कालच केदार जाधव यांच्या चॅनल बद्दल थ्रेड पाहिला आणि मलाही माझ्या नुकत्याच सुरु केलेल्या युट्युब चॅनलबद्दल लिहायचं इन्स्पिरेशन मिळालं!
मायबोलीवर बर्याच जणांना ऑलरेडी माहित असेलच, व्यवसायाने मी मेंदी/बॉडी पेंटिंग अर्टिस्ट आहे आणि काहींना माझी पॅशन फॉर स्टायलिंग्/फॅशनही माहित असेल !
या सगळ्याची सफर माझ्या चॅनलवर , ‘ग्लोरी ऑफ हेना ऑफिशिअयल’ वर पहायला मिळेल !
चॅनल वर अधुन मधुन इंग्लिश व्हिडिओजही येतील पण मुख्यतः मराठी व्हिडिओज असतील .
अत्ता पर्यंत रिलिझ झालेले मराठी व्हिडिओज :
१. खणाची साडी कशी स्टाइल करायची : https://youtu.be/DSa50t10jQE
२. एक बेसिक ग्रे कुर्ता वापरून १० वेगवेगळ्या स्टाइल्स : https://youtu.be/gJG2ihXMTkw
३. स्टे होम लुक स्टायलिश : https://youtu.be/EunTdSlcjns
४. संक्रान्त स्पेशल काळ्या कपड्यांचे स्टायलिंग : https://youtu.be/CM81NMR6IYM
५. काळ्या साडीचे स्टायलिंग पार्ट १ : https://youtu.be/3VHKrvewzeA
6. काळ्या साडीचे स्टायलिंग ( पार्ट २ )
https://youtu.be/QQRYd2YQlRE
पण मुळात माझ्या चॅनलची सुरवात कशी झाली, थॉट प्रोसेस काय होती , याची छोटीशी जर्नी मला इथे शेअर करायला नक्कीच आवडेल !
नावात काय आहे ?
तर माझं चॅनल तसं नावाला मी २०१७ मधे सुरु केलं खरं पण २०२० ची लॉकडाउन फेज येई पर्यन्त मी एकही व्हिडिओ केला नव्हता, माझं इन्स्टाग्रॅम अकाउंट अपडेट ठेवणे एवढेच मला पुरेसे होते !
२०१० मधे लॉस एंजलिसला मुव्ह झाल्या पासून मी मेन्ली एंटरटेन्मेन्ट इंडस्ट्री , म्युझिक इंडस्ङ्री आणि फॅशन इंडस्ट्री रिलेटेड इव्हेंट्स करु लागले आणि माझ्या नावा बरोबरच माझ्या इन्स्टाग्रॅम नावालाही रेकग्निशन मिळालं !
२०१६ मधे मधे मी पॉप सिंगर पियामियाला ‘ग्लॅमर मॅगझिन’ च्या कव्हरपेज साठी आणि इतर बर्याच एडिटोरियल लुक्स साठी मेन्दी काढली आणि माझं ते मेन्दी डिझाइन , माझ्या इन्स्टाग्रॅम चं नावही एकदम व्हायरल झालं .
या नंतर मी इतरही अनेक सेलिब्रिटी इव्हेंट्स केले , त्यात बियॉन्सी, शे मिचेल टोनी ब्रॅक्स्टन, इव्हन रेचल वुड इ. सेलिब्र्टिजच्या मेन्दीला बरच मिडिया रेकग्निशन मिळालं आणि मी दीपाली देशपांडे = ग्लोरी ऑफ हेना असं इक्वेशन बनलं , त्यामुळे मी सगळ्या सोशल मिडिया हॅडल्सना काही विचार न करता हेच नाव दिलं, ‘ग्लोरी ऑफ हेना’ , अर्थात युट्युबलाही !
चॅनलचा श्रीगणेशा
मी ज्या फिल्डमधे काम करते, त्या फिल्ड मधे तुमच्या खर्या नावा आधी लोक इन्स्टाग्रॅम हँडल विचारतात !
तुमचं काम, एक्स्पिरिअन्स, इव्हेंट्स, क्लाएंटेल या सगळ्या गोष्टीं मधे पोटेन्शिअल क्लाएंट्सना इंटरेस्ट असतो आणि ती माहिती लोक इन्स्टाग्रॅमवरच बघतात त्यामुळे अनेक मिनि व्हिडिओज मी फक्त इन्स्टाग्रॅमवरच टाकत होते , युट्युब ऑप्शनच्या बाबतीत मी कधीच फारसा उत्साह दाखवला नाही.
पण २०२० मधे मार्च एंड नंतर सगळी इक्वेशन्सच बदलली !
६ मार्चला मी डिस्नी स्टुडिओ मधे माझा २०२० चा शेवटचा कॉर्पोरेट मेंदी इव्हेंट केला.
डिस्नीनी पहिले देशी अॅनिमेटेड डिटेक्टिव कॅरॅक्टर ‘मीरा , द रॉयल डिटेक्टिव्ह ‘ , इंट्रोड्युस करताना सेलिब्रेशन म्हणून हा कॉर्पोरेट इव्हेंट ठेवला होता.
त्या इव्हेंटला करोना ची भिती /चर्चा नुकतीच सुरु झाली होती , ‘आपल्या लॉस एंजलिस मधे इथे एकही केस नाही, इतकच समाधान लोक व्यक्त करत होते पण एप्रिल सुरु झाला आणि हळुहळु सगळच गंभीर होत गेलं.
माझ्या सारख्या सगळ्याच फ्रीलान्स अर्टिस्ट्सना मोठा ब्रेक घ्यावा लागला, ज्या कामात सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य नाही त्यातून तात्पुरता ब्रेक घेणे हेच शहाणपणाचे होते.
पँडेमिकच्या गंभीर वातावरणात स्वतःला पॉझिटिव आणि बिझी ठेवण्यासाठी अनेक नव्या गोष्टी सुरु केल्या पण फायनली हे पूर्ण वर्ष असच जाणार, ऑल सेलिब्रेशन्स /फेस्टिवल्स आर अबाउट सेलिब्रेटिंग अॅट होम हे रिअलाइझ झाल्यावर फायनली ऑक्टोबरमधे मुहुर्त लागला माझ्या पहिल्या स्टायलिंग युट्युब व्हिडिओला ‘नवरात्री आउटफिट्स‘.
त्यावेळी समजलं कि माझ्या ‘ग्लोरी ऑफ हेना’नावाने अनेकांनी चॅनल्स सुरु केली म्हणून मग मला ‘ग्लोरी ऑफ हेना ऑफिशिअल’ हे अॅड करावं लागलं !
या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स मिळाल्यावर मी माझ्या इतर हॉबीज क्राफ्ट्स, कुकिंग, मेंदी क्रस्फ्ट्स या विषयांनाही चॅनलवर इन्क्लुड केले पण स्टायलिंग व्हिडिओजना , त्यात मराठी स्टायलिंग व्हिडिओजना सर्वात चांगला रिस्पॉन्स मिळाला.
स्टायलिंग व्हिडिओज का ?
जरी या क्षेत्रात फॉर्मल शिक्षण घेतले नसले तरी मी माझ्या इव्हेंट्सच्या निमित्ताने गेले १० वर्ष याच क्षेत्रात वावरते, इंडस्ट्रीतल्या टॉपमोस्ट स्टायलिस्ट्स्/मॉडेल्स/मेकप अर्टिस्ट्सची/हेअर अर्टिस्टची कामं अगदी जवळून बघते , टिम म्हणून अनेक इव्हेंट्सना त्यांच्याबरोबर एकत्रं काम करते आणि शिकते.
याशिवाय लहानपणापासून ही माझी हॉबी/पॅशन आहे, कुठल्याही इव्हेंट्सना जाताना माझ्यासाठी एकच अॅट्रॅक्शन असतं, ते म्हणजे ड्रेसिंग अप्/स्टायलिंग त्यामुळे युट्युबच्या निमित्ताने माझ्या स्टायलिंग टिप्स, मेन्ली इंडो वेस्टर्न फॅशन , माझ्या क्षेत्रातली वेगळी लाइफस्टाइल याबद्दल मराठी ऑडियन्सला सांगणे हा माझा मेन उद्देश असेल !
याचा अर्थ असा नाही कि मी माझ्या मेन प्रोफेशन ‘मेन्दी ‘ बद्दल व्हिडिओज टाकणार नाही, तेही टाकणारच आहे पण त्यासाठी माझे इन्स्टाग्रॅम अकाउंटही आहे !
मच रिक्वेस्टेड ‘ हेना कँडल्स ट्युटोरियल’ व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे : https://youtu.be/9habwefU6Us
तर माझ्या या नव्या अॅडव्हेंचरला तुम्हाला या टॉपिक्स बद्दल आवड असेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि मित्र मैत्रीणींशी शेअर करा !
Glory of Henna Official : https://youtube.com/channel/UCgiWJZMwRX5gnSRSUTbCx9Q
थँक्स राधिका.
थँक्स राधिका.
Shitalkrishna,
सॉरी तुझा प्रश्न मिस केला होता.
ऑक्सिडाइझ्ड ज्युलरी २-३ व्हिडिओज मधे आहे, कुठल्या स्पेसिकिफ व्हिडिओ बद्दल असेल तर सांग.
जनरली मी प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधे टाकते.
खणाच्या साडीवरची ज्युलरी पुण्याच्या एका साडी व्हेंडरकडून घेतली आहे, माहिती हवी असेल तर सांगु शकते.
इतर ओक्सिडाइझ्ड ज्युलरी क्लोव्हर सेंटर, कँप .
हार्दिक अभि नंदन. मला तुमच्या
हार्दिक अभि नंदन. मला तुमच्या अचीव्ह मेंट्स व क्रिएटिविटी बद्दल अतिशय आदर आहे. व पुण्याची मुलगी म्हणून अभिमान सुद्धा वाटतो.
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
एक एपिसोड पर्फ्युम्स वर पण करा स्टाइलचे ते महत्वाचे अंग आहे. अ लुक इज नॉट फिनिश्ड टिल यु स्मेल ग्रेट.
हेना कँडल्स ट्युटोरियल आवडले.
हेना कँडल्स ट्युटोरियल आवडले.
वा! अभिनंदन आणि खूप शुभेछा !
वा! अभिनंदन आणि खूप शुभेछा !
अभिनंदन दिपाली आणि खूप
अभिनंदन दिपाली आणि खूप शुभेच्छा तुझ्या युट्यूब चॅनलसाठी. सबस्क्राईब केले.
थँक्स अमा, देवकी, रावी आणि
थँक्स अमा, देवकी, रावी आणि सियोना !
अमा,
फ्रेग्रन्स विषयातली मी तज्ञ नाही, तुम्ही कराल का कोलॅब एखाद्या व्हिडिओ साठी ? अॅक्चुअली तुमचा स्वतःचा व्हिडिओ करा, आवडेल पहायला, वेगळेच विश्व आहे तुमचं !
मला सगळे परफ्युम्ज जमत नाहीत अॅलर्जीज इश्युजमुळे, फक्त २ च फ्रेग्रन्स मनापासून जमतात , ‘टॉम फोर्ड सोले ब्लांक’ आणि ‘मिस डिऑर अॅब्सोल्युट्ली ब्लुमिंग’
टॉम फोर्ड काउंटरवर मागच्या विंटर नेहेमी प्रमाणे ‘सोले ब्लांक’ घेतला तर काउंटर वरच्या एक्स्पर्टने विचारलं मला कि हा समरी फ्रेग्रन्स का घेताय , ‘सोले नेज’ घे सांगितलं, जो विंटर फ्रेग्रन्स आहे पण मला अजिबातच जमला नाही तो विंटरी फ्रेग्रन्स !
अभिनंदन आणि शुभेच्छा दिपांजली
अभिनंदन आणि शुभेच्छा दिपांजली, ह्या सर्व सेलिब्रिटी अनुभवांवर लिहिलेलं वाचायला आवडेल.
थँक्स लंपन,
थँक्स लंपन,
प्रयत्न करेन लिहायचा किंवा चॅनलवर व्हिडिओज मधे थोडक्यात सांगायचा.
खूप पर्सनल गोष्टी नाही सांगता येणार ‘एन.डि.ए’ मुळे पण एक अनुभव म्हणून नक्की सांगीन.
दीपांजली खणाच्या साडीवरील
दीपांजली खणाच्या साडीवरील ज्वेलरी.. कोल्हापुरी साज
Hello everyone,
Hello everyone,
संक्रांतीला येणार्या स्पेशल स्टायलिंग व्हिडिओचा हा प्रोमो ,
https://youtu.be/HF8ScN5AXPI
१४ तारखेला पहायला विसरु नका , ‘ब्लॅक कलर इंडियन आउटफिट हॅक्स’ , संक्रान्त स्पेशल एपिसोड !
दिपाली oxidized ठुशी आणि
दिपाली oxidized ठुशी आणि कोल्हापुरी साज पुण्यात कुठे घेतले?
Shital, Siyona Check vi.pu.
Shital, Siyona
Check vi.pu.
दिपांजली विपु बघ.
दिपांजली विपु बघ.
छान आहेत व्हिडीओज. खूप
छान आहेत व्हिडीओज. खूप शुभेच्छा.
संक्रांत स्पेशल एपिसोड :
संक्रांत स्पेशल एपिसोड : https://youtu.be/CM81NMR6IYM
काळ्या कपड्यांचं स्टायलिंग (मॉडर्न ब्लॅक ड्रेसेस विथ ट्रॅडिशनल ट्विस्ट /इंडियन आउटफिट हॅक्स )
नक्की पहा आणि मित्रमैत्रीणींशी शेअर करा !
दिपाली, एकदम फॅन या व्हिडीओ
दिपाली, एकदम फॅन या व्हिडीओ ची.तुझ्यावर सर्वच लूक छान दिसतायत.पण मला हिरवा काळा लूक आणि ब्लॅक पर्ल वाला लूक सर्वात आवडला.
तसंच आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे प्रत्येक नव्या व्हिडीओ बरोबर तुझ्या आवाजात जास्त जिव्हाळा,आपुलकी वाढते आहे.पहिल्या मराठी व्हिडिओत आवाज फॉर्मल होता.आता कोणीतरी गुजगोष्टी करत पण सहसा आपल्याला कोणी मुद्दाम येऊन सांगणार नाही अश्या खूप महत्वाच्या गोष्टी आणि टिप्स सांगतंय असं वाटतं.
वेगवेगळ्या प्रकारचे(पेन्सिल, बॅलेरिना,फ्लॅट,मेरी जेन,कोल्हापुरी,बुट्स इत्यादी) शूज आणि त्यांचं ड्रेस बरोबर पेअरिंग यासाठी एक वेगळा व्हिडिओ हवा अशी फर्माईश.
मला पण या व्हिडिओतलं बोलणं
मला पण या व्हिडिओतलं बोलणं आणि वावर जास्त सहज वाटला. काळे ड्रेस अति फेवरीट त्यामुळे बहुतेक सगळेच आवडले. सोनम लूक, बॉलिवुड रेट्रो आणि ग्रीन -ब्लॅक फ्युजन हे सगळ्यात जास्त आवडले.
मस्त झालाय हा व्हिडीओ. सगळे
मस्त झालाय हा व्हिडीओ. सगळे लुक्स आवडले. तुझं बोलणं आणि वावर याबद्दल अनुला अनुमोदन.
अजून अजून छान होत चाललंय.
अनु,
अनु,
थँक्स अ लॉट या फिडबॅकबद्दल , शुज कलेक्शन सजेशन बद्दलही !
थँक्स नी, एम्टी.
सिम्प्ली ऑस्सम संक्रांत
सिम्प्ली ऑस्सम संक्रांत स्पेशल!!! काळा माझा लाडका रंग आहे. रेट्रो बॉलीवुड लुक फार आवडला.
रॉ ग्रे सिल्क हा माझाही आवडता रंग आहे.
थँक्स , सामो !
थँक्स , सामो !
पुढच्या व्हिडिओचा शुटिंग
पुढच्या व्हिडिओचा शुटिंग पार्ट झालाय , लुक्स लाइक २ किंवा कदाचित ३ पार्ट्स मधे डिव्हाइड करावा लागेल!
एक्सायटेड आहे आवडता विषय आहे
पहिला पार्ट ३ /४ दिवसात टाकेन.
संक्रांत स्पेशल एपिसोड :
संक्रांत स्पेशल एपिसोड : https://youtu.be/CM81NMR6IYM>>>> हा व्हिडिओ जास्त आवडला.
दिपांजली, सगळे व्हिडीओ आवडले.
दिपांजली, सगळे व्हिडीओ आवडले. खणाच्या साडीत आणि ऑक्सीडाइज्ड ज्युलरीत मला खूप इंटरेस्ट आहे. दोन्ही पुण्यात कुठे उपलब्ध आहेत?
तसंच ग्रे कुडत्यावर विविध प्रकारचं ड्रेपींग अगदीप भारी आणि करणेबल वाटलं.
तू सगळं खूप छान कॅरी करतेस.
>>>>तू सगळं खूप छान कॅरी
>>>>तू सगळं खूप छान कॅरी करतेस.>>> खरच!!! १००% खरे आहे.
थँक्स शुगोल आणि सामो.
थँक्स शुगोल आणि सामो.
मी पुण्याहून शीतल फटक यांच्याकडून मागवलं साडी/ज्युलरी.
तिची माहिती वि.पू, मधे पाठवतेय.
माझ्या चॅनल वर नवीन व्हिडिओ :
माझ्या चॅनल वर नवीन व्हिडिओ : काळ्या साडीचे स्टायलिंग पार्ट १ : https://youtu.be/3VHKrvewzeA
यात स्टेटमेन्ट नेकलेस आणि दुपट्टा हे टॉपिक्स कव्हर केलेत, नी चे कस्टम नेकलेस सुध्दा इनक्लुड केलय ! .
पुढच्या आठवड्यात पुढचा पार्ट येईल , नक्की पहा आणि शेअर करा
छान झालाय व्हिडिओ
छान झालाय व्हिडिओ
ओशन नेकलेस सोडून बाकी सर्व लुक्स आवडले.
बुद्धा दुपट्टा वाला लूक जबरदस्त जमलाय.
ऑक्सिडाईज लूक पण मस्त दिसतोय.
अनु +१
अनु +१
विशेषतः नीधपने डिझाइन केलेला नेकलेस सुंदर दिसतोय साडीवर. आणि बुद्धा दुपट्टाही मस्तच दिसतोय.
तू सगळं खूप छान कॅरी करतेस.>>
तू सगळं खूप छान कॅरी करतेस.>>>>> अगदी अगदी!
Pages