी पॉप सिंगर पियामियाला ‘ग्लॅमर मॅगझिन’ च्या कव्हरपेज साठी आणि इतर बर्याच एडिटोरियल लुक्स साठी मेन्दी काढली आणि माझं ते मेन्दी डिझाइन , माझ्या इन्स्टाग्रॅम चं नावही एकदम व्हायरल झालं .
7B5DBDCA-CB6A-429D-BE64-16C53926091E.jpeg
या नंतर मी इतरही अनेक सेलिब्रिटी इव्हेंट्स केले , त्यात बियॉन्सी, शे मिचेल टोनी ब्रॅक्स्टन, इव्हन रेचल वुड इ. सेलिब्र्टिजच्या मेन्दीला बरच मिडिया रेकग्निशन मिळालं आणि मी दीपाली देशपांडे = ग्लोरी ऑफ हेना असं इक्वेशन बनलं , त्यामुळे मी सगळ्या सोशल मिडिया हॅडल्सना काही विचार न करता हेच नाव दिलं, ‘ग्लोरी ऑफ हेना’ , अर्थात युट्युबलाही !

39F19442-ACB4-4655-BF2E-63F086B8CA79.jpegचॅनलचा श्रीगणेशा
मी ज्या फिल्डमधे काम करते, त्या फिल्ड मधे तुमच्या खर्या नावा आधी लोक इन्स्टाग्रॅम हँडल विचारतात !
तुमचं काम, एक्स्पिरिअन्स, इव्हेंट्स, क्लाएंटेल या सगळ्या गोष्टीं मधे पोटेन्शिअल क्लाएंट्सना इंटरेस्ट असतो आणि ती माहिती लोक इन्स्टाग्रॅमवरच बघतात त्यामुळे अनेक मिनि व्हिडिओज मी फक्त इन्स्टाग्रॅमवरच टाकत होते , युट्युब ऑप्शनच्या बाबतीत मी कधीच फारसा उत्साह दाखवला नाही.
पण २०२० मधे मार्च एंड नंतर सगळी इक्वेशन्सच बदलली !
६ मार्चला मी डिस्नी स्टुडिओ मधे माझा २०२० चा शेवटचा कॉर्पोरेट मेंदी इव्हेंट केला.
डिस्नीनी पहिले देशी अ‍ॅनिमेटेड डिटेक्टिव कॅरॅक्टर ‘मीरा , द रॉयल डिटेक्टिव्ह ‘ , इंट्रोड्युस करताना सेलिब्रेशन म्हणून हा कॉर्पोरेट इव्हेंट ठेवला होता.
त्या इव्हेंटला करोना ची भिती /चर्चा नुकतीच सुरु झाली होती , ‘आपल्या लॉस एंजलिस मधे इथे एकही केस नाही, इतकच समाधान लोक व्यक्त करत होते पण एप्रिल सुरु झाला आणि हळुहळु सगळच गंभीर होत गेलं.
माझ्या सारख्या सगळ्याच फ्रीलान्स अर्टिस्ट्सना मोठा ब्रेक घ्यावा लागला, ज्या कामात सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य नाही त्यातून तात्पुरता ब्रेक घेणे हेच शहाणपणाचे होते.
पँडेमिकच्या गंभीर वातावरणात स्वतःला पॉझिटिव आणि बिझी ठेवण्यासाठी अनेक नव्या गोष्टी सुरु केल्या पण फायनली हे पूर्ण वर्ष असच जाणार, ऑल सेलिब्रेशन्स /फेस्टिवल्स आर अबाउट सेलिब्रेटिंग अ‍ॅट होम हे रिअलाइझ झाल्यावर फायनली ऑक्टोबरमधे मुहुर्त लागला माझ्या पहिल्या स्टायलिंग युट्युब व्हिडिओला ‘नवरात्री आउटफिट्स‘.
त्यावेळी समजलं कि माझ्या ‘ग्लोरी ऑफ हेना’नावाने अनेकांनी चॅनल्स सुरु केली म्हणून मग मला ‘ग्लोरी ऑफ हेना ऑफिशिअल’ हे अ‍ॅड करावं लागलं !
या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स मिळाल्यावर मी माझ्या इतर हॉबीज क्राफ्ट्स, कुकिंग, मेंदी क्रस्फ्ट्स या विषयांनाही चॅनलवर इन्क्लुड केले पण स्टायलिंग व्हिडिओजना , त्यात मराठी स्टायलिंग व्हिडिओजना सर्वात चांगला रिस्पॉन्स मिळाला.
स्टायलिंग व्हिडिओज का ?
जरी या क्षेत्रात फॉर्मल शिक्षण घेतले नसले तरी मी माझ्या इव्हेंट्सच्या निमित्ताने गेले १० वर्ष याच क्षेत्रात वावरते, इंडस्ट्रीतल्या टॉपमोस्ट स्टायलिस्ट्स्/मॉडेल्स/मेकप अर्टिस्ट्सची/हेअर अर्टिस्टची कामं अगदी जवळून बघते , टिम म्हणून अनेक इव्हेंट्सना त्यांच्याबरोबर एकत्रं काम करते आणि शिकते.
याशिवाय लहानपणापासून ही माझी हॉबी/पॅशन आहे, कुठल्याही इव्हेंट्सना जाताना माझ्यासाठी एकच अ‍ॅट्रॅक्शन असतं, ते म्हणजे ड्रेसिंग अप्/स्टायलिंग त्यामुळे युट्युबच्या निमित्ताने माझ्या स्टायलिंग टिप्स, मेन्ली इंडो वेस्टर्न फॅशन , माझ्या क्षेत्रातली वेगळी लाइफस्टाइल याबद्दल मराठी ऑडियन्सला सांगणे हा माझा मेन उद्देश असेल !
याचा अर्थ असा नाही कि मी माझ्या मेन प्रोफेशन ‘मेन्दी ‘ बद्दल व्हिडिओज टाकणार नाही, तेही टाकणारच आहे पण त्यासाठी माझे इन्स्टाग्रॅम अकाउंटही आहे !
मच रिक्वेस्टेड ‘ हेना कँडल्स ट्युटोरियल’ व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे : https://youtu.be/9habwefU6Us

तर माझ्या या नव्या अ‍ॅडव्हेंचरला तुम्हाला या टॉपिक्स बद्दल आवड असेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि मित्र मैत्रीणींशी शेअर करा !
Glory of Henna Official : https://youtube.com/channel/UCgiWJZMwRX5gnSRSUTbCx9Q

Group content visibility: 
Use group defaults

थँक्स सगळ्यांना!
अनु,
तो दुपट्ट्यावर बुध्दाचा चेहरा नाही , कथकली डान्स मधला रावण आहे Happy

ओह. माझ्या डोक्यात का कोणास ठाऊक बुद्धा होता. हल्ली बुद्धा प्रिंट चे ब्लाऊज, बॅग्स खूप बघतेय फेसबुक सजेशन्स मुळे, त्यामुळे असेल. (बाकी नजर ठिक आहे हो Happy )

नवा व्हिडीओ पाहिला. आवडला. मुळात मला काळी प्लेन साडी आवडत नाही. ़काठ, पदर, बुट्टे वगैरे असलेले आवडतात. तरी सगळी साडी निर्‍या करुन वेगळ्या ओढणीचा पदर घेण्याची आयडीया जाम आवडली आहे. एक खरं आहे ह्या काँबोला प्लेन साडीच पाहिजे.

थँक्स शुगोल !
साडी विथ ओढणीला प्लेन साडीच हवी असं नाही, पण प्लेन साडी असेल तर काँबिनेश्न्स करायला भरपूर चॉइस मिळतो .
जर साडी प्रिंटेड असेल तर दुपट्टा प्लेन /साडीचा काठाशी मॅच होणारा घेऊ शकतो किंवा सेम बुट्टी असलेला /सेम फॅब्रिक किंवा काँप्लिमेन्टरी फॅब्रिकचा .
साडी आणि दुपट्टा सुध्दा प्रिंटेड असेल तर ‘प्रिंट ऑन प्रिंट‘ मिक्स करायचे बेसिक अ‍ॅस्थेटिक रुल्स फॉलो करायचे, मी करणार आहे यावर एक व्हिडिओ.

खूप छान माहिती देत आहेस दिपांजली. नक्कीच आवडेल बघायला.

नी चा नेकलेस आवडल्याचं सांगायचे राहूनच गेले. तिच्या धाग्यावर लिहीते सवडीने.

मीही तुमचे काही व्हिडीओ बघितले, आणि सर्वात जास्त काय आवडलं माहित आहे, तर तुमचे खणखणीत आवाजात स्वच्छ, अस्खलित मराठी बोलणे. आवश्यक त्यावेळेसच इंग्रजी शब्द येतात. पुढच्या वाटचालींसाठी शुभेच्छा!!!

वॉव. खूप भारी झालाय हा व्हिडीओ.

तू startingला मोत्याचे दागिने घातलेत काळ्या साडीवर ते जबरदस्त दिसतंय.

प्रत्येक स्टाईलबद्दल सांगताना, कित्ती छान ओघवतं बोलतेस.

नीचा नेकलेस घालून केलेला लुक जास्त आवडला पहिल्या तीनमध्ये, तसे सगळेच आवडले पण तो अति आवडला आणि कथकली प्रिंट ओढणी लुक अप्रतिम, त्यातला नेकलेसही फार सुरेख.

माझ्या चॅनलवर नवीन व्हिडिओ ,काळ्या साडीचे स्टायलिंग ( पार्ट २ )
https://youtu.be/QQRYd2YQlRE
मागच्या भागात स्टेटमेन्ट नेकलेस आणि स्टेटमेन्ट दुपट्टा यावर फोकस केलं, या एपिसोडमधे काळी साडी विथ व्हरायटी ऑफ टॉप्स अँड जॅकेट्स यावर फोकस आहे.
आवडला तर लाइक करा आणि शेअर करा Happy
नुकतेच २०० सबस्क्रायबर्स होऊन गेले, एक छोटासा टप्पा गाठलाय ,ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राइब केलय त्या सर्वांना थँक्स !
तसच खणाच्या साडीच्या व्हिडिओला १३हजार पेक्षा जास्त व्ह्युज मिळालेत, त्या बद्दलही थॅंक्स !

मस्त आहे हा व्हिडीओ.
यातले काही लुक्स, हाय लो जॅकेट, ब्रोकेड टॉप वगैरे आवडले.
बाकीही तुझ्यावर सूट होतच आहेत.

सगळे व्हिडीओज पाहिले, आवडले. चॅनल सबस्क्राईब पण केलं. खणाची साडी अत्यंत आवडता प्रकार. सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे. एक प्रश्न: यावर सूट होणारी ऑक्साईड ची ज्वेलरी कुठे मिळते? फक्त ऑनलाइन च मागवावी लागेल का? लोकल मार्केट मध्ये एवढी छान मिळत नाही.

सान्वी,
ऑक्सिडाइज्ड ज्युलरी माहिती पाठवतेय वि.पु मधे.

आहाहा अप्रतिम झालाय हा ही व्हिडीओ डीजे.

मला सगळेच आवडले. तू सर्वच छान कॅरी करतेस आणि तुला सर्वच सूट होतं आणि तुला सुचतंही छान. जबरदस्त एकदम.

ऑक्सिडाईज ज्वेलरी विकणारे सध्या खूप सेलर्स पुण्यात आहेत.नुसते फेसबुकवर सर्च केले तरी बरेच मिळतील.(सध्या प्रसिद्ध असल्याने मीनल ठिपसे हे एकच नाव आठवतेय. दिपंजाली(जाऊदे मोबाईल वरून आता घाईत हा साधा शब्द पण चुकतोय) ने सुचवलेली बाई पण चांगली आहे.)

तू सर्वच छान कॅरी करतेस आणि तुला सर्वच सूट होतं आणि तुला सुचतंही छान. जबरदस्त एकदम.>>खरंच. मस्त वाटलं. विशेषतः आवाज व वर्णन अगदी सुरेख.

तुमचे सगळे व्हिडिओ मस्त आहे. ब्लॅक माझा आवडता रंग असल्याने ब्लॅक साडी वरचे दोन्ही व्हिडिओज आवडलेत.
माझ्याकडे सगळ्या प्रकारचे lehnga choli आहेत. स्पेशल राजस्थान वरून आणलेला..गुजरात वरून आणलेला..केरळ वरून आणलेला south indian टाइप.. आपला लाल हिरवा कॉम्बिनेशन असलेला regular.. गुलाबी गोल्डन..गुलाबी पिवळा.. orange purple..almost सगळेच प्रकार आणि सगळेच कलर आहेत.
पुढच्या महिन्यात एका लग्नात जायचं आहे त्यात यातला एखादा ट्राय करावा असं वाटतं आहे. पण नेमके सगळे कुठे ना कुठे घातल्या गेले त्यामुळे थोड mismatch करून नवीन काहीतरी लेहंगा चोळी पॅटर्न करावा असा विचार आहे..
तुम्हाला शक्य झाल्यास lehnga choli styling वर एक व्हिडिओ बनवा ना. ज्यात जूने वापरून नवीन काहीतरी styling करता येईल.

थँक्स अमृताक्षर,
करणार आहे यावरही व्हिडिओ.
तुझ्या लेहंगा चोली वरचा फक्तं लेहंगा विथ डिफरंट टॉप्स /शर्ट्स्/कॉर्सेट फिटिंग टॉप्स वगैरे .
चोली दुपट्टा विथ साडी अशा प्रकारची ट्राय करु शकतेस काँबो.

आय मेक अप हा प्रकार फार क्लिष्ट वाटल्याने त्याच्या वाटेसच गेलेले नाही. पण आय मेक अप ने इतका प्रचंड फरक पडतो ना. प्लीज तुम्ही जर मेक अप विषयातही निष्णात असाल तर एक व्हिडीओ जरुर करा याविषया वरती. माझ्यासारख्या अनेकजणींना फायदा होऊ शकेल. त्यात आता मास्कसमुळे डोळेच ऊठून दिसतात Happy हाहाहा

हो खरचं आय मेकअप सोबतच पूर्ण फेस मेकअप वर बनवला तरी चालेल. माझ्या सारख्या कधीच मेकअप न करणाऱ्या पण कधीतरी मेकअप ट्राय करायची इच्छा असणाऱ्या मुलींना मदत होईल. मी तर खुपचं ढ आहे मेकअप मधे..काजळ आणि थोड लिपस्टिक हाच माझा युनिव्हर्सल मेकअप आहे. Lol

Pages